आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

८ एप्रिल, दिवस ९८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ११६५ ते ११७६
“८ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ८ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ८ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ११६५ ते ११७६ चे पारायण आपण करणार आहोत.
८ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १२६ ते १५०,
126-9
हे असो पर्वताचिये हृदयीचे । जेवि पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेवि कर्मजात प्रकृतीचे । न लगे मज ॥126॥
ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही, त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही.
127-9
एऱ्हवी इये प्राकृती विकारी । एकु मीचि आहे अवधारी । परि उदासीनाचिया परि । करी ना करवी ॥127॥
त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही. एरव्ही त्या प्रकृतीच्या कार्याला एक कारण आहे असे समज; परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करीत नाही.
128-9
दीपु ठेविला परिवरी । कवणाते नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारी । राहाटे तेहि नेणे ॥128॥
ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करू नको असे कोणाला सांगत नाही, आणि कोण काय व्यापार करतो हेही जाणत नाही
129-9
तो जैसा का साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मी अनासक्तु । मी भूती असे ॥129॥
तो साक्षिभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ति होण्यास कारणीभूत होतो त्याप्रमाणे, सृष्टीची उत्पत्ति, स्थिति व लय या कर्मात मी उदासीन असून भूतांच्या ठिकाणी आहे.
130-9
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगो बहुता उपपत्ती । येथ एकवेळा सुभद्रापती । येतुले जाण पा ॥130॥
हा एकच अभिप्राय खरा आहे. पुनः पुनः पुष्कळ पर्यायांनी काय सांगू ? तर हे सुभद्रापति, एकदां एवढे लक्षात ठेव.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥9. 10॥
131-9
जे लोकचेष्टा समस्ता । जैसा निमित्तमात्र का सविता । तैसा जगत्प्रभवी पंडुसुता । हेतु मी जाणे ॥131॥
अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे, त्याप्रमाणे, जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे जाण.
132-9
का जे मिया अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥132॥
का की, मायेचा अंगीकार मी केला आहे, व तिच्या योगाने प्राणिमात्राची उत्पत्ति होते. म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी अशी लोकांची समजूत आहे.
133-9
आता येणे उजिवडे निरुते । न्याहाळी पा ऐश्वर्ययोगाते । जे माझा ठायी भूते । परी भूती मी नसे ॥133॥
तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ति जरी होते, तरी भूतांत मी नाही, ही माझी अद्भूत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहाळून पहा.
134-9
अथवा भूते ना माझा ठायी । आणि भूतांमाजि मी नाही । या खुणा तु कही । चुको नको ॥134॥
अथवा प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत व मी त्यांच्या ठिकाणी नाही हे वर्म तू कधी विसरू नकोस.
135-9
हे सर्वस्व आमुचे गूढ । परि दाविले तुज उघड । आता इंद्रिया देऊनि कवाड । हृदयी भोगी ॥135॥
हे माझे मुख्य वर्म असुनही तुला उघड करुन दाखविले आहे. तर आता तू आपल्या इंद्रियांची दारे बंद करून त्यांना कळू न देता आपल्या ह्रदयात याचा उपभोग घे.
136-9
हा दंशु जव नये हाता । तव माझे साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेवि भुसी कणु ॥136॥
पार्था, हे वेदांतसिद्धांतांचे वर्म जोपर्यत हाती लागले नाही, तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे कोड्यात शोधूं लागले असता दाण्याचा एक कण सुद्दा सांपडत नाही.
137-9
एऱ्हवी अनुमानाचेनि पैसे । आवडे कीर कळले ऐसे । परि मृगजळाचेनि वोलांशे । काय भूमि तिमे ॥137॥
एरव्ही, अनुमानाच्या साह्याने माझे खरे स्वरूप कळले असे वाटते. पण मृगजलाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का ?
138-9
जे जाळ जळी पांगिले । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले । परि थडिये काढूनि झाडिले । तेव्हा बिंब के सांगे ॥138॥
माशाला धरण्याकरिंता जे जाळे पसरतात त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे नदीच्या कांठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते का सांग बरे ?
139-9
तैसे बोलवरि वाचाबळे । वायाचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारे बोधावेळे । आथि ना होईजे ॥139॥
त्याचप्रमाणे ‘ आम्हाला अनुभव आला ‘ असे शब्दाच्या व वाणीच्या योगाने कितीएक लोक वरकरणी दाखवितात; पण मग खऱ्या बोधाच्या परिक्षेची वेळ आली म्हणजे त्या वेळेस खरोखर त्यांना ज्ञान झालेले नाही (असे अनुभवास येते), व दुसऱ्यास ते करूनही देता येत नाही.
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥9-11॥
संदर्भित अन्वयार्थ
मम = माझा, परम् = परम, भावम् = भाव, अजानन्तः = न जाणणारे, मूढाः = मूढ लोक हे, मानुषीम् = मनुष्याचे, तनुम् = शरीर, आश्रितम् = धारण करणाऱ्या, माम् = मज, भूतमहेश्वरम् = संपूर्ण भूतांचा महान ईश्वर असणाऱ्याला, अवजानन्ति = तुच्छ समजतात (म्हणजे आपल्या योगमायेने संसाराच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात संचार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य समजतात) ॥9-11॥
अर्थ
माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला-तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. ॥9-11॥
140-9
किंबहुना भवा बिहा या । आणि साचे चाड आथि जरी मिया । तरि तुम्ही गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥140॥
किंबहुना या संसाराला भिऊन माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले, ते आपल्या लक्षात पूर्ण वागीव.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-9
एऱ्हवी वेधली दिठी कवळे । ते चांदणियाते म्हणे पिवळे । तेवि माझा स्वरुपी निर्मळे । देखाल दोष ॥141॥
एरवी, काविळीच्या योगाने दृष्टी ग्रासल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे, निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपावर त्याला दोष दिसतात.
142-9
नातरी ज्वरे विटाळले मुख । ते दुधाते म्हणे कडू विख । तेवि अमानुषा मानुष । मानाल माते ॥142॥
किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते, त्याचप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे ते मला मानतात.
143-9
म्हणऊनि पुढती तू धनंजया । झणे विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वाया । जाइजेल गा ॥143॥
म्हणून, हे धनंजया, वारंवार या अभिप्रायाला विसरू नको. जर नुसत्या स्थुल दृष्टीने पाहू लागलास, तर तुझे पाहणे व्यर्थ होईल.
144-9
पै स्थूलदृष्टी देखती माते । तेचि न देखणे जाण निरुते । जैसे स्वप्नीचेनि अमृते । अमरा नोहिजे ॥144॥
ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे जे मला स्थूल दृष्टीने पाहतात, ते खरोखर मला पहात नाहीत.
145-9
एऱ्हवी स्थूलदृष्टी मूढ । माते जाणती कीर दृढ । परि ते जाणणेचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥145॥
एरवी अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात, परंतु त्यांचा समज त्यांच्या खऱ्या समजाच्या आड येतो.
146-9
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठी घातु झाला तया हंसा । माजी रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनिया ॥146॥
ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरीता हंस पक्षी आकाशातून उडी टाकून प्राणास मुकतो;
147-9
सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचे कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥147॥
गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला, तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे ? त्याचप्रमाणे, कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार ?
148-9
हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । का रत्ने म्हणोनि गारा । वेची जेवि ॥148॥
नीलमण्याचा दोन सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले; किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या,
149-9
अथवा निधान हे प्रगटले । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले । का साउली नेणता घातले । कुहा सिंहे ॥149॥
अथवा द्रव्याचा ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे असे समजून खैराचे निखारे पदरांत घेतले, अथवा आपलीच पडछाया पाण्यात पाडली आहे असे न जाणता सिंह विहीरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकला,
150-9
तेवि मी म्हणोनि प्रपंची । जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिही चंद्रासाठी जेवि जळीची । प्रतिमा धरिली ॥150॥
त्याप्रमाणे, प्रपंचात मी खास आहे, अशा कृतनिश्चयाने जे प्रपंचातच गुंग होतात, ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरिंता प्रयत्न करणाऱ्याप्रमाणे फसतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ९८ वा, ८, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११६५ ते ११७६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ११६५
हीन माझी याति । वरी स्तुती केली संती ॥१॥
अंगी वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥धृपद॥
मी एक जाणता । ऐसे वाटतसे चित्ता ॥२॥
राख राख गेलो वाया । तुका म्हणे पंढरीराया ॥३॥
अर्थ
देवा एकतर माझी जात हीन आहे आणि त्यावर संतांनी माझी भरपूर स्तुती केली आहे. देवा मी परमार्थामध्ये जे काही प्राप्त केले आहे ते सर्व हरण करण्याकरताच अभिमान माझ्या अंगी राहायला पाहता आहे. देवा अहंकाराने मला असे वाटायला लागले की या जगामध्ये मीच सर्व काही जाणत आहे. तुकाराम महाराजांचा देवा स्तुती व अभिमान यांनीच मी वाया चाललो आहे त्यामुळे तुम्हीच माझे रक्षण करावे.
अभंग क्र. ११६६
माता कापी गळा । तेथे कोण राखी बाळा ॥१॥
हे का नेणा नारायणा । मज चाळविता दिना ॥धृपद॥
नागवी धावणे । तेथे साह्य व्हावे कोणे ॥२॥
राजा सर्व हरी । तेथे दुजा कोण तारी ॥३॥
तुझ्या केल्याविण । स्थिर वश नव्हे मन ॥४॥
तुका म्हणे हरी । सूत्र तुझ्या हाती दोरी ॥५॥
अर्थ
जर आईनेच आपल्या मुलाचा गळा कापला तर त्या बाळाचे रक्षण कोण करणार ? देवा हे काय तुम्हाला कळत नाही काय मग मला गरिबाला तुम्ही स्तुतीच्या (लोकांनी केली) मार्गाने नेऊन उगाच का फसवितात ? एखाद्या कठीण प्रसंगी एखाद्याने त्याच्या मदतीला कोणाचातरी धावा करावा आणि जो मदतीसाठी येणार आहे त्यांनेच त्याला लुटावे, मारावे मग त्याचे रक्षण कोणी करावे ? जर राजाने प्रजेला लुटले तर तेथे कोणी कोणाला सहाय्य करावे ? देवा तु मला तुझे केल्याशिवाय माझे मन स्थिर होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझे सर्व सूत्रे तुझ्याच हाती आहेत.
अभंग क्र. ११६७
गाऊ नेणे परी मी काही गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥
ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥धृपद॥
वेश्या ज्याच्या नामे तारिली गणिका । अजामेळा सारिखा सारिखा पापरासी ॥२॥
चरणींच्या रजे अहिल्या तारिली । रूपवंत केली कुबजा दासी ॥३॥
पृथिवी तारिली पाताळासी जाता । तुका म्हणे आता आम्ही किती ॥४॥
अर्थ
मला हरीचे गुणगाणं तालबद्ध स्वरबद्ध गाता येत नाही पण मी कसे का होईना पांडुरंगाचे गुणगान गाईन आणि त्याला शरण जाईल. सर्व ब्रह्मांडाचा नायक जो आहे त्याचाच मी अंकित आहे त्यामुळे मी बलवान झालो आहे आणि या कारणामुळे यम आणि कळिकाळ मला काय करणार आहे ? गणिका नावाची वैश्या व अजामेळ सारखा महापाप राशी तरला गेला व ज्याच्याचरणरजाने अहिल्या सारखी स्त्री तरली गेली आणि कुबजा दासी तिला रूपवंत केले. तुकाराम महाराज म्हणतात हिरण्याक्षाने पृथ्वीला पाताळात नेले व हरीने त्या पृथ्वीला पातळ काढून एवढी मोठी पृथ्वी ज्या हरीने तारली त्याच्यासाठी आम्हाला तारणे हे काहीच कठीण नाही.
अभंग क्र. ११६८
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥धृपद॥
अल्प असे ज्ञान । अंगी ताठा अभिमान ॥२॥
तुका म्हणे लंड । त्याचे हाणोनि फोडा तोंड ॥३॥
अर्थ
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर खाल्ली या न्यायाने गाजराची पुंगी तयार करण्यासाठी काही कष्ट करावे लागत नाही आणि समजा गाजराची पुंगी नाही वाजली तर ती खाऊन टाकली तरी चालते, त्याप्रमाणेच या जगामध्ये अध्यात्म करताना कोणत्याही प्रकारची गुरुभक्ती, हरिभक्त न करता अनेक नवनवीन साधू तयार झाले आहेत. देहामध्ये अभिमान त्यांनी जतन केला आहे. अशा लोकांनी कितीही पाठ पाठांतर केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. या अशा माणसांच्या ठिकाणी ज्ञान कमी असते परंतु त्यांच्या अंगी अभिमानाचा ताठा फार मोठा असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे लंड म्हणजे अभिमान वृत्तीच्या माणसांचे हाणून मारून तोंड फोडा.
अभंग क्र. ११६९
परद्रव्य परनारी । अभिलासूनि नाक धरी ॥१॥
जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥धृपद॥
सोवळ्याची स्फीती । क्रोधे विटाळला चित्ती ॥२॥
तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥
अर्थ
जो कोणी परद्रव्य किंवा परनारी यांची इच्छा करुन नाक धरुन प्राणायम करण्याचे ढोंग करतो. अशा दांभिक मनुष्याच्या आचरणाला आग लागो तो गाढव व्यर्थच आपल्या आचाराचा भार वाहात आहे. सोहळयाची स्थिती मी कोणालाच स्पर्श वगैरे करत नाहीये असे तो सर्वत्र सांगत फिरतो पण त्याचे चित्त मात्र क्रोधाने विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “असे मनुष्य अंतरंगात वेगळे आणि बाह्यरंगात वेगळे आचरण करुन फक्त सोंग दाखवित फिरतात. ”
अभंग क्र. ११७०
टिळा टोपी उंच दावी । जगी मी एक गोसावी ॥१॥
अवघा वरपंग सारा । पोटी विषयांचा थारा ॥धृपद॥
मुद्रा लाविता कोरोनि । मान व्हावयासी जनी ॥२॥
तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढे जाती ॥३॥
अर्थ
काही मनुष्य शरीराला बारा टिळा लावतात उंच टोपी घालतात आणि या जगात मीच एक उच्च गोसावी आहे असे दाखवीत. त्यांच्या पोटी विषयांना थारा असतो असे मनुष्य वर-वर साधू पणाचे सोंग मिरवितात. आपल्याला जनमाणसात मान मिळावा यासाठी ते कोरून मुद्रा लावतात. तुकाराम महाराज म्हणतात अशी कितीतरी माणसे नरका ला गेले आहेत आणि पुढेही जातील.
अभंग क्र. ११७१
ऐसे संत जाले कळी । तोंडी तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढे भांग वोढविली ॥धृपद॥
भांगभुकी हे साधन । पची पडे मद्यपान ॥२॥
तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥३॥
अर्थ
कलियुगामध्ये असे अनेक साधुसंत झाले आहेत की त्यांच्या तोंडामध्ये तंबाखू आहे आणि नळीने गुडगुडे ओढणे त्यांना फार आवडते. हे साधुसंत स्नानसंध्या सोडून देतात आणि भांग, गांजा ओढण्यात तल्लीन झालेले असतात. भांग घोटणे भुरकी खाणे तसेच चारचौघांमध्ये बसून दारू पिणे हे त्यांच्या पचनी पडलेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक सोंगी ढोंगी आहेत मग त्यांना पांडुरंग कसा दिसेल, कसा त्यांच्यामध्ये वास्तव्य करेल ?
अभंग क्र. ११७२
जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी ॥१॥
आपघर ना बापघर । चिंती मनी व्यभिचार ॥धृपद॥
सेजे असोनिया धणी । परद्वार मना आणी ॥२॥
तुका म्हणे अस्सल जाती । जातीसाठी खाती माती ॥३॥
अर्थ
जी जातिवंत व्याभीचार करणारी स्त्री आहे तिला जरी सांगितले की “व्यभिचार करू नये”. तिला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न कोण करेल कारण ती कोणाचेही ऐकणार नाही. ती तिच्या घरी असो किंवा बापाच्या घरी असो तिच्या चिंतनाता नेहमी व्याभिचारच असतो. त्या स्त्रीचा पती जरी तिच्या जवळ झोपलेला असला तरी तिचे चित्त परपुरुषा विषयासक्त असते. तुकाराम महाराज म्हणतात तीच खरी अस्सल व्यभिचारी जातीची आहे कारण “जातीसाठी खाती माती” म्हणजे तिला लोक जरी नांव ठेवत असले तरी तिचा स्वभाव ती सोडत नाही म्हणजे ती अस्सल व्यभिचारी आहे.
अभंग क्र. ११७३
अंधळ्याची काठी । हिरोनिया कडा लोटी ॥१॥
हे का देखण्या उचित । लाभ किंवा काही हित ॥धृपद॥
चाळवूनि हाती । साकर म्हणोनि द्यावी माती ॥२॥
तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥
अर्थ
जर डोळस मनुष्याने आंधळ्या व्यक्तीची काठी होऊन त्याला पर्वताच्या कड्यावरून ढकलून दिले तर असे त्याचे वागणे उचित आहे काय ? त्यामध्ये त्याला काही लाभ आहे काय ? आणि त्याचे त्यामध्ये काही हित होणार आहे ? अंध व्यक्तीच्या हातात साखर म्हणून माती द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात आणि त्या डोळस व्यक्तीने आंधळ्या व्यक्तीच्या वाटेवर काटे पसरविणे हे योग्य आहे काय, त्याप्रमाणे देवा तुम्ही डोळस आहात आणि मी अंध आहे त्यामुळे तुम्ही मला या भवसागरातून तारण्यासाठी योग्य मार्ग दाखवा.
अभंग क्र. ११७४
प्रीतिचिया बोला नाही पेचपाड । भलतसे गोड करूनि घेई ॥१॥
तैसे विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीने गाये नाम तुझे ॥धृपद॥
वेडे वाकडे ते बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥
तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥
अर्थ
प्रेमाच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कपट नसते आणि दोन प्रेमळ मनुष्य हे एकमेकांचे बोलणे गोड मानून घेतात. त्या प्रमाणे हे विठोबा राया माझ्या आणि तुझ्यात प्रेमाचे नाते आहे त्यामुळे तू माझे बोलणे गोड मानून घ्यावा. लहान मूल वेडेवाकडे बोबडे बोलते तरी देखील आई बापाला त्या बालकाचे बोल गोड वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात हे माझ्या जीवाच्या सख्या जिवलगा पांडुरंगा तुला माझी दया कृपा करुणा येऊ द्यावी.
अभंग क्र. ११७५
माझे मज कळो येती अवगुण । काय करू मन अनावर ॥१॥
आता आड उभा राहे नारायणा । दयासिंधुपणा साच करी ॥धृपद॥
वाचा वदे परी करणे कठीण । इंद्रिया अधीन जालो देवा ॥२॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरी उदास मायबापा ॥३॥
अर्थ नाही टाका अभंग तपासा
अभंग क्र. ११७६
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगो नये ॥१॥
उदंडचि जाले जन्मोनिया मेले । होऊनिया गेले राव रंक ॥धृपद॥
त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावे ॥३॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥
अर्थ
जर तुम्हाला थोरवी करायची असेल तर विठ्ठलाची करा मानवाची कीर्ती कोणालाही सांगू नका. असे मनुष्य अनेक आहेत कि ते जन्माला आलेत आणि मेलेत हि. पूर्वी असे अनेक राजे झाले आहेत की ते नंतर रंकही झालेत आणि अनेक रंक देखील राजे झालेले आहेत. अशा लोकांचे वर्णन मात्र चराचरात कोणीही करत नाही, पण विठ्ठलाचे वर्णन चारही वेद, सहाही शास्त्रे करतात. नारायण अक्षय आहे व त्याची कीर्ती कळत नाही त्यामुळे नारायणाचे ध्यान सतत करत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर विठ्ठलाचे ध्यान सतत तुमच्या चित्तामध्ये करत राहाल तर तुमच्या जन्म आणि मरण याची व्यथा दूर होईल.
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















