१२ एप्रिल, दिवस १०२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १२१३ ते १२२४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१२ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १२ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १२ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १२१३ ते १२२४ चे पारायण आपण करणार आहोत.


१२ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २२६ ते २५०,

226-9
अखंड अगर्वता होऊनि असती । तयाते विनयो हेचि संपत्ती । जे जयजयमंत्रे अर्पिती । माझाचि ठायी ॥226॥
ते नेहमी गर्वरहित असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ति असते; व ते जयजयमंत्राने माझ्या ठिकाणी आपली सर्व कर्मे अर्पण करतात.
227-9
नमिता मानापमान गळाले । म्हणोनि अवचिते ते मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥227॥
नम्र होता होता त्यांना मानापमानाचा विचार राहात नाही, म्हणून ते मीच होऊन राहतात; व अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात.
228-9
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आता ज्ञानयज्ञे यजिती । ते भक्त आइके ॥228॥
अर्जुना, अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ति तुला सांगितली. आता जे माझी ज्ञानयज्ञाने भक्ति करतात, ते कोणते भक्त ते ऐक.
229-9
परि भजन करिती हातवटी । तू जाणत आहासि किरीटी । जे मागा इया गोष्टी । केलिया आम्ही ॥229॥
परंतू हे किरीटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच, व त्याबद्दल आम्ही पूर्वी (अ. 4 श्लो 33-42) वर्णन केलेच आहे.
230-9
तव आथि जी अर्जुन म्हणे । ते दैविकिया प्रसादाचे करणे । तरि काय अमृताचे आरोगणे । पुरे म्हणावे ? 230॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, ” होय, हा ईश्वरी प्रसादच आहे. तथापि अमृताचे सेवन करणाराच्याने कधी पुरे म्हणवते का ? “
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


231-9
या बोला श्रीअनंते । लागटा देखिले तयाते । की सुखावलेनि चित्ते । डोलतु असे ॥231॥
तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकुन, हा कार्यसाधु आहे असे पाहून श्रीअनंत चित्तांत संतोष मानून डोलू लागले.
232-9
म्हणे भले केले पार्था । एऱ्हवी हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी माते ॥232॥
आणि म्हणाले, ” पार्था शाबास ! बाकी सांगितलेली गोष्ट पुनः सांगणे हे अप्रासंगिकच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते.
233-9
तव अर्जुन म्हणे हे कायी । चकोरेवीण चांदिणेचि नाही । जग निवविजे हा तयाच्या ठायी । स्वभावो की जी ॥233॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, ” तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही. पहा की, चकोर पक्ष्याची तहान भागविण्याशिवाय चंद्राला इतर काही कर्तव्य नाही की काय ? जगाला शांत करणे हा त्याचा स्वभावच आहे;
234-9
येरे चकोरे तिये आपुलिये चाडे । चांचु करिती चंद्राकडे । तेवि आम्ही विनवु ते थोकडे । देवो कृपासिंधु ॥234॥
एरव्ही, चकोर पक्ष्याने आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी विनंति करावी तेवढी थोडीच आहे. कारण, देवा आपण दयेचे सागर आहांत.
235-9
जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी । वाचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥235॥
मेघ आपल्या थोरपणाने जगाचे दुःख निवारण करतो, त्या त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असता चातकाची तहान ती केवढी असणार !


236-9
परि चुळा एकाचिया चाडे । जेवि गंगेतेचि ठाकावे पडे । तेवि आर्त का बहु का थोडे । तरि सांगावे देवा ॥236॥
परंतु एकच चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेतच जावे लागते, त्याप्रमाणे, आम्हाला ऐकण्याची इच्छा थोडी किंवा बहुत असली, तरी देवा, आता सांगण्यास सुरवात करावी.
237-9
तेथे देवे म्हणितले राहे । जो संतोषु आम्हा जाहला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसे उरले नाही ॥237॥
त्या वेळेस देव म्हणाले :- अर्जुना, आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो संतोष झाला आहे, त्यापेक्षा तू स्तुति करुन तो वाढेल असे नाही;
238-9
पै परिसतु आम्हासि निकियापरी । तेचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी । ऐसे पुरस्करोनि श्रीहरी । आदरिले बोलो ॥238॥
परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस, तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर (व पुढेही तसेच ऐक). अशा रीतीने श्रीहरिंनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरवात केली.

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विश्वतोमुखम् ॥9. 15॥

239-9
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूते मंडपु । भेदु तो पशु ॥239॥
ज्ञानयज्ञाचे लक्षण कोणते म्हणशील, तर ज्या ठिकाणी ‘ ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे ‘ म्हणजे आदिसंकल्प हाच पशु;
240-9
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रिये आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत ॥240॥
मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण ते, अथवा पांच इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहीत्य, व ब्रह्माविषयी जे अज्ञान तेच घृत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


241-9
तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणे ॥241॥
हे बलाढ्य अर्जुना, त्या यज्ञांत मन व बुद्धि ही दोन कुंडे असुन या दोन कुंडांत ज्ञानरूप अग्नि प्रदीप्त केला जातो; सुख व दुःख यांचे ठिकाणी जी समता तीच वेदिका म्हणजे यज्ञकुंडाच्या सभोवती असलेला परिघ होय;
242-9
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्त्रुकस्त्रुव । जीव यज्वा ॥242॥
आत्मानात्मविचार करण्याविषयी जी बुद्धीची कुशलता, तेच यज्ञांतील मंत्र होत; शांति हीच स्त्रुक व स्त्रुवा नांवाची हवनपात्रे व जीव हा यज्ञ करणारा होय.
243-9
तो प्रतीतीचेनि पात्रे । विवेकमहामंत्रे । ज्ञानाग्निहोत्रे । भेदु नाशी ॥243॥
तो यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्रांनी, ब्रह्माच्या विचाररूप महामंत्रांनी, ज्ञानरूप अग्निहोस्त्र कर्माने, जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुति देऊन तो भेद नाहीसा करतो,
244-9
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हे ठाये । आत्मसमरसी न्हाये । अवभृथी जेव्हा ॥244॥
त्या वेळेस अज्ञान नाहीसे होऊन यज्ञ करणारा व यज्ञक्रिया ही जागचे जागीच राहतात. नंतर आत्मानंदरसात जीव यजमानाचे अवभृथस्नान होते.
245-9
तेव्हा भूते विषय करणे । हे वेगळाले काही न म्हणे । आघवे एकचि ऐसे जाणे । आत्मबुद्धी ॥245॥
तेव्हा पंचमहाभूते, शब्द, स्पर्श इत्यादि विषय व इंद्रिये ही वेगळाली आहेत असे म्हणत नाही व ब्रह्माशी तादात्म्य झाल्यामुळे सर्व एक आहे असे तो जाणतो.


246-9
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना । मीचि जाहालो होतो ना । निद्रावशे ॥246॥
अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की, ‘ स्वप्नात पाहिलेली चित्रविचित्र सेना झोप लागल्यामुळे मीच झालो होतो ना
274-9
आता सेना ते सेना नव्हे । हे मीच एक आघवे । ऐसे एकत्वे मानवे । विश्व तया ॥247॥
आता जी सेना पाहिली होती, ती सेना नव्हती; ती मीच झालो होतो; ‘ अर्जुना, अशा प्रकारे त्या पुरुषाला जग एकरूप भासते.
248-9
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधे भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरे । एकत्वे येणे ॥248॥
मग तो जीव ‘मी आहे ‘ अशी आठवण विसरतो, व ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत आत्माच भरलेला आहे असे मानतो. अशा प्रकारे ज्ञानयज्ञाने ऐक्य पावून कितीएक मला भजतात.
249-9
अथवा अनादि हे अनेक । जे आनासारिखे एका एक । आणि नामरुपादिक । तेही विषम ॥249॥
दुसरा, माझे भजन करणारा असे समजतो की, जगांतील जे सर्व पदार्थ दिसतात, ते अनादि आहेत. एकासारखे एक असुनही निराळे आहेत, आणी त्यांची नांवे व रूपे ही निराळी आहेत, म्हणून, जग हे जरी भिन्न वस्तूंनी भरलेले आहे,
250-9
म्हणोनि विश्व भिन्न । परि न भेदे तयांचे ज्ञान । जैसे अवयव तरी आन आन । परि एकेचि देहीचे ॥250॥
तरी त्या वस्तुचे जे अधिष्ठान त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांचे मनात भेद नसतो. ज्याप्रमाणे, अवयव जरी निरनिराळे आहेत, तरी ते एकाच देहाचे आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १०२ वा, १२, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२१३ ते १२२४
सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. १२१३
बखयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥
ते म्या हृदयी धरिले । तापशमन पाउले ॥धृपद॥
सकळ तीर्था अधिष्ठान । करी लक्ष्मी संवाहन ॥२॥
तुका म्हणे अंती । ठाव मागितला संती ॥३॥
अर्थ

हरीचे चरण विटेवर समान आहेत आणि ते सौंदर्‍याला ही सौंदर्य देणारे आहेत. आणि ते चरण मी माझ्या हृदयात धारण केले आहे आणि हरिचरण त्रिविध तापाचे क्षालन करणारे आहेत. सर्व तीर्थांचे अधिष्ठान हरिचे चरण आहेत त्यांची सेवा लक्ष्मी करत असते. “तुकाराम महाराज म्हणतात संतांनी शेवटी विठोबाच्या समचरणाच्या ठिकाणी ठाव मागितला आहे.
अभंग क्र. १२१४
मासं चर्म हाड । देवा अवघीच गोड ॥१॥
जे जे हरीरंगी रंगले । काही न वचे वाया गेले ॥धृपद॥
वेद खाय शंखासुर । त्याचे वागवी कलेवर ॥२॥
तुका म्हणे ऐसा । बराडी या भक्तीरसा ॥३॥
अर्थ

खरे हरिभक्तांचे मासं, काकडे, हाड हे काहीच वाया जात नाही. देवाला ते सर्व चांगले वाटतात जे जे हरिभक्त हरीच्या रंगात रंगून गेले आहेत, त्या त्या हरी भक्तांचे काहीही शरीराचे इंद्रिय वाया जात नाहीत. शंखासुराने वेद गिळून टाकले तर देवाने त्याचा नाश करून त्याच्या कलेवर जो शंख होता तो आज पर्यंत हातात वागविला आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा हा देव आहे भक्तांच्या भक्ती रसा करिता भिकारी झालेला आहे.
अभंग क्र. १२१५
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥
कैचा राम अमागिया । करी कटकट वाया ॥धृपद॥
स्मरणाचा राग । क्रोधे विटाळले अंग ॥२॥
तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥
अर्थ
काही गरिबांना परमार्थ करण्या विषय संसाराची चिंता आड येते, तर काही श्रीमंतांना संसाराची चिंता नसली तरी लोकलज्जा परमार्थ करण्यासाठी नडते. अशा अभागी माणसाच्या तोंडाला रामाचे नाम कधी येणार ? मात्र हे संसारीक वटवट करत असतात. एखाद्याने जर उपदेश केला की तु हरीचे स्मरण कर तर त्याला राग येतो कारण त्यांच्या शरीर क्रोधाने वीटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा जड दगडा पुढे बोलण्यात काय अर्थ आहे त्यामुळे अशा मूर्ख माणसांपुढे गप्प राहणे योग्य आहे.
अभंग क्र. १२१६
आपुलिया काजा । आह्मी सांडियेले लाजा ॥१॥
तुम्हा असो जागवीत । आपुलिया हित ॥धृपद॥
तुम्ही देहशून्य । आम्हा कळे पाप पुण्य ॥२॥
सांगायासी लोका । उरउरीत उरला तुका ॥३॥
अर्थ

हे देवा आम्ही आमच्या उद्धाराच्या कामाकरिता लाज सोडून देत आहोत. देवा आम्ही तुला जागवीत आहोत कारण आमचे हित तुझ्या हातात आहे. देवा तुम्ही देह शून्य आहात, तुम्हाला देहच नाही, तुम्ही विदेही आहात त्यामुळे तुम्हाला पाप-पुण्य नाही पण मात्र आम्हाला पापपुण्य आहे आणि ते आमच्या अनुभवावरूनच आम्हाला समजते आणि कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात मी ही तुमच्या प्रमाणे देह शून्य आहे विदेही आहे परंतु भुतला वरील अज्ञानी लोकांना उपदेश करण्यासाठी मी वेगळा होऊन राहतोय.
अभंग क्र. १२१७
सत्य आम्हा मनी । नव्हो गाबाळाचे धनी ॥१॥
ऐसे जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥धृपद॥
देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥२॥
तुका म्हणे बरे घडे । देशोदेशी चाले कोडे ॥३॥
अर्थ

सत्यरूप जो माला आहे तो म्हणजे हरीचे नाम. आणि तेच हरीचे नाम आमच्या मनात आहे. गबाळ मालाचे आम्ही धनी मुळीच नाही. हे लोक हो तुम्ही हरिनाम रूपी खरा माल जाणून घ्या आणि तोच हरिनाम रुपी शुद्ध माल मनात भरून घ्या. आमच्याविषयी मनातील राग द्वेष काढून टाका तुमचे चांगले व्हावे यासाठी मी तुमच्याशी कठीण शब्दात बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे जर तुम्ही वागलात (मी सांगितल्याप्रमाणे) तर देशोदेशी तुमचे चांगलेच कौतुक होईल.
अभंग क्र. १२१८
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥
त्याग करू नये खरे । ऐसे विचारावे बरे ॥धृपद॥
तुमचिया तोंडे । धर्माधर्माचीच खंडे ॥२॥
मजसाठी देवा । काही लपविला हेवा ॥३॥
जाला सावधान । त्यासी घालावे भोजन ॥४॥
तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥
अर्थ

देवा तुम्ही माझ्या हिताचा उपदेश करून चांगल्या मार्गाला मला लावावे हीच नीती आहे. त्यामुळे तुम्ही आमची उपेक्षा करणे हे चांगले नाही हे तुम्हीच जाणून घ्यावे आणि त्याविषयी तुम्ही नीट विचार करावा. धर्माधर्माचा निवड तुमच्याच तोंडून भगवद्गीतेत व वेदात झालेला आहे मग देवा माझ्या हितासाठी तुम्ही काही लपून का ठेवत आहात ? झोपेतून उठले की त्या बाळाला जेवू घालने आईचे कर्तव्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात बाप नेहमी मुलाच्या हिताचाच विचार करत असतो त्याप्रमाणे तुम्हीही आम्हाला असा उपदेश करा की ज्यामध्ये आमचे हित होईल.
अभंग क्र. १२१९
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥
रविरश्मिकळा । नये घालिता पै डोळा ॥धृपद॥
दुरि ते जवळी । स्नेहे आकाशा कवळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । माझे पायी अखंडित ॥३॥
अर्थ

परमात्मा आणि सुखरूप जीव हे दोन्ही सुखी आहेत सुखाचेच ते रूप आहेत आणि एकमेकांना ते भेटले की त्यांना कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते‌ तुटत नाहीत. सूर्‍याची किरणे सूर्य पासून वेगळी करून त्यांना आपल्या डोळ्यांमध्ये घालता येत नाही. एखादा मनुष्य आपल्यापासून दूर जरी असला तरी तो स्नेहाने आपल्या जवळच येतो. त्याप्रमाणे प्रेमाने आकाशाला देखील कवळी घालता येते. तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त अखंडितपणे देवाच्या चरणी मी राखणार.
अभंग क्र. १२२०
तुम्हा न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥
फुकासाठी जोडे यश । येथे का करा आळस ॥धृपद॥
कृपेचे भुकेले । होय जीवदान केले ॥२॥
तुका म्हणे शिकविले । माझे ऐकावे विठ्ठले ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही माझ्या मनाचे समाधान केले तर तुमचे काही खर्च होणार आहे नाही. परंतु माझ्या मनातील संकोच नक्की जाईल जर तुम्ही माझे समाधान केले तर. देवा माझे समाधान केल्याने तुम्हाला फुकट ची कीर्ती प्राप्त होईल आणि जर तुम्हाला कीर्ती मिळत असेल तर तुम्ही आळस का करता‌ ? देवा मी तुमच्या कृपेचा भुकेला आहे. आणि तुम्ही जर असे केले तर तुम्ही मला जीवदान दिल्यासारखेच होईल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला शिकविले पाहिजे, ही एवढी विनंती तुमच्या जवळ मी करत आहे ती तुम्ही ऐकावी.
अभंग क्र. १२२१
लोक म्हणती मज देव । हा तो अधर्म उपाव ॥१॥
आता कळेल ते करी । सीर तुझे हाती सुरी ॥धृपद॥
अधिकार नाही । पूजा करिती तैसा काही ॥२॥
मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥
अर्थ

अरे देवा हे लोक मला देव म्हणतात आणि माझी पूजा करतात आणि पूजा करून घेणे म्हणजे हा तर अपराध आहे. देवा तुला आता काय करायचे ते कर मी माझे शिर कापण्यासाठी सूरी तुझ्या हातात दिली आहे. तु काप अथवा कापू नकोस माझा अधिकार नसतानाही लोक माझी पूजा करतात. तुकाराम महाराज म्हणतात मुलाच्या आईलाच मुलाचे वडील कोण आहेत हे माहीत असते त्याप्रमाणे माझे मन मी किती पुण्यवान आहे आणि किती पापी आहे मला हे चांगलेच माहीत आहे.
अभंग क्र. १२२२
एका म्हणता भले । आणिका सहजचि निंदिले ॥१॥
काही न करिता सायास । सहज घडले ते दोष ॥धृपद॥
बरे वाईटाचे । नाही मज काही साचे ॥२॥
तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावे चिंतनी ॥३॥
अर्थ

एखाद्या व्यक्तीला बऱ्याच माणसांमध्ये चांगले म्हटले तर बाकीच्यांची निंदा सहजच घडते. या कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता दोष घडला जातो. कोणालाही बरे वाईट म्हणणे माझ्या ठिकाणी राहिलेच नाही त्यामुळे माझ्याकडून पापच घडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात वाणीने कोणाचीही निंदा न करण्यासाठी मनावर नियंत्रण घालून सतत नामाचे चिंतन करत रहावे.
अभंग क्र. १२२३
आणिले सेवटा । आता कामा नये फाटा ॥१॥
मज आपुलेसे म्हणा । उपरि या नारायणा ॥धृपद॥
वेचियेली वाणी । युक्ती अवघी चरणी ॥२॥
तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥३॥
अर्थ

देवा मी सेवेचा शेवट केला आहे त्यामुळे मला फलप्राप्ती करिता कोणताही फाटा तुम्ही येऊ देऊ नका. हे नारायणा तुम्ही मला हा तुकाराम माझा आहे असे म्हणून माझा अंगिकार करावा हेच फळ द्यावे. देवा मी माझी बुद्धी आणि वाणी दोन्ही तुमच्या चरणी समर्पित केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझ्या अन्यायाची अपराधाची तुमच्याकडून क्षमा करून घेऊन तुमचे पाय घट्ट धरले आहे.
अभंग क्र. १२२४
न करा टांचणी । येथे काही आडचणी ॥१॥
जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥
आठही प्रहर । बारा मास निरंतर ॥३॥
तुका म्हणे वाणी । वर्जेना हे घेता धणी ॥४॥
अर्थ

हरीनाम घेण्याबाबत, हरिभक्ती करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मनात अडचण किंवा संकोच होऊ देऊ नका. सर्वत्र माझा बाप विठ्ठलच पिकला आहे तरी तुम्ही तुमच्या जिभेच्या मापाने माझ्या विठ्ठलाला भरपूर मोजून घ्या. आठ ही प्रहर आणि बाराही महिने तुम्ही निरंतर माझ्या विठ्ठलाचे मोजमाप करत रहा म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण तुम्ही सतत करा. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की ते कितीही घेतले तरी आता पुरे झाले असे वाणी म्हणतच नाही.


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading