२५ ऑक्टोबर, दिवस २९८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५६५ ते ३५७६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 25 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २५ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५६५ ते ३५७६ चे पारायण आपण करणार आहोत.
२५ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २२६ ते २५०,

226-18
या शरीराचेनि मिसके । कर्मची लागले असिके । जिता मेलया न ठाके । इया रीती ॥226॥
या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि याप्रमाणे ते जिवंतपणी व मेल्यावरही कर्म करण्याचे राहत नाही. ॥26॥
227-18
यया कर्माते सांडिती परी । एकीचि ते अवधारी । जे करिता न जाइजे हारी । फळशेचिये ॥227॥
हे बघ, या कर्मचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे. तो असा की, कर्म करीत असतात फलेच्छेच्या आधीन होऊ नये. ॥27॥
228-18
कर्मफळ ईश्वरी अर्पे । तत्प्रसादे बोधु उद्दीपे । तेथ रज्जुज्ञाने लोपे । व्याळशंका ॥228॥
कर्माचे फळ ईश्वरास अर्पण केले, म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते, ॥28॥
229-18
तेणे आत्मबोधे तैसे । अविद्येसी कर्म नाशे । पार्था त्यजिजे जै ऐसे । तै त्यजिले होय ॥229॥
तसा या आत्मबोधाने अज्ञाना सह कर्माचा नाश होतो. पार्था, जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा, तेव्हाच तो खरा त्याग होय. ॥29 ।
230-18
म्हणौनि इयापरी जगी । कर्मे करिता मानू त्यागी । येर मुर्छने नांव रोगी । विसावा जैसा ॥230॥
म्हणून जगामध्ये सात्विक त्यागाच्या हातोटीने कर्म करतो, त्यालाच आम्ही कर्म त्यागी असे मानू. एरवी रोग्याला मुर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात, ॥230॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


231-18
तैसा कर्मी शिणे एकी । तो विसांवो पाहे आणिकी । दांडेयाचे घाय बुकी । धाडणे जैसे ॥231॥
त्याप्रमाणे तो कर्म करताना कंटाळतो, तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो. ती असे की, याप्रमाणे दांड्याच्या घावाच्या वेदना बुक्क्यांनी कमी करावयाच्या तसाच हा प्रकार आहे. ॥31॥
232-18
परी हे असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगती । जेणे फळत्यागे निष्कृती । नेले कर्म ॥232॥
परंतु ही असो; ज्याने फळत्याग करून कर्माला निष्कर्मत्व आणिले तोच या त्रिभुवनात त्यागी होय. ॥32॥
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिना प्रेत्य न तु संन्यासिना क्वचित् ॥18. 12॥
233-18
येऱ्हवी तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते की भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥233॥
एरवी तरी अर्जुना, जे कर्मफळाची अशा सोडीत नाहीत तिच्या तीन प्रकारच्या कर्मफळाचा भोग घेण्यास समर्थ असतात. ॥33॥
234-18
आपणचि विऊनि दुहिता । की न मम म्हणे पिता । तो सुटे की प्रतिग्रहीता । जावई शिरके ॥234॥
आपण कन्येस जन्म दिला असूनही ‘ती माझी नाही’ असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो, तेव्हा त्याची तिजवरील माया सुटून पाणि ग्रहण करणारा जावाई तिच्या मायापाशांत पडतो. ॥34॥
235-18
विषाचे आगरही वाहती । ते विकिता सुखे लाभे जिती । येर निमाले जे घेती । वेचोनि मोले ॥235॥
जे विषाच्या (बचनाग वगैरेच्या) बागा किंवा व्यापार करितात, ते त्याची विक्री करून त्याजवर नफा मिळवून सुखाने प्रपंच करतात, पण जे त्याचे सेवन करतात, ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात ! ॥35॥


236-18
तैसे कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू । एथ न शके आवरू । दोहीते कर्म ॥236॥
त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरू कर्म करो, किंवा मी कर्ता नाही, असे समजून फळाची आशा सोडून कर्म करो, तरी दोघांनाही कर्म करणे चुकत नाही. ॥36॥
237-18
वाटे पिकलिया रुखाचे । फळ अपेक्षी तयाचे । तेवी साधारण कर्माचे । फळ घे तया ॥237॥
रस्त्यावरील पिकलेल्या (आम्र) वृक्षाच्या फळाची जो इच्छा करील त्याचे ते फल असते (म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते.
238-18
परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामी न रिघे । जे त्रिविध जग अवघे । कर्मफळ हे ॥238॥
वाटेवरील वृक्षांच्या पिकलेल्या फळांचा इच्छा करितो, त्यासच ती बाधक होते; परंतु कर्म करून तो फळाची आशा करीत नाही, जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही. कारण, हे तीन प्रकारचे जग कर्माचे फळ आहे. ॥38॥
239-18
देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । आणि हे तव तिन्ही प्रकार । कर्मफळाचे ॥239॥
देव, मनुष्य व स्थावर याला जग असे म्हणतात, आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफळाचेच आहेत. ॥39॥
240-18
तेचि एक गा अनिष्ट । एक ते केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसे ॥240॥
ते कर्म एक अनिष्ट (प्रतिकूल), एक केवळ इष्ट (अनुकूल) आणि एक इष्टानिष्ट (मिश्र) असे तीन प्रकारचे आहे; ॥40॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


241-18
परी विषयमंती बुद्धी । आंगी सूनि अविधी । प्रवर्तती जे निषिद्धी । कुव्यापारी ॥241॥
परंतु जे विषयासक्त आहेत, ते अविधीचा अंगीकार करून निषिद्ध अशा कर्माची ठिकाणी प्रवृत्त होतात; ॥241॥
242-18
तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम ते अनिष्ट । कर्मफळ ॥242॥
आणि त्यायोगे कृमी, कीटक अथवा माती वाईट देह पावतात, त्याला कर्मफळ असे म्हणतात ॥42॥
243-18
का स्वधर्मा मानु देता । स्वाधिकारु पुढा सूता । सुकृत कीजे पुसता । आम्नायाते ॥243॥
किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारनुरूप वेदात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात, ॥43॥
244-18
तै इंद्रादिक देवांची । देहे लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥244॥
तेव्हा अर्जुना, तेव्हा इंद्रादीक देवतांचे देह प्राप्त होतात; त्या कर्म फळाला पुण्यकर्म असे म्हणतात; ॥44॥
245-18
आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळे । उठी दोंही वेगळे । दोही जिणते ॥245॥
आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहो वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो, ॥45॥


246-18
रेचकुचि योगवशे । होय स्तंभावयादोषे । तेवी सत्यासत्य समरसे । सत्यासत्यचि जिणिजे ॥246॥
किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो, त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोहोंनाही जिंकण्यास कारण होते. ॥46॥
247-18
म्हणौनि समभागे शुभाशुभे । मिळोनि अनुष्ठानाचे उभे । तेणे मनुष्यत्व लाभे । ते मिश्र फळ ॥247॥
म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते, मनुष्यदेह याचा लाभ हेच मिश्र फळ होय. ॥47॥
248-18
ऐसे त्रिविध यया भागी । कर्मफळ मांडलेसे जगी । हे न सांडी तया भोगी । जे सूदले आशा ॥248॥
या जगात तीन प्रकारचे कर्मफळ आहे; या कर्मफळाची अशा टाकत नाहीत, ते जन्म-मरणाचे फेऱ्यात पडतात. ॥48॥
249-18
जेथे जिव्हेचा हातु फाटे । तव जेविता वाटे गोमटे । मग परीणामी शेवटे । अवश्य मरण ॥249॥
ज्या जेवणाऱ्याला सहन होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते. त्याला त्यायोगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते. ॥49॥
250-18
संवचोरमैत्री चांग । जव न पविजे ते दांग । सामान्या भली आंग । न शिवे तव ॥250॥
जोपर्यंत अरण्य लाभले नाही, तोपर्यंतच संवचोराची मैत्री बरी, किंवा वेश्येचा जोपर्यंत स्पर्श झाला नाही तोपर्यंतच ती बरी असते. ॥250॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २९८ वा. २५, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५६५ ते ३५७६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३५६५ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
येती वारकरी । वाट पाहातो तोवरी ॥१॥
घालूनिया दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥धृपद॥
पत्र हाती दिले । जया जेथे पाठविले ॥२॥
तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥
अर्थ
पंढरीहून वारकरी येतीलच तोपर्यंत मी वाट पाहात राहीन. मग आलेल्या वारकऱ्यांना मी दंडवत घालीन आणि माझ्यासाठी माझ्या विठोबाने काही निरोपाची गोष्ट तुमच्याजवळ सांगितली आहे की काय असे मी त्यांना विचारीन. वारकऱ्यांच्या हाती मी पत्र दिले होते आणि ते देवाजवळ पाठविले होते. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की वारकरी पंढरीहून परत आले की मी त्यांच्यासमोर जाईन आणि त्यांना विचारेन की माझ्यासाठी विठोबाने काही निरोप पाठविले आहे की काय असे मी त्यांना विचारेन. ”
12:07
अभंग क्र. ३५६६ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
रुळे महाद्वारी । पायाखालील पायरी ॥१॥
तैसे माझे दंडवत । निरोप सांगतील संत ॥धृपद॥
पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥
तुका म्हणे बाळ । लोळे न धरिता सांभाळ ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या महाद्वारातील पायाखालील जी पायरी आहे, ती पायरी जशी रुळलेली आहे अगदी त्याप्रमाणे माझा दंडवत आहे मी संतांकडे माझा निरोप पत्ररुपाने तुमच्याजवळ पाठविला आहे तो निरोप संत तुम्हाला सांगतील. दंड किंवा काठी ही कशी एकदम जमिनीवर पडते अगदी तसाच मी लोटांगण घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “लहान बाळ देहाचा सांभाळ न धरता जसे लोळण घेते अगदी तसा मी लोळण घेत आहे. ”
12:07
अभंग क्र. ३५६७ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
तुह्मी संतजनी । माझी करावी विनवणी ॥१॥
काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥धृपद॥
भाका बहुता रीती । माझी कीव काकुलती ॥२॥
न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥३॥
अर्थ
हे संतजनहो माझ्यावतीने देवाला विनवणी करा. की या तुक्याचा असा कोणता अन्याय आहे की ज्यामुळे तुम्ही त्याच्यापासून तुमचे पाय अंतरवले आहेत. हे संतजनहो विविध प्रकाराने विविध रितीने तुम्ही माझी कीव करुणा देवाजवळ करा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे संतजनहो तुम्ही देवाला विचारा की तुकाराम पंढरीक्षेत्र आणि तुझे विटेवरचे समचरण का पाहू शकत नाही. ”
12:07
अभंग क्र. ३५६८ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
होईल कृपादान । तरी मी येईन धावोन ॥१॥
होती संताचिया भेटी । आनंदे नाचो वाळवंटी ॥धृपद॥
रिघेन मातेपुढे । स्तनपान करीन कोडे ॥२॥
तुका म्हणे ताप । हरती देखोनिया बाप ॥३॥
अर्थ
तुम्ही जर माझ्यावर कृपादान केले तर धावतच देवा मी तुमच्याकडे येईन. मग मी पंढरीक्षेत्राला आलो तुमच्याकडे धावत आल्यानंतर संतांच्या व माझ्या गाठीभेटी होतील व आम्ही दोघे आनंदाने वाळवंटात नाचू. मग मी माझ्या मातेपुढे विठाईपुढे जाईन व कौतुकाने तिचा प्रेमरुपी स्तनपान करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या बापाला म्हणजे विठूरायाला नुसते पाहिले तरी सर्व पाप क्षणात नाहीसे होतात. ”
12:07
अभंग क्र. ३५६९ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥
जरी तू होसी कृपावंत । तरि हा बोलावी पतित ॥धृपद॥
नाणी काही मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥
तुका म्हणे नाही । काय शक्ती तुझे पायी ॥३॥
अर्थ
हे देवा मी तुला पाठवलेल्या निरोपाचे पत्र तू वाच आणि त्वरेने मला त्याचा जाब तुम्ही दयावा. देवा तू जर कृपावत माझ्याविषयी झालास तर तू मला नक्कीच पंढरीला बोलावणे पाठवशील. देवा माझ्याविषयी आता काहीही मनात आणू नकोस माझ्या पापाचा नाश तू कर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या पायामधे अशी कोणती शक्ती नाही की जे तू करु शकत नाहीस. ”
12:08
अभंग क्र. ३५७० (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
ऐकोनिया कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥
माते सुख डोळा पडे । तेथे कोण लाभ जोडे ॥धृपद॥
बोलता ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥२॥
तुका म्हणे धावे । वासना ते रस घ्यावे ॥३॥
अर्थ
देवा तुझी किर्ती ऐकली की कानाला अशी काही विश्रांती वाटते की ते कसे सांगू हेच कळत नाही आणि तुला डोळयाने पाहण्याचा लाभ जर घडला तर ते सुखच वेगळे त्या लाभापुढे दुसरा श्रेष्ठ लाभच कोणता असणार आहे ? देवा तुझे नाम वाचेने घेताना कधीही वीट येत नाही याउलट तुझे नाम घेताना जिव्हा आनंदाने नाचते. तुकाराम महाराज म्हणतात, “माझी अशी वासना आहे की तुझ्या अनुभव सुखाचा रस चाखावा आणि त्यासाठीच ती धावत आहे. ”
12:08
अभंग क्र. ३५७१ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
किती करू शोक । पुढे वाढे दुःखे दुःख ॥१॥
आता जाणसी ते करी । माझे कोण मनी धरी ॥धृपद॥
पुण्य होते गाठी । तरि का लागती हे आटी ॥२॥
तुका म्हणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥
अर्थ
देवा आता मी तुझ्यासाठी किती शोक करु पुढे दु:खाने दु:ख वाढतच आहे. परंतू देवा आता तुला जे समजते ते तू कर पण हे लक्षात ठेव की तुझ्यावाचून माझ्या अंत:करणातील इच्छा कोण मनावर धरणार आहे ? देवा माझ्या पदरात जर एवढे पुण्य असते तर मला एवढया आटाआटी का कराव्या लागल्या असत्या ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्या अंगी तर कोणते सामर्थ्य तर नाही परंतू तुझी व माझी भेट व्हावी एवढीच माझी तळमळ बाकी राहिली आहे. ”
12:08
अभंग क्र. ३५७२ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥
जासी एखादा मरोन । पाठी लागेल हे जन ॥धृपद॥
घरी लागे कळ । नाही जात तो शीतळ ॥२॥
तुका म्हणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥३॥
अर्थ
देवा मी माझ्या शरीराची आबाळ करुन घेईल व दातांची कसाळी केली तर मग पुढे काय होईल ते तूच पाहा. देवा मी एकदाचा मरुन जातो म्हणजे मग लोक तुझ्या पाठीमागेच लागतील. देवा मी जरी घरी थांबलो तर घरी कलह होतात भांडणे होतात घरी देखील मला शांतता मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मग पोरकेपणाच माझ्या मागे राहील. ”
12:08
अभंग क्र. ३५७३ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)

आता आशीर्वाद । माझा असो सुखे नांद ॥१॥
म्‍हणसी कोणा तरी काळे । आहेतसी माझी बाळे ॥धृपद॥
दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥२॥
नेसी कधी तरी । तुका म्‍हणे लाजे हरी ॥३॥
अर्थ
देवा तू सुखाने नांद असा आशिर्वाद माझा तुला आहे. देवा तू कधीतरी आमच्याविषयी कोणाजवळ तरी म्हणणार आहेस की ही माझी बाळे आहेत. देवा आम्ही तुझ्यापासून कितीही दूरदुरांतरात असलो तरी तू आमचा कधीतरी क्षेमसमाचार घेशील. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरी तुला कधीतरी लाज वाटेल आणि कधीतरी तू आम्हाला पंढरीला नेशीलस. ”
12:08
अभंग क्र. ३५७४ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता हे सेवटी । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आता द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु॥
आता करकर । पुढेन करी उत्तर ॥२॥
तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥
अर्थ
देवा आता ही माझी शेवटची गोष्ट तुम्ही ऐकावी. देवा मी तुम्हाला पाठविलेल्या निरोपाचे जसे तुम्हाला उत्तर देता येईल तसे तुम्ही दयावे. देवा आता मी तुझ्याशी यापुढे एकही शब्द बोलणार नाही किंवा तुझ्याशी किरकिर मी घालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्वत्र तुझा जसा ठसा आहे तो तसाच राखून ठेव म्हणजे पुरे. ”
12:09
अभंग क्र. ३५७५ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
बोलिलो ते आता । काही जाणता नेणता ॥१॥
क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥धृपद॥
स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥२॥
तुका म्हणे लाड । दिला तैसे पुरवा कोड ॥३॥
अर्थ
देवा मी तुम्हाला ज्ञान अज्ञानात जे काही आता बोललो आहे, त्या अन्यायाबद्दल हे पाडूरंगे माझी माय मला क्षमा करावी. देवा मी आतापर्यंत तुझी जी स्तुती किंवा निंदा केली ती तू सहन कर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आतापर्यंत तुम्ही माझा जसा लाड केला तसेच माझे कोडकौतुकही पूर्ण करा. ”
12:09
अभंग क्र. ३५७६ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोप नाही डोळा ॥१॥
वाट पाहे आस धरूनिया जीवी । निढळा हे ठेवी वरी बाहे ॥धृपद॥
बोटावरी माप लेखितो दिवस । होतो कासावीस धीर नाही ॥२॥
काय नेणो संता पडिला विसर । की नव्हे सादर मायबाप ॥३॥
तुका म्हणे तेथे होईल दाटणी । कोण माझे आणी मना तेथे ॥४॥
अर्थ
माझ्या माहेरावरुन मला काय निरोप येतो या विचारानेच माझ्या डोळयाला झोप नाही. पंढरपूरहून माझ्या माहेराहून काही निरोप येतो की काय याची वाट मी पाहात आहे व माझ्या जीवाला तीच आशा लागली आहे व पंढरीवरुन काही निरोप येतो की काय याची मी वाट माझ्या कपाळावर हात ठेवून पाहात आहे. मी सारखे बोटावर दिवस मोजत आहे माझा अगदी जीव कासावीस होतो आहे आणि धीर तर धरवतच नाही. मी संतांजवळ पत्र दिले होते ते पत्र संत माझ्या मायबापाला दयायला विसरले की काय किंवा माझे मायबाप ते पत्र घेण्यास सादर नव्हते की काय हे मला काही कळेनासे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या मायबापाजवळ भक्तांची खूप गर्दी झाली असेल त्यामुळे त्या गर्दीमध्ये माझे कोण मनावर घेणार आहे ? ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading