३० ऑक्टोबर, दिवस ३०३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६२५ ते ३६३६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३० ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 30 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३० ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६२५ ते ३६३६ चे पारायण आपण करणार आहोत.
३० ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३५१ ते ३७५,

351-18
ते देववृंद बरवे । कर्मकारण पांचवे । अर्जुना एथ जाणावे । देवो म्हणे ॥351॥
तेच दैव म्हणजे देवांचा समुदाय हे या कर्माचे पाचवे कारण आहे. देव म्हणतात:- समजलास अर्जुना ? 351
352-18
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णी । निरूपिली ॥352॥
याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची पाच प्रकारची कारणे तुला सांगितली ती ऐकलीस ना ? 352
353-18
आता हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिही ते हेतुही उघडे । दाऊ पांचै ॥353॥
आता या हेतूंच्या योगे ही कर्म घडतात, ते पाच हेतू तुला उघड करून सांगतो. 353
शरीरवाण्‌मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥18. 15॥
354-18
तरी अवसात आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवी । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळाते ॥354॥
तर अकस्मात वसंत ऋतु प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडास नवी पालवी फुटते, पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळी निर्माण होतात; 354
355-18
का वार्षिये आणिजे मेघु । मेघे वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥355॥
अथवा पावसाळ्यात मेघ उत्पन्न होतात, मेघांपासून पर्जन्यवृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टी पासून धान्य उत्पन्न होते; 355


356-18
नातरी प्राची अरुणाते विये । अरुणे सूर्योदयो होये । सूर्ये सगळा पाहे । दिवो जैसा ॥356॥
किंवा पूर्वेस अरुणोदय होतो, अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकार झाला म्हणजे दिवस होतो, 356
357-18
तैसे मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥357॥
त्याप्रमाणे अर्जुना, मन हे कर्माचा संकल्प होण्याच कारण आहे आणि तोच संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो, 357
358-18
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजाताचिया वाटा । तेव्हा कर्ता रिगे कामठा । कर्तृत्वाच्या ॥358॥
मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते, तेव्हा कर्ता कर्म करण्यास लागतो, 358
359-18
तेथ शरीरादिक दळवाडे । शरीरादिका हेतुचि घडे । लोहकाम लोखंडे । निर्वाळिजे जैसे ॥359॥
तेव्हा शरीरादिक सर्व इंद्रिये कर्माला कारण होतात. लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास त्याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्यारांनीच तयार करावा लागतो, 359
360-18
का तांथुवाचा ताणा । तांथु घालिता वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥360॥
अथवा तंतूंच्या मागांत (मार्गात) तंतू आडवे घातले म्हणजे त्या तंतूंचे वस्त्र होते; 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


361-18
तैसे मनवाचादेहाचे । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नी घडे रत्नाचे । दळवाडे जेवी ॥361॥
जसे हिऱ्याला पैलू पाडावयाचे ते हिर्‍यानेच पाडावे लागतात, तसे मन, वाचा व देह यांच्या कर्मास मनच कारण आहे. 361
362-18
एथ शरीरादिके कारणे । तेचि हेतु केवी हे कोणे । अपेक्षिजे तरी तेणे । अवधारिजो ॥362॥
या ठिकाणी, कर्माची शरीरादिक कारणे, तीच त्यांना हेतू कशी होतील. अशी जर कोणी शंका घेईल, तर सांगतो, ऐक. 362
363-18
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । का ऊसाचे कांडे ऊसा । वाढी हेतु ॥363॥
हे पहा, सूर्याच्या प्रकाशास जसा सूर्यच हेतू व कारण आहे, किंवा उसाचे कांडे हेच उसाच्या वाढीस हेतू आहे; 363
364-18
नाना वाग्देवता वानावी । तै वाचाचि लागे कामवावी । का वेदा वेदेचि बोलावी । प्रतिष्ठा जेवी ॥364॥
अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीलाच श्रम करावे लागतात, किंवा वेदांची थोरवी वर्णन करावयाची असल्यास ती वेदांनीच करावी लागते, 364
365-18
तैसे कर्मा शरीरादिके । कारण हे कीर ठाउके । परी हेचि हेतु न चुके । हेही एथ ॥365॥
तसे कर्माला शारीरादि हीच कारणे होत. हे सर्वास माहीत आहे; परंतु या ठिकाणी शारीरादिकच कर्मास हेतूही आहेत यात शंका नाही. 365


366-18
आणि देहादिकी कारणी । देहादि हेतु मिळणी । होय जया उभारणी । कर्मजाता ॥366॥
आणि देहादिक अधिष्ठानाला देहादिकच हेतू आहेत व ज्यामुळे सर्व कर्मांची उभारणी होते, 366
367-18
ते शास्त्रार्थे मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥367॥
ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले, तर हे धनंजया, ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात; आणि त्याचा हेतूही न्यायच होय. 367
368-18
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपाये धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥368॥
जसे पर्जन्याचे पाणी अवचित साळीला लावले, तर ते जमिनीत जिरते, परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो; 368
369-18
का रोषे निघाले अवचटे । पडिले द्वारकेचिया वाटे । ते शिणे परी सुनाटे । न वचिती पदे ॥369॥
अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला, तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही, 369
370-18
तैसे हेतुकारण मेळे । उठी कर्म जे आंधळे । ते शास्त्राचे लाहे डोळे । तै न्याय म्हणिपे ॥370॥
तशी हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते, तेच जर सशास्त्र होईल; तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे. 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


371-18
ना दूध वाढिता ठावो पावे । तव उतोनि जाय स्वभावे । तोही वेचु परी नव्हे । वेचिले ते ॥371॥
अथवा एका भांड्यात दूध ब्राह्मणास वाटून संपले णि दुसर्‍या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले, तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे, तथापि उतू गेले दूध खर्च झाले, (कारणी लागले) असे म्हणता येत नाही, 371
372-18
तैसे शास्त्रसाह्येवीण । केले नोहे जरी अकारण । तरी लागो का नागवण । दानलेखी ॥372॥
तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म केले तर ते जर व्यर्थ होणार नाही, तर दरवड्या गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये ? 372
373-18
अगा बावन्ना वर्णापरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । का बावन्नही नुच्चारिता । जीवु आथी ? ॥373॥
अर्जुना, बावन्न वर्णविरहित कोणता मंत्र आहे ? अथवा बावन्न वर्णा पैकी एकाचा तरी उच्चार न करणारा असा कोण प्राणी सापडेल ? 373
374-18
परी मंत्राची कडसणी । जव नेणिजे कोदंडपाणी । तव उच्चारफळ वाणी । न पवे जेवी ॥374॥
परंतु अर्जुना, जो पर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही, तोपर्यंत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्रोचाराची फलप्राप्ती होणार नाही, 374
375-18
तेवी कारणहेतुयोगे । जे बिसाट कर्म निगे । ते शास्त्राचिये न लगे । कासे जव ॥375॥
त्या प्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते, ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही, 375

दिवस ३०३ वा. ३०, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६२५ ते ३६३६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३६२५ (निर्याणाचेअभंग)
बोलिलो ते आता पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गाठी ॥१॥
जातो आता आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ॥धृपद॥
न घडे यावरी न धरवे धीर । पीडता राष्ट्र देखोनि जग ॥२॥
हाती धरोनिया देवे नेला तुका । जेथे नाही लोका पराश्रम ॥३॥
अर्थ
“कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण हे वचन” जे मी तुम्हाला पाळण्याकरता दिले आहे ते तुम्ही पाळावे व त्याप्रमाणे वागावे आणि तुम्ही जरी तसे वागले नाही तरी तुम्हाला जबरदस्तीने तसे वागण्यास लावावे एवढे पुण्य तरी माझ्या पदरी कोठे आहे ? हे माझ्या स्वामी मी तुमची आज्ञा घेऊन आता जात आहे आम्ही व्यर्थ काळ कोठे घालवावे ? हे राष्ट्रदु:खाने पीडित आहे हे पाहून मला धीर धरवत नाही आता मी येथे जास्त वेळ राहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या हाताला धरुन देवाने मला अशा ठिकाणी नेले आहे की जेथे मला लोकांचे परिश्रम पाहण्यास मिळणार नाहीत. ”
12:22
अभंग क्र. ३६२६ (निर्याणाचेअभंग)
करावे ते काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥
अवघे एकमय । राज्य बोलो चालो नये ॥धृपद॥
दुजयाची सत्ता । न चलेसी झाली आता ॥२॥
आता नाही तुका । पुन्हा हारपला लोका ॥३॥
अर्थ
आता कोणत्याही प्रकारचे काम करणे म्हणजे उगाच श्रम वाढवण्यासारखे आहे. आता सर्वत्र एका ब्रम्हाचेच सामर्थ्य त्यावाचून दुसरे काहीही बोलणे चालणे नको आहे. आता एका ब्रम्हावाचून दुसऱ्या कशाचीही सत्ता न चालण्यासारखी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता मी या लोकासाठी हरपलो आहे पुन्हा यांना मी दिसणार नाही. ”
12:22
अभंग क्र. ३६२७ (निर्याणाचेअभंग)
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळी विठो आम्हासी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥३॥
अर्थ
आता आम्ही वैकुंठाला जात आहोत आमच्यावर सर्वाची कृपा असू दयावी सर्वाना माझी हीच विनंती सांगावी. खूप वेळ झाला आहे पाडूरंग उभा आहे तो श्रीरंग मला वैकुंठाला बोलावित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या अंत:काळी प्राणाच्या वेळी विठोबा मला पावला आणि मी कुडीसहीत म्हणजे माझ्या देहासहीत गुप्त झालो आहे. ”
12:22
अभंग क्र. ३६२८ (निर्याणाचेअभंग)
न देखिजे ऐसे केले । या विठ्ठले दुःखासी ॥१॥
कृपेचिये सिंहासनी । अधिष्ठानी बैसविले ॥धृपद॥
वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनी ॥२॥
तुका म्हणे अवघे ठायी । मज पायी राखिले ॥३॥
अर्थ
विठ्ठलाने मला पुन्हा दु:ख दिसणार नाही असे केले आहे. विठोबाने माझ्यावर कृपा केली आणि जगाचे अधिष्ठान असलेल्या ब्रम्हरुप सिंहासनावर मला बसविले आहे. क्षीरसागरामध्ये शय्येवर बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दु:खाचा वारा लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “विठ्ठलाने मला सर्वत्र व्यापक केले आहे आणि त्याच्या पायाच्या ठिकाणी मला आश्रय दिला आहे. ”
12:22
अभंग क्र. ३६२९ (पाईकाचेअभंग)
पाईकपणे जोतिला सिद्धांत । शुर धरी मात वचन चित्ती ॥१॥
पाइकीवाचून नव्हे कधी सुख । प्रजांमध्ये दुःख न सरे पीडा ॥धृपद॥
तरि व्हावे पाईक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥
पाइकीचे सुख जया नाही ठावे । धिग त्यांनी ज्यावे वायाविण ॥३॥
तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥४॥
अर्थ
खरा पाईक म्हणजे सेवक व्हावे हाच सिध्दात मी दृढ केला आहे आणि जो खरा शूर आहे तोच मी सांगितलेले वचन चित्तात धारण करील. खरा सेवक झाल्यावाचून सुख कधीही मिळणार नाही लोकांमध्ये राहून दु:ख आणि पीडा कधीही संपणार नाही. त्यामुळे जीवावर उदार होऊन खरा सेवक बनावे आणि जो खरा सेवक बनतो त्यांचा सर्वभार माझा स्वामी पाडूरंग वाहात असतो. पाईकीचे सुख म्हणजे खऱ्या सेवकाचे सुख ज्यांना माहीतच नाही त्यांच्या जगण्याचा धिक्कार असो ते व्यर्थच जगत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “दिवसामध्ये आठ प्रहार आहेत व त्या आठ प्रहारापैकी एक क्षण देखील देवाची सेवा करण्याचा करार केला तरी सेवक होऊन तो अपार असे सुख भोगतो. ”
12:22
अभंग क्र. ३६३० (पाईकाचेअभंग)
पाईकीचे सुख पाईकासी ठावे । म्हणोनिया जीवे केली साटी ॥१॥
येता गोळ्या बाण साहिले भडिमार । वर्षाता अपार वृष्टि वरी ॥धृपद॥
स्वामीपुढे व्हावे पडता भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥
पाईकांनी सुख भोगिले अपार । शुर आणि धीर अंतर्बाही ॥३॥
तुका म्हणे याहि सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥
अर्थ
पाईकाचे म्हणजे सेवकाचे सुख सेवकालाच माहित असते त्यामुळे तर मी माझ्या जीवावर उदार होऊन देवाची सेवा करीत आहे. कितीही दु:खाच्या गोळया त्रिविधतापाचे बाण आणि अपार लोकनिंदा जरी सेवकाच्या अंगावर आली तरी तो सहन करतो. जो युध्दप्रसंगी स्वामीच्या पुढे जाऊन स्वामीवर येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन ते सहन करतो त्याचे ते कार्य शोभनीय असते. ज्या सेवकांच्या आतरबाह्य शौर्य आणि धैर्य हे ठासून भरलेले आहे त्यांनी अपार असे सुख भोगलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या सिध्दांताच्या खुणा जो कोणी शहाणा आहे तोच जाणू शकतो व तोच अपार सुख भोगू शकतो. ”
12:22
अभंग क्र. ३६३१ (पाईकाचेअभंग)
पाईक तो जाणे पाईकींचा भाव । लगबग ठाव चोरवाट ॥१॥
आपणा राखोनि ठकावे आणीक । घ्यावे सकळीक हिरूनिया ॥धृपद॥
येऊ नेदी लाग लागो नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥२॥
ऐसे जन केले पाईके पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाईक त्रैलोकींचा ॥४॥
अर्थ
जो खरा सेवक आहे त्यालाच माहित असते की सेवक होण्यासाठी कोणते कौशल्य अंगी असावे आणि त्याला हेही माहित असते की जरी वेळप्रसंगी शत्रूच्या तावडीत आपण सापडलो तर तेथून लगबग करुन बाहेर पडण्यासाठी चोरवाटा कोणत्या आहेत, वेळप्रसंगी कसे वागावे, कोणत्या प्रकारच्या युक्त्या कराव्यात हे देखील त्याला माहित असते. असे जे शूर शिपाई आहेत त्यांना आपल्याजवळचे रक्षण कसे करावे आणि शत्रूला कसे फसवावे तसेच शत्रूजवळच्या वस्तू किंवा इतर मौल्यवान वस्तू कशा लुटून आणाव्यात हे देखील त्यांना कळते. परंतू लुटून आणलेल्या मालाचा आरोप आपल्यावर येऊ नये तसेच शत्रूही आपल्या पाठीमागे लागू नये अशा प्रकारे जो वर्तन करतो त्या शिपायाला त्याचा स्वामी मान तर देतोच परंतू सारे जग त्याला मान्यता देते. ज्या लोकांना कोणी भीक घालीत नाही अशा लोकांना हा खरा स्वामी सेवक आपल्याबरोबर घेतो आणि त्याला देखील आपल्यासारखे निपुण करुन त्याला देखील जगामध्ये मान्यता मिळवून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, “असे शूर शिपाई ज्या राजाच्या अधिपत्याखाली काम करतात तो राजा त्रैलोक्यामध्ये अतिशय नेक असून सर्वात बलवान असतो. ” (सारांश :- देवाच्या देखील सेवकाने असेच लपून छपून काम क्रोधरुपी शत्रूवर हल्ला करुन त्यांचा पराभव करावा. )
12:23
अभंग क्र. ३६३२ (पाईकाचेअभंग)
पाईकांनी पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा साठा मोडोनिया ॥१॥
पारखिये ठायी घेउनिया खाणे । आपले ते जन राखियेले ॥धृपद॥
आधारेंविण जे बोलता चावळे । आपले ते कळे नव्हे ऐसे ॥२॥
सांडिता मारग मारिती पाईक । आणिकासी शीक लागावया ॥३॥
तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥४॥
अर्थ
संत महात्मे साधू हे देखील देवाचे शूर शिपाई आहेत त्यांनी परकीयांचा म्हणजे चार्वाकादिकाचा मतमतांतरांचा नाश करुन भक्ती अद्वैत नामसंकीर्तन करुन कर्माचा मार्ग चालविला आहे. संतांनी परकीयांचा नाश करुन आपल्या विचाराची खाण लोकापुढे मांडली व आपल्या लोकांचे रक्षण केले. जे लोक वेदशास्त्राचा आधार घेऊन बोलत नाही व्यर्थ काहीतरी चावळल्यासारखे बडबड करतात असे मनुष्य आपल्या जातीचे म्हणजे देवाचे भक्त नाहीत हे लगेच कळून येते. जे लोक वेदशास्त्राला अनुसरुन वागत नाही त्या लोकांना संत महात्मे देवाचे खरे सेवक शासन करतात व त्यांना शासन केले की इतर लोक घाबरतात आणि इतरांना वेदशास्त्र मार्गाने चालण्याचे चांगले वळण लागावे यासाठीच ते संत महात्मे वेदशास्त्रानुसार न चालणाऱ्या लोकांना शासन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “विश्वातील लोकांना संत महात्मे आपल्या विश्वासात घेऊन देव वेद आणि धर्म यांच्याविषयी त्यांना उपदेश करुन त्यांना मोक्ष सुख देतात. ”
12:23
अभंग क्र. ३६३३ (पाईकाचेअभंग)
पाईक तो प्रजा राखोनिया कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईक पाईका नाईक । भाव सकळीक स्वामिकाजी ॥धृपद॥
तृणवत तनु सोने ज्या पाषाण । पाईका त्या भिन्न नाही स्वामी ॥२॥
विश्वासावाचूनि पाईकासी मोल । नाही मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाईका जतन करी त्यासी ॥४॥
अर्थ
संत महात्मेरुपी देवाचे खरे सेवक प्रजारुपी भक्तांच्या कुळाचे रक्षण करुन परकीयांचे म्हणजे दुष्ट चार्वाकादिकांचे मूळ जाणून त्यांचे छेदन करतात. तोच एक खरा सेवक आहे व सर्व सेवकांमध्ये सर्वश्रेष्ठ सेवक आहे ज्याचा भाव स्वामीच्या कार्‍याकडे असतो. स्वामीचे कोणतेही कार्य करण्याकरता सेवक आपले शरीर अगदी तृणाप्रमाणे मानून स्वामीचे कार्य करतो व सोने म्हणजे त्याला दगडाप्रमाणे वाटते असे सेवक आणि स्वामी हे भिन्न नाहीत त्या दोघाचेही ऐक्य झालेले आहे. स्वामीच्या विश्वासावाचून सेवकाला मोलच येत नाही जर स्वामीचा विश्वास नसेल तर सेवकाने कितीही मोठया गप्पागोष्टी केल्या तरी त्या मिथ्या ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, “सेवक आपल्या स्वामीला कधीही उणेपणा येऊ देत नाही स्वामीचा मोठेपणा सेवक कायम राखत असतो. ”
12:23
अभंग क्र. ३६३४ (पाईकाचेअभंग)
धनी ज्या पाईका मानितो आपण । तया भिते जन सकळीक ॥१॥
जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥धृपद॥
आपुलिया सत्ता स्वामीचे वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥२॥
कमाइची हीणे पडिली उदंडे । नाही तया खंड येती जाती ॥३॥
तुका म्हणे तरि पाईकीच भली । थोडीबहु केली स्वामिसेवा ॥४॥
अर्थ
ज्या शिपायाला स्वत: स्वामी मान देतो त्या शिपायाला सर्व लोक भीत असतात. जे सेवक जीवावर उदार होऊन स्वामीचे कोणतेही कार्य असले तरी करतात तेच सेवक आपल्या शूरपणाचा आपल्या नेकपणाचे भूषण मुकूटमण्यासारखे सर्वत्र मिरवू शकतात. मिरवत असतात. आपल्या जीवावर उदार होऊन जो सेवक स्वामीचे कोणतेही कार्य करतो तोच आपल्या सत्तेने स्वामीचे सर्व वैभव आणि सर्व प्रकारचे सुख व गौरव भोगत असतो. शूरपणाची कमाई कमी असलेले लोक याठिकाणी अनेक आहेत आणि एक एक पैशासाठी ते राजाच्या घरी हेलपाटे मारत असतात त्यांचे हेलपाटे कधीही संपत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे स्वामीची थोडी फार जरी सेवा केली तर ती अती उत्तम व स्वत:ला खरा सेवक म्हणून घेणे हे खूप चांगले. ”
12:23
अभंग क्र. ३६३५ (पाईकाचेअभंग)
पाईकपणे खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीने ॥१॥
पाईक जाणे मारिते अंग । पाईकासी भंग नाही तया ॥धृपद॥
एके दोही घरी घेतले खाणे । पाईक तो पणे निवडला ॥२॥
करूनि कारण स्वामी यश द्यावे । पाईका त्या नांव खरेपण ॥३॥
तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाही स्वामिस्थळा गेल्याविण ॥४॥
अर्थ
जो एकनिष्ठेने स्वामीची सेवा करतो तोच स्वामीच्या बक्षीसास पात्र होतो व त्याचीच किर्ती सर्वत्र होते. युध्दप्रसंगी कसे युध्द करावे हे ज्याच्याकडे कौशल्य आहे तोच खरा शूर शिपाई आहे व त्याच्या सेवकपणाला कधीही भंग येत नाही. जो शूर शिपाई शत्रूच्या एक दोन घरामध्ये घुसून त्यांचा माल लुटून आणतो तो शिपाई सर्व शिपायामध्ये निराळाच निवडला जातो अगदी त्याप्रमाणे साधकरुपी शिपायाने आपल्या अंत:करणातील काम क्रोधरुपी एक दोन विकारांना मारले पाहिजे. विविध प्रकारचे युक्त्या प्रयुक्त्या करुन स्वामीला यश मिळवून दयावे अश्या शिपायाला खरा शिपाई म्हणून नांव मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा शूर शिपायाला एका स्वामीवाचून दुसरे कोणतेही ठिकाण माहित नसते व तो तेथे गेल्यावाचून राहातही नाही. ”
12:23
अभंग क्र. ३६३६ (पाईकाचेअभंग)
उंच निच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढया बळी निवडिला ॥१॥
स्वामिकाजी एक सर्वस्वे तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥धृपद॥
प्रसंगावाचूनि आणिती आयुर्भाव । पाईक तो नांव मिरवी वाया ॥२॥
गणतीचे एक उंच निच फार । तयांमध्ये शूर विरळा थोडे ॥३॥
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥४॥
अर्थ
सेवकांच्या ओळीमध्ये कसे कसे सेवक आपल्या उच्च नीच पदावर असतात ते पाहा कोणी सेवक भित्रे असतात, कोणी बलाढय असतात, तर कोणी शूर असतात. स्वामीचे कार्य करण्यासाठी सर्वस्वाने अगदी कायावाचामनाने काही सेवक तत्पर असतात, तर काही सेवक कामकुचर असतात, तर काही सेवक आशाबध्द असतात. असे कितीतरी सेवक आहेत की जे युध्दप्रसंग नसतानाही केवळ शूरपणाचा अविर्भाव आणतात व स्वत:ला मी खरा सेवक आहे असे व्यर्थ म्हणून घेतात. अशा प्रकारे शिपायाची जरी ओळ लावली तर त्यामध्ये उच्च नीच पदावर अनेक शिपाई असतात आणि या सर्वामध्ये शूर शिपाई हे थोडेच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “स्वामी खऱ्या सेवकाला चांगल्या प्रकारे ओळखतात व त्यालाच मानसन्मान देऊन योग्य प्रकारचे मोल देत असतात. ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading