७ मे, दिवस १२७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १५१३ ते १५२४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“७ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ७ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ७ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५१३ ते १५२४ चे पारायण आपण करणार आहोत.
७ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १ ते २५,

सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥अथ एकादशोऽध्यायः- अध्याय अकरावा ॥ विश्वरूपदर्शनयोगः॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय अकरावा
1-11
आता यावरी एकादशी । कथा आहे दोही रसी । येथ पार्था विश्वरूपेसी । होईल भेटी ॥1॥
यानंतर आता जेथे अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे, त्या अकराव्या अध्यायातील कथाभागात दोन रस मुख्यतः व्यक्त झालेले आहेत
2-11.
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसा पांतिकरा । जाहला मानु ॥2॥
याप्रमाणे या अध्यायात शांतरसाच्या घरी, अद्भूतरस हा पाहूणचाराला आला आहे, असे दिसेल आणि इतरहि रसांना त्यांच्यापक्तीस पाहूणचाराचा मान मिळणार आहे.
3-11
अहो वधुवरांचिये मिळणी । जैशी वराडिया लुगडी लेणी । तैसे देशियेच्या सुखासनी । मिरविले रस ॥3॥
अहो ! ज्याप्रमाणे मुलामुलीच्या लग्नात आलेले पाहुणे वस्रालंकारांनी सुशोभित होऊन मिरवतात, त्याप्रमाणे या मराठी भाषेच्या पालखीत बसून हे सर्व रस मिरवतील.
4-11
परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे । जैसे हरिहर प्रेमभावे । आले खेंवा ॥4॥
पण ज्याप्रमाणे हरिहरांना प्रेमाने अलिंगन द्यावे, त्याप्रमाणे शांत व अद्भूत हे दोन रस मात्र डोळ्यांच्या ओंजळीने म्हणजे स्पष्टपणे घेता येतील.
5-11
ना तरी अंवसेच्या दिवशी । भेटली बिंबे दोनी जैशी । तेवी एकवळा रसी । केला एथ ॥5॥
किंवा अमावास्येच्या दिवशी, ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब ही दोन्ही बिंबे मिळून जातात, त्याप्रमाणे या अध्यायात दोन रस एकत्र मिळालेले आहेत


6-11.
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसे रसा जाहले प्रयाग । म्हणौनि सुस्नात होत जग । आघवे एथ ॥6॥
किंवा ज्याप्रमाणे गंगायमुना यांचे प्रवाह प्रयागाचे ठिकाणी एकत्र झाले, त्याप्रमाणे हा अध्याय शांत व अद्भूत या रसांचे प्रयागस्थळ झाले आहे; म्हणून सर्व जग प्रयागक्षेत्राप्रमाणे येथे स्नान करून पवित्र होईल.
7-11
माजी गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागी त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥7॥
ज्याप्रमाणे प्रयागाचे ठिकाणी गंगा यमुना यांच्या संगमांत गुप्तपणे सरस्वतीचा संगम होऊन, प्रयाग हे त्रिवेणी संगमाचे स्थान झाले आहे, त्याप्रमाणे या अध्यायातहि शांत व अद्भूत या दोन रसांचे प्रगट प्रवाह असून त्यामध्ये भगवंताची गीतारूप रसाळवाणीरूपी सरस्वति नदीचा गुप्त प्रवाह असल्यामुळे, बापहो ! हा अध्याय म्हणजे योग्य त्रिवेणी संगमच झाला आहे.
8-11
एथ श्रवणाचेनि द्वारे । तीर्थी रिघता सोपारे । ज्ञानदेवो म्हणे दातारे । माझेनि केले ॥8॥
श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, स्वामी निवृत्तिनाथांनी मला निमित्त करून या त्रिवेणीक्षेत्रात जाण्याकरिता श्रवणाचा सोपा मार्ग करून दिला.
9-11
तीरे संस्कृताची गहने । तोडोनि मऱ्हाठिया शब्दसोपाने । रचिली धर्मनिधाने । श्रीइनिवृत्तिदेवे ॥9॥
संपूर्ण धर्माची ठेव अशा निवृत्तिनाथांनी या संगमाच्या तीरावरील मूळची संस्क त भाषेची दुर्गम अरण्ये तोडून मराठी शब्दरूपी पायर्‍या बांधल्या.
10-11
म्हणौनि भलतेणे एथ सद्भावे नाहावे । प्रयागमाधव विश्वरूप पहावे । येतुलेनि संसारासि द्यावे । तिळोदक ॥10॥
म्हणून कोणीहि येथे सद्भाव धरून स्नान करावे व या प्रयागांतील माधव जे विश्वरूप त्याचे दर्शन घ्यावे. एवढ्यानेच त्यांना संसाराचा निरास करता येईल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-11
हे असो ऐसे सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥11॥
असे हे सावयव रूपकाचे निरूपण पुरे. या अध्यायात रसभाव भरास आलेले आहेत आणि येथे सर्व जगाला श्रवणाच्या आनंदाचे राज्यच प्राप्त होईल. (श्रवणापासून परमसुख प्राप्त होईल असा अर्थ. )
12-11
जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरा रसा पडप जोडे । हे अल्पचि परी उघडे । कैवल्य एथ ॥12॥
जेथे केवळ शांतरस व अद्भूतरस हे स्पष्ट आहेत आणि बाकीच्या रसांनाही शोभा म्हणजे मान प्राप्त झाला आहे. हे थोडे असले तरी उघड मोक्ष करून देणारे आहेत.
13-11
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपे विसंवता ठावो । परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथ ही पातला ॥13॥
तो हा अकरावा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतिच्या ठिकानांचे निरूपण करणारा होय. पण अर्जुन मात्र सर्व भाग्यवानांमध्ये थोर भाग्यवान आहे, कारण तो येथेहि प्राप्त झाला. (जो देवाचा अपणपे विसंबता ठावो – भगवंताचा सगुण साकार चतुर्भुजादि मूर्त्याविष्कार या विश्वरूपापासूनच होतो व तेथेच पुनः अंतर्धान पावतो असा अर्थ)
14-11
एथ अर्जुनचि काय म्हणो पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ॥14॥
एकट्या अर्जुनालाच हा लाभ प्राप्त झाला असे का म्हणावे ? गीतार्थ हा आता मराठी भाषेत आला असल्यामुळे, वाटेल त्याला सहज प्राप्त होण्याजोगा झाला आहे.
15-11
याचिलागी माझे । विनविले आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनी तुम्ही ॥15॥
म्हणूनच तुम्ही संतजनांनी एकाग्र चित्त द्यावे व माझी विनंति ऐकावी.


16-11
तेवीचि तुम्हा संताचिये सभे । ऐसी सलगी कीर करू न लभे । परी मानावे जी तुम्ही लोभे । अपत्या मज ॥16॥
त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या संत समाजांमध्ये मी असा धीटपणा करणे खरोखर बरे नाही, पण तुम्ही आईबापांनी माझ्यासारख्या लेकरांच्या विनंतीला पुत्रलोभाने मान द्यावा.
17-11
अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । का करविलेनि चोजे न रिझे । बाळका माय ॥17॥
अहो ! राघूला आपणच शिकवावे व शिकून राघू बोलू लागला म्हणजे आपणच आनंदाने मान डोलवावी किंवा लेकरांकडून एखादी कौतुकाची गोष्ट करवून, ती पाहून आई आपणच आनंदी होत नाही काय ?
18-11
तेवी मी जे जे बोले । ते प्रभु तुमचेचि शिकविले । म्हणौनि अवधारिजो आपुले । आपण देवा ॥18॥
त्याप्रमाणे मी जे जे बोलतो ते ते, महाराज ! तुम्ही शिकविलेलेच बोलतों, म्हणून देवा ! तुम्ही शिकविलेलेंच तुम्ही ऐका.
19-11
हे सारस्वताचे गोड । तुम्हीचि लाविले जी झाड । तरी आता अवधानामृते वाड । सिंपोनि कीजे ॥19॥
हे ललितवाङ्गमयाचे मधूर झाड तुम्हीच लाविले, तेव्हा आता त्यावर अवधानरूपी अमृताचे सिंचन करून त्याचे पालन पोषन करावे.
20-11
मग हे रसभाव फुली फुलेल । नानार्थ फळभारे फळा येईल । तुमचेनि धर्मे होईल सुरवाडु जगा ॥20॥
मग हे झाड, नानरसभावरूपी फुलाने फुलून जाईल आणि अनेक अर्थरूपी फळभाराने ते फलद्रूप होईल. तुमच्या या परोपकाररूपी धर्माने सर्व जगाला सुखाचा लाभ होईल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-11
या बोला संत रिझले । म्हणती तोषलो गा भले केले । आता सांगै जे बोलिले । अर्जुने तेथ ॥21॥
श्रीज्ञानेश्वर माउलिच्या या बोलण्याने संतांना फार समाधान झाले व ते म्हणाले, बाबा ! फार चांगले बोललास ! आम्हाला संतोष झाला आता पुढे अर्जुन काय म्हणाला ते सांगा.
22-11
तव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचे बोलणे । मी प्राकृत काय सांगो जाणे । परी सांगवा तुम्ही ॥22॥
तेव्हा निवृत्तिदासांचे दास श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो महाराज ! श्रीकृष्णार्जुनाचे पुढे काय बोलणे झाले, हे मज अज्ञानी लेकराला सांगता येईल ? परंतु तुम्हीच मजकडून बोलवा.
23-11
अहो रानीचिया पालेखाइरा । नेवाणे करविले लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ॥23॥
अहो ! जंगलांतील झाडाचा पाला खाऊन राहणार्‍या वानरांकडून लंकेश्वर जो रावण त्याचा पराभव श्रीरामांनी करवीला. एकटा अर्जुन, पण त्याने कौरवाचे अक्रोड अक्षौहिणी सैन्य जिंकले नाही काय ?
24-11
म्हणौनि समर्थ जे जे करी । ते न हो न ये चराचरी । तुम्ही संत तयापरी । बोलवा माते ॥24॥
म्हणून समर्थ जे करू म्हणतील ते जगात घडून येणार नाही असे होत नाही. त्याप्रमाणे आपण संतजनांनीहि माझ्याकडून बोलवावे.
25-11
आता बोलिजतसे आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥25
श्रीवैकुंठीचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण, त्याच्या मुखातून जो उत्तम गीतोपदेश निघाला तो मी सागतों, ऐका.

दिवस १२७ वा, ७, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५१३ ते १५२४
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १५१३
आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनी । तरि हे ठाकोनि आलो स्थळ ॥१॥
मागिला पुढिला करावे सारिखे । पालटो पारिखे नये देवा ॥धृपद॥
आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटता हे थार उरी नाही ॥२॥
तुका म्हणे येथे नसावेचि दुजे । विनंती पंढरिराजे परिसावी हे ॥३॥
अर्थ

देवा संतांच्या मुखातून मी तुझी कीर्ती ऐकली आहे त्यामुळे या ठिकाणी आलो आहे. देवा तुम्ही जसा तुमच्या मागील भक्तांचा उद्धार केला तसाच यापुढेही भक्तांचा उद्धार करावा यामध्ये पालट होऊ देऊ नका. आम्हाला केवळ तुझ्या नामाचा आधार व त्याच्यावरच विश्वास आहे आणि तो नामाचा आधार व विश्वास तुटला तर मग आम्हाला दुसरे कोठेही थारा नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी राजा माझ्याविषयी तुमच्याजवळ परके पणा नसावा एवढी विनंती तुम्ही माझी ऐकावी.
अभंग क्र. १५१४
मोलाचे आयुष्य वेचतसे सेवे । नुगवता गोवे खेद होतो ॥१॥
उगवू आलेति तुह्मी नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥धृपद॥
लिगाडाचे मासी न्याये जाली परी । उरली ते उरी नाही काही ॥२॥
तुका म्हणे लाहो साधी वाचाबळे । ओढियेलो काळे धाव घाला ॥३॥
अर्थ

देवा मोलाचे आयुष्य तुमच्या सेवेत खर्च होत आहे तरीही आमची भवसागरातून सुटका होत नाही याबद्दल खेद वाटतो. हे नारायणा तुम्ही जर मनापासून आमची भवसागरातून मुक्तता करण्याकरिता आलात तर आमचा एका क्षणात परिहार होईल. माझी अवस्था म्हणजे गुळाची चिटकलेल्या माशी प्रमाणे झाली आहे आता यात काही संशयच नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला करुणा भाकणे करीता केवळ वाचेचे बळ उरले आहे त्यामुळे वाचेने तुम्हाला मी आळवित आहे देवा काळाने मला ओढले आहे तरी तुम्ही लवकर धाव घेऊन माझ्याकडे यावे.
अभंग क्र. १५१५
म्हणऊनि जालो क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशी आवरूनि ॥१॥
कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केले विसर्जन आव्हानींच ॥धृपद॥
पारिखा तो आता जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाही जीव देवा समर्पीला ॥३॥
अर्थ

आम्ही भव सागरातील सर्व आशा पाशा पासून आमचे चित्त आवरले आहेत व त्यामुळे आम्ही देहरूपी क्षेत्रांमध्ये संन्यास घेतला आहे. आम्ही सुरुवातीलाच आमच्या चित्ताचे आवाहन केले व त्याचे विसर्जन करून टाकले आता देहरूपी तीर्थक्षेत्र सोडून त्याचे त्या सीमेचे उल्लंघन आम्ही केव्हाही करणार नाही. आता आम्हाला सर्व ठिकाणे परके झाली आहेत आम्ही हरी विषयी एकविध भक्तिभाव ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आता कोणत्याही प्रकारचा कार्य करण्याचा हेवा राहिला नाही कारण आम्ही आमचा जीव देवाला अर्पण केला आहे.
अभंग क्र. १५१६
विभ्रंशिली बुद्धि देहाती जवळी । काळाची अवकाळी वायचाळा ॥१॥
पालटले जैसे देंठ सांडी पान । पिकले आपण यातपरी ॥धृपद॥
न मारिता हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥
तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळीचा तैसा लवलाहो ॥३॥
अर्थ

हा काळ असे काही खोटे चाळे करतो की, मनुष्याने आयुष्यभर जरी चांगले काम केले तरी शेवटी हा काळ त्याची बुद्धी भ्रष्ट करतो. एखाद्या झाडाचे हिरवे पान पिकल्यावर देठासहित गळून पडावे त्याप्रमाणे आपली शेवटी स्थिती होते. एखाद्या हिन बुद्धीच्या माणसाला न मारता त्याची हिन बुद्धी त्याला दुःख देते आणि ती हीन बुद्धी माजल्या सारखी करून त्याला पुन्हा या संसारत गोवते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे गळाला लागलेला मासा सारखा तळमळ करत असतो त्याप्रमाणे बुद्धिभ्रष्ट झालेले आणि बुद्धिहीन माणसे सारखे तळमळतात.
अभंग क्र. १५१७
नवजावा तो काळ वाया । मुख्य दया हे देवा ॥१॥
म्हणऊनि जैसे तैसे । रहणी असे पायाचे ॥धृपद॥
मोकळे हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥
तुका म्हणे काही नेणे । नवजे येणेंपरी वाया ॥३॥
अर्थ

देवा तुमच्या चिंतना वाचून कोणताही काळ जाऊ नये हीच मुख्य दया तुमची आमच्यावर असू द्यावी. आम्ही जसे आहोत तसे तुमच्या पायाजवळ आहोत म्हणून तुमच्या चिंतना वाचून मोकळे ठेवले तर आम्हाला फार कष्ट होतील. आणि तुमचे जर चिंतन केले नाही तर आम्ही दुर्जन होऊ. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला शास्त्र वगैरे काही माहीत नसले तरी आम्ही वायाला जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
अभंग क्र. १५१८
कल्पतरूअंगी इच्छिले ते फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥
धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्ती साठविला ॥धृपद॥
बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥
तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझे पाठी खरा चंदनाचे ॥३॥
अर्थ

एखादा अभागी मनुष्य जरी असला आणि तो मनुष्य कल्पतरू वृक्षाखाली बसला आणि त्याने जी इच्छा केली तरी त्याची देखील इच्छा पूर्ण होईल. ज्यांनी कोणी आपल्या चित्तामध्ये नारायण साठविला आहे ते लोक धन्य आहेत व त्यांच्या जाती धन्य आहेत. पाणी सर्व बिजांना समान प्रमाणात दिले तरी जसे बीज असेल तसेच अंकुर तयार होते व तसे फळ देखील मिळते त्याप्रमाणे नारायण सर्वत्र समान प्रमाणे समावलेला आहे व ज्याचा जसा गुण असेल त्याला तसेच फळ मिळते. तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या मनुष्याला हिऱ्याची ओळख पटते आणि गाढवाच्या पाठीवर चंदनाचे जरी ओझे दिले असले तरी त्याला चंदनाच्या सुगंधाची ओळख नसते त्याप्रमाणेच चांगल्या मनुष्यालाच नारायणाची ओळख असते त्यामुळे तो सुखी होतो आणि गाढवाच्या पाठीवर जसे चंदनाचे ओझे असते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यरुप गाढवाच्या हृदयात नारायणरुप चंदन असते आणि ज्याला नारायणाची ओळख होते तोच मनुष्य सुखी होतो नाहीतर ओळख न झाल्यास त्या मनुष्याला दुःख प्राप्त होते.
अभंग क्र. १५१९
उकिरडा आधी अंगी नरकाडी । जातीची ते जोडी तेचि चित्ती ॥१॥
कासयाने देखे अंधळा माणिके । चवीविण फिके वाया जाय ॥धृपद॥
काय जाणे विष पालटो उपचारे । मुर्खासी अंतर तोचि बरे ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश वेड्या । संगे होतो रेड्यासवे कष्ट ॥३॥
अर्थ

गाढवाने उकिरडा पहिला कि ते त्यामध्ये लगेच लोळण घेते त्याप्रमाणे ज्याची जशी जात असेल म्हणजे ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे तो व्यक्ती वागत असतो. मूर्ख माणसाला वाईट तर चांगल्या मनुष्याला चांगल्या गोष्टी आवडतात मौल्यवान माणिकाची किंमत आंधळ्या व्यक्तीला काय समजणार कारण त्याच्या दृष्टीने तो खडाच असतो आणि जर जिभेला चवच नसेल तर कितीही उत्कृष्ट पदार्थाचा भोजन असले तरी ते कसे चांगले वाटेल त्याप्रमाणे मूर्ख मनुष्याला परमार्थ कसा चांगला वाटेल ? विषाला कितीही चांगले म्हटले, त्याला चांगले करून प्यावे असे म्हटले तरी ते कडू आहे त्याप्रमाणे मूर्ख माणसाला कितीही चांगला उद्देश सांगितला तरी तो चांगला होत नाही त्यामुळे त्यापासून दूर राहणेचं चांगले. तुकाराम महाराज म्हणतात मूर्ख आणि वेड्या मनुष्याला कितीही चांगला उपदेश केला तरी काहीच उपयोग होत नाही.
अभंग क्र. १५२०
जया शिरी कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥
वर्ते तैसे वर्ते जन । बहुता गुण एकाचा ॥धृपद॥
आपणीया पाक करी । तो इतरी सेविजे ॥२॥
तुका म्हणे शूर राखे । गांडया वाखे सांगाते ॥३॥
अर्थ

ज्याच्यावर मोठा कारभार करण्याची जबाबदारी असते त्याची बुद्धी नेहमी धर्मनीती संपन्न असावी. तो जसे वर्तन करील त्याप्रमाणे सर्व वर्तन करतात आणि त्याचा सद्गुण सर्वाना मिळतो. आपण आपल्या करिता जर अन्न तयार केले तर चांगलेच करतो त्याप्रमाणे आपण जर चांगले वागलो तर आपले पाहून इतर लोकही तसेच वागतात. तुकाराम महाराज म्हणतात शूर मनुष्या बरोबर राहिले की आपले रक्षण होते आणि भित्र्या मनुष्य बरोबर राहिले की आपली फजिती होत असते.
अभंग क्र. १५२१
एक एका साह्य करू । अवघे धरू सुपंथ ॥१॥
कोण जाणे कैसी परी । पुढे उरी ठेविता ॥धृपद॥
अवघे धन्य होऊ आता । स्मरविता स्मरण ॥२॥
तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥
अर्थ

परमार्थ करण्याविषयी आपण सर्व एकमेकांना साह्य करू व सन्मार्गाला लागू. आम्ही म्हातारपणी परमार्थ करू असे म्हटले तर पुढे आयुष्य किती शिल्लक आहे कोणालाही ही गोष्ट माहित नाही. आता आपण परमार्थ करू, हरीचे स्मरण सर्वाकडून करून घेऊ व धन्य होऊ. तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणाची आवड धरली तर सर्व काही प्राप्त होते.
अभंग क्र. १५२२
फलकट तो संसार । येथे सार भगवंत ॥१॥
ऐसे जागवितो मना । सरसे जनासहित ॥धृपद॥
अवघे निरसूनि काम । घ्यावे नाम विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
अर्थ

फोलपटा प्रमाणे असणारा संसार मिथ्या आहे व सर्व संसाराचेही सार असणारा भगवंत सत्य आहे. हाच विचार मी माझ्या मनामध्ये व सर्व जणांमध्ये जागवित आहे. संसाराचे सर्व कामं बाजूला सारून एक विठोबाचे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा वाचुन कोणताही व्यवहार व्यर्थ आहे आणि मीथ्या आहे.
अभंग क्र. १५२३
शुध्दरसे ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥
कळो नये जाली धणी । नारायणी पूर्तता ॥धृपद॥
आवडे ते तेचि यासी । ब्रम्ह रसी निरसे ॥२॥
तुका म्हणे बहुता परी । करूना करी सेवन ॥३॥
अर्थ

हरीच्या शुद्ध नाम रसाने माझी जीभ ओलावली असून जीव्हा अजूनही तृप्त झाली नाही नारायणा विषयी इच्छा केव्हा पूर्ण होणार आहे ते काही कळत नाही ? माझ्या जीव्हेला हरीचे शुद्ध हरीब्रम्‍हनामरस आवडते व त्या हरीब्रम्‍हनाम रसाने सर्व निरस केले आहे. नंतर हरीच्या शुद्ध नामरसाची माझ्या जिवाला पूर्ण तृप्ती झाली नाही त्यामुळे मी नारायणाची विविध प्रकाराने करुणा भाकत आहेत.
अभंग क्र. १५२४
असंती काटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह ते विकार विरहित ॥१॥
तरि म्हणा त्याग प्रतिपादिलासे । अनादि हा असे वैराकार ॥धृपद॥
सिजले हिरवे एका नावे धान्य । सेवनापे भिन्न निवडे ते ॥२॥
तुका म्हणे भूती साक्षी नारायण । अवगुणी दंडण गुणी पुजा ॥३॥
अर्थ

सर्वत्र ब्रम्‍ह आहे आणि जे वाईट आहे त्याविषयी तिरस्कार करणे कंटाळा करणे हा काही मत्सर नव्हे आणि जे ब्रम्‍हज्ञानी आहेत ते विकाररहित असतात. वाईटाचा सर्वानी त्याग करावा असे प्रतिपादन सर्वत्र आहे आणि वाईटाचा सर्वानी तिरस्कार केलेला आहे आणि असेच चालत आले आहे. धान्य हिरवे असो किंवा शिजलेले असो त्याला आपण धान्य म्हणतो परंतु आपण जेवण करण्याकरता शिजलेले निवडतो त्याप्रमाणे परमार्थामध्ये आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करतो व जे वाईट आहे त्यांचा त्याग करतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व भूत मात्रामध्ये एक नारायण साक्षी रूपाने आहे परंतु जे अवगुणी आहेत त्यांना दंड केला जातो आणि जे गुणी आहेत त्यांची पूजा केली जाते.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading