९ ऑक्टोबर, दिवस २८२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २५१ ते २७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३७३ ते ३३८४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“९ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 9 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ९ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३७३ ते ३३८४ चे पारायण आपण करणार आहोत.
९ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २५१ ते २७५,

251-17
एऱ्हवी तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ? ॥251॥
अभ्रांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडवून दिला तरी असा अकाली येणारा मेष काय फार काळ टिकतो ? 51
252-17
तैसे राजस तप जे होये । ते फळी कीर वांझ जाये । परी आचरणीही नोहे । निर्वाहते गा ॥252॥
त्याप्रमाणे हे राजस तप त्याला फल तर येत नाहीच, पण, ते अखेरपर्यंत पुरे होण्याचीच मारामार असते. 52
253-17
आता तेचि तप पुढती । तामसाचिये रीती । पै परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥253॥
आता याच्यापुढे वर्णिले जाणारे जे तामस तप त्याला स्वर्गफल तर नाहीच, पण राजसा सारखी कीर्ती मिळण्याचाही संभव नाही. 53

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥17. 19॥
254-17
केवळ मूर्खपणाचा वारा । जीवी घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरियाचे ॥254॥
अर्जुना, केवळ मूर्खपणाच्या भरी भरून शरीर हा जणू आपला वैरी आहे अशा जीवाची समजूत करून घेतो. 54
255-17
पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागी । का इंधन कीजे हे आगी । आंतु लावी ॥255॥
ते शरीर म्हणजे जसे काही काष्ठ आहे असे मानून त्याला सर्व बाजूनी पंचाग्नीची धग लावतो. 55


256-17
माथा जाळिजती गुगुळु । पाठी घालिजती गळु । आंग जाळिती इंगळु । जळतभीता ॥256॥
माथ्यावर गुगुळ जाळतात, पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नि पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात. 56
257-17
दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायाचि उपवास । का घेपती धूमाचे घास । अधोमुखे ॥257॥
श्वासोछवास बंद करून व्यर्थ उपवास करितात अथवा उलटे टांगून घेऊन धूम्रपान करतात 57
258-17
हिमोदके आकंठे । खडके सेविजती तटे । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥258॥
थंडीत गळयाइतक्या थंडगार पाण्यात उभे राहतात, तटावरील कातळावर बसतात व जिवंत मांस चिमट्याने तोडतात ! 58
259-17
ऐसी नानापरी हे काया । घाय सूता पै धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलाते ॥259॥
असे नानाप्रकारचे क्लेश शरीराल देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतु बाळगून तप करितात. 59
260-17
आंगभारे सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । का आड जालियाते रगडा । करी जैसा ॥260॥
भारानेच स्वतःच्या कडयाचा सुटणारा धोंडा खली पडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडतांना मध्ये येणाऱ्या वस्तूही रगडून जसा चूर करितो ! 260
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


261-17
तेवी आपलिया आटणिया । सुखे असतया प्राणिया । जिणावया शिराणिया । कीजती गा ॥261॥
त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कट इच्छा बाळगतात. 61
262-17
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे ते किरीटी । तामस होय ॥262॥
अर्जुना, ह्याप्रमाणे व्यर्थ व दुष्ट तपाचरण ज केले जाते हे तामस तप होय. 62
263-17
एवं सत्त्वादिकांच्या आंगी । पाडिले तप तिही भागी । जाले तेही तुज चांगी । दाविले व्यक्ती ॥263॥
एवं, सत्वादिक तीन जातीचे जे तप ते तुला । स्पष्टपणे सांगितले. 63
264-17
आता बोलता प्रसंगा । आले म्हणौनि पै गा । करू रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥264॥
आत – ओघानेच आले म्हणून त्रिविध दानाचे लक्षण सांगू. 64
265-17
येथ गुणाचेनि बोले । दानही त्रिविध असे जाले । तेचि आइक पहिले । सात्त्विक ऐसे ॥265॥
तीन गुणांच्या योगे ह्या दानाचेही तीन प्रकार होतात त्यातील सात्विक प्रकार प्रथम श्रवण कर. 65

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥17. 20॥
266-17
तरी स्वधर्मा आंतौते । जे जे मिळे आपणयाते । ते ते दीजे बहुते । सन्मानयोगे ॥266॥
तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळेल ते जो सम्मान पूर्वक दुसऱ्याला अर्पण करतो. 66
267-17
जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसे ॥267॥
दैवयोगाने उत्तम व बियाणे मिळाले तरी जसे उत्तम क्षेत्र (शेत ) व वाफसा ह्यांची उणीव भासते, तशाच अडचणी दानांतही आहेत असे दिसून येते. 67
268-17
अनर्घ्य रत्न हाता चढे । तै भांगाराची वोढी पडे । दोनी जाली तरी न जोडे । लेते आंग ॥268॥
अमूल्य रत्न प्राप्त झाले तरी सोन्याची गरज असते ( कोंदण वगैरेसाठी ) व सोनेही प्राप्त झाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण. 68
269-17
परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकी मिळती । जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयी ॥269॥
परंतु आपल्या भाग्याचा उत्कर्ष असतो तेव्हांच सणासारखा दिवस, जीवाचे आप्तेष्ट व द्रव्यानुकूलता असा एकत्र योग येतो. 69
270-17
तैसे निफजावया दान । जै सत्त्वासि ये संवाहन । तै देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥270॥
त्याप्रमाणे हातून सात्विक दान घडण्याचा योग असेल तेव्हांच योग्य देश, काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता ह्यांची जोड लाभते. 270
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


271-17
तरी आधी तव प्रयत्नेसी । होआवे कुरुक्षेत्र का काशी । नातरी तुके जो इहीसी । तो देशुही हो ॥271॥
म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्ने करून, कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा ह्यांच्या तोडीचे एखादे क्षेत्र असा देश पहावा. 71
272-17
तेथ रविचंद्रराहुमेळु । होता पाहे पुण्यकाळु । का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥272॥
तेथे सूर्यग्रहण वा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाल अथवा तत्सम दुसरा पुण्यकाल असावा, 72
273-17
तैशा काळी तिये देशी । होआवी पात्र संपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेचि का ॥273॥
तशा मुहूर्तावर या देशात असे सत्पात्र मिळावे की, जो शुचित्वाचा मूर्तीमंत अवतार होय. 73
274-17
आचाराचे मूळपीळ । वेदांची उतारपेठ । तैसे द्विजरत्न चोखट । पावोनिया ॥274॥
तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान, वेदाचे वसतिस्थान, शुद्ध विद्वद्रत्न असा असावा. 74
275-17
मग तयाच्या ठाई वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढे कांता । रिगे जैसी ॥275॥
मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी; पण तीही, पतीपुढे कांता जशी लीन असते तशा लीनतेने व संतोषावै करावी. 75

दिवस २८२ वा. ९, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३७३ ते ३३८४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३३७३
तुझे मजपाशी मन । माझी येथे भूक तहान ॥१॥
जिव्हा रते एके ठायी । दुजे बोलायाचे काई ॥धृपद॥
माझिया कवतुके । उभा पहासी भातुके ॥२॥
तुका म्हणे साचे । तेथे मागील कईचे ॥३॥
अर्थ
तुझे मन माझ्यापाशी आहे त्यामुळेच तर देवा तुला माझी तहान भूक सर्व समजते. माझी जीभ तुझ्या नामाच्या ठिकाणी रत झाली आहे त्यामुळे नामावाचून दुसरे आता काय बोलायचे ? देवा तू माझे कौतुक पाहात उभा आहे आणि मला काहीतरी खाऊ देऊ पाहात आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा असे आपले दोघाचे एकमेकांशी संबंध आहेत मग तेथे मागील संचित कर्म कसे राहतील ? ”
4:22

अभंग क्र. ३३७४
हेचि व्हावे माझी आस । जन्मोजन्मी दास ॥१॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥धृपद॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा सुकाळ ॥२॥
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ॥३॥
अर्थ
देवा माझी नेहमी अशीच इच्छा असावी की मी जन्मोजन्मी तुझाच दास म्हणून राहावा. हे हरी मला पंढरीचा वारकरी कर आणि माझी पंढरीची वारी कधीही चुकवू देवू नको. देवा मला सदा सर्वकाळ संतांची संगती लागू दया आणि अखंड त्यांच्या संगतीत भक्तीप्रेमाचा सुकाळ लागू दयावा. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि चंद्रभागेचे स्नान घडू दे हेच दान मी तुला मागत आहे. ”
4:22

अभंग क्र. ३३७५
आता हे शेवटी असो पायावरी । वदती वैखरी वागपुष्पे ॥१॥
नुपेक्षावे आम्हा दीना पांडुरंगा । कृपादानी जगामाजी तुह्मी ॥धृपद॥
बोळवुनी देह सांडियेली शुद्ध । तोडियेले भेद जीवशिव ॥२॥
तुका म्हणे मन तुमचे चरणी । एवढी आयणी पुरवावी ॥३॥
अर्थ
देवा मी माझ्या वैखरीने जे काही तुझे गीतरुपी गुणगान गात व वागपुष्पे वर्णन करीत आहे ते शेवटी तुझ्या पायावरच असू दयावेत. हे पाडूरंगा आम्हा दीनांचे तुम्ही उपेक्षा करु नका जगामध्ये तुम्हीच एक कृपादान देणारे आहात. मी देहभावच नाहीसा केला आहे आणि जीव व शिव यामधील भेदच नाहीसा करुन तुझ्याशी एकरुप झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझे मन तुमच्या चरणावर नेहमी असू दयावे एवढी माझी आर्त इच्छा तुम्ही पूर्ण करावी. ”
4:22

अभंग क्र. ३३७६ ( श्लोक रचना आहे)
तुजवाचुनी मागणे काय कोणा । महीमंडळी व्यापक विश्व जाणा ।
जीवभावना पुरवू कोण जाणे । तुजवाचुनी होत का रावराणे ॥१॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोका । भवतारकु तूजवाचुनि एका ।
मनी मानसी चिंतिता रूपनाम । पळे पाप ताप भये नासे काम ॥२॥
हरी नाम हे साच तुझे पुराणी । हरीहातिचे काळगर्भादियोनी ।
करू मुखवाणी कसी देशघडी । तुजवाचुनि वाणिता व्यर्थ गोडी ॥३॥
भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वर्णिता शीणला शेषफणी ।
असो जीव भाव तुझ्या सर्व पायी । दुजे मागणे आणीक व्यर्थ काई ॥४॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिने तारिली पातकी थोर दोषी ।
तुका राहिला पायिं तो राख देव । असे मागतो तुझी पादसेवा ॥५॥
अर्थ
देवा तुझ्यावाचून दुसऱ्या कोणाला काय मागावे कारण तू या महीमंडळातच नाही तर सर्व विश्वात व्यापलेला आहे. देवा कितीही राजे आणि राव असले तरी देखील माझ्या अंत:करणातील ओळखून माझी इच्छा पूर्ण तुझ्यावाचून दुसरा कोण करेल माझा जीवभाव तूच एक जाणतोस माझ्या अंत:करणातील इच्छा देखील तूच जाणतोस व तूच त्या पूर्ण करणारा आहेस. देवा तुझ्या एकटया वाचून त्रैलोक्यामध्ये कोणीही मोक्षदाता नाही किंवा कोणीही या भवसागरातून तारणारा नाही. देवा तुझ्या नाम आणि रुपाचे मनामध्ये चिंतन केले तर तुझ्या नाम आणि रुपाच्या भयानेच पाप ताप पळून वासना नाहीसे होते. देवा तुझे हरी हे नाम पुराणामध्ये अतिशय प्रसिध्द आहे कारण हरीनाम गायिल्यामुळे काळाच्या हातातून सुटका होते व अतिनीच योनीत जन्म होणार असेल तरी तो गर्भवास टळतो. देवा तुझ्या वर्णनावाचून मी इतरांचे वर्णन करु कसे मी करणारच
4:22

अभंग क्र. ३३७७ (श्लोक रचना आहे)
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे ।
पळे पाप महा सुटे काप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥
गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनी अमृत सर्वसुख ।
मुनिलागे बहु गोड चित्ती । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥
ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना ते द्यावयासी उदार ।
सिद्धी वोळगती जया सर्वठायी । तुझे नाम हे चांगले गे विठाई ॥३॥
असे उघडा हा विटेवरी उभा । कटसूत्र हे धरुनि भक्तीलोभा ।
पुढे वाट दावी भवसागराची । विठो माउली सिद्ध हे साधकांची ॥४॥
करा वेग हा तो धरा पंथ आधी । जया पार नाही सुखा ते च साधी ।
म्हणे तुका पंढरीस सर्व आले । असे विश्व हे जीवने त्याचि ज्याले ॥५॥
अर्थ
हा देव भिवरेच्या तीरी उभा आहे आणि त्याच्यासमोर दक्षिणेकडे मुख करुन चंद्रभागा वाहात आहे. आणि भक्त हे नामवीर आहेत ते हरीच्या नामाची गर्जना जयघोष कशा प्रकारे करतात ते ऐका ती गर्जना ऐकून महापापाला मोठया प्रमाणात थरकाप सुटतो व ते पळतच सुटते. हा देव गुणगंभीर, धैर्यवान व हास्यमुख आहे तो आपल्या अमृतवाणीने सर्वाना सर्वकाळ सुख होईल असेच अमृतवचन आपल्या मुखाने वदत आहे. देवाचे ध्यान चित्तामध्ये करत असताना मुनी लोकांना अतिशय गोड वाटते आणि त्याचे ध्यान करता करता देहभाव नाहीसा झाला तरी या गोष्टीचे भान त्यांना राहात नाही. देवाने आपला असा अप्रतिम थोर ठसा या भुमंडळावर घातला आहे की त्याच्यासारखा इच्छा देणारा उदार दाता दुसरा कोणीही येथे नाही. सर्व रिध्दी सिध्दी तुझी सेवा करतात हे माझी विठाई तुझे नाम फार चांगले आहे. भक्तांच्या लोभामुळे हा देव हातात कटिसूत्र धर�
4:23

अभंग क्र. ३३७८ (श्लोक रचनाआहे)
धना गुंतले चित्त माझे मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारी ।
मरे हिंडता न पुरे यासि काही । मही ठेंगणी परी ते तृप्ती नाही ॥१॥
पाहाता न दिसे शुद्ध निजमती । पुढे पडिलो इंद्रिया थोर घाती ।
जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडी ॥२॥
असी आणिके काय सांगो अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता ।
क्रोध काम यातना थोर करी । तुजवाचुनी सोडवी कोण हरी ॥३॥
निज देखता निज हे दूरि जाये । नीज आळस दंभ या भीत आहे ।
तया वस्ती देही नको देउं देवा । तुजवाचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥
करी घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ती दूरी ।
नको मोकलू दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥
अर्थ
हे मुरारी माझे चित्त धनामध्ये गुंतले आहे आणि माझे मन हे दारोदारी मला अन्न पाण्यासाठी हिंडवत आहे. हे मन दाही दिशा हिंडून येते तरी त्याला हिंडण्यास जागा कमीच आहे सगळया भूमंडळाचा जरी राजा झालो तरी मनाला तृप्ती काही होत नाही. पुढे माझ्या बुध्दीकडे मी पाहिले तर बुध्दी देखील शुध्द झालेली मला दिसली नाही आणि इंद्रियाने तर माझा मोठा घात मांडला आहे. हे हरी अशा या दुष्टांची संगती मला होत आहे व त्यामुळे मला दु:ख होऊन जन्ममरणाच्या बेडीत गुंतावे लागत आहे त्यामुळे यांच्यापासून माझी संगती लवकरात लवकर हे हरी तू तोङ हे अनंता असे माझ्यामध्ये कितीतरी दुर्गुण आहेत ते तुला काय म्हणून सांगू मोह, ममता, पाप हे तर फार दुष्ट आहेत. हे हरी काम क्रोध हे तर मला खूप मोठी यातना देतात दु:ख देतात मग दु:खातून तुझ्यावाचून मला दुसरा कोण सोडवणार आहे ? देवा तुझ्या नीजस्वर�
4:23

अभंग क्र. ३३७९ (श्लोक रचनाआहे)
पैल सांवळे तेज पुंजाळ कैसे । सिरी तुर्बीली साजिरी मोरवीसे ।
हरे त्यासि रे देखता ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठी ॥२॥
असे यादवा श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती तेहतीस कोटि तीन्ही ।
महाकाळ हे कापती दैत्य ज्यासी । पाहा सांवळे रूप हे पापनासी ॥३॥
कसी पाउले साजिरी कुंकुमाची । कसी वीट हे लाधली दैवांची ।
जया चिंतिता अग्नी हा शांति नीवे । धरावा मानसी आपल्या दृढभावे ॥४॥
मुनी देखता मूख हे चित्त माये । देह मांडला भाव हा बापमाय ।
तुक्या लागले मानसी देवपीसे । चित्त चोरटे सांवळे रूप कैसे ॥५॥
अर्थ
पलीकडे तेज:पुंज सावळे परब्रम्ह कसे दिसते पाहा त्याने आपल्या माथ्यावर मोरपीस लावले आहे. ज्याला पाहिल्यानंतर त्रिविध ताप आणि माया नष्ट होते अशा योगीराज यादवाला भजा. ज्याला पाहून सोळा हजार एकशे आठ सुंदर स्त्रिया व गोकुळातील सुंदर तरुणी लुब्ध झाल्या. कोटयावधी चंद्रकळा असलेली वैजयंती माळ व त्याच्याशीच एकरुप झालेली ती वैजयंती माळ त्याच्या गळयामध्ये अति शोभून दिसत आहे. असा हा चक्रपाणी सर्व यादवांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याला तेहतीस देव आणि त्रिभुवन वंदन करतात. महाकाळ व महादैत्य ज्याचे नांव ऐकताच थरथर कापतात असे हे सावळे रुप पापनाश करते ते पाहा. अशी ही देवाची कुंकूमासारखी साजिरे पाऊले आहेत व ते पाऊले ज्या वीटेला लागली आहेत ती वीट किती दैववान आहे किती भाग्यवान आहे. ज्याचे चिंतन केले असता अग्नी शांत होतो अशा ह�
4:23

अभंग क्र. ३३८०
असे नांदतु हा हरी सर्वजीवी । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवी ।
घटी बिंबले बिंब हे ठायिठायी । तया संगती नासु हा त्यासि नाही ॥१॥
तृन वाटिता क्षीर हे होत नाही । पशू भिक्षता पालटे ते चि देही ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥
फळ कर्दळी सेवटी येत आहे । असे शोधिता पोकळीमाजि काये ।
धीर नाही त्ये वाउगे धीग झाले । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥
असे नाम हे दर्पणे सिद्ध केले । असे बिंब ते या मळा आहे ठेले ।
कसे शुद्ध नाही दिसे माजिरूप । नका वाढवू सीण हा पुण्यपाप ॥४॥
करा वर्म ठावे नका सोंग वाया । तुका वीनवीतो पडो काय पाया ।
त्यज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरले शेवटी काय पाहे ॥५॥
अर्थ
हा हरी सर्व जीवांमध्ये व्यापलेला आहे जसा लाकडामध्ये अग्नी अदृश्य रुपाने आहे अगदी तसाच. चार पाच घट ठेवले आणि त्यामध्ये पाणी टाकले व पाहिले तर सर्व घटामधे सूर्‍याचे प्रतिबिंब दिसेल आणि जरी एखादया घटातील पाणी संपले तरी सूर्‍याचे प्रतिबिंब संपले असे नाही तर सूर्‍याच्या प्रतिबिंबाचा नाश होत नाही अगदी त्याप्रमाणे जरी देहाचा नाश झाला तरी आत्मरुप हरीचा नाश होत नाही. जसे पाहा की, गवत जर आपण वाटले तर त्याचे दूध काही होणार नाही परंतू तेच गवत व्यालेल्या गाईने खाल्ले तर त्या गवताचे रुपातर मात्र दुधात होते. याचे वर्म जाणणारा एकच आहे आणि तोच सर्वाच्या आतरबाह्य व्यापून आहे. केळीच्या झाडाला शेवटी केळीचे फळ येते परंतू त्याच्या पोकळीमध्ये केळीचा शोध घेण्यास गेलो तर आपल्याला काय भेटणार आहे ? परंतू ज्यांना झाडाला फळ आणि फूल येईपर्यं�
4:23

अभंग क्र. ३३८१ (श्लोक रचनाआहे)
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसी एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझे तुज काही एक । धरी विठ्ठली प्रेम हे पायिं सूख ॥१॥
असा सर्वभावे तुज शरण आलो । देहदुःख हे भोगिता फार भ्यालो ।
भवतारिते दूसरे नाहिं कोणी । गुरु होत का देव आणिक तीन्ही ॥२॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती तेचि सोये ।
करी सर्व संगी परि त्यागु ठायी । तुका विनवी ठेवुनि शीर पायी ॥३॥
अर्थ
हे मना तू वासना, दुष्ट खोडी टाकून दे आणि बुध्दीमध्ये त्याविषयीची गोडी ठेवणे हे एक व्यर्थ खोडी आहे. अरे मना तू माझे एक म्हणणे ऐक ते म्हणजे माझे सगळे हित तुझ्याजवळ आहे त्यामुळे तू विठ्ठलाविषयी प्रेम धर आणि त्याच्या पायी सुख आहे हे मान्य कर. अरे मना मी देहाचे दु:ख भोगताना फार भयभीत झालो आहे त्यामुळे मी तुला सर्वभावे शरण आलो आहे. अरे मना तुझ्यावाचून हा भवसागर मी तरुन जाऊ शकत नाही मग मला गुरु ब्रम्हा, विष्णू, महेश हे तीनही देव जरी आले तरी तुझ्यावाचून भवसागर तरुन जाणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मना लोकांना धनाची फार वासना आहे आणि तुला देखील त्यांची संगती करणे योग्य वाटते. अरे मुख्यत: तू सर्वसंग परित्याग कर हीच विनंती मी तुझ्या पायावर माथा ठेवून करीत आहे. ”
4:24

अभंग क्र. ३३८२ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेश. )
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायापाशी ॥१॥
अनाथा जीवाचा तू काजकैवारी । ऐसी चराचरी ब्रिदावळी ॥धृपद॥
न संगता कळे अंतरीचे गुज । आता तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर त्याचे करिसी समाधान । अभयाचे दान देऊनिया ॥३॥
तुका म्हणे तूचि खेळे दोही ठायी । नसेल तो देई धीर मना ॥४॥
अर्थ
हे श्रीपंढरीशा पतितपावना तुझ्या पायापाशी माझी एक विनंती आहे. तू अनाथ जीवाचा कार्य करणारा भक्तकैवारी आहेस अशी तुझी ब्रीदावळी सर्व चराचरामध्ये पसरलेली आहे. देवा तुला न सांगता अंत:करणातील सर्व गुज कळते आता तुझी लाज तुलाच असो. देवा तू तुझ्या हट्टी भक्तांना अभयाचे दान देऊन त्यांचे समाधान करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा संकटेही तूच निर्माण करतोस आणि त्या संकटाचे निवारणही तूच करतोस त्यामुळे संकटप्रसंगी आमच्या मनामध्ये जर धैर्य नसेल तर ते धैर्य तुम्हीच आम्हाला दयावे.
4:24

अभंग क्र. ३३८३
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥धृपद॥
अगा कृपावंता जीवन तू दाता । अगा सर्वसत्ता धरितिया ॥२॥
अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्त द्यावे ॥३॥
तुका म्हणे नाही अधिकार तैसी । सरती पायापाशी केली मागे ॥४॥
अर्थ
हे उदारा, हे विश्वंभरा रुक्मिणीच्या वरा पाडूरंगा. हे सर्वोत्तमा, हे कृष्णा रामा, हे मेघश्यामा विश्वजनित्या. हे कृपावंता जीवनदान देणाऱ्या दाता, सर्व सत्ताधारण करणाऱ्या देवा, हे सर्व जाणत्या हे नारायणा माझ्या करुण वचनाकडे तुम्ही चित्त दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अजामेळसारख्या पाप्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना देखील तुम्ही त्याला तुमच्या पायाशी मान्य केले तर माझ्यासारख्या पाप्याला देखील तुमच्या पायाजवळ मान्य करुन घ्यावे. ”
4:24

अभंग क्र. ३३८४
नोहे दास खरा । परि हा झाला से डांगोरा ॥१॥
यासी काय करू आता । तू हे सकळ जाणता ॥धृपद॥
नाही पुण्यगाठी । जे हे वेचू कोणासाठी ॥२॥
तुका म्हणे का उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥
अर्थ
हे देवा मी तुझा खरा दास नाही परंतू माझा तसा डांगोरा सर्वत्र झाला आहे. याला मी आता काय करु तू तर सर्व जाणता आहेस. माझ्या वाट्यातील पुण्य खर्च करुन एखादयासाठी चांगले कार्य करावे असे मी ठरवले तर तेवढे देखील पुण्य माझ्या पदरामध्ये नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमचा खरा दास नाही खरा भक्त नाही परंतू मी तुमचा खरा भक्त आहे खरा दास आहे अशी सर्वत्र माझी प्रसिध्दी झाली आहे एवढी माझी प्रसिध्दी करुन विनाकारण माझी उपाधी तुम्ही का वाढविली आहे ? ”

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading