94. आरोग्याच्या लाटा, व समज – गैरसमज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

थोडसं रोचक-थोडसं खोचक

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक लाटा उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात.त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात…

गव्हांकूराची प्रचंड लाट
🍁पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती.प्रत्येक बाल्कनी – टेरेस – अंगणात गव्हांकूर पिकू- डोलू लागले. कॅन्सर,डायबेटीस, बी.पी. गायब होणार होते आणि आपण
एकदम तंदुरुस्त होणार होतो.
कैक टन गव्हांकूर संपले. मानसिकसमाधानापलीकडे विशेष काही घडले नाही
व लाट ओसरली !

अल्कली WATER ची लाट
🍁 अल्कली WATER ची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार होता. २० -३० हजार मशीनची किंमत. मशीन्स धूळ खात पडली.आणि लाट ओसरली !

लिंबू-पाणी लाट
🍁सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी. वजन घटणार. बांधा सुडौल होणार. हजारो लिटर मध संपले. हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले.लाट ओसरली.

नोनी फळाची लाट
🍁मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नाना – नानी आठवले
पण तहीरी नानी व नाना पार्क मधून काही मंडळी वैकुंठाला गेली.

ॲलोव्हेरा ज्यूस लाट
🍁ॲलोव्हेरा ज्यूस.! सकाळ संध्याकाळ प्या. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.
हजारो बाटल्या खपल्या. विशेष काही बदलले नाही.तीही लाट ओसरली.

बिस्किट लाट
🍁 मग रामदेव बाबांची बिस्किटे आली. ५००० करोड चा व्यवसाय झाला.बाबा उद्योगपती झाले. आणि इथे आमची आरोग्यस्थिती होती तशीच.

पंचकर्म लाट
🍁मग माधवबागवाले आले .
तेल मसाज पंचकर्म करा. हृदयाचे ब्लॉक घालवा म्हणाले. राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)
मग आली दिवेकर लाट. …
मग आली दीक्षित लहर…
… ही लाट आता उसळ्या घेतेय…
ओसरेल लवकरच.


लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय.
विचार करा आणि जस्ट एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा. आणखी थोडा विचार करा..
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे साधे घरगुती जेवण पालेभाजी ,
वेलवर्गीय भाजी , फळभाजी ,
मोडआलेली कडधान्ये , सॅलड,
साजुक तूप, बदलते गोडेतेल ,
गहूँ, ज्वारी, बाजरी ,
मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो.


आम्हाला शिस्त नकोय. जीभ चटावलीय. पैसा बोलतोय…
” घरचा स्वयंपाक नकोय…”
आता तर पंधरा मिनीटात ओला.. स्विगी.. दारात…
आली लाट मारा उड्या एवढे टाळू या…
हसत खेळत जगूया,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम.बस्स !
सकाळी लवकर उठणं , रात्री लवकर झोपणं , दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.


आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम
सातत्याने करणे आवश्यक आहे.
आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे ?
दिर्घायुष्य लाभावं , आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत. या करीता आपला आहार ,
आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे. आपल्या प्रकृती नुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा.प्रकृती विरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.
व्यायामात नियमितता व सातत्य असावं.
आणि हो….


या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल….
बघा पटलं तर घ्या.नाहीतर चला हवा येऊ द्या……

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading