१९ एप्रिल, दिवस १०९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४०१ ते ४२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १२९७ ते १३०८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १९ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.


१९ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा, ओवी ४०१ ते ४२५,

401-9
परि सर्वथा आपुला जीवी । केलियाची शंका काहीचि नुरवी । ऐसी धुवोनि कर्मे द्यावी । माझिया हाती ॥401॥
परंतु ती केल्याबद्दलची आपल्या मनात आठवणही राहू नये इतक्या निष्कामतेने ती सर्व मला अर्पण कर.

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै: ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥9. 28॥

402-9
मग अग्निकुंडी बीजे घातली । तिये अंकुरदशे जेवि मुकली । तेवि न फळतीचि मज अर्पिली । शुभाशुभे ॥402॥
मग, ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाहीत, त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्माची फलप्राप्ती तुला होणार नाही.
403-9
अगा कर्मे जै उरावे । तै तिही सुखदुःखी फळावे । आणि तयाते भोगावया यावे । देहा एका ॥403॥
अरे, जर कर्म उरले, तर त्याच्यापासून सुखदुःख भोगावे लागते, व ते भोगण्याकरिता जन्म घ्यावा लागतो.
404-9
ते उगाणिले मज कर्म । तेव्हाचि पुसिले मरण जन्म । जन्मासवे श्रम । वरचिलही गेले ॥404॥
तेच कर्म जर मला अर्पण केले, तर लागलीच जन्ममरण चुकते; आणि जन्माबरोबर त्याच्या पुढील भोगावयास लागणारे श्रमही चुकतात.
405-9
म्हणऊनि अर्जुना यापरि । पाहेचा वेळु नव्हेल भारी । हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥405॥
म्हणून अर्जुना, याप्रमाणे आजचे काम उद्यावरटाकलेस तर फलप्राप्तीला वेळ लागणार नाही काय ? म्हणून, सोपी अशी ही सर्व (कर्मफलाचा त्याग करण्याची) युक्ति तुला सांगितली.


406-9
या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखाचिया सागरी न बुडिजे । सुखे सुखरुपा घडिजे । माझिया आंगा ॥406॥
आता या देहाच्या बंधनांत न पडता व सुखदुःखाच्या सागरांत न बुडता, अनायासाने, संतोषकारक असे जे माझे रुप, त्यात मिसळून जा.

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥9. 9॥

407-9
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूती सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाही ॥407॥
तो मी कसा आहे म्हणून विचारशील, तर सर्व भूतांचे ठिकाणी नेहमी सारखा असून माझ्या ठिकाणी ‘ माझे ‘ व ‘तुझे ‘ असा भेद नाही.
408-9
जे ऐसिया माते जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवे कर्मे करुनि । भजती माते ॥408॥
जे अशा माझ्या स्वरूपाला जाणतात, व अहंकाराचा बीमोड करून कायावाचामनाने कर्मे करून मला भजतात,
409-9
ते वर्तत दिसती देही । परि ते देही ना माझा ठायी । आणि मी तयांचा हृदयी । समग्र असे ॥409॥
ते जगात देहाने जरी व्यापार करीत असले, तरी त्यांचे चित्त इकडे नसुन माझे ठिकाणी असते, आणि मीही त्यांच्या ह्रदयात पूर्ण भरलेला असतो.
410-9
सविस्तर वटत्व जैसे । बीजकणिकेमाजी असे । आणि बीजकणु वसे । वटी जेवी ॥410॥
ज्याप्रमाणे विस्तारासह वडाचे मोठे झाड वडाच्या बीजांतच असते व बीज त्या झाडातच असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


411-9
तेवी आम्हा तया परस्परे । बाहेरी नामाचीचि अंतरे । वाचुनि आंतुवट वस्तुविचारे । मी तेचि ते ॥411॥
त्याप्रमाणे माझ्यात व त्यांच्यात केवळ नांवाचेच अंतर असते, बाकी अंतःस्थितीचा विचार करून पाहता ते व मी हे एकच आहो.
412-9
आता जायांचे लेणे । जैसे आंगावरी आहाचवाणे । तैसे देह धरणे । उदास तयाचे ॥412॥
आता, लोकांचे मागून आणलेले दागिने अंगावर घालणे जसे व्यर्थ त्याचप्रमाणे त्यांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते.
413-9
परिमळु निघालिया पवनापाठी । मागे वोस फूल राहे देठी । तैसे आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥413॥
वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलांचा वास त्याचे मागोमाग जातो, व देठापाशी फुल जसे वासरहीत राहते, त्याप्रमाणे, आयुष्याची मुदत संपविण्यापुरतांच ते देह धारण करतात.
414-9
येर अवष्टंभु जो आघवा । तो आरुढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥414॥
हे पांडवा; जो अभिमान म्हणून आहे, तो सर्व माझी भक्ति पावून माझ्या स्वरूपांतच मिळाला.

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥9. 30॥

415-9
ऐसे भजतेनि प्रेमभावे । जया शरीरही पाठी न पवे । तेणे भलतया व्हावे । जातीचिया ॥415॥
अशा प्रेमभावाने जे मला भजतात; व ज्यांना हे शरीर पुनः प्राप्त होत नाही, ते हव्या त्या जातीचे असले तरी असोत;


416-9
आणि आचरण पाहाता सुभटा । तो दुष्कृताचा सेल वाटा । परि जीवित वेचिले चोहटा । भक्तीचिया की ॥416॥
आणी हे महावीरा त्यांचे आचरण जरी पाप करणाऱ्यात पहील्या प्रतीचे असले, तरी ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तीमार्गात केला आहे;
417-9
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणोनि जीवित जेणे भक्ती । दिधले शेखी ॥417॥
अरे अंतकाली जी मनाला बुद्धि होते तीच गति खरोखर पुढील जन्मी प्राप्त होते; म्हणून आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ जो माझ़्या भक्तीत घालवितो,
418-9
तो आधी जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारी । जैसा बुडाला महापूरी । न मरतु निघाला ॥418॥
तो पुर्ववयात जरी दूराचरण करणारा असला, तरी तो सर्वौत्तमच आहे असे समज. एखाद्या मनुष्यांने महापुरांतच नदी अलीकडील कांठी उडी घातली, मग जरी सर्व मनुष्यास तो मेला असे वाटले,
419-9
तयाचे जीवित ऐलथडिये आले । म्हणोनि बुडालेपण जेवी वाया गेले । तेवी नुरेचि पाप केले । शेवटलिये भक्ती 419॥
तरी तो न मरता जसा पलीकडील काठाला महापूरांतून बाहेर निघावा व तसा जो जिवंत निघाल्यामुळे जसे त्याचे बुडालेपण व्यर्थ व्हावे, त्याचप्रमाणे पुर्ववयात केलेले पाप उत्तरवयातील ज्ञानोत्तर भक्तीने नाहीसे होते.
420-9
यालागी दुष्कृती जऱ्ही जाहला । तरि अनुतापतीर्थी न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावे ॥420॥
याकरिता, पापाचरण करणारा जरी असला तरी तो पश्चातापरूप तीर्थात न्हाऊन जर सर्वभावाने मला शरण आला,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


421-9
तरि आता पवित्र तयाचेचि कुळ । अभिजात्य तेचि निर्मळ । जन्मलेया फळ । तयासीच जोडले ॥421॥
तर त्याचे कुल पवित्र होते, तो निर्मल कुलीनपणास पावतो, व जन्मास आल्याचे फळ जी भक्ती तीही त्यालाच प्राप्तहोते.
422-9
तो सकळही पढिन्नला । तपे तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणे ॥422॥
त्याला सर्व शास्त्रे वगैरे अवगत होतात; त्याला तपाचेही आचरण केल्याचे श्रेय येते, व त्याला अष्टांगयोगसाधनाची सिद्धि मिळते.
423-9
हे असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा । जयाची अखंड गा आस्था । मजचिलागी ॥423॥
पार्था, फार काय सांगावे ? तो सर्व कर्माच्या झपाट्यातून पार पडतो; व त्याचे सर्व प्रेम माझ्याच ठिकाणी असते.
224-9
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेचिया पेटी । जेणे मजमाजी किरीटी । निक्षेपिली ॥424॥
हे किरीटी, एकनिष्ठारूप पेटीत मनोबुद्धीचे सर्व व्यापार भरून ती माझ्यामध्ये जो ठेवितो,

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥9. 31॥

425-9
तो आता अवसरे मजसारिखा होइल । ऐसाही भाव तुज जाइल । हा गा अमृताआंत राहील । तया मरण कैचे ॥425॥
तो काही अवकाशाने मजसारखा होणार असा जर तुझा कदाचित् समज होईल, तर पहा की, जो अमृतांत वास करील त्याला मरण कोठून प्राप्त होणार ?

दिवस १०९ वा, १९, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२९७ ते १३०८
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १२९७
तरि च जन्मा यावे । दास विठोबाचे व्हावे ॥१॥
नाही तरि काय थोडी । श्वानशूकरे बापुडी ॥धृपद॥
जन्मल्याचे ते फळ । अंगी लागो नेदी मळ ॥२॥
तुका म्हणे भले । ज्याच्या नावे मानवले ॥३॥
अर्थ

विठोबाचे दास व्हायचे असेल तरच जन्माला यावे. नाहीतर श्वान म्हणजे कुत्रे आणि सुकरे हे जन्माला थोडे आहेत की काय ? अंगाला त्रिविध गुणाचे मळ लागू न देणे हेच खरे मनुष्य जन्माचे फळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्यजन्मात असे संत सज्जन चांगले आहेत की ज्यांचे नांव घेतले तर आपल्यालाही मोठे पणा प्राप्त होतो.
अभंग क्र. १२९८
द्या जी माझा विचारोनिया विभाग । न खंडे हा लाग आहाचपणे ॥१॥
किती नेणो तुम्हा साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलो ते ॥धृपद॥
करविता कलह जिवाचिये साठी । हे तुम्हा वोखटी ढाळ देवा ॥२॥
तुका म्हणे धीर कारण आपुला । तुह्मी तो विठ्ठला मायातीत ॥३॥
अर्थ

देवा मला माझा परमार्थाचा वाटा नीटविचार करून द्यावा. माझी काहीच तरी समजूत काढल्याने मी तुमचा पाठलाग सोडणार नाही. देवा आमची किती कट तुम्ही सहन करता हे काही कळत नाही. पण त्यामुळे आम्हीच एक वाईट ठरतो. आमचा जीव जाईपर्यंत तुम्ही आम्हाला भांडायला लावता ही तुमची सवय फार वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो विठ्ठला तुम्ही माये पलीकडे आहात त्यामुळे आम्हाला आमचा वाटा घेईपर्यंत धीर धरणे आमचे कर्तव्यच आहे.
अभंग क्र. १२९९
आमुचे ठाउके तुम्हा गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥
काय हा सांगावा नसता नवलावो । मैंदपणे भाव भुलवणेचा ॥धृपद॥
एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥
तुका म्हणे ज्याणे असे चेतविले । त्याच्याने उगळे कैसे नव्हे ॥३॥
अर्थ

देवा आमचा गर्भवासाचे दुःख तुला माहित आहे. पूर्व कर्माचे दोष आणि भोग हे दोन्ही बलवान असल्याने आम्हाला भोगावे लागणार आहेत. तेही तुमच्या सक्तीने, देवा तुम्ही नवल परी गोष्टी निर्माण करतात आणि संभवित पणाने लोकांना भुलविता हे कसे सांगावे ? देवा तुम्ही एकाला पळ म्हणता आणि दुसर्‍याच्या पाठीशी लागता आणि हे कौतुक तुम्हीच पाहता. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने हा प्रकार चेतवून दिला आहे तोच हा प्रकार बंद का नाही पडत ?
अभंग क्र. १३००
निर्दयासी तुम्ही करिता दंडण । तुमचे गाऱ्हाणे कोठे द्यावे ॥१॥
भाकितो करुणा ऐकती कान । उगले चि मौन्य धरिले ऐसे ॥धृपद॥
दीनपणे पाहे पाय भिडावोनि । मंजुळा वचनी विनवीतसे ॥२॥
तुका म्हणे गाठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसा ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही निर्दय माणसांना दंड करता पण आता तुम्हीच निर्दय झाला आहात. मग तुमचे गाह्राने कोठे द्यावे ? देवा मी तुम्हाला करुणा भाकत आहे तुम्ही तुमच्या कानाने ऐकतही आहात परंतु तुम्ही उगाचच मौन धरून का धरता ? तुमच्या पायाला मिठी मारून मी तुमच्याकडे दिन पणाने पाहत आहे. करून वचन आणि मी तुम्हाला विनंती करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा विठ्ठला माझ्या मनाची गाठ उकला नुसतेच माझ्याकडे काय पाहत उभे आहात ?
अभंग क्र. १३०१
नसतो किविलवाणे । काही तुमच्या कृपादाने ॥१॥
हेचि तयाची ओळखी । धाले टवटवित मुखी ॥धृपद॥
वाया जात नाही । वचन प्रीतीचे ते काही ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्य येते अनुभवा ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही माझ्यावर कृपा केली असती तर मी असा केविलवाणा दिसलो नसतो. ज्याचे मुख टवटवीत आहे तो तृप्त झाला असे समजावे. आणि हीच तुमच्या कृपेची खरी ओळख आहे. देवा तुम्ही एखाद्या बरोबर काही शब्द प्रेमाने बोलला तर ते शब्द कधीच वाया जात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात देवा जे सत्य आहे ते अनुभवाला येते, म्हणजे मला तुमची कृपा झाली असती तर त्याचा अनुभवही आला असता.
अभंग क्र. १३०२
जालो तव साचे । दास राहवणे काचे ॥१॥
हे का मिळते उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥धृपद॥
सिंहाचे ते पिले । जाय घेऊनिया कोल्हे ॥२॥
तुका म्हणे नास । आम्हा म्हणविल्या दास ॥३॥
अर्थ

देवा आम्ही तुझे खऱ्या अर्थाने दास झालो आहोत तरीही आम्हाला अज्ञानात राहावे लागते आहे. हे कृपावंता देवा आम्हाला असे ठेवणे योग्य आहे काय, तुम्हाला ते कळत नाही काय. बलाढ्य सिंहिणी ची पिल्ले जर कोल्ह्याने नेले तर सिंहाच्या दृष्टीने ते योग्य आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुझे दास आहोत असे म्हणून घेतल्यावरही आमचा नाश होणे योग्य आहे काय ?
अभंग क्र. १३०३
देवाच्या उद्देशे जेथे जेथे भाव । तो तो वसे ठाव विश्वंभर ॥१॥
लोभाचे संकल्प पळालियावरी । कैची तेथे उरी पापपुण्या ॥धृपद॥
शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥
तुका म्हणे ज्याचे तयासी च कळे । प्रांत येतो फळे कळो मग ॥३॥
अर्थ

आपण जेथे जेथे देव आहे असा खरा भक्तिभाव ठेवतो तेथे विश्वंभर खरोखर वास करत असतो. लोभाचा संकल्प जर अंतकरणातून पळून गेला मग तेथे पाप-पुण्य कसे राहील ? मन जर निर्मळ असेल तर तीच खरी शुद्ध भक्ती असते मन जर पापी विचाराने विटाळलेले असेल तर चित्तावर वज्रलेप घट्ट बसलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात आपले मन निर्मळ आहे की नाही त्या बाबतीत आपले मनच साक्षी असते आणि पुढे मिळणाऱ्या फळापासून ते आपल्याला कळून येते.
अभंग क्र. १३०४
कडसणी धरिता अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥
लौकिकाबाहेरि राहिलो निराळा । तुजविण वेगळा नाही तुजा ॥धृपद॥
संकोचाने नाही होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥
तुका म्हणे केले इच्छे चि सारिखे । नाहीसे पारिखे येथे कोणी ॥३॥
अर्थ

संसाराविषयी जितका विचार करावा तितका त्रास होतो आणि त्याने भय व शोक वाढत जातात. देवा मी आता लौकिका पासून पूर्ण बाहेर राहिलो आहे. यापासून निराळा झालो आहे. त्यामुळे तू आणि मी वेगळा नाही आहोत. मी तुझ्याविषयी संकोच बाळगावा तर माझी इच्छा कधीही पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे संकोच जवळ ठेवण्याचे काही कारण येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या प्रमाणे सर्व काही केले आहे त्यामुळे जगातील कोणीच माझ्यासाठी परके राहिले नाही.
अभंग क्र. १३०५
हेचि जतन करा दान । धरुनी चरण राहिलो तो ॥१॥
घ्यावी माझ्या हाते सेवा । हेची देवा विनवणी ॥धृपद॥
आणीक काही न घाली भार । बहुत फार साकडे ॥२॥
तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥३॥
अर्थ

देवा मी तुमचे चरण धरून राहिलो आहे ह्याच तुम्ही मला दिलेल्या कृपादानाचे तुम्ही रक्षण करा. देवा माझ्या हातून तुम्ही सेवा व्हावी हीच माझी तुम्हाला विनंती आहे. देवा या वाचून मी दुसरे कोणतेच भार किंवा कोणताही हे साकडे तुमच्यावर घालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचा म्हणून घेतो मग तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा.
अभंग क्र. १३०६
आपुल्याच फुंदे । जेथे तेथे घेती छंदे ॥१॥
पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥धृपद॥
विश्वाचे माठ । त्याचे कपाळी ते नाट ॥२॥
तुका म्हणे घाणा । मूढा तीर्थी प्रदिक्षणा ॥३॥
अर्थ

काही माणसे असे आहेत की ते आपल्या अभिमानाने जिथे तिथे दूराग्रह धरत असतात. परमार्थामध्ये सत्याचा फार मोठा दुष्काळ पडला आहे त्यामुळे घोटाळा ही फार मोठा निर्माण झाला आहे. मीथ्या जगाचा अभिमान धरणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीच फळ प्राप्ती होत नसते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे घाण्याचा बैल घाण्याभोवतीच फिरत असतो त्याप्रमाणे मूर्ख लोक तीर्थयात्रा प्रदक्षिणा करतो परंतु आपले मुख्य साधन जे आहे ते म्हणजे हरी प्राप्ती करून घेणे ही साधना प्राप्त करावी याचे त्याला ज्ञान नसते.
अभंग क्र. १३०७
उद्योगाची धाव बैसली आसनी । पडिले नारायणी मोटळे हे ॥१॥
सकळ निश्चिंती जाली हा भरवसा । नाही गर्भवासा येणे ऐसा ॥धृपद॥
आपुलिया सत्ते नाही आम्हा जिणे । अभिमान तेणे नेला देवे ॥२॥
तुका म्हणे चळे एकाचिया सत्ते । आपुले मी रिते पणे असे ॥३॥
अर्थ

देहा सहीत सर्व इंद्रियांचे मोटाळे नारायणा जवळ आहेत त्यामुळे या संसारातील सर्व चिंता नारायणा जवळच येऊन बसली आहे. या कारणामुळेच आता माझा गर्भवास तुटला आहे व त्यामुळेच मी निश्चिंत झालो आहे व माझा या गोष्टीवर पूर्ण भरवसा झाला आहे. देवाने माझा सर्व देह अभिमान नेला आहे त्यामुळे मला माझ्या सत्तेने जगायचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व शरीर देवाच्या सत्तेने चलनवलन करीत आहे त्यामुळे मी आता देहाभिमान टाकून रिता झालो आहे.
अभंग क्र. १३०८
बहुता पुरे ऐसा वाण । आले धन घरासी ॥१॥
घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥धृपद॥
ऐका निवळल्या मने । बरव्या काने सादर ॥२॥
तुका म्हणे करूनि अंती । निश्चिंती हे ठेवावी ॥३॥
अर्थ

परमार्थ स्वरूपाचा माल व धन सर्वाना मिळेल व फुकटचा नारायण रूपी माल कोणत्याही प्रकारची किंमत न देता घ्या. व या नारायणाला कधीही विसरू नका. मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही शुद्ध मनाने व कान देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणतात मी सांगितलेले साधन तुम्ही साठवून ठेवा व अंतकाळी निवांत होण्याची तरतूद ठेवावी.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading