२ एप्रिल, दिवस ९२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २५१ ते २७१ सार्थ तुकाराम गाथा अभंग १०९३ ते ११०४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २५१ ते २७१,

251-8
आता शरीराचे तयाचिया ठाई । आडनांवही उरले नाही । तरि कोणे काळे काई । निमे ते पाहे पा ॥251॥
देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनांव सुद्धा रहात नाही. मग असे पहा की, कोणच्या वेळेस कशाचा लय होतो.
252-8
मग मार्गाते कासया शोधावे । कोणे कोठूनि के जावे । जरी देशकालादि आघवे । आपणचि असे ॥252॥
जर देश, काल इत्यादि गोष्टी तो आपणच होऊन राहीला आहे, तर मग कोणीकडून कसे जावे ? इत्यादि ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा ?
253-8
आणि हा गा घटु जे वेळी फुटे । ते वेळी तेथीचे आकाश लागे नीटे वाटे । वाटा लागे तरि गगना भेटे । एऱ्हवी काय चुके ॥253॥
आणि ज्या वेळेस घट फुटतो, त्या वेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाही तर चुकते की काय ?
253-8
पाहे पा ऐसे हन आहे । की तो आकारूचि जाये । येर गगन ते गगनीचि आहे । घटत्वाहि आधी ॥254॥
हे पहा -खरी गोष्ट अशी आहे की, त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो; येरव्ही घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे.
255-8
ऐसिया बोधाचेनि सुरवाडे । मार्गामार्गाचे सांकडे । तया सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी ॥255॥
अशा ज्ञानाच्या साधनाने, आपण ब्रह्मच आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही


256-8
याकारणे पंडुसुता । तुवा होआवे योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळी साम्यता । आपणपा होईल ॥256॥
यास्तव, हे पंडुसुता, तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरुपता प्राप्त होईल.
257-8
मग भलतेथ भलतेंव्हा । देहबंध असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाही ॥257॥
मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो. परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही.
258-8
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांती मरणे नाप्लवे । माजी स्वर्गसंसाराचेनि लाघवे । झकवेना ॥258॥
तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही, तसेच सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसारसुख यांच्या मोहाने कधी फसत नाही.
259-8
येणे बोधे जो योगी होये । तयासीचि या बोधाचे नीटपण आहे । का जे भोगाते पेलूनि पाहे । निजरूपा ये ॥259॥
त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. कारण, तो विषयोपभोगाला तोलून पाहून ब्रह्मरूपाला मिळतो.
260-8
पै गा इंद्रादिका देवा । जया सर्वस्वे गाजती राणिवा । ते सांडणे मानूनि पांडवा । डावली जो ॥260॥
हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग मिळतो, ते सुख त्याज्य मानून तो दूर लोटतो.

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदेत्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥8. 28॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥8॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


261-8
जरी वेदाध्ययनाचे जाले । अथवा यज्ञाचे शेतचि पिकले । की तपोदानांचे जोडले । सर्वस्व हन जे ॥261॥
जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला, अथवा यज्ञ करून पुण्य पेरून ठेविले, किंवा तप आणि दान करून पुण्य जोडले,
262-8
तया आघवा पुण्याचा मळा । भार आंतौनि जया ये फळा । ते परब्रह्मा निर्मळा । सांटी न सरे ॥262॥
अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने व्यापून गेला, तरी त्या निर्मळ ब्रह्माचा बरोबरी कोणाच्यानेंही करवत नाही.
263-8
जे नित्यानंदाचेनि माने । उपमेचा काटाळा न दिसे साने । पाहा पा वेदयज्ञादि साधने । जया सुखा ॥263॥
जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्ताकरता वेदयज्ञादि साधने करावी लागतात;
264-8
जे विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडे पुरे । पुढती महासुखाचे सोयरे । भावंडचि ॥264॥
जे स्वर्गसुख विटत नाही, व संपतही नाही, भोगणाराच्या इच्छा पूर्ण करते, व जे महासुखाचे (ब्रह्मसुखाचे) धाकटे भावंडच होय,
265-8
ऐसे दृष्टीचेनि सुखपणे । जयासी अदृष्टाचे बैसणे । जे शतमखाही आंगवणे । नोहेचि एका ॥265॥
अशाप्रमाणे वरकांती दिसनारे ते सुख, व जे मरणानंतरच प्राप्त होते, आणि जे शंभर यज्ञ करूनही साध्य होत नाही


266-8
तयाते योगीश्वर अलौकिके । दिठीचेनि हाततुके । अनुमानती कौतुके । तव हळुवार आवडे ॥266॥
योगोश्वर दिव्यदृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे सुक्ष्म वाटते.
267-8
मग तया सुखाची किरीटी । करुनिया गा पाउटी । परब्रह्मचिये पाटी । आरूढती ॥267॥
मग अर्जुना, त्या स्वर्गसुखाची पायरी करून ते ब्रह्मपदावर चढतात.
268-8
ऐसे चराचरैकभाग्य । जे ब्रह्मेशा आराधनेयोग्य । योगियांचे भोग्य- । भोगधन जे ॥268॥
याप्रमाणे स्थावरजंगमाचे मुख्य भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधाना करण्यास योग्य, व योग्याची उपभोग घेण्याची वस्तु,
269-8
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । तो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥269॥
जो आद्य ज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ति, जो सर्व विश्वातील प्राणिमात्राचे जीवन, जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा,
270-8
जो सवर्ज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळीचा कुळदिवा । तो श्रीकृष्णजी पांडवा- । प्रति बोलिला ॥270॥
जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा, व यादवकुलाचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला बोलला.


271-8
ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढा मातु । ज्ञानदेव म्हणे ॥271॥
असा कुरुक्षेत्रांतील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
॥इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां अक्षरब्रह्म योगोनाम् अष्टमोऽध्याय:॥8॥
। सच्चिदानन्दार्पणमस्तु ।

दिवस ९२ वा, २, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०९३ ते ११०४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग – १०९३
विठ्ठल विठ्ठल येणे छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥१॥
वाये टाळ टाळ्या टाळी । होईल होळी विघ्नांची ॥धृपद॥
विठ्ठल आदी अवसानी । विठ्ठल मनी स्मरावा ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानी आईका ॥३॥
अर्थ

विठ्ठल या नामात ब्रह्मानंद आहे व त्या नामाच्या छंदात गर्जना करावी. नाम घेताना हाताने टाळी, टाळ वाजवाव्यात त्यामुळे सर्व विघ्नांची होळी होते. कोणतेही काम करताना कामाच्या आधी व शेवटी विठ्ठल नाम घ्यावे मनामध्येही विठ्ठलाचे स्मरण करावे. तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो तुम्ही तुमच्या वाणीने विठ्ठलच म्हणा आणि कानाने ही विठ्ठलच ऐका.
अभंग – १०९४
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले ॥धृपद॥
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥
तुका म्हणे खरे जाले । एका बोले संतांच्या ॥३॥
अर्थ

पंढरीचे जे खरे वारकरी आहेत तेच मोक्षाचे खरे अधिकारी आहेत असा वर देवाने पुंडलिकाला दिलेला आहे. तो वारकरी मूढ असो, पापी असो किंवा कसाही असो हा पांडुरंग त्याला आपल्या कासेला बांधून भवसागरातून पार करतो. तुकाराम महाराज म्हणतात पुंडलिकाने देवाला वर मागितला आहे की ‘हे देवा जे कोणी वारकरी तुझ्या दर्शनाला पंढरीला येतील तू त्यांना मुक्त कर ” या पुंडलिकाच्या वराला देवाने मान्य करून त्याचे म्हणणे खरे ठरविले.
अभंग – १०९५
अमृताची फळे अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयाचिया ॥धृपद॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥२॥
तुका म्हणे तैसे होइजेत संगे । वास लागे अंगे चंदनाच्या ॥३॥
अर्थ

अमृताची वेली असली की फळही अमृताचे तयार होईल आणि त्या फळापासून जे बीज तयार होईल पुढे त्याचाच सविस्तर होईल. त्याप्रमाणे हे नारायणा मला अशा संतांची संगती दे की ज्यांच्या अंतःकरणात मध्ये आणि त्यांच्या वचनांमध्ये भक्तीचा ओलावा असेल. उत्तम प्रकारचे अन्न सेवन केलेले असेल किंवा उत्तम प्रकारची पेये घेतल्याने घशाला शीतलता मिळते त्यामुळे अंगावर कांती व शरीरावर पुष्टी दिसते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडा शेजारी असणाऱ्या सर्व वृक्षांना चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांच्या संगतीने संसारिक माणसांच्या अंगी संतांचे गुण आपोआप येतात.
अभंग – १०९६
पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ॥धृपद॥
मागील परिहार पुढे नाही शीण । जालिया दर्षणे एकवेळा ॥२॥
तुका म्हणे नेदी आणिकाचे हाती । बैसला तोचित्ती निवडेना ॥३॥
अर्थ

हे संसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग भक्तांच्या भेटी करता फार उतावीळ आहे आणि भक्तांची वाट तो सारखी पाहत असतो. तो कृपाळू आहे आणि भेट घेण्याकरता तो तातडी करतो त्या पांडुरंगाचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे संचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देत नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा की एकरूप झाला की काही केल्या वेगळा होत नाही तो भक्तांच्या चित्तात चिद्रुप होतो.
अभंग – १०९७
न कळे ते कळो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥१॥
न दिसे ते दिसो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥धृपद॥
न बोलो ते बोलो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥२॥
न भेटे ते भेटो येईल आपण । करिता चिंतन विठोबाचे ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणता वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावे । तरतील नावे विठोबाच्या ॥५॥
अर्थ

श्रद्धेने विठोबाचे नाम घेतले की न कळणाऱ्या गोष्टीही आपोआप कळतात. जे काही अदृष्य स्वरूपात आहे तेही दिसू लागते केवळ विठोबाचे नाम स्मरण केले तर. जे बोलण्यासाठी अवघड आहे ते वेदार्थही आपण सहज बोलू शकतो केवळ विठ्ठलाचे नामस्मरण मनापासून करण्याची आवश्यकता आहे. ज्याची भेट ही अशक्य आहे त्यांची भेट ही‌ आपोआप होईल ते केवळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने. अलभ्याचाही लाभ पुष्कळ होईल ते केवळ विठोबाचे नामस्मरण निरंतर आपल्या वाचेने केल्यानेच. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक या भवसागरात आसक्त झालेले आहेत ते मनोभावे विठोबाचे नामस्मरण करतील तर ते देखील तरुण जातील.
अभंग – १०९८
बहुजन्मे केला लाग । तो हा भाग लाधलो ॥१॥
जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥धृपद॥
गेले मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥
तुका म्हणे तांतड करू । पाय धरू बळकट ॥३॥
अर्थ

माझ्या अनेक जन्मीचे पूर्वपुण्य आहे की मला हा मनुष्यदेह प्राप्त झाला. मी या विठ्ठलाच्या चरणी माझा देह अर्पण करेल आणि संसाराची होळी करीन. एकदा की हा मनुष्य देह गेला की पुन्हा मिळत नाही याची चिंता मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता तातडी करून परमार्थ करावा लागेल आणि हरीचे पाय बळकट धरावे लागेल.
अभंग – १०९९
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्या ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हे वर्म पडे ठायी ॥३॥
अर्थ

भक्ती प्रेम सुख हे हरीच्या भक्तांवाचून इतर कोणालाही समजणार नाही मग पंडीत असो, ग्रंथवाचक असो किंवा ज्ञानी असला तरी. मग कोणी आत्मनिष्ठ किंवा जीवनमुक्त जरी झाले तरी त्यांनाही भक्तीसुख दुर्लभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, “श्रध्देने तुम्ही या विठ्ठलाचे नारायणाचे नाम जर घेतले तरच तो नारायण कृपा करील आणि मग भक्तीसुखाचे रहस्य मर्म वर्म कळेल. ”
अभंग – ११००
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥धृपद॥
मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तू नेणे ॥२॥
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी ॥३॥
अर्थ

गाढवीनीने दूध दिले तरी त्या दुधाची बरोबरी गाईच्या दुधाशी होईल काय ? कावळ्याच्या गळ्यामध्ये पुष्पाचा हार घातला तरी त्याला हंसाचे रूप येईल काय ? मर्कटाने जरी अंगाला बारा टिळे लावले तरी त्याला ब्राम्‍हणाप्रमाणे वर्तन करता येईल काय ? तर येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ब्राम्‍हणाने जरी कर्म भ्रष्ट पणा केला तरी तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे चांगले कर्म करणाऱ्याकडून एखादे कर्म चुकून वाईट जरी घडले त्याच्याकडून कर्म भ्रष्ट पानाचे वर्तन झाले तरी तो श्रेष्ठ होय. (या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ‘तो ब्राम्‍हण ” म्हणजे नेहमी चांगले कर्म करणारा श्रेष्ठ ब्राम्‍हण. )
सार्थ तुकाराम गाथा १००१ ते ११०० समाप्त
सार्थ तुकाराम गाथा ११०१ ते १२००
सार्थ तुकाराम गाथा 1101 ते 1200
अभंग क्र. ११०१
देव भक्तालागी करू नेदी संसार । अंगे वारावार करोनि ठेवी ॥१॥
भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥धृपद॥
स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागी कर्कशा करुनी ठेवी ॥२॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोका काय सांगो ॥३॥
अर्थ

देवभक्तांना संसार करू देत नाही कारण भक्त जर संसार करू लागले तर ते भक्ती करणार नाही त्यामुळे देव प्रतिकूलता निर्माण करतो. भक्ताचे जर भाग्य उजळावे तर त्या भक्ताला अभिमान निर्माण होतो त्यामुळे देव त्याला करंट‌ा करतो. बायको जर गुणवती द्यावी तर तो तिच्या मोहात पडतो त्यामुळे देव त्याला बायको किरकिर करणारी देतो. तुकाराम महाराज म्हणतात‌ या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे त्यामुळे याविषयी मी इतरांना अधिक काय सांगू ?
अभंग क्र. ११०२
वाघे उपदेशिला कोल्हा । सुखे खाऊ द्यावे मला ॥१॥
अंती मरसी ते न चुके । मज ही मारितोसी भुके ॥धृपद॥
येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडे जाला ॥२॥
देह तव जाणार । घडेल हा परउपकार ॥३॥
येरू म्हणे मनी । ऐसे जावे समजोनि ॥४॥
गाठी पडली ठका ठका । त्याचे वर्म जाणे तुका ॥५॥
अर्थ

एकदा वाघाने एका कोल्ह्याला असा उपदेश केला की, अरे मला फार भूक लागली आहे त्यामुळेच तुला मी खावे असे मला वाटत आहे. तरी तू मला सुखाने तुला खाऊ दे. तुला मरण काही चुकणार नाही मग तू मला तरी मला का उपाशी मारतोस ? ते ऐकून कोल्हा त्याला म्हणतो की अरे तू म्हणतो ते अगदी योग्य आहे आणि ते मला पटले देखील पण तू तुझ्या तोंडाने असा निवड करतो आहेस की माझ्यावर उपकार कर, मला खाण्याची इच्छा तुला झाली आहे पण तू जर मला सोडून दिले तर तुला परोपकार करण्याचे पुण्य मिळेल त्यामुळे तूच सांगितलेला हा निर्णय तूच समजून घे म्हणजे झाले. तुकाराम महाराज म्हणतात एका ठकाला दुसऱ्या ठका ची गाठ पडली तर ते एकमेकाला कसा स्वार्थी उपदेश करतात ते मला माहित आहे.
अभंग क्र. ११०३
जेथे आठवती स्वामींचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकात । समाधान चित्त ते ते घडी ॥धृपद॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहाता संकल्प गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणे । भाग्य नारायण उत्तम ते ॥३॥
अर्थ

जेथे हरीच्या पायाचे चिंतन चालू असते तेच ठिकाण उत्तम आणि रम्य असते. हरिचिंतन रानात वनात एकातात केव्हाही चित्ताला समाधानच देते. ज्यावेळी गोविंदाचे चिंतन करण्याचा संकल्प आपण करतो तो काळ धन्य आहे व आनंद देणारा काळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य जीवनात ज्या ज्या वेळी हरीचे चिंतन करतो, नारायणाचे चिंतन चित्तात करतो तो काळ लाभदायक आहे आणि यालाच उत्तम भाग्य देखील म्हणतात.
अभंग क्र. ११०४
तुज न भे भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥
माझा बळीया नेणसी कोण । संता साहे नारायण ॥धृपद॥
शंख वधिला सागरी । वेद घेउनि आला चारी ॥२॥
कूर्मे दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटी ॥३॥
वाराहरूप धरिले गाढे । धरा प्रतापे धरिली दाढे ॥४॥
हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥
वामन जाला दिनानाथ । बळी पाताळी घातला दैत्य ॥६॥
छेदुनिया सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥
शिळा प्रतापे सागरी तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥
मारोनिया कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥
पांचाळीसी गांजिता वरी । वस्त्रे आपण जाला हरी ॥१०॥
गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥
तुका म्हणे हरीरूप जाले । पुन्हा नाही जन्मा आले ॥१२॥
अर्थ

हे कळिकाळा मी तुला केव्हाच भिणार नाही कारण माझ्या चित्तामध्ये नामा विषयी विशेष जिव्हाळा आहे. अरे माझा पाठीराखा कोण आहे ते तुला माहीत आहे काय, अतिशय बलाढ्य असा संतांना सतत सहाय्य करणारा नारायणच माझा पाठीराखा आहे. मी तुला त्याच्या काही कथा सांगतो ते ऐक. ज्यावेळी शंखासुराने चारही वेद चोरुन सागरात नेले त्यावेळी या नारायणाने त्याचा वध करून चार वेद परत आणले. कुर्म अवतारात या हरि ने आपले हात-पाय लपून मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि देवांची मदत केली आणि चोरून अमृत पिणाऱ्या राहू दैत्याचा याने शिरच्छेद केला. वराह अवतारामध्ये याने हिरण्याक्षाचा वध करून पाताळात नेलेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर धरून वर काढले. पुढे त्याने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आपल्या भक्ताचे म्हणजे प्रल्हादाचे रक्षण केले. त्यानंतर त्याने वामनाचे र�

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading