१५ एप्रिल, दिवस १०५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १२४९ ते १२६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१५ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १५ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १५ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या अध्याय ९ वा, ओवी ३०१ ते ३२५ आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १२४९ ते १२६० चे पारायण आपण करणार आहोत.


१५ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३०१ ते ३२५,

301-9
तरंग पाणियेवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय आटाव्या किंवा सुर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिंसू नयेत, त्याप्रमाणे सर्व जीव मीच बनलेला असून, ते मला ओळखत नाहीत, हे केवढे आश्चर्य आहे
302-9
हे आतबाहेर मिया कोंदले । जग निखिल माझेचि वोतिले । की कैसे कर्म तया आले । जे मीचि नाही म्हणती 302॥
पहा. या सकल विश्वांत अंतर्बाह्य मीच भरलेला आहे, व हे जग मद्रूपच आहे; परंतु जीवांची कर्मे त्यास कशी आड येतात पहा, की ते मलाच ‘ नाही ‘ असे म्हणतात.
303-9
परि अमृतकुहा पडिजे । का आपणयाते कडिये काढिजे । ऐसे आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥
परंतु अमृताच्या कूपांत पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्याला बाहेर काढा असे म्हणतो, तेव्हा अशा त्या अभाग्याला काय म्हणावे ?
304-9
ग्रासा एका अन्नासाठी । अंधु धावताहे किरीटी । आडळला चिंतामणि पाये लोटी । आंधळेपणे ॥304॥
हे किरीटी, अन्नाकरिता धावणाऱ्या अंधळ्याला चिंतामणी सांपडला असता दृष्टि नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो,
305-9
तैसे ज्ञान जै सांडुनि जाये । तै ऐसी हे दशा आहे । म्हणोनि कीजे ते केले नोहे । ज्ञानेवीण ॥305॥
त्याप्रमाणे ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते; म्हणून ज्ञानाशिवाय जी जी कर्मे करावी ती न केल्यासारखी आहेत.


306-9
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती । तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेवीण ॥306॥
अंधळ्याला गरुडाचे पंख जरी मिळाले, तरी त्याला काय उपयोग होणार ? त्याचप्रमाणे, ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत.

त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥9. 20॥

307-9
देख पा गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥307॥
अरे अर्जुना, हे पहा, वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधिमार्गाची कसोटी बनतात, (वेदात सागितल्याप्रमाणे यथाविधि आचरण करतात, )
308-9
यजन करिता कौतुके । तिही वेदांचा माथा तुके । क्रिया फळेसि उभी ठाके । पुढा जया ॥308॥
ते यज्ञ करू लागले म्हणजे तीन्ही वेद संतोष पावून मान डोलवितात, व त्यांच्यापुढे क्रियाही फलप्राप्तीसह उभी राहते.
309-9
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचे स्वरुप । तीही तया पुण्याचेनि नांवे पाप । जोडिले देखे ॥309॥
याप्रमाणे यज्ञांतील सोमपान करणारे यज्ञकर्ते (दीक्षित) जे आपणच यज्ञरूप होतात, त्यांनी, नाव मात्र पुण्य परंतु खरोखर पापाचीच जोड केली असे समज
310-9
जे श्रुतित्रयाते जाणोनि । शतवरी यज्ञ करुनि । यजिलिया माते चुकोनि । स्वर्गु वरिती ॥310॥
ते ऋक्, यजु व साम या तीन्ही वेदांस जाणून शंभर यज्ञांनी माझे यजन करतात; परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


311-9
जैसे कल्पतरुतळवटी । बैसोनि झोळिये पाडी गाठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करु ॥311॥
अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा हतभाग्य मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गाठी मारतो, आणि मग भिक्षा मागण्यास निंघतो
312-9
तैसे शतक्रतू यजिले माते । की ईप्सिताति स्वर्गसुखाते । आता पुण्य की हे निरुते । पाप नोहे ॥312॥
त्याप्रमाणे, शंभर यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गसुखाची इच्छा करतात; तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे का ?
312-9
म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयाते उपसर्गु । हानि म्हणती ॥313॥
म्हणून, माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात, त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणोत, परंतु ज्ञानी जे आहेत, ते, तो जन्ममरणरूप फेऱ्यात पडून त्याची हानि झाली असे म्हणतात.
314-9
एरव्ही नरकांतीलदुःखाच्या मानाने स्वर्गप्राप्तीला सुख म्हणता येईल; परंतू या दोहोंशिवाय अखंड आनंददायक व निर्दोष असे जे सुख, ते माझे स्वरूप होय.
315-9
मज येता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोराचिया ॥315॥
हे महावीरा अर्जुना, माझ्याकडे येण्याला स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहेत.


316-9
स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे । पापात्मके पापे नरका जाइजे । मग माते जेणे पाविजे । ते शुद्ध पुण्य ॥316॥
स्वर्गप्राप्ति पुण्यात्मक पापाने होते, व नरकप्राप्ति पापात्मक पापाने होते, पण ज्या योगाने माझी प्राप्ति होते, ते शुद्ध पुण्य समज.
317-9
आणि मजचिमाजी असता । जेणे मी दूरी होय पंडुसुता । ते पुण्य ऐसे म्हणता । जीभ न तुटे काई ॥317॥
हे पंडुसुता माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरतो, त्याला पुण्य असे जर म्हटले, तर जीभ तुटणार नाही काय ?
318-9
परि हे असो आता प्रस्तुत । ऐके यापरि ते दीक्षित । यजुनि माते याचित । स्वर्गभोगु ॥318॥
परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करतात.
319-9
मग मी न पविजे ऐसे । जे पापरुप पुण्य असे । तेणे लाधलेनि सौरसे । स्वर्गा येती ॥319॥
मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात.
320-9
जेथ अमरत्व हेचि सिंहासन । ऐरावतासारिखे वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥320॥
जेथे अमरत्व हेच सिंहासन ऐरावतासारखे वाहन, अमरावती हे राजधानीचे शहर;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


321-9
जेथ महासिद्धींची भांडारे । अमृताची कोठारे । जिये गावी खिल्लारे । कामधेनूची ॥321॥
जेथे अष्टमहासिद्धीचीभांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत, व ज्या गावात कामधेनूचे कळपच्या कळप आहेत;
322-9
जेथ वोळगे देव पाइका । सैघं चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरुंचिया ॥322॥
जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरिता चिंतामणीच्या वाटा आहेत व कल्पतरूंची उपवने आहेत;
323-9
गंधर्वगान गाणी । जेथ रंभेऐशिया नाचणी । उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥323॥
जेथे गंधर्व गायन करताहेत, रंभेसारख्या अप्सरा नृत्य करणाऱ्या आहेत, व जेथे उर्वशीप्रमुख स्त्रिया विलासाकरिता आहेत,
324-9
मदन वोळगे शेजारे । जेथ चंद्र शिंपे सांबरे । पवना ऐसे म्हणियारे । धावणे जेथ ॥324॥
ज्या ठिकाणी मदन सेजघरात चाकरी करतो आहे, चंद्र सडा संमार्जन करतो आहे, व वायूसारखे धावनारे चाकर आहेत,
325-9
पै बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचेब्राह्मण । ताटियेचे सुरगण । विकार जेथे ॥325॥
इंद्राला आशीर्वाद देणारांत बृहस्पतीसारखे मुख्य ब्राह्मण आहेत, व ज्यांच्या पंक्तीला देवमंडळी आहेत,

दिवस १०५ वा, १५, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२४९ ते १२६०
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १२४९
कोण वेची वाणी । आता क्षुल्लका कारणी ॥१॥
आता हेचि माप करू । विठ्ठल हृदयात धरू ॥धृपद॥
नेंदाविया वृत्ति । आता उठो चि बहुती ॥२॥
उपदेश लोका । करूनी वेडा होतो तुका ॥३॥
अर्थ

आता शुल्लक कारणासाठी वाणी कोण खर्च करतोय ? आता एवढेच काम करूया विठ्ठलाला आपल्या हृदयात धरून ठेवुया. माझ्या चित्तामध्ये आता यापुढे अनेक विषया विषयी वृत्ती उठू नये. तुकाराम महाराज म्हणतात मी हरिभक्ती विषयी उपदेश करून मी ही त्यामध्ये वेडा होत आहे.
अभंग क्र. १२५०
मागेन ते एक तुज । देई विचारोनि मज ॥१॥
नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥धृपद॥
जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥
रंक होईन दीनांचा । घाये देहपात साचा ॥३॥
तुका म्हणे हे चि आता । देई देई तू सर्वथा ॥४॥
अर्थ

देवा मी तुला आता एक मागणे मागणार आहे पण तू मला ते विचार करून द्यावे. माझी मागणी अशी की तू मला दुर्जनाची संगती नको देऊस. यांच्या संगतीने माझे क्षणाक्षणाला चित्त भंग पावते. देवा मी पुष्कळ जन्म घेईन आणि अनेक यातना सोसून मी एखाद्या गरीबाचा रंक म्हणजे भिकारी होईल मग त्याने मला मारले तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात पण देवा तू मला आता सर्वथा हेच दान दे की मला दुर्जनाची संगती होऊ देऊ नकोस.


अभंग क्र. १२५१
जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥
तरि म्या बोलावे ते काई । सरे ऐसे तुझे पायी ॥धृपद॥
पालटती क्षण । संचित प्रारब्ध क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे सत्ता । होसी सकळ करिता ॥३॥
अर्थ

हे पांडुरंगा तू धर्म आणि नीती उत्तम प्रकारचा जाणतोस. त्यामुळे मी तुझ्या पायाशी असे बोलावे की जेणेकरून ते तू मान्य करशील. देवा तू जर मनात आणले तर माझे संचित, प्रारब्ध, क्रियमाणकर्म एका क्षणात पळून जाऊ शकतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू तुझ्या सत्तेने काहीही करु शकतोस.
अभंग क्र. १२५२
तुम्ही काटाळलां तरी । आम्हा न सोडणे हरी ॥१॥
जावे कवणिया ठाया । सांगा विनवितो पाया ॥धृपद॥
केली जिवा साठी । आता सुखे लागो पाठी ॥२॥
तुका म्हणे ठाव । न सोडणे हाचि भाव ॥३॥
अर्थ

हे हरी तुम्ही आम्हाला किती जरी कंटाळलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. देवा तुम्हाला सोडून आम्ही कोठे जावे ते तुम्ही सांगा, ही मी विनंती तुमच्या पाया पाशी करतोय ? देवा आम्ही आमचा जीव तुम्हाला अर्पण केला आहे त्यामुळे आता खुशाल तुमच्या पाठीशी लागावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुमच्या ठिकाणी जो आश्रय घेतला आहे तो सोडून न देणे हाच भक्तिभाव आमच्या ठिकाणी असला पाहिजे.


अभंग क्र. १२५३
येउनि संसारी । मी तो एक जाणे हरी ॥१॥
नेणे आणिक काही धंदा । नित्य ध्यातसे गोविंदा ॥धृपद॥
काम क्रोध लोभस्वार्थ । अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥
तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥

अर्थ
या संसारात जन्माला येऊन मी फक्त एक हरीलाच जाणतो आहे. मी इतर कोणालाही जाणत नाही मी फक्त गोविंदाचे ध्यान नित्य करत आहे. माझा काम, क्रोध, लोभ हा सर्व पंढरीनाथच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल माझा धनी आहे आणि मी त्याचा सेवक आहे.
अभंग क्र. १२५४
सर्वपक्षी हरी साहयसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥
सहजचाली चालता पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदात वाहे पाणी ॥३॥

अर्थ नाही टाका


अभंग क्र. १२५५
आम्हा घरी एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनी ॥१॥
वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवने ॥धृपद॥
वत्स नाही माय भलत्या सवे जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥
चहू धारी क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥
तुका म्हणे माझी भूक तेथे काय । जोगाविते माय तिन्ही लोका ॥४॥
अर्थ

आमच्या घरी एक दुखती गाय आहे तिला इतका पान्हा आहे की त्रिभुवना मध्येही तिचा पान्हा समावत नाही. ती गाय रंगाने सावळी आहे आणि तिचे नांव श्रिधरा आहे. ती गाय चौवदा भुवनामध्ये चरत असते. परंतु त्या गाईला कोणतेही वासरू नाही तिला जे कोणी भक्तीच्या वात्सल्याने कुरवाळीतो त्याला ती गाय तीच्या बरोबर घेऊन जाते. आणि त्याचे अंतकरण भरून त्याला दूध पाजते. ती गाय आपल्या चारही स्तनातून दूध स्त्रवत असते आणि ते दूध पिऊन सनकादिक मुनी तृप्त झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या दुधाने संपूर्ण जगाला ती गाय पोसते तर मग माझी भूक त्या सर्वाच्या भूकेच्या पुढे किती आहे ?
अभंग क्र. १२५६
काय पुण्य ऐसे आहे मजपाशी । तांतडी धावसी पांडुरंगा ॥१॥
काय ऐसा भक्त वाया गेलो थोर । तू मज समोर होसी वेगा ॥धृपद॥
काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तू झडकरी पाचारिशी ॥२॥
कोण मी नावाचा थोर गेलो मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥
तुका म्हणे नाही ठाउके संचित । येणे जन्महित नाही केले ॥४॥
अर्थ

हे पांडुरंगा माझ्याकडे असे कोणते पुण्य आहे की ज्या कारणामुळे तू माझ्या कडे धावते येशील ? देवा असा मी कोणता भक्त वाया जाणार आहे की ज्यामुळे तू तातडीने माझ्या पुढे येशील ? देवा तू माझे असे कोणते कष्ट पाहिले किंवा चाकरी पाहिली की ज्यामुळे तू मला तुझ्याकडे बोलशील ? हे नारायणा असा मी कोणता मोठा लागून गेला आहे, मी तर करंटा आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला माझे संचित माहित नाही परंतु माझ्या या जन्मात मी कोणतेच स्वहिताचे काम केले नाही.


अभंग क्र. १२५७
आमुचिया भावे तुज देवपण । ते का विसरोन राहिलासी ॥१॥
समर्थासी नाही उपकारस्मरण । दिल्या आठवण वाचोनिया ॥धृपद॥
चळण वळण सेवकाच्या बळे । निर्गुणाच्यामुळे सांभाळावे ॥२॥
तुका म्हणे आता आलो खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावे ॥३॥
अर्थ

देवा आमच्या भक्ती भावामुळे तुला देवपणा आले आहे. हे देवा तू विसरून गेला आहेस की काय ? श्रीमंत लोकांना केलेल्या उपकाराची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्यांना आठवण करून देण्यात येत नाही. आम्ही तुझे सेवक आहोत आणि आमच्या भक्तिभावानेच निर्गुणाच्या ठिकाणी तुला अवतार घेण्याच्या चलन-वलनात्मकक्रिया होतात, त्यामुळे तुझे सगुण रूप सांभाळले जाते. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मी आता अट्टाहासावर आलेलो आहे त्यामुळे तुझे प्रेम देऊन तु माझी समजूत काढावी.
अभंग क्र. १२५८
आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा । आता करू सेवा कोणाची मी ॥१॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदे ॥धृपद॥
बोलतसे जैसे बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥
पाप पुण्य ज्याचे तोचि जाणे काही । संबंध हा नाही आम्हासवे ॥३॥
तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥४॥
अर्थ

ज्यावेळी आम्ही देवाला देह अर्पण केला त्यावेळी आम्ही मेलो आहोत. त्यामुळे मी आता कोणत्या साधनाद्वारे देवाची सेवा, पूजा करू. प्रारब्धाची सूत्रे देवाच्या हातात आहे आणि तो या देहरूपी पुतळ्याला जसा हलवीत आहे तसा हा देह हलतो. तो देव जसे मला बोलावीत आहेत तसे मी बोलत आहे. त्यामुळे हा देव सर्व क्रिया करतो यात कोणतीही शंका मला राहिली नाही. आम्ही हा देह देवाला अर्पण केला त्यामुळे या देहाकडून जे पाप-पुण्य घडते ते देवालाच माहित आमचा त्याच्याशी काहीच संबंध राहतोच कुठे ? तुकाराम महाराज म्हणतात लोकांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते म्हणजे आम्ही या देहापासून अलिप्त आहोत अतीत म्हणजे वेगळे आहोत.


अभंग क्र. १२५९
लागो नेदी बोल पाया तुझ्या हरी । जीव जावो परि न करी आण ॥१॥
परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानी ॥२॥
तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥
अर्थ

देवा मी दुराचारी पणाने वागणार नाही जेणेकरून तुझी अपकीर्ती होईल. माझा प्राण जरी गेला तरी हरकत नाही पण भलतेसलते मी वागणार नाही. देवा परस्त्री मला रखुमाई समान आहे तर परधन ओकलेल्या अन्ना पक्षही घाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांची लाज कोण राहतो तर हा दीनदयाळ सहकारी पांडुरंगच.
अभंग क्र. १२६०
हेचि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥
सुखाचे भातुके करावे जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥धृपद॥
दुरील जवळी आपणचि होते । कवळिले चित्ते जीवनासी ॥२॥
तुका म्हणे नाम घेता वेळोवेळा । होतील शीतळा सकळा नाडी ॥३॥
अर्थ

हरीच्या स्वरूपाची आठवण करणे हीच त्याची खरी भेट आहे. आणि त्या विषयी आवड धरली की जीवाला विश्रांती प्राप्त होते. देवाच्या स्वरूपाची आठवण केल्यानंतर जे सुख मिळते केस खाऊ, जतन करून त्याचेच सेवन करावा मग त्याने तहान भूक नाहीशी होते. आपल्या चित्ताने जीवनरूपी विठ्ठलाला कवटाळले तर दूर वाटणारा विठ्ठल आपोआप आपल्या जवळ येतो. तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाचे नाम वेळोवेळा घेतले असता शरीराच्या सर्व नाड्या शांत होतात.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading