२० नोव्हेंबर, दिवस ३२४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ८७६ ते ९०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३८७७ ते ३८८८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२० नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 20 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २० नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८७७ ते ३८८८ चे पारायण आपण करणार आहोत.
२० नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ८७६ ते ९००,

876-18
नातरी सप्तगुणार्णवी । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥876॥
किंवा सत्वगुणरुपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्रप्रकृतीरूप पृथ्वी होय. 876
877-18
का गुणांचे सातांही ओघी । हे क्रिया ते गंगा जगी । तया महोदधीचिया आंगी । विलसे जैसी ॥877॥
अथवा सप्तगुणरूपी ओघांनी क्षात्रक्रियारुपी गंगा ही क्षात्रप्रकृती धारण करणार्‍या ह्या महोदधिला मिळवून शोभते. 877
878-18
परी हे बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥878॥
या सर्व गोष्टी राहू दे. क्षात्र प्रकृतीची शौर्याधिक गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. 878
879-18
आता वैश्याचिये जाती । उचित जे महामती । ते ऐके गा निरुती । क्रिया सांगो ॥879॥
आता हे महामते, वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतो, ऐक. 879

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥18. 44॥
880-18
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणे जे ॥880॥
(कृषी) शेत, बीज, नांगर इत्यादी साहित्य मिळवून त्यांच्यायोगे पुष्कळ नफा मिळविणे, 880
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


881-18
किंबहुना कृषी जिणे । गोधने राखोनि वर्तणे । का समर्घीची विकणे । महर्घीवस्तु ॥881॥
किंबहुना कृषिकर्म करून अथवा (गोरक्ष्य) गाईचं संरक्षण करून किंवा (वाणिज्य) सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकणे, 881
882-18
येतुलाचि पांडवा । वैश्याते कर्माचा मेळावा । हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥882॥
अर्जुना, वैश्य जातीने ह्या तीन प्रकारे कर्म करून निर्वाह करणे, हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय. 882
883-18
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्मे तिन्ही वर्ण । ययाचे जे शुश्रूषण । ते शूद्रकर्म ॥883॥
आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण या तिन्ही वर्णास द्विज हे नाव आहे व यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे. 883
884-18
पै द्विजसेवेपरौते । धावणे नाही शूद्राते । एवं चतुर्वर्णोचिते । दाविली कर्मे ॥884॥
परंतु द्वीजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच नाही. या प्रकारे करून चारी वर्णांची कर्मे तुला सांगितली. 884

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥18. 45॥
885-18
आता इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसे करणा । शब्दादिक ॥885॥
आता, या चार वर्णांची निरनिराळी उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. ज्याप्रमाणे कर्मादि इंद्रियांना शब्दादिक विषयच योग्य उचित होत, 885


886-18
नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥886॥
अथवा मेगा पासून पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय. आणि अर्जुना नदीस उचित स्थान समुद्र, 886
887-18
तैसे वर्णाश्रमवशे । जे करणीय आले असे । गोरेया आंगा जैसे । गोरेपण ॥887॥
तसे वर्णाश्रमधर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म, ते केले असता, गौर अंगास जसे गोरेपण शोभा देते, तशी त्या वर्णांला अत्यंत शोभा येते. 887
888-18
तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखे वीरोत्तमा । प्रवर्तावयालागी प्रमा । अढळ कीजे ॥888॥
हे विरोतमा त्या स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. 888
889-18
पै आपुलेचि रत्न थिते । घेपे पारखियाचेनि हाते । तैसे स्वकर्म आपैते । शास्त्रे करावी ॥889॥
परंतु आपल्याजवळ असलेले रत्न जसे रत्न पाख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते, तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे. 889
890-18
जैसी दिठी असे आपुलिया ठायी । परी दीपेवीण भोग नाही । मार्गु न लाहता काई । पाय असता होय ? ॥890॥
जशी आपल्याजवळ दृष्टी असूनही दिव्यावाचून तिचा उपयोग होत नाही आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्याचा काय उपयोग ? 890
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


891-18
म्हणौनि ज्ञातिवशे साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलिया शास्त्रे गोचरु । आपण कीजे ॥891॥
म्हणून जातीप्रमाणे जो जो योग्य अधिकार असेल, तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा. 891
892-18
मग घरींचाचि ठेवा । जेवी डोळ्या दावी दिवा । तरी घेता काय पांडवा । आडळु असे ? ॥892॥
मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवितो, तेव्हा तो घेण्याविषयी प्रतिबंध असतो काय ? 892
893-18
तैसे स्वभावे भागा आले । वरी शास्त्रे खरे केले । ते विहित जो आपुले । आचरे गा ॥893॥
तसे स्वभावतः आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्यांचे जो आचरण करतो; 893
894-18
परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी । आंगे जीवे मांडुनी । तेथेचि भरु ॥894॥
पण आळस सोडून व फलेच्छा टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्वकाळ घालवितो; 894
895-18
वोघी पडिले पाणी । नेणे आनानी वाहणी । तैसा जाय आचरणी । व्यवस्थौनी ॥895॥
पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडेच जात नाही तसे त्याचे आचरण यथाशास्त्र होते; 895


896-18
अर्जुना जो यापरी । ते विहित कर्म स्वये करी । तो मोक्षाच्या ऐलद्वारी । पैठा होय ॥896॥
अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्मांचे स्वतः आचरण करितो, तो पुरुष मोक्षाच्या अलीकडले दार वैराग्य तेथे प्राप्त होतो. 896
897-18
जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि काही संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥897॥
जो अकरण व निषिद्ध या कर्मांचा संबंध होऊ देत नाही, म्हणून आत्मप्राप्ती विरुद्ध जो संसार, त्याच्या भयापासून मुक्त होतो; 897
898-18
आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडे । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥898॥
तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणिला तरी पाय अडकवून घेत नाही, तसे काम्य कर्माकडे जो कौतुकानेहि पहात नाही; 898
899-18
येर नित्य कर्म तव । फळत्यागे वेचिले सर्व । म्हणौनि मोक्षाची शीव । ठाकू लाहे ॥899॥
आणि दुसरे जे नित्यकर्म, त्याचा फलत्याग् केल्यामुळे तेही तो संपवितो; त्यामुळे तो मोक्षाचा शिवेजवळ प्राप्त होतो. 899
900-18
ऐसेनि शुभाशुभी संसारी । सांडिला तो अवधारी । वौराग्यमोक्षद्वारी । उभा ठाके ॥900॥
अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा राहतो. 900
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३२४ वा. २०, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८७७ ते ३८८८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३८७७ (बाळकोडेचेअभंग)
नाही नाश हरी आठविता मुखे । जोडतील सुखे सकळ ही ॥१॥
सकळी ही सुखे वोळली अंतरी । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊ विसरली बाहेरी गोपाळे । तल्लीन सकळे कृष्णसुखे ॥३॥
सुख ते योगिया नाही समाधीस । दिले गाई वत्स पशु जीवा ॥४॥
वारला पाऊस केव्हा नाही ठावा । तुका म्हणे देवावाचूनिया ॥५॥
अर्थ
जो मुखाने हरीचे नामस्मरण करतो त्याला देव आठवितो त्याचा कधीही नाश होत नाही त्याला जगातील सर्व प्रकारचे सुख येऊन मिळतात. ज्याच्याकडे जगातील सर्व सुखे आपोआप येऊन मिळाली आहेत, सर्व सुखे त्याच्याकडे वळली आहेत अशा मनुष्याला बाहेर कोणत्याही विषयाशी किंवा कार्‍याशी काय काम आहे ? सर्व गोपाळ कृष्णसुखाच्या बाहेर येण्याचे विसरुन गेले कृष्णसुखामध्ये ते अगदी तल्लीन झाले होते. समाधी अवस्थेमध्ये असताना देखील जे सुख योगी मुनींना मिळत नाही ते सुख कृष्णाने गाई, वत्स, पशु, पक्षी व सर्व जीवांना दिले. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी इंद्राने क्रोधित होऊन गोकुळवाशीयांवर अतिवृष्टी केली त्यावेळी सर्व गोपाळ भगवंताच्या सुखामध्ये म्हणजे कृष्णसुखामध्ये तल्लीन झाले होते आणि पाऊस केव्हा थांबला हे कोणालाही देवावाचून कळले नाही केवळ एका देवालाच पाऊस केव्हा थांबला हे माहित होते.
12:52 Sdm:
अभंग क्र. ३८७८ (बाळकोडेचेअभंग)
यासि समाचार सांगतो सकळा । चलावे गोकुळा म्हणे देव ॥१॥
देव राखे तया आडलिया काळे । देव सुखफळे देतो दासा ॥२॥
दासा दुःख देखो नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळता ॥३॥
नाही मेघ येता जाता देखियेला । धारी वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढे भक्तांचे साकडे अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥
अर्थ
इंद्राने क्रोधित होऊन गोकुळावर अतिवृष्टी केली मग भगवंताने गोवर्धनगिरी पर्वत उचलला व त्या गोवर्धनगिरी पर्वताखाली सर्व गोकुळवाशी राहू लागले, पशु पक्षी राहू लागले नंतर गोपाळांना वाटले की, हा गोवर्धनगिरी पर्वत आम्ही सर्वानी उचलून धरला आहे असा अहंभाव त्यांच्या ठिकाणी तयार झाला तेव्हा भगवंताने करंगळीच्या नखावर गोवर्धनगिरी पर्वत उचलला आहे हे गोपाळांना कळले त्यावेळी त्यांचा गर्वनाश झाला सात दिवस सर्व त्या पर्वताखाली वास करत होते नंतर कृष्ण्‍ गोपाळांना म्हणाला की, “इंद्राने हा अतिवृष्टीचा वर्षाव का केला ते तुम्हाला मी सांगतो चला. ज्यावेळी भक्तांवर संकट येते त्यावेळी देव त्यांची मदत करतो आणि त्यांना सुख फळे देतो. आपल्या दासांना दु:ख झालेले देवाला पाहावत नाही दु:ख होण्याच्या आधी त्या दु:खाचे निवारण देव करतो त्यामुळेच अतिवृष्टीतून मेघ कधी आले आणि कधी गेले व शिळा धारांचा वर्षाव किती दिवस चालला हे सुध्दा कोणालाही कळले नाही. ” तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे भक्तांचे येणारे संकट अनंतावर येऊन पडते आणि तोच त्याचे निवारणही करतो. ”
12:53 Sdm:
अभंग क्र. ३८७९ (बाळकोडेचेअभंग)
काकुळती एके पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जाले ते काळी आनंद । कळला गोविंद साच भावे ॥३॥
भावे तयापुढे नाचती सकळे । गातील मंगळे ओंव्या गीत ॥४॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाहाती पावे ॥५॥
वत्से गाई पशू नाचती आनंदे । वेधलिया छंदे गोविंदाच्या ॥६॥
चित्त वेधियेले गोविंदे जयाचे । कोण ते दैवाचे तयाहुनि ॥७॥
तयाहुनि कोणी नाही भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥
अर्थ
इंद्राने ज्यावेळी अतिवृष्टी गोकुळावर केली त्यावेळी सात दिवस सर्वजण त्या गोवर्धनगिरीच्या खाली होते पाऊस ओसरला की नाही हे पाहाण्यासाठी काही गोपाळ भित भित बाहेर पाहू लागले तर त्यावेळी हरी म्हणाला, “आता भिऊ नका पाऊस ओसरला आहे. ” मग पाऊस ओसरलेला पाहून सर्वजण म्हणू लागले की, “हा पाऊस जणू आपल्यासाठी काळच होऊन आला होता मग सर्वजण गोवर्धनाच्या बाहेर आले. ” त्यावेळी सर्वाना कौतुक झाले, आनंद झाला गोविंद ख-या भावनेने सर्वाना कळला. भक्तिभावपूर्वक सर्व लोक कृष्णापुढे नाचू लागले व मंगलकारक ओव्या, गीत सर्व लोक गाऊ लागले. सर्वजण राम, कृष्णावर ओव्या गात होते व गोपाळ मुरली, पावा वाजवत होते. गाई, वत्स, पशु, पक्षी हे गोविंदाच्या छंदाने आनंदीत झाले होते व त्या छंदात नाचत होते. गोविंदाने ज्याचे चित्त वेधून टाकले आहे त्याच्यापेक्षा दैववान, भाग्यवान दुसरा कोण आहे ? गोविंद ज्यांच्याशी अखंडीत संगतीत आहे त्याच्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणीही नाह�
12:53 Sdm:
अभंग क्र. ३८८० (बाळकोडेचेअभंग)
गोकुळींची गती कोण झाली परि । पाहो आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशी मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलो ॥२॥
आता जीव नाही सांगावया रानी । पुरिले पाषाणी शिळाधारी ॥३॥
रिता कोठे नाही राहो दिला ठाव । जल्पती तो भाव न कळता ॥४॥
न कळता देव बळे हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥
माव न कळता केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥
पाहता ते आहे जैसे होते तैसे । नाचती विशेषे तुका म्हणे ॥७॥
अर्थ
आपण अतिवृष्टी केली त्यामुळे गोकुळाची अवस्था काय झाली हे जाणून घेण्यासाठी इंद्राने मेघांना बोलावून विचारपूस केली. मग मेघ इंद्राजवळ बोलू लागले आपला बडिवार सांगू लागले की, “आम्ही सर्व संहार करुन आलो आहोत. आम्ही त्या गोकुळातील सर्व लोकांना पाषाण आणि शिळा धारांनी पुरुन टाकले आहे आता त्या रानामध्ये कोणीही एक प्राणी शिल्लक आहे असे सांगण्यात देखील राहिले नाही. ” खरे प्रकार काय आहे हे काहीही माहित नसतांना ते मेघ इंद्राजवळ नको त्या गोष्टी सांगू लागले व म्हणू लागले की, “आम्ही त्या ठिकाणी काहीही बाकी ठेवलेले नाही. ” ज्यांना देव समजत नाही ते अहंकाराने नको ते काहीही हुंबरत असतात परंतु खरेतर शेवटी त्यांचा अपमानच होत असतो. खरी वस्तुस्थिती काय आहे हे काहीही माहित नसतांना मेघांनी नको ती तोंडपिठी केली. मग इंद्र आपल्या दृष्टीने पाहाण्यासाठी स्वत: तेथे आला. “तुकाराम महाराज म्हणतात, “मग तेथे इंद्र आला त्याने पाहिले तर काय की, जसे गोकुळवाशी पूर्वी होते तसेच होते याउलट विशेष आनंदाने ते नाचत होते. ”
12:54 Sdm:
अभंग क्र. ३८८१ (बाळकोडेचेअभंग)
नाचता देखिली गाई वत्से जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारी । वांचली ही परी कैसी येथे ॥२॥
येथे आहे नारायण संदेह नाही । विघ्न केले ठायी निर्विघ्न ते ॥३॥
विचारिता उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळो आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचे ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥
सीणता जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळा समागमे ॥७॥
समागमे गाईं वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळिता अंगसंग ॥८॥
संग जाला मायबापा लोकपाळा । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥
करिते हे जाले स्तुती सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पाजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणे नादे ॥१२॥
नामाचे गजर गंधर्वांची गाणी । आनंद भुवनी न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळी देवासी दोही ठायी ॥१४॥
दोही ठायी सुख दिले नारायणे । गेला दरुषणे वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥
अर्थ
इतकी अतिवृष्टी करुन देखील गोकुळातील सर्व लोक, गाई, वत्स, जीव, जंतू, पशु, पक्षी आनंदाने नाचत आहे हे पाहून इंद्र विस्मितच झाला. तो आश्चर्यचकित झाला इंद्राला वाटले की, आपण इतका शिळा धारांचा वर्षाव करुन देखील हे सर्वजण वाचले तरी कसे ? मग इंद्र विचार करु लागला की, आपण एवढे विघ्न आणून देखील येथे काहीच परिणाम झाला नाही त्याअर्थी येथे नारायण आहे यात कोणत्याही प्रकारचा संशयच नाही, मुळात नारायण जेथे आहे ते ��
12:54 Sdm:
अभंग क्र. ३८८२ (बाळकोडेचेअभंग)
गोविंदाचे नाम गोड घेता वाचे । तेथे हे कइंचे वैरभाव ॥१॥
भावे नमस्कार घातला सकळी । लोटांगणे तळी महीवरी ॥२॥
वरी हातबाहे उभारिली देवे । कळलीया भावे सकळांच्या ॥३॥
सकळ ही वरी बहुडविले स्थळा । चलावे गोपाळा म्हणे घरा ॥४॥
राहिली ही नाचो गोविंदाच्या बोले । पडिलीया डोले छंदे हो ती ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यासि ॥६॥
त्यासी तुका म्हणे आनंदे सकळ । ठेंगणे गोपाळा समागमे ॥७॥
अर्थ
गोविंदाचे नाम अतिशय गोड आहे ते वाचेने घेतले असता तेथे वैरभाव राहीलच कसा ? इंद्र देवाने व गोकुळातील लोकांनी भूमीवर साष्टांग लोटांगण घेऊन कृष्णाला दंडवत घातला. सर्वाच्या अंत:करणातील भक्तिभाव जाणून देवाने वर हात केला. देवाने सर्वाना आपआपल्या स्थानी जाण्यास सांगितले व गोपाळांनाही आपआपल्या घरी जाण्यास सांगितले. कृष्णाने सर्वाना आपआपल्या स्थळी जाण्याची आज्ञा केली त्यानंतर सर्व गोपाळाचे नाचणे बंद झाले गोपाळ आपआपल्या घरी गेल्यानंतर देखील स्वस्थ पडल्यावरही कृष्णाच्या छंदात आनंदाने नाचत होते. त्या सर्व गोकुळवाशीयांना कृष्णाचा इतका छंद लागला होता की, त्यांना स्वत:लाही स्वत:ला आवरता येत नव्हते इतका कृष्णाचा आनंदाचा छंद त्यांना आला होता. तुकाराम महाराज म्हणतात, “लहान गोपाळांच्या संगतीत तर त्यांना जास्त आनंद झाला. ”
12:55 Sdm:
अभंग क्र. ३८८३ (बाळकोडेचेअभंग)
समागमे असे हरी नेणतिया । नेदी जाऊ वाया अंकितांसि ॥१॥
अंकिता सावध केले नारायणे । गोपाळ गोधने सकळही ॥२॥
सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसी सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगीकार देवे । न कळता भावे वाचवी त्या ॥४॥
त्या जाला निर्धार हरी आम्हापासी । निवांत मानसी निर्भर ती ॥५॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणे ॥६॥
नारायण भय येऊ नेदी गावा । तुका म्हणे नावा अनुसरे त्या ॥७॥
अर्थ
जो हरीला अंकित आहे आणि त्याला कसल्याही प्रकारचे ज्ञान जरि नसले तरी देखील हरी त्याला वाया जाऊ देत नाही. नारायणाने आपल्याला अंकित असलेल्या सर्व गाई वासरांना व गोपाळांना सावध केले. इंद्राने अतिवृष्टी केली व सर्वजण सात दिवस त्या गोवर्धनगिरीच्या खाली उभे होते त्यानंतर पाऊस ओसरल्यावर सर्वजण गोकुळात पुन्हा आले व कृष्णाने या मोठया संकटातून आपल्याला वाचवले याचा आनंद त्यांच्या मनात झाला. भगवंताने कृष्णाने सर्वाचा अंगीकार केला अतिवृष्टीचा कोणताही त्रास गोकुळवाशीयांना देवाने जाणून दिला नाही व त्यांचे प्राण वाचविले. त्या सर्व गोकुळवाशीयांची खात्री झाली की, हरी आमच्याजवळच आहे त्यामुळे सर्वाच्या मनामध्ये आनंद निर्माण होऊन सर्वजण निश्चिंत झाले होते. गोकुळातील सर्व लोकांना नारायणाने आनंदीत केले. तुकाराम महाराज म्हणतात, “जो नारायणाच्या नामाला अनुसरतो त्याच्या गावाला भय देखील नारायण येऊ देत नाही. ”
12:56 Sdm:
अभंग क्र. ३८८४ (बाळकोडेचेअभंग)
अनुसरे तया फिरो नेदी मागे । राहे अंग संगे समागमे ॥१॥
अंगसंग असे क्रम साक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसे फळ ॥धृपद॥
फळपाकी भोग देतील प्राणीये । तुका म्हणे नये सवे काही ॥२॥
अर्थ
जो देवाला अनुसरुन राहतो देवाच्या अंगसंगतीत राहतो देवाच्या सोबत असतो त्याला देव कधीही पुन्हा संसाराकडे मागे येऊ देत नाही. देव सर्वाच्या अंत:करणात व्यापलेला आहे त्यामुळे सर्वाच्या कर्माचा साक्षी तोच आहे ज्याचा जसा भक्तिभाव असेल त्याचा तसे फळ देव त्याला देतो. तुकाराम महाराज म्हणतात, “जशा प्रकारचे कर्म मनुष्य करेल तशा प्रकारचे फळरुपी भोग त्याला प्राप्त होतात आणि संचित कर्मावाचून मनुष्या काहीही बरोबर जात नाही. ”
12:56 Sdm:
अभंग क्र. ३८८५ (बाळकोडेचेअभंग)
ये दशे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रूपे अनंते । पुढेहि बहुत करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे । केला नारायणे अवतार ॥३॥
अर्थ
अशा प्रकारे कृष्णाने रांगत असल्यापासून ते गाई रक्षण करण्यापर्यंत विविध प्रकारचे चरित्र केले. नंतर देवाने गोपाळाचे सोंग देखील बाजूला सारले कारण देवालापुढे खूप मोठे मोठे काम करायचे होते. तुकाराम महाराज म्हणतात, “खरे तर नारायणाने धर्मसंस्थापना करण्यासाठीच अवतार घेतलेला होता. ”
12:57 Sdm:
अभंग क्र. ३८८६ (बाळकोडेचेअभंग)
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती ते नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढे तो ही भाव आरंभिला ॥२॥
लाविले लाघव पाहोनिया संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥
न साहवे दुःख भक्तांचे या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥
रूप हे चांगले रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारिता ॥६॥
उच्चारिता नाम कंस वैरभावे । हरोनिया जीवे कृष्ण केला ॥७॥
कृष्णरूप त्यासि दिसे अवघे जन । पाहे तो आपण कृष्ण झाला ॥८॥
पाहिले दर्पणी आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तोचि झाला ॥९॥
झाली कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥
अर्थ
जे दुष्ट आहे परपीडा जे दुस-यावर करतात दुस-यांना त्रास देतात त्यांचा संहार करण्यासाठीच देवाने अवतार घेतला होता. दैत्य आणि कंसाने परपीडा करण्याचे कार्य चालू केले देवाने देखील सर्व दुष्टांचा नाश करण्याचे आरंभिले. कृष्णाने देखील विविध प्रकारच्या योजना करुन संधी साधून सर्व दुष्ट लोकाचा वध केला. जे लोक दुष्ट आहेत, जे लोक दुस-यांना त्रास देतात ते लोक या चक्रपाणी कृष्णाला सहन होत नाहीत. भक्तांचे दु:ख देवाला सहन होत नाही त्यामुळे तर देवाला अवतार घ्यावा लागतो, रुपाला यावे लागते. राम आणि कृष्ण हे रुप व हे नाम अतिशय चांगले आहे हे नाम आपल्या मुखाव्दारे उच्चारले असता संसार श्रम नाहीसे होतात. कंसाने वैर भावनेने का होईना पण्‍ कृष्णाचे नाम उच्चारले त्यामुळे त्याची जीवदशा नाहीशी झाली तोही कृष्णरुप झाला त्याला सर्व लोक कृष्णमयच दिसू लागले स्वत:ला आरशात पाहिले तरी स्वत: कृष्णमय
12:57 Sdm:
अभंग क्र. ३८८७ (बाळकोडेचेअभंग)
सैन्य जन हासे राया जाले काई । वासपे तो ठायी आपणासि ॥१॥
आपणा आपण जाय सती जैसी । वैरभाव ज्यासि भक्ति नाही ॥२॥
नाही याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावे ती तया हासती । तयास दिसतो अवघी हरी ॥४॥
हरीला कंसाचा जीव भाव देवे । द्वेषाचिया भावे तुका म्हणे ॥५॥
अर्थ
कंसाला सर्व सैन्य, सर्व लोक आणि स्वत:चे शरीरही कृष्णरुपच दिसू लागले त्यामुळे तो सारखा कृष्ण, कृष्ण करु लागला व त्याचे सैन्य म्हणू लागले की, आपल्या राजाला झाले काय, वेड लागले की काय असे म्हणून हसत होते. सती ही स्वत: अग्नीत प्रवेश करते अगदी त्याचप्रमाणे ज्याच्या ठिकाणी कृष्णाविषयी भक्तीही नाही आणि वैरभावही नाही तसाच हा प्रकार समजावा म्हणजेच सर्व लोक आपल्यासारखे सामान्य आहे असेच त्याला वाटू लागते. कंसाचा व सैन्यांचा कृष्णाविषयी एकविधभाव नाही त्यामुळे त्यांचे छंद वेगवेगळे आहेत. कंसाला भयामुळे सर्व लोक कृष्ण दिसू लागले त्यामुळे तो सारखा कृष्ण कृष्ण करु लागला आणि सैन्याला कंस राजा, आपण सैन्य, कृष्ण वैरी असा प्रकार दिसत होता त्यामुळे कंस कृष्ण कृष्ण करत असताना ते त्याला हसत होते. तुकाराम महाराज म्हणतात, “कंसाने भय भावनेने कृष्णाचे ध्यान केले त्यामुळे त्याची जीवदशा नाहीशी झाली व देवाने त्याला कृष्णमयच केले. ”
12:58 Sdm:
अभंग क्र. ३८८८ (बाळकोडेचेअभंग)
द्वेषाचिया भावे हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्म अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावे । तुका म्हणे जीवे जाणे लागे ॥३॥
अर्थ
कंस व्देष भावनेने श्रीकृष्णाचे ध्यान करु लागला व तो देखील हरीरुप झाला त्याचा देहभाव नाहीशा झाला. कंसाचा देहाभिमान नाहीशा झाला होता देह भावना ठेवून कर्म केले तर त्यापासून अभिमान वाढत जातो मग त्याला नारायणाची प्राप्ती होईल कशी ? तुकाराम महाराज म्हणतात, “नारायणाविषयी एकविध भक्तिभाव आपल्या अंत:करणामधे असावा आणि आपला जीव भाव देवाला अर्पण करावा. ”

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading