आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

६ ऑक्टोबर, दिवस २७९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १७६ ते २००+ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३३७ ते ३३४८
“६ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ६ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३३७ ते ३३४८ चे पारायण आपण करणार आहोत.
६ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १७६ ते २००,
176-17
तिही फळवांच्छात्यागी । स्वधर्मावाचूनि विरागी । कीजे तो यज्ञु सर्वांगी । अळंकृतु ॥176॥
केवल स्वधर्म म्हणून, अन्य कशाच्याही इच्छेकरिता नव्हे अशा वैराग्यवृत्तीने ते तो यज्ञ सर्वागाने सालंकृत म्हणजे यथासांग करतात. 76
177-17
परी आरिसा आपणपे । डोळा जैसे घेपे । का तळहातीचे दीपे । रत्न पाहिजे ॥177॥
परंतु, आरशांत आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावरील रत्नाची दिव्याने परीक्षा करावी. 77
178-17
नाना उदिते दिवाकरे । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेदु निर्धारे । देखोनिया ॥178॥
किंवा सूर्योदय झाल्यावर आपला इच्छित अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून. 78
179-17
तिये कुंडे मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी । ते मेळवणी जैसी विधी । आपणपा केली ॥179॥
कुंडे, मंडप, वेदी व आणखी लागणाऱ्या सामग्रीची सिद्धता करितात; ती अशी की, जणू विधीने मूर्तरूपाने अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे. 79
180-17
सकळावयव उचिते । लेणी पातली जैसी आंगाते । तैसे पदार्थ जेथिचे तेथे । विनियोगुनी ॥180॥
सर्व देहाचे अवयव यथा योग्य आभरणांनी जसे श्रृंगारावे तशी यज्ञाची सर्व सामग्री जेथीच्या तेथे मांडतात. 180
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-17
काय वानू बहुती बोली । जैसी सर्वाभरणी भरली । ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषे ॥181॥
त्याचे आणखी किती वर्णन करावे ? यज्ञाच्या निमित्ताने, सर्व साहित्यासह साक्षात् यज्ञविद्याच तेथे अवतरली आहे असे वाटते. 81
182-17
तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु । नुठऊनिया लागु । महत्त्वाचा ॥182॥
याप्रमाणे कोणताही विशिष्ट हेतु न बाळगता जो सांगोपांग यज्ञ केला जातो. 82
183-17
प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडी कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाही ॥183॥
फल, पुष्प, छाया यांपैकी काहीही प्राप्ति नसलेली तुळशीची झाडं लोक जशी पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात. 83
184-17
किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥184॥
किंबहुना, फलाशेवीण अशा दक्षतेने जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा. 84
अभिसन्धाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥17. 12॥
185-17
आता यज्ञु कीर वीरेशा । करी पै याचि{ऐ}सा । परी श्राद्धालागी जैसा । अवंतिला रावो ॥185॥
अर्जुना, दुसरा जो राजस यज्ञ तोही विधि असाच असतो, पण श्राद्धाच्या दिवशी इष्ट पंगतीला राजाला आमंत्रण देण्यासारखे हे असते. 85
186-17
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥186॥
राजा जर भोजनास आला तर पुष्कळच उपयोग होण्यासारखा असतो, लौकिकही वाढतो आणि श्राद्धही पार पडले 86
187-17
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोका । घडेल यागु ॥187॥
तसा तिहेरी हेतु मनात बाळगून तो मनात समजतो की, यज्ञफल म्हणून स्वर्ग ठेवलेलाच; दीक्षित म्हणून लोकात मान मान्यता होणारच; आणि यज्ञासारखे महत्कार्य घडल्याचे श्रेयही मिळाले. 87
188-17
ऐसी केवळ फळालागी । महत्त्व फोकारावया जगी । पार्था निष्पत्ति जे यागी । राजस पै ते ॥188॥
असा केवल फलाशेने व लोकात प्रसिद्धि व्हावी म्हणून जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. 88
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥17. 13॥
189-17
आणि पशुपक्षिविवाही । जोशी कामापरौता नाही । तैसा तामसा यज्ञा पाही । आग्रहोचि मूळ ॥189॥
आणि पशु व पक्षी ह्यांच्या विवाहांत कामेच्छेवाचून दुसरा जस कोणी जोशी म्हणून लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला एक आग्रहावाचून अन्य काही कारण लागत नाही. 89
190-17
वारया वाट न वाहे । की मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसी बिहे । आगी जरी ॥190॥
वाऱ्याला वाहण्यास काय मार्ग लागतो ? मरणाला काय मुहूर्त पाहिजे ? किंवा अग्नि काय पवित्र अपवित्र यास भितो ? हे जर होत असेल तर- 190
191-17
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥191॥
तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा लागेल; पण अर्जुना, तो स्वतःच निर्बंधरहित आहे. 91
192-17
नाही विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्नजाता न सुये तोंड । मासिये जेवी ॥192॥
त्याला विधिची चाड नसते, मंत्राची गरज लागत नाही आणि त्या मंडपांत माशीच्या तोंडालाही अन्न लागत नाही. 92
193-17
वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ के रिगेल दक्षिणा । अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥193॥
ब्राह्मण जेथे डोळ्यासमोर नको, तेथे दक्षिणेचा प्रश्न कोठून येणार ? आणि आगीला जसे वाऱ्याचे सहाय्य व्हावे. 93
194-17
तैसे वायाचि सर्वस्व वेचे । मुख न देखती श्रद्धेचे । नागविले निपुत्रिकाचे । जैसे घर ॥194॥
त्याप्रमाणे पुष्कळ द्रव्य खर्च होऊनही तेथे श्रद्धेचा लेशही नसतो; म्हणजे निपुत्रिकाचे घर त्याच्यामागून वाटेल त्याने बळकवावे तसेच हे होय. 94
195-17
ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइके म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥195॥
देव म्हणाले अर्जुना, ऐक बरे ! असा जो यज्ञाभास ‘ (नाममात्र यज्ञ ) तो तामस यज्ञ. 95
196-17
आता गंगेचे एक पाणी । परी नेले आनानी वाहणी । एक मळी एक आणी । शुद्धत्व जैसे ॥196॥
अरे, गंगोदक तेच; परंतु निरनिराळ्या प्रकाराने उपयोग केला म्हणजे गटारात सोडलेले अपवित्र होते, व दुसऱ्याने तीर्थ म्हणून शुद्धता येते. 96
197-17
तैसे तिही गुणी तप । येथ जाहले आहे त्रिरूप । ते एक केले दे पाप । उद्धरी एक ॥197॥
त्याप्रमाणे तपही तीन गुणांनी त्रिधा झाले आहे. त्यातील एकाचा आचार पापाला कारण होतो, तर एकाचा उद्धाराला कारण होतो, 97
198-17
तरी तेचि तिही भेदी । कैसेनि पा म्हणौनि सुबुद्धी । जाणो पाहासी तरी आधी । तपचि जाण ॥198॥
तरी त्याचेच तीन भेद कोणते हे जाणावयाची इच्छा असेल तर, प्रथम तप म्हणजे काय हे समजून घे. 98
199-17
येथ तप म्हणजे काई । ते स्वरूप दाऊ पाही । मग भेदिले गुणी तिही । ते पाठी बोलो ॥199॥
आता, तप म्हणजे काय ते प्रथम सांगून तीन गुणांनी ते त्रिविध कसे झाले आहे हे मग सांगू 99
200-17
तरी तप जे का सम्यक् । तेही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ॥200॥
तरी यथार्थ तपाचे, शरीर, मानसिक आणि शाब्द असे तीन भेद आहेत. 200
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २७९ वा. ६, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३३७ ते ३३४८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३३३७
आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हाती उपदेश ॥१॥
दगडाची नांव आधीच ते जड । ते काय दगड तारू जाणे ॥१॥
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंग संपादणी करिती परी ॥३॥
अर्थ
काही गोसावी आपली अयाचित (दान घेण्याची) वृत्ती स्वत: न सांगता शिष्याकडून सांगतात. दगडाचि जड नांव इतर दगडांना पैलतीरावर नेउ शकणार नाही; कारण ती स्वतः पाण्यात तरंगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, साधुचा वेश परिधान करण्याचे सोंग करुण त्यांनी साधुत्व विटंबिले आहे
4:12
अभंग क्र. ३३३८
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥
खापराचे होन खेळती लेकुरे । काय त्या वेव्हारे लाभ हाणि ॥धृपद॥
मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥
स्वप्नीचे जे सुखदुःख जाले काही । जागृती तो नाही साच भाव ॥३॥
सारी जाली मेली लटिके वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥
अर्थ
मृगजलाची नदी पार करण्यासाठी पायउतारा व्हावे लगत नाही. खपरच्या खोट्या पैश्याने मुले खळतात, त्यात खरोखरचा आर्थिक लाभ हानी नसते. लहान मूली बाहुला-बाहुलीचे लग्न करतात; पण त्यात खरे नाते जोडले जात नाहीत. स्वप्नातील सुखदुःखाशी जागृतिमधील जीवनातील काहीही संबंध नसतो. तुकाराम महाराज म्हणतात खेळाच्या पटावरि सोंगट्या मारतात, काही पुन्हा जिवंत होऊन उठतात हे सर्व जसे खोटे असते, तसेच बध्दता, मुक्तता हे शब्द आत्म्याला लागू पडत नाही.
4:13
अभंग क्र. ३३३९
आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन सर्व खोटे ॥३॥
अर्थ
आंधळयाला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगच आंधळे भासते. आजारी माणसाच्या तोंडाला चव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त शुद्ध नाही, त्याला सारे त्रभुवन खोटे भासते.
4:13
अभंग क्र. ३३४०
बोलविसी तैसे आणी अनुभवा । नाही तरी देवा विटंबना ॥१॥
मिठेंविण काय करावे मिष्टान्न । शव जीवेविण शृंगारिले ॥धृपद॥
संपादणीविण मिटविले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥
कन्यापुत्रेंविण मंगळदायके । वेचिले हे फिके द्रव्य तरी ॥३॥
तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरी प्रेमभाव ॥४॥
अर्थ
देवा तू माझ्या मुखातून जसे बोल बोलवित आहेस त्या प्रकारचा अनुभव देखील माझ्या अंगी येऊ दयावेत नाहीतर त्या बोलण्याची विटंबना होईल. मीठावाचून मिष्ठान्न असेल तर त्याचा काही उपयोग होईल काय आणि जीवावाचून एखादया प्रेताला सजवले श्रृंगारले तरी ते व्यर्थच ठरते. जर एखादे सोंग संपादन केले आणि त्या सोंगाची संपादने व्यवस्थित व चांगली करता आली नाही तर घेतलेल्या सोंगाची विटंबनाच होते तसेच एखादयाचे रुप अतिशय सुंदर आहे पण त्यामध्ये चांगले गुणच नाही तर ते रुप व्यर्थच ठरते. मुलाचे किंवा मुलीचे लग्न असेल तर त्यामध्ये द्रव्य खर्च केले तर ते फलदायक ठरते परंतू बाहुला बाहुलीचे लग्न ठेवले आणि त्यामध्ये द्रव्य खर्च केले तर ते व्यर्थच ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अगदी तसेच माझे दिसत आहे मी वरवर तर भक्तीचे प्रेमाचे बोल बोलतो आहे परंतू अंत:करणामध्ये तुझ्याविषयी प्रेमभाव भक्तीभाव काही दिसून येत नाही. ”
4:13
अभंग क्र. ३३४१
नाही आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥
का हे नष्ट करिती निंदा । नेणो सदा आमुची ॥धृपद॥
असो भलते ठायी मने । समाधाने आपुल्या ॥२॥
तुका म्हणे करू देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥
अर्थ
आम्ही विष्णूदास आहोत आम्ही कशाचीही अपेक्षा करत नाहीत. असे असून देखील हे दुष्ट लोक आमची नेहमी निंदा का करतात हे काही कळत नाही. आम्ही कोठेही असो कोणत्याही परिस्थितीत असोकग आमचे मन समाधानी असते व आमच्या परिस्थितीशीही आम्ही समाधानी असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता आम्हाला कोणी काहीही म्हणो कितीही आमची कोणी निंदा करो परंतू आम्ही तुमच्या सेवेचाच धंदा नेहमी करत राहू. ”
4:13
अभंग क्र. ३३४२
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥१॥
आवडीने गळा मिठी । घाली उठी बैसवी ॥धृपद॥
लावू धावे मुख स्तना । नये मना निराळे ॥२॥
भावंडाचे भाते दावी । आपुले लावी त्यास जी ॥३॥
माझे थोडे त्याचे फार । उत्तर हे वाढवी ॥४॥
तुका म्हणे नारायणा । तुम्ही जाणा बुझावू ॥५॥
अर्थ
माता आपल्या बाळाला कधी विसरते काय तर नाही कारण तिच्या अंत:करणामध्ये बाळाच्याविषयी कळवळा असतो. बाळ आईला आवडीने प्रेमाने गळयाला मिठी मारते आणि आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी तिला सारखे बसवते उठवते. आवडीने व प्रेमाने आईच्या स्तनाला ते बाळ आपले मुख लावण्यासाठी धावते त्यावेळी त्याच्या मनामध्ये काहीच येत नाही. आईने दिलेला खाऊ ते बाळ भावंडाना दाखवते परंतू भावंडाचा खाऊ त्याला जर आवडला तर स्वत:ला दिलेला खाऊ ते बाळ भावंडांना देते आणि भावंडाचा खाऊ स्वत:ला घेते. ते बाळ म्हणते की मला दिलेला खाऊ थोडा आहे त्याला दिलेला खाऊ जास्त आहे व असे म्हणूनच भांडण करु लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी देखील तुमचे लहान बाळ आहे माझी समजूत काढण्याचे देखील तुम्हीच जाणता. ”
अभंग क्र. ३३४३
वचन ते नाही तोडीत शरीरा । भेदते अंतरा वज्रा ऐसे ॥१॥
काही न सहावे काशा हि कारणे । संदेह निधान देह बळी ॥धृपद॥
नाही शब्द मुखी लागत तिखट । नाही जड होत पोट तेणे ॥२॥
तुका म्हणे जरी गिळी अहंकार । तरी वसे घर नारायण ॥३॥
अर्थ
जर कोणी आपल्याशी कठोर शब्दाने बोलले तर ते आपले शरीर तोडीत नाही परंतू आपले अंत:करण दगडासारखे ते शब्द भेदत असते. कोणी आपल्याला बोलले तर ते आपल्याला का बरे सहन होत नाही त्याला मुख्य कारण आहे तो देहभाव जर आपण देहच देवाच्या पायी बळी दिला तर कोणी आपल्याला कितीही बोलले तरी आपल्याला ते शब्द लागणारच नाही. मग कठोर शब्द बोलणाऱ्याचे मुख देखील तिखट होत नाही आणि ऐकणाऱ्याचे पोट देखील जड होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व गोष्टीला कारण एक अहंकार आहे जर आपण अहंकारच गिळून टाकला तर आपल्याला कोणी काहीही बोलले आपल्याशी कोणी कसेही वागले तरी आपण ते सहन करु शकतो आणि आपल्या देहरुपी घरामध्ये स्वत: नारायण वास्तव्य करीन. ”
4:14
अभंग क्र. ३३४४
मायेचा मारिला अंगी नाही घाव । दुःखे तरी लव धडधडी ॥१॥
न लभे हा काळ न सुटे हातीचा । न बोलवे वाचा वेडावली ॥धृपद॥
न पवे धावणे न पवेचि लाग । न लगेची माग धरावया ॥२॥
भेणे तरि अंगा लावियेल्या राखा । तरी त्यासी वाखा करीतसे ॥३॥
तुका म्हणे हाका मारू नेदी देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥
अर्थ
सर्व लोक मायेने मारले गेले आहेत परंतू अंगावर एक देखील घाव दिसत नाही पण शरीरावरील एक ना एक केस जळत आहे. या मायेच्या हातातून सुटण्याचा काळही येत नाही आणि तिच्याविषयी काही बोलायला जावे तर वाणीलाच वेड लागले आहे. या मायेच्या मागे कितीही धावले तरी ती हाती काही लागत नाही कितीही तिचा पाठलाग केला तरी तिचा मागमूस काही लागत नाही. या मायेच्या भितीने कित्येक साधू संन्यासी लोकांनी अंगाला राख फासली आहे परंतू तरी देखील ती माया त्यांची फजितीच करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “माया ही जगामध्ये अनेक रुपाने वास्तव्य करते आणि लोकही त्याच्यात गुंतून पडतात ती कोणालाही सोडत नाही आणि मुख्य म्हणजे देवाला हाकच मारु देत नाही देवाचे नामस्मरण देखील करु देत नाही. ”
4:14
अभंग क्र. ३३४५
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ॥धृपद॥
बैसविले मला येणे अश्वावरी । धावू पळू तरी कैसा आता ॥२॥
असोनि उपाय म्हणे हे आपण । म्हणे हायहाय काय करू ॥३॥
तुका म्हणे हा तो स्वये परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥
अर्थ
एक भित्रा शिपाई युध्दाच्या प्रसंगी म्हणतो की माझ्या एका हातामध्ये ढाल आहे तर दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे त्यामुळे माझे दोन्हीही हात गुंतले आहेत तसा तर मी फार शूर शिपाई आहे पण आता मी युध्द तरी कसे करु ? अहो युध्द बाजूलाच राहीले परंतू माझ्या डोक्यात टोपी अंगामध्ये जड चिलखत घातलेले आहे कमरेला पट्टा बांधलेला आहे युध्दप्रसंग तर सोडा परंतू या जड हत्यारांनीच मला मरण ओढावल्यासारखे वाटत आहे. त्यामध्ये माझ्या सेनापतीनी मला घोडयावर बसवले आता एवढे ओझे सांभाळून शत्रूच्या मागे मी धावू कसा आणि शत्रू माझ्या मागे लागला तर मी पळू कसा ? त्या शिपायाजवळ युध्दाच्या प्रसंगी लागणारे हत्यार अंगामध्ये चिलखत डोक्यामध्ये टोपी कमरेला पट्टा हे प्रसंगी उपयोगी पडणारे साहित्य शस्त्रे दिलेले आहेत परंतू त्याला ते उपाय वाटत नसून अपाय वाटत आहेत आणि तो म्हणतो कसा की हाय हाय मी काय करु माझ्या अंगावर एवढे जड साधने दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे हे मनुष्य आहेत विचार करुन पाहिले तर परब्रम्ह हेच मूळस्वरुप जीवाचे आहेत परंतू अज्ञानामुळे परब्रम्हस्वरुप हे झाकले जाते आणि मूर्खांना हे कळत नसल्यामुळे हरीप्राप्तीचे मुख्य वर्म म्हणजे संतचरण सेवा आहे हे देखील कळत नाही. ”
4:14
अभंग क्र. ३३४६
काय करू न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥
ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥धृपद॥
कुटुंबाचा तुम्हा भार । मज व्यवहार निमित्त ॥२॥
तुका म्हणे करिता काम । हृदयी नाम धरीन ॥३॥
अर्थ
हे गोविंदा मी कोणत्याही प्रकारचा व्यापार धंदा करत नाही त्याला मी काय करु माझे चित्त तुझ्या पायाशीच रत झाले आहे. असा माझा संकल्प असताना माझ्या बुध्दीला तुम्ही धीर दयावा माझी बुध्दी तुमच्या पायाच्या ठिकाणीच स्थिर राहू दयावा माझ्या बुध्दीला इतरत्र कोठेही जाऊ देऊ नये. खरे तर माझ्या कुटूंबाचा भार तुमच्या माथ्यावर आहे मी केवळ व्यवहाराचा निमित्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी कोणताही व्यवहार करताना कार्य करताना तुझेच नाम ह्दयामध्ये दृढ धरीन आणि त्याचे चिंतन करीन. ”
4:15
अभंग क्र. ३३४७
येऊनि नरदेहा विचारावे सार । धरावा पै धीर भजनमार्गा ॥१॥
चंचळ चित्तासी ठेवूनिया ठायी । संताचिये पायी लीन व्हावे ॥धृपद॥
भावाचा पै हात धरावा नश्चिये । तेणे भवभय देशधडी ॥२॥
नामापरते जगी साधन सोपे नाही । आवडीने गाई सर्वकाळ ॥३॥
तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा नश्चियाचा मेरु झाला ॥४॥
अर्थ
या नरदेहामध्ये येऊन मुख्य सार कशात आहे याविषयी विचार करावा आणि भजन मार्गामध्ये धीर धरावा. चंचल चित्ताला एका ठिकाणी स्थिर करावे आणि संतांच्या पायी लीन व्हावे. हरीच्या भक्तीभावावर दृढ निश्चय धरावा त्यामुळे भवसागरातील सर्व भय देशोधडीला जातील. हरीचे नाम गाणे यासारखे सोपे साधन जगामधे कोणतीच नाही त्यामुळे हरीची प्राप्ती करुन घ्यायची असेल तर सर्वकाळ नाम आवडीने गात राहा. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारचा निश्चयाचा मेरु ज्याचा झाला त्या नराचा वंश धन्य आहे. ”
4:15
अभंग क्र. ३३४८
बीज जाळुनि केली लाही । आम्हा जन्ममरण नाही ॥१॥
आकारासी कैचा ठाव । देह प्रत्यय झाला देव ॥धृपद॥
साकरेचा नोहे उस । आम्हा कैचा गर्भवास ॥२॥
तुका म्हणे अवघा जोग । सर्वा घटी पांडुरंग ॥३॥
अर्थ
बी भाजले की त्याची लाही तयार होते आणि ती लाही जमिनीत पेरली असता उगवतच नाही त्याप्रमाणे आम्ही “कर्मरुपी बी ज्ञानरुपी अग्नीमध्ये” भाजून काढले आहे व त्या कारणामुळे आम्हाला जन्ममरणच नाही. जगातील कोणत्याही आकाराविषयी आमच्यामध्ये स्थानच राहिले नाही त्यामुळे आमचा देह म्हणजे प्रत्यक्ष देवच झाला आहे. साखरेचा परत ऊस तयार होतो का तर नाही त्याप्रमाणे आम्ही आमचे कर्मरुपी बीजच जाळून टाकले त्यामुळे आम्हाला गर्भवास तरी कसा होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “एक पाडूरंगच सर्वत्र व्यापलेला आहे असाच अनुभव आम्हाला येत आहे. ” (मंबाजी गोसव्याने मारले त्या समयीचे अभंग)
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















