20. ध्वजस्तंभी म्हणजे काय ?

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

ध्वजस्तंभी म्हणजे काय ?
What is flag pillar?

96 कुळी मराठ्यांच्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये विशेष करून विवाह मध्ये जो ध्वजस्तंभ उभा केला जातो त्यावर एक विशिष्ट प्रकारचे चिन्ह असते त्याला ध्वजस्तंभ असे म्हणतात.

जसे मंदिरावरच्या ध्वजावर अनेक ठिकाणी ओम सापडतो भगवान श्रीकृष्णांच्या यादव कुळांमधल्या लोकांच्या ध्वजावर गरुड सापडतो,

मराठ्यांच्या अनेक कुळांमध्ये अनेक कुळांच्या ध्वजावरती कुठे फणा काढलेला नाग, कुठे चंद्र, कुठे सूर्य, कुठे हनुमान, असे अनेक प्रकारचे ध्वज स्तंभावरती चिन्ह सापडतात, हे चिन्ह त्या त्या कुळाची ओळख आहे.

युद्धामध्ये समारंभामध्ये त्या त्या कुळातले लोक या चिन्हाने अधिकृत ओळखले जात, त्यांच्या या चिन्हांनीच त्यांची उभी राहण्याची सन्मानाची जागा या चिन्हाने अंकित केलेले जात असे.

आजही लग्नामध्ये नवरदेवाच्या आणि नवरीच्या गाडीला वाहनाला जे निशान उभे करतात ला अर्थात लावतात त्याला त्यावर हे कुळाचे अधिकृत चिन्ह त्या ठिकाणी लावतात,

तसेच लग्नाच्या मंडपामध्ये घरावरती या चिन्हाचा उपयोग विशेष करून केल्या जातो. स्तंभ शब्दाचा अर्थ खांब असा होतो आणि ध्वज शब्दाचा अर्थ झेंडा होतो.

96 कुळी मराठ्यांच्या मध्ये असा नियम आहे की हे सर्व राजघरणे आपापल्या राज चिन्हाचा उपयोग केल्या जात होता त्यापैकीच एक ध्वजस्तंभ मी हे राजध्वज व राजकुळाचे चिन्ह मानले गेलेले आहे.

कुळाची २५ प्रकारची चिन्ह-माहिती

Page: 1 2

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading