२० एप्रिल, दिवस ११० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४२६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १३०९ ते १३२०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२० एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २० Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २० एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२० एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४२६ ते ४५०,

426-9
पै सूर्य जो वेळु नुदैजे । तया वेळा की रात्र म्हणिजे । तेवी माझिये भक्तीविण जे कीजे । ते महापाप नोहे ॥426॥
हे बघ, ज्या वेळी सुर्य उदय पावत नाही, त्याच वेळेला रात्र असे म्हणतात; त्याचप्रमाणे, माझ्या भक्तीशिवाय जे करणे ते महापाप नव्हे काय ?
427-9
म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळीक पंडुसुता । तेव्हाचि तो तत्वता । स्वरुप माझे ॥427॥
म्हणून हे पंडुसुता, त्याच्या चित्ताला जेव्हा माझा योग होतो, तेव्हांच खरोखर तो माझ्या स्वरूपाला पावतो.
428-9
जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदील कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥428॥
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यात पहीला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे, जो सर्व भावाने मला भजतो, तो मद्रूपच होऊन राहतो.
429-9
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवे । 429॥
मग त्याला माझी स्थिति, माझी कांति व माझी नित्य शांति प्राप्त होते. फार तर काय, तो माझ्या जीवानेच जिवंत राहतो.
430-9
एथ पार्था पुढतपुढती । तेचि ते सांगो किती । जरी मिया चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥430॥
पार्था, येथे वारंवार तेच ते काय सांगुं ! पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल, तर त्याने माझी भक्ती विसरता कामा नये.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


431-9
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणी श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु का वहावा ॥431॥
अरे कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही, चांगल्या जातीचीही अडचण नाही, आणखी मग विद्वत्तेचा तरी उगीच सोस पाहिजे कशाला ?
432-9
का रुपे वयसा माजा । आथिलेपणे का गाजा । एक भाव नाही माझा । तरी पाल्हाळ ते ॥432॥
अथवा रूपाची आणि वयाची प्रतिष्ठा किंवा डौल (ह्यापैकी काही सुद्धा नको) एक माझ्या ठिकाणी भक्ति नसली तर ही सर्व व्यर्थ.
433-9
कणेविण सोपटे । कणसे लागली आथी एक दाटे । काय करावे गोमटे । वोस नगर ॥433॥
दाण्याशिवाय रिकामी कणसे जरी पुष्कळ दाट लागली असती, अथवा सुंदर शहर असून ते जरओसाड असले; तर त्याला काय करावयाचे आहे ?
434-9
नातरी सरोवर आटले । रानी दुःखिया दुःखी भेटले । का वांझ फुली फुलले । झाड जैसे ॥434॥
किंवा मोठा तलाव असुन तो जर आटला, तसेच रानात एका दुःखकष्टी मनुष्यास दुसरा तसाच भेटला, अथवा ज्याप्रमाणे वांझ फुलांनी एखादे झाड फुलले असावे,
435-9
तैसे सकळ ते वैभव । अथवा कुळजातीगौरव । जैसे शरीर आहे सावेव । परि जीवचि नाही ॥435॥
त्याचप्रमाणे सर्व वैभव, कुल अथवा जातीचा मोठेपणा व्यर्थ होय. जसे सर्व अवयवांनी युक्त शरीर असून त्यात फक्त जीव नसावा.


436-9
तैसे माझिये भक्तीविण । जळो ते जियालेपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई ॥436॥
त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय त्याचे जीवन व्यर्थ होय. अरे पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत का ?
437-9
पै हिवराची दाट साउली । सज्जनी जैसी वाळिली । तैसी पुण्ये डावलूनि गेली । अभक्ताते ॥437॥
हे पहा हिवराची अगदी दाट सावली आहे; पण सज्जनांनी ती निषिद्ध मानली आहे, त्याचप्रमाणे जो माझी भक्ति करीत नाही, त्याला पुण्य डावलून (सोडुन) जाते.
438-9
निंब निंबोळिया मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागी ॥438॥
लिंब हा लिंबोळ्यांच्या भाराने वांकला, तरी त्यापासून ज्याप्रमाणे कावळ्यांनाच सुकाळ होतो, त्याप्रमाणे माझी भक्ति न करणारा पापाचीच जोड करण्याकरिता जगतो.
439-9
का षड्रस खापरी वाढिले । वाढूनि चोहटा रात्री सांडिले । ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥439॥
किंवा ज्याप्रमाणे, षड्रस अन्नांनी भरलेले खापर चव्हाट्यावर ठेविले म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगाला येते,
440-9
तैसे भक्तीहीनाचे जिणे । जो स्वप्नीही परि सुकृत नेणे । तेणे संसारदुःखासी आवंतणे । वोगरिले गा ॥440॥
त्याप्रमाणे, जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण जाणत नाही, त्या भक्तिहीनाचे जिणे म्हणजे संसारदुःखाला ताट वाढून ठेवल्याप्रमाणेंच होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


441-9
म्हणोनि कुळ उत्तम नोहावे । जाती अंत्याही व्हावे । वरि देहाचेनि नांवे । पशूचेही लाभो ॥441॥
म्हणून, उत्तम कुल नसले अथवा जातीने अंत्यज असला, व पशूचाही देह प्राप्त झाला असला, (तरी चालेल पण भक्ति पाहिजे. )
442-9
पाहे पा सावजे हातिरु धरिले । तेणे तया काकुळती माते स्मरिले । की तयाचे पशुत्व वावो जाहले । पातलिया माते॥442॥
पहा की नक्राने गजेद्राला धरल्यावर त्याने दीनपणाने माझे स्मरण केले, त्या वेळेस तो मजप्रत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थ झाले.

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥9. 32॥

443-9
अगा नांवे घेता वोखटी । जे आघवेया अधमांचिये शेवटी । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥443॥
हे किरीटी, जी अधमाहून अधम, व तिचे नांव देखील घेणे उचित नव्हे, अशा पापयोनीत ज्यांनी जन्म घेतला आहे;
444-9
ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझा ठायी दृढ । सर्वभावे ॥444॥
जन्म तर अशा पापयोनीत व मूर्खपणाने केवळ दगड, परंतु माझ्या ठिकाणी सर्वस्वी दृढ भाव आहे.
445-9
जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेचि रुप । जयांचे मन संकल्प । माझाचि वाहे ॥445॥
ज्याच्या वाणीने माझा नामोच्चार होतो, जे दृष्टीने माझ्याच रूपाचा उपभोग घेतात, व ज्यांच्या मनात माझ्याशिवाय दुसरा संकल्पच नसतो;


446-9
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाही श्रवण । जया सर्वांगी भूषण । माझी सेवा ॥446॥
ज्यांचे कान माझा गुणानुवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात, व ज्यांच्या सर्व अवयवांना माझ़्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही;
447-9
जयांचे नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकाते जाणे । जया ऐसे लाभे तरी जिणे । एऱ्हवी मरण ॥447॥
ज्यांच्या बुद्धीला विषयांची आठवणही होत नाही, जे मला एकट्यालाच जाणतात, व ज्यांना या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय जिवंत राहण्यापेक्षा मरण बरे वाटते
448-9
ऐसा आघवाचि परि पांडवा । जिही आपुलिया सर्वभावा । जियावयालागी वोलावा । मीचि केला ॥448॥
हे पांडवा, अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर ठेवून असतात; .
449-9
ते पापयोनीही होतु का । ते श्रुताधीतही न होतु का । परि मजसी तुकिता तुका । तुटी नाही ॥449॥
ते पापयोनीत जन्म घेतलेले असोतकिंवा शास्त्र देखील पडलेले नसोत, पण त्यांची माझ्याबरोबर तुलना केली असता ते मजपेक्षा कमी नाहीत.
450-9
पाहे पा भक्तिचेनि आथिलेपणे । दैत्यी देवा आणिले उणे । माझे नृसिंहत्व लेणे । जयाचिये महिमे ॥450॥
हे पहा की, भक्तीच्या महत्वाने दैत्यांनी देवांनाही मागे टाकले, व त्या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ११० वा, २०, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३०९ ते १३२०
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १३०९
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥
कासया मी तुझा म्हणवितो दास । असतो उदास सर्व भावे ॥धृपद॥
भयाचिया भेणे धरियेली कास । न पुरता आस काय थोरी ॥२॥
तुका म्हणे आप आपली जतन । कैचे थोरपण मग तुम्हा ॥३॥
अर्थ

देवा मला माझ्या इंद्रियांवर ताबा ठेवता आला असता तर मी त्यांच्या आधीन झालो नसतो. मग मी मला तुझा दास म्हणून का घेतले असते ? मी इंद्रियांच्या आधीन असतो तर सर्व भावे उदास होऊन राहिलो असतो. जन्म मरणाच्या भीतीने मी तुमची कास धरली आहे त्यामुळे देवा तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण करत नसाल तर तुमची थोरवी काय उपयोगाची ? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा आम्हाला जर आमची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात ठेवता आली असतील तर मग आम्ही तुम्हाला मोठेपणा का दिला असता ?
अभंग क्र. १३१०
विनवितो तरी आणितोसि परी । याचकाने थोरी दातयाची ॥१॥
आमुचे ही काही असो द्या उपकार । एकल्याने थोर कैचे तुम्ही ॥धृपद॥
न घ्यावी जी काही बहु साल सेवा । गौरव तो देवा यत्न कीजे ॥२॥
तुका म्हणे नाही आमुची मिरासी । असावेसी ऐसी दुर्बळेची ॥३॥
अर्थ

देव मी तुम्हाला विनंती करत राहतो आणि तुम्ही मला जे पाहिजे ते न देता भलतेच प्रकार दाखवता. पण एक लक्षात ठेवा या जगात दात्याचा थोरपणा हा केवळ याचकामुळे असतो. देवा तुम्ही आमचे थोडे उपकार मना जरा आम्ही तुमचे भक्त नसतो तर तुम्हाला देव पणा कसा आला असता, कसा थोरपणा आला असता ? देवा तुम्ही आमच्याकडून भरपूर सेवा करून घेऊ नका उलट आपल्या दोघाचाही गौरव कसा होईल याचा प्रयत्न करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा आमची वंशपरंपरा अशी नाही की आम्ही कायमस्वरूपी दुबळे राहावेत.
अभंग क्र. १३११
एका ऐसे एक होते कोण्याकाळे । समर्थाच्या बळे काय नव्हे ॥१॥
घालूनि बैसलो मिरासीस पाया । जिंको देवराया संदेह नाही ॥धृपद॥
केला तो न संडी आता कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥
तुका म्हणे जाली अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळो साच ॥३॥
अर्थ

एकासारखी एक गोष्ट कोणत्याही काळात होणे शक्य आहे काय ? परंतु समर्थांच्या बळाने काही होणे अशक्य नाही. मी माझी वंशपरंपरागत सेवा याचा आधार घेऊन तुमच्या पायाशी बसलो आहे देवा. त्यामुळे मी तुम्हाला जिंकणे यात कोणताही संदेह नाही. देवा मी एकदा निश्चय केला की, तो सोडणार नाही तुमच्या आणि माझ्या मध्ये येणाऱ्या विकारांना मी बाजूला सारे. तुकाराम महाराज म्हणतात देवा इतक्या दिवस माझ्यावर आळसाने धाडी घातली होती त्यामुळे मला तुम्हाला कसे जिंकावे याचे वर्म कळले नव्हते.
अभंग क्र. १३१२
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आता उठावेसे मना । येत नाही नारायणा ॥धृपद॥
सुरवाडिकपणे । जेथे सापडले केणे ॥२॥
तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥३॥
अर्थ

देवा मी तुमचे चरण खऱ्या भक्तीभावाने धरले आहे त्यामुळे माझ्या मनाचे समाधान झाले आहे. नारायण आता तुमच्या सुंदर चरणापासून उठावे असे मनातही येत नाही. तुमच्या चरणांजवळ मला कोणतेही कष्ट न करता मोक्ष रुपी माल सापडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या संचित कर्माचा भोग नष्ट झाला आहे.
अभंग क्र. १३१३
मुखाकडे वास । पाहे करूनिया आस ॥१॥
आता होईल ते शिरी । मनोगत आज्ञा धरी ॥धृपद॥
तुह्मी अंगीकार । केला पाहिजे हे सार ॥२॥
तुका म्हणे दारी । उभे याचक मी हरी ॥३॥
अर्थ

देवा मी तुमच्या मुखाकडे मोठी आसं करून पाहत आहे. आता मला तुम्ही कोणतीही आज्ञा करा मी ती मला शिरसावंद्य आहे. देवा तुम्ही माझा अंगिकार करावा हाच माझा सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मी तुमच्या दाराशी भिकारी म्हणून उभा आहे.
अभंग क्र. १३१४
नाही माथा भार । तुम्ही घेत हा विचार ॥१॥
जाणोनिया केले । दुरिल अंगेसी लाविले ॥धृपद॥
आता बोलावे आवडी । नाम घ्यावे घडी घडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही माझ्या योगक्षेम माझा भार तुमच्या अंगावर घेत नाही. हा तुमचा विचार आहे हे जाणून मी आता तुमच्या अंगाशी येऊन चिटकलो आहे. आता आम्ही तुमच्याशी आवडीने बोलणार आणि तुमचे नाम घडोघडी ला घेणार. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्यापासून दूर राहून जीव दशेने उरणे म्हणजे प्रत्यक्ष खोटेपणा आहे.
अभंग क्र. १३१५
माझे जड भारी । आता अवघे तुम्हावरी ॥१॥
जालो अंकित धंकिला । तुमचा मुकलो मागिला ॥धृपद॥
करितो जे काम । माझी सेवा तुझे नाम ॥२॥
तुका पाया लागे । काही नेदी ना न मगे ॥३॥
अर्थ

माझा सर्व संकटाचा भार तुमच्यावर आहे. देवा मी तुमच्या दासाचा ही दास आहे त्यामुळे मी आता प्रपंचाच्या दुखायला ही मुकलो आहे. देवा मी एकच काम करतो ते म्हणजे तुझे नांव घेतो आणि हिच माझी सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी केवळ तुमच्या पायाला लागला आहे, या वाचून मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आणि तुम्हाला काही मागणारही नाही.
अभंग क्र. १३१६
तुम्ही आम्ही भले आता । जालो चिंता काशाची ॥१॥
आपुलाले आलो स्थळी । मौन कळी वाढेना ॥धृपद॥
सहज जे मनी होते । ते उचिते घडले ॥२॥
तुका म्हणे नसते अंगा । येत संगा सारिखे ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही स्वामी आणि मी सेवक या नात्याने आप आपल्या परीने चांगले झालो आहो मग आता चिंता आहे तरी कशाची ? देवा तुम्ही स्वामी आहात मी सेवक आहे, आपण दोघेही एकमेकांच्या जागेवर बरोबर आहोत. जर आपण मौन धरले तर आपल्या मध्ये भांडण होण्याचे कारण काय देवा इतके दिवस माझ्या मनात होते की तुमची सेवा करण्याची मला संधी यावे ते जाता उचित प्रकारे घडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आमच्याशी योग्य पणाने वागत नव्हते त्यामुळे आमच्या अंगी नसता क्रोध येत होता.
अभंग क्र. १३१७
चित्ता ऐसी नको देऊ आठवण । जेणे देवाचे चरण अंतरे ते ॥१॥
आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावी कानी ऐसी गोडी ॥धृपद॥
मत्सराचा ठाव शरीरी नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥
तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचे ते बळ क्षमा अंगी ॥३॥
अर्थ

हे मना ज्यामुळे देवाचे चरणा अंतरतील अशा गोष्टीची आठवण तू चित्तामध्ये येऊ देऊ नकोस, माझ्या मुखातून राम नामाचा ध्वनी बाहेर पडावा कानाने देवाचेच संदेश वचने ऐकावी अशाच गोष्टीची आवडत तुला लागू दे. दुसऱ्यांविषयी मत्सर नसावे कारण त्यामुळे लाभ तर काही होत नाही. पण दुःख मात्र होते. तुकाराम महाराज म्हणतात अंतकरण शितल असावे अंतकरणात क्षमा असावी हेच खरे शांतीचे बळ आहे.
अभंग क्र. १३१८
कोण पुण्य कोण गाठी । ज्यासी ऐसीयांची भेटी ॥१॥
जीही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥धृपद॥
कोण हा भाग्याचा । ऐसियाची बोले वाचा ॥२॥
तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसाराची तुटी ॥३॥
अर्थ

असे कोणते पुण्य कोणाच्या पदरी आहे की ज्याला ज्ञानी भक्तांची भेट घडेल. की, ज्या हरीभक्तांनी संसारावर पाणी सोडले आणि हरीला आपल्या मनात धारण केले. असा कोण भाग्यवान आहे की त्या भाग्यवानाबरोबर ते हरीभक्त परमार्थाविषयी बोलण्यास तयार होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा ज्ञानी भक्तांची भेट होणे म्हणजे पूर्व पुण्यानेच हे होते आणि त्यांची भेट झाली की संसारबंधन तुटते. ”
अभंग क्र. १३१९
तरिच हा जीव संसारी उदास । धरिला विश्वास तुम्हा सोई ॥१॥
एके जातीविण नाही कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥धृपद॥
फुटतसे प्राण क्षणांच्या विसरे । हे तो परस्परे सारिखेचि ॥२॥
तुका म्हणे चित्ती राखिला अनुभव । तेणे हा संदेह निवारिला ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही माझी उपेक्षा करणार नाही असा मी दृढविश्‍वास धरला आहे आणि त्या कारणामुळे मी संसाराविषयी उदास झालो आहे. दोन समान जातीचे व्यक्ती म्हणजे समान स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांना एकमेकांविषयी कळवळा असतो त्याप्रमाणे गोपाळा तुमची आणि माझी जात म्हणजे आपल्या दोघाचा स्वभाव एक सारखाच आहे. त्या कारणाने आपण प्रेम सुखाच्या दोरी ओढले गेलो आहोत. देवा तुमचा क्षणभर मला विसर पडला तर माझा जीव कासावीस होतो. अगदी त्याप्रमाणे तुम्हालाही माझा क्षणभर विसर पडला तर तुमचा देखील जीव कासावीस होतो हा तुमचा आणि माझा स्वभाव अगदी सारखाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी जात एकच आहे म्हणजे स्वभाव एकच आहे याचा माझ्या चित्ताला अनुभव आला आहे, त्यामुळे माझ्या मनाचा संदेह निवारण झाला आहे, माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही.
अभंग क्र. १३२०
किती विवंचना करीतसे जीवी । मन धावडवी दाही दिशा ॥१॥
कोणा एका भावे तुम्ही अंगीकार । करावा विचार याच साठी ॥धृपद॥
इतर ते आता लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥
तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावे प्रेमबोधी बुडोनिया ॥३॥
अर्थ

देवा तुझी प्राप्ती व्हावी यासाठी माझे मन किती वंचित होत आहे तुला काय सांगू. अरे तुझी भेट व्हावी यासाठी माझे मन दाहीदिशा हिंडत आहे. देवा तुम्ही माझा अंगिकार कोणत्याही प्रकारे केला पाहिजे याचा विचारा मी करीत आहे. संसारातील सर्व लाभ मला आता तुमच्या वाचून तूच्छ वाटत आहेत कारण संसारातील गुणदोष मला चांगलेच कळले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या प्रेम बोधात बुडून जावे अशी माझी इच्छा आहे आणि मला अखंड समाधी लागावी असेच मला वाटते.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading