१९ ऑक्टोबर, दिवस २९२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४९३ ते ३५०४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 19 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४९३ ते ३५०४ चे पारायण आपण करणार आहोत.
१९ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७६ ते १०० ,

76-18
तरी पंडुकुमरे तेणे । देवाचे सरते बोलणे । जाणोनि अंतःकरणे । काणी घेतली ॥76॥
सतराव्या अध्यायात देवांनी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली ॥76॥
77-18
येऱ्हवी तत्वविषयी भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । ते साहावेना ॥77॥
एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्व पूर्ण समजले होते परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटेना ॥77॥
78-18
वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥78॥
वासराचे पोट भरल्यावरहि गायीने त्याचेपासून दूर न व्हावे असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे ॥78॥
79-18
तेणे काजेवीणही बोलावे । ते देखीले तरी पाहावे । भोगिता चाड दुणावे । पढियंतयाठायी ॥79॥
आपल्या जो मनुष्य परम प्रिय असतो त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपल्याकडे पाहिल्यावरही आपल्याकडेच पाहत राहावे असे प्रीतीचे लक्षण आहे. ॥79॥
80-18
ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तव तेचि मूर्ती । म्हणौनि करू लाहे खंती । उगेपणाची ॥80॥
अशी प्रेमाची जात असून पार्थ तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे, म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले ॥80॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


81-18
आणि संवादाचेनि मिषे । जे अव्यवहारी वस्तु असे । ते भोगिजे की जैसे । आरिसा रूप ॥81॥
आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ‘ब्रह्म ” ते आरश्यात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते तसे भोगिता येते ॥81॥
82-18
मग संवादु तोही पारुखे । तरी भोगिता भोगणे थोके । हे का साहवेल सुखे । लांचावलेया ? ॥82॥
मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्ती बंद होते ही गोष्ट सुखप्राप्तीला (सवकलेल्या) सकवलेल्या अर्जुनाला कशी सहन होईल ॥82॥
83-18
यालागी त्याग संन्यास । पुसावयाचे घेऊनि मिस । मग उपलविले दुस । गीतेचे ते ॥83॥
म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे पुसण्याच्या निमित्ताने गीतारूपी वस्त्राची अर्जुनाने पुन: घडी उकलली. ॥83॥
84-18
अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जै वांसरुचि गाय दुहे । तै वेळु कायसा ॥84॥
तर हा अठरावा अध्याय नसून एकाध्यायी गीताच आहे. पहा कि जेंव्हा वासरुंच गाईस पान्हा आणते तेव्हा वेळअवेळ याचा गाईस विचार असतो काय.
85-18
तैसी संपता अवसरी । गीता आदरविली माघारी । स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ? ॥85॥
त्याप्रमाणे गीता संपण्याचे वेळी पुन्हा: गीतेच्या पूर्वपदावर अर्जुन आला तेंव्हा सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत ? ॥85॥


86-18
परी हे असो ऐसे । अर्जुने पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशे । अवधारिजो ॥86॥
परंतु ही गोष्ट राहु द्या; अर्जुनाने कृष्णाची विनंती करून म्हटले की भगवंतानी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे.
अर्जुन उवाच ।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥18. 1॥
87-18
हा जी संन्यासु आणि त्यागु । इया दोही एक अर्थी लागु । जैसा सांघातु आणि संघु । संघातेचि बोलिजे ॥87॥
हे प्रभो संन्यास आणि त्याग या दोहोंचा एकाच अर्थाशी संबंध आहे जसा ‘संघात ” आणि ‘संघ ” या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करितात ॥87॥
88-18
तैसेचि त्यागे आणि संन्यासे । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेनि तव मानसे । जाणिजे हेचि ॥88॥
तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो आमच्या मनाला तरी असे वाटते ॥88॥
89-18
ना काही आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु । तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पै ॥89॥
मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करून सांगावा “तेव्हा” श्री मुकुंद म्हणाले अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत ॥89॥
90-18
तरी अर्जुना तुझ्या मनी । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमले हे मानी । मीही साच ॥90॥
तथापि अर्जुना त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत असे जे तुझ्या मनाला वाटले, ते बरोबर आहे असे मी म्हणतो, ॥90॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-18
इही दोही कीर शब्दी । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदी । येतुलेचि ॥91॥
खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो, हे खरे आहे, पण त्यांच्या अर्थांमध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की, ॥91॥
92-18
जे निपटूनि कर्म सांडिजे । ते सांडणे संन्यासु म्हणिजे । आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥92॥
जे सर्वथैव कर्म सोडणे, त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि अर्जुना, कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल ह्यांचा त्याग करणे, त्याला त्यागा असे म्हणतात, ॥92॥
93-18
तरी कोणा कर्माचे फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेही सांगो विवळ । चित्त दे पा ॥93॥
तर कोणत्या कर्माचे फळ टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे, हेही स्पष्ट करून सांगतो, ते चित्त देऊन ऐक,
94-18
तरी आपैसी दांगे डोंगर । झाडे डाळती अपार । तैसे लांबे राजागर । नुठिती ते ॥94॥
ज्याप्रमाणे अरण्यात डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात, त्याप्रमाणे लांबीचे भात, व बागेतील झाडे, आपोआप उगवत नाहीत.
95-18
न पेरिता सैंघ तृणे । उठती तैसे साळीचे होणे । नाही गा राबाउणे । जियापरी ॥95॥
पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते तसेच शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पिक होत नाही ॥95॥


96-18
का अंग जाहले सहजे । परी लेणे उद्यमे कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवी ॥96॥
अथवा शरीर जरी सहज झालेले आहे, तरी दागिने उद्योग करूनच करावी लागतात, किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते, पण विहीर खणावी लागते ॥96॥
97-18
तैसे नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामिता कामिक । न निफजे जे ॥97॥
त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहे, परंतु काम्यकर्मे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही ॥97॥

श्रीभगवानुवाच ।
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥18. 2॥
98-18
का कामनेचेनि दळवाडे । जे उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ॥98॥
किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे यथासांग अश्वमेधादी याग ॥98॥
99-18
वापी कूप आराम । अग्रहारे हन महाग्राम । आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते ॥99॥
पुष्करणी, विहिरी, इत्यादी बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे, व एखादी ठिकाणी शहर बसविणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते ॥99॥
100-18
ऐसे इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जे केले भोगवी फळ । बांधोनिया ॥100॥
असे सर्व इष्टापुर्त कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे आणि त्याचे आचरण केले असता ते करणारास बद्ध करून फळ भोगण्यास लावते ॥100॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २९२ वा. १९, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४९३ ते ३५०४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३४९३ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
कब मरू पाऊ चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥
जग डरे ज्याकु सो मोहि मीठा । मीठा दर आनंदसाहि पैठा ॥धृपद॥
भला पाऊ जनम इन्हे बेर । बस मायाके असंग फेर ॥२॥
कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलि पसारा ॥३॥
अर्थ
कधी मी हा देह त्याग करीन आणि कधी मला ठाकूरजीचे चरण प्राप्त होतील असे मला वाटते आहे कारण ठाकूर माझ्या जीवनापेक्षाही मला प्रिय आहेत. सारे जग ज्या मरणाला भिते ते मरण मला अतिशय गोड वाटते आणि पुन्हा पवित्र असा हरीभक्तांच्या घरी जन्म घेऊन तेथे आनंदाने राहाणे मला गोड वाटते. एकदा की हरीभक्ताच्या घरी मी पुन्हा जन्माला आलो की मी सर्व मायेचे फेरे चुकवून असंग रुपाने राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी धन दार मान सन्मान सर्व पसारा गुंडाळला आहे. ”
11:50 am –
अभंग क्र. ३४९४ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
दासो पाछें दौरे राम । सोवे खडा आपे मुकाम ॥१॥
प्रेमरसडी बांधी गले । खैंच चले तब मोही उधर ॥धृपद॥
आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आगे बाट बतावे ॥२॥
तुका प्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥३॥
अर्थ
हरीदास जेथे जेथे जातील त्यांच्या मागे मागे राम पळतच असतो आणि ज्या ठिकाणी हरीदास मुक्काम करतील झोपतील तेथे त्यांच्या शेजारीच जवळच राम उभा राहातो. कारण राम भक्तांच्या प्रेमरुपी दोरीने बांधला गेलेला आहे त्या प्रेमरुपी दोरीला भक्त जिकडे खेचतील तिकडे तिकडे राम त्यांच्या मागे चालत जातो. हा देव आपल्या भक्तांना कधीही कोणत्याही भ्रमात भुलून देत नाही जर भक्त वाट चुकलेच तर त्यांच्या हाताला धरुन स्वत: त्यांच्यापुढे चालून त्यांना चांगली वाट दाखवतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे प्रभू दीन दयाळू गोपाळा मी तुझ्यावरुन सर्व काही ओवाळून टाकले आहे तुझ्यापुढे सर्वाचा त्याग केला आहे. ”
11:50 am –
अभंग क्र. ३४९५ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥
इतन गोते काहे खाता । जब तू आपणा भूल न होता ॥१॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥३॥
अर्थ
अरे मानवा तू असे काहीतरी करावे की ज्यामुळे राम तुझ्या घरी येतील आणि सर्व वासनेचा त्याग करुन संसाराचा धंदा बंद करावा. अरे तू जर तुझ्या मूळस्वरुपाला म्हणजे ब्रम्हस्थितीला विसरला नसतास तर तुला या संसारामध्ये एवढे गोते का खावे लागले असते ? मनात एक आणि वरती वागणूक एक असे जरी तू करत असला तरी देखील सर्व जाणणाऱ्या रामाला तुझ्या अंतरंगात काय आहे हे देखील माहित आहे तो सर्व काही जाणत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रभू सर्वत्र आहे सर्व देश विदेशात भरुन उरलेला आहे एकही जागा त्याच्यावाचून मोकळी नाही. ”
11:51 am –
अभंग क्र. ३४९६ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊ मेरे तनकी पैजार ॥धृपद॥
हासत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥
जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हिंदु धेड चंभार ॥२॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाम । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥
अर्थ
माझ्या रामाचे नाम जो वारंवार घेईन त्याच्या पायात मी माझ्या देहाच्या कातडयाचे पायताण करुन राहीन. हसताना, खेळताना, वाटेने चालताना, जेवण जेवताना, खाटेवर झोपताना जो वारंवार रामाचे नामस्मरण करतो तो मला खूप आवडतो. मला कोणत्याही जातीविषयी अजिबात प्रेम नाही कोण स्पृश्य हिंदू असो किंवा अस्पृश्य हिंदू असो नाहीतर कोणी चांभार असो मला त्याच्याशी काहीही कर्तव्य्‍ नाही जो रामाचे नाम प्रेमाने घेतो त्याच्याविषयी माझे प्रेम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याचे चित्त रामाच्या नामाशी एकरुप झाले आहे त्याच्या पायाशी माझे चित्त एकरुप झाले आहे. ”
11:51 am –
अभंग क्र. ३४९७ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
आप तरे त्याकी कोण बऱ्हाई । औरनकु भलो नाम धराई ॥धृपद॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥१॥
बरसते मेघ फलतही बिरखा । कोन काम अपनी उन्हो तिरखा ॥२॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥३॥
काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥४॥
कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥५॥
अर्थ
जो स्वत: तरतो त्याची काय बढाई करावी जो दुसऱ्याला तारतो त्याचेच नाम नेहमी घ्यावे. भूमीएवढा सर्व भार का सहन करत असेल आणि दुभती गाय आपले दुध स्वत: कधीही चाखत नाही पण दुसऱ्याला पिण्यास देते. मेघ सतत वर्षाव करत असतात वृक्ष नेहमी फळ देत असतात परंतू त्यांचे हे कर्तव्य ते करत असताना ते यामध्ये आपल्याला काय फायदा होईल याचा विचार देखील करत नाहीत. चंद्र आणि सूर्य नेहमी पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात ते थोडा वेळ देखील बसत नाहीत ते कशासाठी ? परीस धातू लोखंडाला सोने का बरे करीत असेल आणि लोखंडाला सोने केले तरी देखील तो स्वत: सोने होत नाही असे असले तरी देखील त्याचे मोल काही कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “याचा अर्थ असा की नेहमी दुसऱ्यावर उपकार करत राहावात रघुराज प्रभू राम देखील दुसऱ्यावर नेहमी उपकार करत आहेत. ”
11:51 am –
अभंग क्र. ३४९८ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोते खाय ॥धृपद॥
नहिं एकदो सब संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥
उपर स्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥२॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवर मारग रामहि एका ॥३॥
अर्थ
जग ज्या मार्गाने चालत आहे त्या मार्गाने कोण जाईल कारण ज्या मार्गाने जग जाईल त्या मार्गाने गेल्यास परिणाम वाईट होईल हे लोकांना समजत नाही त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे गोते खावे लागतात. या संसाराच्या मागे चालणारे एक दोन नाहीत तर सर्व जगच चालत आहे परंतू या मार्गाने चालले तर परिणाम वाईट होतील हे ज्यांना कळेल तेच खरे शूर आहेत. जे कोणी तृष्णेच्या पाठीवर बसून स्वार झाले आहेत ते कोणीही वाचणार नाहीत त्यांची लुटमार होणारच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ही सर्व घडामोडी मी पाहातो आहे आणि त्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली व त्यामुळे मी सर्व जगाकडे पाठ फिरवून बसलो आहे आणि ज्या मार्गाने रामाची प्राप्ती होईल तोच मार्ग मी निवडला आहे. ”
11:52 am –
अभंग क्र. ३४९९ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
भले रे भाई जिन्हे किया चीज । अछा नहिं मिलत बीज ॥१॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥धृपद॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥२॥
कहे तुका मैं ताका दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥३॥
अर्थ
ज्या मनुष्यांनी मनुष्य देहात येऊन त्याचे चीज केले ते खूप भले आहेत कारण चांगल्या बीजाचे मनुष्य लवकर भेटत नाहीत. अनेक जन्म फिरत फिरत शेवटी सारभूत असलेला मनुष्यदेह तू मिळवला आहेस आणि याच जन्मात तू धन दार याचा त्याग करु शकतोस. काही लोक सर्व धन दाराचा त्याग करुन तीर्थयात्रा करत फिरत असतात परंतू तरी देखील त्यांची भवरोगाची तळमळ काही तुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच मनुष्याचा दास आहे जो आपल्या माथ्यावर कोणत्याही प्रकारचा भार घेऊन चालत नाही व अशा मनुष्या जवळच मी नेहमी जात असतो. ”
11:52 am –
अभंग क्र. ३५०० (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
लाल कंबली वोढे पेनाये । मोसु हरीथे कैसे बनाये ॥१॥
कहे सखि तुम्हे करति सोर । हिरदा हरीका कठिन कठोर ॥धृपद॥
नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥२॥
और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥३॥
अर्थ
हे सखे तू मोठया आवडीने लाल शालू डोक्यावर घेऊन गेलीस खरी परंतू हरीने तुला नग्न कसे केले ते पाहा. हे सखी तू हरीशी स्वैराचार करतेस खरी परंतू हरीचे ह्दय अतिशय कठीण कठोर आहे. त्या हरीला कोणतेही कर्म करताना कोणत्याही प्रकारची लाज किंवा शरम नाही आणखीही मी त्याच्याविषयी खूप ऐकले आहे की त्याला खूप बायकाही आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि हे सखे मी तुला त्याच्याविषयी आणखीही काही गोष्टी सांगतो की ज्या मी ऐकल्या आहेत त्या गवळयाच्या पोराला कोणत्याही प्रकारचे नाम किंवा रुप नाही तो सर्व जगाचे पालनपोषण करतो असे म्हणतात पण तोच दुसऱ्याच्या घरी जाऊन दही दूध लोणी चोरुन खातो असे लोक म्हणतात. ”
11:52 am –
अभंग क्र. ३५०१ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
अभंग क्र. ३५०१ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
राम कहो जीवना फल सो ही । हरीभजनसुं विलंब न पाई ॥१॥
कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥धृपद॥
कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥
कहे तुका सब हि चेलक्तहार । एकारामविन नहिं वोसार ॥३॥
अर्थ
रामाचे नामस्मरण केल्याने जीवनात खरे फल प्राप्त होते त्यामुळे हरीभजन करण्यास विलंब न करता हरीभजन करत राहावे. कोणाचा वाडा आणि कोणाची झोपडी एका रामावाचून सर्व व्यर्थच आहे. कोणाचे शरीर आणि कोणाची माया एका रामावाचून सर्व जाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या जगामध्ये एक रामच सारभूत आहे त्याच्यावाचून सर्व काही नश्वर आहे. ”
11:53 am –
अभंग क्र. ३५०२ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
काहे भुला धनसंपत्तीघोरे । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥१॥
राजे लोक सब कहे तू आपना । जब काल नही पाया ठाना ॥धृपद॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥
राना रंग डोंगरकी राई । कहे तुका कर इलाहि ॥३॥
अर्थ
अरे तू धनसंपत्तीच्या महाघोर मोहाला का भुलला आहेस त्यापेक्षा रामनाम ऐक आणि तेच गात राहा. अरे तू राजाला व तुझ्यासंबधी असलेल्या सर्व लोकांना आपले म्हणतोस परंतू ज्यावेळी काळ तुझ्याजवळ येऊन थांबेल तुला घेण्यासाठी त्यावेळी तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही. अरे माया संसारीक सर्व धंदा हे मिथ्या आहे त्यामुळे तू अभिमानाचा त्याग कर आणि गोविंदाचे भजन कर. तुकाराम महाराज म्हणतात, “तो गोविंद राजाचा रंक डोंगराची राई एका क्षणात करु शकतो असा तो बलाढय आहे. ”
11:53 am –
अभंग क्र. ३५०३ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
कहे रोवे आगले मरना । गंव्हार तू भुला आपना ॥१॥
केते मालुम नहिं पडे । नव्हे बडे गये सो ॥धृपद॥
बाप भाई लेखा नहिं । पाछें तू हि चलनार ॥२॥
काले बाल सोपत भये । खबर पकडो तुका कहे ॥३॥
अर्थ
मेलेल्या मनुष्याकडे पाहून तू का रडतो आहेस अरे गव्हारा पुढे तूही मरणार आहेस हे विसरला आहेस की काय ? अरे आतापर्यंत कितीतरी लहानमोठे प्राणी गेले आहेत त्याचा विचार जर केला तर माहितही नाहीत ते किती आहेत. अरे आतापर्यंत बाप भाऊ हे गेले आहेत आणि त्यांच्या मागे तूही जाणारच आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे आतापर्यंत तुझ्यासोबत वाढलेले तुझे काळे केस देखील पाढरे झाले आहेत मग याच गोष्टीची तू खबर घे आणि हरीनाम घेत राहा. ”
11:53 am –
अभंग क्र. ३५०४ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥धृपद॥
तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥
कीर्त बधाऊ तो नाम न मेरा । काहे झुटा पछतऊ घेरा ॥२॥
कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोरत हि हात ॥३॥
अर्थ
रामासारखे सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही आणि कोणत्या गोष्टीत आहे ते तू मला सांग हे मी तुला तुझा म्हणून प्रश्न विचारीत आहे. अरे तू तुझ्या तारुण्याची बढाई किती दिवस करणार आहे किती वेळ त्याची बढाई सांगशील त्या तुझ्या शरीराला व्याधी पीडाच शीण करतील. आपली किर्ती वाढवावी एवढा माझा अधिकारही नाही आणि व्यर्थ किर्ती वाढवून जन्ममरणाच्या फेऱ्यात का पडून पश्चात्ताप करावा ? तुकाराम महाराज म्हणतात, “रामाचे नाम आवडीने घ्यावे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो तरी देखील ती तुम्हाला समजत कशी नाही अहो मी गोष्ट तुम्हाला शरण येऊन हात जोडून सांगतो आहे. ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading