२० ऑक्टोबर, दिवस २९३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५०५ ते ३५१६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२० ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 20 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २० ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५०५ ते ३५१६ चे पारायण आपण करणार आहोत.
२० ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १०१ ते १२५,

101-18
देहाचिया गावा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणो नये धनंजया । जियापरी ॥101॥
अर्जुना, देहरूप गावास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ॥101॥
102-18
का ललाटीचे लिहिले । न मोडे गा काही केले । काळेगोरेपण धुतले । फिटो नेणे ॥102॥
किंवा नशिबात लिहिलेली काही टळत नाही, अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. ॥102॥
103-18
केले काम्य कर्म तैसे । फळ भोगावया धरणे बैसे । न फेडिता ऋण जैसे । वोसंडीना ॥103॥
तसे काम्यकर्मे केले असता, ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही, त्याप्रमाणे ते फळ भोगाविण्याकरिता दारात धरणे घेऊन बसते ! ॥103॥
104-18
का कामनाही न करिता । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडे न झुंजता । लागे जैसे ॥104॥
अथवा अर्जुना इच्छा न करिता काम्यकर्म अकस्मात घडले तरी, केवळ करमणुकीकरिता वाय बाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थली लागला तर जसा जीव घेण्यास कमी करत नाही, ॥104॥
105-18
गूळ नेणता तोंडी । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥105॥
गुळ न समजून जरी तोंडात घातला तरी तो गोडच लागतो किंवा अग्नीस राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भाजतोच. ॥105॥


106-18
काम्यकर्मी हे एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक । म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥106॥
त्याप्रमाणे, काम्यकर्माचे ठिकाणी फळ भोगविण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून मुमुक्षूने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये. ॥106॥
107-18
किंबहुना पार्था ऐसे । जे काम्य कर्म गा असे । ते त्यजिजे विष जैसे । वोकूनिया ॥107॥
किंबहुना बा पार्था, असे जे काम्यकर्म आहे ते, विष पोटात गेले म्हणजे ओकुन टाकतात, तसे टाकून द्यावे ॥107॥
108-18
मग तया त्यागाते जगी । संन्यासु ऐसया भंगी । बोलिजे अंतरंगी । सर्वद्रष्टा ॥108॥
मग ज्याच त्याला जगात संन्यास असे म्हणतात, असे सर्वातर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलिले ॥108॥
109-18
हे काम्य कर्म सांडणे । ते कामनेतेचि उपडणे । द्रव्यत्यागे दवडणे । भय जैसे ॥109॥
मग म्हणतात:- ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्ये टाकून दिली म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या काम्यकर्मांचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीतशा करणे होय ॥109॥
110-18
आणि सोमसूर्यग्रहणे । येऊनि करविती पार्वणे । का मातापितरमरणे । अंकित जे दिवस ॥110॥
आणि चंद्रग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस, ॥110॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


111-18
अथवा अतिथी हन पावे । हे ऐसैसे पडे जै करावे । तै ते कर्म जाणावे । नौमित्तिक गा ॥111॥
अथवा काकबळी टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता, जी जी कर्मे करावी लागतात ति नैमित्तिक कर्मे होतं ॥111॥
112-18
वार्षिया क्षोमे गगन । वसंते दुणावे वन । देहा श्रृंगारी यौवन- । दशा जैसी ॥112॥
वर्षाकाळी जसे आकाश भरून येवून मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते, अथवा शरीराला यौवनदशा शोभा आणते. ॥112॥
113-18
का सोमकांतु सोमे पघळे । सूर्ये फांकती कमळे । एथ असे तेचि पाल्हाळे । आन नये ॥113॥
किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याचे किरणांनी सुर्यविकाशिनी कमळे प्रफुल्लीत होतात; या ठिकाणी, जे मुळचे असते तेच वाढते, निराळे काही उत्त्पन्न होत नाही. ॥113॥
114-18
तैसे नित्य जे का कर्म । तेचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावे तेणे नाम । नैमित्तिक होय ॥114॥
त्याच प्रमाणे जे नित्य कर्म आहे, त्यालाच निमिताचे नियम लागले कि, नैमित्तिक हे मोठे नांव त्याला प्राप्त होते. ॥114॥
115-18
आणि सायंप्रातर्मध्यान्ही । जे का करणीय प्रतिदिनी । परी दृष्टि जैसी लोचनी । अधिक नोहे ॥115॥
आणि दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी जे कर्म करावे लागतात; परंतु ज्या डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही. ॥115॥


116-18
का नापादिता गती । चरणी जैसी आथी । नातरी ते दीप्ती । दीपबिंबी ॥116॥
अथवा गतीचा स्वीकार ती जशी पायात आपोआपच आहे; किंवा दिव्याचे ठिकाणीच जसे त्याचे सहज तेज आहे, ॥116॥
117-18
वासु नेदिता जैसे । चंदनी सौरभ्य असे । अधिकाराचे तैसे । रूपचि जे ॥117॥
चंदनास वरून वास लावल्या शिवाय जसा अंगाचा सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय. ॥117॥
118-18
नित्य कर्म ऐसे जनी । पार्था बोलिजे ते मानी । एवं नित्य नैमित्तिक दोन्ही । दाविली तुज ॥118॥
त्या कर्मास पार्था, जगात नित्य कर्म म्हणतात, असे समज. या प्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक हि दोन्ही कर्मे दाखविली. ॥118॥
119-18
हेचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणो पाहती एक । वांझ ययाते ॥119॥
हेच नित्यनैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे. म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणू पाहतात. ॥119॥
120-18
परी भोजनी जैसे होये । तृप्ति लाहे भूक जाये । तैसे नित्यनैमित्तिकी आहे । सर्वांगी फळ ॥120॥
परंतु, भोजनापासून जशी तृप्ती प्राप्त होवून क्षुधा नष्ट होते, तशी या नित्यनैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फळ प्राप्ती होते. ॥120॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


121-18
कीड आगिठा पडे । तरी मळु तुटे वानी चढे । यया कर्मा तया सांगडे । फळ जाणावे ॥121॥
ज्या प्रमाणे हिणकस सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिणकसपणा जाऊन त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फळ प्राप्ती होते. (चित्त शुद्धी होते) ॥121॥
122-18
जे प्रत्यवाय तव गळे । स्वाधिकार बहुवे उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥122॥
कारण, या कर्माच्या आचरणाने दोष नाहीतसे होवून आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. ॥122॥
123-18
येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकी आहे फळ । परी ते त्यजिजे मूळ । नक्षत्री जैसे ॥123॥
नित्यनैमित्तिक कर्मापासून जरी एव्हढी मोठी फळ प्राप्ती होते, तरी मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलांप्रमाणे, त्याच्या फळाचा त्याग करावा. ॥123॥
124-18
लता पिके आघवी । तव च्यूत बांधे पालवी । मग हात न लावित माधवी । सोडूनि घाली ॥124॥
वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व आम्रवृक्षास पालवी फुटली, तरी जसा तो त्यास हात न लाविता टाकून जातो. ॥124॥
125-18
तैसी नोलांडिता कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठी फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥125॥
तसे नित्यनैमित्तिक कर्मांचे चित्त देवून यथाविधी आचरण कारावे; पण त्यापासून निष्पन्न होण्याऱ्या सर्व फलांचा वांती (उलटी, वमन) प्रमाणे त्याग करवा. ॥125॥

दिवस २९३ वा. २०, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५०५ ते ३५१६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३५०५ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥१॥
मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥धृपद॥
कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥२॥
कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥३॥
अर्थ
अरे तु प्रत्यक्ष डोळयाने पाहिले तर असे दिसते की तू खोटा आहे तुझे व्यवहारही खोटे आहेत मग तू व्यर्थ घरादाराचा का त्याग केला आहे ? अरे परमार्थ करायचा असेल तर मनापासून चांगल्या विचाराने परमार्थ केला पाहिजे वरवर केवळ परमार्थाचे सोंग दाखवून अंत:करणात कपट ठेवून परमार्थ करणे योग्य नाही. काम क्रोध जवळ असणे म्हणजेच संसार आहे आणि त्याचाच तू स्वत:च्या माथ्यावर भार घेऊन चालत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “संन्यास कशाला म्हणतात तर शरीराची अपेक्षाच सोडून देणे यालाच संन्यास म्हणतात. ”
11:54 am –
अभंग क्र. ३५०६ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
रामभजन सब सार मिठाई । हरी संताप जनमदुख राई ॥धृपद॥
दुधभात घृत साकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥
अर्थ
राम भजन सर्व साराचेही सार आहे व ते अत्यंत गोड आहे ते त्रिविधताप आणि जन्मदु:खाचे डोंगराचा नाश करते. दूध, भात, तूप, साखर हे तुमची भूक शांत करतील परंतू अंत:काळी तुम्हाला भवसागरातून तारणार नाही. आपले खाण्यात दिवस निघून जातात आपल्याला गोडधोड खारट आंबट खाण्याची सवय लागते परंतू नंतर प्रारब्धाने ते गोडधोड आंबटही आपल्याला खाण्यास मिळत नाही व नंतर या सवयीमुळेच आपल्याला पश्चात्ताप करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, “जो रामरस पितो त्याला नंतर गोडधोड आंबट काहीही खाण्याची इच्छा राहात नाही. ”
11:54 am –
अभंग क्र. ३५०७ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥धृपद॥
ये हि तन करते क्या होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥
रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥
कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥
अर्थ
पुन्हा पुन्हा तू का मरतोस आहेस अरे अभागी मनुष्या पुन्हा पुन्हा मरणे हेच तुझ्या भाग्यात आहे की काय ? अरे या मनुष्य देहात तू ठरवले तर काय करु शकत नाहीस त्यामुळे सर्वकाही सोडून दे आणि हरी भक्ती आणि भजन कर तू वैकुंठाला जाशील. अरे रामनाम घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मोल किंवा कवडी खर्च करावी लागत नाही याउलट ते रामनामच तुला सर्व मायेतून सोडवते. तुकाराम महाराज म्हणतात, “तू मनापासून रामाची भक्ती करण्याचा निश्चय जवळ राखून ठेव आणि नित्य जिभेने रामरस चाखत राहा. ”
11:54 am –
अभंग क्र. ३५०८ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
हू दास तीन्हके सुनाहो लोका । रावणमार विभीषण दिई लंका ॥धृपद॥
गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥
वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥२॥
स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लिये कहे भाई तुका ॥३॥
अर्थ
ज्या रामाची किर्ती तुम्हा लोकांना सांगणार आहे त्याचा मी दास आहे त्या रामाने रावणाला मारुन बिभीषणाला लंका दिली. ज्यावेळी रागावलेल्या इंद्राने प्रचंड प्रमाणात पर्जन्य वृष्टी सुरु केली त्यावेळी देवाने आपल्या करंगळीच्या नखावर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे रक्षण केले. या वैकुंठ नायकाने कालयवन, कंसासूर व अनेक दैत्यांना यमसदनी धाडले व अशा सुंदर कांती असलेल्या देवाची गोपीका मनात इच्छा धरतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी देवाने स्तंभ फोडून स्तंभातून नरसिंहरुप अवतार धारण करुन हिरण्यकश्यपूचे पोट फाडले. ”
11:54 am –
अभंग क्र. ३५०९ (हिंदुस्तानीदोहे)
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय ।
भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज ।
बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥
लोभीके चित धन बैठे । कामीन चित्त काम ।
माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥१॥
तुका पंखिबहिरन मानुं । वोहि जनावर बाग ।
असंतनकु संत न मानू । जे वर्मकु दाग ॥१॥
तुका राम बहुत मिठा रे । भर राखू शरीर ।
तनकी करू नावरी । उतारू पैल तीर ॥१॥
संतन पन्हया ले खडा । राहू ठाकुरद्वार ।
चलत पाछेंहुं फिरो । रज उडत लेऊ सीर ॥१॥
तुकाप्रभु बडो न मनूं न मानू बडो । जिसपास बहु दास ।
बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥१॥
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड ।
हरीबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥१॥
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसे बीख ।
आव न जानूं मते बेरो । जब काल लगावे सीख ॥१॥
कहे तुका मे सवदा बेचूं । लेवेके तन हार ।
मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥१॥
तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।
क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥१॥
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख ।
पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥१॥
कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय ।
हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥१॥
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ।
चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥१॥
तुका सुरा बहुत कहावे । लडत बिरला कोये ।
एक पावे उंच पदवी । एक खौंसा जोये ॥१॥
तुका माऱ्या पेटका । और न जाने कोये ।
जपता कछु रामनाम । हरीभगतनकी सोय ॥१॥
काफर सोही आपण बुझे । अल्ला दुनिया भर ।
कहे तुका तुम्हे सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका क�
11:55 am –
अभंग क्र. ३५१० (तुकोबाचापत्नीसउपदेश)
कोण येते घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाही धंदा ॥१॥
देवासाठी जाले ब्रम्हांड सोइरे । कोवळ्या उत्तरे काय वेचे ॥धृपद॥
माने पाचारिता नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाठी ॥२॥
तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसे श्वान लागे पाठी ॥३॥
अर्थ
महाराज आपल्या पत्नीस म्हणतात की, कोण आमच्या घराला विनाकारण उगाचच कशाला येईल ज्याला त्याला ज्याचा त्याचा व्यवसाय नाही काय ? देवामुळे सारे ब्रम्हांड माझे सोयरे झाले आहे त्यामुळे लोक माझ्याकडे घरी येतात आणि घरी आलेल्या लोकांशी तू जर मृदू शब्दामध्ये भाषांतर केले तर तुझे काही खर्च होणार आहे काय ? ज्या लोकांना मान सन्मान देऊन देखील ते कोठेही जात नाहीत असे लोक घरी माझ्या प्रेमापोटी माझ्याकडे येतात. तुकाराम महाराज म्हणतात, “पण हे रांडे तुला हे लोक घरी आलेले का आवडत नाही तुला याचे भूषण वाटत नाही पिसाळलेले कुत्रे जसे पाठीशी लागते तसे तू माझ्या पाठीशी का लागतेस ? ”
11:55 am –
अभंग क्र. ३५११ (तुकोबाचापत्नीसउपदेश)
देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥
दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥धृपद॥
द्विजा पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥
नको चिंता करु वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी । परी तो जवळी आहे आम्हा ॥४॥
अर्थ
देव पहावयास सायास करावे नाशवंत देहाची अपेक्षा धरु नये. आज सोमवार आहे द्वादशी तिथी आहे प्रात:काळ आहे व अशा शुध्द दिवशी चांगला पर्वकाळच घडला आहे. यामुळे तू प्रात:काळी ब्राम्हणाला बोलवून आण मन शुध्द कर आणि यथाविधी त्यांना दान दयावे. तू तुझ्या पोटाची व वस्त्राची चिंता करु नकोस आमची माऊली पाडूरंग आहे ती तुझी सर्व काळजी घेईल. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाने गीतेत आणि वेदात असे सांगितले आहे की, मी प्रकृतीच्या पलीकडे फार दूर आहे परंतू तसे नसून तो आमच्यासाठी आमच्या फार जवळ आहे. ”
11:55 am –
अभंग क्र. ३५१२ (तुकोबाचापत्नीसउपदेश)
सुख हे नावडे आम्हा कोणा बळे । नेणसी अंधळे झालीशी तू ॥१॥
भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटले चपळ मन ठायी ॥धृपद॥
द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हासी पाषाणाहूनि हीन ॥२॥
सोइरे सज्जन जन आणि मन । अवघे समान काय गुणे ॥३॥
तुका म्हणे आम्हा जवळीच आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥
अर्थ
संसारातील सुख आम्हाला कितीही बळजबरीने दाखवले तरी आम्हाला ते आवडणार नाही ते आम्हाला आवडतही नाही कारण आम्हाला परमार्थाचे पूर्ण ज्ञान झाले आहे आणि तू परमार्थाविषयी आंधळी झाली आहेस. अरे हरीभजनाच्या सुखामुळे माझी तहान भूक कशी हरली आहे आणि चंचल असलेले मन एका ठिकाणी कसे स्थिर झाले आहे याचा तू विचार कर. लोकांना धन हे जीवापेक्षाही जास्त आवडते परंतू तेच धन आम्हाला पाषाणापेक्षाही हीन आहे. सोयरे सज्जन जन आणि वन हे सगळेच आम्हाला एकसारखे का वाटते कोणत्या गुणामुळे आम्हाला ते सर्व एक वाटते याविषयी विचार कर. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे आमच्याजवळ नेहमी आमचा पाडूरंग असतो आणि तोच आमचे सुखदु:ख सर्व काही सहन करत असतो. ”
11:55 am –
अभंग क्र. ३५१३ (तुकोबाचापत्नीसउपदेश)
गुरुकृपे मज बोलविले देवे । होईल हे घ्यावे हित काही ॥१॥
सत्य देवे माझा केला अंगीकार । आणीक विचार नाही दुजा ॥धृपद॥
होईन बळकट घालूनिया कास । हाचि उपदेश तुज आता ॥२॥
सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राम्हणाचे ॥३॥
वैष्णवांची दासी होई सर्वभावे । मुखी नाम घ्यावे विठोबाचे ॥४॥
पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिही वाद आइकिला ॥५॥
तुका म्हणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥६॥
अर्थ
हे स्त्रीये मी जे काही बोललो आहे ते गुरुकृपेमुळे आणि देवाने माझ्या मुखातून बोलाविले आहे त्यामुळे मी बोललो आहे आता यातून तुझे हित कशाने होईल ते तू ग्रहण कर. खरोखरच देवाने माझा अंगीकार केला आहे यात मला कोणतीही शंका नाही. आता तू देखील तुझी कंबर कसून धैर्य धर हाच तुला माझा आता उपदेश आहे. अंगणापुढे तुळशी वृंदावनापुढे सडासंमार्जन कर रांगोळी काढ व घरी आलेल्या अतिथी व ब्राम्हणांचे पूजन कर. सर्वभावे वैष्णवांची तू दासी हो आणि विठोबाचे नाम मुखाने घेत राहा. आमच्या पती पत्नीमधील हा संवाद म्हणजे परमार्थाचा पूर्ण बोधच आहे आणि ज्याने हा संवाद ऐकला तो धन्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हा संवाद नाही तर पाडूरंगाची कथा आहे आणि जो ही कथा ऐकेल आपल्या चित्तात धारण करेल तो या भवसागरातून तरुन जाईल. ”
11:56 am –
अभंग क्र. ३५१४ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
भूतबाधा आम्हा घरी । हे तो आश्चर्य गा हरी ॥१॥
जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥धृपद॥
जागरणाचे फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥
तुका म्हणे देवा । आहाच कळो आली सेवा ॥३॥
अर्थ
हे हरी आमच्या घरी भूतबाधा व्हावी हे तर आश्चर्यच आहे. आता तर माझ्या भक्तीचा कळशच झाला आहे तुझ्या भक्तीने मला ब्रम्हानंद सुखाचा आनंद प्राप्त व्हावा तर तसे न होता दोषच माझ्या ठिकाणी येऊन वस्ती करु लागले आहेत. हरीभजन केल्याने शांती प्राप्त व्हावी पण असे न होता माझी तळमळच अधिक झाली आहे हेच फळ हरी जागरणाचे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी आतापर्यंत तुझी केलेली सेवा ही ढोंगच आहे असे मला कळून आले आहे. ”
11:56 am –
अभंग क्र. ३५१५ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
नाही जो वेचलो जिवाचिया त्यागे । तोवरी वाउगे काय बोलो ॥१॥
जाणिवले आता करी ये उद्देश । जोडो किंवा नाश तुमची जीवे ॥धृपद॥
ठायीचेचि आले होते ऐसे मना । जावे ऐसे वना दृढ जाले ॥२॥
तुका म्हणे मग वेचीन उत्तरे । उददेशिले खरे झाल्यावरी ॥३॥
अर्थ
जोपर्यंत मी जीवाचा त्याग केला नाही देहाचा खर्च करुन तुझी सेवा केली नाही तोपर्यंत परमार्थाविषयी व्यर्थ काय बोलू ? देवा आता मला माझा मुख्य उद्देश समजला आहे आता मी प्राप्ती तुझी तरी करुन घेईल नाहीतर माझ्या जीवाचा तरी नाश करुन घेईल. पूर्वीच माझ्या मनामध्ये असे आले होते वनामधे जावे असा दृढनिश्चय देखील झाला होता. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझा उद्देश म्हणजे तुझी प्राप्ती करुन घेण्याचा आहे तो ज्यावेळी खरा होईल त्यापुढेच मी तुझ्या सेवेचे आणि तुझ्या भक्तीचे शब्द बोलेन. ”
11:56 am –
अभंग क्र. ३५१६ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
करू कवित्व काय आता नाही लाज । मज भक्तराज हासतील ॥१॥
आता आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृपद॥
अनुभवाविण कोण करी पाप । रितेचि संकल्प लाज लावी ॥२॥
तुका म्हणे आता न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥३॥
अर्थ
देवा मला जर तुझी प्राप्तीच झाली नाही तरी देखील मी तुझे कवित्व करीतच राहीलो तर भक्तराज संत साधू मला हसतील. देवा आता निवाड्याचा दिवस आला आहे एक तर तुझी प्राप्ती किंवा माझ्या देहाचा नाश, कारण जर सत्यच नसेल तर रसाला वीरस पणा येतो. देवा तुझा अनुभवच नाही तर केवळ कवित्व करावे मग असे पाप या पुढे कोण करेल नुसतेच संकल्प करत रहावे हे देखील लाज वाटण्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता देवाचा अनुभव मला आल्याशिवाय मला धीर धरवणार नाही आणि देवाची प्राप्ती झाल्याशिवाय माझा जीव स्थिर होणार नाही.


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading