२२ ऑक्टोबर, दिवस २९५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५२९ ते ३५४०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२२ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 22 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २२ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५२९ ते ३५४० चे पारायण आपण करणार आहोत.
२२ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १५१ ते १७५ ,

151-18
नाव थडी न पवता । न खांडिजे केळी न फळता । का ठेविले न दिसता । दीपु जैसा ॥151॥
किंवा नाव नदीचे काठास पोहोचल्या खेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाही; किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्या शिवाय दिवा मालविता येत नाही. ॥151॥
152-18
तैसी आत्मज्ञानविखी । जव निश्चिती नाही निकी । तव नोहावे यागादिकी । उदासीन ॥152॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना विषयी दृढ निश्चय झाला नाही, तोपर्यंत यागादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. ॥152॥
153-18
तरी स्वाधिकारानुरुपे । तिये यज्ञदाने तपे । अनुष्ठावीचि साक्षेपे । अधिकेवर ॥153॥
तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान व तप याचे यथाविधी वरचेवर आचरण केलेच पाहिजे. ॥153॥
154-18
जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागी ॥154॥
जो चालण्याची त्वरा करतो, त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडे, तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. ॥154॥
155-18
अधिके जव जव औषधी । सेवनेची मांडी बांधी । तव तव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥155॥
एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो जो अधिकाधिक तयार होतो, तो तो तो रोगापासून मुक्त होत जातो ॥155॥


156-18
तैसी कर्मे हातोपाती । जै कीजती यथानिगुती । तै रजतमे झडती । झाडा देऊनी ॥156॥
त्याप्रमाणे जो जो कर्मे विधिपूर्वक लवकर लवकर करावी, तो तो रज व तम हे गुण समूळ नाहीतसे होतात; ॥156॥
157-18
का पाठोवाटी पुटे । भांगारा खारु देणे घटे । तै कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥157॥
अथवा सोन्यास एकामागून एक जेव्हा खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकसपणा जाऊन ते शुद्ध होते. ॥157॥
158-18
तैसे निष्ठा केले कर्म । ते झाडी करूनि रजतम । सत्वशुद्धीचे धाम । डोळा दावी ॥158॥
तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता; ते रज व तम याचा नाश करून सत्तशुद्धीचे दर्शन करून देते. ॥158॥
159-18
म्हणौनिया धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया । तीर्थांचिया सावाया । आली कर्मे ॥159॥
म्हणून अर्जुना, सत्तशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. ॥159॥
160-18
तीर्थे बाह्यमळु क्षाळे । कर्मे अभ्यंतर उजळे । एवं तीर्थे जाण निर्मळे । सत्कर्मेचि ॥160॥
तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्मांच्या योगे अंतर्मल नाहीसा होता. एवंच सत्कर्मे हीच चीत्तशुद्धीस तीर्थे होत ॥160॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


161-18
तृषार्ता मरुदेशी । झळे अमृते वोळली जैसी । की अंधालागी डोळ्यासी । सूर्यु आला ॥161॥
तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा, पाण्याचा झरा सापडावा किंवा आंधळ्यांच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे, ॥161॥
162-18
बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूने दिधली । आयुष्यवृद्धी ॥162॥
बुडणाऱ्यास तारण्याकरिता नदीनेच धावावे, पडणाराला जसे पृथ्विनेच झेलावे अथवा मारणारास मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्यावी, ॥162॥
163-18
तैसे कर्मे कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरता । राखिला विषे ॥163॥
त्याप्रमाणे कर्मापासून मुमुक्षुस होणारी पिडा कर्मानीच दूर करावी; अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युत्क्ती माहित आहे, तो वैद्द ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाचे रक्षणकरतो, ॥163॥
164-18
तैसी एके हातवटिया । कर्मे कीजती धनंजया । बंधकेचि सोडवावया । मुख्ये होती ॥164॥
त्याप्रमाणे धनंजया, युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असून ही मुक्त करण्यास कारणीभूत होतात ॥164॥
165-18
आता तेचि हातवटी । तुज सांगो गोमटी । जया कर्माते किरीटी । कर्मचि रुसे ॥1॥165॥
तर अर्जुना, जिच्यायोगे कर्मापासूनच कर्माचा नाश होतो, ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो ॥165॥
एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥18. 6॥


166-18
तरी महायागप्रमुखे । कर्मे निफजताही अचुके । कर्तेपणाचे न ठाके । फुंजणे आंगी ॥166॥
तर पंचमहायज्ञादि प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तुत्वचा अभिमान बाळगीत नाही, ॥166॥
167-18
जो मोले तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे । ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवी ॥167॥
जो मोलाने (दुसऱ्याजवळून पैसे घेऊन )तीर्थयात्रा करतो, त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही; ॥167॥
168-18
का मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥168॥
किंव्हा राजशिक्कयाच्या बळावर जो एकटा राजासही पकडून आणतो त्याला मी या राजस जिंकले, असा गर्व होत नाही; ॥168॥
169-18
जो कासे लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणे ॥169॥
जो दुसऱ्यास कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो, त्याला मी पोहणारा आहे, असा गर्व होत नाही; किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यास राजाकरिता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, ॥169॥
170-18
तैसे कर्तृत्व अहंकारे । नेघोनि यथा अवसरे । कृत्यजातांचे मोहरे । सारीजती ॥170॥
त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगिता ज्या ज्या वेळी जी जी कर्मे करावयाची ती ती यथाविधी जी करितो; ॥170॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


171-18
केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हो नेदावा । मनोरथु ॥171॥
हे पांडवा, केलेल्या कर्माची जी फळ प्राप्ती व्हावयाची तिच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होवू देत नाही. ॥171॥
172-18
आधीचि फळी आस तुटिया । कर्मे आरंभावी धनंजया । परावे बाळ धाया । पाहिजे जैसे ॥172॥
हे धनंजया, प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा; ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून त्याच्या ठिकाणी प्रीती नित्यनैमित्तिक ठेवता नुसता संतोष मानवा. ॥172॥
173-18
पिंपरुवाचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्मे ॥173॥
पिंपराच्या आशेने जसा कोणी पिंपळास पाणी घालत नाही तशी फळाची आशा सोडून कर्मे करावे. ॥173॥
174-18
सांडूनि दुधाची टकळी । गोवारी गावधेनु वेटाळी । किंबहुना कर्मफळी । तैसे कीजे ॥174॥
गुराखी दुधाची आशा सोडून जसा गावातील गाई वळतो, तसे कर्मफलाविषयी निरिच्छ असावे. ॥174॥
175-18
ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपणा आपुलिया गाठी । लाहेची तो ॥175॥
या युक्तीने जो कर्मांचे आचरण करितो, त्याला आपल्याजवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. ॥175॥

दिवस २९५ वा. २२, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५२९ ते ३५४०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३५२९
अनन्यासी ठाव एक सर्वकाजे । एकाविण दुजे नेणे चित्त ॥१॥
न पुरता आळी देशधडी व्हावे । हे काय बरवे दिसतसे ॥धृपद॥
लेकराचा भार माउलीचे शिरी । निढळ ते दुरी धरिलिया ॥२॥
तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढयासाठी ॥३॥
अर्थ
देवाशी अनन्य असलेले भक्ताचे चित्त एका देवाच्याच ठिकाणी असते एका देवावाचून दुसरे कोणाशीही अनन्य असणे हे भक्ताचे चित्त जाणत नाही. देवाशी अनन्य असलेल्या भक्ताचे हट्ट देवाकडून पूर्ण न होता त्या भक्ताला देशोधडीला जावे लागले तर हे देवाला बरे दिसते काय ? लेकराचा सर्व भार माऊलीच्या माथ्यावर असतो परंतू त्या माऊलीनेच त्या लेकराला जर दूर लोटले तर ते लेकरु कमनशिबीच समजावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही सर्वसमर्थ आहात तरी देखील माझे एवढेसे हट्ट पूर्ण करण्यासाठी एवढयाशा गोष्टीसाठी तुम्ही किती लांबणी घातली आहे. ”
11:59 am –
अभंग क्र. ३५३०
स्तुती तरि करू काय कोणापासी । कीर्ती तरि कैसी वाखाणावी ॥१॥
खोटया तव नाही अनुवादाचे काम । उरला भ्रम वरी बरा ॥धृपद॥
म्हणवावे त्याची खुण नाही हाती । अवकळा फजिती सावकाश ॥२॥
तुका म्हणे हेंगे तुमचे माझे तोंड । होऊनिया लंड आळवितो ॥३॥
अर्थ
देवा तुझी स्तुती तरी काय व कोणापाशी करु आणि तुझ्या किर्तीचे वर्णन तरी कसे करु ? देवा अहो मला तुमचे खरे स्वरुपच समजले नाही तर मग लोकांजवळ तुमच्या स्वरुपाचे वर्णन करु तरी कशासाठी उगाच खोटे वर्णन करुन काय उपयोग आहे त्यापेक्षा लोकांमध्ये तुमच्या स्वरुपाचे भ्रम राहीले तरी ते बरे परंतू खोटे वर्णन मी करणार नाही. देवा आम्ही तुमची किर्ती करावी परंतू त्याचा अनुभवच आमच्या हाती नाही त्यामुळे आमची अवकळा होते व लोक आमची अगदी सावकाशपणे फजिती करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा असे असले तरी देखील मी निर्लज्ज होऊन तुमचे वर्णन माझ्या मुखाने करीत आहे. ”
12:00
अभंग क्र. ३५३१
काहीच न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसा ॥१॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढे ॥धृपद॥
बोलिले वचन हारपले नभी । उतरलो तो उभी आहो तैसी ॥२॥
तुका म्हणे काही न करावेसे झाले । थकितचि ठेले वित्त उगे ॥३॥
अर्थ
देवा मी तुम्हाला किती आळवण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याचा काहीच उपयोग झाला नाही यावरुन तुमचे ह्दय फार कठीण आहे असेच मला वाटत आहे. देवा माझ्या आता सर्व शक्ती खर्च झाल्या आहेत तुमच्यापुढे कोणत्याही माझ्या युक्त्या चालेनास्या झाल्या आहेत. देवा आम्ही तुझ्यापुढे किती दिवसापासून तिष्ठत उभे आहोत परंतू त्याचा काहीच उपयोग झाला नाही आम्ही जे काही शब्द बोललो ते सर्व आकाशात मिसळून गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचा असा स्वभाव पाहून माझे मन अगदी स्तब्ध झाले आहे यापुढे कोणतेही उपाय करु नये असेच मला वाटत आहे.
12:00
अभंग क्र. ३५३२
रूपी गोवियेले चित्त । पायी राहिले निश्चिंत ॥१॥
तुह्मी देवा अवघेचि गोमटे । मुख देखता दुःख न भेटे ॥धृपद॥
जाली इंद्रिया विश्रांति । भ्रमता पीडत ते होती ॥२॥
तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गाठी ॥३॥
अर्थ
देवाच्या रुपाच्या ठिकाणी माझे मन गोवले गेले आहे आणि पायाच्या ठिकाणी निश्चिंत झाले आहे. देवा तुम्ही सर्वांगाने गोड आहात तुमचे मुख जरी पाहिले तरी दु:खाची भेट होत नाही. देवा माझ्या इंद्रियांना विविध प्रकारच्या विकारांनी व विषयाने त्रास होत होता परंतू आता तुमच्या रुपाच्या ठिकाणी व पायाच्या ठिकाणी माझे चित्त स्थिर झाले त्यामुळे माझ्या इंद्रियांना विश्रांती मिळाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या भेटीने भवबंधाची गाठच सुटली.
12:00
अभंग क्र. ३५३३ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला । जनाचिया बोलासाठी चित्त क्षोभविले ॥१॥
भोगविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलो ॥धृपद॥
अवघे घालूनिया कोडे तहानभुकेचे साकडे । योगक्षेम पुढे तुज करणे लागेल ॥२॥
उदकी राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले ॥३॥
अर्थ
देवा मी तुझ्यावर फार मोठा अन्याय केला मी तुझा अंत पाहिला आहे. लोक मला म्हणू लागले की याने अभंगरचना केलेल्या वह्याही पाण्यात बुडविल्या म्हणजे परमार्थही बुडविला आणि संसारही बुडविला त्यामुळे माझे चित्त क्षोभवले झाले व मी तुला बोलून त्रास दिला. देवा पाण्यातून वह्या काढून देण्यासाठी मी तुला प्रार्थना केली तेरा दिवस मी डोळे झाकून उपोषण केले मी खरेतर अधम आहे हीन जातीचा आहे तुला मी त्रास दिला आहे. देवा मी अभंगरचना केलेल्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या तुला त्या वह्या कोरडे काढून देण्याचे कोडे घातले एवढेच नाही तर माझ्या तहानभूकेचे देखील साकडे घातले. याच कारणामुळे तुला माझा योगक्षेमाचा भार चालवणे भाग पडले व माझे पुढचे सर्व योगक्षेमाचे भार तू चालवले. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी पाण्यामध्ये बुडवलेल्या अभंगरचनेच्या वह्या तू जशाच्या तशा कोरड्या ठेवल्यास आणि जनवाद चुकविलास आणि तू तुझे ब्रीद खरे केलेस. ”
12:00
अभंग क्र. ३५३४ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
तू कृपाळू माउली आम्हा दीनांची साउली । न सवंरित आली बाळवेशे जवळी ॥१॥
माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण । निवविले मन आळिंगन देऊनी ॥धृपद॥
कृपा केली जना हाती पायी ठाव दिला संती । कळो नये चित्ती दुःख कैसे आहे ते ॥२॥
तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करी वो माझे आई । आता पुढे काई तुज घालू साकडे ॥३॥
अर्थ
हे देवा तू आमची कृपाळू माऊली आहेस आम्हावर कृपेची छाया करणारी सावली आहेस. त्यामुळे तू बाळवेशेच्या रुपाने आमच्याजवळ आलीस. गोजिरे सगुण रुप दाखवून त्या विठू माऊलीने माझे समाधान केले. आणि मला आलिंगन देऊन माझे मन शांत केले. माझ्यावर लोकांच्या माध्यमातून कृपा केलीस आणि संतांच्या पायाच्या ठिकाणी मला आश्रय दिलास. माझ्या चित्ताला दु:ख कसे आहे ते देखील कळू दिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे आई मी अन्यायी आहे त्यामुळे माझ्याकडून चुकत असेल तर मला क्षम कर. आता मी तुझ्यावर यापुढे कशासाठी संकटे घालू ? ”
12:00
अभंग क्र. ३५३५ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
कापो कोणी माझी मान सुखे पीडोत दुर्जन । तुज होय सीण ते मी न करी सर्वथा ॥१॥
चुकी झाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभे करोनिया जळा माजी वह्या राखविल्या ॥धृपद॥
नाही केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥
गेले होऊनिया मागे नये बोलो ते वाउगे । पुढिलिया प्रसंगे तुका म्हणे जाणावे ॥३॥
अर्थ
माझे कोणी मान कापू नाहीतर यापुढे मला कोणीही दुर्जन लोकांनी कितीही पीडा देवू, परंतू देवा तुला कोणता त्रास होईन असे मी कधीही वागणार नाही. देवा माझ्या चांडाळाकडून एकवेळ चूक झाली आहे. ती चूक म्हणजे मी तुला पाण्यात उभे केले आणि माझ्या पाण्यात बुडवलेल्या वह्यांचे रक्षण तुला करायला लावले व तु माझ्या सर्व वह्या राखल्या. देवा तुला मी असे काम सांगितले व हे काम सांगताना देखील मी थोडा विचार केला नाही आणि खरे पाहिले गेले तर माझा अधिकार तो काय आहे की मी तुला काम सांगावे ? मला हे देखील कळाले नाही की सर्वसमर्थ असा हरी त्याच्यावर आपण भार तरी कसा घालावा ? तुकाराम महाराज म्हणतात, “मागे जे होऊन गेले ते गेले आता त्याविषयी बोलणे हे व्यर्थ आहे. आता यापुढे असा प्रसंग येऊ नये याविषयीच काळजी घ्यावी. ”
12:00
अभंग क्र. ३५३६ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
काय जाणे मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥
उताविळ झालो आधी मतिमंद हीनबुद्धि । परि तू कृपानिधी नाही केला अव्हेर ॥धृपद॥
तू देवाचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हा दासा कीव का भाकणे लागली ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा मी तो पतितचि खरा । अन्याय दुसरा दारी धरणे बैसलो ॥३॥
अर्थ
पाडूरंगा तुझे सामर्थ्य मी काय जाणणार आहे ? मी जर प्रसंगी धीर धरला तर तू एक काय करु शकत नाहीस ? परंतू देवा मी फार उतावीळ आहे खरेतर मी मतिमंद आहे अगदी बुध्दीहीन आहे. परंतू हे पाडूरंगा तू कृपानिधी आहेस मी कसाही वागलो तरी तू माझा अव्हेर कधीच केला नाहीस. पाडूरंगा तू देवाचाही देव आहेस ब्रम्हांडाचा जीव आहेस त्यामुळे आम्हा दासांना कीव भाकण्याची गरजच काय उरली कारण तू आमच्या अंत:करणातील सर्व मनोरथ न मागताच पूर्ण करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा खरोखर मी तर पतितच आहे. पाण्यात बुडविलेल्या माझ्या वह्या तारण्यासाठी मी तुझ्या दारात धरणे धरुन बसलो हा माझा दुसरा अन्याय आहे. ”
12:01
अभंग क्र. ३५३७ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्या केला हरी एवढा तुम्हा आकांत ॥१॥
वांटलासी दोही ठायी मजपाशी आणि डोही । लागो दिला नाही येथे तेथे आघात ॥धृपद॥
जीव घेती मायबापे थोड्या अन्यायाच्या कोपे । हे तो नव्हे सोपे साहो त्वांचि जाणीतले ॥२॥
तुका म्हणे कृपावंता तुज ऐसा नाही दाता । काय वाणू आता वाणी माझी कुंटली ॥३॥
अर्थ
देवा माझ्या मानेवर कोणी सुरीही धरली नव्हती किंवा कोणी माझ्या पाठीवर घावही घातले नव्हते. परंतू तरी देखील हे हरी मी तुमच्यापुढे एवढा मोठा आकांत केला. देवा तुला माझ्याजवळ आणि डोहात टाकलेल्या माझ्या वह्या तारण्याकरता डोहामध्ये दोन्हीही ठिकाणी राहावे लागले. देवा तू मला आणि पाण्यात बुडालेल्या वह्यांना दोघानाही आघात होऊ दिला नाही. अहो काही मायबाप असे आहेत की जे मुलांकडून थोडा जरी अपराध झाला तरी त्यांचा जीव घेतात. पण देवा अपराध सहन करणे हे सोपे नाही पण सहन कसे करावे याबाबतीत तू चांगल्या प्रकारे जाणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे कृपावंता हरी तुझ्यासारखा दाता त्रिभुवनामध्ये कोणीही नाही. देवा आता तुझे वर्णन मी कसे करु तुझे वर्णन करताना माझी वाचा खुंटली आहे. ”
12:01
अभंग क्र. ३५३८ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
तू माउलीहून मायाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥
देऊ काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलो ॥धृपद॥
तुवा केले रे अमृता गोड त्या ही तू परता । पाचां त्तवाचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥
काही न बोलोनि आता उगाच चरणी ठेवितो माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करी अपराध ॥३॥
अर्थ
देवा तू माऊलीपेक्षाही मायाळू, चंद्रापेक्षाही शीतळ, देवा तू पाण्यापेक्षाही पातळ आहेस आणि प्रेमाचा तर कल्लोळच आहेस. हे पुरुषोत्तमा दुसरी तुला कोणती उपमा दयावी ? देवा तुझ्या नामावरुन तर मी आपला जीव ओवाळून टाकला आहे. देवा तू अमृताची निर्मिती केलीस परंतू त्यापेक्षाही तू अधिक गोड आहेस. देवा तू पाच तत्वाचा जनिता म्हणजे निर्माता आहेस त्यामुळे सर्वत्र तुझीच सत्ता आहे व सकळांचा तूच नायक आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा मी आता काहीही बोलत नाही काहीही न बोलता उगीचच तुझ्या चरणी माथा ठेवतो. तरी हे देवा मी आतापर्यंत जे काही अपराध केले ते सर्व क्षमा करा ही एवढी विनंती तुम्हाला मी करत आहे. ”
12:01
अभंग क्र. ३५३९ (कोरड्याकविताउदकातुनकाढणेत्याबद्दलदेवाचीक्षमायाचना)
मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगो काई । आता मज पायी ठाव देई विठ्ठले ॥१॥
पुरे पुरे हा संसार कर्म बळिवंत दुस्तर । राहो नेदी स्थिर एके ठायी निश्चळ ॥धृपद॥
अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग । धरू जाता संग तव तो होतो बाधक ॥२॥
तुका म्हणे आता अवघी तोडी माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करी हृदयी ॥३॥
अर्थ
देवा मी किती अवगुणी आहे अन्यायी आहे हे तुला किती म्हणून सांगू ? हे विठ्ठले मला तुम्ही तुमच्या पायाजवळ आश्रय दयावा. देवा आता हा संसार पुरे अगदी पुरे झाला आहे माझे कर्म फार बलवंत असून फार कठीण आहेत. माझे कर्म मला एका ठिकाणी निश्चिंत स्थिर राहू देत नाहीत ते मला अनेक जन्ममरण सोसायला लावतात. बुध्दीचे अनेक तरंग आहेत ते क्षणाक्षणाला रंग बदलत असतात. परंतू बुध्दीमध्ये उठणारे अनेक तरंगाची संगती जर करण्यास गेलो तर ते आपल्यास बाधक ठरते ते आपल्याला दु:ख देते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा आता तुम्ही माझी सर्व चिंता तोडून टाका. आणि माझ्या ह्दयामध्ये येऊन तुम्ही वास करा. ”
12:01
अभंग क्र. ३५४० (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
कोणा मुखे ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥
मग मी न धरी आस मागील बोभाट । वेगी धरिन वाट माहेराची ॥धृपद॥
निलाजिरे चित्त करि तळमळ । केधवा देखती मूळ आले डोळे ॥२॥
तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥३॥
अर्थ
देवा मी कोणाच्या मुखातून ही गोष्ट ऐकेल की “चल तुला पंढरीनाथ बोलवित आहे”. बघ मी माझ्या मागे असलेल्या संसाराविषयी कोणतीही इच्छा धरणार नाही त्वरेने माझ्या माहेरची म्हणजे पंढरीची वाट धरीन. माझे चित्त निलाजरे झाले आहे आणि ते तळमळत आहे ते केवळ यासाठी माझ्या माहेराहून मूळ आलेले डोळयाने पाहण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझ्या डोळयाने पंढरी पाहीन असे माझे भाग्याचे उजरी म्हणजे उदय केव्हा होईल ? ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading