२४ नोव्हेंबर, दिवस ३२८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९७६ ते १००० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९२५ ते ३९३६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २४ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२४ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९७६ ते १०००,

976-18
मुखाभासेसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेवीण जैसा । पाहाता ठाके ॥976॥
अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर नेल्यावर ज्याप्रमाणे पहाणारा हा पहातेपणाशिवाय असतो, 76
977-18
तैसे नेणणे जे गेले । तेणे जाणणेही नेले । मग निष्क्रिय उरले । चिन्मात्रचि ॥977॥
त्याप्रमाणे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता ज्ञानालाहि घेऊन जाते मग केवळ निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरतें. 77
978-18
तेथ स्वभावे धनंजया । नाही कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥978॥
अर्जुना, या नैष्कर्म्यभूमिकेच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्यसिद्धि असे म्हणतात. 78
979-18
ते आपुले आपणपे । असे तेचि होऊनि हारपे । तरंगु का वायुलोपे । समुद्रु जैसा ॥979॥
ते आपले स्वरूप असून नसणेपणाच्या ज्ञानामुळे जो असणेपणा येतो तोहि जाऊन केवळ असणेपणा राहातो, तसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायु नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐक्य पावतात79
980-18
तैसे न होणे निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे । सर्वसिद्धीत सहजे । परम हेचि ॥980॥
तसे कोणतेहि कर्म न होणे अशी जी स्थिति तिला नैष्कर्यसिद्धि म्हणतात आणि हीच साहजिकतः सर्व सिद्धीत मुख्य होय. 980
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


981-18
देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु । का सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥981॥
कळस बसल्यावर देवळाच्या कामाचा शेवट होतो; अथवा गंगा समुद्रांत पावली म्हणजे जसे पुढे तिचे नांव रहात नाही; किंवा सोने शुद्ध करीत असता सोळा आणे कस लागला म्हणजे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते, 81
982-18
तैसे आपुले नेणणे । फेडिजे का जाणणे । तेहि गिळूनि असणे । ऐसी जे दशा ॥982॥
त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहिसे केले, ते ज्ञानहि जेव्हा नाहिसे होईल, अशी जी स्थिति, 82
983-18
तियेपरते काही । निपजणे आन नाही । म्हणौनि म्हणिपे पाही । परमसिद्धि ते ॥983॥
तिच्यापेक्षां दुसरे काही प्राप्त होणे राहात नाही; म्हणूनतिला परमसिद्धि असे म्हणतात. 83

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥18. 50॥
984-18
परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि- । काळी पावे ॥984॥
पण जो कोणी एखादा मोठा भाग्यवान् असतो त्याला श्रीगुरूच्या कृपेची जेव्हा प्राप्ति होते तेंव्हा हीच आत्मसिद्धि प्राप्त होते. 84
985-18
उदयताचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । का दीपसंगे कापुरु । दीपुचि होय ॥985॥
सूर्य उगवतांच जसा अंधकाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या ज्योतीस कापुर लागतांच तो दिवा होतो, 85


986-18
तया लवणाची कणिका । मिळतखेवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवी ॥986॥
अथवा मिठाचा खडा जसा पाण्यात मिळवितांच जसा जलरूप होऊन राहतो; 86
987-18
का निद्रितु चेवविलिया । स्वप्नेसि नीद वाया । जाऊनि आपणपया । मिळे जैसा ॥987॥
किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केल्यावर मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळस्वरूपाप्रत प्राप्त = होतो, 87
988-18
तैसे जया कोण्हासि दैवे । गुरुवाक्यश्रवणाचि सवे । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥988॥
तशी दैवयोगाने ज्या कोणीची वृत्ति गुरुवाक्यश्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, 88
989-18
तयासी मग कर्म करणे । हे बोलिजैलचि कवणे । आकाशा येणे जाणे । आहे काई ? । ॥989॥
मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल ? पहा की, आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणे जाणे घडते का ? 89
990-18
म्हणौनि तयासि काही । त्रिशुद्धि करणे नाही । परी ऐसे जरी हे काही । नव्हे जया ॥990॥
म्हणून ज्यास आमसिद्धि प्राप्त झाली आहे, त्याला खरोखरच काही एक कर्तव्य उरत नाही, 990
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


991-18
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पै किरीटी । वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥991॥
परंतु ज्या कोणी एखाद्या भाग्यवानला गुरूचे वचन कानावर येतांक्षणीच आत्मसाक्षात्कार होते, 91
992-18
येऱ्हवी स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनी । रजतमे कीर दोन्ही । जाळिली आधी ॥992॥
अशा अधिकारी पुरुषाला सोडून एखाद्या मंदाधिकारी साधकांनी स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्यकर्म व निषिद्धकर्म या इंधनाने रज व तम हे गुण अगोदर जाळून टाकले, –92
993-18
पुत्र वित्त परलोकु । यया तिहीचा अभिलाखु । घरी होय पाइकु । हेही जाले ॥993॥
नंतर पुत्र, वित्त ( द्रव्य, ) स्वर्गादि लोक या तिहीचा काम (इच्छा ) हा ज्याच्या स्वाधीन देऊन घर सेवक झाला; 93
994-18
इंद्रिये सैरा पदार्थी । रिगता विटाळली होती । तिये प्रत्याहार तीर्थी । न्हाणिली कीर ॥994॥
भिन्न भिन्न निषिद्ध विषयांचे ठायी प्रवेश केल्यामुळे इंद्रिये जी विटाळली होती, ती अष्टांगयोगांतील प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केली; 94
995-18
आणि स्वधर्माचे फळ । ईश्वरी अर्पूनि सकळ । घेऊनि केले अढळ । वैराग्यपद ॥995॥
आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने नाश न पावणारे वैराग्य प्राप्त करून घेतले. 95


996-18
ऐसी आत्मसाक्षात्कारी । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥996॥
अशाप्रकारे, आत्मसाक्षात्काररूप जे ज्ञान, ते होण्याला जी साधने पाहिजेत, ती सर्व सामुग्री मिळविली; 96
997-18
आणि तेचि समयी । सद्गुरु भेटले पाही । तेवीचि तिही काही । वंचिजेना ॥997॥
आणि तशात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनीहि प्रतारणा न करिता सम्यग्ज्ञानाचा उपदेश केला; 97
998-18
परी वोखद घेतखेवो । काय लाभे आपला ठावो ? । का उदयजताचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥998॥
परंतु औषध घेतांक्षणीच तत्काळ रोगाची निवृत्ति होऊन, आपले मूळचे प्रकृतीची स्थिति प्राप्त होते काय ? अथवा प्रातःकाळी सूर्य उगवतांच मध्यान्हकाळ होतो काय ? 98
999-18
सुक्षेत्री आणि वोलटे । बीजही पेरिले गोमटे । तरी आलोट फळ भेटे । परी वेळे की गा ॥999॥
उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टि झाली व त्यात उत्तम बीजहि पेरले, म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते; परंतु अर्जुना, त्याला वेळ लागतो की नाही ? 99
1000-18
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वाचूनि वेळु । लागेचि की ॥1000॥
उत्तम मार्ग असून त्यात सुसंगतीचाहि लाभ झाला, तरी सुद्धां ज्या ठिकाणी आपल्यास जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागावयाचाच, 1000
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३२वा. २४, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९२५ ते ३९३६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३९२५ (वासुदेव)
मनु राजा एके देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी ।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आम्हावरी गा ॥१॥
म्हणउनि आलो या देशा । होतो नाही तरी भुललो दिशा ।
दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा ॥धृपद॥
सवे घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।
कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली ती कोण कोण गा ॥२॥
पुढे भक्तिने धरिले हाती । मागे ज्ञान वैराग्य धर्म येती ।
स्थिर केली जी आचपळे होती । सद्धि आणुनि लाविली पंथी गा ॥३॥
केले उपकार सांगो काय । बाप न करी ऐसी माय ।
धर्म त्याच्या हे देखियेले पाय । दिले अखय अभय दान गा ॥४॥
होतो पीडत हिंडता गाव । पोट भरेना राहावया ठाव ।
तो येणे अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥५॥
अर्थ
मन नावाचा एक राजा आहे तो देहरुपी गावामधे नांदत आहे आणि त्याला दोन बायका आहेत. पुत्रपौत्रांनी तो अतिशय संपन्न आहे त्याने आमच्यावर फार मोठी कृपा केली आहे. म्हणून तर या देशाला आलो नाहीतर चुकलो असतो तर वेगळयाच दिशेने गेलो असतो. तो मन नावाचा राजा अतिशय दाता आहे त्याने मला इच्छेचे दान दिले व तो मला येऊन भेटल्यावर त्याने मला चांगला मार्ग दाखविला. त्याच्याबरोबर त्याचे चार सुलक्षणी मुले घेऊन तो मनरुपी राजा आला. त्याने कडेकाटे चुकवून आम्हाला आणले आणि त्याच्याबरोबर त्याचे चार मुले कोणती आली आहेत ती तुम्ही ऐका. पुढे “भक्ति”ने हाताला धरले आहे व मागे “ज्ञान, वैराग्य, धर्म” येत आहेत. जे अचपळ होते त्यांना स्थिर केले आणि सिध्द मंडळींना आणून मार्गाला लावले. अहो आईबाप देखील असे उपकार करणार नाहीत असे उपकार त्यांनी आमच्या�
1:10
अभंग क्र. ३९२६ (वासुदेव)
गातो वासुदेव मी ऐका । चित्त ठायी ठेवुनि भावे एका ।
डोळे झाकुनि रात्र करू नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥
राम राम स्मरा आधी । लाहो करा गाठ घाला मूळबंदी ।
सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदी गा ॥धृपद॥
अल्प आयुष्य मानवी देह । शत गणिले ते अर्ध रात्र खाय ।
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरले ते पाहे गा ॥२॥
क्षणभंगुर नाही भरवसा । व्हा रे सावध तोडा माया आशा ।
काही न चले गळा पडेल मग फासा । पुढे हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥
काही थोडा बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट ।
तन मन ध्यान लावुनिया नीट । जर असेल करणे गोड शेवट गा ॥४॥
विनवितो सकळा जना । कर जोडुनि थोरा लाहना ।
दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥
अर्थ
मी वासुदेव गात आहे तुम्ही तुमचे चित्त एका ठिकाणी एकनिष्ठ करुन ऐका. तुम्ही डोळे झाकून रात्र करुन घेऊ नका म्हणजे सर्व काही जाणत असून देखील काहीच माहित नसल्यासारखे करु नका तुमच्या आयुष्याची गणती काळ करत आहे. त्यामुळे तुम्ही राम राम असे नामस्मरण अगोदर करा आणि आपल्या मूळ स्वरुपाशी गाठ घालून घेत रहा. सर्व उपाध्या बाजूला टाकून दया आणि एका गोविंदाच्या ठिकाणीच लक्ष लावून रहा. मानवी देहाचे आयुष्य अगदी थोडे आहे म्हणजे शंभर वर्षे आयुष्य धरले तर पन्नास वर्षे तर झोपण्यातच जातात. त्यामध्ये देखील बाळपण गेले पीडा, रोग, क्षय हे गेले मग भजनासाठी किती वेळ उरला तो पहा. क्षणभर देखील भरवसा नाही त्यामुळे सर्व माया, आशा तुम्ही तोडा आणि सावध व्हा. मग तुमचे काहीही चालणार नाही तुमच्या गळयामध्ये यमाचा फासा पडेल तुम�
1:10
अभंग क्र. ३९२७ (वासुदेव)
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून ।
जागे होउनि करा काही दान । नका ऐकोनि झाको लोचन गा ॥१॥
हरी राम कृष्णा वासुदेवा । जाणवितसे जना ।
चिपळ्या टाळ हाती विणा । मुखी घोष नारायणा गा ॥धृपद॥
जे ठाकेल कोणा काही । फळ पुष्प अथवा तोयी ।
द्या परी मीस घेऊ नका भाई । पुढे विन्मुख होता बरे नाही गा ॥२॥
देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त ।
झाले एक चित्त तरी बहुत । येवढ्यासाठी नका करू वाताहात गा ॥३॥
आलो येथवरी बहु सायासे । करिता दान हेचि मागावयास ।
नका भार घेऊ करू निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥
आता मागुता येईल फेरा । हे तो घडे या नगरा ।
म्हणे तुकयाबंधु राम धरा । ओळखी नाही तरी जाल अघोरा गा ॥५॥
अर्थ
अरे गर्भवास, बाळपण आणि तारुण्य असे तीन प्रहर टळले आहेत अजून देखील तुम्ही असे झोपलेले का आहात ? त्यामुळे स्वहिताविषयी जागे व्हा आणि काहीतरी हरिनामरुपी दान करा उगाच डोळे झाकून राहू नका. “हरे राम कृष्णा” या भजनाविषयी मी वासुदेव लोकांना जाणीव करुन देत आहे. हातामध्ये टाळ, वीणा, चिपळया घेऊन मुखाने नारायण घोष करीत आहे. कोणाला जे काही सापडेल फळ, पुष्प अथवा पाने काहीही असो ते देवाला अर्पण करा. हे माझ्या बंधूंनो तुम्ही झोपण्याची मिस घेऊ नका स्वत:चे हित करण्याविषयी विन्मुख होऊ नका कारण तुमच्यासाठी पुढे ते बरे नाही. देवाला केवळ एकनिष्ठ भक्तिभाव लागतो तो त्याच्यासाठी प्रमुख कारण आहे, मुख्य आहे या व्यतिरिक्त देवाला काहीही अर्पण करावे लागत नाही. एक चित्त जरी झाले तरी ते खूप आहे तेवढयासाठी तुम्ही स्वत:ची वाताहात करुन घेऊ नका. मी खूप साहस कर�
1:10
अभंग क्र. ३९२८ (वासुदेव)
राम राम दोनी अक्षरे । सुलभ आणि सोपारे । जागा मागिले पाहारे । सेवटिचे गोड तेचि खरे गा ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्याघोषे गा ॥धृपद॥
गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाही आणिका नावा । दान जाणोनिया करी हावा । न ठेवी उरी काही ठेवा गा ॥२॥
निज घेउनिया फिरती । ऐक वेळा जाणविती । धरूनिया राहा चित्ती । नेघें भार सांडी कामा हाती गा ॥३॥
सुपात्री सर्व भाव । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाही ठाव गा ॥४॥
शूर दान जीवे उदार । नाही वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥
अर्थ
राम राम ही दोन्ही अक्षरे अतिशय सोपी आणि सुलभ आहेत. आणि या राम नामाचा जप तुम्ही तुमच्या शेवटच्या पानामध्ये म्हणजे वृद्धपकालामध्ये करा तुमचा शेवटचा काळ मग गोड होईल आणि तोच खरा ठरेल. वासुदेव “रामकृष्ण” नामस्मरण करुन लोकांना जागृत करीत आहे. तेही पायात घाग-या हातामध्ये टाळ, चिपळया वाजवून लोकांना जागृत करीत आहे. खरे तर वासुदेव संतांचे स्वरुप आहे त्यामुळे तो वासुदेवच वासुदेवाला गात असतो हे जाणून घ्यावे संत आणि वासुदेव यामध्ये केवळ नाममात्र भिन्नत्व आहे. त्यामुळे हे सर्व जाणून घेऊन तुम्ही वासुदेवाला कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता दान करा कोणताही ठेवा मागे ठेवू नका. नीजस्वरुप घेऊनच वासुदेव फिरत आहे, हिंडत आहे आणि ते नीजस्वरुप तुम्ही चित्तात धारण करा असे तो एकवेळाच सर्वाना जाणीव करुन देत आहे. हेच तुम्ही चित्तामध्ये धारण करा आणि हातामधील सर्व काम बाजूला ठेवून संसाराचा भार तुम्�
1:10
अभंग क्र. ३९२९ (वासुदेव)
बोल अबोलणे बोले । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरात घरकुल केले । नेणो आंधार ना उजेडले गा ॥१॥
वासुदेव करितो फेरा । वाडियात बाहेर दारा । कोणी काही तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातो माघार गा ॥धृपद॥
हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे । गजर होतो बहु मोठ्याने । नाही निवडिली थोर लहाने । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥२॥
मी वासुदेव तत्वता । कळो येईल विचारिता । आहे ठाउका सभाग्या संता । नाही दुजा आणीक मागता गा ॥३॥
काही जागाचि निजलासी । सुने जागोन दारापासी । तुझ्या हितापाठी करी वसवसी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥
ऐसे जागविले अवघे जन । होते संचित तीही केले दान । तुका म्हणे दुबळी कोणकोण । गेली वासुदेवा विसरून गा ॥५॥
अर्थ
ब्रम्हज्ञान हा विषय स्वत:चा नसताना देखील काही लोक वरवर ब्रम्हज्ञानाच्या खूप गोष्टी बोलतात परंतु अंत:करणामध्ये ब्रम्हासंबंधाविषयी ते निजलेले असतात. अशा शब्दज्ञानी लोकांनी जगतरुपी घरामध्ये घरकुल केले आहे किंवा ईश सृष्टीच्या घरात पुन्हा स्वत:ला राहण्याकरता एक नवे घरकुलच केले आहे मग अशा शब्दज्ञानी लोकांच्या ठिकाणी अंधार आहे की उजेड आहे हे काही समजत नाही. वासुदेव तुमच्या देहरुपी वाडयामध्ये व घराच्या बाहेर दारामध्ये परमार्थ जागृतीविषयी फेरा करीत आहे. अरे कुणी काहीतरी दान पुण्य करा जर कुणी काही वासुदेवाच्या उत्तराला जाब दिला नाही तर तो वासुदेव मागे जाईल हे लक्षात ठेवा. हातामध्ये टाळ, वीणा व मुखामध्ये हरीचे नाम तो वासुदेव गात आहे व हरीनामाचा मोठा गजर तेथे होत आहे. अरे त्याने दान देण्याविषयी लहान मोठयांच
1:11
अभंग क्र. ३९३० (वासुदेव)
राम कृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदे आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥
जनी वनी अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगा तो वासुदेव । ऐसा मनी वसू द्या भाव गा ॥धृपद॥
निज दानाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखी नाम उच्चारी घडोघडी । ऐसी करा वासुदेवी जोडी गा ॥२॥
अवघा सारूनि सेवट झाला । प्रयत्न न चले काही केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥३॥
तुका म्हणे रे धन्य त्याचे जिणे । जीही घातले वासुदेवा दान । त्या न लगे येणे जाणे । झाले वासुदेवी राहणे जोगी गा ॥४॥
अर्थ
वासुदेव रामकृष्णाला टाळ चिपळया वाजवत गीतरुपाने गात आहे. तो आपल्या छंदामध्ये सर्वत्र नीजस्वरुप घेऊन फिरत आहे. सर्वजणा वनामध्ये देव आहे आणि वासनेचा नाश करावा असे वासुदेव सांगत आहे. मग वासुदेवाची तुम्ही सेवा करा आणि अशा प्रकारचा भक्तिभावच तुम्ही तुमच्या मनामध्ये कायम असू दयावा. वासुदेवाला नीजस्वरुपाचे दान देण्याची मोठी आवड लागलेली आहे. त्यामुळे तर वासुदेव घडोघडीला आपल्याच नामाचा उच्चार करत आहे खरे तर वासुदेव संतांचे स्वरुप आहे त्यामुळे तो वासुदेवच वासुदेवाला गात असतो हे जाणून घ्यावे संत आणि वासुदेव यामध्ये केवळ नाममात्र भिन्नत्व आहे आणि त्याच्या नामाविषयी तुम्ही अशीच गोडी असु दयावी. अशा प्रकारे सर्व गोष्टी सारुन शेवट झाला कितीही प्रयत्न केले तरी काहीही चालत नाही. त्यामुळे हे झोपलेल्यांनो आता तुम्ही झोप सोडून दया आणि जागे व्हा व वासुदेवाला दान करा. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यांनी वासुदेवाला दान दिले त्यांचे जगणे धन्य आहे. त्यांन
1:11
अभंग क्र. ३९३१ (जोगी)
जग जोगी जग जोगी । जागे जागे बोलती ॥१॥
जागता जगदेव । राखा काही भाव ॥धृपद॥
अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥
पूजा पत्र काही । फल पुष्प तोय ॥३॥
बहुता दिसा फेरा । आला या नगरा ॥४॥
नका घेऊ भार । धर्म तोचि सार ॥५॥
तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥६॥
अर्थ
जगातील जेवढे काही योगी आहेत जे सर्व जगाला आपल्या स्वकर्तव्याविषयी जागे रहा असे सांगत आहे. जगन्नायक देवाविषयी तुम्ही जागृत रहा आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचा एकनिष्ठ भक्तिभाव ठेवा. सर्व जीवमात्रांना देव मानून त्यांची पूजा करावी व क्षेत्रातील शिव विष्णूंची जेवढी काही प्रतिमा आहे त्यांची पूजा करावी. पान, फल, पुष्प किंवा पाने या कोणत्याही साधनेव्दारे त्यांची पूजा करावी. खूप दिवसानंतर या मनुष्य देहरुपी नगरामध्ये फेरा आला आहे. कोणत्याही प्रकारचा भार तुम्ही आपल्या माथ्यावर घेऊ नका धर्माने वागणे हेच खरे सार आहे व हेच खरे जीवनाचे सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हेच दान मी तुम्हाला मागत आहे व हेच दान तुम्ही मला अनन्यभावनने दयावे. ”
1:11
अभंग क्र. ३९३२ (सरवदा)
ऐका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथे नाडेल माई । दोघा पुत्रांची ।
ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारिता शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥
आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरे बोले तो जाय । नरकामध्ये अधोगती ।
हे चौघांच्या मुखे । मना आणावे सुखे । अवघी चुकतील दुःखे । खोटे बोला नरनारी ॥धृपद॥
आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागे माझे चित्त म्हणोन । पडिले खान तया घरी ।
म्हणोन न म्हणा माझे काही । निजी निजा सुखे ठायी । यत्न होईल तई । चोराठायी विश्वास ॥२॥
आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामध्ये ।
पाचांनी दिधली हाती । म्हणोनि न मनावी निश्चिंती । परपुरुषी होय रती । सुखगती ते पावे ॥३॥
आणिक परी । सरवदा सांगतो ते करी । दान देता जो न वारी । नव्हे भला भला तो ।
तुका म्हणे आई । येथे नांव काई । सांगसी ते ठायी । मरो रांडेचे ॥४॥
अर्थ
सरवदा म्हणजे भविष्य सांगणारा तुम्हाला काय भविष्य सांगतो ते, हे माझ्या बंधूंनो तुम्ही ऐका. बुध्दीरुपी आई तिचे दोन पुत्र एक काम आणि क्रोध त्याच्यामुळे त्या बुध्दीरुपी आईची फसगत होईल. ती दोन मुले आपल्या आईची नेहमी विटंबना करतात हे सर्व लोकांमध्ये प्रसिध्द आहे. शहाण्या मनुष्याने या दोन पुत्रापैकी एका काम नावाच्या पुत्राला जर मारले नाही तर त्याला सुख कधीही प्राप्त होणार नाही. हा सरवदा म्हणजे भविष्य सांगणारा काय भविष्य सांगतो आहे ते तुम्ही नीट ऐका. जो जगताला सत्य मानतो तो अधोगतीला जाईल चार वेदाच्या मुखाने जे उपदेश सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या मनामध्ये दृ�
1:11
अभंग क्र. ३९३३ (मुंढा, हिंदीपदे)
संबाल यारा उपर तले दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥
प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई । प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥धृपद॥
उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेका खचलावत भार ॥२॥
कहे तुका चलो एका हम जिन्होके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥
अर्थ
हे माझ्या मित्रा तू वरती यमाच्या आणि खाली पशूयोनी दु:खाच्या तडाख्यापासून सावध रहा. आणि जो या दोन गोष्टीपासून दक्ष राहीन तो वाचेल नाहीतर निष्काळजी राहिला तर त्याची लूट होईल. त्यामुळे अरे बाबा देवावर प्रेम कर आणि देवाच्या प्राप्तीविषयी प्रयत्न कर. प्रपंचामध्ये उडया मारणे त्याच्या आनंदात ढुंगण वाकडे करुन नाचणे हे कशाला करतोस त्यामुळे देवाच्या प्रेमाचा विसर पडेल आणि हे गोसाव्या तुझ्या काखेत झोळी कृष्णंजीन यांची लडबड आणि खडाव्याची खडबड कशाला पाहिजे का त्याचा भार व्यर्थ तू चालवत आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे हे लोकांनो आम्ही तुम्हाला ज्या संतांच्या स्वाधीन करु त्या संतांना तुम्ही काहीही दान देण्याविषयी हात वरती ठेवाल तर तुमचा नावलौकिक आणि परमार्थिक अधिकार वाढेल. ”
1:11
अभंग क्र. ३९३४ (मुंढा, हिंदीपदे)
सब संबाल म्याने लौंडे खडा केऊ गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥
आपसकु संबाल आपसकु संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नही तो करूँगा हाल ॥धृपद॥
आवलका तो पीछें नही मुदल बिसर जाय । फिरते नही लाज रंडी गद्धी गोते खाय ॥२॥
जिन्हो खातिर इतना होता सो नही तुझे बेकाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥३॥
निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जवानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥४॥
कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पक्कड धका गांडगुडघी मार चलाऊ आलेख ॥५॥
अर्थ
हे मुला तू स्वत:ला सांभाळ असा विषयामध्ये गुंग होऊन उभा का राहिला आहेस अरे तू मोहरुपी भांग पिऊन मदोन्मत्त झाला आहेस त्यामुळे तुला स्वत:चा विसर पडला आहे. तू स्वत:ला सांभाळ मुला स्वत:ला सांभाळ स्वत:चा तोल तू सांभाळ जर तू व्यवस्थित बोलला नाहीस तर मी तुझे चांगलेच हाल करीन. पहिले तर तुला मनुष्य देहरुपी मुद्दल प्राप्त झाली याचाच विसर पडला आहे. या रांडांना, गाढवांना पुन्हा पुन्हा जन्ममरणाचा गर्भवास सोसून अनेक योनीत फिरावे लागते याची यांना लाज देखील वाटत नाही अरे सावध व्हा तुम्ही सारखे सारखे जन्ममरणाचे गोते खात आहात. अरे तू ज्यांच्यासाठी एक व्यवहार करतोस तेच तुझ्या अंत:काळी कामाला येणार नाहीत आणि जरी तू गोसावी होऊन आणि हातामध्ये मोठा भोपळा घेऊन फिरत बसलास तरी ते चांगले काम होणार नाही. अरे मुला तू एक गोष्ट लक्षात ठेव की, “तू ज्यांच्यावर प्रेम करतोस ती बायका पोरेच निघून जातील तर तुझी जवानीची गोष्ट काय करतोस त्यामुळे तू हा सर्व तारुण्याचा मोह आणि दांडगाईपणा सोडून दे तरच तुझे चित्त एकाग्र ह�
1:11
अभंग क्र. ३९३५ (मुंढा, हिंदीपदे)
नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फासा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥
काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥धृपद॥
दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥२॥
नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये ॥३॥
कहे तुका उस असाके संग फिरफिर गोते खाये ॥४॥
अर्थ
संसार करत असताना संसारामध्ये केवळ साक्षीभूत रुपाने रहावे संसारात असून देखील संसारात नसावे तर तो जिंकला समजावा दुरुनच संसाराचा तमाशा पहावा जर तुम्ही संसारात गुंतून रहाल तर काही लोक तुम्हाला पकडण्यासाठी फाशा, काठी घेऊन बसलेले आहेत. या संसार बाजारामध्ये त्रिविधतापाने लोक मार खात आहे हे तू तुझ्या डोळयाने पहातो आहे तरी देखील तू संसाराला का भूलतो आहेस ? दमडी आणि चमडीला जो मनुष्य भुलतो तो सर्वाच्या अगोदर लाथा खातो. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे बाबांनो मी कोणालाही आसक्तीने घरी बोलवत नाही आणि तुम्हीही कोणाच्या घरी जाऊ नका किंवा कोणाला तुमच्या घरी बोलवू नका कारण त्या आसक्तीच्या संगतीमुळे जन्ममरणाचे पुन्हा पुन्हा गोते खावे लागतात. ”
1:11
अभंग क्र. ३९३६ (हिंदीपदे)
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥
ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटे आघे चढे पीठ । आपे हुवा असीवार ॥२॥
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्या अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥
अर्थ
अरे बाबा देवाने जर मनात आणले तर मस्तकावरचा मुकूट देखील सामान्य वस्तू होईल आणि सामान्य वस्तू देखील मस्तकावरचा मुकूट होऊ शकते जर देवाने मनातच आणले तर गाई आणि वासरु देखील वाघाचे मित्र होऊ शकतात नाहीतर ते बरोबर काय सोबत सुध्दा राहू शकत नाही. त्यामुळे तू माझ्या स्वामीचे स्मरण करत राहा त्याने जर मनात आणले तर तुला राज्यपीठावर देखील तो बसवील, घोडयावर देखील चढवेल. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्वाच्या अंत:करणात वसलेला जो देव आहे त्या हरीच्याच प्राप्तीचे प्रयत्न करत राहा आणि जो कुणी प्रयत्न करेल तोच खरा दरवेश म्हणजे संत होतो. ”

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading