६ डिसेंबर, दिवस ३४० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२५१ ते १२७० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४०६९ ते ४०८०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“६ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 December
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ६ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
६ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२५१ ते १२७०,

1251-18
तैसा बुद्धी वाचा काये । जो माते आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपाये । कर्मे करू ॥1251॥
त्याप्रमाणे, काया, वाचा, मनेंकरून जो माझा आश्रय करून राहिला आहे, तो क्वचित् निषिद्धही कर्म करो. 51
1252-18
परी गंगेच्या संबंधी । बिदी आणि महानदी । येक तेवी माझ्या बोधी । शुभाशुभांसी ॥1252॥
पण, गंगाप्रवेश झाल्या वर ओहोळ आणि महानदी हा जसा भेद उरत नाही त्याप्रमाणे, ज्याला माझ्या स्वरूपाचे ज्ञान झाले आहे त्याला शुभ व अशुभ दोन्ही कर्मे तुल्य असतात 52
1253-18
का बावने आणि धुरे । हा निवाडु तवचि सरे । जव न घेपती वैश्वानरे । कवळूनि दोन्ही ॥1253॥
हा अस्सल चंदन आहे व हा धुर करणारा निंब आहे असा विचार, ती दोन्ही काष्ठे अग्नींत टाकली नाहीत तोपर्यंतच असतो. 53
1254-18
ना पांचिके आणि सोळे । हे सोनया तवचि आले । जव परिसु आंगमेळे । एकवटीना ॥1254॥
पांचकशी व सोळाकशी, असा भेद सोन्यात तोंवरच असतो, की जपर्यंत हलक्या सोन्याला परिसाचा संबंध घडत नाही. (तो जडल्याबर हिणकट धातूचे उत्तम सुवर्ण होणारच). 54
1255-18
तैसे शुभाशुभ ऐसे । हे तंवचिवरी आभासे । जव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥1255॥
सर्वत्र माझा एकाचच प्रकाश (व्याप्ति) आहे अशा बोधाचा जोंवर उदय झाला नाही तोवर शुभ व अशुभ असे भेद बुद्धिपुढे उभे रहातात. 55


1256-18
अगा रात्री आणि दिवो । हा तवचि द्वैतभावो । जव न रिगिजे गावो । गभस्तीचा ॥1256॥
अरे, रात्र आणि दिवस हा दैतभाव, ती दोघे, सूर्याच्या गावाला गेली नाहीत तोंवरच नांदतो (तेथे रात्रही नाही व तत्सापेक्ष दिवसही नाही) 56
1257-18
म्हणौनि माझिया भेटी । तयाची सर्व कर्मे किरीटी । जाऊनि बैसे तो पाटी । सायुज्याच्या ॥1257॥
म्हणून, अर्जुना, माझ्या यथार्थस्वरूप प्रकाशापुढे, त्याच्या शुभाशुभ सर्व कर्माचेभस्म होऊन तो सायुज्यपदावर बसतो. 57
1258-18
देशे काळे स्वभावे । वेचु जया न संभवे । ते पद माझे पावे । अविनाश तो ॥1258॥
देशाने, कालाने अगर निसर्गतः ज्याचा कधीही नाश संभवत नाही असे जे माझे अविनाशपद (सायुज्यपद) हे त्याला प्राप्त होते. 58
1259-18
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता । लाहे तेणे न पविजता । लाभु कवणु असे ॥1259॥
किंबहुना, अर्जुना, मी जो परमात्मा त्याची प्रसन्नता अथवा त्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो; आणखी कोणता असा लाभ असणार की, जो या प्रसादानंतरही मिळणे बाकी आहे ? 59
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥18. 57॥

1260-18
याकारणे गा तुवा इया । सर्व कर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपी धनंजया । संन्यासु कीजे ॥1260॥
यास्तव, धनंजया, तू आपली सर्वं कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर. 1260
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1261-18
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणे करा । आत्मविवेकी धरा । चित्तवृत्ति हे ॥1261॥
परंतु अर्जुना, तो कर्मसंन्यास अकृत्रिम असून चित्तवृत्ति आत्मविचाराकडे असू दे. 61
1262-18
मग तेणे विवेकबळे । आपणपे कर्मावेगळे । माझ्या स्वरूपी निर्मळे । देखिजेल ॥1262॥
मग त्या आत्म- विचाराच्या सामर्थ्याने. तुला, कर्माहून अत्यंत वेगळे असलेल्या अशा आपल्या निर्मळ स्वरूपाचे माझ्या स्वरूपात दर्शन होईल. 62
1263-18
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे । ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥1263॥
आणि कर्माचे जन्मस्थान जी प्रकृति किंवा अविद्या तिचा व आपला काहीही संबंध नाही हे तुझ्या ध्यानी येईल. 63
1264-18
तेथ प्रकृति आपणया । वेगळी नुरे धनंजया । रूपेवीण का छाया । जियापरी ॥1264॥
( विचारा अंती तुला असेही कळून येईल कि) रूपावाचून छाया म्हणून जसा स्वतंत्र पदार्थ नसतो, त्याप्रमाणं स्वात्मसत्तेहून प्रकृतीला पृथक् सत्ताच नसल्यामुळे ती आपल्याहून वेगळीही नाही, असें, अर्जुना तुझ्या ध्यानात येईल. 64
1265-18
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु । निफजेल अनायासु । सकारणु ॥1265॥
अशा अनिर्वचनीय स्वरूपाविष्करणाने प्रकृतीचा नाश (मिथ्यात्व) झाला म्हणजे, तीच कर्माचे जन्मस्थान किंवा कारण असल्यामुळे, कर्माचा कारणासहवर्तमान सहजच संन्यास होतो. 65


1266-18
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरे आपणपया । तेथ बुद्धि घापे करूनिया । पतिव्रता ॥1266॥
अशा रीतीने सर्वकर्मसंन्यास झाला असता, मी आत्मा सहजच नित्य स्थित आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुझी बुद्धि पवित्रतेप्रमाणे सदैव स्थिर असू दे. 66
1267-18
बुद्धि अनन्य येणे योगे । मजमाजी जै रिगे । तै चित्त चैत्यत्यागे । मातेचि भजे ॥1267॥
बुद्धि अनन्यभावाने मत्स्वरूपी रत आली म्हणजे चित्तही अन्य चिंतनाच्या विषयांच्या त्यागाने माझ्याच भजनी लागेल. 67
1268-18
ऐसे चैत्यजाते सांडिले । चित्त माझ्या ठायी जडले । ठाके तैसे वहिले । सर्वदा करी ॥1268॥
याप्रमाणे विषय त्याग झालेले चित्त माझ्या स्वरूप नित्य जडून राहील असे सत्वर कर. 68
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्‌क्ष्यसि ॥18. 58॥
1269-18
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियाचि भरेल जेधवा । माझा प्रसादु जाण तेधवा । संपूर्ण जाहला ॥1269॥
मग अशा प्रकारच्या अभेद सेवेने तुझे चित्त जेव्हा मद्रूप होईल, तेव्हांच तुझ्यावर माझा पूर्ण प्रसाद झाला असे समज. 69
1270-18
तेथ सकळ दुःखधामे । भुंजीजती जिये मृत्युजन्मे । तिये दुर्गमेचि सुगमे । होती तुज ॥1270॥
ह्या प्रसादाने जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढी दुर्गम दुःखे भोगावी लागतात ती सर्व तुला सुतर (सुगम) होतील. (भोगावी लागणार नाहीत) 1270
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३४० वा. ६, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०६९ ते ४०८०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ४०६९
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासी । कृपादानाविसी उदार ॥१॥
विठ्ठल स्मरणा कोवळा । विठ्ठल गौरवी आगळा । आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥धृपद॥
उभाचि परी न मनी सीण । नाही उद्धरिता भिन्न । समर्थाचे घरी एकचि अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥
रुचीचे प्रकार । आणिताती आदरे । कोठे ही न पडे अंतर । थोरांसी थोर धाकुटया धाकुटा ॥३॥
करिता बळ धरिता नये । झोंबता डोळे मनच होय । आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथे । तो नाही भरिले रिते । करितो सेवन आइते । तुका म्हणे चित्ते चित्त मेळवूनी ॥५॥
अर्थ
विठ्ठल हा देव भीमातीरीच्या ठिकाणी वास करतो तो पंढरपूर निवासी आहे. तो पुंडलिकाजवळ असून भक्तांवर कृपादान करण्यासाठी अतिशय उदार आहे. विठ्ठलाचे स्मरण करण्यास अतिशय मृदू आहे, सोपे आहे, कोवळे आहे आणि सर्वाच्या दृष्टीने तो सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठल हा सर्व ब्रम्हांडाचा आधार असून भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तो लीला निग्रही म्हणजे स्वत:च्या इच्छेने रुप धारण करतो. विठ्ठल भक्तांसाठी विटेवर एकसारखा उभा आहे परंतू त्याचा शीण त्रास तो मानून घेत नाही आणि भक्त कोणत्याही प्रकारचा असला तरी त्यांचा उध्दार करण्याविषयी तो भिन्नत्व मनात आणीत नाही. समर्थ माणसाच्या घरी जर कोणी जेवणासाठी गेले तर सर्वाना सारख्या प्रमाणात सारखेच अन्न वाढण्यात येते आणि जे खरे भुकेलेले आहेत त्यांना क्षणो क्षणाला सांभाळले जाते. आवडीचे पदार्थ ते आदराने आणतात व त्यांना वाढतात त्यामध्ये त्यांच्यात कोणतेही अंतर प
26/12/22, 10:45 Sdm:
अभंग क्र. ४०७०
ताप हे हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसे दुःख । अवलोकिता उपजे सुख । उभे सन्मुख दृष्टीपुढे ॥१॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी । स्तविता न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥धृपद॥
रामकृष्णध्यान वामननारसिंही । उग्र आणि सौम्य काहीच नाही । सापडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाही याचे भातुके ॥२॥
गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हे ॥३॥
ठाण हे साजिरे सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपंपार । तो हा कटी कर धरिताहे ॥४॥
जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा । अनंता अंगी अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक ॥५॥
अर्थ
हरीचे श्रीमुख पाहिले की त्रिविधतापाचा नाश होतो आणि भवरोगासारखे दु:ख देखील हरले जाते. हरीच्या सन्मुख उभे राहून त्याच्या दृष्टीपुढे उभे राहून त्याला पाहिले की सुख उत्पन्न होते. हरीला दृष्टीने पाहाण्याची तृप्ती पूर्ण होतच नाही हरी म्हणजे कृपेची सखोल खाणच आहे. हरी हा समचरणी असून कृपानिधी आहे त्याचे वर्णन करण्यासाठी वेदवाणी देखील पुरी पडली नाही. रामकृष्ण हे, वामन ध्यानासारखे सौम्य आणि नृसिंह ध्यानासारखे उग्र नाही. जे हरीची भक्ती करतात त्यांनाच हरीची प्राप्ती होते आणि शुध्द भक्तिभाव हाच खरा खाऊ म्हणजे भातूके हरीचे आहेत. नारायणाच्या ठिकाणी गंभीर, चातुर्य, सर्वज्ञ, शूरत्व, धैर्य आणि उदार अशा प्रकारचे अनेक गुण आहेत. नारायण हा त्रिभुवनातही व्यापक असून त्याचे लावण्य सर्वाना मोहीत करणारे आहेत. हरीच्या शरीराची ठेवण ही अतिशय साजिरी सुंदर अविनाशी अविकार आहेत. जो अनंत आहे आणि अपरंपार आहे तोच परमा�
26/12/22, 10:45 Sdm:
अभंग क्र. ४०७१
एक मागणे हृषीकेशी । चित्त द्यावे सांगतो वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करी ॥१॥
नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक । तू स्वामी मी सेवक । खंडणा नको करू ऐसी ॥धृपद॥
मना येईल तो जन्म देई । भलते कुळी भलते ठायी । ते मी साकडे घालीत नाही । हृदयींहुनी तूंवा न वजावे ॥२॥
इतुले करी भलत्या परी । भलत्या भावे तुझे द्वारी । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥३॥
नको विचारू दुसरे आता । शरण आलो जी पंढरीनाथा । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तू दाता दानशूर ॥४॥
अर्थ
हे ऋषीकेशी माझे एक मागणे आहे मी तुम्हाला ते सांगतो तेवढे तुम्ही माझ्या शब्दाकडे तुमचे चित्त दयावे. तुमच्या चरणात व माझ्यात अंतर पडणार नाही असेच कृपादान तुम्ही माझ्यावर करा. यावाचून मला इहलोक परलोक याचे ऐश्वर्य रिध्दी सिध्दी यांची इच्छा उत्पन्न होईल अशी बुध्दी देऊ नकोस. तू स्वामी असावा आणि मी सेवक असावा देवा यामध्ये फक्त तू खंडन करु नकोस. देवा तुझ्या मनाला येईल त्या ठिकाणी मला तू जन्माला घाल अगदी कोणत्याही कुळात कोणत्याही ठिकाणी मला तू जन्माला घाल. देवा मला कुठेही जन्माला घालण्याबद्दल मी तुला कोणत्याही प्रकारचे साकडे घालीत नाही. परंतू माझ्या हृदयामधून तू जाऊ नयेस. देवा तू एवढेच कर की कोणत्याही प्रकारे, कोणत्याही पध्दतीने मी तुझ्या दारामध्ये काम करणारा दासाप्रमाणे होऊन राहीन आणि माझ्या वाणीने तुझे नित्य नाम वदत राहावे. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, “हे जी पंढरीनाथा तुम्ही दुसरे कोणताही विचार करु नका मी तुम्हाला शरण आलो आहे. तू मोठा दात��
26/12/22, 10:46 Sdm:
अभंग क्र. ४०७२
कई देखता होईन डोळी । सकळा भूती मूर्ती सांवळी । जीवा नांव भूमंडळी । जळी स्थळी काष्ठी पाषाणी ॥१॥
ऐसी कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरी बुडईन । होईल स्नान अनुतापी ॥धृपद॥
ऐसा कई येईन दैवास । दृश्य हे नासोनि जाईल आस । सदा संतचरणी देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥
कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहीसा होईल पार । अमृत ते पृथ्वीतळी सागर । वाहातील पूर आनंदाचे ॥३॥
प्रसन्न दया क्षमा शांती । कई नवविधा होईल भक्ती । भोगईन वैराग्य संपत्ती । मनोरथ कळती तई पुरले ॥४॥
तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पाग । म्हणोनि घातले साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥५॥
अर्थ
मी माझ्या डोळयाने देवाची सावळी मूर्ती सर्व प्राणीमात्रामध्ये केव्हा पाहीन ? प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भूमंडळामध्ये जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देवा तुझी सावळी मूर्ती मी केव्हा पाहीन ? मी या जगाचा जीव होईन अशी कृपा नारायण माझ्यावर केव्हा करेन ? मी अनुतापाने म्हणजे पश्चात्तापाने स्नान करुन प्रेमसागरात बुडेल अशी कृपा नारायण माझ्यावर करील काय ? सर्व दृश्य पदार्थांचा नाश होऊन माझी आशा नाश पावेल, आणि माझ्या देहाचा नेहमी संतांच्या चरणाजवळ वास होईल आणि त्यांचे उच्चिष्ट मला तृप्ती होईपर्यंत सेवन करण्यास मिळेल असे माझे भाग्य केव्हा उदयास येईल ? माझ्या सुखाचा अंत:पार लागणार नाही, आणि माझ्या आनंदामृताचे पूर पृथ्वीतळावर वाहून त्याचा समुद्र तयार होण्याचा नवस मी केला आहे त्याला अंकुर म्हणजे फळ केव्हा येतील ? माझ्यावर दया, क्षमा, शांती हे प्रसन्न केव्हा होतील आणि केव्हा मला नवविधा भक्ती प्रा��
26/12/22, 10:46 Sdm:
अभंग क्र. ४०७३
तू बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनी । रिघालो पाठी तुझी म्हणउनी । आता करीन मनी असेल ते ॥१॥
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजी स्थापिला ॥२॥
उपकर्म करावा बहुत । तरी तू जाणसी धर्मनीत । उचित काय ते अनुचित । राखे शरणागत आलो आता ॥३॥
तू देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा शुर । महावीरा वीर धनुर्धर । मी तो पामर काय तेथे ॥४॥
किती म्या काय विनवावे । शरण आलो जीवे भावे । तुकयाबंधु म्हणे करावे । क्षेम आघवे येणे काळे ॥५॥
अर्थ
हे देवा या त्रिभुवनामध्ये सर्व बलवंतांचा तू शिरोमणी आहेस. असे म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे घुसलो आहोत. आता तुझ्या मनाला येईल तसे तू कर. देवा तू कृपासिंधू आहेस दीनवत्सल आहेस रावणाच्या बंदीशाळेतील देवांची तूच सुटका केली आहेस तू सर्व दैत्य कुळाचा, राक्षस दळाचा संहार केला आणि तुला शरण आलेल्या बिभीषणाला लंकेच्या राज्यावर तू बसविले. जरी आम्ही काही उपक्रम करण्याचा प्रयत्न केला तरी तू सर्व धर्मनीती जाणत आहेस. आता उचित काय व अनुचित काय हे तूच पाहा आणि मी तुला शरण आलो आहे व शरण आलेल्या भक्तांचे तू रक्षण कर. देवा तू प्रताप दीनकर आहेस सुर व असुरांमध्ये तू शूर आहेस. सर्व वीरांमध्ये तू महावीर धनुर्धर आहेस मग तेथे मी पामर काय आहे ? तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात, “देवा मी तुला किती आणि काय विनवावे त्यामुळे आता काहीच न करता तुला जीवेभावे शरण आलो आहे. देवा यावेळेला माझे सर्व प्रकारे क्षेमरक्षण करावे. ”
26/12/22, 10:47 Sdm:
अभंग क्र. ४०७४
देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणता लागताहे वेळ । नसे पाहाता भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥
जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म ते अझुनी । सत्य आचरण नेणे स्वप्नी । निखळ खाणी अवगुणाची ॥२॥
भक्ती दया अथवा कथा । कानी न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥३॥
काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचे तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥४॥
निंदा द्वेष घात विश्वास । करिता नाही केला आळस । करू नये ते केले संतउपहास । अभक्ष ते ही भिक्षले ॥५॥
पाळिले नाही पितृवचन । सदा परद्वारी परधनी ध्यान । बोलो नये घडले ऐसे अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी ॥६॥
कायामने वाचा इंद्रियाशी । सकळ पापंचिच राशी । तुकयाबंधू एसीयासी । आलो ह्रषिकेशी तुज शरण ॥७॥
अर्थ
देवा मी चांडाळ आहे चांडाळ आहे हे म्हणण्यासाठी देखील मला वेळ लागत आहे. माझ्यासारखा अमंगळ आणि दुष्ट या भूमंडळावर पाहण्यास गेले तर दुसरा कोणीही नाही. देवा मी ज्या दिवशी जन्मलो तेव्हापासून ते आतापर्यंत अजूनही असत्यच कर्म करतो आहे. सत्य आचरण तर मी स्वप्नातही केले नाही मी तर केवळ अवगुणाची खाणच आहे. देवा भक्ति, हरीकथा, दया याविषयी मी कानाने ऐकले तर मला ते सहन होत नाही. देवा विषयाची तळमळ माझ्यामध्ये अखंड आहे. अशा प्रकारे मी अधमाहूनही अधम आहे. काम, क्रोध, दंभ, अहंकार, गर्व, ताठा, मद, मत्सर हे सर्व उत्पन्न होण्याचे माहेरघर म्हणजे माझे शरीर आहे. एखादयाने जर दुस-यावर उपकार केले तर तो मला वै-याप्रमाणेच वाटतो. परनिंदा व्देष विश्वासघात हे करण्यासाठी मी कधीही आळस केलाच नाही. आणि करु नये ते संतांची हेळणा मी केली आण
26/12/22, 10:47 Sdm:
अभंग क्र. ४०७५
काय काय करितो या मना । परी नाइके नारायणा । करू नये त्याची करी विवंचना । नेऊ पतना आदरिले ॥१॥
भलतिये सवे धावे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडे काही कपट । घात बळकट मांडियेला ॥२॥
न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळे आकाशा । घाली उडी बळेचि देखोनि फासा । केलो या दोषा पाहुणा ॥३॥
चेतवूनि इंद्रिये सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसे चांडाळ अनिवार हे ॥४॥
आता काय ऐसे करावे यासी । बहुत जाचिलो केलो कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धाव मज ऐसी परी झाली ॥५॥
अर्थ
हे नारायणा माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी मी काय काय करतो आहे काय सांगू परंतू ते माझे काही ऐकतच नाही. जे करु नये त्याचीच विवंचना त्याच्याच विषयी हाव ते मन धरते आणि मला पतनाला नेऊ पहाते. माझे मन भलत्याच विषयांकडे सैराटपणे धावत जाते मग त्या वाटेमध्ये काटे कुटे द-या आहेत की काय हे देखील ते पहात नाही. या मनाने कोणत्याही प्रकारचा विचार न करता बळकटपणाने माझा घातच करण्याचे ठरवलेले आहे. अहो या मनाला भ्रमण करण्यासाठी दहा दिशा, सप्त पाताळ आणि आकाश देखील पुरत नाही. देवा ज्या ठिकाणी माझे चांगले होणार नाही अशा ठिकाणचा फासा पाहून हे मन बळेच तेथे उडी घालते आहे अशा प्रकारे याने मला सर्व दोषाचा पाहूणाच करुन ठेवलेला आहे. माझ्या मनाने माझ्या इंद्रियांमध्ये काम, क्रोध, आशा, तृष्णा या सर्वाना चेतवून दिले आहे या मनाने सर्व दुष्टांना जागृत करुन माझी चांगली शुध्द बुध्दी माझ्यापासून दूर केली आणि त्याने माझी रायाच केली अगदी राळ करुन टाकली म्हणजे माझी फजि��
26/12/22, 10:48 Sdm:
अभंग क्र. ४०७७
खाणोरीयांची पुसो घरे । जीही बरे पाळती ॥१॥
सांगती त्या जावे वाटे । धरोनी पोटामध्ये गोष्ठी ॥धृ॥
आली गेली होती ठाया । सत्य छाया कळली ॥२॥
तुका म्हणे आपुले बळ । युक्ती काळ कारण ॥३॥
अर्थ
ज्यांनी देवाच्या निजस्वरुपावर दरोडा घालून त्याची चांगल्या प्रकारे पाळत ठेवली आहे अशाच लोकांचे घरी आम्ही विचारु. ते मला जे काही गुह्य गोष्टी सांगतील आणि जो कोणता मार्ग दाखवतील त्या मार्गाने आम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्दयात साठवून जाऊ. ज्या संतांनी देवाच्या निजस्वरुपावर दरोडा घातला आहे ते संत देवाच्या ठिकाणी गेले आलेले आहेत त्यामुळे त्यांना देवाची खरी कृपा कळली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “संतांनी सांगितलेल्या मार्गावर तर जावेच परंतू आपल्याही ठिकाणी असलेल्या युक्ती आणि बळाचे वापर करावे म्हणजे योग्य काळ आला आणि योग्य वेळ आली की सर्व साधने सफल होतात. ”
26/12/22, 10:48 Sdm:
अभंग क्र. ४०७६
नोहे आजीकालीचे ऐसे । अनारिसे पालटे ॥१॥
आता लागवेग करा । ज्याचे धरा ठाके ते ॥धृपद॥
नका सांगो वाउग्या गोष्टी । चाहूल खोटी ये ठायी ॥२॥
तुका म्हणे मोडा माग । आपुला लाग करुनी ॥३॥
अर्थ

हा देव म्हणजे आजकाल जन्माला आलेला नाही तो कितीही काळ गेला तरी बदलण्यासारखा नाही आता या देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी लाग वेग म्हणजे त्वरा करा भक्ति करण्यासाठी जो मार्ग तुम्हाला धरता येईल तो मार्ग तुम्ही धरा. हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी व्यर्थ, निरर्थक, अनुभवशून्य गोष्टी सांगू नका कारण त्या गोष्टी या ठिकाणी चालत नाही त्या गोष्टी खोट्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आपल्या मागील देहासंबंधी व मी देह हा सर्व मार्ग सोडा आणि आपल्या आत्मस्वरुपाचा मार्ग शोधून हरीशी तुम्ही एकरुप व्हावे. ”
26/12/22, 10:49 Sdm:
अभंग क्र. ४०७८
बैसो आता मनी । आले तैसेचि वदनी ॥१॥
मग अवघेचि गोड । पुरे सकळ हि कोड ॥धृपद॥
बाहेरील भाव । तैसा अंतरी हि वाव ॥२॥
तुका म्हणे मणि । शोभा दावीली कोंदणी ॥३॥
अर्थ
मुखाने जसे भक्तिज्ञान वैराग्याच्या गोष्टी करता येतात तसेच ते मनामध्येही रुजलेले असावे. मग सर्व काही गोड होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जसा आपला बाहेरील भक्तिभाव आहे तसाच प्रकारचा भक्तिभाव अंतरंगातही रुजलेला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, “कोंदण करुन जसा हिरा लावल्यावर शोभून दिसतो अगदी त्याप्रमाणे भक्ति, ज्ञान, वैराग्याच्या गोष्टी आपण बाहेर बोलतो तसेच अनुभव अंत:करणातही असेल तर आपण केलेले कार्य शोभून दिसते. ”
26/12/22, 10:49 Sdm:
अभंग क्र. ४०७९
यत्न आता तुम्ही करा । मज दातारा सत्तेने ॥१॥
विश्वास तो पायावरी । ठेवुनि हरी राहिलो ॥धृपद॥
जाणतचि दुजे नाही । आणीक काही प्रकार ॥२॥
तुका म्हणे शरण आलो । नेणे बोलो विनविता ॥३॥
अर्थ
हे दातारा आता तुम्ही तुमच्या सत्तेने माझे रक्षण करण्याचे प्रयत्न करा. हे हरी तुमच्या पायावर मी विश्वास ठेवलेला आहे. देवा तुमच्यावाचून दुसरा कोणताही प्रकार मी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुम्हाला शरण आलो आहे दुसरे काहीही मी बोलत नाही केवळ माझे रक्षण करा एवढी एकच विनंती तुम्हाला करत आहे. ”
26/12/22, 10:50 Sdm:
अभंग क्र. ४०८० (आरत्या)
जगदिश जगदिश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ती ।
पुण्यपापविरहित सकळा अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणता सर्वथा ॥धृपद॥
आगम निगम तुज नेणती कोणी । परि तू भाव भक्ती जवळीच दोन्ही ।
नेणता विधियुक्त ईश्वराते पूजनी । न माये ब्रम्हांडी तो संपुष्टासनी ॥२॥
असुरा काळ भासे विक्राळ पुढे । पसरी मुखएक चावितो धुडे ।
भक्त शरणागता चालतो पुढे । दावी वाट जाऊ नेदी वाकडे ॥३॥
एकाएकी बहु विस्तरला सुखे । खेळे त्याची लीला तोचि कवतुकें ।
तेथे नरनारी कवण बाळके । काय पापपुण्य कवण सुखदुःखे ॥४॥
सकळा वर्मां तूचि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख ।
जाणो म्हणता तुज ठकली बहुतेक । तुका म्हणे शरण आलो मज राख ॥५॥
अर्थ
देवा तुला सर्वच जण जगदीश, जगदीश असे म्हणतात परंतू सर्व जगामध्ये सर्वत्र तू तुझ्या युक्तीने व्यापक आहेस. देवा तुझी युक्ती म्हणजे अशी आहे कि, तू तर सर्व पाप पुण्याचा आधिपती आहे सर्वत्र तू व्यापक आहे परंतू कमळ जसे पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त राहते त्याप्रमाणे तू सर्वत्र व्यापक असून देखील सर्वापासून अलिप्त राहतोस तू सुर्‍याप्रमाणे केवळ सर्वत्र साक्षी रुपाने पहात आहेस. हे पंढरीनाथा तुझा त्रिवार जयजयकार असो तुझे विठ्ठल नाम घेतले असता पाप मागे शिल्लकच रहात नाही. देवा तुला वेद आणि शास्त्र हे कोणीही जाणत नाही त्यांना तू कळतही नाहीस परंतू भक्ति आणि भाव या दोन्हीही ठिकाणी तू राहात असतोस. विधियुक्त ईश्वराची पूजा कशी करावी ही ज्या भोळया भक्त भाविकाला कळत न��

डिसेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading