आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१८ ऑक्टोबर, दिवस २९१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४८१ ते ३४९२
“१८ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 18 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १८ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४८१ ते ३४९२ चे पारायण आपण करणार आहोत.
१८ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५१ ते ७५ ,
51-18
का गंगायमुना उदक । वोघबगे वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणे ॥51॥
प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले, तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. ॥51॥
52-18
न मोडिता दोन्ही आकार । घडिले एक शरीर । हे अर्धनारी नटेश्वर- । रूपी दिसे ॥52॥
अर्धनारीनटेश्वराचे रूपात जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते ॥52॥
53-18
नाना वाढिली दिवसे । कळा बिंबी पैसे । परी सिनाने लेवे जैसे । चंद्री नाही ॥53॥
शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राचे दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे. त्याच्यावर निराळे थर नाहीत ॥53॥
54-18
तैसी सिनानी चारी पदे । श्लोक तो श्लोकावच्छेदे । अध्यावो अध्यायभेदे । गमे कीर ॥54॥
तसेच श्लोक चार जणांनी वेगळे वेगळे दिसतात व अध्याय अध्याय यामुळे वेगळे भासतात खरे; ॥54॥
55-18
परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणी दोरी । एकचि जैसी ॥55॥
परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते ॥55॥
56-18
मोतिये मिळोनि बहुवे । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥56॥
पुष्कळ मोती मिळून एकावळीची माळ तयार होते, परंतु सर्वाशी कांती एकच असते ॥56॥
57-18
फुलांफुलसरा लेख चढे । द्रुती दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणे पाडे । जाणावे हे ॥57॥
माळेत फुले ओवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते; परंतु त्याचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरीता दुसरे बोट घालावे लागत नाही म्हणजे सारखाच सुगंध असतो त्याचप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे ॥57॥
58-18
सात शते श्लोक । अध्याया अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जे दुजे नाही ॥58॥
गीतेचे श्लोक सातशे असून अध्याय अठरा आहेत, परंतु देवाने या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे. दुसरे काही वर्णन केले नाही ॥58॥
59-18
आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे । प्रस्तुत तेणे निर्वाहे । निरूपण आइका ॥59॥
आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथांचे स्पष्टीकरण केले आहे, तूर्त या समजुतीने मी अठरावा अध्याय सांगतो तो ऐका. ॥59॥
60-18
तरी सतरावा अध्यावो । पावता पुरता ठावो । जे संपता श्लोकी देवो । बोलिले ऐसे ॥60॥
तर सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ॥60॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-18
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं । बुद्धि सांडूनि आस्तिकी । कर्मे कीजती तितुकी । असंते होती ॥61॥
अर्जुना ब्रम्हनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत ॥61॥
62-18
हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठा मळु । ठेविला देखो ॥62॥
असे देवाचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की, देवानी कर्मावर श्रद्धा ठेवणारास दोष ठेवला आहे. ॥62॥
63-18
तो अज्ञानांधु तव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा । तेथ नामचि एक पुढा । का सुझे तया ॥63॥
तो बिचारा ज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरलेला आहे, हे त्यास समजले नाही; मग तो प्रत्यक्ष त्याच्यापुढे असूनही ब्रह्मनामश्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल ? ॥63॥
64-18
आणि रजतमे दोन्ही । गेलियावीण श्रद्धा सानी । ते का लागे अभिधानी । ब्रह्माचिये ? ॥64॥
रज व तम दोन्ही गुणांच्या नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते, ती ब्रम्हाच्या ब्रम्हश्रद्धेच्यानावासकशी पात्र होईल ? ॥64॥
65-18
मग कोता खेंव देणे । वार्तेवरील धावणे । सांडी पडे खेळणे । नागिणीचे ते ॥65॥
मग, शस्त्राला आलिंगन देणे अथवा दोरीवर धावत सुटणे व नागिणीला हातात धरुण खेळणे. या गोष्टी जशा मरणास कारण होतात. ॥65॥
66-18
तैसी कर्मे दुवाडे । तया जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजी ॥66॥
तशी कर्मे कठीण असून ती जन्ममरण देण्यास कारणीभूत होतात, असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत. ॥66॥
67-18
ना विपाये हे उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे । येऱ्हवी येणेचि जाये । निरयालया ॥67॥
कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्याना ज्ञानाची योग्यता येते व ते कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्ति कारण होते ॥67॥
68-18
कर्मी हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी । आता कर्मठा कै वारी । मोक्षाची हे ॥68॥
आजवर कर्म करण्यामध्ये पुष्कळ काळ घालविला पण त्यापासून मोक्ष मिळाला नाही, आता यापुढे कर्मठांना मोक्षाची पाळी केव्हा येणार ? ॥68॥
69-18
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥69॥
तर कर्माचे दैन्य फिटून व त्याचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्मसंन्यास त्याचा आदर करावा ॥69॥
70-18
कर्मबाधेची कही । जेथ भयाची गोठी नाही । ते आत्मज्ञान जिही । स्वाधीन होय ॥70॥
ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते ॥70॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-18
ज्ञानाचे आवाहनमंत्र । जे ज्ञान पिकते सुक्षेत्र । ज्ञान आकर्षिते सूत्र । तंतु जे का ॥71॥
व जो कर्मसंन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करण्याचे मंत्र, अथवा ज्ञान पिकवण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू होत, ॥71॥
72-18
ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग । तरी हेचि आता चांग । व्यक्त पुसो ॥72॥
ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त होवो, तर हेच आता उघड रीतीने सांगा असे देवास पुसावे ॥72॥
73-18
ऐसे म्हणौनि पार्थे । त्यागसंन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथे । प्रश्नु केला ॥73॥
असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला ॥73॥
74-18
तेथ प्रत्युत्तरे बोली । श्रीकृष्णे जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥74॥
तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनास प्रत्युत्तर देण्यासाठी जे भाषण केले तोच हा अठरावा अध्याय व्यक्त झाला ॥74॥
75-18
एवं जन्यजनकभावे । अध्यावो अध्यायाते प्रसवे । आता ऐका बरवे । पुसिले जे ॥75॥
याप्रमाणे कार्यकारणभावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो, आता अर्जुनाने काय प्रश्न केला, तो ऐका ॥75॥
दिवस २९१ वा. १८, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४८१ ते ३४९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३४८१ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥
त्यासी ताडणाची पूजा । योग घडे बऱ्या वोजा ॥धृपद॥
अभिळाषाच्या सुखे । अंती होती काळी मुखे ॥२॥
तुका म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥
अर्थ
एखाद्या मनुष्याने दुसऱ्या एखाद्या मनुष्याकडून अलंकार घेतले आणि ते दिलेच नाही तर तो मनुष्य एक प्रकारे चोरच ठरतो. अशा लोकांची पुजा म्हणजे त्यांना मार देणे होय आणि त्यांना मार देण्याचा योग योग कधी ना कधी नक्कीच येतो. अतिशय अभिलाशा केल्याने सुरुवातीला सुख प्राप्त तर होते परंतु शेवटी त्या माणसाचे तोंड काळे होते. तुकाराम महाराज म्हणतात चोरांना हाणून मारून त्यांची माती करणे हेच त्यांच्यासाठी भूषण होय.
11:48 am –
अभंग क्र. ३४८२ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥
ऐशी अभाग्याची बुद्धि । सत्य लोपी नाही शुद्धि ॥धृपद॥
नाक कापुनि लावी सोने । कोण अळंकार लेणे ॥२॥
तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥
अर्थ
विष कालवून अमृताचा नाश केला. अशी ही अभाग्याची बुध्दी असते त्याच्या अशा वागण्याने सत्याचा नाश होतो याची त्याला शुध्द राहात नाही. स्वत:चेच नाक कापून घेतले आणि त्या जागी एक सोन्याचा अलंकार लावला तर त्याचा काही उपयोग होणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “विहिर पाडून मदार बांधावी म्हणजे त्याचे थडगे बांधावे असेच व्यर्थ कृत्य या सालू मालूचे आहे. ”
11:48 am –
अभंग क्र. ३४८३ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
कण भुसाच्या आधारे । परि ते निवडिता बरे ॥१॥
काय घोंगालि पाधाणी । ताकामध्ये घाटी लोणी ॥धृपद॥
सुइणीपुढे चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥
तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भणभण ॥३॥
अर्थ
धान्य हे भूसाच्या आतमध्ये असते परंतू त्या भूसाच्या आतून धान्याचे कण निवडणे हेच चांगले असते. एखादी घांगावलेली मूर्ख स्त्री ताकामध्ये लोणी टाकते आणि ते घोटत बसते परंतू तीला लोणी व ताक यामधील फरक कळत नाही. हे चावट स्त्री सुईनी पुढे लिंग लपवून कसे ठेवता येईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “थोडेसे जरी ज्ञान प्राप्त झाले तरी त्या ज्ञानाचा दिमाख सर्वत्र दाखवीत भणभण करत काही लोक फिरत असतात. ”
11:48 am –
अभंग क्र. ३४८४ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
विकल तेथे विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥
हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडो भाव ॥धृपद॥
गऱ्हवारे हा विधि । पोट वाढविले चिंधी ॥२॥
लावू जाणे विल्हे । तुका साच आणि कल्हे ॥३॥
अर्थ
हे दुसऱ्यांचे काव्य चोरणाऱ्या लोकांनो मातीला बुक्का नांव ठेवा आणि जेथे ते विकेल तेथे तुम्ही खुशाल विका. परंतू आमच्या ठिकाणी खोटेपणा चालणार नाही आमच्याजवळ खरे आणि खोटे निवडण्याचे ठिकाणच आहे. एका स्त्रीने पोटाला चिंध्या बांधल्या आणि मी गरोदर आहे असे सर्वाना खोटेच सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, “खरे आणि खोटे हे मला चांगलेच समजते आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची हे देखील मी चांगल्या प्रकारे जाणतो आहे. ”
11:48 am –
अभंग क्र. ३४८५ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
विषयी अद्वये । त्यासी आम्हा सिवो नये ॥१॥
देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥धृपद॥
वासनेची बुंथी । तेथे कैची ब्रम्हस्थिति ॥२॥
तुका म्हणे असता देही । हा जमे ती तेथे नाही जमेती ॥३॥
अर्थ
जे नेहमी विषयासक्त असतात त्यांना आम्ही कधीही शिवू नये व कधी शिवणारही नाही. देव निष्काम आहे त्यामुळे तो विषयास्कत माणसापासून निराळाच राहातो म्हणजेच त्यांच्यापासून वेगळा राहातो. ज्याच्या ठिकाणी वासना नेहमी असते तेथे ब्रम्हस्थिती तरी कशी उत्पन्न होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या ठिकाणी देहभाव आहे त्याला देवाची प्राप्ती कधीही होणार नाही. ”
11:49 am –
अभंग क्र. ३४८६ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
नमितो या देवा । माझी एके ठायी सेवा ॥१॥
गुणअवगुण निवाडा । म्हैस म्हैस रेडा रेडा ॥धृपद॥
जनी जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥
तुका म्हणे खडे । निवडू दळणी घडघडे ॥३॥
अर्थ
मी एका विठोबालाच नमन करतो आणि त्याच्याच ठिकाणी माझी एकनिष्ठ सेवा आहे. गुण आणि अवगुण याचा निवाडा मला चांगल्या प्रकारे करता येतो म्हणजे म्हैस ती म्हैसच आणि रेडा तो रेडाच. येथे सर्व जनामध्ये जनार्दनच वास्तव्य करत आहे याचा मला साक्षात्कार झाला आहे त्यामुळेच मी सर्वाना लोटांगण घालून दंडवत करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “धान्य दळत असताना धान्यातील खडे निवडले पाहिजे नाहीतर जाते धडधड करु लागले तर त्यामध्ये खडे आहे हे स्पष्ट होते. ”
11:49 am –
अभंग क्र. ३४८७ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
क्या गाऊ कोई सुननवाला । देखे तो सब जग ही भुला ॥१॥
खेलो आपणे राम इसाते । जैसी वैसी करहो मात ॥धृपद॥
कहासे लाऊ मधुरा बानी । रीझे ऐसी लोक विराणी ॥२॥
गिरिधर लाल तो भाव का भुका । राग कला नहिं जानत तुका ॥३॥
अर्थ
मी काय गाऊ माझे ऐकणारे कोण आहे जिकडे पाहावे तिकडे लोक सर्व विषयालाच भुललेले आहेत. त्यामुळे मी आपल्या रामाबरोबरच खेळत आहे आणि जसे जमेल तसे त्याच्याशी गप्पागोष्टी करत आहे. मी लोकांचे मनोरंजन होईल अशी मधुर वाणी कोठून आणू. तुकाराम महाराज म्हणतात, “मला एवढेच माहित आहे की गिरीधरलाल हा भक्तीभावाचा भुकेला आहे तो राग आणि कला हे काहीही जाणत नाही. ”
11:49 am –
अभंग क्र. ३४८८ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥
तीनसो हम करवो सलाम । ज्या मुखे बैठा राजाराम ॥धृपद॥
तुलसीमाला बभूत चऱ्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥
कहे तुका जो साई हमारा । हिरनकश्यप उन्हे मारहि डारा ॥३॥
अर्थ
ज्याने घर दार मंदीर या सर्वाचा त्याग करुन वनात वास केला आहे आणि पोट भरण्यासाठी जो घर घर जाऊन तुकडे मागून पोट भरतो आहे, आणि ज्याच्या मुखामध्ये राजा राम वसलेला आहे म्हणजे राजा राम प्रभूचे नांव ज्याच्या मुखात नेहमी आहे त्याला आम्ही सलाम करतो. जो तुळशीमाळा गळयामध्ये घालतो आणि जो हरीचे गुण निर्मळ मनाने गातो त्याला आम्ही सलाम करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “आमचा स्वामी कोण आहे तर ज्याने प्रल्हादाच्या रक्षणासाठी हिरण्यकश्यपूला मारले तो भगवंत आमचा स्वामी आहे. ”
11:49 am –
अभंग क्र. ३४८९ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
मंत्रतंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥
राम कहे त्यागे पगहू लागू । देखत कपट अभिमान दुर भागू ॥धृपद॥
अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानू ॥२॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥
अर्थ
प्रभू रामचंद्राविषयी जो भक्तिप्रेमभाव आपल्या अंत:करणात राखत नाही तो कितीही मंत्रतंत्र जाणणारा असला तरी आम्ही त्याला मानत नाही. जो मुखाने रामनाम घेतो त्याच्या पायाला आम्ही लागू परंतू ज्याच्या ठिकाणी आम्हाला कपट अभिमान दिसतो आम्ही त्याच्यापासून दूर पळून जाऊ. आम्ही जात कूळ हे काहीही जाणत नाही जो प्राणी नारायणाला जाणतो त्या प्राण्यालाच आम्ही मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, “जो बलवंत अशा रामाची उपासना करतो त्याच्यावरुन आम्ही आमचा जीव तन धन ओवाळून टाकू. ”
11:50 am –
अभंग क्र. ३४९० (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
चुराचुराकर माखन खाया । गौलनीका नंद कुमर कन्हया ॥१॥
काहे बराई दिखावत मोहि । जाणतहुं प्रभुजणा ते राखो भाई ॥धृपद॥
और मात सुन उखलसुं गला । बांधलिया आपना तू मोही ॥२॥
फिरत बनबन गाऊ धरावत । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥३॥
अर्थ
गवळणींचा नंदकुमार कन्हैया चोरून चोरून त्यांच्या घरी लोणी खातो. त्या गवळणी कृष्णाला म्हणतात अरे कृष्णा तू मला बढाई का दाखवत आहेस तुझा प्रभूपना मी चांगलाच जाणव आहे. कान्हा अजून एक गोष्ट तू ऐक तु स्वतःहून आपला गळा उखळाला बांधलेला आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात हे कान्होबा तू हातामध्ये काठी घेऊन वनामध्ये गायीचा चरायला घेऊन जात असतो.
11:50 am –
अभंग क्र. ३४९१ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
हरीसुं मिल दे एक हि बेर । पाछे तू फेर नावे घर ॥१॥
माल सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥धृपद॥
हरीसुख मोहि कहिया न जाय । तव तू बुझे आगोपाय ॥२॥
देखहि भाव कछु खरि हात । मिला तुका प्रभुसात ॥३॥
अर्थ
अरे तू एकदाच आपले चित्त हरीच्या ठिकाणी एकरुप कर मग तुला पुन्हा जन्ममरणरुपी फेर घालावे लागणार नाहीत. अरे तू जरी भर तरुण अवस्थेत असला आणि यमदूत जर तुला न्यायला आलेच तर ते तुझे काहीही ऐकणार नाहीत ते तुला त्यांच्याबरोबर घेऊन जातील. हरीचे सुख किती आहे व कसे आहे हे मला सांगता येत नाही ज्यावेळी तू परमार्थामध्ये पाऊल टाकशील त्यावेळी त्या सुखाचा अनुभव तुला येईलच. तुकाराम महाराज म्हणतात, “हा प्रभू आपला भक्तिभाव पाहातो आणि केवळ भक्तिभावच पाहातो दुसरे काहीही तो जाणत नाही किंवा पाहात नाही व आपला भक्तिभाव पाहून तो आपल्या हाताला धरुन त्याच्याशी आपल्याला एकरुप करतो. ”
11:50 am –
अभंग क्र. ३४९२ (हिंदुस्तानीभाषेतीलअभंग)
क्या कहुं नही बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥
क्या जीवनेकी पकरी आस । हातो लिया नहिं तेरा घास ॥धृपद॥
किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तू सब ल्या न्यारा ॥२॥
कहे तुका तू भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥३॥
अर्थ
काय करावे लोकांना कितीही चांगला उपदेश केला तरी त्यांना समजत नाही ज्यावेळी यम येईल आणि धक्का देईल त्यावेळेस त्यांना कळेल. अहो तुम्ही जीवनाची कोणती अपेक्षा धरुन जगता आहात ते काही कळत नाही तुम्ही जेवणासाठी हातात घास घेतला तर तो पोटात जाईल की नाही याचा देखील भरवसा नाही म्हणजेच तुम्ही हातात घेतलेला घास खाणे देखील तुमच्या हातात नाही. अरे वेडया तू कोणाला आपले म्हणतोस एकदा की तू मेला मग तुझ्यापासून सगळे दूर राहातील. तुकाराम महाराज म्हणतात, “लोकांनो तुम्ही वेडे झाले आहात त्यामुळे थोडासा आपल्याविषयी देखील विचार करा. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















