७ ऑक्टोबर, दिवस २८० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३४९ ते ३३६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“७ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 7 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ७ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३४९ ते ३३६० चे पारायण आपण करणार आहोत.
७ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २०१ ते २२५,

201-17
आता गा तिही माझारी । शारीर तव अवधारी । तरी शंभु का श्रीहरी । पढियंता होय ॥201॥
आता या तीहींतील प्रथम शारीर तप कोणते ते ऐक; त्या तपस्व्याचे उपास्य शंकर असो किंवा विष्णू असो. 1

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥17a14॥
202-17
तया प्रिया देवतालया । यात्रादिके करावया । आठही पाहार जैसे पाया । उळिग घापे ॥202॥
त्या आपापल्या प्रिय देवतांच्या दर्शनार्थं अगर त्यांच्या यात्रादिकांसाठी, आठही प्रहर जणू त्याच्या पायात भोंवरे बांधले आहेत. (जो सारख्या यात्रा करीत राहतो) 2
203-17
देवांगणमिरवणिया । अंगोपचार पुरवणिया । करावया म्हणिया । शोभती हात ॥203॥
देऊळ वाडा स्वच्छ ठेवून व सुशोभित करून, पूजासाहित्य व अलंकारादि पुरवून तसेच देवसेवा करून ज्याचे हात शोभत आहेत. 3
204-17
लिंग का प्रतिमा दिठी । देखतखेवो अंगेष्टी । लोटिजे का काठी । पडली जैसी ॥204॥
शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती ह्यांचे दर्शन होताच जो दंडायमान भूमीवर साष्टांग नमस्कार घालतो. 4
205-17
आणि विधिविनयादिकी । गुणी वडील जे लोकी । तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥205॥
आणि विधिपालनाने वा विनयादिकाने गावात जे कोणी श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांची जो सेवा करितो. 5


206-17
अथवा प्रवासे का पीडा । का शिणले जे सांकडा । ते जीव सुरवाडा । आणिजती ॥206॥
अथवा प्रवासादिक किंवा अन्यपीडेने संकटांत असलेले जे कोणी, त्यांची सुखसोय अथवा लावतो. 6
207-17
सकल तीर्थांचिये धुरे । जिये का मातापितरे । तया सेवेसी कीर शरीरे । लोण कीजे ॥207॥
अथवा सकल तीर्थाचे तीर्थ जी मातापितरे त्यांच्या, जो सेवेपुढे आपले शरीरही तुच्छ लेखण्याची ज्याची तयारी आहे. 7
208-17
आणि संसारा{ऐ}सा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानी सकरुणु । भजिजे गुरु ॥208॥
आणि संसारासारखा घोर शीण हरण करणारे व ज्ञानदानाविषयी सदैव सकरुण असलेले जे श्रीगुरु त्यांची जो सेवा करितो. 8
209-17
आणि स्वधर्माचा आगिठा । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटी सुभटा । झाडी कीजे ॥209॥
आणि अर्जुना, जडदेहाभिमानरूपी जे बुद्धीवर कीट आलेले आहे ते झडून जावे म्हणून जो नित्य स्वधर्माचरणावृत्तिरूप अग्नीचा त्याला ताव देतो. 9
210-17
वस्तु भूतमात्री नमिजे । परोपकारी भजिजे । स्त्रीविषयी नियमिजे । नांवे नांवे ॥210॥
सर्वातर्यामी एकच परमात्मा आहे ह्या बुद्धीने जो भूतमात्राच्या ठिकाणी लीन असतो, नित्य परोपकाररत असतो, आणि स्त्रीविषयींची गोष्टही ऐकणेस जो तयार नसतो. 210
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


211-17
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणे आंगे । तेथूनि जन्म आघवे । सोवळे कीजे ॥211॥
जन्माच्या वेळी जो मातेच्या देहाच स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्रीजातीचा स्पर्श; तेथून पुढे त्या विषयासंबंधी शरीर आजन्म सोवळे आहे. 11
212–17
भुतमात्राचेनि नांवे । तृणही नासुडावे । किंबहुना सांडावे । छेद भेद ॥212॥
गवतालाही जीव आहे म्हणून तेही उपटू नये, किंवा अन्य छेदक वा भेदक कायिक वाचिक क्रिया जो टाळतो. 12
213-17
ऐसैसी जै शरीरी । रहाटीची पडे उजरी । तै शारीर तप घुमरी । आले जाण ॥213॥
असे वागण्याचे जे शरीराला सहज वळण पडलेले असते ते मूर्त अथवा खरे शारीर तप असे समज. 13
214-17
पार्था समस्तही हे करणे । देहाचेनि प्रधानपणे । म्हणौनि ययाते मी म्हणे । शारीर तप ॥214॥
अर्जुना, ह्याला शारीर तप म्हणण्याचे कारण असे की ह्या सर्व क्रिया देहाच्या आश्रयाने होत असतात. 14
215-17
एवं शारीर जे तप । तयाचे दाविले रूप । आता आइक निष्पाप । वाङ्मय ते ॥215॥
ह्याप्रमाणे शारीरतपाचे लक्षण सांगितले; आता निष्पाप वाणीचे तप कोणते ते ऐक. 15

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥17. 15॥
216-17
तरी लोहाचे आंग तुक । न तोडिताचि कनक । केले जैसे देख । परीसे तेणे ॥216॥
परिस हा लोखंडाचा आकार, वजन वगैरे कशालाही न्यूनता न आणिता जसे याचे सुवर्ण करितो. 16
217-17
तैसे न दुखविता सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसे साधुत्व का देखिजे । बोलणा जिये ॥217॥
शेजाऱ्याला अगर जवळ येणाराला न दुखविता त्याला सुख होईल अशी ज्याच्या भाषणात साधुता दिसेल. 17
218-17
पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेचि जिये । तैसे एका बोलिले होये । सर्वाहि हित ॥218॥
पाणी झाडाना म्हणून दिले जाते, पण, याच्या ओलाव्यावर गवत सहजच बाढते, त्याप्रमाणे एकापाशी केलेले भाषण सर्वाना हितकर असते. 18
219-17
जोडे अमृताची सुरसरी । तै प्राणांते अमर करी । स्नाने पाप ताप वारी । गोडीही दे ॥219॥
अमृतगंगा प्राप्त झाली तर अमरत्व येते, स्नानाने पाप व ताप जातात व प्राशनालाही गोड असते. 19
220-17
तैसा अविवेकुही फिटे । आपुले अनादित्व भेटे । आइकता रुचि न विटे । पीयुषी जैसी ॥220॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
त्याप्रमाणे त्यांच्या बरोबरच्या भाषणाने अज्ञान नाहीसे होते, आत्मस्वरूपदर्शन (अनादित्व) होते आणि ते ऐकत असता, जसा अमृताचा वीट येत नाही तसा कधी वीटही येत नाही. 220


221-17
जरी कोणी करी पुसणे । तरी होआवे ऐसे बोलणे । नातरी अवर्तणे । निगमु का नाम ॥221॥
जर कोणी काही प्रश्न केला तर भाषणाचा हा प्रकार असतो नाहीतर स्वाध्याय (वेदपाठ) अथवा हरिस्मरण चालू असते. 21
222-17
ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनी । केली जैसी वदनी । ब्रह्मशाळा ॥222॥
ऋग्वेदादि तिन्ही वेदांची वाग्मंदिरांत प्रतिष्ठा करून वदन म्हणजे जणु ब्रह्मशाळाच बनवितात ! 22
223-17
ना तरी एकाधे नांव । तेचि शैव का वैष्णव । वाचे वसे ते वाग्भव । तप जाणावे ॥223॥
किंवा, शिव अथवा विष्णु ह्यांपैकी एकाद्या देवतेचे नांव मुखात सारखे असते, तेच वाचिक तप होय. 23
224-17
आता तप जे मानसिक । तेही सांगो आइक । म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥224॥
लोकनाथ नायक भगवान म्हणाले, आता मानसिक तप कथन करितों, तेही ऐक. 24

मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥17. 16॥
225-17
तरी सरोवर तरंगी । सांडिले आकाश मेघी । का चंदनाचे उरगी । उद्यान जैसे ॥225॥
तरी तरंगावाचून सरोवर, अभ्रांवाचून आकाश अथवा सर्पावाचून चंदनवन अथवा उद्यान. 25

दिवस २८० वा. ७, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३४९ ते ३३६०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३३४९
वैकुंठीचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥
धारीष्ट धैर्‍याचा वरीष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥धृपद॥
पितृसेवा पुण्ये लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगे ॥२॥
अंगसंगे रंगे क्रीडा करी जाणा । ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा ॥३॥
धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायी लोळे ॥४॥
अर्थ
वैकुंठीचा देव ज्याने भूतळावर नामरुपाला आणला असा तो सर्वापेक्षा वेगळा पुंडलिक धन्य आहे. धैयाचेही धारिष्ट, सर्व भक्तांमध्ये वरिष्ठ, पवित्र, पुण्यवान असा एकनिष्ठ पुंडलिक आहे. या पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली व त्या सेवेच्याच पुण्याईने परब्रम्ह त्याच्या हाती आले ते परब्रम्ह ‘विठ्ठल ” निदान त्यांना सापडले आणि नेहमी त्याच्या संगतीमध्येच ते ब्रम्ह राहिले. अहो ज्याच्या घरामध्ये वैकुंठीचा पाहुणा राहतो ज्याबरोबर राहतो आणि त्याच्या घरामध्ये क्रिडा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा या पुंडलिकाची भक्ती आणि शक्ती हे धन्य आहे आणि त्याच्या भक्ती व शक्तीची ख्याती त्रैलोक्यात प्रसिध्द आहे पुंडलिकाच्या पायाजवळ तर चारही मुक्ती लोळण घेत आहेत. ”
4:15

अभंग क्र. ३३५०
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदले डोळा ॥१॥
तेणे अंजनगुणे दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥धृपद॥
देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥
न झाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळले ॥३॥
तत्वमसि विद्या ब्रम्हानंदी सांग । तेचि झाला अंगे तुका आता ॥४॥
अर्थ
तांबडा रजोगुण, पांढरा सत्वगुण, पिवळा शुद्ध सत्वाचा आणि काळा वर्ण तमोगुणाचा आहे आणि या सर्वापेक्षा वेगळे असे चिन्मय अंजन म्हणजे ज्ञानाचे अंजन सद्गुरु ने माझ्या डोळ्या मध्ये घातले आहे. अशा प्रकारचे ज्ञान अंजन गुण माझ्या डोळ्यात सद्गुरु घातले त्यामुळे माझी दिव्य दृष्टी झाली आणि द्वैत व अद्वैत ही कल्पनाच नाहीशी झाली. देश काळ वस्तू यांमधील भेद मावळला म्हणजे सर्व भेद नाहीसा झाला आणि आत्मा हा विश्वकार स्वरूपाने तेजोमय झाला. खरे म्हणजे प्रपंच नाहीच हे जेव्हा सद्गुरु ने ज्ञानांजन माझ्या डोळ्यात घातले त्यावेळी मला समजले आणि ” अहम सोहम ” म्हणजे ” ते ब्रम्ह मीच आहे ” हे ज्ञान मला प्राप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात तत्वमसि या महावाक्याच्या बोधने मी ब्रह्मानंदामध्ये पूर्ण निमग्न झालो म्हणजेच ब्रम्हानंदाच्या अनुभवाने मीच ब्रह्मानंद झालो आहे.
4:15

अभंग क्र. ३३५१
एक ब्रहाचारी गाढवा झोबता । हाणोनिया लाता पळाले ते ॥१॥
गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाझी ॥धृ॥.
हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाची ते ॥२॥
अर्थ
एक ब्रम्हचारी मनुष्य अतिशयं कामातूर झाला व सर्व लाज सोडून तो गाढवाला झोंबू लागला मग त्या गाढवाने त्याला लाथा हाणल्या व तेथून पळून गेले. अशा प्रकारे ते गाढवही गेले ब्रम्हचारी मनुष्याचे ब्रम्हचार्यपणही गेले आणि जगामध्ये त्याचे तोंड काळे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी अशाच प्रकारे मुर्ख मनुष्य स्वार्थही करुन घेत नाहीत आणि परमार्थही करुन घेत नाही ते देखील असेच वायाला जातात. ”
4:17

अभंग क्र. ३३५२
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥१॥
शास्त्रही पुराणे गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यासी ॥धृपद॥
कर्मअभिमाने वर्ण अभिमाने । नाडले ब्राम्हण कलियुगी ॥२॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भावं त्याचा पायी विठोबाचे ॥३॥
अमृताची वाणी वरुशला शुध्द । करी त्या अशुद्ध ऐसा कोण ॥४॥
चहु वेदांचे हे केले विवरण । अर्थहि गहन करूनिया ॥५॥
उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे । करुनी निराळे ठेविले ते ॥६॥
भक्ति ज्ञान आणि वैराग्य आगळा । ऐसा नाही डोळा देखियेला ॥७॥
जपतप यज्ञ लाजविली दाने । हरीनाम कीर्तने करूनिया ॥८॥
मागे कवीश्वर झाले थोरथोर । नेले कलेवर कोणे सांगा ॥९॥
म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी । गेला तो विमानी बैसोनिया ॥१०॥
अर्थ
जगात जरी कोणी पंडित अथवा दशग्रंथी प्रवचन कार झाला असलास तरी त्याची बरोबरी तुकाराम महाराजां बरोबर होणार नाही. त्यांनी जरी शास्त्र, पुराण, गीता हे नित्यनेमाने वाचले तरी त्यातील वर्म त्यांना समजणार नाही. कलियुगा मधील ब्राम्‍हण हे कर्म अभिमानाने व वर्ण अभिमानानेच फसले गेलेले आहेत. तुकाराम हा वाणी आहे व्यवसायिक आहे परंतु तसा नाही त्याचा विठोबाच्या पायी खरा भक्तिभाव आहे. शुद्ध अभंग रुपी वाणीचा सातत्याने वर्षाव केला आहे त्याची वाणी म्हणजे अमृता सारखीच आहे मग त्याला अशुद्ध आहे असे कोण म्हणेल ? मनुष्या मधील उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे देखील वेगवेगळे प्रकार करून हे प्रकार निराळे करून त्यांनी ठेवले आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यामध्येही तो सर्वापेक्षा वेगळा आहे निराळा आहे असा सर्वश्रेष्ठ मी माझ्या डोळ्याने कोणीही दुसरा पा�
4:17

अभंग क्र. ३३५३
माझी मज आली रोकडी प्रचीत । होऊनि फजित दुःख पावे ॥१॥
काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा या शरीरी बहुत झाली ॥धृपद॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार । स्वप्नी सविस्तर सांगितले ॥२॥
तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आंम्हा थोर । का जो अवतार नामयाचा ॥३॥
त्याची तुज काही घडलीरे निंदा । म्हणोनी हे बाधा जडली तुज ॥४॥
अर्थ
आता एक करी सांगेन ते तुला । शरण जी त्याला निश्चयेसी ॥५॥ @
दर्शनेचि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सांगितला ॥६॥ @
तोचि हा विश्वास धरोनि मानसी । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥ @
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे । झाले हे आराम देह माझे ॥८॥
4:17

अभंग क्र. ३३५४
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकी ॥१॥
ऐशी वेदश्रुती बोलती पुराणे । नाही ती दुषणे हरीभक्ता ॥ ध्रु. ॥
उंच नीच वर्ण न म्हणावा कोणी । जे का नारायणी प्रिय झाले ॥२॥
चहु वर्णासीहि असे अधिकार । करिता नमस्कार दोष नाही ॥३॥
जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय पूज्य मान सर्वत्रासी ॥४॥
गुरु परब्रम्ह देवाचा हि देव । त्यासी तो मानव म्हणु नये ॥५॥
म्हणे रामेश्वर नामी जे रंगले । स्वये तेचि झाले देवरूप ॥६॥
अर्थ
जो मनुष्य आपल्या वाणीने वैष्णवांच्या जात व कुळा चा उच्चार करील तो पतनाला जाईल व कुंभी नरक भोग भोगील, असे वेदामध्ये सांगितले आहे परंतु हरी भक्तांना अशा प्रकारचे दूषणे नाहीत. जे वैष्णव नारायणा प्रिय झाले आहेत त्या वैष्णवाचा वर्णन उच्च आहे किंवा नीच आहे असे कोणीही म्हणू नये. हरिभक्ती करण्यासाठी चारही वर्णांना अधिकार आहे देवाला नमस्कार करण्यास कोणत्याही प्रकारचा दोष नाही. जसे शालीग्रामाला पाषाण म्हणू नये कारण तो सर्वत्र पूज्य आहे. गुरु परब्रम्हा चे स्वरूप आहे देवाचा आहे देव आहे त्याला सामान्य मानव म्हणू नये. असे म्हणून शेवटी रामेश्वर भट्ट म्हणतात की जे हरिनामाच्या रंगात रंगले आहेत ते स्वतः देवरूप झालेले आहेत.
4:17

अभंग क्र. ३३५५
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरी ।
ऐसिया अनंतामाजी तू अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुके तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनी ॥धृपद॥
शास्र शीष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविनी योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळी जग दांध्या गिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
संत वृंदे तीर्थ गौतमी हरीकथा । तुकया नर सिंहस्ता भेटो आली ॥३॥
शांति पतिव्रते झाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता ।
क्षमा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगी । ते तो तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वी विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभावे ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्मांशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ती ।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ती विस्तारिली । वाक्ये सफल केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमाने वंचलो । तो मी उपेक्षिलो न पाहिजे ।
न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
अर्थ
भागवत भक्त संत हे जीवनमुक्त आहेत त्यांचा चराचरामध्ये अद्भुत महिमा आहे. अशाच अनंत भक्तांपैकी तू एक अनंत भक्त आहेस जो केवळ लीला करण्याकरता देह धारण करून जगत्राता म्हणजे जगाचे रक्षण करत आहेस. (असे जगद्गुरु तुकाराम महाराजांना श्री रामेश्वर भट्ट म्हणताहेत) . ब्रह्मानंदाच्या तूलनेत तुकाराम महाराज उतरले आहेत आणि संपूर्ण विश्वाचा सखा असा हरी तुकाराम महाराजांच्या रूपानेच या भुतलावर क्रिडा करत आहे. हे भक्तराया तुकोबा त�
4:17

अभंग क्र. ३३५६
स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ॥१॥
नारायणा नामे होऊ जिवन्मुक्त । कीर्तिनी अनंत गाऊ गीती ॥धृपद॥
वैकुंठीचे जन सदा इच्छीतात । कइ येथे येती हरीचे दास ॥२॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनिया कर तिष्ठतसे ॥३॥
तुका म्हणे पावावया पैल पार । नाममंत्र सार भाविकासि ॥४॥
अर्थ
स्वर्गातील अमर देवता अशी इच्छा धरत असतात की मृत्यूलोकी आमचा जन्म व्हावा व नारायण नाम घेऊन जीवन मुक्त होऊ आणि कीर्तनातून आनंताचे गीत गाऊ. वैकुंठा मध्ये नेहमी राहणारे लोक अशी इच्छा धरतात की हरीचे दास येथे केव्हा येतील ? यमधर्म आपले दोन्ही हात जोडून हरिदास केव्हा येतील अशी तिष्ठत वाट पहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात भाविकांसाठी सर्व सार म्हणजे नाम आहे आणि नाममंत्र भाविकांना पैलंतिराच्या पार पोहोचवत असते.
4:18

अभंग क्र. ३३५७
आमुची मिरासी पंढरी । आमुचे घर भीमातिरी ॥१॥
पांडुरंग आमुचा पिता । रखुमाई आमुचि माता ॥धृपद॥
भाउ पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥
तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायापाशी ॥३॥
अर्थ
आमची वतनदारी म्हणजे पंढरी आहे आणि आमचे घर भीमा नदीच्या तीरावर आहे. पाडूरंग हा आमचा पिता आहे आणि रुक्माई ही आमची माता आहे. पुंडलिक मुनी हा आमचा भाऊ आहे चंद्रभागा ही आमची बहीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी जुना वतनदार आहे त्यामुळे मला पाडूरंगाने त्याच्या पायाजवळ मला आश्रय दिला आहे. ”
4:18

अभंग क्र. ३३५८
गंगा गेली सिंधुपाशी । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥
तिणे जावे कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥धृपद॥
जळ क्षोभले जलचरा । माता बाळा नेदी थारा ॥२॥
तुका म्हणे आलो शरण । देवा त्वां का धरिले मौन ॥३॥
अर्थ
गंगा समुद्राजवळ गेली आणि समुद्राने तिला तेथे स्थानच दिले नाही तर, मग तिने कोठे जावे हे पंढरीराया आता तुम्हीच हे मला सांगा ? पाणी जळचरांवर चिडले आणि मातेने बाळाला थाराच दिला नाही तर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुम्हाला शरण आलो आता तुमच्यावाचून मी दुसरे कोठे जावे मी तुमच्याजवळ आलो आणि तुम्ही असे मौन का धरले आहे देवा सांगा. ”
4:18

अभंग क्र. ३३५९
संदेह गमला । कैसा रेडा बोलविला ॥१॥
सांगा देव का न होती । निर्जिव चालविली भिंती ॥धृपद॥
कोरडे कागद । उदकी न लागती बुंद ॥२॥
नीळा म्हणे खरा । देवा संतपायी थारा ॥३॥
अर्थ
ज्ञानोबारायांनी रेड्याला कसे बोलायला लावले या गोष्टीचे आश्चर्य वाटते. निर्जीव भिंतीला देखील ज्ञानेश्वरांनी चालविले मग सांगा ते देव कसे होणार नाहीत ( याचा अर्थ ज्ञानोबाराय देवच आहेत) . सद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग रूपी गाथा पाण्यामध्ये लोकांनी टाकला तर त्या गाथेला एक थेंब देखील पाणी लागले नाही संपुर्ण गाथेतील कागद कोरडे निघाले. निळोबाराय म्हणतात अशा श्रेष्ठ संतांच्या ठिकाणीच देवा मला थारा म्हणजे ठाव मिळावा.
4:18

अभंग क्र. ३३६०
नाम वाचे श्रवणी कीर्ती । पाउले चित्ती समान ॥१॥
काळ सार्थक केला त्यांनी । धरिला मनी विठ्ठल ॥धृपद॥
कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥
निळा म्हणे स्वरूपसिद्धी । नित्य समाधी हरिनामी ॥३॥
अर्थ
ज्यांच्या वाचे मध्ये हरीचे नाम, ज्यांच्या कानाने हरीची कीर्तीचे श्रवण होते आणि ज्यांच्या चित्तामध्ये हरीचे पाऊले आहेत, आणि ज्या लोकांच्या मनामध्ये एक विठ्ठलच आहे त्याच लोकांनी आपला काळ सार्थकी केला आहे असे म्हणावे. असे संत र्निदंभ म्हणजे दंभरहित असतात नेहमी कीर्तनाचा समारंभ ते करत असतात. निळोबाराय म्हणतात ज्यांची नेहमी हरिनामा मध्ये समाधी लागलेली असते त्यांची स्वरूपसिद्धी नक्कीच झालेली आहे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading