आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० ऑक्टोबर, दिवस २८३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २७६ ते ३०० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३८५ ते ३३९६
“१० ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 10 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १० ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१० ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २७६ ते ३००,
276-17
का जयाचे ठेविले तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपे विडा राया । दिधला जैसा ॥276॥
किंवा, जशी काही त्याची अ । पल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असवी. 76
277-17
तैसेनि निष्कामे जीवे । भूम्यादिक अर्पावे । किंबहुना हावे । नेदावे उठो ॥277॥
अशा निष्कामबुद्दीने भूमि आदिक दान ब्राह्मणास अर्पण करावे, पण त्याबद्दल मनात मुळीच फलेच्छा नसवी 77
278-17
आणि दान जया द्यावे । तयाते ऐसेया पाहावे । जया घेतले नुमचवे । कायसेनही ॥278॥
आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा असावा की त्याला आपल्या दानाची उलटफेड करण्याची कधी संधि येणार नाही. 78
279-17
साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ॥279॥
आकाशाकडे मुख करून हाक मारिली असता जसे प्रत्युत्तर मिळत नाही, किंवा आरशाच्या मागील बाजूने पाहता प्रतिबिंब दिसत नाही, 79
280-17
नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुके । उधळौनि कवतिके । न येईजे हाता ॥280॥
किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असता जसा तो प्रत्याघाताने परत आपल्या हात येत नाही. 280
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-17
नाना वसो घातला चारू । माथा तुरंबिला बुरू । न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥281॥
किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतघ्न मनुष्य हे जसे केव्हांही प्रत्युपकार करीत नाहीत. 81
282-17
तैसे दिधले दातयाचे । जो कोणेही आंगे नुमचे । अर्पिलया साम्य तयाचे । कीजे पै गा ॥282॥
त्याप्रमाणे दिलेले दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही, असे जे दान तेच श्रेयशसकर दान होय. 82
283-17
ऐसिया जे सामग्रिया । दान निफजे वीरराया । ते सात्त्विक दानवर्या । सर्वाही जाण ॥283॥
अशा तजवीजीने केलेले जे दान ते, अर्जना, सात्विक सर्वश्रेष्ठ दान होय. 83
284-17
आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥284॥
आणि तो देश काल पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारे द्रव्यही न्यायनिष्ठ व धामिक आचाराने मिळविलेले असावे. 84
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥17. 21॥
285-17
परी मनी धरूनि दुभते । चारिजे जेवी गाईते । का पेव करूनि आइते । पेरू जाइजे ॥285॥
मनात दुधाची आशा धरून गाईला चारतात किंवा आधी पेवाची तयारी करून मग जसे शेत पेरतात. 85
286-17
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतु जाइजे सोयिरा । का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥286॥
किंवा आहेर मिळेल ही पोटात आशा धरून मग जसे लग्नकार्यात सोयऱ्याला आमंत्रण देतात, किंवा जेथून वाण परत येईल अशाकडेच ते पाठवावयाचे. 86
287-17
पै कळांतर गाठी बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥287॥
किंवा लांच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करावे अथवा द्रव्य घेऊन आर्त औषध जनांस द्यावे. 87
288-17
तैसे जया जे दान देणे । तो तेणेचि गा जीवने । पुढती भुंजावा भावे येणे । दीजे जे का ॥288॥
तसे दान ज्याला द्यावयाचे, त्या दानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल अशी बुद्धि आत ठेवावयाची. 88
289-17
अथवा कोणी वाटे जाता । घेतले उमचो न शकता । मिळे जै पंडुसुता । द्विजोत्तमु ॥289॥
अथवा, सहज वाटेने जातांना एखादा पवित्र पण प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला, 89
290-17
तरी कवड्या एकासाठी । अशेषा गोत्रांचीच किरीटी । सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी । तयाचिये ॥290॥
तर अधेल्या पैशाचे दानाकरिता त्याच्या हाता वर सर्व आप्तेष्टांच्या प्रायश्चित्तार्थ जे उदक सोडतात, 290
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-17
तेवीचि पारलौकिके । फळे वांछिजती अनेके । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥291॥
त्याचप्रमाणे, अनेक पारलौकिक फळांची इच्छा बाळगून जे दान देतात व तेही इतके की त्याने एक वेळची भूकही भागू नये 91
292-17
तेही ब्राह्मणु नेवो सरे । की हाणिचेनि शिणे झांसुरे । सर्वस्व जैसे चोरे । नागऊनि नेले ॥292॥
आणि ते दान ब्राह्मण नेवू लगला की, चोरांनी नागविल्याप्रमाणे जणू आपली हानि झाली, असे मानून त्याबद्दल मनात झुरतात. 92
293-17
बहु काय सांगो सुमती । जे दीजे या मनोवृत्ती । ते दान गा त्रिजगती । राजस पै ॥293॥
अर्जुना, फार काय वर्णावे ! अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान सर्व जगात राजसदान म्हणून प्रसिद्ध आहे 93
अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥17. 22॥
294-17
मग म्लेंच्छांचे वसौटे । दांगाणे हन कैकटे । का शिबिरे चोहटे । नगरींचे ते ॥294॥
मग म्लेच्छांच्या वस्तीची जागा, अथवा अरण्य किंवा अपवित्र स्थळ किंवा शिबिर, नगरांतले चव्हाटे, 94
295-17
तेही ठाई मिळणी । समयो सांजवेळु का रजनी । तेव्हा उदार होणे धनी । चोरियेच्या ॥295॥
अशा ठिकाणी बसून सायंकाळी अथवा रात्री चोरीने मिळविलेले द्रव्य उदारपणाने दान करितात. 95
296-17
पात्रे भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी । जिये मूर्तिमंते भुररी । भुले तया ॥296॥
हे द्रव्य ज्यांना दिले जाते ते लोक म्हणजे भाट, तमासगीर, वेश्या, जुगारी, भुताटक्या, अथवा भूल घालणारे असे असतात. 96
297-17
रूपानृत्याची पुरवणी । ते पुढा डोळेभारणी । गीत भाटीव तो श्रवणी । कर्णजपु ॥297॥
त्यातील रूपवानांनी त्यांच्यापुढे नृत्यगानादि प्रकार करून त्यास नेत्रकटाक्षाने वगैरे भुरळ पाडून त्याच्या कानांत जाईल असा स्तुतीचा जप केला; 97
298-17
तयाहीवरी अळुमाळु । जै घे फुलागंधाचा गुगुळु । तव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥298॥
म्हणजे तल्लीन होऊन, अत्तर गुलाब वगैरे सुगंधी द्रव्यांचा चवीने भोग घेऊन मूर्तीमंत वेताळच बनतात ! 98
299-17
तेथ विभांडूनिया जग । आणिले पदार्थ अनेग । तेणे घालू लागे मातंग । गवादी जैसी ॥299॥
मग लोकांना लुटून आणलेल्या अनेक पदार्थानि तेथे मांग गारोडीसारख्यांना अन्नछत्र घालतात. 99
300-17
एवं ऐसेनि जे देणे । ते तामस दान मी म्हणे । आणि घडे दैवगुणे । आणिकही ऐक ॥300॥
एकूण असा जो द्रव्याचा व्यय होतो त्याला मी तामसदान म्हणतो; आणि त्यातही एखादेवेळी कसा प्रकार घडतो, ते ऐक. 300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २८३ वा. १०, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३८५ ते ३३९६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३३८५
तुजविण सत्ता । नाही वाचा वदविता ॥१॥
ऐसे आम्ही जाणो दास । म्हणोनि जालो उदास ॥धृपद॥
तुम्ही दिला धीर । तेणे मन झाले स्थिर ॥२॥
तुका म्हणे आड । केलो मी हे तुझे कोड ॥३॥
अर्थ
देवा माझ्यावर तुझी सत्ता आहे आणि माझ्या वाणीला तुझ्यावाचून बोलविणारा दुसरा कोण आहे माझेच काय संपूर्ण त्रैलोक्यावर तुझीच सत्ता आहे. देवा आम्ही दासांनी हे जाणून घेतले आहे त्यामुळे तर देहावर उदास झालो आहे. देवा तुम्हीच मला धीर दिला त्यामुळे तर माझे मन स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा प्रत्येक प्रसंगी मी तुला पुढे घालून तुझ्या आड लपून राहिलो ही देखील तुझीच लीला आहे. ”
4:24
अभंग क्र. ३३८६
काय मी जाणता । तुम्हाहुनि जी अनंता ॥१॥
जो हा करू अतिशय । का तुम्हा दया नये ॥धृपद॥
काय तुज नाही कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हाहुनि ॥३॥
अर्थ
हे अनंता मी तुमच्यापेक्षा जास्त काही जाणत आहे काय ? की उगाचच मी तुमच्यापुढे मी माझा शहाणपणा दाखवू मी तर अज्ञानी आहे तुमच्यापुढे मी शहाणपणा कसा दाखवणार त्यामुळे देवा तुम्हाला माझी दया का बरं येत नाही ? हे विश्वाच्या मायबापा तुमच्यामध्ये कृपा राहिलीच नाही की काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमच्यापेक्षा जास्त काय बोलू शकतो काय ? ”
4:24
अभंग क्र. ३३८७ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेश. )
काय ज्ञानेश्वरी उणे । तिही पाठविले धरणे ॥१॥
ऐकोनिया लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥धृपद॥
तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥
तुका म्हणे ठेवा । होता सांभाळावे देवा ॥३॥
अर्थ
ज्ञानियांचे देखील जे राजे आहेत असे ज्ञानेश्वर महाराज यांना उपदेश करण्यासाठी काय उणे होते की त्यांनी माझ्याकडे धरणेकऱ्याला पाठविले ? ‘माझ्या दारामध्ये हा ब्राम्हण कृपा होण्यासाठी धरणे धरुन बसला होता ” हे वाक्य श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले होते व तोच मजकूर मला धरणे धरणाऱ्या ब्राम्हणाच्या तोंडून ऐकण्यास मिळाला त्यावेळी मला ही गोष्ट समजली. माझे स्वामी सर्व जाणतात तरी देखील सेवकाच्याच वाणीतून ते वदवून घेत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा परमार्थाचा जो ठेवा आहे तो तुम्हीच सांभाळावा कारण त्याचे खरे अधिकारी तर तुम्हीच आहात. ”
4:25
अभंग क्र. ३३८८
ठेवूनिया डोई । पायी झालो उतराई ॥१॥
कारण ते तुह्मी जाणा । मी तराळ नारायणा ॥धृपद॥
प्रसंगी वचन । दिले तेचि खावे अन्न ॥२॥
तुका म्हणे भार । तुम्ही जाणा थोडा फार ॥३॥
अर्थ
मी माझे मस्तक तुमच्या पायावर ठेवून उतराई झालो आहे. हे नारायणा माझ्याकडे हा जो धरणेकरी ब्राम्हण आलेला आहे याला उपदेश कसा करावा हे तुम्हीच जाणा कारण मी तर केवळ तराळ म्हणजे वेठीला धरलेला नौकर आहे. माझ्या मालकाने मला प्रसंगानुसार जी आज्ञा दिली आणि जसे अन्न दिले तसेच मी खावे असा माझा अधिकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्यावर जो भार आहे तो थोडाफार तुम्हीच जाणून घ्यावा. ”
4:25
अभंग क्र. ३३८९ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
नको काही पडो ग्रंथाचिये भरी । शीघ व्रत करी हेचि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावे देवा । ओस देहभावा पाडोनिया ॥धृपद॥
साधने घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकी न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नोहे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी पातली अंगसंगे जरा । आता उजगरा कोठवरी ॥४॥
तुका म्हणे घाली नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
अर्थ
ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यास तुकाराम महाराज उपदेश करु लागले आहेत ते म्हणतात की, “अनेक ग्रंथाच्या भरीस तू आता पडू नकोस त्वरेने एकच उपाय कर, देहभाव नाहीसा करुन देवाची आवड मनात धरुन देवाला नेहमी आळवत राहा. ” हे साधन सोडून तू इतर कोणतेही साधन करु नकोस कारण इतर साधने तुला काळाच्या मुखामध्ये घालतील त्यामुळे तुला अनेक गर्भवास भोगावे लागतील इतर साधनामुळे ते गर्भवास तुला चुकणार नाही. मेल्यानंतर मोक्ष मिळेल खरा तर तो मोक्ष नाहीच मुद्दामहून पाप कर्म करुन अध:पतनाची इच्छा धरु नये. अरे देहाच्या संगतीमुळे तुला आता वृध्द अवस्था आली आहे आणि ह्या उजगरा म्हणजे उजाळा तरी कोठपर्यंत तुला करुन दयावा ? तुकाराम महाराज म्हणतात, “आता तू नामासाठी उडी घाल म्हणजे सतत हरीचे नामचिंतन करीत राहा म्हणजे पाडूरंग तुला या भवसागराच्या पलीकडे पोहोचविल. ”
4:25
अभंग क्र. ३३९० (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
नाही देवापाशी मोक्षाचे गांठोळे । आणूनि निराळे द्यावे हाती ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनिया मन । निर्विषय कारण असे तेथे ॥धृपद॥
उवपास पारणी अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटी असे फळ ॥२॥
आदरे संकल्प वारी अतिशय । सहज ते काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नीचिया घाये विळवसी वाया । रडे रडतियासवे मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशी । शरण देवासी जाय वेगी ॥५॥
अर्थ
देवाजवळ मोक्षाचे गाठोडे नाही की ते देवाने तुझ्या हातामध्ये आणून दयावे. इंद्रियांवर विजय मिळवून मनाला निर्विषय कर तरच मोक्षाची प्राप्ती होईल. उपवास म्हणजे एकादशी सोमवार हे व्रते करणे नंतर पारणे सोडणे त्यानंतर वेदशास्त्राचा अभ्यास करणे आणि सत्कर्म करणे याचे तुला शेवटी मोक्षरुपी फळ मिळेल. संसारामध्ये तू अनेक प्रकारचे संकल्प करतोस ते संकल्प करणे सोडून दे दुराग्रह म्हणजे अभिमानपणा सोडून दे असे केल्याने तुला सहजस्थिती प्राप्त होईल व सहजस्थिती प्राप्त झाली की मग तुला दु:ख जाणवणार नाही. स्वप्नामध्ये तुझ्यावर कोणी घाव केला तर तू विनाकारणच तळमळ करतोस कारण हे घाव खोटे आहे हे तू जाणतच नाहीस आणि मनुष्य रडू लागला की त्याच्याबरोबरही तू व्यर्थ रडत बसतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “तुला मी वरती जे काही साधने सांगितली आहेत ते मूळ आहे आणि त्या मुळाजवळच तुला इच्छित असलेले फळ देखील आहे त्यामुळे मी सांगितलेले साधने. �
4:25
अभंग क्र. ३३९१ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
त्याजिले भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावे देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करी ॥धृपद॥
नाही जावे यावे दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरीचा ॥२॥
तुका म्हणे हा तो आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥
अर्थ
बाहेर लोकांना सांगावे की मी संसाराचा त्याग केला आणि अंत:करणामध्ये संसाराविषयी वासना ठेवावी त्यामुळे शेवटी होते काय तर पुन्हा संसारात येऊन पडावेच लागते मग असे केल्याने काय उपयोग होणार आहे ? देवाला करुणा भाकून सतत आळवत राहावे आणि त्याविषयी मनाला साक्षी करावे देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी कोठेही दूर यावे जावे लागत नाही तो आपल्या अंत:करणामध्ये साक्षीभूत रुपाने आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव कृपासिंधू आहे त्याला करुणा भाकली की तात्काळ भवबंध तोडून टाकतो. ”
4:25
अभंग क्र. ३३९२
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥धृपद॥
आनंदले मन । प्रेमे पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरेचि वेगळी ॥३॥
अर्थ
मनाला जर सारखा गोविंद गोविंद असा जर छंद लागला, तर मग हे शरीर देखील गोविंदमय होते देव आणि आपल्यात भेदच राहात नाही. देवातील व आपल्यातील एकदा भेद नाहीसा झाला की मग आपले मन आनंदी होते आणि प्रेमाश्रू आपल्या डोळयातून सारखे वाहात राहाते. तुकाराम महाराज म्हणतात, “अळी भुंग्याचे इतके ध्यान करते की शेवटी ती भुंगाच होऊन जाते भुंग्यापेक्षा वेगळी ती राहातच नाही त्याप्रमाणे भक्ताने गोविंदाचे इतके ध्यान केले की भक्त देखील गोविंदरुपच होऊन जातात गोविंदापेक्षा ते वेगळे राहात नाहीत. ”
4:26
अभंग क्र. ३३९३
ज्याचे जया ध्यान । तेचि होय त्याचे मन ॥१॥
म्हणऊनि अवघे सारा । पांडुरंग दृढ धरा ॥धृपद॥
सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे नभा । परता अणुचाही गाभा ॥३॥
अर्थ
ज्याला ज्या गोष्टीचे ध्यान नेहमी लागलेले असते त्याचे मन त्या गोष्टीशीच एकरुप होऊन जाते. म्हणूनच सर्व काही बाजूला ठेवा आणि पाडूरंगाचेच मनामध्ये सतत ध्यान करत राहा. ज्याचे दोन्हीही चरण सारखेच आहे आणि सर्वत्र व्यापक असूनही जो विटेवर आपले दोन्हीही समचरण ठेवून उभा आहे तोच पाडूरंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “असा हा परमात्मा नभापेक्षाही मोठा आहे आणि अणूसारख्या परमाणूचाही गाभा आहे. ”
4:26
अभंग क्र. ३३९४ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन । तेव्हा आले जाण फळ त्याचे ॥१॥
नाही तरि वाया केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥धृपद॥
पढोनिया वेद हरीगुण गावे । ठावे ते जाणावे तेव्हा जाले ॥२॥
तपतिर्थाटणे तेव्हा कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरीच्या नामी ॥३॥
यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठी राहे ॥४॥
तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडो सार धरी हेचि एक ॥५॥
अर्थ
ग्रंथाला प्रमाण धरुन कीर्तन करावे ग्रंथाचा अभ्यास करावा व नंतर कीर्तन करावे आणि कीर्तन करताना देवाविषयी आवड निर्माण झाली व समाजात परिवर्तन झाले तर समजावे की आपण केलेल्या ग्रंथाचा अभ्यास फळाला आला आहे. जर ग्रंथाला प्रमाण धरुन कीर्तन केले तरच उपयोग आहे नाहीतर ग्रंथप्रमाण धरले नाही आणि कीर्तन केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही शेवटी आपल्याला त्याचा त्रासच भोगणे शिल्लक राहील. वेदपठण करावे परंतू हरीचे गुण गाऊन हरीचे गुण गायिल्यानंतर वेदपठण आपण केले तर वेदांचा अर्थ आपल्याला समजेल. तप तीर्थाटन करताना चित्त हरीच्या नामाच्या ठिकाणी स्थिर करावे तरच आपण केलेले कार्य सिध्द होईल. हरीचे नाम जर आपल्या कंठात स्थिर नेहमी राहीले तरच याग, यज्ञ, दान, धर्म इत्यादी कार्य केल्याचे फळ आपल्याला भेटेल. तुकाराम महाराज म्हणतात, “हे धरणेकरी ब्राम्हणा अरे तू योगयागातील जप तप या काबाड कष्टाच्या भरीस पडू नको केवळ एक�
4:26
अभंग क्र. ३३९५ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
सुखे खावे अन्न । त्याचे करावे चिंतन ॥१॥
त्याचे दिले त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥धृपद॥
आहे हा आधार । नाम त्याचे विश्वंभर ॥२॥
नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरी भाव ॥३॥
अर्थ
अन्नाची उत्पत्ती करणाऱ्या देवाचे अन्न आपण जसे सुखाने खातो तसेच त्या देवाचेही चिंतन सुखाने करावे. देवाचे घेतलेले देवालाच दिले तरच आपल्याला फळप्राप्ती होते. संपूर्ण विश्वाचा हा आधार आहे त्यामुळे तर त्या देवाला विश्वंभर नांव दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जगामध्ये देवावाचून कोणताही पदार्थ रिकामा नाही त्यामुळे तुझा भक्तीभाव तू व्यापक कर आणि सर्वभूती तू हरी आहे असाच दृढ भक्तीभाव ठेव. ”
4:26
अभंग क्र. ३३९६ (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचे ॥१॥
करोनि पारणे आंचवे संसारा । उशीर उशिरा लावू नको ॥धृपद॥
घरकुलीने होता पडिला अंधार । तेणे केले फार कासावीस ॥२॥
झुंगारूनि दुरी लपविले काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥
अर्थ
अरे तू स्वत:ला देह समजून लहान का राहिला आहेस ब्रम्हांडाचे आभूषण घे म्हणजे मीच ब्रम्ह आहे असा दृढ निश्चय कर. आचमन घे आणि या संसाराचे पारणे फेडून टाक ब्रम्ह मीच आहे असे म्हण आणि असे करण्यासाठी तू फार उशीर लावू नकोस. देहभाव या अज्ञानरुपी अंधाराने तुला संसारामध्ये गुंतवून टाकले व संसाराच्या अनेक प्रकारच्या भाराने तुला फार कासावीस केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादयाला दान देण्यासाठी आपण पैसे बाहेर काढावेत तो जवळ आल्यानंतर पैसे झुगारुन देण्याचे नाटक करुन आपल्याजवळच काखेत पुन्हा लपवून ठेवावे त्याप्रमाणेच देवाचे हे सारे कौतुक आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















