आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१४ ऑक्टोबर, दिवस २८७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३७६ ते ४०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४३३ ते ३४४४
“१४ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 14 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १४ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४३३ ते ३४४४ चे पारायण आपण करणार आहोत.
१४ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३७६ ते ४००,
376-17
आणि दुजे जव जव घडे । तव तव संसारभय जोडे । हे देवो आपुलेनि तोंडे । बोलती वेद ॥376॥
आणि जोपर्यंत द्वैत नांदत असेल तोपर्यंत संसारदुःख होणारच, हे देवानी मुख्यतः सांगितले व वेदवचनही तसेच आहे. 76
377-17
म्हणौनि परत्वे ब्रह्म असे । ते आत्मत्वे परीयवसे । सच्छब्द या रिणादोषे । ठेविला देवे ॥377॥
म्हणून कर्मकर्त्याहून भिन्नत्वाने असणारे जे ब्रह्म त्याचे पर्यवसान कर्तृस्वरूपात व्हावे (कर्त्याला स्वयंब्रह्मत्व यावे) ह्या उद्देशाने अंती ” सत् ” म्हणजे त्रिकालाबाध्यत्व म्हणजेच नित्यत्व व एकत्व दर्शविणाऱ्या शब्दाची योजना देवांनी केली आहे. 77
378-17
तरी ओंकार तत्कारी । कर्म केले जे ब्रह्मशरीरी । जे प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिले ॥378॥
तरी ” ॐ तत ” ह्या दोन शब्दांनी आरंभिलेले व ब्रह्मरूप झालेले जे कर्म तेच प्रशस्त (स्तुत्य) होय असे वाखाणिले आहे. 78
379-17
प्रशस्तकर्मी तिये । सच्छब्दा विनियोगु आहे । तोचि आइका होये । तैसा सांगो ॥379॥
असे जे प्रशस्त कर्म त्याचे ठिकाण “ सत्” ” शब्दाचा कसा विनियोग करावा तो ऐकण्यासारखा आहे, तोच आता सांगतो. 79
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥17. 26॥
380-17
तरी सच्छब्दे येणे । आटूनि असताचे नाणे । दाविजे अव्यंगवाणे । सत्तेचे रूप ॥380॥
तरी ह्या अखेरच्या “ सत शब्दाने जगदादि सर्व असत् पसारा आटून म्हणजे बाध करून (तात्विक दृष्या त्रैकालिक अत्यंताभाव) अव्यंग म्हणजे शुद्ध, चोख, निर्भेळ सत्स्वरूप दर्शविले. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-17
जे सत् तेचि काळे देशे । होऊ नेणेचि अनारिसे । आपणपा आपण असे । अखंडित ॥381॥
जी सद्वस्तु ती देशाचे व कलाने बाधित न होता अखंड आपली आपण जशीच्या तशी असते. 81
382-17
हे दिसते जेतुले आहे । ते असतपणे जे नोहे । देखता रूपी सोये । लाभे जयाची ॥382॥
हे जेवढे म्हणून दृश्य आहे ते सर्वे असत् आहे म्हणून त्यासारखी जी सद्वस्तु नाही तर ज्या सद्रूपाचे दर्शन अथवा अपरोक्षत्व म्हणजे आत्मदर्शनच होय. 82
383-17
तेणेसी प्रशस्त ते कर्म । जे जाले सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधे ॥383॥
त्या सत् शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप होणारे जे प्रशस्त कर्म ते करूनही ऐक्यबोधदृष्टीने त्याजबद्दल समत्व म्हणजे ब्रह्मदृष्टि असावी. 83
384-17
तरी ओंकार तत्कारे । जे कर्म दाविले ब्रह्माकारे । ते गिळूनि होईजे एकसरे । सन्मात्रचि ॥384॥
म्हणजे, ॐ कार व तत् ह्या शब्दोच्चाराने ब्रह्मरूप होते असे सांगितलेले जे कर्म, त्याजविषयींही सन्मात्र ब्रह्मत्वदृष्टीच्या उदयाने कर्मत्वदृष्टि हारपून जावी (त्रिपुटी संभवत नाही अशी दृष्टि उगवावी) 84
385-17
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणे हो ॥385॥
अखेरच्या सत् शब्दाचा अंतस्थ हेतु असा आहे, असे भगवान् श्रीरंगच म्हणतात; मी सांगतो असे समजू नका हो. 85
386-17
ना मीचि जरी हो म्हणे । तरी श्रीरंगी दुजे हेचि उणे । म्हणौनि हे बोलणे । देवाचेचि ॥386॥
कारण, “ देव म्हणतात व मीही तसेच म्हणतो ” असे म्हणणे म्हणजे श्रीरंग आणि मी असे द्वैत उत्पन्न करणे होय, म्हणून हे सर्व भाषण देवांचेच होय. (यात मी आलोंच) 86
387-17
आता आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारी । सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥387॥
आता आणखी एक प्रकाराने, हा सत् शब्द सात्विक कर्मात कसा कामाला येतो तेही ऐक. 87
388-17
तरी सत्कर्मे चांगे । चालिली अधिकारबगे । परी एकाधे का आंगे । हिणावती जै ॥388॥
तरी सत्कर्मे यथाविधि व यथाधिकार उत्तम रीतीने चालू असता कदाचित् एखाद्या गोष्टीचे त्यात वैगुण्य उत्पन्न झाले, 88
389-17
तै उणे एके अवयवे । शरीर ठाके आघवे । का अंगहीन भांडावे । रथाची गती ॥389॥
एखाद्या अवयवाच्या व्यंगतेमुळे जसे सर्वं शरीर पंगु होते किंवा रथाच्या एखाद्या अंगाच्या उणीवेने जसा त्याच्या गतीला प्रतिबंध होतो. 89
390-17
तैसे एकेचि गुणेंवीण । सतचि परी असतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥390॥
तसे, सत्कर्मच खरे; पण एखाद्या गुणाने विकल झाले तरी त्याला जेव्हा असतत्व येऊ पहाते. 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-17
तेव्हा ओंकार तत्कारी । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥391॥
तेव्हा “कार व तत् कार” ह्यांच्यासहवर्तमान उच्चारलेला सत् हा शब्द कर्माला आलेल्या वैगुण्याचा उद्धार करितो. 91
392-17
ते असतपण फेडी । आणी सद्भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥392॥
आणि सत् शब्द हा आपल्या ठिकाणच्या सामर्थ्याने कर्माच्या ठिकाणी आलेले ते असंतपण फेडून त्याला सद्भावाला आणितो. 92
393-17
दिव्यौषध जैसे रोगिया । का सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥393॥
एखाद्या रोग्याला दिव्यौषधाची जोड व्हावी किंवा पराभूताला सहाय मिळावे, त्याप्रमाणे व्यंग पावलेल्या कर्माला सत्कर्माचा अत्यंत उपयोग होतो. 93
394-17
अथवा काही प्रमादे । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥394॥
किंवा प्रमादाने कर्म मर्यादा चुकल्यामुळे त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली; 94
395-17
चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरे पडे । राहाटीमाजी न घडे । काइ काइ ? ॥395॥
नेहमी जाणाराही रस्ता चुकतो, किंवा परीक्षकालाही क्वचित् भ्रम होतो; अहो, ह्या व्यवहारांत कोणती गोष्ट होणार नाही असे निश्चयाने म्हणवेल ? 95
396-17
म्हणौनि तैसी कर्मा । राभस्ये सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवो पाहे जे ॥396॥
तशी अविचाराने (अवधान न राहून) जर कर्माच्या विधीचे उल्लंघन केले गेले आणि त्याची निषिद्धत्वांत गणना होण्याची पाळी आली; 96
397-18
तेथ गा हा सच्छब्दु । येरा दोहींपरीस प्रबुद्धु । प्रयोजिला करी साधु । कर्माते यया ॥397॥
अशावेळी दुसऱ्या ॐ व तत् ह्या शब्दांपेक्षां प्रबुद्ध (सावध) असलेला हा सच्छब्द त्याची योजना केल्याने त्या कर्माला साधुता येते. 97
398-18
लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । का मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥398॥
लोखंडाला परिसाची भेट व्हावी, ओहोळाला गंगेची भेट व्हावी किंवा मृतावर जसा अमृतवर्षाव व्हावा; 98
399-17
पै असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हे असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥399॥
त्याप्रमाणे, अर्जुना, विकल कर्माला ‘सत् ” ह्या शब्दप्रयोगाचा उपयोग होतो; हे असो; अरे, त्याच्या नामाची अशी प्रौढीच आहे. 99
400-17
घेऊनि येथिंचे वर्म । जै विचारिसी हे नाम । तै केवळ हेचि ब्रह्म । जाणसी तू ॥400॥
ह्यांचे वर्म जाणून त्या नामाचा विचार केला असता तुला तेच ब्रह्मरूप आहे असे कळून चुकेल 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २८७ वा. १४, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४३३ ते ३४४४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३४३३ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
हासो रुसो आता वाढवू आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखे करू विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकी ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आम्ही देवाशी आता हसू वेळप्रसंगी त्याच्यावर रुसू परंतू त्याच्याविषयी अंतरंगामधे अवीट गोडी व आवड वाढवू. ती चित्तरुपी स्त्री पुढे म्हणते की आम्ही नारायणाशी एकातात बसून गप्पा मारु त्याची सेवा करु विनोद करु व सुख भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही आमच्या देहाविषयी व संसाराविषयी उदासीन झालो आहोत त्या योगाने तर आम्ही आमच्या पतीला म्हणजे नारायणाला आमच्या आधीन केले आहे. ”
11:34 am –
अभंग क्र. ३४३४ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
मजसवे आता येऊ नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥१॥
न साहवे तुम्हा या जनाची कूट । बोलती वाईट ओखटे ते ॥२॥
तुका म्हणे झालो उदास मोकळ्या । विचरो गोवळ्यासवे आम्ही ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) संसारामध्ये रममाण असलेल्या बयांनो माझ्याबरोबर आता कोणीही येऊ नका. कारण मी परपुरुष असा जो हरी आहे त्याच्याकडे चालले आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तर संसारातील लोक तुम्हाला वाईट उखटे शब्द बोलतील जे तुम्हाला सहन होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही संसाराविषयी प्रपंचाविषयी उदास व मोकळया झालो आहोत त्यामुळे गोपाळाबरोबर आम्ही क्रीडा करत आहोत. ”
11:34 am –
अभंग क्र. ३४३५ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
शिकविले तुम्ही ते राहे तोवरी । मज आणि हरी वियोग तो ॥१॥
प्रसंगी या नाही देहाची भावना । तेथे या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्ती बैसला अनंत । दिसो नेदी नित्य अनित्य ते ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) हे जनहो जोपर्यंत माझा आणि हरीचा वियोग होता तोपर्यंत तुम्ही शिकवलेले माझ्या मनात राहात होते. एकदा की माझा देह हरीशी एकरुप झाला आणि तो प्रसंग ज्यावेळी येईल त्यावेळी तुमच्या शब्दाला कोण मान देईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “अनंत माझ्या चित्तामध्ये वसलेला आहे तो मला नित्य व अनित्य काहीही दिसू देत नाही. ”
11:34 am –
अभंग क्र. ३४३६ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
सांगतो ते तुम्ही अइकावे कानी । आमुचे नाचणी नाचूं नका ॥१॥
जोवरी या तुम्हा मागिलांची आस । तोवरी उदास होऊ नका ॥२॥
तुका म्हणे काय वायाविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाही ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) सासुरवासणी बयांनो मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही तुमच्या कानानी ऐका आम्ही हरीच्या छंदात नाचत आहोत तसे तुम्ही नाचू नका. जोपर्यंत तुम्हाला संसाराविषयी आस आहे अपेक्षा आहे तोपर्यंत तुम्ही देहावर उदास होऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही जर देहावर उदास झाले नाही आणि गोविंदाची भक्ती करु लागले तर तुमची फजिती होईल तुम्हाला धड तुमचा पतीही नाही आणि गोविंदही नाही अशी तुमची फजिती होईल. ”
11:34 am –
अभंग क्र. ३४३७ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
आजिवरी तुम्हा आम्हा नेणपणे । कौतुके खेळणे संग होता ॥१॥
आता अनावर झालो अगुणाची । करू नये तेचि करु सुखे ॥२॥
तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळे एक मनी नारायण ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) अहो सासुरवाशीणी बयांनो आजवर आपण अज्ञानामध्ये संसाराचा खेळ एकमेकांसोबत कौतुकाने खेळत होतो. आता आम्ही त्रिगुणरहित झालो आहोत त्यामुळे अनावर म्हणजे मुक्त झालो आहोत आणि जे कोणीही करु शकत नाही ते आम्ही सुखाने करु. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आता आई आणि वडिल या दोन्हीही कुळाला बुडविले आहे आणि एक नारायणच मनामध्ये दृढ धरला आहे. ”
11:35 am –
अभंग क्र. ३४३८ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
सासुरिया वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥१॥
सांडवर कोणी न धरिती हाती । प्रारब्धाची गति भोगू आता ॥२॥
न व्हावी ते झाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजो आता ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) संसाररुपी पती व संसाराच्या संबंधी असलेल्या सासरच्या लोकांना व देहरुपी माहेरच्या लोकांना दोघानाही माझा वीट आला आहे. आता सर्वानाच माझा वीट आला आहे व मलाही सर्वाचा वीट आला आहे त्यामुळे माझा कोणीही स्वीकार करणार नाही त्यामुळे प्रारब्धाची आता गती जशी असेल तशी भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, “नको होती तेवढी फजिती आतापर्यंत आमची झाली आहे त्यामुळे आता पुढे लाजू तरी कशासाठी ? ”
11:35 am –
अभंग क्र. ३४३९ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
मरणाही आधी राहिलो मरोनी । मग केले मनी होते तैसे ॥१॥
आता तुम्ही पाहा आमुचे नवल । नका वेचू बोल वायाविण ॥२॥
तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हा आम्हा ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आम्ही मरणाच्या आधी मरुन गेलो म्हणजे आम्ही आमचा देह अभिमान आणि देहाविषयीचा अहंकार नाहीसा केला आणि जसे आमच्या मनामध्ये होते तसेच आम्ही केले. त्यामुळे तुम्ही आता आमचे केवळ नवल पाहात राहा व्यर्थ वाणी खर्च करु नका. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो सासुरवाशीणी बयांनो तुम्ही संसारामुळे भयभीत झालेल्या नारी आहात आणि आम्ही तर अगदी नि:संग आहोत आम्हाला कोणाचेही भय नाही त्यामुळे तुमची व आमची बरोबरी होईल ती कशी ? ”
11:35 am –
अभंग क्र. ३४४० (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करी घ्यावे सीस ॥१॥
संवसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुते पाहू नये ॥२॥
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपा सोई ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) जर तुम्हाला परपुरुषाचे सुख भोगायचे असेल तर आपल्या तळहातावर आपले शीर कापून घ्यावे. संसाराला आपल्या हाताने आग लावावी व जळाल्यानंतर संसाराचे काय होते हे पाहाण्यासाठी देखील मागे पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, “पतंग जसा दिव्याकडे नीट झेप घेतो व आपला प्राणत्याग करतो त्याप्रमाणे आपण संसाराचा त्याग करण्यासाठी धीट व्हावे तरच आपल्याला श्रीहरीची प्राप्ती होईल. ”
11:35 am –
अभंग क्र. ३४४१ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
आइकाल परी ऐसे नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले ते ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) अहो बाई आम्ही नि:संग आहोत आम्ही जे काही बोलू ते तुम्ही ऐकाल परंतू तसे करु नका बरे का, यासाठी तुम्ही तुमचा संसाररुपी नवऱ्याला सोडू नका. तुम्ही आपल्या आपणच बंधनात गोवून घेतले आहे त्यामुळे तुम्हाला लौकिकापासून शांती मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “संसाराचा त्याग करण्याविषयी ज्या बयांनी मन कठीण केले आहे त्यांनीच निवडून माझ्याजवळ यावे. ”
11:35 am –
अभंग क्र. ३४४२ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
आहांच वाहांच आत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा तैशा ॥१॥
भेऊ नये तेथे भेडसावू कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे काही अभ्यासावाचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आमच्याबरोबर परमार्थ करणाऱ्या स्त्रीयांनी मनात एक आणि बाहेर एक असा व्यवहार करु नये तसे जर असेल तर आम्हाला अशा मैत्रिणी नको आहेत. आम्ही स्वत:च कुणाला भीत नाही तर मग आम्ही दुसऱ्याला भिती कशासाठी दाखवू परंतू तुम्ही तुमच्या मनाला आवरुन प्रतिबंध करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “विवेक आणि वैराग्य या दोन्हीचाही अभ्यास केल्याशिवाय इतर कोणतेही साधने करणे म्हणजे दांभिकपणाचे लक्षण आहे व त्याने श्रीहरी आपल्याला कधीही मिळणार नाही. ”
11:36 am –
अभंग क्र. ३४४३ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करिता वाया जाय काळ । लटिके ते मूळ फजितीचे ॥धृपद॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥२॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) येथे अनेक लोक आहेत अनेक लोकांचे अनेक मत आहेत कोणी कोणत्या भावनेने कोणते मत तयार केले आहेत ते त्यांनाच माहिती त्यामुळे आम्ही त्यांच्या मताशी मिळणार नाहीत. त्यांच्या मताचा जर विचार करण्यास गेलो तर व्यर्थ वेळ जाईल आणि फजिती होण्यास त्यांचे व्यर्थ मत हे मुख्य कारण ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात, “हे ज्ञानी बयांनो तुम्ही घट व पट याची नादी लागा परंतू व्यर्थ आमच्या वाटेला काही जाऊ नका. ”
11:36 am –
अभंग क्र. ३४४४ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
त्याचे सुख नाही आले अनुभवा । कठिण हे जिवा तोचिवरी ॥१॥
मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा । अंतर हे संगा नेदी पुढे ॥२॥
तुका म्हणे सर्वविशी हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) जोपर्यंत परपुरुष श्रीहरीचे सुख अनुभवायला येत नाही तोपर्यंत परमार्थ कठीण वाटतो. एकदा की त्याच्या सुखाचा अनुभव आला की मग तो श्रीहरी आपल्याला मागील कोणत्याही दु:खाचे स्मरण देखील होऊ देत नाही आणि अनुभव आल्याच्या पुढे देखील तो त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये अंतर पडू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हा श्रीहरी सर्वगुणसंपन्न आहे त्याचे महिमान वेद श्रृती देखील जाणतात. ”
11:36 am –
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















