आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ ऑक्टोबर, दिवस ३०० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५८९ ते ३६००
“२७ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 27 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २७ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५८९ ते ३६०० चे पारायण आपण करणार आहोत.
२७ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २७६ ते ३००,
276-18
विकाशे रवीते उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरी का बरवी । अब्जिनी जैसी ॥276॥
जशी सरोवरातील कमळे आपल्या बोलण्याने फुलंण्याने रवीचा उदय झाला असे कळवितात व आपल्यातील मकरंदचा भ्रमरांकडून कडून उपभोग घेववितात.
277-18
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करू पाचाही तया । कारणा रूप ॥277॥
तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. ती कारणे पाच आहेत. त्यांची लक्षणे तुला सांगतो.
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साण्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥18. 13॥
278-18
आणि पांचही कारणे तिये । तूंही जाणसील विपाये । जे शास्त्रे उभऊनी बाहे । बोलती तयाते ॥278॥
ती पाच कारणे तू ही कदाचित जाणार असशील कारण ज्याविषयी शास्त्राने ऊंच हात करून वर्णन केलेले आहे
279-18
वेदरायाचिया राजधानी । सांख्यवेदांताच्या भुवनी । निरूपणाच्या निशाणध्वनी । गर्जती जिये ॥279॥
ती वेदराजाच्या राज्याच्या राजधानीत सांख्य वेदात मंदिरात निरूपणरुपी नौबदीने प्रसिद्ध आहेत.
280-18
जे सर्वकर्मसिद्धीलागी । इयेचि मुद्दले हो जगी । तेथ न सुवावा अभंगी । आत्मराजु ॥280॥
कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता या जगात हीच मुख्य अवश्य आहेत, तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नको.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-18
ह्या बोलाचि डांगुरटी । तिये प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटी । वसो हे काज ॥281॥
अर्जुना, अशी दवंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे, म्हणून तुलाही ठाऊक असू दे, उपयोग होईल;
282-18
आणि मुखातरी आइकिजे । तैसे कायसे हे ओझे । मी चिद्रत्न तुझे । असता हाती ॥282॥
आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती असल्यावर, दुसऱ्याचे तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस, इतकी अडचण तुला कशास पाहिजे ?
283-18
दर्पणु पुढा मांडलेया । का लोकांचिया डोळया । मानु द्यावा पहावया । आपुले निके ॥283॥
आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रुप पाहण्यात लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा, अशी विनंती का करावी ?
284-18
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ ते तेचि होत जाये । तो मी तुझे जाहालो आहे । खेळणे आजी ॥284॥
भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल, त्या ठिकाणी ती वस्तू मी त्यांच्या दृष्टीस पडतो, तो मी आज तुझे खेळणे झालो आहे. (हस्तगत झालो आहे. )
285-18
ऐसे हे प्रीतीचेनि वेगे । देवो बोलता से नेघे । तव आनंदामाजी आंगे । विरतसे येरु ॥285॥
असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही, तो इकडे पार्था आनंदात निमग्न होऊन गेला.
286-18
चांदिणियाचा पडिभरु । होता सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हो पाहे जैसा ॥286॥
पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत मण्याचा डोंगर जरी असला, तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे.
287-18
तैसे सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतले अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥287॥
त्याप्रमाणे सुख व त्याचा अनुभव या भावांचा पडदा नाहीसा होऊन सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले;
288-18
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धावा । जीवे केला ॥288॥
तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाचे समुद्रात बुडणार्या अर्जुनास वर काढले
289-18
अर्जुना येसणे धेंडे । प्रज्ञा पसरेंसी बुडे । आले भरते एवढे । ते काढूनि पुढती ॥289॥
अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला, एवढे प्रेमाचे भरते आले असून ते बाजूला सारून,
290-18
देवो म्हणे हा गा पार्था । तू आपणपे देख सर्वथा । तव श्वासूनि येरे माथा । तुकियेला ॥290॥
देव म्हणाले, ” पार्था तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये. ” तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलावली;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-18
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशी व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवो पाहे ॥291॥
आणि तो म्हणाला की, हे प्रभो, जो मी तुमच्या सान्निध्यास (द्वैतभावस त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे,
292-18
तयाही हा ऐसा । लोभे देतसा जरी लालसा । तरी का जी घालीतसा । आड आड जीवा ? ॥292॥
आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.
293-18
तेथ श्रीकृष्ण म्हणती निके । अद्यापि नाही मा ठाऊके । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणे आहे ? ॥293॥
तेव्हा श्रीकृष्णश्रीकृष्ण म्हणतात की, अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही, की चंद्र आणि प्रभा यांचा वियोग घडतो का ?
294-18
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊ आम्ही भिवो । जे रुसता बांधे थांवो । ते प्रेम गा हे ॥294॥
आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.
295-18
एथ एकमेकांचिये खुणे । विसंवादु तवचि जिणे । म्हणौनि असो हे बोलणे । इयेविषयींचे ॥295॥
या ठिकाणी एकमेकांची खूणेने परस्परास जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण होय, म्हणून याविषयी वादविवाद पुरे.
296-18
मग कैशी कैशी ते आता । बोलत होतो पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसी ॥296॥
मग अर्जुना, आपण काय बरे बोलत होतो की, सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत, असेच ना ?
297-18
तव अर्जुन म्हणे देवे । माझिये मनीचेचि स्वभावे । प्रस्ताविले बरवे । प्रमेय ते जी ॥297॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, ” देवा, माझ्या मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला.
298-18
जे सकळ कर्माचे बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली का ॥298॥
सर्व कर्मास कारणीभूत अशी पाच कारणे तुला सांगेन अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली;
299-18
आणि आत्मया एथ काही । सर्वथा लागु नाही । हे पुढारलासि ते देई । लाहाणे माझे ॥299॥
आणि आत्म्याचा कर्माची काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता, ते माझे आवडते मला द्या, “
300-18
यया बोला विश्वेशे । म्हणितले तोषे बहुवसे । इयेविषयी धरणे बैसे । ऐसे के जोडे ? ॥300॥
हे बोलणे ऐकून भगवान अति संतोष आणि म्हणाले, ” याविषयी तू धरणे घेऊन बसलास, असा विचारणारा आम्हाला कुठे मिळतो आहे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३०० वा. २७, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५८९ ते ३६००
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३५८९ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
आता माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥
सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु॥
काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे साठविले ॥२॥
मागणे ते काय धाडिले भातुके । पुसेन ते सुखे आहेतसी ॥३॥
तुका म्हणे काय सांगती ते कानी । ऐकोनिया मनी धरुनी राहे ॥४॥
अर्थ
आता माझे सखे वारकरी येतीलच माझ्या जीवाला त्यांच्या भेटीची खूप ओढ लागली आहे. वारकरी माझ्या निरोपाची गोष्ट मला सांगतील आणि माझ्या माहेरची सगळे वृतांत देखील मला सांगतील. तेथे परमार्थाचा काय लाभ झाला तेथे परमार्थरुपी कोणता कोणता माल होता आणि कोणी काय काय साठविले हे मी त्यांना विचारीन. माझ्या मायबापानी माझ्यासाठी काय खाऊ पाठविला तो मी मागवून घेईन आणि माझे मायबाप सुखी आहेत काय हे मी त्यांना विचारीन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे आलेल्या वारकऱ्यांनी मला जे काही सांगितले आहे ते सर्व मी माझ्या कानाने ऐकून माझ्या मनात दृढ धरुन राहीन. ”
12:12
अभंग क्र. ३५९० (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
काय करावे म्या केले ते विचार । घडेल साचार काय पाहो ॥१॥
काय मन नाही धरीत आवडी । प्रारब्धी जोडी तेचि खरी ॥धृपद॥
काय म्या तेथीचे रांधिले चाखोनि । ते हे करी मनी विवंचना ॥२॥
आणीक ही त्यासी बहुत कारणे । बहु असे जिणे ओढीचे ही ॥३॥
तुका म्हणे आम्हा बोळविल्यावरी । परती माघारी केली नाही ॥४॥
अर्थ
अहो मी कोणताही विचार केला तरी त्याचा काही उपयोग आहे का कारण कोणताही विचार मी जरी केला तरी तो कोठे सत्य झाला आहे. अहो मन कोणत्या गोष्टीचे आवड धरीत नाही आणि आवडती वस्तू लगेचच भेटेल असेही नाही पण प्रारब्धाने जे मिळेल तेच खरे आहे. दूर कोठेतरी स्वयंपाक झाला आणि मी येथे बसून ते अन्न खाल्ले असे होऊ शकते काय तर नाही परंतू मन येथे बसून त्या स्वयंपाकाची विवंचना करते स्वयंपाक कसा झाला असेल किंवा त्याची चव कशी असेल असे विचार मन करते. त्यामुळेच माझ्या मनात आले की माझ्या मायबापाला खूप कामे आहेत मला मूळ पाठवण्याचे एवढे एकच काम त्यांच्याकडे नाही त्यांचे जगणे हे खूप ओढाताणीचे आहे त्यामुळे त्यांनी मला मूळ पाठविला नसेल. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा या पाडूरंगाने आम्हाला इकडे पाठविल्यानंतर पुन्हा पंढरीला बोलावलेच नाही कारण त्यांच्या मागे खूप कामे आहेत असे मला वाटते. ”
12:12
अभंग क्र. ३५९१ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
आम्हा अराणूक संवसार हाती । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥
पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलो सदा होतो कामे ॥धृपद॥
वोढवले ऐसे दिसते कपाळ । राहिलो सकळ आवरोनि ॥२॥
मागे पुढे काही न दिसे पाहाता । येथूनिया चिंता उपजली ॥३॥
तुका म्हणे वाट पाह्याचे कारण । येथींचिया हीन झाले भाग्य ॥४॥
अर्थ
आम्ही आतापर्यंत संसाराच्या हातात पडलो होतो त्यामुळे आम्हाला आजपर्यंत आराम म्हणजे विश्रांती मिळालीच नाही. मी आतापर्यंत पुत्र दारा धन आणि धंदा यामध्येच गुंतलो होतो मन नेहमी कामातच गुंतलेले होते. माझ्या सर्व उपाध्या आवरल्या गेल्या आहेत त्यामुळे असे वाटते की माझे भाग्य उदयाला आले आहे. देवा मी मागे पुढे वळून पाहिले तर मला काहीच दिसले नाही त्यामुळे माझ्या चित्तामध्ये चिंता उत्पन्न झाली. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझी वाट पाहाण्याचे मुख्य कारण म्हणजे मी संसारामध्ये भाग्यहीन झाले आहे त्यामुळे तुझी वाट पाहाण्यासाठी हीन झालेले भाग्यच मुख्य कारण ठरले आहे. ”
12:12
अभंग क्र. ३५९२ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
बहु दिस नाही माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसाये ॥१॥
आपुल्याला होतो गुंतलो व्यासंगे । नाही त्या प्रसंगे आठवले ॥धृपद॥
तोडिले तुटते जडती जडले । आहे ते आपुले आपणापे ॥२॥
बहु निरोपाचे पावले उत्तर । जवळीच फार एक ते ही ॥३॥
काय जाणो मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥४॥
अर्थ
खूप दिवस झाले माझ्या माहेरची माझ्या आईबापाची व माझी भेटच झाली नाही कारण मी संसारात गुंतलो होतो व संसारातील व्यवसायामुळे आमच्या दोघामध्ये तूट निर्माण झाली होती. मी संसारात व कामधंदयात गुंतलो होतो त्यामुळे आपल्या मायबापाची व आपली भेट व्हावी हे त्याप्रसंगी आठवलेच नाही. कोणतेही संबंध तोडले तर तुटतात जोडले तर जोडले जातात या सर्व गोष्टी आपल्या मनावरच परावलंबीत असतात. यापूर्वी देवाकडून मला खूप निरोप आले तेवढे एकच उत्तर माझ्याजवळ आहे परंतू मी संसारात गुंतलो त्यामुळे मला काही त्याच्याकडे जाता आले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी संसारामध्ये खूप गुंतलो होतो त्यामुळे खूप दिवस झाले तसे माझ्या माहेरची व माझ्या मायबापाची भेट काही घडली नाही त्यामुळे त्यांनी माझ्यावर प्रेम करायचेच टाकून दिले आहे की काय हे मला काही कळेना. ”
12:12
अभंग क्र. ३५९३ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
होती नेणो झाली कठिणे कठीण । जवळीच मन मने ग्वाही ॥१॥
आह्मी होतो सोई सांडिला मारग । घडले ते मग तिकूनही ॥धृपद॥
निश्चिंतीने होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥
आम्हा नाही त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥३॥
तुका म्हणे झाले धर्माचे माहेर । पडिले अंतर आम्हाकूनि ॥४॥
अर्थ
आम्ही कठीण मनाचे झालो त्यामुळे आमचे आईबाप देखील आमच्याविषयी कठीण मनाचे झाले आहेत की काय हे काही कळत परंतू आमचे मन कठीण झाले आहे याविषयी आमचे मनच आमच्या मनाला साक्षी आहे. आम्ही आमच्या आईबापाविषयी कठीण झालो त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग देखील आम्ही सोडून दिला मग त्यांच्याकडूनही आमच्याबाबतीत तसाच प्रकार घडला आहे. आपण समोरच्याशी जसे वागू तसेच समोरचाही आपल्याशी तसाचे वागेल अगदी निश्चिंत तसाच वागणार आहे त्यामुळे मी जर असा त्यांच्याशी म्हणजे मायबापाशी कठोर वागत असलो तर मी त्यांना तुम्ही असे माझ्याशी दुवर्तणूक करु नका हे सांगणे योग्य नाही त्यांना कोंडीत धरणे योग्य नाही. इतके दिवस आम्हाला आमच्या आईबापाची आठवण आली नाही त्यामुळे त्यांचाही जीव आमच्यापासून विखुरला असेल. तुकाराम महाराज म्हणतात, “पाडूरंग हाच माझ्यासाठी माहेर म्हणजे धर्माचा आईबाप झाला आहे खरे तर चूक माझ्याकडून घडली त्यामुळे त्याच्यावर माझे औरस पुत्र म्हणून सत्ता राहिली नाही. ”
12:12
अभंग क्र. ३५९४ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
आता करावा का सोंस वायाविण । लटिकाचि सीण मनासी हा ॥१॥
असेल ते कळो येईल लवकरी । आता वारकरी आल्यापाठी ॥धृपद॥
बहु विलंबाचे संन्निध पातले । धीराचे राहिले फळ पोटी ॥२॥
चालिले ते ठाव पावेल सेवटी । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥
तुका म्हणे आसे लागलासे जीव । म्हणऊनि कीव भाकीतसे ॥४॥
अर्थ
आता व्यर्थ सोस म्हणजे हव्यास का करावा जर खोटा हव्यास करावा तर तो मनाला व्यर्थ त्रासच ठरतो. आता जो काही प्रकार घडला असेल तो लवकरच कळेल एकदा की वारकरी आले की सर्व काही समजेल. वारकऱ्यांना पंढरीहून निघल्यापासून खूप दिवस झाले आहेत त्यांना येण्यासाठी खूप विलंब लागला आहे परंतू आता ते जवळच आले असतील मी ते येण्याविषयी खूपच आधीर झालो आहे पण अंत:करणात जर धीर असेल तर आपल्याला त्याचे फळ मिळतेच. जे चालतच नाहीत ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतच नाही पण माझे वारकरी पुन्हा मागे फिरले आहेत त्याअर्थी ते मुक्काच्या ठिकाणी म्हणजे देहूत परत येतीलच. तुकाराम महाराज म्हणतात, “मी पाठवलेल्या पत्राच्या उत्तरासाठी माझा जीव आशेला लागला आहे त्यामुळे तर मी एवढी करुणा भाकत आहे. ”
12:13 ३५९५ नही हे
12:13
अभंग क्र. ३५९६ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
घालूनिया ज्योती । वाट पाहे दिवसराती ॥१॥
बहु उताविळ मन । तुमचे व्हावे दरुषण ॥धृपद॥
आलो बोळवीत । तैसे याचि पंथे चित्त ॥२॥
तुका म्हणे पेणी । येता जाता दिवस गणी ॥३॥
अर्थ
हे माझ्या वारकऱ्यांनो ज्या दिवसापासून तुम्ही पंढरीला पायी गेलात त्या दिवसापासून मी माझ्या डोळयात तेल घालून तुमची रात्रंदिवस सारखी वाट पाहात आहे. तुमचे दर्शन व्हावे यासाठी मन फार उतावीळ झाले होते. पंढरीस जाणाऱ्या पंथाकडे जेव्हापासून मी तुम्हाला मार्गस्थ केले त्याच मार्गाकडे माझे चित्त सारखे लागलेले होते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझ्या वारकऱ्यांनो ज्या दिवसापासून तुम्ही पंढरीला निघले होते त्या दिवसापासून तुम्ही येथे जेवत असाल, येथे तुमचा मुक्काम असेल, येथून तुम्ही आता मार्गस्थ झाले असाल असे मी सारखे दिवस मोजीत होतो. ”
12:13
अभंग क्र. ३५९७ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
आजि दिवस धन्य । तुमचे झाले दरुषण ॥१॥
सांगा माहेरींचा मात । अवघा विस्तारी वृत्तांत ॥धृपद॥
आइकतो मने । करूनि सादर श्रवण ॥२॥
तुका म्हणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥३॥
अर्थ
हे माझ्या पंढरीला गेलेल्या वारकऱ्यांनो आज तुमचे दर्शन झाले आजचा दिवसच खरोखर खूप धन्य आहे. माझ्या माहेरी काय घडले याबद्दलचा सर्व वृत्तांत तुम्ही मला आता सांगा. मी माझे मन व कान हे वृत्तांत ऐकण्यासाठी सादर करुन तुमच्यासमोर बसेन व ते ऐकेन. तुकाराम महाराज म्हणतात, “हरीचे नाम घेणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सुखसोहळा आहे परंतू माहेरचा वृत्तांत ऐकण्यासाठी मी फार उत्सुक आहे. ”
12:13
अभंग क्र. ३५९८ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
बोलिली ती काय । माझा बाप आणि माय ॥१॥
ऐसे सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥धृपद॥
पत्राचे वचन । काय दिले फिरावून ॥२॥
तुका म्हणे काही । मना आणिले की नाही ॥३॥
अर्थ
हे माझ्या वारकऱ्यांनो तुम्ही पायी पंढरपूरला गेला होतात त्यावेळी माझे माय आणि बाप काय म्हणाले ? हे माझ्या सख्यांनो वारकऱ्यांनो माझे मायबाप काय म्हणाले ते तुम्ही मला लवकर सांगा. हे माझ्या वारकऱ्यांनो संतांनो मी तुमच्याजवळ पत्र दिले होते ते तुम्ही माझ्या मायबापाकडे दिल्यानंतर माझ्या पत्राचे त्यांनी फिरुन काय उत्तर दिले ? तुकाराम महाराज म्हणतात, “माझे पत्र वाचून देवाने माझ्याविषयी काही मनात घेतले की नाही ? ”
12:14
अभंग क्र. ३५९९ (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
काय पाठविले । सांगा भातुके विठ्ठले ॥१॥
आसे लागलासे जीव । काय केली माझी कीव ॥धृपद॥
फेडिले मुडतर । किंवा काही जरजर ॥२॥
तुका म्हणे सांगा । कैसे आर्त पांडुरंगा ॥३॥
अर्थ
माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी कोणता खाऊ पाठवला आहे तो सांगा. माझा जीव खूप आशेला लागला आहे माझ्यावर विठ्ठलाने कोणत्या प्रकारची कीव केली आहे ते मला सांगा. देवाने माझा मूर्खपणा दु:ख नाहीसे केले की माझे पत्र वाचूनच तो जर्जर झाला ते मला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीहून जाऊन आलेल्या माझ्या वारकऱ्यांनो तुम्ही पाडूरंगापुढे गेलात व माझा निरोप पाडूरंगाच्या पुढे दिलात त्यावेळी पाडूरंगाच्या मनात माझ्याविषयी कशा प्रकारची आर्त भावना तुम्हाला दिसून आली ते मला तुम्ही सांगा. ”
12:14
अभंग क्र. ३६०० (वारकरीपरतआल्यानंतरचेअभंग)
आजिचिया लाभे ब्रह्मांड ठेंगणे । सुखी झाले मन कल्पवेना ॥१॥
आर्तभूत माझा जीव जयांसाठी । त्याच्या झाल्या भेटी पायासवे ॥धृपद॥
वाटुली पाहाता सिणले नयन । बहु होते मन आर्तभूत ॥२॥
माझ्या निरोपाचे आणिले उत्तर । होईल समाचार सांगती तो ॥३॥
तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळले संकल्प संत आले ॥४॥
अर्थ
आज जे मला लाभ झाला आहे त्या लाभापुढे ब्रम्हांड देखील ठेंगणे झाले आहे. माझ्या मनाला जे आज सुख झाले आहे त्या सुखाची कल्पनाही मला होत नाही. माझा जीव ज्या वारकऱ्यांसाठी उतावीळ झाला होता त्या वारकऱ्यांच्या पायाशी आज माझ्या भेटी झाल्या. त्यांची वाट पाहून माझे डोळे थकले होते माझे मन अतिशय उतावीळ झाले होते. मी त्यांच्याकडे माझ्या निरोपाचे पत्र माझ्या मायबापाकडे म्हणजे पाडूरंगाकडे पाठविले होते त्याचेच उत्तर ते घेऊन आले आहेत आणि त्याविषयी सर्व समाचार ते मला आता सांगतील. तुकाराम महाराज म्हणतात, “संत आले व त्यांच्या भेटीने माझ्या त्रिविधतापाचे शमन झाले आणि मी केलेला संकल्प फळाला आला. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















