२९ ऑक्टोबर, दिवस ३०२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६१३ ते ३६२४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२९ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 29 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २९ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६१३ ते ३६२४ चे पारायण आपण करणार आहोत.
२९ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३२६ ते ३५०,

326-18
प्रकृति करी कर्मे । ती म्या केली म्हणे भ्रमे । येथ कर्ता येणे नामे । बोलिजे जीवु ॥326॥
देहाकडून जी जी कर्मे होतात, ती मीच केली असे भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. 326
327-18
मग पातेयांच्या केशी । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥327॥
मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसांमुळे चवरीच्या केसांप्रमाणे चिरल्यासारखी दिसते; 327
328-18
का घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदे अनेकु । आवडे जेवी ॥328॥
अथवा घरात असलेला एकच दिवा पाहिला असता, जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात; 328
329-18
का एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवा रसा । नवविधु ऐसा । आवडो लागे ॥329॥
किंवा एकच पुरुष असून शृंगार, वीर, करुण, इत्यादी नवरसांचे अविर्भाव दाखवू लागला, म्हणजे तो जसा नऊ प्रकारचा वाटू लागतो, 329
330-18
तेवी बुद्धीचे एक जाणणे । श्रोत्रादिभेदे येणे । बाहेरी इंद्रियपणे । फाके जे का ॥330॥
तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादि इंद्रियांच्या निराळीपणाने बाहेर येऊ लागते. 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


331-18
ते पृथग्विध करण । कर्माचे इया कारण । तिसरे गा जाण । नृपनंदना ॥331॥
हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय, असे समज; 331
332-18
आणि पूर्वपश्चिमवाहणी । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवी ॥332॥
आणि पूर्व-पश्चिम वाहिनी नद्या वहात वहात समुद्रास मिळाल्यावर त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात 332
333-18
तैसी क्रियाशक्ति पवनी । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानी । नाना होय ॥333॥
तशी रजोगुणाची कर्तृत्वशक्ती जी संपादनकेल्या शिवाय प्राणवायूत मूळचीच आहे, ती निरनिराळया अवयवांत निरनिराळी भासते. 333
334-18
जै वाचे करी येणे । तै तेचि होय बोलणे । हाता आली तरी घेणे । देणे होय ॥334॥
जेव्हा ती वाच्याद्वारे बाहेर पडते, तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो हस्ताद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याचा व्यापार असे म्हणतात. 334
335-18
अगा चरणाच्या ठायी । तरी गति तेचि पाही । अधोद्वारी दोही । क्षरणे तेचि ॥335॥
अरे, जी पायात आली असता गती असे म्हणतात व मलमूत्राद्वारे आली असता क्षालन असे म्हणतात, 335


336-18
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करिता तेचि शरीरी । प्राणु म्हणिजे ॥336॥
नाभीपासून हृदयापर्यंत ॐकाराची शरीरात वृद्धी बुद्धी करते, तिलाच प्राण असे म्हणतात. 336
337-18
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पै गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥337॥
मग वर जो श्वासोश्वास जातो; त्यात शक्तीला उदान (कंठस्थ वायु) असे नाव प्राप्त होते; 337
338-18
अधोरंध्राचेनि वाहे । अपानु हे नाम लाहे । व्यापकपणे होये । व्यानु तेचि ॥338॥
व गुदद्वाराने आणि बाहेर येऊ लागली म्हणजे अपान (गुदस्थ वायु) हे नाव प्राप्त होते, आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता (व्यान) (शरीरस्थ वायु) असे म्हणतात. 338
339-17
आरोगिलेनि रसे । शरीर भरी सरिसे । आणि न सांडिता असे । सर्वसंधी ॥339॥
खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते; 339
340-18
ऐसिया इया राहटी । मग तेचि क्रिया पाठी । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥340॥
अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून ह्या शक्तीस नंतर समान म्हणजे (नाभिस्थ वायु) असे म्हणतात. 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


341-18
आणि जांभई शिंक ढेकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥341॥
आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे वायूचे व्यापार होतात ते नाग, कूर्म, कृकर, इत्यादी उपप्राणांचे होतं. 341
342-18
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥342॥
हे सुभटा, याप्रमाणे सर्व वायूंचे खेळ असून त्यांच्या त्यांच्या वर्तनात प्रमाणे नावात बदल होतो. 342
343-18
ते भेदली वृत्तिपंथे । वायुशक्ति गा एथे । कर्मकारण चौथे । ऐसे जाण ॥343॥
अशी जी आपापल्या व्यापाराने वायूंची शक्ती निरनिराळी होते, ते कर्माचे चौथे कारण होय, असे समज. 343
344-18
आणि ऋतु बरवा शारदु । शारदी पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥344॥
आणि शरद ऋतू सारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा; 344
345-18
का वसंती बरवा आरामु । आरामीही प्रियसंगमु । संगमी आगमु । उपचारांचा ॥345॥
अथवा वसंत ऋतु असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत प्रिय मनुष्यांचा सहवास आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचारांची अनुकूलता असावी; 345


346-18
नाना कमळी पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासीही यावा । परागाचा ॥346॥
अथवा अर्जुना, कमळ असून ते उमलावे व मग त्यात पुष्परेणूंचा उद्भव व्हावा; 346
347-18
वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वी परतत्व । स्पर्शु जैसा ॥347॥
एखाद्याचे वाणीत कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी, 347
348-18
तैसी सर्ववृत्तिवैभवी । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥348॥
तसेच, सर्व वृत्तीच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी, ती उत्तम प्रकारची असून तशांत सर्व इंद्रिये ही तिला अनुकूल असावी; 348
349-18
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जै अधिष्ठात्रिया का मेळा । देवतांचा जो ॥349॥
आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा त्या इंद्रियांच्या देवतांचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा, 349
350-18
म्हणौनि चक्षुरादिकी दाहे । इंद्रिया पाठी स्वानुग्रहे । सूर्यादिका का आहे । सुरांचे वृंद ॥350॥
म्हणूनच चक्षुरादी दहा इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादि देवांच्या समुदायाचा अनुग्रह, 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३०२ वा. २९, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६१३ ते ३६२४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३६१३ (निर्याणाचेअभंग)
आपुल्या माहेरा जाईन मी आता । निरोप या संता हाती आला ॥१॥
सुख दुःख माझे ऐकिले कानी । कळवळा मनी करुणेचा ॥धृपद॥
करुनी सिद्ध मूळ साउले भातुके । येती दिसे एके न्यावयासी ॥२॥
त्याचि पंथे माझे लागलेसे चित्त । वाट पाहे नित्य माहेराची ॥३॥
तुका म्हणे आता येतील न्यावया । अंगे आपुलिया मायबाप ॥४॥
अर्थ
मी आता लवकरच माझ्या माहेराला जाणार आहे संतांच्या हाती मला देवाने पाठवलेला निरोप लवकर भेटला आहे. देवाने कधीतरी त्यांच्या कानाने माझे सुखदु:खे ऐकले असतील त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी करुणेचा कळवळा आला असेल. मला मूळ पाठविण्याची पूर्ण देवाने तयारी केली आहे आणि मला खाऊही देवाने पाठविला आहे व देव कधीतरी मला लवकरात लवकर न्यायला येतीलच असे मला वाटत आहे. त्याच पंथाकडे माझे चित्त लागले आहे आणि मी नित्य माहेरची वाट पाहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता स्वत: माझे मायबापच मला नेण्यासाठी येतील. ”
12:20
अभंग क्र. ३६१४ (निर्याणाचेअभंग)
चिन्हे उमटती अंगी । शकुनाजोगी उत्तम ॥१॥
आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणो ॥धृपद॥
उत्कंठित झाले मन । हीच खुण तेथींचि ॥२॥
तुका म्हणे काम वारी । आळस घरी करमेना ॥३॥
अर्थ
माझे मायबाप मला नेण्यासाठी स्वत: येत आहेत असे शुभशकुन व उत्तम चिन्ह माझ्या अंगी उमटत आहेत. मला माझ्या बापाची आईची आठवण येत आहे त्यामुळे ते स्वत:च मूळ घेऊन येतील. ते स्वत: माझ्याकडे मूळ घेऊन येतील की काय हे मला काही कळत नाही माझे मन इतके उत्कंठीत झाले आहे हीच तर खूण आहे की ते माझ्याकडे येतील म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, “मला उदयोगधंदयाविषयी आळस आला आहे घरी सुध्दा करमत नाही म्हणजे हा देखील एक शुभशकुनच आहे. ”
12:20
अभंग क्र. ३६१५ (निर्याणाचेअभंग)
आरोनिया पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥
आलियास पुसे मात । तेथे चित्त लागले ॥धृपद॥
दळी कांडी लोकांऐसे । परि मी नसे ते ठायी ॥२॥
तुका म्हणे येथे पिसे । तेथे तैसे असेल ॥३॥
अर्थ
मी आर्ततेने देवाची वाट पाहात आहे आता मला या भवसागरातील कटकट सोसवत नाही. कोणीही जरी आले तरी मी त्यांना एकच गोष्ट विचारतो की माझे माहेरचे काय चालले आहे कारण माझ्या माहेरचे विचारच माझ्या चित्तात आहे माहेरच्या ठिकाणीच माझे चित्त लागले आहे. मी लोकांच्यासारखे दळण कांडण करतो परंतू माझे चित्त तेथे गुंतून राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जसे मला माझ्या माहेरच्या आईबापाचे वेड लागले आहे अगदी तसेच माझ्या माहेरी देखील माझ्या आई बापाला माझे वेड लागले असेल. ”
12:20
अभंग क्र. ३६१६ (निर्याणाचेअभंग)
येथीलिया अनुभवे । कळो जीवे हे येतसे ॥१॥
दोही ठायी एक जीव । माझी कीव त्या अंगी ॥धृपद॥
भूक भुकेचि खाउनि धाय । नाही हाय अन्नाची ॥२॥
तुका म्हणे सुख झाले । अंतर धाले त्यागुणे ॥३॥
अर्थ
येथे मला जो अनुभव आलेला आहे त्यावरुन माझ्या जीवाला असे कळून येते की, विठोबा आणि माझा जीव एकच आहे विठोबाचे अंगी माझ्याविषयी त्यामुळेच तर कीव येते म्हणजे दया येते. भूकच भूकेला खाऊन तृप्त झाली आहे त्यामुळेच तर अन्नाविषयी आवडच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाच्या दर्शनामुळे मला सुख झाले व माझे मन तृप्त झाले. ”
12:20
अभंग क्र. ३६१७ (निर्याणाचेअभंग)
पैल आले हरी । शंख चक्र शोभे करी ॥१॥
गरुड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥धृपद॥
मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजे लोपला गभिस्त ॥२॥
मेघश्यामवर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥३॥
चुतर्भुज वैजयंती । गळा माळ हे रुळती ॥४॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥
तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥६॥
अर्थ
अहो खरोखर मला पलीकडे हरी येताना दिसत आहे त्यांच्या हातामध्ये मला शंख चक्र अगदी शोभून दिसत आहे. गरुडाच्या पंखाचा आवाज फडफड येत आहे जणू काही तो म्हणत आहे की ‘भिऊ नकोस भिऊ नकोस हरी त्वरेने तुझ्याकडे येत आहे ” . मुकूट आणि कुंडल याचे इतके दैदीप्यमान तेज पडले आहे की त्यापुढे सूर्य देखील लोपला आहे. मेघ मेघाप्रमाणे व शामवर्ण असलेल्या हरीची मूर्ती अतिशय डोळस व साजिरी दिसत आहे. त्या हरीचे चतुर्भूज रुप आणि गळयामध्ये वैजयंती माळ अतिशय शोभून दिसत आहे. त्या हरीचा पितांबर कसा झळकत आहे पाहा त्या पितांबराच्या तेजाने दाही दिशा उजळल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “वैकुंठाधीश घरी आले त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. ”
12:20
अभंग क्र. ३६१८ (निर्याणाचेअभंग)
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
ना भी ना भी भक्तराया । वेगी पावलो सखया ॥धृपद॥
दुरूनि येता दिसे दृष्टी । धाके दोष पळती सृष्टी ॥२॥
तुका देखोनि एकला । वैकुंठीहूनि हरी आला ॥३॥
अर्थ
शंख, चक्र, पद्म व गदा हातात असलेला हरी पलीकडे आलेला आहे. आणि तो म्हणत आहे हे माझ्या भक्तराया माझ्या सखया ‘भिऊ नकोस भिऊ नकोस मी त्वरेने तुझ्याकडे येतोय ” . दुरुन पुरुषोत्तम येताना माझ्या दृष्टीला दिसत आहे व त्याच्या धाकाने दोष जिकडे वाट दिसेल तिकडे पळत सुटले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हरीने मला एकटयाला पाहिले त्यामुळे तो वैकुंठाहून माझ्याकडे आला आहे. ”
12:20
अभंग क्र. ३६१९ (निर्याणाचेअभंग)
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥
आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ॥धृपद॥
सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥२॥
उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवाचे ॥३॥
तुका करी रिता ठाव । त्यासी बैसावया वाव ॥४॥
अर्थ
मला पलीकडे दिंडया पताका व वैष्णवाचा समुदाय आहे असे दिसत आहे. पंढरीचा राणा आता आला आहे कारण दिंडया पताका व वैष्णवाचा समुदाय हे पंढरीचा राणा येण्याच्याच खुणा मुख्यत: आहेत. त्या निमित्ताने माझ्या मनाला फार सुख वाटत आहे. आणि शुभशकुनाने माझे डोळे देखील फडफडत असून माझ्या बाह्या देखील स्फुरत आहेत. हरीच्या नामाचा गजर उठला असून अपार अशा वैष्णवाचा समुदाय इकडे येताना दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या सर्वाना बसण्यासाठी मी जागा रिकामी करीत आहे. ”
12:21
अभंग क्र. ३६२० (निर्याणाचेअभंग)
चला जाऊ रे सामोरे । पुढे भेटो विठ्ठल धुरे ॥१॥
तुका आनंदला मनी । कैसा जातो लोटांगणी ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजी ॥धृपद॥
पुढे आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥
आळंगिला बाही । ठेविला विठोबाचे पायी ॥३॥
अर्थ
चला पुढे जाऊ वैष्णवांना भेटू आणि पुढे आलेल्या विठ्ठलाला देखील भेटू. आज हा तुकाराम खूप आनंदला आहे त्याच्या मनात आज खूप आनंद निर्माण झाला आहे. पाहा मी कसा त्यांच्यासमोर लोटांगण घालीत जात आहे. प्रेमसुखाची तृप्ती होण्याकरता मी लोटांगण घेत त्यांच्यापुढे जात आहे. मायबाप कृपावंत साधूसंत हे देखील पुढे आलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी संतांना माझ्या बाहूने आलिंगन दिले आणि संतांनी मला त्यांच्या पायावर ठेवले. ”
12:21
अभंग क्र. ३६२१ (निर्याणाचेअभंग)
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥
काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥धृपद॥
दरदरीट पाण्या । माजी रांधयेल्या कण्या ॥२॥
घरी मोडकिया बाजा । वरी वाकळांच्या शेजा ॥३॥
मुखशुद्धि तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥४॥
अर्थ
आज माझ्या घरी ऋषीकेश पाहुणे म्हणून आले आहेत. आता त्यांचा स्वागतोपचार व आदरातिथ्य मी कसे करु माझी झोपडी देखील मोडकी जर्जर आहे. असो तरीपण मी पाण्यामध्ये पातळ कण्या देवासाठी शिजवल्या आहेत माझ्या घरी मोडकी बाज आहे पण तरी देखील मी त्याच्यावर वाकळ टाकून बसण्याची सोय करुन ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाला जेवण झाल्यावर मुखशुध्दी करण्यासाठी मी तुळशीचे पान देणार आहे यापेक्षा मी दुसरे वेगळे मुखशुध्दी करण्यासाठी काय उपचार करणार आहे मी तर दुर्बळ आहे. ”
12:21
अभंग क्र. ३६२२ (निर्याणाचेअभंग)
संती केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥
काही ठेविले चरणी । घेती तेचि पुरवूनि ॥धृपद॥
तुका पायवणी । घेऊनिया निराळा ॥२॥
नसता काही संचित । भेटी झाली अवचित ॥३॥
देव मिळोनिया भक्त । तुका केलासे सनाथ ॥४॥
अर्थ
संतांनी माझा अंगीकार केला आहे त्यांना माझ्याविषयी फार मोठा अभिमान वाटत आहे. त्यांच्या चरणाजवळ काहीही प्रेमाने ठेवले की ते मान्य करुन घेतात. त्यांचे चरणतीर्थ मी घेऊन त्यांच्यापासून वेगळा उभा राहात आहे. काहीही माझे पूर्वपुण्य नसताना संतांची अवचितच मला भेट झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देव आणि भक्त या दोघानीही मिळून मला सनाथ केलेले आहे. ”
12:21
अभंग क्र. ३६२३ (निर्याणाचेअभंग)
अवघियांच्या आलो मुळे । एका वेळे न्यावया ॥१॥
सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे । आधी ठावे करितो ॥धृपद॥
जोवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥
मंगळाचे वेळे उभे । असा शोभे सावध ॥३॥
अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥
तुका म्हणे पाहे वाट । बहु आट करूनि ॥५॥
अर्थ
हे लोकहो मी तुमच्या सर्वासाठी येथे आलो आहे सर्वाना एकाच वेळेस वैकुंठास नेण्यासाठी मी तयार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वानी तयार व्हावे तयार व्हावे माझ्याबरोबर येण्यासाठी मी तुम्हाला आधीच ही माहिती देत आहे. माझ्याबरोबर वैकुंठाला येण्यासाठी अजून खूप घटका बाकी आहे तोपर्यंत तुम्हाला तयारी करण्यास खूप काळ आहे. अशा मंगलमय वेळेस म्हणजे वैकुंठाला जाण्याच्या वेळेस तुम्ही जर सावधानतेने उभे राहाल तरच तुम्ही शोभून दिसाल. सर्व गोष्टीचा चांगला योग घडून आला तरच तो आनंददायक वेळ ठरतो. त्यानेच आनंद प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तर वैकुंठाला जाणारच आहे परंतू मी खूप कष्ट करुन तुम्हीही माझ्याबरोबर येता की काय याची वाट पाहात आहे. ”
12:21
अभंग क्र. ३६२४ (निर्याणाचेअभंग)
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुह्मी ॥१॥
कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण । घ्या माझे वचन आशीर्वाद ॥धृपद॥
वाढवूनि दिलो एकाचिये हाती । सकळ निश्चिंती झाली तेथे ॥२॥
आता मज जाणे प्राणेश्वरासवे । माझिया भावे अनुसरलो ॥३॥
वाढविता लोभ होईल उसीर । अवघीच स्थिर करा ठायी ॥४॥
धर्म अर्थ काम झाला एके ठायी । मेळविला जिंही हातो हात ॥५॥
तुका म्हणे तुम्हाआम्हा हेचि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥
अर्थ
मी चाललो आहे त्यामुळे मला वैकुंठीला जाण्यासाठी तुम्ही मला निरोप दया आणि तुम्ही तुमच्या घरी जावे. कोणतेही कर्म करताना व धर्म करताना आपल्या वर्णाश्रमाप्रमाणेच तुम्ही करावे व त्यानेच तुमचे कल्याण होईल हेच माझे आशिर्वाद तुम्ही घ्यावे. आतापर्यंत तुम्ही मला वाढविले आणि देवाच्या हाती देऊन टाकले त्यामुळे माझी सर्व प्रकारे निश्चिंती झाली आहे. आता मला माझ्या प्राणेश्वराबरोबर जावा लागेल मी माझ्या भक्तीभावानेच त्याला अनुसरलेलो आहे. तुम्ही जर माझ्याविषयी लोभ म्हणजे प्रेम वाढविले तर मला जाण्यास उशीर होईल त्यामुळे तुम्ही लोभ प्रेम सर्व विकार येथे स्थिर म्हणजे अगदी शांत करा. ज्यांनी या जन्मामध्ये हातोहात धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करुन घेतले आहेत ते धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “लोकहो आता तुमची आणि माझी ही शेवटची भेट असेल माझ्या मागे त्या गोष्टी केवळ बोलण्यासाठीच उरलेले असतील. ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading