आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१२ ऑक्टोबर, दिवस २८५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४०९ ते ३४२०
“१२ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 12 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १२ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४०९ ते ३४२० चे पारायण आपण करणार आहोत.
१२ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३२६ ते ३५०,
326-17
हा बोलु आइकतखेवी । अर्जुना आधि न माये जीवी । म्हणे देवे कृपा करावी । सांगावे ते ॥326॥
हे भाषण ऐकतांच, अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनी कृपा करून ते सांगावेच. 26
327-17
तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणे सात्त्विक ते मुक्ती- । रत्न देखे ॥327॥
तेव्हा कृपाळ व चक्रवर्ती भगवान म्हणाले ज्याच्या योगे सात्विक गुणाला मुक्तिरत्नाचा लाभ होतो त्याचे लक्षण ऐक. 27
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥17. 23॥
328-17
तरी अनादि परब्रह्म । जे जगदादि विश्रामधाम । तयाचे एक नाम । त्रिधा पै असे ॥328॥
तरी, परब्रह्म हे अनादि असून जगदादिकांचे विश्रांतिस्थान आहे; हे त्यांचे एकच नांव तीन प्रकारचे आहे. 28
329-17
ते कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती- । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥329॥
खरोखर पहाता वस्तुतः त्याला नाम किंवा जाति नाही, परंतु अज्ञानी जीवांना त्याची ओळख अथवा कल्पना व्हावी म्हणून वेदांनी खूण म्हणून त्याचे ‘ब्रह्म ” असे नांव ठेविले. 29
330-17
उपजलिया बाळकासी । नांव नाही तयापासी । ठेविलेनि नांवेसी । ओ देत उठी ॥330॥
मुलाला जन्मतः काही नांव नसते, पण नंतर त्याला जे नांव द्यावे त्या नांवाने हाक मारली असता ‘ ओ ‘देते. 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-17
कष्टले संसारशीणे । जे देवो येती गाऱ्हाणे । तया ओ दे नांवे जेणे । तो संकेतु हा ॥331॥
संसाराच्या कष्टाने शीण पावलेले लोक जेव्हा वेदाकडे आपले गाऱ्हाणे सांगतात तेव्हा त्यांना ज्या नांवाने तो ‘ओ’ देतो. तो हा संकेत किंवा ती ही ब्रह्मनामक खुण होय. 31
332-17
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वे तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदे बापे ॥332॥
ब्रह्मावरील अनिर्वाच्यतेचा आळ फिटावा व त्याची ऐक्यरूपाने भेट व्हावी अशा हेतूने वेदाने सकृप होऊन जीवांसाठीहे मंत्ररूप नाम शोधून ठेविले. 32
333-17
मग दाविलेनि जेणे एके । ब्रह्म आळविले कवतिके । मागा असत ठाके । पुढा उभे ॥333॥
मग ह्या खुणेच्या मंत्राने त्याला (ब्रह्माला) कौतुकाने हाक मारिलो असता, जे मार्ग म्हणजे दृष्टीआड असल्यासारखे असते ते प्रत्यक्ष पुढे उभे रहतें. 33
334-17
परी निगमाचळशिखरी । उपनिषदार्थनगरी । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारी । तयांसीच कळे ॥334॥
पण, वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरुपी नगरांत ज्यांचा ब्रह्माशी सहसमागम असतो त्यासच हे नाम महात्म्य कळतें. 34
335-17
हेही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥335॥
हेही असो; ब्रह्मदेवाला सृष्टि उत्पन्न करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झाले ते ज्या एका नामाच्या आवृत्तीने म्हणजे जपाने च होय. 35
336-17
पै सृष्टीचिया उपक्रमा- पूर्वी गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥336॥
अर्जुना, सृष्टि उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटाच वेडयासारखा (काही न सुचून ) बसला होता. 36
337-17
मज ईश्वराते नोळखे । ना सृष्टिही करू न शके । तो थोरु केला एके । नामे जेणे ॥337॥
त्याला माझी ओळख नव्हती किंवा सृष्टि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ही नव्हते, पण, त्या वेदसांकेतिक नामाने त्याला एवढे सामर्थ्य आले. 37
338-17
जयाचा अर्थु जीवी ध्याता । जे वर्णत्रयचि जपता । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥338॥
ज्या मंत्राच्या अर्थाचे मनात ध्यान करून व ज्या मंत्राच्या तीन अक्षरांचा जप करून त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता आली. 38
339-17
तेधवा रचिले ब्रह्मजन । तया वेद दिधले शासन । यज्ञा ऐसे वर्तन । जीविके केले ॥339॥
प्रथम ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना वेदाज्ञरूपी आचाराचे बंधन लावून, निर्वाहार्थं यज्ञादि साधने स्वाधीन केली. 39
340-17
पाठी नेणो किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्ही भुवने ॥340॥
मग आणखी किती लोक निर्माण केले त्याची गणतीच नाही; तसेच त्रिभुवन निर्माण करून त्यास व्यवहारार्थं बक्षीस करून दिले. 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-17
ऐसे नाममंत्रे जेणे । धातया अढंच करणे । तयाचे स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥341॥
ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला अशी प्रचंड शक्ति प्राप्त झाली, त्याचे स्वरूप तू आता श्रवण कर, असे श्रीनिवास भगवान् म्हणाले. 41
342-17
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥342॥
तरी सर्व मंत्रांचा राजा जो ” प्रणव ” तोच “ॐ ” आदिवर्ण म्हणजे मूळ अक्षर असे जाण व ‘तत् ” हे दुसरे व ” सत्” हे या मंत्राचे तिसरे अक्षर होय. 42
343-17
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हे त्रिप्रकारु । हे फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचे ॥343॥
ह्याप्रकारे “ॐ तत्सत” आकाराचे हे त्रिप्रकारक ब्रह्मनाम हेच कोणी उपनिषदांचे सुंदर पुष्प त्याचा सुगंध तू सेवन कर. 43
344-17
येणेसी गा होऊनि एक । जै कर्म चाले सात्त्विक । तै कैवल्याते पाइक । घरीचे करी ॥344॥
ह्या वर्णत्रयाच्या ऐक्याने सात्विक कर्माचरण केले असता मोक्ष त्याचा दास होतो. 44
345-17
परी कापुराचे थळीव । आणून देईल दैव । लेवो जाणणेचि आडव । तेथ असे बापा ॥345॥
दैवयोगाने, कापुराचे अलंकार जरी मिळाले, तरी ते ल्यावे कसे हे समजणेच मोठे कठीण असते. 45
346-17
तैसे आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचे ॥346॥
तसे, सत्कर्माचे आचरण व ब्रह्मनामाचा उच्चार जरी केला, तरी जर त्याच्या उपयोगाचे वर्म माहीत नसेल, 46
347-17
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानू नेणता परवडी । मुद्दल तुटे ॥347॥
तर, साधुसंत प्रेमाने घरी आले तरी त्यांचे आदरातिथ्य कसे करावे हे न जाणता जर अपमान झाला तर पुण्य लागण्याऐवजी पाप मात्र लागते. 47
348-17
का ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवी ॥348॥
किंवा सोन्याचे उत्तम टीक वगैरे दागिने एकत्र गाठोडे करून जसे गळ्यात बांधावे 48
349-17
तैसे तोंडी ब्रह्मनाम । हाती ते सात्त्विक कर्म । विनियोगेवीण काम । विफळ होय ॥349॥
तसे मुखाने ब्रह्म नामोच्चार, हाताने सात्विक कर्म, पण त्याचा विनियोग मात्र माहीत नाही असे असेल तर ते व्यर्थ जाते. 49
350-17
अगा अन्न आणि भूक । पासी असे परी देख । जेऊ नेणता बालक । लंघनचि की ॥350॥
अरे, पोटात भूक आहे, जवळ अन्नही आहे, पण कसे जेवावे ते माहित नसलेल्या बालकाला जसा उपवास घडतो. 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २८५ वा. १२, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४०९ ते ३४२०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३४०९
आता माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसे करी गा पांडुरंगा । प्रेम वोसंडेसे अंगा ॥धृपद॥
सर्व काळ नये । वाचे विट आड भये ॥२॥
तुका वैष्णवांसंगती । हेचि भोजन पंगती ॥३॥
अर्थ
आता माझ्या मनाला हरीकथेचीच उपासना घडावी एवढीच विनंती आहे. आणि हे पाडूरंगा ती उपासना करत असताना माझ्या अंगातून प्रेमच बाहेर ओसंडत राहावे असेच तुम्ही करा. पाडूरंगा सर्वकाळ जरी मी हरीकथा करत राहीलो तरी माझ्या वाचेला हरीकथेविषयी वीट येऊ देउ नको आणि हरीकथा करताना कोणत्याही प्रकारचे भय आडवे येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “पाडूरंगा माझी एवढीच इच्छा आहे की वैष्णवांच्या पंगतीत बसून मला हरीकथेचे भोजन मिळावे. ”
11:29 am –
अभंग क्र. ३४१०
उपास कराडी । तिही करावी बापुडी ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारीली आस ॥धृपद॥
भक्तीच्या उत्कर्षे । नाही मुक्तीचे ते पिसे ॥२॥
तुका म्हणे बळ । अंगी आमुच्या सकळ ॥३॥
अर्थ
जे भोळे भाबडे लोक आहेत त्यांनीच उपासतापास करावेत. आम्ही तर विठोबाचे दास आहोत सर्व चिंता, आशा, अपेक्षा आम्ही झुगारुन दिले आहेत. आम्हाला भक्तीचा उत्कर्ष आहे आवड आहे मुक्तीचे वेड नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आमच्या अंगामध्ये सर्व प्रकारचे बळ आहे. ”
11:29 am –
अभंग क्र. ३४११
करविली तैसी केली कटकट । वाकडे की नीट देव जाणे ॥१॥
कोणाकारणे हे झालेंसे निर्माण । देवाचे कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असे ॥३॥
अर्थ
मला जशी जमेल तशी बडबड मी केली आता ही बडबड वाकडी आहे की सरळ आहे हे देवालाच माहित. कोणासाठी आणि कोणत्या कार्यासाठी माझ्या मुखातून हे अभंगरुपी शब्द निर्माण झाले आहेत हे देवाचे करणे देवच जाणे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी अभिमानापेक्षा वेगळा होऊन राहिलो आणि माझा सर्व योगक्षेमाचा भार गोपाळावरच घालून राहिलो आहे. ”
11:29 am –
अभंग क्र. ३४१२ (महाराजांनीज्ञानेश्वरमहाराजांनापत्रलिहिले)
तुम्ही येथे पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
आता काय पुढे वाढवुनि विस्तार । झाला समाचार आइका तो ॥धृपद॥
देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायी । झालो उतराई ठावे असो ॥३॥
अर्थ
हे सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुम्ही माझ्याकडे जो धरणेकरी ब्राम्हण पाठविला त्याबद्दल झालेला वृत्तांत तुम्ही ऐका. आता मी पुढे विस्तार काय वाढवत बसू जो प्रकार झाला त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी जो उचित मार्ग आहे तोच उचित मार्ग मी अकरा अभंगांच्या माध्यमातून त्याला सांगितला परंतू या महाफलाचा ( तुकाराम महाराजांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी प्रसादाचा ) तो त्याग करुन येथून गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जी मला सेवा सांगितली ती सेवा मी पूर्ण केली व ती तुमच्या पायाच्या ठिकाणी मी समर्पण करुन उतराई झालो आहे हे तुम्हाला ठाऊक असो. ”
11:29 am –
अभंग क्र. ३४१३ (शिवाजीमहाराजांनीतुकाराममहाराजांनानेण्याकरताघोडाकारकूनअबदागिरीपाठविलीत्यावेळीकारकुणाबरोबरपाठविलेलानिरोप)
दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे ॥१॥
आता येथे पंढरिराया । मज गोविसी कासया ॥धृपद॥
मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धावा ॥३॥
अर्थ
प्रथम तुकाराम महाराज देवाला म्हणतात की, “देवा दिवट्या छत्री घोडे हे माझ्यासाठी चांगले नाही. हे पंढरीराया आता या मोहात तू मला कशाला गुंतवत आहेस ? मानसन्मान, दंभ, प्रतिष्ठा हे तर मला शुक्राच्या विष्ठेप्रमाणे आहेत. ” तुकाराम महाराज म्हणतात, “यातून मला सोडवण्यासाठी देवा तुम्ही लवकर धावा. ”
11:30 am –
अभंग क्र. ३४१४ (शिवाजीमहाराजांनीतुकाराममहाराजांनानेण्याकरताघोडाकारकूनअबदागिरीपाठविलीत्यावेळीकारकुणाबरोबरपाठविलेलानिरोप)
नावडे जे चित्ता । तेचि होसी पुरविता ॥१॥
का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाठी ॥धृपद॥
न करावा संग । वाटे दुरावावे जग ॥२॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥
जन धन तन । वाटे लेखावे वमन ॥४॥
तुका म्हणे सत्ता । हाती तुझ्या पंढरिनाथा ॥५॥
अर्थ
अरे देवा माझ्या चित्ताला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच गोष्टी तू पूर्ण करणार आहे. अरे माझा जीव घेण्यासाठी तू असा माझा पाठपुरावा का करत आहेस ? कोणाचीही संगती करु नये नव्हे नव्हे या जगालाच दूर लोटून दयावे की काय असे मला वाटत आहे. मला असे वाटत आहे की एकातात जावे एकांत सेवन करावा कोणाशीही बोलू नये. जन, तन, धन हे ओकलेल्या अन्नाप्रमाणे लेखावे असेच मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा सर्व सत्ता तर तुझ्याच हातात आहे माझ्या वाटणे न वाटण्याला काय किंमत आहे तुला जे वाटेल तेच तू करशील. ” (श्रीशिवाजी महाराजांनी श्री तुकाराम महाराजांना आणण्याकरता घोडा आबदागिरी व कारकून पाठविला तेव्हा श्रीशिवाजी महाराजांना कारकूनाबरोबर दिलेल्या निरोपाचे अभंग)
11:30 am –
अभंग क्र. ३४१५
जाणोनी अंतरी । ताळीसील करकर ॥१॥
तुज लागली हे खोडी । पांडुरंग बहु कुडी ॥२॥
उठविसी दारी । धरणे एखादिये परि ॥३॥
तुका म्हणे पाय । कैसे सोडीन ते पाहे ॥४॥
अर्थ
देवाला उद्देशून महाराज म्हणतात, “देवा तुला माहित आहे माझ्या अंत:करणात काय आहे तरी देखील माझ्या पाठीमागे काहीतरी मायिक पदार्थ लावून त्यात मला तू गुंतवून टाकशील आणि तुझ्या पाठीमागची करकर तू टाळशील असे तुला वाटत असेल. ” हे पाडूरंगा तुला ही वाईट खोड लागली आहे. तुमच्या दारामध्ये एखादा भक्त धरणे धरुन बसला तर त्याची काहीतरी समजूत काढून तुम्ही त्याला उठवून देता. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा पण मी तुझा भक्त आहे तुझे पाय सोडीनच कसे तू याचा विचार करुन बघ माझ्या मागे कितीही तू मायिक पदार्थांचे भुंगे लाव तरी मी तुझे पाय सोडणार नाही. ”
11:30 am –
अभंग क्र. ३४१६
नाही विचारीत । मेघ हगंनदारी सेत ॥१॥
नये पाहो त्याचा अंत । ठेवी कारणापे चित्त ॥धृपद॥
वर्जीत गंगा । नाही उत्तम अधम जगा ॥२॥
तुका म्हणे मळ । नाही अग्नीसी विटाळ ॥३॥
अर्थ
मेघवर्षाव करताना ही हगणदारी आहे किंवा हे शेत आहे याविषयी विचार करत नाही. त्यामुळे देवा तुम्ही भक्ताच्या विचाराकडे लक्ष दया त्याचा अंत पाहू नका. गंगा जगामधील उत्तम अधम लोकाचा विचार करत नाही चांगल्या लोकांचे आणि वाईट लोकांचे दोघाचेही पापनिवारण ती करत असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अग्नीला कोणत्याही प्रकारचा मळ लागत नाही किंवा अग्नी कधीही विटाळत नाही. ”
11:30 am –
अभंग क्र. ३४१७ (शिवाजीमहाराजांनीतुकाराममहाराजांनानेण्याकरताघोडाकारकूनअबदागिरीपाठविलीत्यावेळीकारकुणाबरोबरपाठविलेलानिरोप)
मुंगी आणि राव । आम्हा सारिखाची जीव ॥१॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फासा ॥धृपद॥
सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ॥२॥
तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सांवळे ॥३॥
अर्थ
मुंगी असो किंवा राजे असो आम्हाला दोन्हीही सारखेच आहेत. आता आमचा मोह आणि आशा, इच्छा, अपेक्षा गेले आहेत कळी काळाचा फास देखील आम्ही तोडला आहे. सोने आणि माती या दोन्हीचीही जागा आमच्या चित्तामध्ये सारखीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आमच्या घरी वैकुंठाहून सावळे ब्रम्ह आले आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची इच्छा अपेक्षा राहिली नाही. ”
11:30 am –
अभंग क्र. ३४१८
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथे हे उपाय न सरती ॥धृपद॥
अमृते सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहे काळा ॥२॥
भूत भविष्य कळो येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धीसिद्धी ॥३॥
ठान मान कळो येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥
तुका म्हणे मोक्ष राहे ऐलीकडे । येर बापुडे काय तेथे ॥५॥
अर्थ
दगडाचे पर्वत देखील सोन्याचे करता येतील, संपूर्ण रान देखील कल्पतरु करता येईल परंतू विठोबाचे पाय दुर्लभ आहेत तेथे कोणत्याही प्रकारचे चमत्कार किंवा बल मान्य होत नाही. समुद्र गंगा यांना अमृताने भरुन टाकला येईल, काळाला देखील थोडया वेळ थांब असे म्हणता येईल. भूत भविष्य वर्तमान या गोष्टी आपल्याला कळून घेता येतील, रिध्दी सिध्दीला देखील आपल्याला प्रसन्न करता येईल. वस्तू किंवा घर न पाहाता देखील आपल्याला ते कोठे आहे कोठे नाही ते सांगता येतील, योगमुद्रा आपल्याला सिध्द होतील, प्राणवायू देखील आपल्याला ब्रम्हांडात नेता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, “तरी देखील मोक्ष अलीकडेच राहातो मग इतर साधने बिचारे यापुढे काय आहेत ? ”
11:31 am –
अभंग क्र. ३४१९
तिन्ही त्रिभुवनी । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥
हाता आले घाव डाव । आमुचा मायबाप देव ॥धृपद॥
काय त्रिभुवनी बळ । अंगी आमुच्या सकळ ॥२॥
तुका म्हणे सत्ता । अवघी आमुचीच आता ॥३॥
अर्थ
तीनही त्रिभुवनामध्ये एक आम्हीच सगळया वैभवाचे धनी आहोत. सर्व युक्त्या आमच्या हातात आल्या आहेत कारण देवच आमचा मायबाप आहे. तीनही भुवनात जितके बळ नाही तेवढे बळ आमच्या अंगामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता सर्वत्र आमचीच सत्ता आहे. ”
11:31 am –
अभंग क्र. ३४२० (शिवाजीमहाराजांनीतुकाराममहाराजांनानेण्याकरताघोडाकारकूनअबदागिरीपाठविलीत्यावेळीकारकुणाबरोबरपाठविलेलानिरोप)
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुह्मी कळलेती उदार । साठी परिसाची गार ॥धृपद॥
काय जीव देता तरी । वचना नये येका सरी ॥२॥
गोमांसासमान । तुका म्हणे आम्हा धन ॥३॥
अर्थ
छत्रपती शिवाजीमहाराजांना श्रीतुकाराम महाराज पत्राद्वारे सांगतात की, “हे शिवराय तुम्ही आम्हाला हा काय ठेवा दिला आहे आम्हाला केवळ एक विठ्ठल हवा आहे. तुम्ही आम्हाला आबदागिरी, घोडे, रत्न पाठवून दिले यावरुन तुम्ही किती उदार आहात हे आम्हाला समजले आहे जसे परीस घ्यावे आणि त्याबदल्यात गारगोटी दयावे असे तुमचे मोठेपण आहे. तुम्ही जीव जरी दिला तरी, मी भक्तीमध्ये बोललेल्या शब्दाची व तुम्ही दिलेल्या वस्तू तसेच अबदागिरी घोडे रत्न यांची बरोबरी होऊ शकत नाही. ” तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही जे धन पाठविले आहे ते आम्हासाठी गोमांसाप्रमाणेच आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















