आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ जून, दिवस १६८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २००५ ते २०१६
“17 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 17 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २००५ ते २०१६ चे पारायण आपण करणार आहोत.
17 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७६ ते १००,
76-13
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इये तुज । सांगितली बुझ । महाभूते पांचे ॥76॥
तरी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही तुला सांगितलेली पाच महाभूते होत, असे समज.
77-13
आणि जागतिये दशे । स्वप्न लपाले असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥77॥
आणि ज्याप्रमाणे जागृतीअवस्थेत स्वप्न लपलेले असते किंवा अमावास्येला चंद्र गुप्त असतो,
78-13
नाना अप्रौढबाळकी । तारुण्य राहे थोकी । का न फुलता कळिकी । आमोदु जैसा ॥78॥
अथवा प्रौढ दशेला न आलेल्या मुलाचे ठिकाणी तारूण्य दडलेले असते किंवा न फुललेल्या कळीचे ठिकाणी सुगंध जसा गुप्त असतो.
79-13
किंबहुना काष्ठी । वन्हि जेवी किरीटी तेवी प्रकृतिचिया पोटी । गोप्यु जो असे ॥79॥
एवढेच नाही, तर लाकडांचे ठिकाणी, अर्जुना अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी जो गुप्त असतो,
80-13
जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचे मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥80॥
ज्याप्रमाणे धातूगत ज्वर केवळ कुपथ्याचे निमित्त पाहत असतो आणि मग कुपथ्य झाल्याबरोबर शरीराच्या आत-बाहेर तो व्यापतो
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-13
तैसी पाचाही गाठी पडे । जै देहाकारु उघडे । तै नाचवी चहूकडे । तो अहंकारु गा ॥81॥
त्याप्रमाणे पाचही भूतांची एकत्र गाठ पडून, जेव्हा देहाचा आकार व्यक्त होतो, तेव्हा जो जीवाला चहूकडून नाचवितो, तोच अहंकार होय
82-13
नवल अहंकाराची गोठी । विशेषे न लगे अज्ञानापाठी । सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥82॥
या अहंकाराची अशी गंमत आहे की तो विशेषतः अज्ञान्याच्या पाठीस लागत नाही; पण तो सज्ञान्याच्या कंठास झोंबून नाना संकटात पाडतो.
83-13
आता बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशिया चिन्ही जाणिजे । बोलिले यदुराजे । ते आइके सांगो ॥83॥
आता जिला बुद्धी म्हणतात, ती अशा लक्षणावरून जाणावी, असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले, तेच आता सांगतो, ऐक.
84-13
तरी कंदर्पाचेनि बळे । इंद्रियवृत्तीचेनि मेळे । विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥84॥
प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये, वृत्तीच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून येतात म्हणजे विषयांचा भोग घेऊन येतात.
85-13
तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणो लागे जीवा । तेथ दोहीसी बरवा । पाडु जे धरी ॥85॥
जीवाला ज्या सुखदुःखांच्या लुटीचा अनुभव येतो, त्या दोघांचा जी अगदी बरोबर भेद दाखविते,
86-13
हे सुख हे दुःख । हे पुण्य हे दोष । का हे मैळ हे चोख । ऐसे जे निवडी ॥86॥
हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे मलीन, हे शुध्द अशी जी निवड करते,
87-13
जिथे अधमोत्तम सुझे । जिये साने थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवे ॥87॥
जिला उत्तम, कनिष्ठ हे समजते, जिला लहान, मोठे समजते, अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या सहाय्याने जीव विषयाची परीक्षा करतो,
88-13
जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे ॥88॥
जी ज्ञानेंद्रियांचे कारण आहे, जी सत्वगुणाचा उत्कर्ष होय आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते, (जीवाच्या ठिकाणी जी जाणीवरूप ज्ञानवृत्ती स्फुरते, ती बुध्दी होय, असे येथे बुध्दीचे लक्षण केले आहे. या बुध्दीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे मी मुळात निर्मळ आहे. म्हणूनच तिच्यात ज्ञानरूप आत्मा प्रतिबिंबित होतो. त्या ज्ञानप्रकाशाने युक्त असलेली बुद्धीवृत्ती आपल्या पलीकडे असलेल्या शुद्ध आत्मस्थितीला व अलीकडे असलेल्या जीवस्थितीला जाणत असते, म्हणूनच ती आत्मा व जीव यांच्या संधीत असते, असे म्हटले आहे. )
89-13
अर्जुना ते गा जाण । बुद्धि तू संपूर्ण । आता आइके वोळखण । अव्यक्ताची ॥89॥
अर्जुना ! ही सर्व बुध्दी आहे, असे जाण. आता अव्यक्ताची ओळख ऐक.
90-13
पै सांख्यांचिया सिद्धांती । प्रकृती जे महामती । तेचि एथे प्रस्तुती । अव्यक्त गा ॥90॥
हे बुद्धीमान अर्जुना ! सांख्यवाद्यांनी आपल्या सिद्धांतात जडविनाशी क्षेत्राचे कारण म्हणून जी प्रकृती मानली आहे, तीच येथे प्रस्तुत ‘अव्यक्त’ या शब्दाने सांगितली आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-13
आणि सांख्ययोगमते । प्रकृती परिसविली तूते । ऐसी दोही परी जेथे । विवंचिली ॥91॥
सांख्य व योग यांच्या मताप्रमाणे प्रकृतीचे स्वरूप तुला ऐकविलेच आहे आणि तेथे, ती दोन प्रकारची आहे, हेही सांगितले गेले.
92-13
तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥92॥
तेथे दुसरी जी जीवदशा म्हणून पराप्रकृती सांगितली, तिलाच हे वीरश्रेष्ठा ! येथे ‘अव्यक्त’ हा पर्यायी शब्द आहे.
93-13
तऱ्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनी । का हारपे अस्तमानी । भूतक्रिया ॥93॥
रात्र संपून उजाडल्यावर आकाशात तारे नाहीसे होतात किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यापार बंद पडतात.
94-13
नातरी देहो गेलिया पाठी । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटी । कृतकर्माच्या ॥94॥
किंवा हे अर्जुना ! देह नाहीसा झाला की, पूर्वी केलेल्या कर्माच्या पोटातच देहादिक उपाधी लीन होतात,
95-13
का बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । का वस्त्रपणे तंतु । दशे राहे ॥95॥
किंवा बीजाच्या आकारातच संपूर्ण वृक्ष गुप्त असतो किंवा सुताच्या दशेत वस्त्रपण गुप्त राहते,
96-13
तैसे सांडोनिया स्थूळधर्म । महाभूते भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥96॥
त्याप्रमाणे संपूर्ण पंचमहाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून देऊन व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात,
97-13
अर्जुना तया नांवे । अव्यक्त हे जाणावे । आता आइके आघवे । इंद्रियभेद ॥97॥
अर्जुना ! त्या स्थितीला ‘अव्यक्त’ या नावाने जाण. आता इंद्रियांचे संपूर्ण भेद ऐक.
98-13
तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इये जाणे ज्ञान- । करणे पांचे ॥98॥
तरी कान, डोळे, त्वचा, घ्राण, जिह्वा, ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे जाण.
99-13
इये तत्त्वमेळापंकी । सुखदुःखांची उखिविखी । बुद्धि करिते मुखी । पांचे इही ॥99॥
या छत्तीस तत्वांच्या समुदायरूपी चिखलात या पाच ज्ञानेंद्रियरूप मुखांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते.
100-13
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥100॥
मग वाणी, हात, पाय, गुदद्वार, उपस्थ असे आणखी पाच प्रकार आहेत,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १६८ वा, १७, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २००५ ते २०१६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २००५
उल्लंघिली लाज । तेणे साधियेले काज ॥१॥
सुखे नाचो पैलतीरी । गेलो भवाचे सागरी ॥ध्रु ॥
नामाची सांगडी । सुखे बांधिली आवडी ॥२॥
तुका म्हणे लोका । उरली वाचा मारी हाका ॥३॥
अर्थ
आम्ही परमार्थ प्राप्ती साठी लाज भयाचेही उल्लंघन केले आहे. ते लाज सोडल्यामुळे आमचे कार्य प्राप्त केले आहे आम्ही भव नदी तरून पार गेलो आहे व सुखाने नाच आहोत आणि ते केवळ हरी नामाच्या छदाणेच. तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे कार्य संपले आहे आणि आता फक्त लोकांना परमार्थ मार्गाला लागा असे हाक मारण्यासाठीच हि वाचा कामाला लागली आहे.
अभंग क्र. २००६
बैसलोंसे दारी । धरणे कोंडोनि भिकारी ॥१॥
आता कोठे हालो नेदी । बरी सांपडली संदी ॥धृपद॥
किती वेरझारा । मागे घातलीया घरा ॥२॥
माझे मज नारायणा । देता का रे नये मना ॥३॥
भांडावे ते किती । बहु सोसिली फजिती ॥४॥
तुका म्हणे नाही । लाज तुझे अंगी काही ॥५॥
अर्थ
मी तुझ्या दरी भिकारी होऊन तुला कोंडून ठेवण्या साठी बसलो आहे आता मी तुला येथून कोठेही हलू देणार नाही. आता हि चांगली संधी सापडली आहे आता पर्यंत आम्ही तुझ्या दरी कितीतरी हेलपाटे घातले आहे. हे पांडुरंग माझेच मला देण्याविषयी तू इतका का बरे संकोच करतोस ? तुझ्याशी कटी भांडावे हे समजत नाही आज पर्यंत जन्म मरणाची फजिती किती आम्ही सोसली आहे ? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुला थोडी देखील लाज कशी नाही. आम्हाला आता विन्मुख पाठवून तुला काहीच बरे वाटत नाही ?
अभंग क्र. २००७
जालो द्वारपाळ । तुझे राखिले सकळ ॥१॥
नाही लागो दिले अंगा । आड ठाकीलो मी जगा ॥धृपद॥
करूनिया नीती । दिल्याप्रमाणे चालती ॥२॥
हाती दंड काठी । उभा जिवाचिये साठी ॥३॥
सकळ बळ बुद्धी युक्ती । तुझ्या दिल्या सर्व शक्ती ॥४॥
तुका म्हणे खरा । आता घेईन मुशारा ॥५॥
अर्थ
मी तुझा द्वारपाल झालो आहे आणि तुझे इतर लोकांच्या टिकेपासून रक्षण केले आहे तुझ्या व सर्व जागाच्या मध्ये उभा राहिलो व मी तुला धक्काही लागू दिला नाही तुम्ही लोकांना जी नीती घालून दिली आहे त्याप्रमाने लोक चालत आहे हातात दंडुका घेऊन आणि जीव तुम्हाला अर्पण करून मी उभा आहे. हे देवा मी माझे बल आणि बुद्धी आणि सर्व शक्ती तुला अर्पण केले आहे म्हणजे तुझी सेवाच केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मी या चाकरी बद्धल तुझ्या कडू काहीतरी नकीच मागून घेईन.
अभंग क्र. २००८
फळाची तो पोटी । घडे वियोगे ही भेटी ॥१॥
करावे चिंतन । सार ते चि आठवण ॥धृपद॥
चित्त चित्ता ग्वाही । उपचारे चाड नाही ॥२॥
तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा ॥३॥
अर्थ
आम्हाला खऱ्या फळाचा योग तुमच्या वियोगात व तुमच्या विरहातच भेटते तुमच्या विरहात जास्त चांगले चिंतन होते. हा फळाचा योग म्हणजे चित्तात तुमचे सारभूत चिंतन करावे लागते हे घडते कि नाही याला माझे चित्त साक्षी आहे. असे चिंतन केले कि अन्य काहीही उपचार तुला अर्पण करायला गरजनाही. तुकाराम महाराज म्हणतात जी काही सेवा करायची ती मनोभावे करावी. तरच ती देवाला पोहचते.
अभंग क्र. २००९
दुर्बळाचे कोण । ऐके घालूनिया मन । राहिले कारण । तयावाचूनि काय ते ॥१॥
कळो आले अनुभवे । पांडुरंगा माझ्या जीवे । न संगता ठावे । पडे चर्या देखोनि ॥धृपद॥
काम क्रोध माझ्या देही । भेदाभेद गेले नाही । होते तेथे काही । तुज कृपा करिता ॥२॥
हे तो नव्हे उचित । नुपेक्षावे शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हा न कळे ॥३॥
अर्थ
तू दुर्बलाचे गह्राने कधी मान्रावर घेऊन ऐकणार ? त्यावाचून तरी थोरांचे काय अडले आहे ? हे पांडुरंगा, हे माझ्या अनुभवावरुनच मला समजले आहे तुंम्ही जरी सांगितले नाही तरी हे मला कळून आहे तेही तुमची चर्या पाहून, कारण माझ्या अंतःकरणातील काम, क्रोध, भेद जो पर्यंत गेले नाहीत तो पर्यंत तू कृपा करून तरी उपयोग काय होणार ? तुकाराम महाराज म्हणतात देवा, पण तुम्ही शरण आलेल्यांची उपेक्षा करू नये कारण ते तुम्हाला शोभणार नाही असे मला वाटते पण तुझी रीत तुझी पद्धत काय आहे ते आम्हाला काळात नाही.
अभंग क्र. २०१०
आम्ही भाव जाणो देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥
तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगता ठावे । तुम्हा विण न पडे॥धृपद॥
दोनी फाकविल्या वाटा । गोवा केला घटापटा । नव्हे धीर फाटा । आड राने भरती ॥२॥
तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आता येणे वेळे । चरण जीवे न सोडी ॥३॥
अर्थ
तुझी माया काही काळात नाही तुला कोणत्या रीतीने भजावे हेच समजत नाही ज्या गानिकेन जन्म भर वेश्या व्यवसाय केला तिचा तू उद्धार केला आणि पुत्र मोहाने दशरथाने जन्म भर राम राम म्हणले त्याला तू पतनाला नेले असे जर विसंगत असेल तर मी काय करावे ? कोणत्या मार्गानं तुला भाजाव हे तू सांगितल्या शिवाय कसे कळेल ? स्वर्ग आणि नर्क हे दोन मार्ग तूच निर्माण केले आहेस आणि घटाकाशन्याय अश्या तर्क विचारांचा गुंताडा तूच निर्माण केला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारचे तुझे चाळे मला माझ्या डोळ्यांना धडधडीत दिसत आहे म्हणून पूर्ण निर्धार केला आहे कि मी तुझे चरण माझा जीव जी पर्यंत सोडणार नाही.
अभंग क्र. २०११
वेरझारी जाला सीण । बहु केले खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथे फावला ॥१॥
आता काय भीड भार । धरूनिया लोकाचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥धृपद॥
आले बहुतांच्या मना । का रे न होशी शहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागो आपुल्या ॥२॥
तुका म्हणे चौघांमधी । तुज नेले होते आधी । आता नामधी । उरी काही राहिली ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या घरी खूप येरझाऱ्या आम्ही घातल्या आहेत तरीही तु आम्हाला काहीच दिले नाही त्यामुळे आम्हाला खूप शीण झाला आहे व त्या गोष्टीचा आम्हाला खूप खेद ही वाटत आहे आणि आम्हाला त्रास ही खूप झाला आहे. आता बरे झाले तुझ्याशी भांडणं करण्याकरता आजचा दिवस सापडला. देवा मी आता तुझी भीडभाड तरी किती दिवस धरू या लोकांमध्ये तुझे मर्यादा तरी किती दिवस बाळगू ? देवा आता मी सर्व तुझ्या मर्यादीचा व्यवहार बुडवणार आहे आणि तुझ्यासारखाच सच्चिदानंदरुप होणार आहे. देवा तुझ्या सारखेच व्हावे असे खूप संतांच्या मनातही आले आहे तरीही तु शहाणा का होत नाहीस ? देवा आम्ही मात्र आमचे जे वचन आहे “तुझी सेवा करणार” या वचनाला आम्ही आज पर्यंत जागे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुला याआधी चारचौघात संतांमध्ये नेले होते. त्यामुळे आता आपल्या दोघामध्ये काहीच भांडण राहिलेली नाही.
अभंग क्र. २०१२
कल्पतरूखाली । फळे येती मागीतली ॥१॥
तेथे बैसल्याचा भाव । विचारूनि बोले ठाव ॥धृपद॥
द्यावे ते उत्तर । येतो प्रतीतीचा तो फेर ॥२॥
तुका म्हणे मनी । आपुल्या च लाभहानि ॥३॥
अर्थ
कल्पतरू वृक्षाच्या खाली बसून आपण जे फळ मागू ते आपोआप येते. तेथे बसणाऱ्या चा भक्ती भाव हा शुद्ध असला पाहिजे आणि जे योग्य आहे तेच विचार करून मागितले पाहिजे तरच आपल्याला ते फळ मिळते. मग आपण जे काही मागू ते आपल्याला एका नंतर एक प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात आपण आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे चांगल्या वाईट गोष्टीची इच्छा कल्पतरूच्या वृक्षाखाली करतो त्याप्रमाणे आपल्याला लाभ हानी होते.
अभंग क्र. २०१३
रंगलिया या रंगे पालट न घरी । सेवले अंतरी पालटेना ॥१॥
सावळे निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगे कैसे शोभा देती ॥धृपद॥
पवित्र जाले ते न लिंपे विटाळा । नैदी बैसो मळा आडवरी ॥२॥
तुका म्हणे काळे काळे केले तोंड । प्रकाश अभंड देखोनिया ॥३॥
अर्थ
हरीच्या रंगात एकदा की मन रंगले की ते मन परत पालटत नाही आणि अंतकरणात आपण ज्याला साठवले आहे तेही पुन्हा कधीही पालटत नाही. सावळे निखळ असा कृष्ण नाम ठसा माझ्या अंतरंगात ठसलेला आहे त्यामुळे माझ्या बाह्य रंगात देखील एक वेगळीच शोभा निर्माण होते. एकदा की आपल्या अंतकरणात कृष्ण नाम ठसा उमटला की आपले मन पवित्र होते ते कधीही विटाळत नाही आणि संपूर्ण शरीरावर देखील पापाचा मळ बसू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण नाम ठसा अंतकरणात उमटला व त्यामुळे या अंतरंगामध्ये अमर्याद ज्ञान प्रकाश निर्माण झाला व ते पाहून काळाने देखील आपले तोंड काळे केले.
अभंग क्र. २०१४
जगा काळ खाय । आह्मी माथा दिले पाय ॥१॥
नाचो तेथे उभा राहे । जाता व्यंग करी साहे ॥धृपद॥
हरीच्या गुणे धाला । होता खात चि भुकेला ॥२॥
तुका म्हणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥
अर्थ
संपूर्ण जगाला काळ खातो परंतु आम्ही त्या काळाच्या देखील माथ्यावर पाय दिला आहे. हरिकीर्तन करत असताना हा काळ आमच्या पुढे निमूटपणे उभा राहतो आणि आम्ही कोठेही चालत असलो की हा काळ आमच्यावर येणाऱ्या संकटापासून आम्हाला वाचवण्याकरता साह्य करतो. हा काळ संपूर्ण जगाला खाऊन देखील भुकेलाच रहातो परंतु जेव्हा आम्ही हरी चे गुण गायले त्यावेळी हा तृप्त झाला. तुकाराम महाराज म्हणतात हा काळ अतिशय तप्त आहे परंतु हरिनामाने तो हळु हळु शीतल झाला आहे.
अभंग क्र. २०१५
ब्रम्हरस घेई काढा । जेणे पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचे । अणीक वाचे न सेवी ॥धृपद॥
भवरोगाऐसे जाय । आणीक काय क्षुल्लके ॥२॥
तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
अर्थ
तु ब्रम्ह रसाचा काढा घे म्हणजे त्याने काय होईल तर तुझे जन्ममरणाची पिडा कायम स्वरुपी नाश पावेल. या औषधाचे पथ्य म्हणजे विठोबाचे नाम आहे त्यावाचून तु दुसरे काहीही सेवन करू नकोस. अरे या ब्रम्ह रस काढ्याणे भव रोग नाहीसा होतो तर तेथे किरकोळ रोग काय आहेत ? तुकाराम महाराज म्हणतात केवळ ब्रम्ह रस काढ्याणे तुला कोणत्याही प्रकारच्या भुतांची कधीही बाधा होणार नाही.
अभंग क्र. २०१६
अंगे अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥
सुखी जालो या सेवने । दुःख नेणे यावरी ॥धृपद॥
निर्माल्याचे तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचे ॥२॥
तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
अर्थ
संत चरण रजाचा अनुभव माझ्या अंगी आला आहे याचा महिमा असा आहे. त्यांच्या चरणरज सेवनामुळे मी सुखी झालो आहे दुःख म्हणजे काय आहे हेच मला आता समजत नाही. निर्मल्यातील तुळशी दळ आणि हरीच्या चरणाचे तीर्थ याचाही अनुभव माझ्या अंगी आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतचरणरज निर्मल्यातील तुळशी दळ व हरी चरण तीर्थ हे भक्तिभावाने सेवन करावेत.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















