२१ मे, दिवस १४१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १६८१ ते १६९२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२१ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण



हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २१ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २१ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६८१ ते १६९२ चे पारायण आपण करणार आहोत.
२१ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३५१ ते ३७५,

351-11
ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणे मृत्यु लपे । तो मी एथे अहाळबाहळी कांपे । ऐसे तुवा केले ॥351॥
ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रूद्र भितो, ज्या मला भिऊन मृत्युदेखील तोंड लपवितो. त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा, असा विश्वरूप तू झाला आहेस.
352-11
परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणे हारी । भयासि आणी ॥352॥
पण याला विश्वरूप हे जरी नाव आहे, तरी भगवंता ! ही विलक्षण महामारी आहे. हे विश्वरूप, आपल्या भयंकर विक्राळ स्वरूपामूळे साक्षात भयालाही हार खायला लावणारे आहे.

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥11. 24॥

अर्थ हे विष्णो, गगनाला स्पर्श करणारा, दीप्रिमान, अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेला, दीप्तिमान व विशाल नेत्र असलेला, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकूळ झाला आहे असा मी धैर्य धारण करू शकत नाही व शांति देखील धरू शकत नाही. ॥11-24॥
353-11
ठेली महाकाळेंसि हटेतटे । तैसी किती{ए}के मुखे रागिटे । इही वाढोनिया धाकुटे । आकाश केले ॥353॥
तुझी कित्येक क्रुध्द मुखें, जणुंकाय महाकाळाशी पैज मारून आहेत, तशु रागीट आहेत, त्यांनी आपल्या विस्तृतपणाने आकाशालाहि लहान केले आहे.
354-11
गगनाचेनि वाडपणे नाकळे । त्रिभुवनीचियाही वारिया न वेटाळे ययाचेनि वाफा आगी जळे । कैसे धडाडीत असे ॥354॥
ही अफाट वाढलेली मुखे एवढ्या विस्तीर्ण आकाशांतहि सामावत नाहीत. त्रिभुवनात वाहणारा वारादेखील त्यांना वेटाळू शकत नाही. त्यांच्या वाफेने अग्निदेखील जळू शकेल, अशी प्रज्वलित आहेत.
355-11
तेवीचि एकसारिखे एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो का जे प्रळयी सावावो लाहे । वन्ही ययाचा ॥355॥
त्याचप्रमाणे सर्व मुखे एकसारखी नसून त्यांचे वर्णहि भिन्न भिन्न आहेत, जणु काय प्रलकाली आग्नीला याचेच सहाय्य मिळते.

356-11
जयाचिये आंगीची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । की तयाही तोंडे आणि तोंडी । दात दाढा ॥356॥
ज्यांच्या अंगाचे तेज एवढे भयंकर आहे की, जे त्रैलोक्याची राखरांगोळी करील. त्यातहि आणखी तोंडे असून, त्या तोंडात भयंकर दाढा दात आहेत.
357-11
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र की महापुरी पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥357॥
जणु काय वार्‍याला धनुर्वात झाला किंवा समुद्र महापुरांत पडला अथवा विषरूपी अग्नि, समुद्रात असलेल्या वडवाग्नीला मिळून, मारण्याला प्रवृत्त झाला.
358-11
हळाहळ आगी पियाले । नवल मरण मारा प्रवर्तले । तैसे संहारतेजा या जाहले । वदन देखा ॥358॥
किंवा अग्नीने हलाहल विष प्राशन केले किंवा स्वतः मरणच मारायला प्रवृत्त झालें. त्याप्रमाणे या सृष्टिचा संहार करणार्‍या या अंगाच्या तेजाला, तुझी मुखे आणखी सहाय्यभूत झाली आहेत.
359-11
परी कोणे माने विशाळ । जैसे तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेले ॥359॥
पण ही तुझी मुखे कशाप्रमाणे अशी विशाल पसरलेली आहेत, असे म्हणशील, तर ज्याप्रमाणे अंतराळ तुटून आकाशात जणु काय भगदाड पडले आहे.
360-11
नातरी काखे सूनि वसुंधरी । जै हिरण्याक्षु रिगाला विवरी । तै उघडले हाटकेश्वरी । जेवी पाताळकुह र ॥360॥
किंवा जेंव्हा हिरण्याक्ष राक्षस, पृथ्वी खाकेत मारून पाताळांत जाण्याकरिता समुद्राच्या विवराने शिरला, तेव्हा, ज्याप्रमाणे पाताळांतील हिटकेश्वराने पाताळाचे विवर खुले केले
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

361-11
तैसा वक्त्रांचा विकाशु । माजी जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घासु । न भरीचि कोंडे ॥361॥
त्याप्रमाने तोंडे पसरलेली आहेत व त्यामधे जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांचा घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही.
362-11
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारी । गरळज्वाळा लागती अंबरी । तैसी पसरलिये वदनदरी । माजी हे जिव्हा ॥362॥
आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही (प्रत्येक) वदनरूपी दरीत पसरली आहे.
363-11
काढूनि प्रळयविजूंची जुंबाडे । जैसे पन्नासिले गगनाचे हुडे । तैसेआवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥363॥
प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत.
364-11
आणि ललाटपटाचिये खोळे । कैसे भयाते भेडविताती डोळे । हो का जे महामृत्यूचे उमाळे । कडवसा राहिले ॥364॥
आणि ललाटारूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावित आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भिवयांच्या) अंधारात राहिले आहेत.
365-11
ऐसे वाऊनि भयाचे भोज । एथ काय निपजवू पाहातोसि काज । ते नेणो परी मज । मरणभय आले ॥365॥
असे हे महाभयाचे (मृत्यूचे) कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पहातोस ते मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे.

366-11
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलो प्रतिफळे । बापा देखिलासि आता डोळे । निवावे तैसे निवाले ॥366॥
अहो देवा, विश्वरूप पहाण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले आहे.
367-11
अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आता चैतन्य माझे विपाये । वाचे की न वाचे ॥367॥
अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच. त्याची काळजी कोणी केली आहे ? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे.
368-11
एऱ्हवी भयास्तव आंग कांपे । नावेक आगळे तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥368॥
भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धि दचकते आणि अभिमान विगलित होतो.
369-11
परी येतुलियाही वेगळा केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥369॥ ।
जो परंतु या सर्वाहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले.
370-11
बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपाये नांदे ॥370॥
काय आश्चर्य आहे ? विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता ? त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच असेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

371-11
देवा तुझ्या ये दर्शनी । जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी । ते सावरावयालागी गंवसणी । धैर्याची करितसे ॥371॥
देवा ! या तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझ्या मनात जी काही व्याकुळता उत्पन्न झाली, ती सावरण्याकरिता मी धैर्याची खोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
372-11
तव माझेनि नामे धैर्य हारपले । की तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहले । हे असो परि मज भले आतुडविले । उपदेशा इया ॥372॥
तेव्हा माझ्या ‘अर्जुन’ या नावाचे धैर्य नाहीसे झालें; कारण विश्वरूपाचे दर्शन धैर्याच्या मर्यादांपेक्षाही श्रेष्ठ झाले हे असो, पण तुम्ही मला या उपदेशाने-म्हणजे विश्वरूप दर्शनाने-बरे संकटांत टाकलें.
373-11
जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धावाधावी करितसे बापुडा । परि सोयही कवणेकडा । न लभे एथ ॥373॥
बापडा माझा जीव निर्धास्त होऊन विश्रांती मिळावी म्हणून सर्वत्र धावाधाव करीत आहे; पण या विश्वरूपात तशी सोय कोठेहि प्राप्त होत नाही.
374-11
ऐसे विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेले आहे चराचरी । जी न बोले तरि काय करी । कैसेनि राहे ? ॥374॥
याप्रमाणे या विश्वरूपाच्या महामारींत सर्व स्थावरजंगम जीवाचे जीवित्व नाहिसे झाले आहे. देवा ! हे बोलू नये, पण काय करू बोलण्यावाचून राहवत नाही.
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म
प्रसीद देवेश जगन्निवास ॥11. 25॥

अर्थ दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे (दिसणारी) तुझी मुखे पाहून (मी इतका गर्भगळित झालो आहे की) मला दिशाभूल झाली आहे, मला काही समाधान वाटत नाही, हे देवाधिदेवा, जगन्निवासा, (आता) प्रसन्न हो. ॥11-25॥
375-11
पै अखंड डोळ्यांपुढे । फुटले जैसे महाभयाचे भांडे । तैशी तुझी मुखे वितंडे । पसरली देखे ॥375॥
महाभय सांठविलेले भांडे फुटल्याप्रमाणे तुझी विक्राळ मुखे मी अखंड डोळ्यांसमोर पसरलेली पाहत आहे.

दिवस १४१ वा, २१, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६८१ ते १६९२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १६८१
वाट पाहे हरी का नये आझूनि । निष्ठुर का मनी धरियेले ॥१॥
काय करू धीर होत नाही जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥धृपद॥
नाही माझा धावा पडियेला कानी । कोठे चक्रपाणी गुंतलेती ॥२॥
नाही कळो आले अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥
बहुता दिसांचे राहिले भातुके । नाही कवतुके कुरवाळिले ॥४॥
तुका म्हणे देई एकवेळा भेटी । शीतळ हे पोटी होईल मग ॥५॥

अभंग क्र. १६८२
नाही दिले कधी कठिण उत्तर । तरी का अंतर पडियेले ॥१॥
म्हणऊनि आता वियोग न साहे । लांचावले देहे संघष्टणे ॥धृपद॥
वेळोवेळा वाचे आठवितो नाम । अधिकचि प्रेम चढे घेता ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविले ॥३॥
अर्थ

देवाला मी कधीही कठोर शब्दात बोललो नाही तरीही देवात आणि माझ्यात असे अंतर का पडले आहे ? माझ्या देहाला आता देवाचे आलिंगन केव्हा पडेल यासाठी मला तळमळ लागली आहे. देह त्याच्यासाठी लाचावला आहे त्यामुळे देवाचा वियोग मला सहन होत नाही. आणि वेळो वेळा हरीचे नाम माझ्या वाचनात येत आहे आणि जसजसे हरीचे नाम मी घेत आहेत तसतसे देवाविषयी माझे प्रेम वाढतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे माझी आई तू मला तुझ्या कडेवर घे व माझी समजूत काढा.

अभंग क्र. १६८३
आता न करी सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥
सुखे सेवीन अमृत । ब्रम्हपदींचे निश्चिंत ॥धृपद॥
तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥२॥
तुका म्हणे देवराजा । आता लपलेती वाया ॥३॥
अर्थ

आता देवापुढे मी कोणत्याही प्रकारचे कष्ट करणार नाही केवळ ब्रम्‍हरसच आनंदाने सेवन करीन. ब्रम्‍हपदाचे अमृत मी सुखाने व निश्चिंती ने आणि आवडीने सेवन करेल. देवा तुमच्या नीजस्वरूपाचा ठेवा आम्ही माहीत करून घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमच्यापासून लपवून बसला आहात परंतु आम्हाला तुमच्या विषयी सर्व काही समजले आहेत त्यामुळे तुम्ही जे काही वागत आहात म्हणजे आमच्यापासून लपून बसत आहात ते सर्व व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल.

अभंग क्र. १६८४
जेथे जेथे जासी । तेथे मजचि तू पाहासी ॥१॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाही कोणी ठाव ॥धृपद॥
चित्त जडले पायी । पाळती हे ठायी ठायी ॥२॥
तुका म्हणे पोटी । देवा घालुनि सांगे गोष्टी ॥३॥
अर्थ

मी जेथे जाईल तेथे तू मलाच पाहणार आहे. मी माझा भक्तिभाव असा विकसित करीन की जगातील कोणतीच जागा शिल्लक राहणार नाही. आणि देवा माझे चित्त तुमच्या पायाशी एकरूप झालेले आहे ते तुमच्या वर पाळद ठेवून म्हणजे नजर ठेवून आहे. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तुमचा मी शोध घेईल व माझा तुम्ही शोध कराल. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाला माझ्या पोटात साठवून ठेवेल म्हणजेच मी ब्रम्‍हरूप होईल आणि मग त्याच्या स्वरूपाच्या गोष्टी लोकांना सांगेन.

अभंग क्र. १६८५
मुक्तीपाग नाही विष्णुचिया दासा । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनिया चित्ती । आदि तोचि अंती अवसान ॥धृपद॥
भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाठी । अमृत ते पोटी साठविले ॥३॥
दयावंत तरी देवाचि सारखी । आपुली पारखी नोळखती ॥४॥
तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥५॥
अर्थ

अर्थ:–विष्णूच्या दासाला मुक्तीची चिंता भेडसावत नाही किंवा त्याला तो कठीण आहे असे देखील नाही तसेच संसार कसा असतो किंवा तो कसा करावा हे तो जाणत देखील नाही कारण त्यांच्या चित्ती गोविंदच जडून गेला असल्याने त्यांच्या आदी, अंती आणि अवसानी तोच बसला आहे. म्हणजेच कोणतेही कर्म करण्याचे कारण देवच असून आणि ज्यांच्यासाठी करायचे ते देखील त्यास देवाला अर्पण करण्यासारखे असते त्यामुळे त्याच्या ध्यानीमनी देखील तोच वसतो. तसेच त्याच्या वाट्याला जे जे भोग येतात ते सर्व ते नारायणाला अर्पण करून व स्वतः त्या भोगापासून नामानिराळी राहून सदैव देवाच्या नामस्मरणात ते मग्न असतात आणि देवाला प्रसन्न कण्याच्या ज्या ज्या मंगळ ओव्या आहेत तेच गाण्यात त्यांना आनंद मिळतो. तसेच स्वतःची पूर्ण शक्ती आणि बुद्धी ते इतरांच्या कल्याणासाठी व सामान्यांवर उपकार करण्यासाठी ते खर्च करतात, नामस्मरणामुळे कृपारूपी अमृत जे त्यांच्या पोटी साठलेले असते ते इतरांना कसे देता येईल ह्यासाठीच त्यांची धडपड असते. अशी ही वैष्णव मंडळी अंतःकरणाने अत्यंत दयावंत असून देवासारखीच भासतात किंबहुना देवात आणि त्यांच्यात फरक हा जाणवतच नाही, कारण ह्यांना आपले

अभंग क्र. १६८६
सापडला हाती । तरी जाली हे निश्चिंती ॥१॥
नाही धावा घेत मन । इंद्रियांचे समाधान ॥धृपद॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका म्हणे काम । निरसुनिया घेतो नाम ॥३॥
अर्थ

अर्थ :– माझ्या हाती तुला साध्य करण्याचे वर्म लागले आहे त्यामुळे आता मी खऱ्या अर्थाने निश्चिन्त झालो आहे. त्यामुळे माझे मन देखील आता इंद्रियांच्या ओढीने धाव घेत नाही किंबहुना माझी सर्वच इंद्रिये अतिशय समाधानी झाली आहेत. तसेच माझ्या मनाला आता कसलाही आणि कोणताही हेवा नाही, सर्वच अपेक्षांचा आणि संचिताचा त्याच्याकडून त्याग झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढेच नव्हे तर माझ्या मनाने आता एवढी मजल मारली आहे की सर्व काम आणि कामना ह्यांचा त्याला विसर पडून ते फक्त आणि फक्त आता हरीचे नाम घेण्यात गुंतले आहे.

अभंग क्र. १६८७
सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी । वैष्णवा चरणी होइन किडा ॥१॥
ऐसे जन्म आता मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥धृपद॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीन ते शिरी जाईन मागे ॥२॥
तुका म्हणे येथे राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनिया ॥३॥
अर्थ

मी वैष्णवाचे उच्छिष्ट सेवन करेल आणि त्यांच्या अंगणात लोळेण कारण त्यांच्या पायाची धूळ त्या अंगणाला लागलेले आहे. आणि वैष्णव ज्या ठिकाणी स्नान करतात त्या ठिकाणी मी एखादा किडा मुंगी होऊन राहील कारण असे केल्याने वैष्णवांच्या चरण तीर्थाचे मला रोज तीर्थ पिण्यास मिळेल. देवा असाच जन्मला दे की जेणेकरून मला संतांची संगती घडेल कारण हीच आवड मला आहे. वैष्णवाचे चरण रज जेव्हा माझ्या अंगावर येतील तेव्हा मी त्या रजाला वंदन करीन आणि ते चरणरज मी माझ्या मस्तकावर धारण करीन व ते चरणरज सतत माझ्या अंगावर यावे यासाठी मी सतत त्यांच्या मागे मागे फिरेल. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व जगाचे मीथ्य त्व जाणले त्यामुळेच वैष्णवांच्या ठिकाणी माझी निष्ठा झाली आहे.

अभंग क्र. १६८८
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृपद॥
सांडी हंसगती । बहु उत्कंठा हे चित्ती ॥२॥
तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥
अर्थ

देवा तुला आलिंगन देण्यासाठी माझे दंड बाहू स्फुरण पावत आहेत. त्यामुळे हे विठाई तू पावले शीघ्रगतीने टाक. देवा आता हसंगतीने चालणे सोड कारण तूझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला उत्कंठा लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तू लवकर चालत माझ्याकडे ये.

अभंग क्र. १६८९
जेणे वेळ लागे । ऐसे सांडी पांडुरंगे ॥१॥
कंठ कंठा मिळो देई । माझा वोरस तू घेई ॥धृपद॥
नको पीतांबर । सांवरू हे अळंकार ॥२॥
टाकी वो भातुके । लौकिकाचे कवतुके ॥३॥
हाता पाया नको । काही वेगळाले राखो ॥४॥
तुका म्हणे यावरी । मग सुखे अळंकारी ॥५॥
अर्थ

हे पांडुरंगा माझी भेट घेण्याकरता तुला एवढा वेळ का लागत आहे ज्या कारणामुळे तुला इतका वेळ लागत आहे आता ते कारण बाजूला सार. देवा तू माझ्या गळ्याला गळा मिळव माझी भेट घे आणि माझ्या भक्तीचा रस तू प्रशांत कर. माझी भेट घेताना तुझे पितांबर आणि अलंकाराची तू सावरासावर करू नकोस. देवा माझ्या लौकिकाचे तू कौतुक करू नकोस आणि माझ्यासाठी काही खाऊ आणला असेल तर तो बाजूला टाकून दे. देवा मला आलिंगन देताना मी अपवित्र आहे म्हणून अंग चोरी करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा तू मला आलिंगन दिले की मग तुझे अलंकार व पितांबर तू सावरत बस.

अभंग क्र. १६९०
दावूनिया कोणा काही । तेचि वाही चाळविली ॥१॥
तैसे नको करू देवा । शुद्धभावा माझिया ॥धृपद॥
रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवू ॥२॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥
दर्पणींचे दिले धन । दिसे पण चरफडी ॥४॥
तुका म्हणे पायासाठी । करींतो आटी कळो द्या ॥५॥
अर्थ

देवा तुम्ही तुमच्या भक्तांना काहीतरी आमिष दाखवून फसविले आहे तसेच मलाही फसवत आहात काय ? देवा माझा भक्ती भाव अतिशय शुद्ध आहे त्यामुळे माझ्याशी तुम्ही तसे काही करू नका. परमार्थामध्ये भक्ती उत्कृष्ट पद्धतीने न व्हावी यासाठी रिद्धी सिद्धी आड येत असतात. उन्हात झळायामुळे मृगजळाचा भास होतो मग हरीण त्याच्यामागे ऊर फुटेपर्यंत पळत असते व ते मृगजळ त्याला आपल्याकडे मोहन घेते. मूर्ख व्यक्ती आरश्यामध्ये धनाचे प्रतिबिंब दिसले की ते धन घेण्यासाठी चरफड करते. तुकाराम महाराज म्हणतात देवा केवळ तुमच्या पायाची प्राप्ती व्हावी यासाठी मी आता आटाआटी करत आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे.

अभंग क्र. १६९१
कृपेचा ओलावा । दिसे वेगळाचि देवा ॥१॥
मी हे इच्छीतसे साचे । न लगे फुकट साई काचे ॥धृपद॥
जेणे जाय कळसा । पाया उत्तम तो तैसा ॥२॥
तुका म्हणे घरी । तुझ्या अवघिया परी ॥३॥
अर्थ

देवा तुझ्या कृपेचा ओलावा जाणवला की मग लक्षण काही वेगळेच दिसतात. देवा मला तुझ्या दर्शनाची खरोखरी इच्छा आहे मग माझे समाधान करण्यासाठी संसारातील माइक पदार्थ जरी फुकट मला कोणी जरी दिले तरी ते मला नको. बांधकामाचे काम कळसापर्यंत व्यवस्थित गेले म्हणजे त्या बांधकामाचा पाया पक्का आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या घरी सर्व पदार्थ आहेत व भक्त जे काही मागतील ते तू त्यांना देऊ शकतोस.

अभंग क्र. १६९२
तरी आम्ही तुझी धरियेली कास । नाही कोणी दास वाया गेला ॥१॥
आगा पंढरीच्या उभा विटेवरी । येई लवकरी धावा नेटे ॥धृपद॥
पालवितो तुज उभरोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥
तुका म्हणे तुज बहु कान डोळे । का हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥
अर्थ

देवा तु आज पर्यंत केलेले कोणतेही कार्य व्यर्थ गेले नाही त्यामुळे आम्ही तुझी कास धरली आहे. हे पंढरीषा विटेवर उभे असलेल्या पांडुरंगा तू लवकर धाव घे व आमच्याकडे धावत लवकर ये देवा. हे देवा मी माझे दोन्ही हात वर करून तुला माझ्याकडे बोलावीत आहे तरी

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading