१६ ऑक्टोबर, दिवस २८९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४५७ ते ३४६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१६ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 16 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १६ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४५७ ते ३४६८ चे पारायण आपण करणार आहोत.
१६ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १ ते २५,

॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी
॥ अथ अष्टादशोऽध्यायः अध्याय अठरावा ॥
मोक्षसंन्यासयोग ॥


अध्याय अठरावा
1-18
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥1॥
हे देवा ! तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहा. आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करणारे वायूच आहा. तुमचा जयकार असो. ॥1॥
2-18
जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥2॥
देवा ! तुम्ही सर्वात बलवान असून दुःखाचा समूळ नाश करणारे आहा. वेद व शास्त्ररुपी वृक्षांचे फळ असून लाभदायक आहा. तुमचा जयजयकार असो. ॥2॥
3-18
जयजय देव सकल । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥3॥
देवा ! तुम्ही सम्पूर्ण असून ज्यांनी विषयाचा त्याग केला आहे, त्याच्यावर कृपा करणारे आहा व लीलेने कालाच्या क्रीडेस आपण कारण असून कालातीत असे पूर्ण आहा, तुमचा जयजयकार असो. ॥3॥
4-18
जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥4॥
देवा, तुम्ही अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुमचे दोंद वाढले आहे आणि वरचेवर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे, तुमचा जयजयकार असो. ॥4॥
5-18
जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥5॥
देवा, तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे निरसन करणारे आहा व सर्व जगाला कारणीभूत आहा, तुमचा जयजयकार असो. ॥5॥


6-18
जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥6॥
हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहा; तसेच जगद्रूप मेघांचे धारण करणारे आकाशच आहा; तसेच जगद्रूप उत्त्पतीचे मूळस्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥6॥
7-18
जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदममदनमदभेद । दयार्णव ॥7॥
हे देवा ! उपाधिरहित आहा व अविद्यारुपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहा आणि शमदमेकरून काममदाचा नाश करणारे व दयेचा समुद्रच आहा, तुमचा जयजयकार असो. ॥7॥
8-18
जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥8॥
हे देवा ! तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहा व भाविक भक्तांचे चित्तरुपी मंदिरातील दीप आहा आणि संसारतापाचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥8॥
9-18
जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥9॥
हे देवा ! तुमची असून तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहा; व भजभक्ताधीन असून भजनास योग्य व मायेस अगम्य आहा, तुमचा जयजयकार असो. ॥9॥
10-18
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥10॥
हे देवा गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्ष आहा व आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान, आहा, तुमचा जयजयकार असो ॥10॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-18
हे काय एकैक ऐसैसे । नानापरीभाषावशे । स्तोत्र करू तुजोद्देशे । निर्विशेषा ॥11॥
याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रत्यायांनी विशेषणे देण्यास योग्य नाही, असे जे सर्वविशेष भावरहित तुम्ही. त्या तुमची स्तुती किती काय ? ॥11॥
12-18
जिही विशेषणी विशेषिजे । ते दृश्य नव्हे रूप तुझे । हे जाणे मी म्हणौनि लाजे । वानणा इही ॥12॥
ज्या विशेषणाने तुमची स्तुती करावी, ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे, हे मी जाणतो, म्हणून तुमच्या ह्या वर्णाची लाज वाटते. ॥12॥
13-18
परी मर्यादेचा सागरु । हा तवचि तया डगरु । जव न देखे सुधाकरु । उदया आला ॥13॥
परंतु समुद्राला, मर्यादा आहे, असा जो ज्याचा लौकिक आहे तो जो पर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच. ॥13॥
14-18
सोमकांतु निजनिर्झरी । चंद्रा अर्घ्यादिक न करी । ते तोचि अवधारी । करवी की जी ॥14॥
सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्घ्य देत नाही. तर चंद्रच त्याच्याकडून करवितो. ॥14॥
15-18
नेणो कैसी वसंतसंगे । अवचितिया वृक्षाची अंगे । फुटती तै हे तयाहि जोगे । धरणे नोहे ? ॥15॥
वसंत ऋतू सुरु झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते, हे समजत नाही, त्या प्रमाणे माझी हि स्थिती झाली असे का समजू नये ? ॥16॥


16-18
पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजे कवण ? । का जळे शिवतले लवण । आंग भुले ॥16॥
सूर्यविकासिनी कमल सूर्यकिरण पडताक्षणीच लज्जा सोडून प्रफुल्लीत होतो, किंवा मीठ पाण्यात घातल्यावर तद्रूप होते. ॥16॥
17-18
तैसा तूते जेथ मी स्मरे । तेथ मीपण मी विसरे । मग जाकळिला ढेकरे । तृप्तु जैसा ॥17॥
तसा जेंव्हा मी तुमचे स्मरण करतो, तेंव्हा आपले स्वरूप विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य इच्छेवाचून जसा ढेकारावर ढेकर देतो. ॥17॥
18-18
मज तुवा जी केले तैसे । माझे मीपण दवडूनि देशे । स्तुतिमिषेच पा पिसे । बांधले वाचे ॥18॥
तसे, हे श्रीगुरुराया माझ्या मीपणात देशांतराला दडवून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या रूपाने माझ्या वाचेला वेड लावले आहे, अशी माझी स्थिती केली. ॥18॥
19-18
ना येऱ्हवी तरी आठवी । राहोनि स्तुति जै करावी । तै गुणागुणिया धरावी । सरोभरी की ॥19॥
किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी, तर तुमचे गुण व तुम्ही याची निवड केली पाहिजे. ॥19॥
20-18
तरी तू जी एकरसाचे लिंग । केवी करू गुणागुणी विभाग । मोती फोडोनि सांधिता चांग । की तैसेचि भले ॥20॥
तर हे प्रभो, तुम्ही एक रसाचेच बनलेले लिंग आहा, त्या आपले ठिकाणी गुणागुणी विभाग कसा करू ? हे पहा, मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते मूळचे अखंड असलेले चांगले नव्हे काय ?. ॥20॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-18
आणि बाप तू माय । इही बोली ना स्तुति होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथे ॥21॥
आणि तुम्ही मायबापा आहा असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकुरपणाच्या उपाधीने आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ लागतो. ॥21॥
22-18
जी जालेनि पाइके आले । ते गोसावीपण केवी बोले ? । ऐसे उपाधी उशिटले । काय वर्णू ॥22॥
मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हास धनी म्हणून कसे म्हणून अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्याचे काय वर्णन करू ?. ॥22॥
23-18
जरी आत्मा तू एकसरा । हेही म्हणता दातारा । तरी आंतुल तू बाहेरा । घापतासी ॥23॥
हे प्रभु तुम्ही जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणार्‍या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते. ॥23॥
24-18
म्हणौनि सत्यचि तुजलागी । स्तुति न देखो जी जगी । मौनावाचूनि लेणे आंगी । सुसीना मा ॥24॥
म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने चढविता येत नाहीत. ॥24॥
25-18
स्तुति काही न बोलणे । पूजा काही न करणे । सन्निधी काही न होणे । तुझ्या ठायी ॥25॥
तर काही न बोलणे हीच आपली स्तुती काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न होणे या गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. ॥25॥

दिवस २८९ वा. १६, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४५७ ते ३४६८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३४५७ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
टंवकारूनि दृष्टी लावुनिया रग । दावी झगमग डोळ्यांपुढे ॥१॥
म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥धृपद॥
दीपाचिया ज्योती कोंडियेले तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥
पडदा लावोनिया दीप चहू कोनी । बैसोनि आसनी मुद्रा दावी ॥४॥
नैवेद्यासी म्हणे करावे पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥
झाला उपदेश कवळ घ्या रे मुखी । आपोशन शेखी बुडविले ॥५॥
पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविका लोकाप्रती ॥६॥
कायावाचामने सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥७॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणे । गुरुत्वभूषणे भोग भोगी ॥८॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥९॥
योगाची धारणा नाही प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥१०॥
वैराग्याचा लोप हरीभजनी विक्षेप । वाढविले पाप मतिलंडे ॥१२॥
तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥
अर्थ
शाक्तउपासक गुरु आपल्या भोळया शिष्याचे दोन्हीही डोळे आपल्या बोटाने त्याला रग लागेपर्यंत दाबून धरतात आणि नंतर त्याला एकदम डोळे उघडून टवकारुन पाहायला लावतात मग त्या शिष्याच्या डोळयापुढे एक वेगळीच झगमग दिसते व तो भोळा शिष्य त्यालाच ब्रम्ह समजू लागतो. मग ते म्हणतात की शिष्याला समाधी लागली आहे असे खोटे सांगून शिष्याला आणि लोकांना दोघानाही ते फसवतात. एका खोलीमध्ये अनेक दिवे लावतात त्या दिव्यांचा उजेड खोलीमध्ये कोंडून घेतात व शिष्याला रात्रीच्यावेळी हे शाक्तलोक उपदेश करत�
11:40 am –
अभंग क्र. ३४५८ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
गुरुमार्गामुळे भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाही ब्रह्मी ॥१॥
पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥धृपद॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥
काही टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥
नसता करुनी होम खाती एके ठायी । म्हणती पाप नाही मोक्ष येणे ॥४॥
इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥
नाही शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणे द्रव्य काही ॥६॥
तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥
अर्थ
अशा या ढोंगी शाक्तगुरुमार्गामुळे सर्व लोक भ्रष्ट होतात आणि ते लोकांना म्हणतात की ब्रम्हाला कोणतीही जात कुळ नाही. असे हे लोक पवित्र माणसांना कंटक म्हणून संबोधतात आणि याची संगती नको असे म्हणून त्याचा त्याग करतात अनामिक म्हणजे अत्यांजादिकांना हे आपले मानतात. हे शाक्तउपासक गुरु काय करतात तर ढोर, लोहार, चांभार, न्हावी, वेसकर, कुंभार, रस्ते झाडणारे इत्यादी बारा बलुतेदारांना व त्यांच्या घरातील स्त्रीया पोरांना उपदेश करत असतात. असे हे शाक्तउपासक असलेले लोक जारणमारण मंत्रतंत्र जादूटोणा इत्यादी चमत्काराचा उपयोग करतात व त्याच चमत्काराला बळी पडून ब्राम्हण वर्ग देखील त्यांचे शिष्य होतात व त्यांच्या स्वधर्माची फजिती करुन घेतात. शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वर्णन नसलेला खोटा होम हे लोक करतात आणि सर्व जातीतील लोक एकत्र येऊन हे लोक जेवण करतात व हे म्हणतात यामधे कोणतेही पाप नाही याने मोक्षच मिळणार आहे.

अभंग क्र. ३४५९ (वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
शाक्त गधडा जये देशी । तेथे राशी पापाच्या ॥१॥
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रिये ॥धृपद॥
क्रोधरूपे वसे काम । तीचे नाम जपतसे ॥२॥
मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्ती सांटविला ॥३॥
स्तवुनिया पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥
तुका म्हणे भगवती । नेइल अंती आपणापे ॥५॥

जो देवीची उपासना करणारा शाक्त आहे, तो मूर्ख गाढव ज्या देशांत राहतों, त्या ठिकाणीं पापाच्या राशी असतात. १. त्यानें आपल्या सर्व पुण्याचा नाश केल्यामुळें, त्याच्यावर इंद्रियांचा घाला ( दरवडा ) पडतो; मग ते विषयाचा गोंधळ घालतात. २. प्रत्यक्ष क्रोधरूपानें कामाची वस्ती जिच्या ठिकाणीं आहे, त्या देवीच्या नामाचा जे जप करतात; किंवा, प्रत्यक्ष क्रोधरूपानें जिच्या ठिकाणीं काम आहे, अशा मांगिणीच्या मुलीस देवी असें मानून, तिचा ते जप करतात. ३. ती देवी दारू पिणारी असून, मांगिणीच्या स्वभावाची आहे , तिचें ध्यान मनानें करून, ज्यानें आपल्या हृदयांत विटाळ सांठविला आहे; अथवा मांगिण जातीच्या मुलीस देवी असें समजून तिची पूजा करीतात व तिला दारू प्यावयास देतात, आणि तिने ती थोडी प्याल्यानंतर राहिलेली उष्टी दारू, प्रसाद म्हणून हे शाक्त पितात. अशा प्रकारच्या विटाळानें त्यांचे चित्त विटाळलेलें असतें. ४. त्या रांडेचें स्तवन करून पूजा केली तर, त्या भांडखोरांचें भांडण करण्याविषयीं दांतांस दांत लागत नाहींत ( एक सारखें भांडत राहतात ), अथवा, ह्या रांडेचें स्तवन करून, जे पूजा करतात, अशा ह्या भांडखोरांच्या तोंडाशीं लागूं नये. ५. तुकाराम महाराज म्हणतात, असें केल्यानें, ही देवी, अखेरीस आपल्या जवळ नेईल, अशी त्यांची भावना असते. ६/३४३३.

अभंग क्र. ३४६० (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥
अधर्माचे उबड पीक । धर्म रंक ते गावी ॥धृपद॥
न पिके भूमि कापे भारे । मेघ वारे पीतील ॥२॥
तुका म्हणे अवघी दुःखे । येती सुखे वस्तीचि ॥३॥
अर्थ
ज्या देशामधे शाक्त वास करतात त्या देशातील राजा आणि प्रजा दोघेही द्वाड असतात. ज्या गावामधे शाक्त असतात त्या गावात अधर्माचे पीक भरपूर येते आणि धर्म दुबळा झालेला असतो. शाक्त लोक ज्या भूमीवर राहातात ती भूमी कधीही पिकत नाही त्यांच्या ओझ्याने तेथील भूमी थरथर कापते आणि मेघ वारे पिऊन घेतात म्‍हणजे मेघ आकाशात तर असतात परंतू मेघ पृथ्वीवर पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्या ठिकाणी शाक्त उपासक लोक असतात त्या ठिकाणी जगातील सर्व दु:खे आनंदाने वस्ती करण्यास येतात. ”
11:44 am –
अभंग क्र. ३४६१ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
ऐका कलीचे हे फळ । पुढे होईल ब्रम्हघोळ ॥१॥
चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥धृपद॥
पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥
वामकवळ मार्जन । जन जाईल अध:पतन ॥३॥
तुका हरीभक्ती करी । शक्ती पाणी वाहे घरी ॥४॥
अर्थ
कलिचे पुढील फळ ऐका पुढे चालून वर्णसंकरन होईल. चार वर्ण व अठरा जात एकत्र बसून एका पंक्तीत भोजन करतील. नीच जातीतील स्त्रीयांची लोक पूजा करतील व त्याचे उष्टे मद्य सेवन करतील. डाव्या हाताने जेवण करतील त्यामुळे लोक अध:पतनाला जातील. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे शाक्त उपासकांनो मूर्खांनो शुध्द अंत:करणाने हरीभक्ती करा शक्ती तुमच्या घरी पाणी वाहील. ”
11:44 am –
अभंग क्र. ३४६२ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
ऐसे कलियुगाच्या मुळे । झाले धर्माचे वाटोळे ॥१॥
सांडुनिया रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोम ॥धृपद॥
शिवो नये ती निळी । वस्त्रे पाघरती काळी ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥
अर्थ
कलियुगामध्ये अधर्माचे प्रमाण वाढेल त्यामुळे धर्माचे वाटोळेच होत आहे. या कलियुगामध्ये “राम राम” असे म्हणण्याचे सोडून ब्राम्हण लोक देखील फकीराचे कपडे घालून डोम डोम असे म्हणून भीक मागत आहेत. अहो ज्या निळया व काळया वस्त्राला शिवू नये असे वस्त्र अंगावर ते पाघरतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो ब्राम्हण लोकांचे कर्म कोणते होम, हवन, जप, तप, अध्ययन, अध्यापन हे आहे ही वृत्ती टाकून देऊन ते फकीराचे कपडे घालून भीक मागत फिरत आहेत. ”
11:45 am –
अभंग क्र. ३४६३ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
अवघ्या पापे घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥धृपद॥
काम क्रोध मद्य अंगी । रंगला रंगी अवगुणी ॥२॥
करिता पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणीही ॥३॥
अर्थ
सर्व पापे एकत्र येऊन शाक्त उपासक घडला आहे. हे पाडूरंगा त्याचा स्पर्श होऊन मला विटाळ होईल त्यामुळे माझ्या अंगाला त्याचा विटाळ देखील नको आहे. देवा त्याच्या अंगी काम क्रोध हे विकार जडलेले असतात मद्यपान करण्याची खोड त्याच्या अंगी असते व अनेक प्रकारचे रंगामध्ये तो रंगून गेलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “शाक्त उपासक लोक कोणत्याही प्रकारचे पाप कर्म करताना शंका मनामध्ये धरत नाहीत. ”
11:45 am –
अभंग क्र. ३४६४ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
वारिता बळे धरिता हाती । जुलुमे जाती नरकामधी ॥१॥
रंडीदासाप्रति काही । उपदेश तो ही चालेना ॥धृपद॥
जन्म गेला वाताहात । थोर घात येठायी ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥
अर्थ
शाक्त उपासक लोकांना असे कर्म करु नका असे जरी सांगितले त्यांच्या हाताला धरुन जरी त्यांना त्या कर्मापासून मागे ओढले तरी ते ऐकत नाही बळजबरीने ते नरकामध्ये जातातच. अशा या शाक्त भक्तांना रंडीचे दास असणाऱ्या भक्तांना कितीही उपदेश केला तरी ते ऐकत नाही त्यांच्यापुढे कोणतेही उपदेश चालत नाहीत. अशा या शाक्त उपासकांना कितीही उपदेश केला तरी त्यांच्यापुढे काही चालत नाही यांचा जन्म व्यर्थ जाऊन त्यांच्या जन्माची वाताहातच म्हणजे हानीच होते आणि ते स्वत:चा मोठा घात करुन घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा तुझ्या कथेला हे लोक नांव ठेवतात. ”
11:45 am –
अभंग क्र. ३४६५ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥
तिची त्या पडली सवे । मागे धावे म्हणोनि ॥धृपद॥
शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥
तुका म्हणे शिंदळीचे । बोलता वाचे निंद्य ते ॥३॥
अर्थ
शाक्त उपासकांची माय सुकरीन आहे आणि ती रस्त्यावरची विष्ठा खाते. तिला तर विष्ठा खाण्याची सवय असतेच त्यामुळे हे शाक्त तिचे मुले आहेत ते देखील तिच्या पाठीमागे मागे विष्ठा खाण्यास धावत असतात. शाक्त उपासकांची माय गाढवीन असते ती भुंकत भुंकत वेशीपर्यंत जाते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे ही गाढवीन ओरडत ओरडत वेशीपर्यंत जाते परंतू हे शिंदळीचे आहेत याचे नांव देखील वाणीने घेतले तरी ते निंदय आहेत. ”
11:45 am –
अभंग क्र. ३४६६ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
हरीहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकी ॥१॥
ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥धृपद॥
अंगी कवडे घाली गळा । परडी कळाहीन हाती ॥२॥
गळा गांठा हिंडे दारी । मनुष्य परी कुतरी ती ॥३॥
माथा सेंदुर दात खाती । जेंगट हाती सटवीचे ॥४॥
पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥
ऐशा छंदे चुकली वाटा । भाव खोटा भजन ॥६॥
तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ते ॥७॥
अर्थ
काही लोक हरी (शिव) आणि हर (विष्णु) या श्रेष्ठ देवतांना सोडून क्षुल्लक देवी देवतांविषयी भक्तिभाव मनात ठेवतात. त्या देवाची व त्यांच्या भक्तांची विटंबना कशी होते ते ऐका. अंगामध्ये विशिष्ट प्रकारचे वस्त्र घालून गळयामध्ये खूप साऱ्या कवडयांच्या माळा घालतात व हातात काळीबेरी परडी धरतात. गळयामध्ये अनेक प्रकारच्या कवडयांची माळे घालतात व दारोदारी भीक मागत हिंडतात, ती आहेत तर मनुष्य, पण लक्षणे त्यांच्या अंगामध्ये सर्व कुत्र्यांची आहेत. माथ्याला शेंदूर लावून ती सटवी अंगामधे देवीचा संचार आणून दात खाते आणि जेंगट नावाचा वादय वाजविते. ज्या देवताचे पोट मोठे असून पशूसारखे म्हणजे हत्तीसारखे सोंड ज्या देवताला आहे त्या देवताची हे लोक पूजा करतात. अशा प्रकारे विविध छंदाने हे लोक खऱ्या परमार्थाची वाट चुकलेली असून त्यांच्या भजनामध्ये खोटा भक्तिभाव असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “जे लोक विष्णू आणि शिव या दोन देवतांना सोडून इतर देवतांची पूजा करतात त्यांची विटंबनाच होते. ”
11:45 am –
अभंग क्र. ३४६७ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
कांद्यासाठी झाले ज्ञान । तेणे जन नाडिले ॥१॥
काम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥धृपद॥
पूजेलागी द्रव्य मागे । काय सांगे शिष्याते ॥२॥
तुका म्हणे कैचे ब्रम्ह । अवघा भ्रम विषयांचा ॥३॥
अर्थ
कांदे खाण्यासाठी शाक्त उपासक गुरु शिष्यांना असे सांगतात की, सर्वत्र ब्रम्ह आहे कांदयामध्ये देखील ब्रम्हच आहे त्यामुळे कांदे खाण्यास काही हरकत नाही व त्यांचा हा उपदेश ऐकून भोळे लोक फसतात. अशा गुरुंच्या ठिकाणी काम क्रोधांची बुचबुच असते आणि कुत्रे जसे भुंकतात तसे हे निर्लज्ज लोक काहीतरीच बडबड करत असतात. आपली पूजा करुन घेण्यासाठी तो गुरु शिष्याला द्रव्य मागतो अशा गुरुकडून शिष्याला काय उपदेश मिळणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो सर्व विषयाचा भ्रम ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ बम्ह येईल तरी कोठून ? ”
11:45 am –
अभंग क्र. ३४६८ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
सांडुनिया पंढरीराव । कवणाते म्हणो देव ॥१॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकाते देव म्हणता ॥धृपद॥
सांडुनिया हिरा । कोणे वेचाव्या त्या गारा ॥२॥
तुका म्हणे हरीहर । ऐसी सांडुनिया धुर ॥३॥
अर्थ
एका पंढरीरायाला सोडून मी दुसऱ्या कोणाला देव म्हणू ? पंढरीरायाला सोडून इतर कोणाला देव म्हणताना माझ्या चित्ताला खूप लाज वाटते. गारा जरी हिऱ्यासारख्या चमकत असल्या तरी हिरा सोडून कोण गारा वेचत बसणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “हरी आणि हर या देवतांना सोडून इतर देवतांची पूजा कोण करेल ? ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading