105. पाली खंडोबा, १३ खंडोबा ठिकाणे 96 कुळी मराठा कुलदैवत

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

Pali Khandoba 96 Kuli Maratha Kuladaivat

महाराष्ट्र खंडोबा मंदिरे
महाराष्ट्रामधील खंडोबा मंदिरांची सविस्तर माहिती पहा

१. सातारे २. बीड ३. पाली ४. शेगुड ५. रेवडी ६. निमगाव ७. माळेगाव ८. नळदुर्ग ९. अणदूर १०.चंदनपुरी ११. नेवासा १२. मलवडी १३. धामणी

सध्या उपलब्ध माहितीनुसार खंडोबाची एकूण मुख्य बारा ठिकाणे सापडतात.
१.) जेजुरी, २.) पाली, ३.) नळदुर्ग, ४.) देवरगुड्डा, ५.) मृणमैलार, आदिमैलार या स्थाना शिवाय इतर स्थाना विषयी देशकालपरत्वे भेद आढळतात.

या लेखात आज पालीच्या खंडोबाची माहिती पाहणार आहोत

पाली :- खंडोबा
श्री क्षेत्र पाली ही खंडोबा आणि म्हाळसा या दोघांच्या विवाहाची भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाहबद्ध होते झाले. म्हाळसा नेवासाच्या तिम्माशेठ वाण्याची मुलगी. साक्षात पार्वतीमातेनेच त्याची घरी अवतार-जन्म घेतला, भगवान शंकराचे दृष्टांता प्रमाणे त्या दोघांचा (म्हाळसेचा व खंडोबाचा) विवाह तारळी नदीच्या काठी पाली ला संपन्न केला.
म्हाळसा ही मोहिनीचे रूप धारण केलेली पार्वती आहे. दरवर्षी पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा येथे साजरा करतात.
पाली या गावाचे मूळ नांव नाव राजापूर, येथे पालाई नावाची एक गवळण रहायची ती खंडोबाची अनन्य भक्ती करत होती तिच्या भक्तीला पावून खंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रगट झाले. या पालाईचे नावा मुळेच या गावाचे नाव बदलून पाल / पाली असे झाले.

पाली गाव सातारा जिल्ह्यात सातारा शहरा पासून तीस किमी अंतरावर आहे. सातारा – कराड मार्गावरील अतीत व काशीळ या गावावरून येथे जाता येते गाडी रस्ता थेट मंदिराचे दक्षिण द्वारात पोहोचतो,

आत गेले कि कोटाचे पुर्व बाजूस दरवाजा आहे हा जुना मुख्य दरवाजा असून या दरवाजाचे बाहेरच्या बाजूस दक्षिणेकडे एका चौथऱ्यावर पादुका स्थापन केल्या आहेत. पुर्व दरवाज्याच्या अलीकडे खंडोबाचे अश्वारूढ पुतळा-शिल्प बसवले आहे. या दरवाज्यातून प्रवेश केला की
या नंदी मंडपीच्या पुढे भागात शेजारी एक खंडोबाचे मंदिर आहे, यामध्ये मूर्ती बैठी व चतुर्मुख आहे .
गर्भगृहाच्या दरवाज्याचे उंबऱ्यावर एक स्त्रीचा मुखवटा असून हा पालाई गवळणीचा आहे हिच्या मुळेच देव येथे आले.

गर्भगृहात मूर्ती योनीरूप असून त्या मध्ये खंडोबा व म्हाळसा यांची द्वीलिंग आहेत. या लिंगा पुढे तिवईच्या आधारे गादीवर मुखवटे ठेऊन सजावट केली असून या योनी मागे छान महिरप ठेवलेली आहे. त्याच्या पाठीमागे एक पितळी घोडेस्वाराची पत्नीसह मूर्ती आहे. ही खंडोबा म्हाळसा यांची असावी पण ती हेगाडीची असल्याचे सांगतात.
योनीच्या दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळीत बानाईची मूर्ती स्थापन केलेली आहे.

खंडोबा म्हाळसा विवाह यात्रा
पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो, तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांचे गर्दीने भरून जातो अनेक वऱ्हाडी लग्नासाठी पालीस येतात मध्यान्हा दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरा मधून विवाह साठी प्रस्थान होते हत्ती वरून देव लग्नासाठी पाली गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराचे उधळनीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हळदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचे लोभस दृष केवळ अवर्णनीय. गावाचे पेठेतून मिरवून हा सोहळा तारळी नदी पार करून जावू लागतो मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समुह केवळ सुवर्णच
नदीच्य पलीकडे कायम स्वरूपी दगडी बाहुले लग्नासाठी उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो या मंडपात मिरवणूक पोहचते आणि खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो रात्री देवाची वरात निघते ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहचते. लग्नाचे पाचव्या दिवशी पाखाळनी करण्यात येते. या वेळेस भरणारी यात्रा सुमारे १५ दिवस चालते .

13 खंडोबा ठिकाणे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading