आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

४ ऑक्टोबर, दिवस २७७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १२६ ते १५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३१३ ते ३३२४
“४ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ४ ऑक्टोबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३१३ ते ३३२४ चे पारायण आपण करणार आहोत.
४ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १२६ ते १५०,
126-17
आंगेचि द्रव्ये सुरसे । जे आंगेचि पदार्थ गोडसे । आंगेचि स्नेहे बहुवसे । सुपक्वे जिये ॥126॥
जे पदार्थ अंगानेच उत्तम रसभरित, गोड बव्हंशी स्निग्ध, आणि सुपक्व असतात. 26
127-17
आकारे नव्हती डगळे । स्पर्शे अति मवाळे । जिभेलागी स्नेहाळे । स्वादे जिये ॥127॥
जे आकाराने अवजड नसतात, स्पर्शाला मऊ असतात, जिभेला स्निग्ध रुचीचे असून जे स्वादिष्ट असतात. 27
128-17
रसे गाढी वरी ढिली । द्रवभावी आथिली । ठाये ठावो सांडिली । अग्नितापे ॥128॥
रसयुक्त वरून मऊ, पाणीदार (सुकलेली नव्हेत) व अग्नितापादिकांनी कसलेली नव्हेत. 28
129-17
आंगे साने परीणामे थोरु । जैसे गुरुमुखींचे अक्षरु । तैशी अल्पी जिही अपारु । तृप्ति राहे ॥129॥
गुरूपदेशाची अक्षरे थोडी असली तरी अर्थ फार थोर असतो, तसा जो आहार आकाराने स्वल्प, पण परिणामाच्या दृष्टीने थोर असून ज्याचे अल्प सेवन करूनही तृप्ति टिकून असते. 29
130-17
आणि मुखी जैसी गोडे । तैसीचिहि ते आंतुलेकडे । तिये अन्नी प्रीति वाढे । सात्त्विकासी ॥130॥
आणि जे रुचीने गोड तसेच परिणामानेही गोड अशा अन्नाविषयी सात्विक जीवाचे प्रेम असते. 130
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-17
एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचे त्राण । नीच नवे हे ॥131॥
सात्विक अन्नाचे लक्षण असे असते; ह्याच्या सेवनाने नित्य आयुष्यवर्धन होत असते. 31
132-17
येणे सात्त्विक रसे । जव देही मेहो वरीषे । तव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥132॥
अशा सात्विक अन्नांचा वर्षाव देहावर होत असता दिवसेंदिवस त्या देहाच्या आयुष्य नदीला पूर येतो. 32
133-17
सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥133॥
दिवसाच्या वृद्धीला जसा सूर्य कारण आहे त्याप्रमाणे सत्ववृद्धीस व रक्षणास हाच आहार कारण आहे. 33
134-17
आणि शरीरा हन मानसा । बळाचा पै कुवासा । हा आहारु तरी दशा । कैची रोगा ॥134॥
आणि शरीराला व मनाला बल अर्पण करणाऱ्या ह्या आहाराचा आश्रय असल्यावर तेथे रोगाचा प्रवेश कसा होणार ? 34
135-17
हा सात्त्विकु होय भोग्यु । तै भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयले जाणो ॥135॥
असा सात्विक आहार भोग्य म्हणून प्राप्त असेल तरच आरोग्याच भोग घडण्याचे शरीराचे भाग्य उदयाला आले आहे असे म्हणावे. 35
136-17
आणि सुखाचे घेणे देणे । निके उवाया ये येणे । हे असो वाढे साजणे । आनंदेसी ॥136॥
आणि त्याचे सर्व व्यापार या आहाराने सुखमय होतात; फार काय सांगावे ? त्याची वृत्ति सदा आनंदी असते. 36
137-17
ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ॥137॥
ऱ्ह्याप्रमाणे सात्विक आहाराचा फार थोर परिणाम असून तो अंतर्बाह्य सर्वप्रकारे उपकारक आहे. 37
138-17
आता राजसासि प्रीती । जिही रसी आथी । करू तयाही व्यक्ती । प्रसंगे गा ॥138॥
आता प्रसंगवशांत ज्या रसांची राजस वृत्तीच्या माणसाला आवड असते त्याचेही वर्णन करू. 38
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥17. 9॥
139-17
तरी मारे उणे काळकुट । तेणे माने जे कडुवट । का चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥139॥
फक्त मरण आणीत नाही इतकेच काय ते कमी; बाकी कडूपणाला काळकूट विषासारखे; चुन्याहून दाह करणारे जे आंबट असते. 39
140-17
कणिकीते जैसे पाणी । तैसेचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥140॥
कणीक भिजविण्यास लागणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने आत मीठ व अन्य खारट तुरट रस मिळविणे. 140
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-17
ऐसे खारट अपाडे । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषे तोंडे । आगीचि गिळी ॥141॥
असे अत्यंत खारट पदार्थ राजस प्रकृतीच्या पुरुषाला आवडतात व तो इतके कढत पदार्थ सेवन करितो की, तोंडाने जणु अग्नीच गिळतो ! 41
142-17
वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसे उन्ह मागे । राजसु तो ॥1142॥
त्या पदार्थातून निघणाऱ्या वाफांवर जणु दिव्याची वातही पेटवित येईल असे उष्ण पदार्थ तो मागत असतो. 42
143-17
वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसे तीख तो खाये । जे घायेविण रुपे ॥143॥
वावटळीपेक्षांही तुफान उडविणारे व प्रहार करील असे तिखट तो खातो की, ज्याने प्रत्यक्ष घावाशिवाय जणु जखम झाली आहे असे वाटावे. 43
144-17
आणि राखेहूनि कोरडे । आत बाहेरी येके पाडे । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥144॥
आणि आत बाहेर सारखे कोरडे व रूक्ष असे तोंडी लावणे त्याला फार आवडते. 44
145-17
परस्परे दाता । आदळु होय खाता । तो गा तोंडी घेता । तोषो लागे ॥145॥
जे पदार्थ खाऊ गेले असता दांतावर दात आदळावे असे कडक पदार्थ खाण्यात त्याला संतोष वाटतो. 45
146-17
आधीच द्रव्ये चुरमुरी । वरी परवडिजती मोहरी । जिये घेता होती धुवारी । नाकेंतोंडे ॥146॥
जातीनेच पदार्थ झणझणीत, त्यात वर मोहरीसारखी फोडणी की, जी खातांना नाकातोंडातून श्वास अगर शिंका येतात. 46
147-17
हे असो उगे आगीते । म्हणे तैसे राइते । पढिये प्राणापरौते । राजसासि गा ॥147॥
हे असो; आगीलाही मागे टाकणारे असे सणसणीत रायते त्या राजसाला प्राणापेक्षां आवडते. 47
148-17
ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषे अग्नि भडभडा । पोटी भरी ॥148॥
ज्याची कितीही भक्षण केले तरी तृप्ति होत नाही असा जिभेचा वेडा झालेला मनुष्य, अन्नाच्या मिषाने जणू पोटात अग्नीच सांठवितो. 48
149-17
तैसाचि लवंगा सुंठे । मग भुई गा सेजे खाटे । पाणियाचे न सुटे । तोंडोनि पात्र ॥149॥
त्याचप्रमाणे लवंगा, सुंठ वगैरे खाऊन भुईवर अंथरुणावर किंवा खाटेवर जो लोळतो व तोंडापुढील पाण्याचे भांडे दूर करीत नाही. 49
150-17
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववावया घातले । माजवण पोटी ॥150॥
तो त्यांनी आहार केला असे न म्हणता शरीरांत सुप्त असलेले रोगरूपी सर्प जागे करण्यासाठी पोटात जणू माजोरी पदाथच भरले आहेत. 150
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २७७ वा. ४, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३१३ ते ३३२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३३१३
नका मजपाशी । वदो प्रपंचाचे विशी ॥१॥
आता नाइकावे कानी । मज देवाविण वाणी ॥धृपद॥
येऊनिया रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥
मागे आजिवरी । झाले माप नेले चोरी ॥३॥
सांडियेली पाने । पुढे पिका अवलोकने ॥४॥
पडो नेदी तुका । आड गुंफूं काही चुका ॥५॥
अर्थ
हे जनहो तुम्ही प्रपंचाविषयी माझ्याजवळ काहीही बोलू नका. वाणीने देवाविषयी बोलणे ऐकावेसे वाटते या वाचून दुसरे काहीही मला कानाने ऐकावेसे वाटत नाही. जन्माला येऊन कोण पाप पुण्य पाहात बसणार आहे ? या पूर्वीपासून ते आतापर्यंत जे पाप पुण्याचे माप माझ्याकडून झाले ते काळरुपी चोराने चोरुन नेले आहे. धान्य पेरले की त्याला कोंब फुटतात मग ते बारीकसे कोंब पाहून आनंद वाटते परंतू ते छोटे कोंब मोठे होऊन त्याचे मोठे मोठे पाने होतात व त्याला पीक येते मग पीकाविषयी आवड निर्माण होते पानाविषयी आवड संपते अगदी त्याप्रमाणे मी माझ्या मागच्या पापपुण्याला सोडून दिले आहे व हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी पुढे सरसावलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “यापुढे मी कोणतीही चूक करणार नाही व कशात गुंतूनही राहाणार नाही. ”
4:02
अभंग क्र. ३३१४
माझे मज द्यावे । नाही करवीत नवे ॥१॥
सहस्रनामाचे रूपडे । भक्त कैवारी चोखडे ॥धृपद॥
साक्षीविण बोले । तरी मज पाहिजे दंडिले ॥२॥
तुका म्हणे माल । माझा खरा हा विठ्ठल ॥३॥
अर्थ
मी लोकांना नाम घ्यायला विठ्ठलाचे दर्शन घ्यायला सांगतो हे काही चूक नाही परंतू तुम्हाला चूक वाटत असेल तर ती माझी मलाच दयावी आणि मी तुमच्याकडून काही नवीन करुन घेतो असे देखील नाही. सहस्त्रनाम ज्याच्याकडे आहे व अनेक रुपे असे ज्याने धारण केले आहे असा तो भक्तांचा कैवारी खूप चांगला आहे. मी तुम्हाला जे सांगतो ते बोलणे जर वेद श्रृती संत यांच्या साक्षी शिवाय असेल तर मला तुम्ही दंड केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तुम्हाला विठ्ठलाचे नाम घ्यायला सांगतो कारण माझा विठ्ठलरुपी माल खरा आहे. ”
4:03
अभंग क्र. ३३१५
आम्हा लडिवाळाचे बोल । करा कवतुके नवल ॥१॥
करू स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणा हे गोविंदा ॥धृपद॥
बोबड्या उत्तरी । तुह्मां रंजवितो हरी ॥२॥
मागतो भातुके । तुका म्हणे कवतुके ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुझे लाडके भक्त आहोत त्यामुळे आम्ही कसे बोलतो याचे नवल करा त्याचे कौतुक करा. हे गोविंदा आम्ही तुझी स्तुती करण्यास जातो परंतू चुकून तुझी निंदा आमच्याकडून घडते परंतू आमचा खरा भक्तीभाव हा तर तुम्ही जाणता आहात. हे हरी मी कसेतरी बोबडे बोल बोलून तुमची करमणूक करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही कौतुकाने व लाडाने तुला प्रेमरुपी खाऊ मागत आहोत. ”
4:03
अभंग क्र. ३३१६
न लाहिजे जपे न लाहिजे तपे । आम्हासी हे सोपे गीती गाता ॥१॥
न करिता ध्यान न करिता धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरी ॥धृपद॥
जयासी नाही रूप आणि आकार । तोचि कटी कर उभा विटे ॥२॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिया पोटी । तो आम्हा संपुष्टी भक्तीभावे ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळे । जी होती निर्मळे अंतर्बाही ॥४॥
अर्थ
जो देव जपाने व तपाने साध्य होत नाही असा देव नामरुपी त्याचे गीत गायिले त्यामुळे आम्हाला सोपा झाला आहे. या हरीचे कोणत्याही प्रकारचे ध्यान केले नाही धारणा केले नाही तरी देखील तो केवळ नाम घेतले यामुळे आमच्या कीर्तनामध्ये प्रेमाने नाचतो. ज्याला रुप नाही आकार नाही तो कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे. ज्या हरीच्या पोटामधे अनंत ब्रम्हांड आहेत असा हरी आम्ही भक्तीभावाच्या बळावर आमच्या ह्दयरुपी संपुटामध्ये साठवून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे हरीचे लाडके भक्त आहेत व आतरबाह्य निर्मळ आहेत तेच हरीच्या प्राप्तीचे खरे वर्म जाणतात. ”
4:04
अभंग क्र. ३३१७
जालो बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥
केला घरात रिघावा । ठायी पडियेला ठेवा ॥धृपद॥
हाता चढले धन । ऐसे रचिले कारण ॥२॥
तुका म्हणे मिठी । पायी देउनि केली सुटी ॥३॥
अर्थ
मी देवाला शरण गेलो त्यामुळे मी बलवान झालो आहे. मी देवाच्या घरात शिरलो आणि देवाचे मुख्य स्वरुप सच्चिदानंद हे आहे ते कोठे आहे याची माहिती करुन घेतली. परमार्थरुपी मुख्य धन हाताला कसे येईल याविषयी मी उपाययोजना केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी देवाच्या पायाला मिठी दिली आणि माझी सुटका करुन घेतली. ”
4:04
अभंग क्र. ३३१८
लागपाठ केला । आता वाटा निट त्याला ॥१॥
करा जोडीचा हव्यास । आले दुरील घरास ॥धृपद॥
फोडिली भांडारे । मोहोरली एकसरे ॥२॥
अवघिया पुरते । तुका म्हणे घ्यावे हाते ॥३॥
अर्थ
मी परमार्थाचा लागपाठ केला आहे आणि ज्याने कोणी परमार्थाचा लागपाठ केला त्यालाच परमार्थाच्या सरळ वाटा प्राप्त होतील. दूर असलेले निर्गुण निराकार देवाचे स्वरुप स्वत:हून आपल्या घरी म्हणजे पंढरीत आले आहे त्याच्या प्राप्तीचा हव्यास करा. आम्ही परमार्थरुपी धनाचे भांडार फोडले आहे आणि जे भक्तजण आहेत ते हे धन लुटण्यासाठी पुढे आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हे परमार्थरुपी धन तुम्हाला लागेल तेवढे आहे सर्वाना पुरुन ते मागे उरेल एवढे आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे लागेल तेवढे हे परमार्थरुपी धन तुम्ही घ्यावे. ”
4:07
अभंग क्र. ३३१९
एकी असे हेवा । येर अनावडी जीवा ॥१॥
देवे केल्या भिन्नजाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥धृपद॥
प्रीतिसाठी भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥
तुका म्हणे लळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥
अर्थ
एखादा हरीच्या स्वरुपाशी एकरुप झालेला असतो तर एखादयाला त्याची आवड असते तर काही जीवांना त्याची आवडच नसते. याचे मुख्य कारण म्हणजे देवाने तीन प्रकारच्या जाती निर्माण केल्या आहेत उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. आपआपल्या आवडीमुळेच भेद निर्माण होतात त्यामुळे कोणी पूज्य तर कोणी निद्य वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या अंत:करणामध्ये ज्या विषयाबद्दल प्रेम कळवळा असेल त्याविषयी तो लळा धरुन तो विषय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु शकतो. ”
4:07
अभंग क्र. ३३२०
स्वामीचे हे देणे । येथे पावलो दर्षणे ॥१॥
करू आवडीने वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥धृपद॥
कळावया वर्म । हा तो पायाचाचि धर्म ॥२॥
तुका म्हणे सिद्धी । हेचि पावविली बुद्धी ॥३॥
अर्थ
मला मुक्त स्थिती प्राप्त झाली हे माझ्या स्वामीचे कृपेचीच देणगी आहे. देवा आता आम्ही तुमच्याशी आवडीने प्रेमाने वाद संवाद करु आणि तुमच्या सुखाविषयी आम्ही सारे वैष्णव चर्चा करु. देवा तुमच्या पायाची सेवा करणे तुमच्या पायाचे दर्शन घेणे हेच तुमच्या प्राप्तीचे खरे वर्म आहे हे आता आम्हाला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझी बुध्दी तुमच्या पायाच्या ठिकाणी एकनिष्ठ राहिली त्यामुळे मला तुमची प्राप्ती झाली आहे आणि ही सर्व तुमचीच कृपा आहे. ”
4:09
अभंग क्र. ३३२१
रुसलो संसारा । आम्ही आप आणि परा ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलो मुरकंडी ॥धृपद॥
परतेचि ना मागे । मोहो निष्ठुर झालो अंगे ॥२॥
सापडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥
अर्थ
आम्ही स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या संसारावर आता रुसलो आहोत. म्हणूनच मी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे व एका बाजूला मुरकूंडी देऊन पडलो आहे. मी मोहाने परत संसाराकडे मागे कधीही फिरणार नाही इतका मी सर्वांगाने निष्ठूर झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हाला देव सापडला त्यामुळे आमचे सर्व भेव गेले आहे. ”
4:09
अभंग क्र. ३३२२
हे तो वाटले आश्चर्य । तुम्हा न धरवला धीर ॥१॥
माझा फुटतसे प्राण । धाव धाव म्हणऊन ॥धृपद॥
काय नेणो दिशा । झाल्या तुम्हाविण वोसा ॥२॥
तुका म्हणे का गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा मी तुम्हाला इतकी करुणा भाकली तरी देखील तुम्ही इतका धीर धरला या गोष्टीचे मला खरोखर आश्चर्य वाटत आहे. अहो देवा माझी मदत करण्यासाठी मी तुम्हाला हाक मारतोय धावा असे मी तुम्हाला म्हणतोय तरी देखील तुम्ही माझ्या मदतीला येत नाही तुम्हाला आळवताना माझा प्राण फुटत आहे. अहो देवा मग तुमच्यावाचून सर्व दिशा ओस पडल्या आहेत की काय ही गोष्ट मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा मी तुम्हाला करुणा भाकतो तरी देखील तुम्ही का ऐकत नाहीत ? ”
4:09
अभंग क्र. ३३२३
धावा केला धावा । श्रम होऊ नेदी जीवा ॥१॥
वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेकुरा ॥धृपद॥
उशीर तो आता । न करावा हेचि चिंता ॥२॥
तुका म्हणे त्वरे । वेग करी विश्वंभरे ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचा धावा केला आहे त्यामुळे आता लवकर धावत या माझ्या जीवाला जास्त त्रास होऊ देऊ नका. देवा माझ्यावर प्रेम अमृताचा वर्षाव करा आणि मला लेकराला तुमच्या कडेवर घेऊन मिठी मारा. देवा तुम्ही उशीर करता काय याविषयी मला चिंता वाटत आहे परंतू आता तुम्ही उशीर करु नका लवकर तुम्ही यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विश्वंभरे मला भेट देण्यासाठी तुम्ही त्वरा करा घाई करा. ”
4:09
अभंग क्र. ३३२४
जोडिले अंजुळ । असे दान उताविळ ॥१॥
पाहा पाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥धृपद॥
तू स्वामी मी सेवक । आइक्य तो एका एक ॥२॥
करितो विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥
अर्थ
देवा मी माझे अंजूळ म्हणजे दोन्ही हात जोडले आहे आणि तुझ्याकडून दान घेण्यासाठी उतावीळ झालो आहे. त्यामुळे देवा तुम्ही माझ्याकडे कृपा दृष्टीने पाहा, एकदा पाहा आणि तुमच्या कृपादानाचा अनुभव मला घेऊ दयावे. देवा तू स्वामी आणि मी सेवक नेहमी असे असावे अशीच ऐक्यता आपल्या दोघाची असावी. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्यापुढे उभा राहून एवढीच विनंती करीत आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















