99. कुळदेवता कुळदेवी एकच का वेगळे ? उपासना कशी करावी ? कुळ दैवत 96 कुळी मराठा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

What is kUL DEVATA ? How do you know your kUL DEVATA?

कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.

कुलदैवत व गोत्र शोधणे

१) प्रथम आपले भाऊबंद शोधावे , त्यांचे कुलदैवत असेल तेच तुमचे कुलदैवत असते . हजार पिढ्या बदलल्या तरी कुलदैवत बदलत नाही .
२) आपल्या मूळ गावात जावे , तेथे कुणीतरी आपल्या आडनावाचे , गोत्राचे असेलच , त्यांचे कुलदैवत असेल तेच तुमचे कुलदैवत असते .
३) जवळपास जे तीर्थक्षेत्र असेल तेथील उपाध्ये यांचेकडे पूर्वजांच्या नोंदी सापडतात . उदा पूर्वी प्रत्येक पिढीत एकतरी जण नारायण नागबली करत असत . त्यावेळी त्यांचे पूर्वजांचे नोंदी , गोत्र , कुलदैवत त्रंबकेश्वर येथे नोंद आहेत . इतर ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा नाशिक , त्रंबकेश्वर येथे जाऊन चौकशी करावी . पूर्वजांची सात आठ पिढ्यांची नावे सुद्धा त्यांच्या चोपडीत सापडतात .
४) मूळ गावातील उपाध्ये , गुरुजी यांना जाऊन विचारावे .
आजकाल सर्व तयार माहिती हवी असते , चौकशी कुणी करत नाही . भाऊबंद , नातेवाईक यांचेशी प्रेमाचे संबंध ठेवत नाहीत . जुन्या पिढीतील एखादी व्यक्ती सर्व माहिती देऊ शकते पण त्यांना कोणी विचारत नाही .

अशोककाका कुलकर्णी

कुलदेवतेची उपासना कशी करावी

कुलदेवतेची उपासना !
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.
कुलदेवता या शब्दाचा अर्थ !
‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना !

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !

शीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे अावश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो; म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे अन् जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मीदेवी असेल, तर श्री महालक्ष्मीदेव्यै नम: । असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

कुलदेवता ठाऊक नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूतीघेतली आहे. ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘कुलदेवता’ या शब्दातील ‘दे’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

श्री खण्डोबा (जेजुरी क्षेत्र सभी की कुलदेवी श्री तुळजा भवानी (श्री तुलजापुर क्षेत्र ) महाराष्ट्र में सामान्य रुप से सभी के लिये श्री खण्डोबा तथा साढ़े तीन शक्तिपीठ की मान्यता जनसामान्य में रूढ़ है  । यह इस प्रकार है –
कुळाची कुळदेवी :>
१). तुळजाभवानी, (महाराष्ट्र),
२). तुळजाभवानी, (राजस्थान),
३). महाकाली-महाकालेश्वर,
४). प्रभावती देवी व प्रभाकर,
५). अंबाबाई, (कोल्हापूर),
६). महालक्ष्मी, (कोल्हापूर),
७). शंकर-पार्वती, सप्तशृंगी,
८). ज्वालामुखी भवानी,
९). महाकाली, जगदंबा,
१०). रेणुका (माहूरगड),
११). कात्यायनी शंकर,
१२). चामुंडेश्वरी देवी,
१३). प्रभावती देवी,
१४). उमा-महेश्वर,
१५). ज्वालादेवी,
१६). ज्योतिर्लिंग,
१७). गौरीशंकर,
१८). कालीमाता,
१९). मांढरदेवी,
२०). योगेश्वरी,
२१). दुर्गादेवी,
२२). जोगेश्वरी,
२३). माहेश्वरी,
२४). रुख्मिणी,
२५). ब्रम्हमाया, इत्यादी



********************************************************************************************

संकलक : ह.भ.प. धनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T 
MOB. : 9422938199 / 9823334438
Email: more.dd819@dd819

संपूर्ण-माहिती-पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading