२५ नोव्हेंबर, दिवस ३२९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १००१ ते १०२५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९३७ ते ३९४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 25 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २५ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२५ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १००१ ते १०२५,

1001-18
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवी अंकुरु फुटला । विवेकाचा ॥1001॥
त्याप्रमाणे वैराग्यहि प्राप्त झाले, त्यात सद्गुरुंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ति करून घेण्याचीही अंत:करणात इच्छा झाली; 1
1002-18
तेणे ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥1002॥
मग त्यांच्या उपदेशानं ब्रह्म एक सत्य आहे व त्यावाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हे ऐकून साधकाचाहि त्याप्रमाणे दृढनिश्चय झाला; 2
1003-18
परी तेचि जे परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेही काम । सरे जेथ ॥1003॥
परंतु असे जे सर्वव्यापक व सर्वोत्तम परब्रह्म, ज्या ठिकणी मोक्ष शब्दहि नाहीसा होतो; 3
1004-18
यया तिन्ही अवस्था पोटी । जिरवी जे गा किरीटी । तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥1004॥
अर्जुना, साध्य, साधक व साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहींशी होते असे जे ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते, 4
1005-18
ऐक्याचे एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । काहीचि नुरोनि उरे । जे काही गा ॥1005॥
जेथे ऐक्याचा एकपणाहि उरत नाही व जेथे आनंदसुखाचा लेशहि उरत नाही व जेथे । काही न उरवून जे उरते, 5


1006-18
तिये ब्रह्मी ऐक्यपणे । ब्रह्मचि होऊनि असणे । ते क्रमेचि करूनि तेणे । पाविजे पै ॥1006॥
असे जे ब्रह्म, त्याब्रम्हाच्या ठिकाणी ऐक्य पावून राहणे ते त्याला मंदाधिकत्वामुळे क्रमानेच प्राप्त होते. 6
1007-18
भुकेलियापासी । वोगरिले षड्रसी । तो तृप्ति प्रतिग्रासी । लाहे जेवी ॥1007॥
क्षुधितापुढे षड्रस अन्नाचे ताट वाहून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ति वाढत वाढता शेवटल्या घासाला पूर्ण तृप्त होतो, 7
1008-18
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा । आंबुथिता आत्मठेवा । काढीचि तो ॥1008॥
त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने व विवेकरूप दीपाच्या प्रकाशाने आमस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो. 8
1009-18
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाच्या आंगी निरवधी । लेणे जाली ॥1009॥
तर आमरूप ऐश्वर्य भोगण्याची ज्या साधकाच्या अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली, 9
1010-18
तो जेणे क्रमे ब्रह्म । होणे करी गा सुगम । तया क्रमाचे आता वर्म । आईक सांगो ॥1010॥
तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ति सुलभ करून घेतो, त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो, ऐक. 10
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥18. 51॥


1011-18
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणे ॥1011॥
श्रीगुरुन दाखविलेल्या वाटेने विवेकतीर्थाच्या तीरावर येऊन बुद्धीचा मळ त्याने धुवून टाकतो. 11
1012-18
मग राहूने उगळिली । प्रभा चंद्रे आलिंगिली । तैसी शुद्धत्वे जडली । आपणया बुद्धि ॥1012॥
मग ज्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने सोडल्यावर ती चंद्रास आलिंगन देते, त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नानाप्रकाच्या दुर्वासनांनी भ्रष्ट झाला होता, तो शुद्ध होऊन ती आपल्या मूळच्या स्थितीस प्राप्त होते. 12
1013-18
सांडूनि कुळे दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागे स्वचिंतनी । पडली तैसी ॥1013॥
कुलस्त्री जशी दोन्ही कुळांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रियपतीलाच अनुकूल असते, तशी बुद्धि ही द्वैतभावना सोडून आत्मचिंतनांतच रत होते. 13
1014-18
आणि ज्ञान ऐसे जिव्हार । नेवो नेवो निरंतर । इंद्रियी केले थोर । शब्दादिक जे ॥1014॥
ज्ञानासारखी जिव्हाळ्याची वस्तु निरंतर बाहेर विषयाकडे नेउन इंद्रियांनी शब्दादि विषयांची थोरवी वाढविली आहे; 14
1015-18
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसे वृत्तिरोधे तया । पाचाही केले ॥1015॥
पण सूर्याचे किरण नाहीतसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसे धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध केला असता पांचहि विषय आपोआप नाही होतात. 15


1016-18
नेणता अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसी वोकविली सवासना । इंद्रिये विषयी ॥1016॥
भ्रष्टाचे अन्न न कळत खाल्यास ते जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे ज्याने वासनांसह विषय इंद्रियाकडून ओकविले, 16
1017-18
मग प्रत्यगावृत्ती चोखटे । लाविली गंगेचेनि तटे । ऐसी प्रायश्चित्ते धुवटे । केली येणे ॥1017॥
मग प्रत्यगाभ्याकडे त्यांना लावून आमरूप गंगेच्या तीरावर त्यांच्याकडून उत्तम प्रायश्चित्ते करविली 17
1018-18
पाठी सात्विके धीरे तेणे । शोधारली तिये करणे । मग मनेसी योगधारणे । मेळविली ॥1018॥
नंतर सात्विक धैर्याने ती सर्व इंद्रिये शुद्ध केली आणि मनाला योगाभ्यास करण्यास लावले. 18
1019-18
तेवीचि प्राचीने इष्टानिष्टे । भोगेंसी येउनी भेटे । तेथ देखिलियाही वोखटे । द्वेषु न करी ॥1019॥
त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही; 19
1020-18
ना गोमटेचि विपाये । ते आणूनि पुढा सूये । तयालागी न होये । साभिलाषु ॥1020॥
अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असता त्याविषयी अभिलाष धरीत नाही. 1020
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1021-18
यापरी इष्टानिष्टी । रागद्वेष किरीटी । त्यजूनि गिरिकपाटी । निकुंजी वसे ॥1021॥
(विविक्तसेवी) – ह्याप्रमाणे अर्जुना, इष्टानिष्ट भोगां-विषयींचा रागद्वेष सोडून तो पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन अशा एकांतस्थानी वास करितो 21

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥18. 52॥
1022-18
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥1022॥
जेथे मुळीच गलबला नाही अशा निर्जन वनांत, केवळ स्वतःचे शरीर हाच एक सोबती असा तो रहातो. 22
1023-18
शमदमादिकी खेळे । न बोलणेचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळे । नेणे वेळु ॥1023॥
इंद्रियांचा शमदम करणे हीच त्याची क्रीडा; मौन धारण करून असणे हाच त्याचा वाग्व्यवहार; असे असून गुरुपदेश चितनांत वेळ कसा व केव्हा गेला हेही त्यास समजत नाही. 23
1024-18
आणि आंगा बळ यावे । नातरी क्षुधा जावे । का जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥1024॥
(लघ्वाशी) शरीर बलिष्ठ व्हावे किंवा क्षुधा अल्पही राहू नये, किंवा जिभेचे लाड पुरवावे; 24
1025-18
भोजन करितांविखी । यया तिहीते न लेखी । आहारी मिती संतोषी । माप न सूये ॥1025॥
ह्या तिन्ही गोष्टींकडे त्याचे लक्ष नसते; संतोष रहावा (समाधानभंग होऊ नये) हेच त्याचे आहाराचे प्रमाण; अमुक खावेच असे त्याचे माप नसते. 25

दिवस ३२वा. २५, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९३७ ते ३९४८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३९३७ (हिंदीपदे)
अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बिगर नही कोय । अल्ला करे सो हि होये ॥१॥
मर्द होये वो खडा फीर । नामर्दकु नही धीर । आपने दिलकु करना खुसी । तीन दामकी क्या खुमासी ॥धृपद॥
सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर जा ॥२॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बनकर ते रोवे । सांतो पाचो मार लगावे । उतार सो पीछे खावे ॥३॥
सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटटी खावे । गावढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥
मेरी दारु जिन्हे खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥
बजारका बुझे भाव । वो हि पुसत आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लेंवो सखा ॥६॥
अर्थ
देवच देणारा आहे देवच देवविणारा आहे देवच दारु म्हणजे औषध आहे आणि आपल्याला खाऊ घालणारा देवच आहे. देवावाचून दुसरे कोणीही नाही आणि देव जे करील तेच होईन. जो खरा मर्द आहे तोच हे औषध घेण्यासाठी उभा राहील जे नामर्द आहेत आणि ज्यांच्या अंगी धैर्य नाहीत ते लोक औषध घेण्यासाठी उभे राहणार नाही. अरे हे औषध घेऊन आपल्या अंत:करणाला सुखी करुन घ्यावे दीडदमडीची काय किंमत तरी आहे काय ? सर्व रसांना मारुन म्हणजे त्यांचा त्याग करुन केवळ सर्व गोष्टींचे सार म्हणजे एक भजन नावाची गोळी आहे. विश्वास तर सर्वाचा मित्र आहे त्यामुळे तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर ही भजन नावाची गोळी थोडी तरी घेऊन जावी. ज्यांच्याजवळ नितीमत्ताच नसते ज्यांची नितीमत्ता नेहमी झोपलेलीच असते ते रोगी नेहमी पुढे रडतच असतात. सप्त धातू आणि पंचभूतात्मक शरीरावर हल्ला चढवून भवरोग
1:12
अभंग क्र. ३९३८ (हिंदीपदे)
आवल्ल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥
आल्ला एक तु नबी एक तु ॥धृपद॥
काटते सिर पावो हात नही जीव डराये । आगले देखो पिछले बुझो । आपे हजुर आये ॥२॥
सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावो रखते जबाब । नही आगली बात ॥३॥
सुनो भाई बजार नही । सब हि नर चलावे । नन्हा बडा नही कोये । एक ठोर मिलावे ॥४॥
एक तरि नही प्यार जीवतनकी आस । कहे तुका सोहि मुंढा राखलिये पायेनपास ॥५॥
अर्थ
सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर ते देवाचे नांव आहे त्यामुळे ते घेण्यासाठी कोणीही विसरु नये देवाचे नाम मनापासून घ्यावे आणि प्रेमपूर्वक वीणा वाजवित देवाचे नांव घ्यावे. हे देवा तूच एक आमचा स्वामी आहेस त्यामुळे आमचे कोणी हात, पाय, डोके जरी कापण्यासाठी आमच्याकडे धावून आले तरी आमचा जीव घाबरणार नाही कारण आमचा रक्षणकर्ता एक तूच आहे. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसण्यासाठी पुराणे पाहा पुराणांमध्ये भक्तांचे चरित्र वाचा भक्तांवर जर काही संकट आले तर त्यांचे रक्षण माझा स्वामी लगेच स्वत:हून भक्तांकडे धाव घेऊन त्यांचे रक्षण करतो. देवाने प्रल्हादिक भक्तांचे रक्षण करण्यासाठी कशी धाव घेतली हे तुम्ही पुराणातही पाहा. अरे तू तुझे सर्व इंद्रियांना परमात्याची भक्ति करण्याकडे लाव केवळ देहाचे, हातपायाचे रक्षण करुन त्यांचे पालनपोषण करुन काही उपयोग नाही तुझे पुढे काय होईल ही गोष्ट सुध्दा आता सांगता येणार नाही. बाबांनो ऐका एकदा की, मनुष्य देहाचा बाजार नाहीशा झाला की सर्वाना सारखेच चालावे लागते मग त्यानंतर लहान, मोठा, उच्च, नीच हा कोणताही भेद राहात नाही सर्वा�
1:13
अभंग क्र. ३९३९ (हिंदीपदे)
तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे । सीर काटे ऊर कुटे ताहा झड करे ॥१॥
ताहा एक तु ही ताहा एक तु ही । ताहा एक तु ही रे बाबा हम तुम्ह नही ॥धृपद॥
दिदार देखो भले नही किसे पछाने कोय । सच्चा नही पकड सके झुटा झुटे रोय ॥२॥
किसे कहे मेरा किन्हे सती लिया बास । नही मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥३॥
सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारा तो ही ॥४॥
भला लिया भेक मुंढे आपना नफा देख । कहे तुका सो ही सखा हाक आल्ला एक ॥५॥
अर्थ
अरे तू लोकाचा व्देष करतोस, त्यांचे डोके फोडतोस, त्यांचा ऊर कुटतोस हे वाईट आहे त्यामुळेच तर लोक तुला भितात अरे आम्ही तुम्ही एक हरीचेच रुप आहेत येथे कोणीही परके नाहीत. आपण जर ज्ञानदृष्टीने पाहिले तर कोणीही कोणाला ओळखत नाही आणि ख-याला कोणीही धरु शकत नाही म्हणजे जे सत्य आहे त्याला कोणीही धरु शकत नाही त्यामुळे तो खोटे खोटेच रडतो आहे. अरे तू कोणाला माझे म्हणतो आणि कोणत्या भाषाला सत्य मानतोस आपले मुख्य जीवन म्हणजे हरीचे स्वरुप आहे त्या स्वरुपाला तू मिळत नाहीस त्यामुळे तू तुझ्या जीवनाचा व्यर्थ नाश करुन घेत आहेस. त्यामुळे हे बाबांनो तुम्ही एक ऐका जे होणार आहे ते होणारच आहे तुमच्या पुढे वाटयाला जे काही अन्न येत असेल ते तुम्ही सर्वानी एकत्र मिळून, मिसळून एकमेकांना वाटून खा आणि सर्वत्र एक हरी आहे असा अनुभव घेत राहा तेच चांगले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “स्वत:च्या स्वहितासाठी तू आपले डोके मुंडून गोसाव्याचे रुप धारण केले आहेस पण आपला सखा एक हरी आहे हे समजून तू त्याला सतत हाक मारत राहा. ”
1:13
अभंग क्र. ३९४० (गोंधळ)
राजस सुंदर बाळा पाहो आलिया सकळा वो । बिबी बिंबोनि ठेली माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगीचीया किळा वो ॥१॥
राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी वो । त्यजुनिया चौघींसी लावी आपुलिये सोई वो ॥धृपद॥
सकुमार साजिरी कैसी पाउले गोजिरी वो । कंठी तुळसीमाळा उभी भीवरेच्या तिरी वो ।
दंत हिर्‍या ज्योति शंखचक्र मिरवे करी वो ॥२॥
निर्गुण निराकार वेदा न कळेचि आकार वो । शेषादिक श्रमले श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे भक्ता देत अभयकर वो ॥३॥
येउनि पंढरपुरा अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा तुकया स्वामीने किंकरा वो ॥४॥
अर्थ
विटेवर असणा-या माझ्या राजस सुकुमार सुंदर बाळाला पाहण्यासाठी सर्व भक्तरुपी स्त्री आई एकत्रित आल्या आहेत आणि परब्रम्‍हरूपी माझी विठाई प्रत्येकाच्या ह्रदयात प्रतिबिंबित होऊन राहिली आहे. तिच्या अंगी असलेल्या लीला कोटी चंद्रासुर्‍यासारख्या आहेत. हे राजास विठाबाई, माझे मन तुझे चरणी लागो. हे राजस सुकुमार माझी विठाबाई माऊली स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहांचा निराश होऊन माझे ध्यान तुझ्या पायीच एकरुप राहू दयावे. राजस सुकुमार साजेरी माझ्या विठाबाई माऊलीची पाऊले कशी गोजिरी आहेत ते पाहा ती आपल्या गळयामध्ये तुळशीची माळ घालून भिवरेच्या तीरी उभी आहे तिचे दात अगदी हि-याप्रमाणे चमकत आहेत व शंख, चक्र, पद्मगदा घेऊन ती उभी आहे. माझी विठाबाई माऊली निर्गुण, निराकार आहे तिचा वेदांना देखील आकार कळत नाही तिची स्तुती करताना शेष देखील थकला व श्रुती, उपनिषदे यांना देखील माझ�
1:13
अभंग क्र. ३९४१ (गोंधळ)
सुदिन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥
पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असे वो । नवस पुरवी माझा मनिची जाणोनिया इच्छा वो ॥धृपद॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥
बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे वो । उद्गारे गर्जती कंठी तुळसीची भूषणे वो ॥३॥
स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता विठाबाई पंचभूती वो ॥४॥
तुझे तुज पावले माझा नवस पुरवी आता वो । तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥५॥
अर्थ
हे माझे माऊली विठाबाई मी चांगल्या दिवशी आणि चांगल्या वेळेत तुझा गोंधळ मांडला आहे पंचप्राणांच्या दिवटया आणि दोन्ही नेत्रांचे हिलाल मी पेटवले आहे. त्यामुळे हे पंढरपूरनिवासी माझी विठाबाई माऊली मी तुझ्या रंगामध्ये नाचत आहे त्यामुळे तू माझ्या मनातील इच्छा जाणून तू माझे नवस पूर्ण कर. मी त्रैलोक्यामध्ये तुझा विश्वरुपेने देव्हारा मांडला आहे चित्त चतुष्ट याचा चौक मांडून मध्यभागी अंत:करणाचा कळस म्हणून ठेवला आहे किंवा त्रैलोक्यात प्रसिध्द असलेल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये तुझा देव्हारा मांडून पंढरी क्षेत्रात चौक साधला आणि मध्यभागी वीटरुपी कळस मांडून ठेवला आहे. आणि त्यावर आमची देवता बसली आहे व त्याच्या पुढे आमचे वैष्णव हरीनामाचा गजर करीत आहे. मोठयाने हरीनामाचा गजर वैष्णव करीत असून त्यांच्या गळयामध्ये तुळशीच्या माळांची भूषणे आहेत. स्वानंदाच्या ताटामध्ये अहंकाराचा धूप जाळून साक्षी चैतन्याचा दीप ओवाळला आणि ते पंचभूतात्मक देहाचा पंचारतीने विठाबा�
1:13
अभंग क्र. ३९४२ (गोंधळ)
सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी वो ।
विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥
अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणी गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवे शिरोमणी वेल्हाळा वो ।
कोटि रविशशिप्रभा तेजे लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिका अनुपम्य इची लीळा वो ॥धृपद॥
सावळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।
कटी क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो । गर्जती चरणी वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥
अष्टांगे मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोलिव शुध्द रसाची ओतिव सुगंध लावण्यखाणी वो ।
सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनी वो । बहु रूपे नटली आदिशक्ति नारायणी वो ॥३॥
घटस्थापना केली पंढरपुरमहानगरी वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही तालांवरी वो ।
आरंभिला गोंधळ इने चंद्रभागेतिरी वो । आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥
तेहतिस कोटि देवचामुंडा अष्टकोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पाच्या वरुषाव वो ।
नारद तुंबर गायन ब्रम्हानंद करिती गंधर्व वो । वंदी चरणरज तेथे तुकयाचा बांधव वो ॥५॥
अर्थ
माझ्या विठाबाई माऊलीचे मुख अतिशय सुंदर आहे व तिच्या कानामध्ये मनोहर कुंडले आहेत तिच्या वेणीची आकृती नागासारखी असून तिच्या कपाळावर केशर आणि कस्तुरीचा मळवट आहे. माझ्या विठाबाई माऊलीचे नेत्र अतिशय मोठे असून तिच्या गळयामध्ये वैजयंती माळ अतिशय शोभून दिसत आहे. तिने पितांबराची कास घातलेली असून तिच्या अंगाला चंदनाची उटी अतिशय शोभून दिसत आहे. अश�
1:13
अभंग क्र. ३९४३ (कैकई)
ऐक बाई तुज वो काही सांगते शकुन । निजलिया भुर होसी जागे म्हणउन ॥१॥
मान्य माझे केले सांगते एका बोले । न येता हे भले कळो कोणा लोकासि ॥धृपद॥
सांगते गुण जीवींची खुण ऐक माझी मात । बैस एका भावे माझे हाती दे वो हात ॥२॥
बरवा घरचार तुज सापडला ठाव । फळ नाही पोटी येथे दिसे खोटा भाव ॥३॥
आहे तुझे हाती एका नवसाचे फळ । भावा करी साह्य चहू अठरांच्या बळे ॥४॥
करी लागपाठ चित्त वित्त नको पाहो । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥
कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाही ठावी ॥६॥
तुका म्हणे नांद सुखे धरी आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राखे बहु मान ॥७॥
अर्थ
शुभशकुन सांगणारे कैकेयी म्हणजे कैकाडीन म्हणते की, “हे बाई मी एक शुभशकुन सांगते ते ऐक, तू जर हरीभजनामधे झोपी गेलीस तर नरकाला भुरर्कन उडून जाशील त्यामुळे तू जागृत राहा. ” मी जे काही एक शब्द सांगितले आहे ते संतांनी देखील मान्य केले आहेत माझे बोलणे व्यवहारामध्ये अति हुशार असलेल्या मनुष्याला देखील कळत नाही. मी तुला जीवाची खरी खूण सांगते मी सांगितलेली गोष्ट तू ऐक हरीच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्तिभावाने तू बस आणि हातात हात तू दे मी तुझा हात पाहते. अरे मला तुझा हात पाहून असे दिसते आहे की, तुला घरदार, धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व काही चांगले ठिकाण मिळालेले आहे परंतु तुला हरीकृपेचे फल प्राप्ती झालेली नसून तुला मिथ्याभास होत आहे म्हणजेच हरीच्या ठिकाणी तुझा खोटा भाव मला दिसतो आहे. अरे तुझ्या हाती एक नवसाचे फळ आहे तू चार वेद आणि अठरा पुराणे यांच्या बळाने भक्तिभावाला साहाय्य कर. अरे तू सारखा गूरुचा �
1:14
अभंग क्र. ३९४४
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तो सांगतसे भावे । असो ठावे सकळा ॥धृपद॥
निराकारी ओस दिशा । येथे इच्छा पुरतसे ॥२॥
तुका म्हणे रोकडे केणे । सेविता येणे पोट धाय ॥३॥
अर्थ
देव हेच खरे संत आहेत आणि संत हेच खरे देव आहेत. त्यांची मूर्ती म्हणजे केवळ उपाधीला निमित्त आहेत. मी हे सर्वाना भक्तिभावपूर्वक सांगत आहे हे सर्वाना माहितच असावे. निर्गुण, निराकाराच्या ठिकाणी सर्व दिशा ओस असतात परंतु संतांच्या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “संत हे रोकडा माल आहे आणि जो कोणी याचे सेवन करेल त्याचे पोट तृप्त होते. ”
1:14
अभंग क्र. ३९४५
न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरा जन्म तया उदरी ॥१॥
कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक हरी सकळ वो ॥धृपद॥
हनुमंता भेटी गर्व हरीला दोहीचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥
द्रौपदीचा भेद पुरविला समयी । ॠषि फळवनी देठी लाविता ठायी ॥३॥
अर्जुनाच्या रथी कपिध्वज स्तंभी ठेविला । दोही पैज तेथे गर्व हरी हा दादुला ॥४॥
भावभक्ती सत्त्वगुण झाला दुर्जना । तुका म्हणे सकळा छंदे खेळे आपण ॥५॥
अर्थ
हरीची माया नारदमुनींना कळली नाही त्यामुळे भगवंताची एक पत्नी नारदाने मागितली. त्यामुळे नारदाचे नारदी होऊन त्याची सात संवत्सरे मुले झाली. या हरीची माया कशी आहे ते पाहा ती कोणालाही आकळणारी नाही अतिशय चपळ असून हरी हा सर्वत्र व्यापक आहे. हनुमंत भगवंताला भेटण्यासाठी व्दारकेत आले त्यावेळी गरुडाचा आणि सत्यभामेचा दोघाचाही अभिमान नाहीसा करण्यासाठी देवाने एक युक्ती केली हनुमंताला आणण्यासाठी देवाने गरुडाला पाठविले त्यावेळी गरुड हनुमंताला आपली शक्ती दाखवू लागला तेव्हा हनुमंताने गरुडाला एक तडाखा लावला आणि त्यावेळी गरुडाचा आपल्या बळाविषयीचा अभिमान नाहीसा झाला व नंतर स्वत: श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्राचे रुप घेऊन हनुमंतास भेटण्यास चालले होते त्यावेळी श्रीकृष्णाने सत्यभामेला सीतेचे रुप घेऊन येण्यास सांगितले परंतु सत्यभामेला सीतेचे रुप धारण करता येईना त्यावेळी सत्यभामेचा आपला रुपाविषयी असलेला अभिमान नाहीसा झाला अशा प्रकारे देवाने सत्यभामा आणि गरुड या दोघाचाही गर्वाचा नाश केला. भगवान श्रीकृष्णाच्या देवत्वाविषयी द्रौपदीला श
1:14
अभंग क्र. ३९४६
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवे पण आता आमुचा दावा ॥१॥
कैसा जासी सांग आता मजपासुनी । केले वाताहात दिले संसारा पाणी ॥धृपद॥
अवघी आवरूनि तुझे लाविली पाठी । आता विसर त्या सोहं कोहंच्या गोष्टी ॥२॥
तुका म्हणे आता चरणी घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आम्हासी तुटी ॥३॥
अर्थ
हे उदारा कृपाळा देवांच्या देवा आता मी प्रतिज्ञा करुन सांगतो की, आमचा तुझ्यावर दावा म्हणजे हक्क आहे. आता तू माझ्यापासून दूर कसा जाशील ते मला तू सांग कारण तुझ्यासाठी मी माझ्या संसाराची वाताहात करुन संसारावर मी पाणी सोडले आहे. देवा मी माझ्या सर्व इंद्रियांना आवरुन तुझ्या पाठीमागे लावले आहे आता सोहंम, कोहंमच्या गोष्टी म्हणजे तुझ्या नीजस्वरुप आणि देहाच्या अहंकृतीच्या गोष्टी सोडून दयावेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी आणि तू एकच आहे हे मला समजले आहे त्यामुळे मी तुझ्या चरणाला मिठी घातली आहे त्यामुळे आपल्या दोघामध्ये तूट जरी पडली तरी काहीच हरकत नाही. ”
1:14
अभंग क्र. ३९४७
करूनी विनवणी पायी ठेवी माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेसे वाटते पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥धृपद॥
असो नसो भाव आलो तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे तुझी आम्ही वेडींवांकुडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ॥३॥
अर्थ
हे पंढरीनाथा मी तुम्हाला विनवणी करुन तुमच्या पायावर माथा ठेवीत आहे त्यामुळे तुम्ही माझी विनंती ऐका. देवा तुमच्या पायाजवळच अखंडीतपणे मी असावे असे मला वाटते त्यामुळे थोडासा संकोच तुम्ही सहन करुन मला तुमच्या पायाजवळ जागा दयावी. हे पंढरीराया माझ्या ठिकाणी भक्तिभाव असो वा नसो परंतु मी तुमच्या ठिकाणी आलो आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पाहावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही तुझी वेडीवाकडी लेकर आहोत त्यामुळे आम्ही तुझे नाम घेत आहोत व तुमच्या नामाच्या आधारानेच आमचा भव पाश तुम्ही तोडून टाका. ”
1:14
अभंग क्र. ३९४८
झाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥
तुझ्या उजळली नामे । चित्त प्रक्षाळिले प्रेमे ॥धृपद॥
अनुतापे झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥
तुका म्हणे देह पायी । ठेवूनि झालो उतराई ॥३॥
अर्थ
हे देवराया माझे शरीर फार मलीन झाले होते. परंतु तुझ्या नामाने माझे शरीर स्वच्छ, शुध्द झाले आणि चित्त तुझ्या प्रेमाने स्वच्छ धुतले गेले. देवा पश्चातापामुळे पापाचा नाश झाला आणि प्रारब्धाचा संबंध तुटला. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझा देह तुझ्या पायी ठेवून मी उतराई झालो आहे. ”

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading