४ एप्रिल, दिवस ९४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १११७ ते ११२८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“४ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ४ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ४ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १११७ ते ११२८ चे पारायण आपण करणार आहोत.


४ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २६ ते ५०,

26-9
सहजे तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदे पेलती अक्षरा । प्रमेयाची ॥26॥
वक्तृत्वरूप पांखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टि येईल.
27-9
अर्थु बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायाते विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥27॥
अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पहात असतो, शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नानाप्रकारचे श्लेष सुचू लागतात.
28-9
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वते वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥28॥
म्हणून, संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या ह्रदयाकाशांत ब्रह्मज्ञानाची वृष्टि होते; आणि जर ऐकणाराचे दुर्लक्ष असेल, तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो.
29-9
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्री की आहे । म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे । श्रोतेनि वीण ॥29॥
अहो, चंद्रकांत मण्याला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ति एका चंद्राचेच ठिकाणी आहे. म्हणून बोलणारास श्रोत्याशिवाय किंमत नाही;
30-9
परी आता आमुते गोड करावे । ऐसे तांदुळी कायसा विनवावे । साइखडियाने काइ प्रार्थावे । सूत्रधाराते ॥30॥
परंतु आम्हास गोड करुन घ्या, अशी तांदुळांना विनंति करावी लागते का ? तसेच, कळसूत्री बाहुल्यांना, ‘आम्हाला नाचवा ‘ म्हणून सुत्रधाराची विनंती करावी लागते का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-9
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । की आपुलिये जाणिवेची कळा वाढवी । म्हणऊनि आम्हा या ठेवाठेवी । काय काज ॥31॥
तो सुत्रधार बाहुल्यांच्या कामाकरिता त्यांना नाचवीत नाही, तर आपली कुशलता दाखविण्याकरिता नाचवितो; म्हणून आम्हाला या उठाठेवी करण्याचे काय कारण आहे ? त्या वेळी श्रीगुरु निवृत्तिराज म्हणतात,
32-9
तव गुरु म्हणती काइ जाहले । हे समस्तही आम्हा पावले । आता सांगे जे निरोपिले । नारायणे ॥32॥
तुला इतके उदास होण्याचे कारण काय झाले ? तुझे सर्व बोलणे आम्हाला मान्य आहे; तर आता श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगीतले, ते सांग. “
33-9
येथ संतोषोनि निवृत्तिदासे । जी जी म्हणऊनि उल्हासे । अवधारा श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले ॥33॥
तेव्हा निवृत्तिदासास ज्ञानदेव संतोष पावून मोठ्या उल्हासाने म्हणाले :- होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले :-

श्री भगवानुवाचः
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात् ॥9. 1॥

34-9
नातरि अर्जुना हे बीज । पुढती सांगिजेल तुज । जे हे अंतःकरणीचे गुज । जीवचिये ॥34॥
अर्जुना, माझ्या अंतःकरणातील अति गुह्य असे जे ज्ञानाचे आदिकारण, ते पुनः तुला सांगतो.
35-9
येणे माने जीवाचे हिये फोडावे । मग तुज का पा मज सांगावे । ऐसे काही स्वभावे । कल्पिशी जरी ॥35॥
आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडुन ते तुला मी का सांगतो अशी जर तुझ्या मनात सहज शंका येईल,


36-9
तरी परियेसी प्राज्ञा । तू आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करु ॥36॥
तर बाबारे, ऐक, तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ति आहेस; आणि आम्ही जे तुला सांगतो, ते तू मनापासून ऐकतोस; म्हणून,
37-9
म्हणोनि गूढपण आपुले मोडो । वरि न बोलावेही बोलावे घडो । परि आमुचिचे जीवीचे पडो । तुझा जीवी ॥37॥
आमची गुह्य गोष्ट पडली तरी पडो, आणि न बोलावयाची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या ह्रदयातील गुह्य गोष्ट तुझ्या ह्रदयात पडो.
38-9
अगा थानी कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे की गोड । म्हणोनि सरो का सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥38॥
अरे, स्तनांत जरी दूध साठविलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते; म्हणून, जर एकनिष्ठ सेवन करणारा वत्स मिळाला, तर त्याची इच्छा पूर्ण होवो.
39-9
मुडाहूनि बीज काढिले । मग निर्वाळलिये भूमी पेरिले । तरी ते सांडीविखुरी गेले । म्हणो ये कायी ॥39॥
मुढ्यातून पेरण्याचे बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले, तर ते सांडलवंडीवरी गेले असे म्हणता येईल का ?
40-9
यालागी सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पै गा गौप्यही परि तयाप्रती । चावळिजे सुखे ॥40॥
याकरिता, प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धिचा, निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल, तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-9
तरि प्रस्तुत आता गुणी इही । तू वाचूनि आणिक नाही । म्हणोनि गुज तरी तुझा ठायी । लपवू नये ॥41॥
तर ह्या गुणांनी संपन्न असा सांप्रत तुजवाचून कोणी नाहीं, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून चोरता येत नाही.
42-9
आता किती नावानावा गुज । म्हणता कानडे वाटेल तुज । तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेसी ॥42॥
आता वारंवार गुप्त गुप्त म्हटल्यामुळे तुला कंटाळवाणे वाटेल; तर आता तुला प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो.
43-9
परि तेचि ऐसेनि निवाडे । जैसे भेसळले खरे कुडे । मग काढिजे फाडोवाडे । पारखूनिया ॥43॥
परंतु खरे आणि खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करुन दाखवितो.
44-9
का चांचूचेनि सांडसे । खांडिजे पय पाणी राजहंसे । तुज ज्ञान विज्ञान तैसे । वांटूनि देऊ ॥44॥
किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध व पाणी निरनिराळे करतो, त्याप्रमाणे हे ज्ञान-विज्ञान तुला स्पष्ट करून सांगतो.
45-9
मग वारयाचिया धारसा । पडिला कोंडा का नुरेचि जैसा । आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥45॥
म्हणजे मग कोंडा व धान्य उफणण्याकरिता वाऱ्यावर धरले असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो.


46-9
तैसे जे जाणितलेयासाठी । संसार संसाराचिये गाठी । लाऊनि बैसवी पाटी । मोक्षश्रियेचां ॥46॥
त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर संसाराच्या पाठीमागेच संसार लावून साधकाला ते मोक्षश्रीच्या पाठीवर नेऊन बसविते !

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥9. 2॥

47-9
जे जाणणेया सुविद्येच्या गावी । गुरुत्वाची आचार्यपदवी । जे सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रा रावो ॥47॥
ज्याला सर्व ज्ञानांच्या ठिकाणी मुख्य असे आचार्याचे स्थान मिळते, जे सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र वस्तुंचा राजा,
48-9
आणि धर्माचे निजधाम । तेविचि उत्तमाचे उत्तम । पै जया येता नाही काम । जन्मांतराचे ॥48॥
आणि धर्माचे अधिष्ठान; तसेच उत्तमांत उत्तम, व ज्या ज्ञानाची प्राप्ति झाली असता दुसरा जन्म घेण्याचे कारण रहात नाही;
49-9
मोटके गुरुमुखे उदैजत दिसे । आणि हृदयी स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसे । आपैसयाचि ॥49॥
जे गुरूच्या मुखातून थोडे बाहेर पडू लागले नाही तोच शिष्याच्या ह्रदयात स्वयमेव असलेले (ब्रह्म) त्यास सहज प्राप्त होते;
50-9
तेविचि पै गा सुखाचा पाउटी । चढता येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणे याहि पडे ॥50॥
त्याचप्रमाणे, सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते; आणि मग भेट झाल्यावर, भेटीपासून, होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ९४ वा, ४, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १११७ ते ११२८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. १११७
राउळासी जाता त्रास मानी मोठा । बैसे चोहोटा आदरेशी ॥१॥
न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥धृपद॥
देवाब्राम्हणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावे ॥२॥
सुगंध चंदन सांडोनिया माशी । बैसे दुगपधीशी अत्याआदरे ॥३॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीन । का रे रामराणा विसरसी ॥४॥
अर्थ
काही माणसे असे आहेत की त्यांना देव दर्शन घेण्यासाठी देवळात जाण्यासाठी त्रास वाटतो परंतु चव्हाट्यावर बसून लोकांच्या टवाळ्या करण्यास मात्र त्यांना आनंद वाटतो. त्या मनुष्याला स्नानसंध्या करण्याची आवडत नाही. राम राम हा मंत्र मुखाने ते कधीही म्हणत नाहीत परंतु गुडगुडी किंवा बिड्या अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस ओडण्यासाठी ते तयार असतात या व्यसनाविषयी त्यांना विशेष प्रेम वाटते. देव आणि ब्राम्‍हण यांच्या चरणावर हा कधीही लोटांगण घालणार नाही परंतु दासींच्या चरणावर हा प्रेमाने लोटांगण घालतो. चंदनाचा सुगंध सोडून माशी मोठ्या आवडीने दुर्गंधी पदार्थावर बसते. तुकाराम महाराज म्हणतात अरे भाग्यहीना तू शूद्र भोगासाठी रामरायाला का बरे विसरलास ?
अभंग क्र. १११८
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आता मज ऐसे करी । तुझे पाय चित्ती धरी ॥धृपद॥
उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥२॥
तुका म्हणे आता । लाभ नाही या परता ॥३॥
अर्थ

हे नारायणा माझ्या मनामध्ये कधीही वाईट दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस. आता तू माझ्या चित्तालाच असे कर की माझे चित्त तुझे चरण घट्ट धरून राहतील. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी जो भक्तिभाव उत्पन्न झाला आहे तो सिद्धीस म्हणजे फलप्राप्ती होईल पर्यंत जावो. तुकाराम महाराज म्हणतात आता या लाभा पेक्षा इतर कोणताही लाभ उरला नाही.
अभंग क्र. १११९
तरुवर बीजा पोटी । बीज तरुवरा शेवटी ॥१॥
तैसे तुम्हा आम्हा जाले । एकी एक सामावले ॥धृपद॥
उदकावरील तरंग । तरंग उदकाचे अंग ॥२॥
तुका म्हणे बिंबछाया । ठायी पावली विलया ॥३॥
अर्थ

बीजातून वृक्ष फळाला येतो आणि शेवटी वृक्षातूनच त्याचे पुन्हा बीज उत्पन्न होते, हे देवा तुझे माझे देखील तसेच आहे, म्हणजेच तुझ्यातून मी जन्माला आलो आणि माझ्यातून तू, म्हणजेच माझ्यात तू आता इतका सामावला आहेस की माझा मीपणा जाऊन, द्वैत जाऊन शेवटी तूच राहणार आहेस. ज्याप्रमाणे पाण्यापासूनच तरंग निर्माण होतात आणि शेवटी ते पाण्यातच सामावतात. म्हणजेच तरंग उदकापासून वेगळे नसून त्या पाण्याचे अंगचं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे छाया जशी ज्या बिंबापासून निर्माण होते आणि शेवटी ती त्या बिंबातच विलीन पावते. म्हणजेच कितीही अशा गोष्टींमध्ये दुजेपण किंवा वेगळेपण दिसून आले तरी शेवटी ते एकच असतात हे कळून येते.
अभंग क्र. ११२०
साखरेची गोणी बैलाचिया पाठी । तयासी शेवटी करबाडे ॥१॥
मालाचे पै पेटे वाहाताती उंटे । तयालागी काटे भक्षावया ॥धृपद॥
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनिया देती यमा हाती ॥२॥
ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी । येर ती बापुडी सिणली वाया ॥३॥
तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चौऱ्यासीचा फेरा फिरो नको ॥४॥
अर्थ

बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी जरी दिली तरी त्याला कडबाच खावा लागतो. उंटाच्या पाठीवर मालाच्या पेट्या जरी दिल्या तरी त्याला त्याचा काहीच उपयोग होत नसून त्याला काटेरी झुडपेच खावे लागतात. त्याप्रमाणे मनुष्य हा संसार वाढविण्या करता वेगवेगळे उद्योग धंदे आशेपोटी करतो पण तो ज्यांच्यासाठी उद्योग धंदे करतो तेच त्याला शेवटी यमाच्या हाती बांधून देतात. ज्याप्रमाणे साखरेची गोडी ओझे वाहणाऱ्या बैलाला न मिळता, ज्याला त्याचा लाभ होतो त्यालाच कळते त्याप्रमाणे या संसारात धन मिळवण्याकरिता जे बिचारे लोक कष्ट करतात त्यांना त्याचा लाभ होत नाही दुसरे त्याचा भोग घेतात आणि त्या बिचार्‍याला केवळ धन कमवायचे आणि कष्ट रक्षण करण्याचा व्यर्थ त्रास होतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे मुर्खा गव्हारा भक्ती कर मूर्खपणाने चौऱ्यांंशी लक्ष योनी चा फेरा फिरू नकोस.
अभंग क्र. ११२१
चिरगुटे घालूनि वाढविले पोट । गर्‍हवार बोभाट जनामध्ये ॥१॥
लटकेचि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनी पोर पोटी नाही ॥२॥
तुका म्हणे अंती वांझ तेचि खरी । फजिती दुसरी जनामध्ये ॥३॥
अर्थ

एका बाईने चिरगुट्याच्या घड्या घालून पोटाला बांधले आणि ते गरोधरपणा मुळेच वाढलेले पोट आहे असे लोकांना दाखविले आणि मी गरोदर आहे असे ती लोकांना दाखवत होते, तिला डोहाळे लागले आहे असे खोटे प्रकार ती करू लागली वस्तुस्थितीने तिच्या पोटात मूल नव्हते आणि स्तनात दूध दही नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात शेवटी तिला काही मुलबाळ नसल्याने ती वांजच आहे असे ठरले आणि लोकांमध्ये तिची फजिती झाली याप्रमाणे काही मनुष्याला अनुभव नसताना आम्हाला सर्व काही माहित आहे असे दाखवण्याची सवय असते परंतु यांच्या क्रियेतून अनुभवाची कोणतीही गोष्ट दिसून येत नाही त्यामुळे त्यांची फजिती होते.
अभंग क्र. ११२२
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायाशी न विसंबे ॥१॥
विसरणे रूप क्षण एक चित्ती । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥धृपद॥
विसरता हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥
तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥
अर्थ
माझ्या विठोबाला माझी सर्व चिंता आहे त्यामुळे मी त्याच्या चरणाला कधीही विसरणार नाही. विठोबाची सावळी मूर्ती माझ्या जीवाचे जीवन आहे त्यामुळे त्याचे ते रूप क्षणभरदेखील मी विसरणार नाही. जर मी हरीला एक क्षणभर देखील विसरलो तर मोठ्या लाभला चुकलो असे समजेल. तुकाराम महाराज म्हणतात या विठोबाचे पाय म्हणजे अमृत संजीवनी आहे आणि ते पाय माझ्या हृदयात सर्वकाळ आहेत.
अभंग क्र. ११२३
काय ती करावी मोलाची माकडे । नाचताती पुढे संसाराच्या ॥१॥
झाडा देतेवेळे विचकिती दात । घेती यमदूत दंडवरी ॥धृपद॥
हात दात कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥
तुका म्हणे किती जाली ही फजित । मागे नाही नीत भारवाही ॥३॥
अर्थ
संसाराच्या पुढे भोगाच्या छंदाने नाचणारे माकड काय उपयोगाची ? केलेल्या पापाचा झाडा यमदूत त्यांना विचारतात त्यावेळी ते त्यांना दात विचकतात मग त्यावेळी त्यांना शिक्षा करण्याकरिता यमदूत त्यांच्यावर प्रहार करतात. लोकांमध्ये मानसन्मान वाढविण्याकरिता हे लोक हात हलवीतात, दात दाखवितात कान व मान हलवून वेगवेगळ्या प्रकारचे सोंग करतात. तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक शब्द ज्ञानाचा भार आणि संसाराचा भार वाहतात अशा लोकांची किती फजिती होते याची गणतीच नाही.
अभंग क्र. ११२४
थोर ते गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेता सुख वाटे ॥१॥
व्यर्थ भरोवरी केले पाठांतर । जोवरी अंतर शुद्ध नाही ॥धृपद॥
घोडे काय थोडे वागविते ओझे । भावेविण तैसे पाठांतर ॥२॥
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो ॥३॥
अर्थ

गुरुचा उपदेश घेताना तुला सुख वाटते परंतु तुला देहाभिमान बाजूला सारता आला पाहिजे. भरपूर ओव्यांचे व वेदांचे पाठांतर तु केले पण जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत हे सर्व व्यर्थ ठरते. घोड्याच्या पाठीवर खूप ओझे असते पण त्याला त्याचा काही लाभ नसतो अगदी तसेच तू कितीही वेद अभ्यास केला व त्याचे पठण केले पण जर तुझे अंतकरण शुद्ध झाले नाही तर ते सर्व व्यर्थ ठरेल अंतकरणात जर भक्तिभाव नसेल तर काहीच उपयोग होणार नाही केवळ पाठांतराचे ओझे तुझ्या माथ्यावर आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात की तुला जर पंढरीनाथाची प्राप्ती व्हावी असे जर वाटत असेल तर तू अंतःकरणा मध्ये निष्ठावंत भक्ती प्रेम धारण कर.
अभंग क्र. ११२५
जाय जाय तू पंढरी । होय होय वारकरी ॥१॥
सांडोनिया वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥धृपद॥
खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥
साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणी ॥३॥
अर्थ

अरे नरा तू मनुष्य जन्माला आला आहेस त्यामुळे तू पंढरीला जाच आणि वारकरी हो. चंद्रभागेचे इतके पवित्र वाळवंटात असताना तू वैकुंठाची इच्छा का करतोस ? त्या वाळवंटामध्ये खांदयावर पताकांचे भार असलेले गळयात तुळशीची माळ आणि कपाळाला अबीर बुक्का लावलेले खूप वारकरी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी त्या वाळवंटातील साधू संतांना वारकऱ्यांना लोटांगण घालीत आहे. ”
अभंग क्र. ११२६
संतांच्या हेळणे बाटले जे तोंड । प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे ॥१॥
भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे । आपुले परावे नाही खळा ॥धृपद॥
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विटाळ बहु त्याचा ॥२॥
तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठी । काही माझे पोटी शंका नाही ॥३॥
अर्थ

संतांची निंदा करून ज्याचे तोंड बाटले आहे ते तोंड नाही तर चांभाराचे कातडे भिजवण्याचे प्रत्यक्ष कुंड आहे असे समजावे. जे दुष्ट लोक दुसऱ्यांचे धन वापरतात कोणत्याही स्त्रीचा भोग घेतात त्यांच्या आचरणावरून ते भेसळीचे वीर्य म्हणजे अशुद्ध बीजाचे आहे असे जाणावे. जो कोणी संतांची जात, कुळ इत्यादी गोष्टीची फाजील चौकशी करतो त्याचा विटाळ धरावा त्याच्या सावलीला देखील स्पर्श करू नये. तुकाराम महाराज म्हणतात लोक संतांविषयी फाजील चौकशी करतात ते लोक चांडाळ अशुद्ध बीजाचे आहे या बद्दल माझी काहीही शंका नाही आणि मी त्यांचे तोंड देखील पाहणार नाही अशीच मी प्रतिज्ञा केलेली आहे.
अभंग क्र. ११२७
बहु टाळाटाळी । होते भोवताहे कळी ॥१॥
बरे नव्हेल सेवटी । भय असो द्यावे पोटी ॥धृपद॥
मुरगाळीता कान । घुसमाडील सावधान ॥२॥
अबोलणा तुका । ऐसे कोणी लेखू नका ॥३॥
अर्थ

मनुष्य जीवनामध्ये परमार्थाची टाळाटाळ होते त्याला कारण म्हणजे कळी काळच आहे. पण याचे परिणाम चांगले होणार नाहीये. याचे भय मनुष्याने आपल्या मनात ठेवायला पाहिजे. पण काळ ज्या वेळेस अशा माणसांचा कान मुरगळून त्यांना नरकात घुसडेल तेव्हाच ते सावध होतील. तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी अबोलका आहे असे कोणीही समजून घेऊ नका, असे जर कोणी वाईट वागतांना दिसेल, परमार्थाची उपेक्षा कोणी करताना दिसेल तर मी त्याला बोलल्या शिवाय राहणार नाही.
अभंग क्र. ११२८
जिव्हे जाला चळ । नाही अवसान ते पळ ॥१॥
हेचि वोसनावोनी उठी । देव साठविला पोटी ॥धृपद॥
नाही ओंढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥२॥
तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥
अर्थ

माझ्या जिभेला हरी नामाचा इतका छंद लागलेला आहे‌ की मी आता एक फळ देखील विश्रांती घेत नाही. माझ्या देहामध्ये हा हरी इतक्या प्रमाणात साठला गेला आहे की मी घरातून जरी उठलो तरी देखील या हरीचे नाम माझ्या मुखातून येते. मला या हरी नामाची इतके वेड लागले आहे की हरिनामा मुळे कोणताही प्रसंग आला की तो मला बराच वाटतो. हे हरिनाम घेण्याविषयी मला कोणताही अडथळा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझी वाचा मला अनावर झाली असून हरिनाम घेतल्यावाचुन मला रहावतच नाही.


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading