आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२९ नोव्हेंबर, दिवस ३३३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११०१ ते ११२५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९८५ ते ३९९६
“२९ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 29 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २९ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२९ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११०१ ते ११२५,
1101-18
मग तेही अव्यक्त । बोध वाढता झिजत । पुरला बोधी समस्त । बुडोनि जाय ॥1101॥
मग ते आज्ञानही जशी जशी बोधाची स्पष्टता व दृढत होईल तसे क्षीण होत जाऊन अखेर पूर्णबोधकाळी नाहीसे होते. 1
1102-18
जैसी भोजनाच्या व्यापारी । क्षुधा जिरत जाय अवधारी । मग तृप्तीच्या अवसरी । नाहीच होय ॥1102॥
भोजन करू लागले असता, प्रत्येक ग्रासाबरोबर क्षुधा जशी हरत जाते व अखेर तृप्ति झाल्यावर नाहीशीच होते 2
1103-18
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी । मग पातला ठायी बुडी । देऊनि निमे ॥1103॥
किंवा, आपण जितकी मजल चालावी तितकी वाट कमी कमी होऊन अखेर प्राप्तस्थानावर जशी मुळीच खुंटते. 3
1104-18
का जागृति जव जव उद्दीपे । तव तव निद्रा हारपे । मग जागीनलिया स्वरूपे । नाहीच होय ॥1104॥
किंवा जसा जसा जागा होत जाईल, तसे तसे निद्रेचे आवरण कमी होते व पूर्ण जागृति आल्यावर ती निद्रा मुळीच जाते. 4
1105-18
हे ना आपुले पूर्णत्व भेटे । जेथ चंद्रासी वाढी खुंटे । तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥1105॥
हे दृष्टांत राहूद्या; पौणिमेला चंद्र पूर्णकलायुक्त झाला म्हणजे त्याची वाढ संपते व तेथे शुक्लपक्षही जसा निःशेष संपतो. 5
1106-18
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधे ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥1106॥
त्याप्रमाणे, सकलदश्याचा (सकलदृश्याचा) ग्रास करणारे ज्ञान, पुढील अज्ञानकार्यं दृश्य नाहीसे झाल्यामुळे जेव्हा, ज्ञानस्वरूप जो मी, त्या मजशी ऐक्य पावत तेव्हा अबोध किंवा अज्ञान समूळ नाहीसे होते. 6
1107-18
तेव्हा कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचे पेंडवळे । मोडूनि भरले जळे । आब्रह्म जैसे ॥1107॥
कल्पांतकाळच्या जलमय स्थितींत, समुद्र, नदी, नाले वगैरे भेद जसा समूळ नाहीसा होऊन आब्रह्मस्तंबपर्यंत जसे जल मात्र असते. 7
1108-18
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट । का जळोनि काष्ठे काष्ठ । वन्हीचि होय ॥1108॥
किंवा घटमठादि उपाधींच नाश झाल्यावर जसे आकाश एकरूपच असते, अथवा काष्ठे जाळून टाकून अग्नि जसा स्वस्वरूपात लीन होतो. 8
1109-18
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे । नामरूप भेदे जैसे । सांडिजे सोने ॥1109॥
किंवा अलंकार मुशीत आटल्यावर त्यांचे नामरूपादि भेद सोन्याला सोडून जातात (व आपण सुवर्णरूपाने उरतात. ) 9
1110-18
हेही असो चेइलया । ते स्वप्न नाही जालया । मग आपणचि आपणया । उरिजे जैसे ॥1110॥
हेही असो. मनुष्य जागा होऊन पडलेले स्वप्न नाहीसे झाल्यावर जसा केवळ आपण एकटाच असतो. 1110
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1111-18
तैसी मी एकवाचूनि काही । तया तयाहीसकट नाही । हे चौथी भक्ति पाही । माझी तो लाहे ॥1111॥
याप्रमाणे तू व मी विवर्जित असा जो मी शुद्ध परमात्मा त्यावाचून, आपणासकट अन्यत् काहीही नाही अशी शास्त्रकारानी वर्णिलेली चौथी भक्ति (सर्वं खल्विदं ब्रह्म) त्याला प्राप्त होते. 11
1112-18
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथी । ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥1112॥
एऱ्हवी ह्या परमात्मैक्यज्ञानाला आम्ही ‘चौथी भक्ति ‘ असे जे औपचारिकरीत्या म्हटले आहे, ते आर्त, जिज्ञासु व द्रव्यादि प्राप्त्यर्थं जगात चालू असलेल्या तीन भक्तींच्या अपेक्षेनेच होय. 12
1113-18
येऱ्हवी तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती । पै माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥1113॥
वस्तुतः ह्या स्थितीला (भक्तीला) तिसरी, चौथी, पहिली किवा अखेरची असा क्रम लावणे शक्य नसून माझी जी सहजस्वरूपस्थिति तिलाच भक्ति असा आम्ही उपचार केला आहे. 13
1114-18
जे नेणणे माझे प्रकाशूनि । अन्यथात्वे माते दाऊनि । सर्वही सर्वी भजौनि । बुझावीतसे जे ॥1114॥
प्रथम मजविषयक अज्ञानालाही जे प्रकाशित करून नंतर माझे अयथार्थ (विपरीत) दर्शन करवून, आपापल्या कल्पनेप्रमाणे सर्वाकडून माझी भक्ति करवून जे सर्वाची समजूत पाडते. 14
1115-18
जो जेथ जैसे पाहो बैसे । तया तेथ तैसेचि असे । हे उजियेडे का दिसे । अखंडे जेणे ॥1115॥
मग मत्स्वरूपविषयक अज्ञानकाली जो पुरूष मला जेथे जसा पाहील, तसा (त्याच्या कल्पनेप्रमाणे) मी तेथे अनिर्वचनीय स्वरूपाने असतो; (दिसतो) पण ह्या सर्व व्यवहाराला मूल आधार माझे जे अखंड रूप तेच होय. 15
1116-18
स्वप्नाचे दिसणे न दिसणे । जैसे आपलेनि असलेपणे । विश्वाचे आहे नाही जेणे । प्रकाशे तैसे ॥1116॥
स्वप्न दिसो अगर न दिसो; ते पडले अगर पडले नाही असे म्हणण्याच्या दोन्ही व्यवहारांना जसे आपले अस्तित्व अबाधित मानावे लागते, तसा विश्वाचा उदय व अस्त हे दोन्ही ज्याने प्रकाशित होतात. 16
1117-18
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा । तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥1117॥
अर्जुना, असा जो माझा सहजस्वरूप प्रकाश तो बाणणे ही खरी भक्ति होय. 17
1118-18
म्हणौनि आर्ताच्या ठायी । हे आर्ति होऊनि पाही । अपेक्षणीय जे काही । ते मीचि केला ॥1118॥
म्हणून आर्त भक्तांच्या उत्कटभक्तीचा जो इच्छित विषय तोही मीच असतो अथवा बनतों. 18
1119-18
जिज्ञासुपुढा वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा । मी का जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥1119॥
त्याच प्रमाणे अर्जुन, जिज्ञासूची भक्ति जिज्ञासारूपाने मलाच जिज्ञास्य (जाणण्याचा विषय) करिते. 19
1120-18
हेचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थी अर्जुना । करूनि अर्थाभिधाना । आणी माते ॥1120॥
द्रव्यार्थी जनांची भक्तीही मलाच प्राप्तव्यविषय करून मजविषयींचीच याचना करिते. 1120
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1121-18
एवं घेऊनि अज्ञानाते । माझी भक्ति जे हे वर्ते । ते दावी मज द्रष्टयाते । दृश्य करूनि ॥1121॥
याप्रमाणे अज्ञानावस्थीत केली जाणारी जी ही माझी भक्ति, ती दृङ्मात्र (ज्ञानस्वरूप) जो मी, त्या मला ज्ञेयत्वाला आणिते. 21
1122-18
येथे मुखचि दिसे मुखे । या बोला काही न चुके । तरी दुजेपण हे लटिके । आरिसा करी ॥1122॥
मुखालाच मुखाचे दर्शन होते असे म्हणण्यात काहीही चूक नाही; पण (ही अशक्य गोष्ट) आरशाने मुखावर आणिलेल्या लटक्या दुजेपणामुळे संभवते. 22
1123-18
दिठी चंद्रचि घे साचे । परी येतुले हे तिमिराचे । जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥1123॥
चंद्र हाच दृष्टीचा खरा विषय असतो, पण तो एक असता दोन आहेत असे जे वाटते तो तिच्यातील ‘ तिमिर ” दोषाचा प्रभाव होय. 23
1124-18
तैसा सर्वत्र मीचि मिया । घेपतसे भक्ति इया । परी दृश्यत्व हे वाया । अज्ञानवशे ॥1124॥
त्याप्रमाणे ह्या तिन्ही भक्तिद्वारा (वस्तुतः) मीच माझी प्राप्ति करून घेत असतों; परंतु, अज्ञान उपाधीमुळे मजवर लटका प्राप्यप्रापकभाव आला आहे. 24
1125-18
ते अज्ञान आता फिटले । माझे दृष्टृत्व मज भेटले । निजबिंबी एकवटले । प्रतिबिंब जैसे ॥1125॥
अर्जुना, चौथा भक्त (माझा आत्मा) जो तू, त्या तुझ्या दर्शनाने, सर्व अज्ञानाची वार्ता संपून, प्रतिबिंबाने आपल्या बिंबापाशी जसे ऐक्य पावावे (अथवा एकरूपते असावे) त्याप्रमाणे, माझे द्रष्टस्वरूप मला आज भेटले 25
दिवस ३३३ वा. २९, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९८५ ते ३९९६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
दिवस ३३३ वा. २९, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९८५ ते ३९९६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३९८५
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥
लाहो करा वेगी स्मरा । टाळी वाहुनि विश्वंभरा ॥धृपद॥
झालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥
तुकयाबंधु म्हणे थोडे । अवधि उरली आहे पुढे ॥३॥
अर्थ
आता तुमची फजितीची वेळ आलेली असून तुम्ही सर्वजण सावध राहा. विश्वंभराची प्राप्ती करुन घेण्यासाठी तुम्ही त्वरेने प्रयत्न करा आणि हाताने टाळी वाजवा. एकदा की तुमचा देह शक्तीहीन झाला तर नंतर त्याला हरीचे चरण सापडणार नाही. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, “आता पुढे अगदी थोडासाच वेळ उरलेला आहे. ”
1:21
अभंग क्र. ३९८६
नेणे गाऊ काही धड बोलता वचन । कायावाचामनेसहित आलो शरण ॥१॥
करी अंगीकार नको मोकलू हरी । पतितपावन ब्रिदे करावी खरी ॥धृपद॥
नेणे भक्तिभाव तुझा म्हणवितो दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥
म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाय । आता कोण दुजा ऐसा आम्हासी आहे ॥३॥
अर्थ
देवा मला स्वरामध्ये गाता येत नाही, धड नीट शब्दही काही बोलता येत नाही पण मी कायावाचामने सहीत तुला शरण आलो आहे. हे हरी तू माझा अंगीकार कर मला मोकलू नकोस तुझे पतितपावन हे ब्रीद तू खरे करावेस. देवा भक्तिभाव कसा करावा हे मी जाणत नाही तरी पण तुला मी शरण आलो आहे स्वत:ला तुझा दास म्हणून घेत आहे आणि असे असून देखील सुध्दा तू जर मला अंतर देत असशील तर त्याची लाज कोणाला आहे ? तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात की, “देवा आम्ही तुझे आता पाय धरले आहे आणि आम्हाला प्रेम देणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी येथे आहे काय ते तू सांग ? ”
1:21
अभंग क्र. ३९८७
तूचं मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥
आणीक प्रमाण नाही दुसरे आता । योगक्षेमभार तुझे घातला माथा ॥धृपद॥
तूंच क्रियाकर्म धर्म देव तू कुळ । तूच तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥
म्हणे तुकयाबंधु कर्ता कारयिता देवा । तूच भाव भक्ति पूजा पुरस्कार आघवा ॥३॥
अर्थ
देवा तूच आमचा माय, बाप, बंधू, सखा आणि आमचा वित्त, गोत, जीवाचा जिवलग देखील तूच आहेस. देवा मी माझ्या योगक्षेमाचा भार तुझ्या माथ्यावर घातला आहे आणि तुझ्यावाचून मला दुसरे कोणीही प्रमाण नाही. देवा तूच आमच्यासाठी क्रिया, कर्म, धर्म व कुळ आहेस आणि तूच आमच्यासाठी तप, तीर्थ, व्रत, गुरु सर्वकाही आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की, “देवा तूच कर्ता करविता आहेस आणि तूच भावभक्तिपूजा सर्व पुरस्कार देखील आहेस. ”
1:22
अभंग क्र. ३९८८
करुनि उचित । प्रेम घाली हृदयात ॥१॥
आलो दान मागायास । थोर करूनिया आस ॥धृपद॥
चिंतन समयी । सेवा आपुलीच देई ॥२॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥३॥
अर्थ
देवा माझ्या ह्दयामध्ये तुझ्याविषयीचे उचित असे प्रेम निर्माण होऊन तेच तुम्ही माझ्या हृदयामध्ये घालावे. आणि याचसंबंधी मी मोठी अपेक्षा धरुन तुला दान मागण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. देवा मी ज्यावेळी तुमचे चिंतन करेल त्यावेळी मला तुझीच सेवा घडावी. तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात की, “देवा माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी भक्तिभाव उत्पन्न करावा आणि त्याच भक्तिभावाच्या स्वाधीन मला करावे. ”
1:22
अभंग क्र. ३९८९
गाऊ वाहु टाळी रंगी नाचो उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥
बळियांचा बळी वो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळा ही सिद्धींचा ॥धृपद॥
मारू शब्दशस्त्रे बाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडू काळाचे ॥२॥
म्हणे तुकयाबंधु नाही जीवाची चाड । आपुलिया तेथे काय आणिकाची भीड ॥३॥
अर्थ
हरीचे नाम आम्ही गाऊ व त्याच्या छंदामध्येच आम्ही टाळी वाजवून त्याच्याच रंगात देहाविषयी उदास होऊन नाचू त्याचे नाम गाताना सर्व प्रकारचे भय, लज्जा, शंका, अपेक्षा व निराशा आम्ही टाकून देऊ. सर्वामध्ये बलवान असलेल्या बलवंत हरीचे आम्ही दास असून तोच आमचा कैवारी आहे आणि भुक्ती, मुक्तीचा तो दाता असून सर्व सिध्दींचा तो स्वामी आहे. आता आम्ही शब्द, शस्त्रांचे बाण चालू आणि नि:शंक होऊ कंटक अशा कळीकाळाचे शीर आम्ही फोडून त्याचा नाश करु. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की, “आम्हाला आता आमच्याच जीवाची आवड राहिली नाही मग आम्ही इतरांची भीड काय धरणार आहोत. ? ”
1:22
अभंग क्र. ३९९०
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥
आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥धृपद॥
पैल चंद्रभागे तिरी । कट धरूनिया करी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥
अर्थ
वैकुंठाचा त्याग करुन पंढरीनाथ देव विटेवर नीट उभा आहे. जगजेठी पंढरीनाथ भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी येथे आला आहे. सर्वापेक्षा निराळा असा हरी आपले कर कटेवर ठेवून उभा आहे. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, “आकाशामध्ये हरीनामाच्या गजराने जयजयकार होत आहे. ”
1:22
अभंग क्र. ३९९१
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकाचा ॥१॥
उभा न पाचारिता दारी । न संगता काम करी ॥धृपद॥
भाव देखोनि निर्मळ । रजां वोढवी कपाळ ॥२॥
तुकयाबंधु म्हणे न भजा । का रे ऐसा भोळा राजा ॥३॥
अर्थ
गोपीकाचा पती तो श्रीकृष्ण आपल्या भक्तांविषयी असा कृपाळू आहे कि, भक्तांनी त्याला बोलावले नाही तरी त्यांनी न सांगता भक्तांची सर्व कामे करण्यासाठी तो त्यांच्या दारामध्ये सतत उभा असतो. देव आपल्या भक्तांचा शुध्द भक्तिभाव व निर्मळ भक्ति पाहून त्यांच्या पायाची रज म्हणजे माती आपल्या कपाळाला लावण्यासाठी कपाळ पुढे करतो. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, “अरे अश्या भोळया राजाचे तुम्ही भजन का करत नाहीस ? ”
1:22
अभंग क्र. ३९९२
केला अंगीकार पंढरीच्या देवे । आता काय करिती काळ मशक मानवे ॥१॥
घातली बाहेर ती भय होते ज्याच्याने । बैसला आपण तेथे घालुनिया ठाणे ॥धृपद॥
लागो नेदी वारा दुजियांचा अंगासी । हा पुरता निर्धार कळो आला आम्हासी ॥२॥
म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशी आता बैसलो हस्तीवरी माथा ॥३॥
अर्थ
पंढरीच्या देवाने आमचा अंगीकार केला आहे त्यामुळे काळ आम्हाला अगदी मशकाप्रमाणे आहे व तो आमचे काय करणार आहे ? ज्याच्यामुळे मला भय वाटत होते तेच माझ्या ह्दयामधून देवाने बाहेर काढले असून देव स्वत: माझ्या ह्दयाच्या ठिकाणी ठाणे धरुन बसला आहे. आता आम्हाला व्दैताचा किंवा एका पंढरी राजावाचून दुस-या कोणाचाही वारा आमच्या अंगाला लागणार नाही असा पुरता निर्धार आम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आला आहे. तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात, “देवाने आता आम्हाला सर्वश्रेष्ठ ठिकाणी बसविले आहे त्यामुळे आता आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरजच नाही. ”
1:23
अभंग क्र. ३९९३
अगोचरी बोलिलो आज्ञेविण आगळे । परी ते आता न सांडावे कृपाळू राउळे ॥१॥
जाईल रोकडा बोल न पुसती आम्हा । तुझा तुझे म्हणविले पाहा पुरुषोत्तमा ॥धृपद॥
न व्हावा न वजावा न कळता अन्याय । न धरावे ते मनी भलता करी उपाय ॥२॥
म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागो पाहाताहे उंच्या झाडासी ॥३॥
अर्थ
हे कृपाळूवा देवा मी तुमच्या आज्ञेवाचून काहीतरी अगोचरपणाने वेगळे बोललो आहे परंतु तुम्ही त्याचा त्याग करु नका. देवा तू जर आमची विचारपूस केली नाही तर तुझी कृपासिंधू, भक्तवत्सल, दीनानाथ, पतित पावन हे ब्रीदे व्यर्थ जातील याविषयी तूच विचार करुन पाहा हे पुरुषोत्तमा. हे पुरुषोत्तमा न व्हावा, न करावा असा अन्याय जर माझ्याकडून नकळत घडला तर त्याविषयी तुम्ही मनामध्ये काहीही न धरता माझा उध्दार करण्यासाठी काहीतरी वेगळा उपाय करावा. तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात, “देवा मी हीन आहे त्यामुळे तुम्हाला माझी लाज वाटत असेल परंतु उंच असलेल्या झाडालाच वारा लागतो तसे तुम्हीही माझ्या रंकाची झट धरावी. ”
1:23
अभंग क्र. ३९९४
झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापले डेरा चीकसा मर्दु द्या पाई ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी । उभ्या आंचवणा गोपीका कळस घेउनी ॥धृपद॥
अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारू मुळा ॥२॥
सावरीली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा ॥३॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळ जना ॥४॥
अर्थ
देवा स्वयंपाक तयार झाला आहे रखुमाई वाट पाहात आहे हंडाभर पाणी तापले आहे तरी तुमच्या पायाला सुगंधी पदार्थ चोळू दयावे. हे पाडूरंगा उठा तुम्हाला भोजन करण्यास उशीर झाला आहे तुम्हाला आचमन घालण्यासाठी गोपीका कलश घेऊन उभ्या आहेत. देवा तुमच्या सेवेसाठी सर्वजण अगदी सावधान चित्त ठेवून तयार आहेत आणि उध्दव व अक्रूर हे तुम्हाला पाचारण करण्यासाठी आले आहेत. देवा तुमच्या सेजेवर विविध प्रकारची सुगंधी फुले टाकून तुमची सेज सजवण्यात आली आहे तुमच्या शयनगृहामध्ये विविध प्रकारचे रत्नदीप लावण्यात आले आहे व तुमच्या मनोरंजनासाठी ताटामध्ये वाळा व विविध प्रकारचे सुगंधी विडे ठेवण्यात आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी पंढरीरायाला माझ्याकडे पाहा अशी विनंती करत आहे आणि इकडे सर्व लोकांना पंढरीरायाची सेवा करण्यासाठी सावध राहा असे देखील सांगत आहे. ”
1:23
अभंग क्र. ३९९५
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥धृपद॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनिया ॥२॥
तुका म्हणे काय पढियते ते मागा । आपुलाले सांगा सुख दुःख ॥३॥
अर्थ
आता सर्वानी उठून उभे राहा कारण नारायण उठले आहेत व त्यामुळे सर्व मुनीजण आणि तीनही लोक आनंदले आहेत. अपार टाळ, मृदुंग वादयांचा गजर करा व हरीनामाचा जयजयकार करुन हरिच्या नामाचा घोष करा हरीच्या पायावर आपले शीर ठेवून आपले दोन्ही कर जोडून हरीचे मुख सादरपणे पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्हाला काय हवे असेल ते सर्व देवाला मागा आणि तुमचे सर्व सुख, दु:ख देवाला सांगा. ”
1:23
अभंग क्र. ३९९६
घडिया घालुनि तळी चालती वनमाळी । उमटती कोमळी कुंकुमाची ॥१॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकी जेणे ॥धृपद॥
पैस धरुनी चाला ठाकत ठायी ठायी । मौन्य धरुनी काही न बोलावे ॥२॥
तुका अवसरु जाणवितो पुढे । उघडली महाल मंदिरे कवाडे ॥३॥
अर्थ
हरी शय्यागृहातून येत असताना त्यांच्या पायाखाली वस्त्रांच्या घड्या घालून टाकल्या आहेत आणि त्यावरुन वनमाळी चालत येत आहेत व त्यावर हरीचे कुंकुम मंडीत कोवळी पावले उमटत आहेत. ज्याने पाषाणदेखील पाण्यात तारले अशा हरीच्या चरण रजाला सर्व जण म्हणजे लोकांनी वंदन करावे. पैस जागा सोडून हरीला जाण्यासाठी सर्वानी मधोमध जागा सोडा आणि सर्वानी जागोजागी हरीला जाण्यासाठी जागा ठेवून उभे राहा व मधोमध हरीला जाता येईल अशी जागा सोडा व सर्वानी मौन धारण करा कोणी कोणाशीही काहीच बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात, “आता हरीच्या शय्यागृहाचे कवाडे उघडले आहेत, हरी बाहेर येत आहेत आणि मी पुढे चोपदार म्हणून उभा आहे आणि तुम्ही कसे वागावे या विषयी वेळोवेळी मी तुम्हाला सूचना देत आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















