आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ ऑक्टोबर, दिवस ३०१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३०१ ते ३२५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६०१ ते ३६१२
“२८ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 28 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २८ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६०१ ते ३६१२ चे पारायण आपण करणार आहोत.
२८ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३०१ ते ३२५,
301-18
तरी अर्जुना निरूपिजेल । ते कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥301॥
तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो. कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे “
302-18
तव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? । इये गोठीस की राखत आहो । मी तू पण जी ? ॥302॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही मागील गोष्टींचा अभिप्राय विसरलास काय ? आणि मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात का आणता ?
303-18
एथ श्रीकृष्ण म्हणती हो का । आता अवधानाचा पसरु निका । करूनिया आइका । पुढारलो ते ॥303॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर, आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती, ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक.
304-18
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणी पांचे ॥304॥
तर हे धनुर्धरा, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या पांच कारणांनी परभारे होते.
305-18
आणि पांच कारण दळवाडे । जिही कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥305॥
आणि ज्या या पांच कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो, तीच पांच कारणे त्या कर्मास हेतू असतात.
306-18
येर आत्मतत्त्व उदासीन । ते ना हेतु ना उपादान । ना ते अंगे करी संवाहन । कर्मसिद्धीचे ॥306॥
दुसऱ्या जो आत्मा, उदासीन असून कर्माला निमित्तकारण किंवा उपादानकारण नसतो, अथवा तो स्वत: कर्माला करीत नाही
307-18
तेथ शुभाशुभी अंशी । निफजती कर्मे ऐसी । राती दिवो आकाशी । जियापरी ॥307॥
त्याचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ करणे अशा रीतीने होतात की, रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते;
308-18
तोय तेज धूमु । यया वायूसी संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम ते नेणे ॥308॥
पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशास जशी ही गोष्ट माहीत नसते;
309-18
नाना काष्ठी नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळे । उदक ते साक्षी ॥309॥
पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवितो; परंतु त्या ठिकाणी उदक जसे काहीएक न करिता साक्षीभूत असते;
310-18
का कवणे एके पिंडे । वेचिता अवतरे भांडे । मग भवंडीजे दंडे । भ्रमे चक्र ॥310॥
किंवा मातीचा गोळा घेऊन चक्रावर ठेवून दांड्याने चाक हलविल्यावर त्याचे मातीपण जाऊन भांडे तयार होते; 310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-18
आणि कर्तृत्व कुलालाचे । तेथ काय ते पृथ्वीयेचे । आधारावाचूनि वेचे । विचारी पा । ॥311॥
तर याठिकाणी कुंभाराच्या ठिकाणी कुंभाराच्या कसबा शिवाय भांड्यात कसबाशिवाय भांड्यास आधारावाचून पृथ्वीचे दुसरे कोणते सहाय्य मिळते याचा विचार कर. 311
312-18
हेहि असो लोकांचिया । राहाटी होता आघविया । कोण काम सवितया । आंगा आले ? ॥312॥
हेही असो; परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असता ही सूर्य ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो, 312
313-18
तैसे पांचहेतुमिळणी । पांचेचि इही कारणी । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥313॥
त्याचप्रमाणे पाच कारणे मिळाल्याने सर्व करमणूक वेलाची मांडणूक होते व आत्मा हा वेगळाच असतो. 313
314-18
आता तेचि वेगळाली । पांचही विवंचू गा भली । तुकोनि घेतली । मोतिये जैसी ॥314॥
आता ती पाच कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळाली वर्णन करून सांगतो. मोत्ये ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात. 314
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥18. 14॥
315-18
तैसी यथा लक्षणे । आइके कर्म-कारणे । तरी देह हे मी म्हणे । पहिले एथ ॥315॥
त्याचप्रमाणे, कर्माचा कारणांची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती एक. तर देह पहिले कारण होय, असे मी म्हणतो. 315
316-18
ययाते अधिष्ठान ऐसे । म्हणिजे ते याचि उद्देशे । जे स्वभोग्येसी वसे । भोक्ता येथ ॥316॥
या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की, भोग जे विषय, त्यासहवर्तमान भोक्ता या ठिकाणी राहतो. 316
317-18
इंद्रियांच्या दाहे हाती । जाचोनिया दिवोराती । सुखदुःखे प्रकृती । जोडीजती जिये ॥317॥
इंद्रियांच्या दहा हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःख उत्पन्न होतात, 317
318-18
तिये भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाही देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥318॥
ती भोगण्याकरिता दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात.
319-18
हे चोविसाही तत्वाचे । कुटुंबघर वस्तीचे । तुटे बंधमोक्षाचे । गुंथाडे एथ ॥319॥
हे चोवीस तत्त्वाचे वस्तीस्थान असून बंध व मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो. 319
320-18
किंबहुना अवस्थात्रया । हे अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेचि नाम ॥320॥
फार काय ? परंतु जागृती, स्वप्न व सुषुप्ती याचे हे मुख्य ठिकाण होय, म्हणून धनंजया, या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे. 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-18
आणि कर्ता हे दुजे । कर्माचे कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचे जे ॥321॥
आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे होय आणि यालाच चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. 321
322-18
आकाशचि वर्षे नीर । ते तळवटी बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवी ॥322॥
आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते आणि मग त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्याचेच आकाराचे होते; 322
323-18
का निद्राभरे बहुवे । राया आपणपे ठाउवे नव्हे । मग स्वप्नीचिये सामावे । रंकपणी ॥323॥
किंवा निद्रेच्या भारत राजा आपले ऐश्वर्या विसरून स्वप्नात भिकारी झालो आहो असे समजतो 323
324-18
तैसे आपुलेनि विसरे । चैतन्यचि देहाकारे । आभासोनि आविष्करे । देहपणे जे ॥324॥
तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहाच मी असे मानून देहरूपाने प्रगट होते. 324
325-18
जया विसराच्या देशी । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणे भाष केली देहेसी । आघवाविषयी ॥325॥
ज्यात देहात आत्मरुपाचा विसर पडतो, तेथे चैतन्य ‘ जीव’ या नावाने प्रसिद्ध आहे व त्या जीवाने देहाला मी तुझा अभिमान कधीही सोडणार नाही, असे वचन दिले आहे. की ही 325
दिवस ३०१ वा. २८, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६०१ ते ३६१२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३६०१ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
आजी बरवे झाले । माझे माहेर भेटले ॥१॥
डोळा देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥धृपद॥
धन्य झालो आता । क्षेम देऊनिया संता ॥२॥
इच्छेचे पावलो । तुका म्हणे धन्य झालो ॥३॥
अर्थ
आज खूप चांगले झाले संतांच्या रुपाने मला माझे माहेर म्हणजे आईबापच भेटले. आज मी माझ्या डोळयाने संतसज्जन पाहिले त्यामुळे माझा सर्व भाग व शीण निवारण झाला आहे. संतांना क्षेम आलिंगन देऊन मी आता धन्य झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “इच्छेप्रमाणे सर्व मला प्राप्त झाले त्यामुळे मी धन्य झालो आहे. ”
12:18
अभंग क्र. ३६०२ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
वोरसोनि येती । वत्स धेनुवेच्या चित्ती ॥१॥
माझा करावा सांभाळ । वोरसोनिया कृपाळ ॥धृपद॥
स्नेह भूक तहान । विसरती झाले क्षीण ॥२॥
तुका म्हणे कौतुके । दिले प्रेमाचे भातुके ॥३॥
अर्थ
गाईच्या चित्तामध्ये नेहमी तिचे वासरु असते त्यामुळे ती तिचा पान्हा घेऊन वासराकडे जाते. त्याप्रमाणे हे संतजनहो तुम्ही देखील माझ्याकडे स्वत: येऊन माझा सांभाळ करा तुमचा प्रेमरुपी पान्हा पाजून माझा सांभाळ करा. तुमच्या प्रेमाने तहान भूक विसरुन जाते एवढेच नाही तर झालेला त्रासही विसरुन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे संतजनहो तुम्ही मला कौतुकाने तुमचा प्रेमरुपी खाऊ दिलेला आहे. ”
12:18
अभंग क्र. ३६०३ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
आले ते आधी खाईन भातुके । मग कवतुके गाईन ओव्या ॥१॥
सांगितला आधी आइको निरोप । होईल माझा बाप पुसे तो ते ॥२॥
तुका म्हणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥
अर्थ
माझ्या मायबापाने पाठविलेला खाऊ मी आधी खाईन आणि मग कौतुकाने त्यांच्या ओव्या गाईन. माझ्या मायबापाने मला पाठवलेला मी निरोप प्रथम ऐकेन माझ्याविषयी जे जे काही विचारले ते मी प्रथम ऐकेन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे सखे वारकरी आज माहेराहून म्हणजे पंढरीहून परत घरी आले आहेत. ”
12:18
अभंग क्र. ३६०४ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाही आता ॥१॥
काय सांगो सुख झाले आलिंगने । निवाली दर्शने कांति माझी ॥२॥
तुका म्हणे यांच्या उपकारासाठी । नाही माझे गाठी काही एक ॥३॥
अर्थ
आज मला अनेक अशा सुखाच्या राशी जोडल्या गेल्या आहे अशा भाग्याला अंत:पारच नाही. पंढरीहून आलेल्या संत वारकरी यांना आलिंगन देण्याचे सुख काय सांगावे त्यांच्या दर्शनाने माझे शरीर शांत झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “वारकऱ्यांचे उपकार फेडण्यासाठी माझ्या पदरामध्ये काहीच एक भांडवल नाही. ”
12:18
अभंग क्र. ३६०५ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणी मस्तक हे ॥१॥
जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेईन पायवणी धोवोनिया ॥२॥
तुका म्हणे माझे भांडवल सुचे । संता हे ठायीच ठावे आहे ॥३॥
अर्थ
पवित्र होण्याकरता पंढरीहून आलेल्या वारकऱ्यांच्या चरणावर मी लोळण घेऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवीन. मी माझे हात जोडून त्यांना विनंती करीन आणि धावत जाऊन त्यांचे चरणतीर्थ घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्याकडे भांडवल एवढेच आहे हे संतांना देखील माहित आहे. ”
12:18
अभंग क्र. ३६०६ (निर्याणाचेअभंग)
शोधिताचि नये । म्हणोनि वोळगतो पाये ॥१॥
आता दिसो नये जना । ऐसे करा नारायणा ॥धृपद॥
परतोनि मन । गेले ठायींचि मुरोन ॥२॥
विसरला तुका । बोलो चालो झाला मुका ॥३॥
अर्थ
देवा कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या स्वरुपाचा शोध काही लागत नाही त्यामुळे मी तुमची आता चरणसेवा करण्याचे ठरविले आहे. हे नारायणा मी लोकांना दिसणार नाही असे काहीतरी तुम्ही करा. माझे मन आता संसारापासून मागे वळले आहे ते तुमच्या मूळ स्वरुपाच्या ठिकाणी मुरुन गेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी बोलण्या चालण्याचे सर्व काही व्यवहार विसरुन गेलो आहे आणि वृत्तीशून्य होऊन मुका झालो आहे. ”
12:19
अभंग क्र. ३६०७ (निर्याणाचेअभंग)
रज्जुसर्पाकार । भासयेले जगडंबर ॥१॥
म्हणोनि आठवती पाय । घेतो आलाय बलाय ॥धृपद॥
द्रुश द्रुमाकार लाणी । केलो सर्वस्वासी धणी ॥२॥
तुकी तुकला तुका । विश्वी भरोनि उरला लोका ॥३॥
अर्थ
ज्याप्रमाणे एखादी दोरी पडलेली असावी व विना कारण ती सापाप्रमाणे आपल्याला भासावी त्याप्रमाणे हे सर्व जग मला आता मिथ्या वाटत आहे. त्यामुळेच मला हरीचे पाय अत्यंत आवडत आहे व या कारणामुळेच मी अलाय बलाय म्हणजे त्या चरणांनाच प्रेमाने कुरवाळीत आहे. दृष्टीस पडणारे जग हे वड व पिंपळ या वृक्षाप्रमाणे मोठे आहे, जसे त्या वृक्षाचे मूळ तसे या जगाचे मूळ ब्रम्ह आहे व ते ब्रम्हच मी झालो आहे व सर्वस्वाचा धनी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी देखील पूर्ण ब्रम्ह झालो आहे ज्याप्रमाणे देव आहे त्याप्रमाणे मी देखील देवाप्रमाणेच झालो आहे परंतू या जगात केवळ देह दृष्टीनेच मी उरलो तेही केवळ लोकांवर परोपकार करण्यासाठीच. ”
12:19
अभंग क्र. ३६०८ (निर्याणाचेअभंग)
म्हणवितो दास । परि मी असे उदास ॥१॥
हाचि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥धृपद॥
सरते कर्तुत्व माझ्याने । परि मी त्याहून असे भिन्न ॥२॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥३॥
अर्थ
मी स्वत:ला हरीचा दास म्हणून घेतो परंतू मी फार उदास आहे. हाच माझा निश्चय आहे परंतू निश्चयापेक्षाही मी वेगळा होऊन राहिलो आहे. माझ्याकडून कर्तृत्व तर घडते परंतू त्या कर्तृत्वापेक्षाही मी भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी परब्रम्हाच्या तुलनेला येऊन पोहोचलो आहे ही गोष्ट खरी असली तरी देखील जिथे तुलना हा प्रकारच नाही त्याच स्थितीत मी जाऊन पोहोचलो आहे. ”
12:19
अभंग क्र. ३६०९ (निर्याणाचेअभंग)
घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती । मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ॥१॥
ब्रम्हीभूत काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥धृपद॥
तीर्थ भ्रामकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥
सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तीभाग्यसीमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥
धन्य म्हणवीन येह लोकी लोका । भाग्य आह्मी तुका देखियेला ॥५॥
अर्थ
मी इतके रसपूर्ण व चांगले हरीचे कीर्तन व भजन करीन की ब्रम्हज्ञानी मनुष्याला देखील लाळ घोटण्यास प्रवृत्त करेल मुक्त आत्मस्थिती सोडून भक्ती करण्यास तो आपोआप प्रवृत्त होईल. कारण कीर्तनामध्ये शरीर ब्रम्हीभूत अवस्थेला प्राप्त होते आणि देव आपला ऋणी होतो असे भाग्य आपले तयार होते. मी हरी कीर्तनाचा महिमा एवढा वाढवेल की तीर्थयात्रा करणाऱ्यांना देखील त्या गोष्टीचा आळस येईल आणि इंद्रादिक देवांना स्वर्गवास भोग देखील कडू वाटू लागेल. तपश्चर्या करणाऱ्या तपोनिधीला देखील मी अभिमान सोडायला लावीन व यज्ञ आणि दान या साधनांना देखील लाजवीन. भक्तीभाग्य आणि चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना मी प्राप्त करुन घेईन आणि ब्रम्हीचा जो निजठेवा तो प्राप्त करुन घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी असे काही कर्तव्य करीन की या इहलोकामध्ये ज्यांनी कोणी मला पाहिले आहे ते म्हणतील की आमचे भाग्य आहे की आम्ही श्री तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष आमच्या डोळयांनी पाहिले आहे. ”
12:19
अभंग क्र. ३६१० (निर्याणाचेअभंग)
संसाराचे अंगी अवघीच वेसने । आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ॥१॥
आता हे सोवळे झाले त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेले ॥धृपद॥
ब्रम्हपुरी वास करणे अखंड । न देखिजे तोंड विटाळाचे ॥२॥
तुका म्हणे आम्हा एकाताचा वास । ब्रह्मी ब्रम्हरस सेवू सदा ॥३॥
अर्थ
संसाराच्या अंगी अनेक प्रकारचे व्यसने आहेत ती म्हणजे जन्ममरणाचे भय विविध कर्मे भेदाभेद परंतू आम्ही हरीकीर्तनाने शुध्द झालो आहोत. हरीनाम कीर्तनाने सर्व त्रिभूवन आता शुध्द झाले आहे सर्व प्रकारचे विषम भेदाभेद धुवून जाऊन त्याचा त्याग झाला आहे. आता आम्ही ब्रम्हपुरीमध्ये अखंड वास करत आहोत तेथे आम्हाला पापरुपी विटाळाचे तोंड सुध्दा बघण्यास मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हाला एकाताचा वास करणे खूप आवडते व आम्ही ब्रम्हरुप झालो असून ब्रम्हरसाचेच आम्ही नेहमी सेवन करु. ”
12:19
अभंग क्र. ३६११ (निर्याणाचेअभंग)
गरुडाचे पायी । ठेवी वेळोवेळा डोई ॥१॥
वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धरी ॥धृपद॥
पाय लक्ष्मीच्या हाती । म्हणोन येतो काकुलती ॥२॥
तुका म्हणे शेषा । जागे करा हृषीकेशा ॥३॥
अर्थ
मी गरुडाच्या पायावर वेळोवेळी डोई म्हणजे माझा माथा ठेवीत आहे आणि त्याला विनवणी करीत आहे की, “हे गरुडा माझ्यासारख्या दीनाचा उध्दार करण्यासाठी वेगाने तू हरीला आण. ” हरीचे पाय लक्ष्मी मातेच्या हातातही आहेत ती तिच्या हाताने त्यांची सेवा करत आहे त्यामुळे मी लक्ष्मीमातेलाही काकूळतीला येतो आहे आणि तिलाही विनंती करीत आहे की हरीला माझा उध्दार करण्यासाठी लवकर घेऊन यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे शेषा तुम्ही देखील माझ्या हरीला लवकर उठवा आणि माझा उध्दार करण्यासाठी लवकर माझ्याकडे पाठवा. ”
12:19
अभंग क्र. ३६१२ (निर्याणाचेअभंग)
तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥धृपद॥
भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ॥२॥
तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥
अर्थ
हे सनकादीक संतहो तुम्ही स्वत:ला कृपावंत म्हणून घेता मग, तुम्ही माझ्यावर एवढाच उपकार करा देवाला माझा तुम्ही नमस्कार सांगा. माझ्यासाठी तुम्ही वैकुंठीचा राजा पंढरीनाथाला करुणा भाका त्याला एवढी एक विनंती करा की, तुकाराम महाराज म्हणतात, “माझी आठवण देवाला लवकर काढायला सांगा आणि लवकरात लवकर मला मूळ पाठवायला लावा. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















