५ ऑक्टोबर, दिवस २७८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३२५ ते ३३३६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“५ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 5 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ५ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३२५ ते ३३३६ चे पारायण आपण करणार आहोत.
५ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १५१ ते १७५,

151-17
तैसे एकमेका सळे । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखे ॥151॥
तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकेच वेळी उद्भवतात, असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो. 51
152-17
एवं राजसा आहारा । रूप केले धनुर्धरा । परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥152॥
याप्रमाणे राजस आहाराची लक्षणे सांगून त्यांचा परिणाम कसा होतो हेही सांगितलें. 52
153-17
आता तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेही सांगो चिळसा । झणे तुम्ही ॥153॥
आता त्या तामसाला कोणता आहार प्रिय असतो ते सांगतो की, जो ऐकून तुम्हास खंतीच वाटेल. 53
154-17
तरी कुहिले उष्टे खाता । न मनिजे तेणे अनहिता । जैसे का उपहिता । म्हैसी खाय ॥154॥
तरी सडलेले अगर उष्टे अन्न खातांना हे अहितकर आहे अशी मुळीच शंका न येता जशी म्हैस आंबलेले आंबण तसा जो आहार आहे. 54
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥17. 10॥
155-17
निपजले अन्न तैसे । दुपाहरी का येरे दिवसे । अतिकरे तै तामसे । घेईजे ते ॥155॥
त्याप्रमाणे सकाळचे अन्न दुपारी किंवा दुस-या दिवशी शिळे करून खाणे तामसाला फार आवडते. 55


156-17
नातरी अर्ध उकडिले । का निपट करपोनि गेले । तैसेही खाय चुकले । रसा जे येवो ॥156॥
किंवा अर्धे कच्चे अथवा करपून निःसत्व झालेले अन्नही तो खातो. 56
157-17
जया का आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । ते अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाही ॥157॥
जे पुरे शिजलेले आहे किंवा रसपूर्ण आहे ते अन्न खरे, ” ह्या तामसाला माहितही नसते. 57
158-17
ऐसेनि कही विपाये । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तव राहे । व्याघ्रु जैसा ॥158॥
एखादेवेळी अकस्मात् अशा अन्नाची व त्याची गाठ पडलीच तर वाघाप्रमाणे तो त्याला ( त्या अन्नाला) घाण सुटेपर्यंत शिळे होऊ देतो. 58
159-17
का बहुवे दिवशी वोलांडिले । स्वादपणे सांडिले । शुष्क अथवा सडले । गाभिणेही हो ॥159॥
किंवा फार दिवसांचे शिळे, रुचि गेलेली, शुष्क किंवा सडलेले किंवा आत जीव उत्पन्न झालेलें. 59
160-17
तेही बाळाचे हातवरी । चिवडिले जैसी राडी करी । का सवे बैसोनि नारी । गोतांबील करी ॥160॥
व तेही मुलांनी चिखल चिवडून राड करावी त्याप्रमाणे चिवडलेले व गोतांबील ( सर्व पदार्थाची एक रास) केलेले असे बायकांमुलांसह एकत्र खातो. 160
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


161-17
ऐसेनि कश्मळे जै खाय । तै तया सुखभोजन ऐसे होय । परी येणेही न धाय । पापिया तो ॥161॥
अशी घाण जेव्हा तो भक्षण करील तेव्हा आज सुखभोजन झाले असे त्यास वाटते; पण त्या पाप्याचे एवढयानेच समाधान होत नाही. 61
162-17
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥162॥
चमत्कार असा की, जो घाणेरडे अन्न सदोष व शास्त्रदृष्टीने निषिद्ध अथवा त्याज्य आहे. 62
163-17
तया अपेयांच्या पानी । अखाद्यांच्या भोजनी । वाढविजे उतान्ही । तामसे तेणे ॥163॥
तशा अपेय पदार्थाचे पान करण्याची व अभक्ष्य पदार्थांचे भक्षण करण्याची त्या तामसाला फार इच्छा होते. 63
164-17
एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । तयाचे फल दुसरा । क्षणी नाही ॥164॥
ह्याप्रमाणे तामसाचा आहार असतो; त्याचे फल मिळण्यास त्यास पुढला क्षण लागत नाही. 64
165-17
जे जेव्हाचि हे अपवित्र । शिवे तयाचे वक्त्र । तेव्हाचि पापा पात्र । जाला तो की ॥165॥
कारण ज्या क्षणी हे अपवित्र अन्न तो तोंडात घालतो तेव्हांच तो पापी ठरतो. 65


166-17
यावरते जे जेवी । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥166॥
याउपर जे जेवणे ते जेवण न म्हणता पोटात यातना भरण्यासारखेच होय असे जाणावे. 66
167-17
शिरच्छेदे काय होये । का आगी रिघता कैसे आहे । हे जाणावे काई पाहे । परी साहातुचि असे ॥167॥
शिरच्छेद केला तर कसे काय होते, आगीत शिरले तर काय वाटते, हे प्रत्यक्ष का पहावयाचे असते ? पण त्यालाही याची तयारी असते. 67
168-17
म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना । न सांगोचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥168॥
म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही असे देव म्हणाले. 68
169-17
आता ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारी । त्रिधा असे ॥169॥
असे आहाराचे प्रकार झाल्यावर यज्ञाचेही तीन प्रकार आहेत ते ऐक. 69
170-17
परी तिहीमाजी प्रथम । सात्त्विक यज्ञाचे वर्म । आईक पा सुमहिम – । शिरोमणी ॥170॥
तर, ह्या तीन प्रकारापैकी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म, हे कीर्तिमंत शिरोमणे, तू ऐक. 170
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥17. 11॥


171-17
तरी एकु प्रियोत्तमु- । वाचोनि वाढो नेदी कामु । जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥171॥
तरी, एक पति, किंवा पतीची इच्छा ह्यापलीकडे पतिव्रतेला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते. 71
172-17
नाना सिंधूते ठाकोनि गंगा । पुढारा न करीचि रिगा । का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥172॥
किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेश असा नसतो, अथवा आत्मदर्शन होताच वेद जसा मौनावतो. 72
173-17
तैसे जे आपुल्या स्वहिती । वेचूनिया चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागी ॥173॥
त्याप्रमाणे, जे स्वहितार्थ सर्व चित्तवृत्तींचा व्यय किंवा वेचं करून जे फलाशेने अहंकार बाळगीत नाहीत. 73
174-17
पातलेया झाडाचे मूळ । मागुते सरो नेणेचि जळ । जिराले गा केवळ । तयाच्याचि आंगी ॥174॥
पाणी जसे झाडाचे मूळ गांठल्यावर परत न फिरता त्याच्याच अंगांत जिरतें. 74
175-17
तैसे मने देही । यजननिश्चयाच्या ठायी । हारपोनि जे काही । वांछितीना ॥175॥
त्या प्रमाणे मनाने व देहाने निश्चयपूर्वक यज्ञांत फलेच्छा न करिता निमग्न होतात. 75

दिवस २७८ वा. ५, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३२५ ते ३३३६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३३२५
ऐका महिमा आवडीची । बोरे खाय भिल्लटीची ॥१॥
थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ॥धृपद॥
पोहे सुदामदेवाची । फके मारी कोरडेचि ॥२॥
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढे ॥३॥
अर्थ
भगवंताचा महिमा ऐसा आहे, की तो भिल्लिनिचि उष्टी बोरे आवाडीने खातो. त्याला प्रेमाचा दुष्काळ भासतो, तो भक्तांच्या प्रेमाचा भुकेला असतो. सुदाम्याचे कोरडेच पोहे फकी मरून चवीने खातो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताने उष्टे आणले आहे, की थोड़ेसेच आणले आहे, हे तो पाहत नाही; तर त्याचा भक्तिभाव पाहतो.
4:10

अभंग क्र. ३३२६
कुंभ अवघा एक आवा । पाकी एकी गू फेडावा ॥१॥
ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धाने वांटे ॥धृपद॥
हिरे दगड एक खाणी । कैचे विजातीला पाणी ॥२॥
तुका म्हणे शिरी । एक एकाची पायरी ॥३॥
अर्थ
एकाच आव्यात मातीची मडके तयार होतात; पण त्यातील काही स्वयंपाकासाठी वापरतात, तर काही घान भरण्यासाठी वापरतात. त्याप्रमाणे प्रारब्धाने प्रत्येकाची वेगवेगळी कामे ठरवून दिली आहेत. हीरा आणि दगड एकाच खानित सापडत असले तरी दोन्हीचि योग्यता मात्र सारखी एक नसते. तुकाराम महाराज म्हणतात, हीरा राजमुकुटात विराजमान होतो, तर दगड पायरीला बसतो.
4:10

अभंग क्र. ३३२७
मांडे पुर्‍या मुखे सांगो जाणे मात । तोंडी लाळ हात चोळी रिते ॥१॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाही ॥धृपद॥
बोलो जाणे अंगी नाही शूरपण । काय ते वचन जाळावे ते ॥२॥
तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंगे तेचि मूळ लटिक्याचे ॥३॥
अर्थ
काही लोक मांडे, पुर्‍या यांच्या चविचे नुसते वर्णन करुण हात नाचावतात. अश्या लोकांचे वक्तव्य मीठ नसलेल्या भोजनाप्रमाणे बचव असते. अंगी किंचितहि शौर्य नसताना नुसत्या बढ़ाया मारून काय उपयोग ?. तुकाराम महाराज म्हणतात, नुसती बडबड करणारी मानसे ढोंगी असतात, खोटरडी असतात.
4:10

अभंग क्र. ३३२८
न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना ॥धृपद॥
सूर्य नाही जागे करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हूण ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे । लपविता खरे येत नाही ॥३॥
अर्थ
अरन्यातील चंदनवृक्षाला आपल्यातील चंदन सुगंधाचा पुरावा इतर वृक्षाणा द्यावा लागत नाही. अतःकरणातील सत्य आपोआप बाहर पडते, हा त्याचा स्वभाव आहे. सूर्य जगाला ‘जागा हो’ असे म्हणत नाही किव्हा सूर्य किरणे तसे सांगत नाही, उगवने हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आकाशात मेघांची दाटि झाली की मोर त्याचा आनंद लपवून ठेउ शकत नाही, नाचू लागतात. त्याप्रमाणे सत्य लपत नाही.
4:11

अभंग क्र. ३३२९
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाही हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाही पाठी पोटी अंधकार । सर्वांगी साकर अवघी गोड ॥धृपद॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहाता अवगुण मिळेचि ना ॥२॥
अर्थ
चंदनवृक्षाची पान, फांद्या, मूळ, खोड सर्व चंदनाचे असते, तशी परिसाची कोनतीच बाजू हिन नसते. दिव्याचा सर्व बाजूला प्रकाश पसरलेला असतो, तशी साखर सर्व बाजूंनी गोड लागते. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनहि तसेच असतात, त्यांच्या मध्ये अवगुण शोधून सापडनार नाही.
4:11

अभंग क्र. ३३३०
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मने प्रतिमा स्थापिली । मने मन पूजा केली । मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥धृपद॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलेचि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाही नाही आनुदैवत । तुका म्हणे दुसरे ॥३॥
अर्थ
मानवी जीवनातील ईच्या-आकांक्षा, सुख-समाधान, मोक्ष, सर्व सिद्धि मिळविन्याचे प्रमुख साधन म्हणजे प्रसन्न, समाधानी मन होय. मनानेच देवाची स्थापना करून त्याची मानस पूज्या कली असता सर्व ईच्या पूर्ण होतात; कारण मन हे मातेप्रमाने आहे. मानचा गुरु आणि शिष्य, दास-दासी आहे, प्रसन्न मन परमार्थात रमल्याने मोक्ष लभतो; पण उद्विग्न असेल तर अधोगति ठरलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे साधका, वाचका, पंडित, विद्वान, लोकाहो, समाधानी मानसासारखे दूसरे दैवत नाही.
4:11

अभंग क्र. ३३३१
मायबापे जरी सर्पीण किं बोका । त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
अर्थ
मायबाप सर्पिंन आणि बोक्याप्रमाने असतील तर मुलाला त्यांच्या सहवासात सुख वाटत नाही. चंदन लाकडाचा सुळ असला तरी जीव घेणार आणि सोन्याची बेड़ी असली तरी पायाना ती दुःखदायक भासनार. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा मनुष्य ज्ञानी असेल आणि त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, अहंकार असेल तर तो नरकातच जाणार.
4:11

अभंग क्र. ३३३२
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा ॥१॥
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥
तुका म्हणे जैसी लांचासाठी ग्वाही । देतील हे ठावी नाही वस्तु ॥३॥
अर्थ
शास्त्रार्थ पठन केलेले पंडित शब्दार्थ सांगतील, पण अनुभवाचे बोल अनुभविच जानतील. पंडित, ज्ञानी हे ब्रम्‍हज्ञान सांगणारे असले तरीदेखील त्यांच्या ठिकाणी ब्रम्‍ह सुखाचा आनंद व नीस्वरूपाचे सुख याचा अनुभव नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, पैशाने विकत घेतलेल्या साक्षीदारांना खरी परिस्तिति माहित असेलच असे नही.
4:11

अभंग क्र. ३३३३
प्रारब्ध क्रियमाण । भक्ता संचित नाही जाण ॥१॥
अवघा देवचि जाला पाही । भरोनिया अंतर्बाही ॥धृपद॥
सत्वरजतम बाधा । नव्हे हरीभक्तांसि कदा ॥२॥
देवभक्तपण । तुका म्हणे नाही भिन्न ॥३॥
अर्थ
भक्ताना नशीब, कर्म आणि पाप पुन्याचा त्रास भोगवा लगत नाही. कारण तो भक्त अंतर्बाह्य भगवंताशि एकरूप झालेला असतो. हरिभक्तांना सत्त्व-रज-तमाची बाधा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, की देव आणि भक्त एकरूप झालेले असतात.
4:11

अभंग क्र. ३३३४
शास्त्राचे जे सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥
म्हणउनी नाही आणिकाचा पाग । सर्व जाले सांग नामे एका ॥धृपद॥
सगुण निर्गुण जयाचींये अंगे । तोचि आम्हा संगे क्रीडा करी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभ आइते केले नव्हो ॥३॥
अर्थ
जो सहा सास्रांचे सार आणि वेदांची साक्षात मूर्ति आहे, तो आमचा सांगाती, प्राण सखा आहे. म्हणून आम्हाला इतरांची पर्वा नाही; कारण नामस्मरनाने आमचे सर्व चांगले झाले आहे. जो दोन्ही अंगाने सगुन-निर्गुण आहे, तो आम्हा (भक्त) बरोबर नेहमी क्रीड़ा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही (भक्त) जन्मदात्यांचे जन्मदाते आहोत, स्वयंभू आहोत.
4:12

अभंग क्र. ३३३५
कोणे तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वां थोर मानियेली ॥१॥
कोणे ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊ ॥धृपद॥
तेव्हा तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥
का रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिवसेंदिवस बळ क्षीण होते ॥३॥
तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥
अर्थ
तुझा कोणी अंगीकार केला की, तू त्याला थोर मानतो. विठ्ठालाला शरण जावु नको, म्हणून तुला कोणी उपदेश केला आहे का ? जेव्हा यम समोर येईल तेव्हा तुला कोण पाठीशी घालेल. काळ क्षणाक्षणाने तुझे आयुष्य खात आहे; त्यामुळे तुझे बळ दिवसेंदिवस कमी होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आशा नास्तिकाला कोणीतरी माय बाप परमेश्वराची अठावन करुण दया ; कारण तो त्यालाच विसरला आहे.
4:12

अभंग क्र. ३३३६
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकाते डोळा न पाहावे ॥१॥
साधुनी भुजंग धरितील हाती । आणिके कापती देखोनिया ॥२॥
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥
अर्थ
काही लोक सरावपूर्वक सर्पविष खान्याची कला करतात, पण इतरांना ते पाहावात नाही. काही लोक सर्प पकडन्याचे जाणून हातात सर्प पकडतात, इतर लोक मात्र ते पाहुन भयाने कापतात. तुकाराम महाराज म्हणतात, जगात जे अशक्य आहे ते प्रयत्नपूर्वक साध्य करणारेही लोक असतात.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading