१४ जून, दिवस १६५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १९६९ ते १९८०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“14 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 14 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 14 जूनअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९६९ ते १९८० चे पारायण आपण करणार आहोत.
14 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १ ते २५,

सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ त्रयोदशोऽध्यायःअध्याय तेरावा ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय तेरावा
(श्रीगुरुस्तवन व साहित्य = 1-6)
1-13
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥1॥
ज्या चरणांचे अत्यंत परम आदराने स्मरण केले असता पुरुष संपूर्ण विद्येचे वसतिस्थान होतो, त्याच श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करू.
2-13
जयांचेनि आठवे । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवे । जिव्हेसि ये ॥2॥
ज्या चरणांचे स्मरण झाले असता इष्ट अर्थ प्रगट करणारे शब्दभांडार स्वाधीन होते आणि वाणीच्या ठिकाणी संपूर्ण रसाळ वत्कृत्व प्रगट होते.
3-13
वक्तृत्वा गोडपणे । अमृताते पारुखे म्हणे । रस होती वोळंगणे । अक्षरांसी ॥3॥
रसाळवत्कृत्वाच्या गोडपणापुढे अमृतही फिके वाटते आणि नवरस अक्षरांना धरूनच राहतात.
4-13
भावाचे अवतरण अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद ॥4॥
आत्मबोधाचे रहस्य प्रगट करणारी खूण ठिकठिकाणी भावार्थाला प्रगट करते आणि त्यामुळे अंतःकरणात आत्मबोध पूर्णपणे यथार्थ अवगत होतो.
5-13
श्रीगुरूंचे पाय । जै हृदय गिंवसूनि ठाय । तै येवढे भाग्य होय । उन्मेखासी ॥5॥
जेव्हा श्रीगुरूचे पाय आपल्या ह्रदयात राहतात, तेव्हाच ज्ञानाचे एवढे सद्भाग्य प्राप्त होते.


6-13
ते नमस्कारूनि आता । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसे म्हणे ॥6॥
म्हणून त्या चरणांना आम्ही आता नमस्कार करतो; जो ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा पती होय तो भगवान श्रीकृष्ण पुढे असे म्हणाला.

श्रीभगवानुवाच ।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥13. 1॥

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, हे कौतेया, या शरीराला ‘क्षेत्र ” असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला ‘क्षेत्रज्ञ ” असे क्षेत्रक्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात.
7-13
तरी पार्था परिसिजे । देह हे क्षेत्र म्हणिजे । जो हे जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथे ॥7॥
तरी हे अर्जुना ! ऐक देहाला क्षेत्र म्हणतात व देहाला जो जाणतो त्यालाच येथे क्षेत्रज्ञ म्हटले आहे.

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्त्रयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥13. 2॥

अर्थ हे भरतकुलोत्पन्ना, सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ, तो मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे मत आहे.
8-13
तरि क्षेत्रज्ञु जो एथे । तो मीचि जाण निरुते । जो सर्व क्षेत्राते । संगोपोनि असे ॥8॥
शरीरात जो क्षेत्रज्ञ म्हणून येथे सांगितला आहे व जो सर्व सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात व्यापून आहे, तो खरोखर मीच आहे असे जाण.
9-13
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते । जाणणे जे निरुते । ज्ञान ऐसे तयाते । मानू आम्ही ॥9॥
क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ कोण हे यथार्थ जाणणे यालाच आम्ही ज्ञान म्हणतो.

तत् क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे श्रुणु ॥13. 3॥

अर्थ ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर (क्षेत्र व क्षेत्रज्ञ कोण ते ब्रह्मादिकांनाही कळत नाही. = 7-26)
10-13
तरि क्षेत्र येणे नावे । शरीर जेणे भावे । म्हणितले ते आघवे । सांगो आता ॥10॥
तर आता हे शरीर ज्या उद्देशाने क्षेत्र या नावाने संबोधिले जाते तो उद्देश आम्ही आता सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-13
हे क्षेत्र का म्हणिजे । केसे के हे उपजे । कवण कवणी वाढविजे । विकारा एथ ॥11॥
शरीराला क्षेत्र का म्हणतात ? ते कसे व कशापासून उत्पन्न होते ? कोणकोणत्या कार्यरूपाने त्याची वाढ होते ?
12-13
हे औट हात मोटके । की केवढे पा केतुके । बरड की पिके । कोणाचे हे ॥12॥
हे एवढेसे साडे तीन हातच आहे किंवा केवढे मोठे आहे ? व त्याची मर्यादा किती ! ते नापीक आहे किंवा पिकणारे आहे आणि ते कोणाचे आहे ?
13-13
इत्यादि सर्व । जे जे याचे भाव । ते बोलिजेती सावेव । अवधान देई ॥13॥
इत्यादि जे सर्व भाव असतील ते संपूर्ण सांगतो, लक्ष देऊन ऐक.
14-13
पै याची स्थळाकारणे । श्रुति सदा बोबाणे । तर्कु येणेचि ठिकाणे । तोंडाळु केला ॥14॥
उपनिषदांनी आक्रोश करून या क्षेत्रांविषयीच विचार सांगितला आणि याच स्थळाने तर्काला बडबड करायला लावली.
15-13
चाळिता हेचि बोली । दर्शन शेवटा आली । तेवीचि नाही बुझाविली । अझुनि द्वंदे ॥15॥
या क्षेत्राची चर्चा करण्यातच दर्शनांचा शेवट झाला, तरी त्यांच्यातील परस्पर विरोध नाहीसा झाला नाही.


16-13
शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेचि एके । याचेनि एकवंके । जगासि वादु ॥16॥
या एका क्षेत्रामुळेच निर्णयशास्त्रांच्या सोयरीक संबंधात बिघाड उत्पन्न झाला आणि क्षेत्राचे ठिकाणीच एकनिष्ठ झाल्यामुळे जगात वाद माजला.
17-13
तोंडेसी तोंडा न पडे । बोलेसी बोला न घडे । इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥17॥
एकाचे तोंड दुसर्‍याच्या तोंडासमोर होत नाही व एकाचा युक्तिवाद दुसर्‍यास पटत नाही. अशा युक्तिवादामुळे बडबडण्याची सीमा झाली.
18-13
नेणो कोणाचे हे स्थळ । परि कैसे अभिलाषाचे बळ । जे घरोगरी कपाळ । पिटवीत असे ॥18॥
हे शरीर कोणाच्या मालकीचे आहे, हे सांगता येत नाही, तरीपण याची आसक्ती इतकी प्रबळ आहे की, घरोघर याच्या करिताच कपाळपिटी होत असते.
19-13
नास्तिका द्यावया तोंड । वेदांचे गाढे बंड । ते देखोनि पाखांड । आनचि वाजे ॥19॥
नास्तिकांच्या कुतर्कांचे खंडन करण्याकरिता त्यांना तोंड देऊन वेदांनी त्यांच्याविरुध्द थोर बंड उभारले, हे पाहून पाखंड्यांनी भलतेच बोलायला सुरुवात केली.
नास्तिक— म्हणजे देहालाच चेतन आत्मा समजणारे. ते ईश्वर, वेद, वेदाचे ईश्वरप्रणितत्व, पापपुण्यकर्मे, कर्मानुसार गती, परलोक, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादि श्रुतिमान्य सिध्दात आहेत ते मुळीच मानीत नाहीत.
नास्तिका द्यावया तोंड— म्हणजे नास्तिकांची अविचारमूलक मते खोडून काढण्याकरिता.
वेदांचे गाढे बंड — म्हणजे वेदाने अनुमान व अनुभव यांच्या भक्कम आधारावर उभारलेले युक्तिसिध्द विचार. पाखंडी— वेदादि शास्त्रांच्या युक्तिअनुभवसिध्द विचारांचा व सिध्दान्ताचा त्याग करून, विचारास न पटणारे व अनुभवास कधी न येणारे स्वकपोलकल्पित सिध्दान्त प्रतिपादन करणार्‍यांना पाखंडी म्हणतात.
20-13
म्हणे तुम्ही निर्मूळ । लटिके हे वाग्जाळ । ना म्हणसी तरी पोफळ । घातले आहे ॥20॥
(वेद प्रमाण मानणार्‍या अस्तिकाला पाखंडी म्हणतो) तुमचे म्हणणे निराधार व केवळ वायफळ पांडित्य आहे. ” नाही ! आमचे म्हणणेच यथार्थ आहे ” असे म्हणत असाल, तर ही आम्ही प्रतिज्ञेची सुपारी ठेविली आहे – म्हणजे पैेजेने आम्ही आपले म्हणणे सिध्द करून देऊ शकतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-13
पाखांडाचिये कडे । नागवी लुंचिती मुंडे । नियोजिली वितंडे । तळासि येती ॥21॥
असे हे, पाखंडाचे डफ वाजवून नागवे राहतात व डोक्याचे केस उपटतात आणि आपले मत प्रतिपादन करण्याकरिता स्विकारलेल्या वितंडवादानेच ते सर्वाच्या खाली येतात म्हणजे आपणच आपली मते निराधार ठरवितात.
22-13
मृत्युबळाचेनि माजे । हे जाईल वीण काजे । ते देखोनिया व्याजे । निघाले योगी ॥22॥
मृत्यूचे सामर्थ्य अनिवार असल्यामुळे हे क्षेत्र व्यर्थच मृत्यूच्या स्वाधीन होईल, हे जाणून योगी देहाच्या आसक्तीने आयुमर्यादा वाढविण्यास निघाले.
23-13
मृत्युने आधिधिले । तिही निरंजन सेविले । यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥23॥
देहांच्या आसक्ती मृत्यूला पाहून घाबरलेले ते एकांतात जाऊन राहिले व त्यांनी नाना प्रकारच्या यमनियमांचे समुदाय आचरणात आणले.
24-13
येणेचि क्षेत्राभिमाने । राज्य त्यजिले ईशाने । गुंति जाणोनि स्मशाने । वासु केला ॥24॥
या देहाचा अभिमान धरूनच कैलासाचे राज्य करण्यात बंधन आहे, हे जाणून भगवान शंकराने कैलासाचा त्याग केला व स्मशानात वास केला.
25-13
ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकर म्हणोनि कोळसा । कामु केला ॥25॥
अशा त्याग करण्याच्या या प्रतिज्ञेनेच शंकराला दिशा पांघराव्या लागल्या- म्हणजे दिगंबर होऊन राहावे लागले व कामोत्पादक वनशोभेची लाच देऊ पाहणार्‍या मदनाला जाळून शंकराने त्याचा कोळसा केला.

दिवस १६५ वा, १४, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९६९ ते १९८०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १९६९
सिंचन करिता मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडो एक सार धरी ॥धृपद॥
पाणचोऱ्याचे दार । वरील दाटावे ते थोर ॥२॥
वश जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥
एक आतुडे चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥
तुका म्हणे धावा । आहे पंढरिये विसावा ॥५॥
अर्थ

झाडाच्या मुळाला जर पाणी घातले तर संपूर्ण झाड टवटवीत होऊन वोणावले जाते. त्यामुळे इतर कोणत्याही देवदेवतांचे किंवा वेगवेगळ्या ठिकाणाच्या भरीस तुम्ही पडू नका सर्व सारांचे जे सार आहे त्याचीच तुम्ही कास धरा. गारुड्या जवळ पानचोर नावाचे एक भांडे असते त्याला अनेक प्रकारची छिद्रे असतात त्यात पाणी ओतले आणि वरून जर त्या भांड्याला झाकण लावले तर छिद्रे असतांनाही पाणी गळण्याचे थांबते. केवळ राजाला जरी वश केले तर संपूर्ण प्रजा आपल्या वश होते. एक चिंतामणी जरी आपल्या हाती लागला तरी सर्व सुख आपल्याला आपोआप प्राप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात एक पंढरी क्षेत्र असे आहे की तेथे विसावा आहे त्यामुळे तेथे तुम्ही धावा घ्यावा.
3

अभंग क्र. १९७०
करू याची कथा नामाचा गजर । आम्हा संवसार काय करी ॥१॥
म्हणवू हरीचे दास लेऊ ती भूषणे । कापे तयाभेणे कळिकाळ ॥धृपद॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥
तुका म्हणे करू ऐसियांचा संग । जेणे नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥
अर्थ

आता आम्ही हरी ची कथा करून त्याच्या नावाचा गजर करू मग आम्हाला संसार काय करणार आहे ? आणि आम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घेऊ आणि परमार्थिक जी भूषणे आहेत ती सर्व आम्ही परिधान करून त्याच्या भीतीने कळिकाळ देखील आम्हाला भिईल. त्यामुळे आशा, भय, लाज, चिंता आम्हाला आडवी कधीच येत नाही असे तर सत्ता आहे त्या समर्थाची. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही अशा संतांची संगत करू की ज्यामुळे हरीचे चिंतनामध्ये केव्हाच भंग होणार नाही.
3

अभंग क्र. १९७१
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृपद॥
काय उंदीर नाही धावी । राख लावी गाढव ॥२॥
तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
अर्थ

सर्प कधी अन्न खातो काय आणि बगळा शांत बसतो म्हणजे तो ध्यानाला बसलेला असतो काय याचा अर्थ काही लोक अन्न खात नाही म्हणजे तो परमार्थ झाला का किंवा काही लोक ध्यानाला बसल्याचे ढोंग करतात मग ते खरोखर मनापासून ध्यान करतात काय. तर नाही कारण त्यांच्या पोटात नेहमी वाईटच विचार असतात वर वर फक्त ते उपाशी राहतात किंवा ध्यान करण्याचे सोंग करतात त्यामुळे त्यांची बुद्धी खोटी आहे. काही लोक गुहेत जाऊन ध्यानाला बसतात तर काही लोक अंगाला राख लावून स्वतःचा दांभिकपणा दाखवतात मग असे असेल तर उंदीरही बीळात जातो आणि गाढव उकूरड्यावर लोळून स्वतःच्या अंगाला राख फासून घेतो मग तेही परमार्थिक झाले काय ? तुकाराम महाराज म्हणतात तीर्थजळा मध्ये स्नान केल्यावर जर पाप नाहीसे होत असतील तर मग गंगेत मगर नेहमीच असते आणि कावळे काय गंगेत स्नान करत नाहीत काय तेही करत असतात अर्थात जर परमार्थ दांभिक पणाने आणि सोंगाढोंगाने केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही.
3

अभंग क्र. १९७२
मदे मातले नागवेचि नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥
आता शिकवावा कोणासी विचार । कर्म ते दुस्तर करवी धीट ॥धृपद॥
आले अंगासी ते बळिवंत गाढे । काय वेड्यापुढे धर्मनीत ॥२॥
तुका म्हणे कळो येईल तो भाव । अंगावरील घाव उमटता ॥३॥
अर्थ

जे मद्य पेऊन आलेले असतात ते नागवेच नाचत असतात आणि आपल्या वाचेने वाटेल ते अनुचित बडबड करत असतात. आता चांगला उपदेश तरी कोणाला करावा कारण मद्य पिण्याचे वाईट कर्म त्याने केले त्यामुळे त्याच्या अंगी धीटपणा आलेला आहे म्हणजे तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशा मनुष्याच्या अंगात त्याने मानलेली जी परिस्थिती आहे ती फार बलवंत असते त्यामुळे या अशा वेड्या माणसापुढे धर्म आणि नीती सांगून काय उपयोग आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात एकदा की यम दंड अंगावर उमटले की मग अशा माणसाला आपण केलेले कर्म किती वाईट आहे हे समजून येते.
3

अभंग क्र. १९७३
भाविका हे वर्म सापडले निके । सेविती कवतुके धणीवरी ॥१॥
इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदे । वंदितील पदे सकुमारे ॥धृपद॥
विसरले मुक्ती भक्तीच्या अभिळासे । ओढत सरिसे सुख आले ॥२॥
तुका म्हणे नाही मागायाची आस । पांडुरंग त्यास विसंबेना ॥३॥
अर्थ

खऱ्या भाविक भक्तांना हरी प्राप्ती कशाने होते तर भक्तीने होते हे चांगले वर्म सापडले आहे आणि हरीभक्तीरस तृप्ती होई पर्यंत ते सेवन करतात. भक्त जशी इच्छा करतील त्या छंदात हा हरी नाचत असतो आणि भक्तिभावाने भक्त देखील हरीच्या सुकुमार चरणांना वंदन करतात. खरे जे भाविक भक्त आहेत ते भक्तीच्या अभिलासे मुळे मुक्तीला देखील विसरून जातात त्याच कारणामुळे सर्व सुख त्यांच्या जवळ आपोआप येतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्या भाविकाला काहीच मागायची इच्छा नसते त्या भाविकाला पांडुरंग कधीही विसरत नाही.
3

अभंग क्र. १९७४
भक्त समागमे सर्वभावे हरी । सर्व काम करी न संगता ॥१॥
साठवला राहे हृदयसंपुष्टी । बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥धृपद॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका म्हणे जीव भाव देवापायी । ठेवूनि ते काही न मगती ॥३॥
अर्थ

अर्थ –खरा भक्त हा देवाशी एवढा एकरूप झाला असतो की त्याच्या ध्यानी मनी शयनी नयनी तोच असतो, तो जो काही व्यवहार करतो आणि विचार करतो त्याचा सर्व संबंध देवाशीच असतो त्याच्या इंद्रियांना देखील देवाचाच सोस लागला असतो व ते खऱ्या अर्थाने आणि सर्व भावाने देवाशीच समागम करतात. व अशा या भक्तांचे देव देखील न सांगता सर्व कामे करतो. तसेच अशा या भक्तांसाठी तो त्यांच्या हृदयात वास करून राहतो आणि त्यांच्या नयनांची भूक भागवण्यासाठी त्यांच्या समोर मूर्ती रूपात उभा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा केव्हा भक्ताला देवाकडे काही मागायचे झाल्यास फक्त त्याच्या मुखाकडे पाहून त्याचे ध्यान केले असता तो भक्तांची सर्व मनोरथे पूर्ण करतो परंतु हे आगळे भक्त उलट स्वतःचा जीव भावच देवाच्या पायी वाहून, अर्पण करून त्या बदल्यात काहीही मागणे पसंत करत नाहीत.
3

अभंग क्र. १९७५
परमअमृते रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायी ॥१॥
सकळ ही तेथे वोळली मंगळे । वृष्टी केली जळे आनंदाच्या ॥धृपद॥
सकळ इंद्रिये जाली ब्रम्हरूप । ओतले स्वरूप माजी तया ॥२॥
तुका म्हणे जेथे वसे भक्तराव । तेथे नांदे देव संदेह नाही ॥३॥
अर्थ

अर्थ –हरीच्या नामस्मरणाने, नामातून होणाऱ्या प्रेम रुपी अमृताने माझी जिव्हा ओलावली आहे, त्या अमृतात न्हाऊन निघत आहे व माझ्या मनासकट सर्व इंद्रियांची वृत्ती देखील नारायणाच्या पायाशी वळून तेथे एकवटून राहिली आहे. त्यामुळे सगळी मंगलदायके देखील तेथे वळली असून अशा ठिकाणी आनंदरूपी जलाच्या सतत वृष्टी होत असते. (म्हणजेच असा योग जुळून आल्याने आनंदाला उधाण येऊन सर्वत्र मंगल आणि प्रसन्न वाटते आहे. ) तसेच नामाच्या चिंतनाने सगळी इंद्रिये देखील ब्रम्‍हरूप झाली असून ती आत्मस्वरूप होऊन गेली आहेत, म्हणजेच स्वतःची वेगळी अशी ओळख विसरून ते आत्मस्वरूपात विलीन झाली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात असा हा भक्तराव, म्हणजेच भक्तांचा राजा जेथे वास करतो श्रीहरी नारायण देखील तेथेच नांदतो आणि ह्यात किंचित देखील दुमत किंवा संदेह नाही.
3

अभंग क्र. १९७६
कासया गुणदोष पाहो आणिकाचे । मज काय त्यांचे उणे असे ॥१॥
काय पापपुण्य पाहो आणिकाचे । मज काय त्यांचे उणे असे ॥धृपद॥
नष्टदुष्टपण कवणाचे वाणू । तयाहून अणु अधिक माझे ॥२॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहो डोळा आपुलिये ॥३॥
तुका म्हणे मी भांडवल पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेले ॥४॥
अर्थ

देवा मी दुसर्‍याचे गुन दोष कशासाठी पाहू माझ्याच अंगी काय कमी गुण दोष आहेत ? अरे मी दुसर्‍याचे पाप पुण्य कशासाठी पाहू ते माझ्या अंगा मध्ये काय कमी आहे का ? मी दुसऱ्याला नष्ट किंवा दुष्ट असे का म्हणू कारण त्याच्यापेक्षा थोडा दुष्टपणा माझा जास्तच आहे. मी कुचर किंवा खोटा व्यक्ती माझ्या डोळ्यांनी कशाला पाहू कारण त्यांच्या पेक्षा मी वेगळा थोडीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पंढरीनाथा माझ्याकडे दोषाचे पुष्कळ भांडवल आहे ते मी आता सर्व तुझ्याकडे लावून दिले आहे.
3 3

अभंग क्र. १९७७
काळ जवळचि उभा नेणा । घाली झांपडी खुंटी काना ॥१॥
कैसा हुशार सावध राही । आपुला तू अपुलेठायी ॥धृपद॥
काळ जवळिच उभा पाही । नेदी कोणासि देऊ काही ॥२॥
काळे पुरविली पाठी । वरुषे जाली तरी साठी ॥३॥
काळ भोवताला भोवे । राम येऊ नेदी जिव्हे ॥४॥
तुका म्हणे काळा । कर्म मिळते ते जाळा ॥५॥
अर्थ

अरे काळ इतका तुझ्या जवळ उभा आहे तरी तुला कसे समजत नाही काळाने बहुतेक तुझ्यावर झडप घातली आहे आणि तुझ्या कानात खुंटी घातली आहे त्यामुळे तुला ते समजत नसेल. अरे त्यामुळे तु हुशार हो आणि आपल्या ठिकाणीच सावध राहा. अरे हा काळ तुझ्याजवळ नेहमी उभा आहे तुला काही दान करायचे जरी म्हटले तरी हा काळ तुझ्या मनाला विक्षेप करून तुला ते दान करून देणार नाही. अरे तुला साठ वर्षे पूर्ण झाले तरीदेखील काळाने तुझी पाठ पुरवली आहे. काळ तुझ्याभोवती सारखा फिरत आहे तो तुझ्यावर जिभेवर रामाचे नाम ही येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे काळाच्या जोराने तुझ्या हातून आत्तापर्यंत जे जे पापकर्म घडले जे पाप तुला येऊन मिळाले आहेत जोडले आहेत रामाच्या नाम अग्नीने ते जाळून टाकावे.
3 3

अभंग क्र. १९७८
दुष्ट भूषण सज्जनाचे । अलभ्यलाभ पुण्य त्याचे ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकावारि ॥धृपद॥
मळ खाये संवदणी । करी आणिकाची उजळणी ॥२॥
तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥
अर्थ

दृष्ट लोक हे सज्जनांचे भूषण आहेत कारण ते सज्जनांची निंदा करतात त्यामुळे सज्जनांचे पाप त्यांच्याकडे जाते आणि त्यांचे पुण्य सज्जनांना लाभते असा अलभ्य लाभ सज्जनांला होतो. असा दुष्ट मनुष्य धन्य आहे तो सज्जना वर नेहमी परोपकार करतो कारण तो सज्जनाची निंदा करतो आणि स्वतः मात्र नरकाला जातो परंतु सज्जनाचे सर्व पापक्षालन करून त्याला नरकाला जाण्यापासून वाचवितो. परेटाच्या घरची सौंदनी दुसऱ्याच्या कपड्याचे मळ खाते परंतु कपडे मात्र स्वच्छ करते. तुकाराम महाराज म्हणतात अहो सज्जना हो तुम्ही दुष्ट लोकाचा कधीही राग धरू नका उलट त्यांचा आदर करा त्यांच्या विषयी प्रेम वाढवा.
3 3

अभंग क्र. १९७९
साहोनि टांकीघाये । पाषाण देवचि जाला पाहे ॥१॥
तया रीती दृढ मन । करी साधाया कारण ॥धृपद॥
बाण शस्त्र साहे गोळी । शुरा ठाव उंच स्थळी ॥२॥
तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥
अर्थ

अनेक टाक्यांचे घाव सोसून दगडाचा देव झाला तो पहा. त्याप्रमाणे तू हे आपले साधन साध्य करून घेण्यासाठी मन दृढ कर. बाण, शस्त्र, गोळी यांचा त्रास सहन करूनच शूर शिपाई उच्चपदाला प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सती चाललेली स्री अग्नी कडे पाहत नाही त्याप्रमाणे खऱ्या साधकाने दुष्ट लोकांच्या नींदे कडे लक्ष देऊ नये.
3 3

अभंग क्र. १९८०
तेणे वेशे माझी चोरिली अंगे । मानावया जग आत्पपणे ।
नाही चाड भीड संसाराचे कोड । उदासीन सर्व गुणे ।
भय मोह लज्जा निरसली शंका । अवघिया एकचि पणे ।
विठ्ठलाच्या पायी बैसोनि राहिली । भागली नुटित तेणे ॥१॥
आता त्यासी काय चाले माझे बळ । जालोसे दुर्बळ सत्वहीन ।
दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचे कारण ॥धृपद॥
आळसे दृष्टी न पाहे आपुले । एकचि देखिले सर्वरूप ।
मानामान तेथे खुंटोनि राहिले । पिसुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथे काय पुण्यपाप ।
विठ्ठलावाचुनि काही च नावडे । वेगळाल्या भावे रूप ॥२॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।
सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलो दुरी तया ।
मी तू पणा निष्काम होऊनि । राहिलो आपुलिया ठाया ।
तुजविण आता मज नाही कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥
अर्थ

त्या हरीनेच माझे स्थुल व सूक्ष्म अंग चोरले आहेत आणि सर्व जगचं आता आप्त सोयरे झाले आहेत. त्यामुळे मला आत्ता संसाराची आवडत त्याविषयी कोणत्याही प्रकारची भिड आणि कोणत्याही प्रकारची शंका राहिली नाही. माझ्या ठिकाणी उदासीनता आली आहे. आता भय, मोह, लज्जा, शंका या सर्वाचे निरासन झाले आहे सर्वत्र मला एक हरीच दिसत आहे. सर्व प्रकारचे भोग भोगुन माझे इंद्रिय आता विठ्ठलाच्या पायी स्थिर झाले आहेत आता विठ्ठलाच्या पायापासून ते थोडा वेळ देखील उठत नाही आता मी पूर्णपणे उदासीन झालो आहे त्यामुळे माझे तेथे बळ काय चालणार आहे मी आता दुर्बळ शक्तीहिन झालो आहे. जळालेल्या वस्त्रांची घडी व्यवस्थित दिसते परंतु त्याचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे माझे ही �

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading