१. महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी, सार्थ

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

🌹 महिषासुरमर्दिनी स्तोत्र 🌹
Mahishasur Mardini Stotra Marathi
Mahishasur Mardini Stotra English
Mahishasur Mardini Stotra Hindi
Navaratra Devi Puja Upasana

नवरात्र देवी पूजा उपासना
महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी
महिषासुरमर्दिनी स्तोत्र इंग्रजी
महिषासुरमर्दिनी स्तोत्र हिंदी

आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्त या स्तोत्राचे पठण करतात. रोज पठण केल्याने आध्यात्मिक वाढ होते असे म्हणतात. महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे पठण आव्हानात्मक काळात किंवा संकटाच्या वेळी देवी दुर्गेचे संरक्षणात्मक कवच मिळविण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी केले जाते.

शारदीय नवरात्रीत महिषासुर मर्दिनीचे पठण अवश्य करावे. पौराणिक मान्यतेनुसार माता भगवतीच्या या स्तोत्राचा पाठ केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. शास्त्रानुसार, जो कोणी दिवसातून एकदाही माँ महिषासुरमर्दिनी स्तोत्राचा पाठ करतो, त्याच्या आयुष्यात कधीही समस्या येत नाहीत.

अयि गिरि नन्दिनी नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवर विन्ध्यशिरोधिनिवासिनी विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१॥

हे पर्वताच्या कन्ये, जिने सर्व जगताला आनंदी केले आहे, जी या विश्वात स्वर्गीय क्रीडा करते, (शिवाचे वाहन) नंदी जिची स्तुती करतो, श्रेष्ठ विन्ध्य पर्वताच्या शिखरावर जी रहाते, जी विष्णूला आनंद देते, इंद्र जिची स्तुती करतो, देवी भगवती, जी नीलकंठाची अर्धांगिनी आहे, जिच्या कुटुंबात असंख्य लोक आहेत, जिने (भक्तांसाठी) खूप काही केले आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.



सुरवर वर्षिणि दुर्धर धर्षिणि दुर्मुख मर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिष मोषिणि घोषरते।
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२॥

जी देवांवर वरांचा वर्षाव करते, जिने दुर्धर व दुर्मुख या राक्षसांचा नाश केला, जी (निजानंदात) मग्न आहे, जी तिन्ही लोकांचे पोषण करते, शंकराला आनंद देते, पातकांचे हरण करते, घोर गर्जना करते, जी दानवांचा क्रोध दाबून टाकते, दैत्यांवर आपला राग काढते, राक्षसांचा माज उतरवते, जी (लक्ष्मी म्हणून) समुद्रातून उत्पन्न झाली आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणार्‍या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रिय वासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमालय शृङ्गनिजालय मध्यगते।
मधुमधुरे [२]मधुकैटभ गञ्जिनि कैटभ भञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥३॥

हे सर्व जगताच्या आणि माझ्याही माते, कदंब वृक्षांच्या राईमध्ये राहणे जिला आवडते, जिला हास्य विनोद आवडतो, जी उंच हिमालयाच्या शिखरावर असलेल्या आपल्या घरात रहाते, मकरंदासारखी गोड असून जी मधु आणि कैटभ या राक्षसांचा तिरस्कार करते, कैटभाचा पराभव करून त्याला दूर पळवून लावते, (आणि त्या सगळ्या) गदारोळात जिला मजा येते, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

अयि शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुंड गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥४॥

तिस-या ओळीचा संदर्भ देवीमाहात्म्याच्या सातव्या अध्यायातील, देवीने कालीचे रूप घेऊन चंड आणि मुंड राक्षसांचा आपल्या तलवारीने शिरच्छेद केला या कथेशी आहे. यामुळे ती चामुंडा या नावाने ओळखली जाते.

तिस-या चरणात ‘ विपाटितमुण्ड ’ ऐवजी ‘ विपाटितभण्ड ’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास देवीने आपल्या भुजांनी भण्डासुराच्या सैनिकांना ठार मारले असा अर्थ होईल.

हे चंडिके माते, तू युद्धात शत्रूंच्या अवाढव्य हत्तींचे शिर व धड व सोंडेचे सहजपणे तुकडे तुकडे करतेस, त्यामुळे तू प्रचंड पराक्रमी आहेस हे दिसून येते, तसेच महाविक्राळ अशा सिंहावर बसून सवारी करत असतेस, एक वेळ तर अशी आली की तू तुझ्या बलशाली बाहूंनी चंड राक्षसाची मुंडीच आवळलीस व मुंड राक्षसालाही दुसर्‍या हाताने सहज पराजित केलेस. त्यामुळे ह्या अचाट पराक्रमाला दिपून मी तुझा भक्त, अनन्यभावे हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जयजयकार असो.॥४॥

अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदूत कृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥५॥

युद्धात तू तुझ्या अनेक रूपांची जागृत अशा तेजस्वी स्त्री देवींचे संघटन करून शक्ति एकवटून त्या शक्तीशाली दुर्मद राक्षसाचा वध केलास. किती चतुरता आहे ही तुझ्यात, हे चतुरस्त्र अष्टवधानि सदा सावध अशी गिरिजे, शिवालाही महायुद्धात तू तुझे सहकारी पद देऊन त्यांचीहि मदत घेतलीस, आणि अत्यंत वाईट अशा स्वभावाचे, वाईट कर्तुत्वाने भरलेले, वाईट आशा व हेतु धरून, कायम दुसर्‍यांच्या नाशाचीच इच्छा धरणारे असे राक्षसी वृत्तीच्या लोकांचे शिरोमणि राजे शुंभ जे तुला कायम यमदूत समजतात, अशा हे महिषासुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो. ॥५॥

अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे।
दुमिदुमितामर धुन्दुभिनाद महोमुखरीकृत दिङ्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥६॥

हे आई तू दयाळू आहेस, पराजित राक्षसांच्या बायका मुलांनाही कोणतेही कपट मनात न धरता,शत्रुत्व कायमचे न धरता त्यांचेही रक्षण,पालन पोषण करतेस व त्यांना अभय देतेस, खरोखरीच तू धन्य आहेस. कायम कोणी शत्रू नसतो व कायम कोणी मित्र नसतो हे खरे आहे. त्रैलोक्याला सत्ता व संपत्ति च्या आधाराने हैराण केलेल्या राक्षसी वृत्तींच्या राज्यकर्त्याना तू आपल्या त्रिशूळाने घायल करून शरण यावयास भाग पाडलेस, त्यावेळेचे ते युद्ध भूमीवरचे डमरू नाद व दुदुंभी आम्हाला आनंदित करते व युद्धास प्रवृत्त करते,”विनाशायच दुष्कृताम” हा संदेश खरा ठरतो. ह्या लढवय्या गुणी महिषर्सुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो. ॥६॥

अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते
समरविशोषित शोणितबीज समुद्भव शोणित बीजलते।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥७॥

हे भगवती तू नुसता हुंकार जरी भरलास तरी शत्रूपक्षाला कापरे भरते. धुरकट डोळ्यांचे ते धूम्र, विलोचन यांसारखे दैत्य, त्यांचा तू सहज संहार केलास, आणि त्या रक्तबिजाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून पुन्हा पुन्हा नव नवीन उत्पन्न होणार्‍या असंख्य राक्षसांना युद्ध भूमीवर ठार करून त्यांची ती अक्षय बीज मालिकाच नष्ट केलीस. शिव शिव, हे अचाट कार्य तुझे, महायुद्धात शुंभ निशुम्भांना हरवल्यामुळे जी शिवाची अतृप्त भूत पिशाच्चे होती, ती तृप्त झाली. जी तुझ्यावर संतुष्ट आहेत. म्हणून आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो. ||७||

धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हतावटुके।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥८॥

युद्ध करतांना तुझा आवेश बघण्यासारखा असतो एक स्त्री असूनही, तुझ्या धनुष्याचा टणत्कार आसमंतात कंप पावतो, ज्यामुळे शत्रू गर्भगळीत तर होतातच पण त्यात तुझ्या हातातील कंकणांचा किणकणाट छातीत दहशत बसवतो. तुझा तो चतुरंग दल सैन्याचा लोंढा लढत असतांना त्यातही तू क्षणात इकडे तर क्षणात तिकडे किती सहजपणे वावरतेस, आणि त्यांना प्रोत्साहित करतेस आपल्या आवाजाने. जशी चपल विद्युल्लताच. डोळे दिपून जातात. आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो. ||८||

सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥९॥

हे जगदंबे, एवढी युद्धविलासिनी असूनही स्त्रीलोलुप अशा नृत्यकलेतही तू अतिशय प्रवीण आहेस. सर्व देवी अवतारांबरोबर किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या हस्तमुद्रा, मुखमुद्रा करून “ता थैय्या ता थैय्या थक थै, थक थै”, थकत कशी नै!! तुझे पदन्यास किती सुंदर!! आणि हे सर्व शांत चित्त ठेऊनच ना!! परत हसतमुख राहतेस सदा न कदा. आणि तुला शरण येणार्‍या प्रत्येकाला तू अभय देतेस, प्रेम करतेस. व्वा! तो मृदुंगाचा ह्या भल्या मोठ्या प्रांगणात तुझ्या नृत्याबरोबर “धीमीक धीमीक टांग टांग टांग” आवाज केवढा घुमतो, ऐकून आनंदाला पारावार राहत नाही, जोश येतो. ऐकणार्‍यांचे पाय आपले वय विसरून थीरकतात. म्हणून आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुर शिञ्जितमोहित भूतपते।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१०॥

तुझी विजय गाथा सारखी मनात जपण्यासारखी आहे. त्यामुळे आम्ही तुझा सतत जयजयकार करीत असतो. आणि विनम्रतेने वंदनही करतो. तू तुझ्या नृत्याकलेत इतकी पारंगत आहेस, की तुझ्या पायातले ते किणकिणणारे पैंजणाचे झण झण झिंज झिंज आवाज ऐकून साक्षात नटेश्वर शिव सुद्धा नाचत तुझ्याबरोबर सहभागी होण्यासाठी मोहित होतात, म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमराधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥११॥

हे जगदंबे, तू हितचिंतकांच्या मनात कायम देवादिकांनी तुला अर्पिलेल्या निर्मल अशा प्राजक्ताच्या फुलांसारखी टवटवीत आकर्षक मनोहारी कांतिधारक वास करत असतेस. कमलिनी मध्ये जसे परागयुक्त कमळ फुल उमलून येते, तसे तुझे सुंदर मोहित करणारे सस्मित मुखकमल जसे चंद्रमुखी, इतके की तुझे जे कमलनयन आहेत त्याकडे ब्रमाणे वश होऊन खरोखरीचे भ्रमर घोंगावत आहेत की काय असे वाटते, म्हणून अशा ह्या माझ्या मातेला, हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१२॥

हे जगदंबे, युद्धात तुझे सरदार व्यवस्थित युद्धधर्माचे पालन करून लढत आहेत की नाही, हे तू चारी दिशांनी जाऊन पाहून त्यांचे कौतुकही करत आहेस,त्यांची काळजी करून विविध सुविधाही पुरवत आहेस. वनांमध्ये स्वछंद विहार करीत असतांना तू स्वतःला अनेकविध पान फुलांनी आच्छादून स्वतःला सजवले आहेस,ते खरोखरीच खूपच सौंदर्यमय आहे, भिल्लिक होऊन झिल्लीक नामक वाद्य वाजवून तू शिवाला आकर्षित केले आहेस. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३॥

हे गजगामिनी तुझ्या चालीवर मोहित झालेले शिव, अशी संथ चाल तर प्रत्यक्ष गण्डस्थळावरुन मद वाहणार्‍या मदोन्मत्त गजराजलाही लाजवेल. कामदेवाला सुद्धा शृंगाराचे धडे देणारी तू रूपसुंदरी, तुझी सुंदर दंतपंक्ती तू हसतांना सर्वांना मोहित करते, साक्षात सागराची तू सौंदर्यवती कन्या आणि तुझा तो सागरपुत्र चंद्र सौंदर्यवान तुझाच भाऊ तो. त्यात तू त्रेलोक्यातले यच्चयावत अलंकार धारण केलेले, मग काय,सगळेच तुझ्यापुढे नतमस्तक होतात. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले।
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४॥

तुझे सौन्दर्य तू विविध पुष्पांनी आणखीनच खुलवले आहेस. कमलदलाप्रमाणे कमनियता, कोमलता, निर्मलता हे सर्व गुण तुझ्यात दिसत आहेत. सर्व कालगुणांना आश्रय देणारी तू कलानिपुण कलापूजकआहेस. मोठ्या आकर्षक जलाशयातील संथपणे विहार करणार्‍या हंसाच्या चालिसमान तुझे ते वागणे, बोलणे, चालणे, त्यात तू आज तुझ्या केशकलापावर सुगंधित पुष्पांनी सुशोभित जे केले आहेस,त्याच्या परिमलाने भुलून भ्रमर रुंजी घालत आहेत, तसे तुझे काळेभोर केस शिवाला आकार्शून घेत आहे. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते।
निजगुणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५॥
तू जेंव्हा तुझ्या मुरलीतून मधुर स्वर काढतेस, तेंव्हा गोड स्वर काढणारी कोकिळसुद्धा लाजून चूर होते, दर्खोऱ्यार्‍यातून जेंव्हा सहज विहार करतेस, जेथे निसर्गरम्य वातावरण असते,भ्रमर गुंजन करत असतात, सुंदर शांत असे ते मनोहारी दृश्य असते ते. तरी तुझ्या आसपास शाकिनी डाकिनी असे कैक गण फिरत असतात. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे।
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६॥

तू परिधान केलेली जी सुंदर पिवळी रेशमी साडी आहे, तिच्या रंगासमोर सूर्याचे तेजहि फिके पडत आहे, तुझ्या चरणाशी लीन झालेल्या देवदेवतांच्या मुकूटमण्यांचे तेज तुझ्या सर्वांगावर असे शोभायमान आभा निर्माण करत आहे की, जसे सुमेरु पर्वतावरील मदोन्मत्त हत्तींच्या गंडस्थळातून तेजस्वी मद ओघळून ते तेज चमकत आहे. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते।
[३]सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७॥
सहस्त्र बाहू तारकासुर राक्षसाला मारुन समस्त देवतांना तारणारा तारक, सहस्त्र नक्षत्रांनाही लाजवणारा, तुझा सुंदर शिवपुत्र कार्तिकेय, जो तुझ्या पराक्रमापुढे नतमस्तक होतो, सप्तशती पाठात दिलेल्या सुरथ नावाच्या राजाची व समाधी नावाच्या वैश्य साधूची संसारव्यथेची चिंता एकच असून त्यांनी जी समाधी लावून तुझे चिंतन केले व तू त्यांच्यावर कृपावंत होऊन जे समाधान दिलेस, म्हणून हे महिषासुरमर्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत्।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८॥

हे कमलिनी, कमलासिनी, करूणामयी, कल्याणमयी पार्वती, जो तुझी रोज पूजा, पाठ, चिंतन, जप, सेवा करतो तो तुझ्याचसारखा कमलालय (लक्ष्मीचे भंडार) होत असेल, मी तर अशीच इच्छा सतत मनात धरून असतो की तुझे पद हेच सर्वश्रेष्ठ पद आहे. जगात तू असल्याशिवाय कोणालाच काडीची किंमत नाही, जोवरी आहे पैसा, लोक म्हणतील जवळ बैसा बैसा! तूच आमचे कल्याण करणार आहेस. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

कनकलसत्कल सिन्धुजलैरनु षिञ्चति ते गुण रङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भ तटीपरिरम्भ सुखानुभवम्।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १९॥

सुवर्णवर्णाच्या घड्यांनी सागराच्या पाण्याने ज्या योगिनीच्या बरोबर तुझ्या प्रांगणात रंग खेळत असतेस, त्या इंद्राणीचा संग लाभ सुखानुभव मी कल्पनेनेच अनुभवतो, हे पार्वती देवी, तुझ्या चरणाशी जो रत होतो, जेथे सर्व देवता कायम आपले मस्तक ठेऊ इच्छितात, टी तू आमचे कल्याण कर. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २०॥
तुझ्या उत्साही आनंदी चंद्रमुखी चेहर्‍याकडे बघितले, की इंद्रपुरीच्या सुंदर सुंदर अप्सरांकडेही बघावेसे वाटणार नाही,अशी तू त्रिपुरसुंदरी. त्यामुळे मला पक्की खात्री आहे की जो भक्त शिवाचे नामस्मरण सदा करत असेल, त्यावर तू शिवप्रिया कृपा का करणार नाहीस? म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते।
यदुचितमत्र भवत्युररी कुरुतादुरुतापमपाकुरुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २१॥

हे उमा, तू दयाळूपणे आमच्यासारख्या दीनांवर कृपावंत हो, कारण तूच आमची पोषणकर्ती अन्नपूर्णा माता आहेस, म्हणूनच आम्ही तुझी विविध रुपात ध्यानधारणा करीत असतो, आमचा हा भवताप नष्ट कर, अर्थात तू तुला जे आमच्या बाबतीत उचित वाटेल तेच कर, आणि तू ते करशीलच. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

॥श्रीमद् आदिशंकराचार्यविरचितम् महिषासुरमर्दिनिस्तोत्रम् संपूर्णम्॥

Mahishasur Mardini Stotra Marathi
Mahishasur Mardini Stotra English
Mahishasur Mardini Stotra Hindi
Navaratra Devi Puja Upasana

नवरात्र देवी पूजा उपासना
महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी
महिषासुरमर्दिनी स्तोत्र इंग्रजी
महिषासुरमर्दिनी स्तोत्र हिंदी

स्तोत्र अष्टक पूर्ण पोस्ट एकाच ठिकाणी

 संत सोपानदेव चरित्र सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, एप्रिल नित्य पारायण सूची, ऑक्टोबर नित्य पारायण सूची, ऑगस्ट नित्य पारायण सूची, किर्तन म्हणजे काय?, गणपती सर्व, ग्रामगीता सर्व, जानेवारी नित्य पारायण, जुलै नित्य पारायण, जून नित्य पारायण सूची, डिसेंबर नित्य पारायण सूची, दत्त संपूर्ण, देव जन्माचे अभंग, धनंजय महाराज मोरे, नाना महाराज कापडणीस, निरपेक्ष किर्तन समूह, नोव्हेंबर नित्य पारायण सूची, पौराणिक सर्व, भ.श्रीकृष्ण चरित्र सर्व, भक्त प्रल्हाद संपूर्ण चरित्र, भजनी मालिका, भागवत पुराण महात्म्य १, भागवत महापुराण, भारुड, मारुती-हनुमान, मार्च नित्य पारायण सूची, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, मे नित्य पारायण सूची, वारकरी ग्रंथ, वारकरी जलद चाली, वारकरी संत, वारकरी सर्व, श्री भ. दतात्रय प्रभू सर्व, श्री समर्थ रामदास संपूर्ण चरित्र, संत कान्होपाठक, संत गजाजन महाराज, संत गाडगेबाबा सर्व भाग, संत गोरा कुंभार गोरोबाकाका, संत चरित्र सर्व, संत चोखामेळा चरित्र सर्व भाग, संत ज्ञानेश्वर सर्व, संत तुकडोजी महाराज साहित्य, संत तुकाराम म. चरित्र सर्व, संत तुकाराम संपूर्ण सूची, संत तुकाराम सार्थ गाथा, संत मीराबाई चरित्र सर्व, संत समाधी अभंग, संत ज्ञानेश्वर म. चरित्र, सप्टेंबर नित्य पारायण सूची, सर्व संत अभंग गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय, स्तोत्र-अष्टके, १२ महिने पारायण सूची, VIDEO

धार्मिक साहित्य सूची

धार्मिक साहित्य सूची List of religious literature
कुळदेवी, स्तोत्र-अष्टके

3. Mahishasuramardini Stotra, English, Sarth, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, इंग्लिश, सार्थ,

भक्त आध्यात्मिक उत्थान के लिए इस स्तोत्र का पाठ करते हैं। कहा जाता है कि प्रतिदिन पाठ करने से आध्यात्मिक विकास होता है। महिषासुर मर्दिनी स्तोत्र का पाठ चुनौतीपूर्ण समय या संकट के समय देवी दुर्गा के सुरक्षा कवच की तलाश और कठिनाइयों पर काबू पाने के लिए किया जाता है।
स्तोत्र-अष्टके

२. महिषासुरमर्दिनी स्तोत्र, हिंदी, सार्थ

भक्त आध्यात्मिक उत्थान के लिए इस स्तोत्र का पाठ करते हैं। कहा जाता है कि प्रतिदिन पाठ करने से आध्यात्मिक विकास होता है। महिषासुर मर्दिनी स्तोत्र का पाठ चुनौतीपूर्ण समय या संकट के समय देवी दुर्गा के सुरक्षा कवच की तलाश और कठिनाइयों पर काबू पाने के लिए किया जाता है।
कुळदेवी, स्तोत्र-अष्टके

१. महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी, सार्थ

महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्त या स्तोत्राचे पठण करतात. रोज पठण केल्याने आध्यात्मिक वाढ होते असे म्हणतात. महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे पठण आव्हानात्मक काळात किंवा संकटाच्या वेळी देवी दुर्गेचे संरक्षणात्मक कवच मिळविण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी केले जाते.

सर्व स्तोत्र अष्टक एकाच ठिकाणी

 संत सोपानदेव चरित्र सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, एप्रिल नित्य पारायण सूची, ऑक्टोबर नित्य पारायण सूची, ऑगस्ट नित्य पारायण सूची, किर्तन म्हणजे काय?, गणपती सर्व, ग्रामगीता सर्व, जानेवारी नित्य पारायण, जुलै नित्य पारायण, जून नित्य पारायण सूची, डिसेंबर नित्य पारायण सूची, दत्त संपूर्ण, देव जन्माचे अभंग, धनंजय महाराज मोरे, नाना महाराज कापडणीस, निरपेक्ष किर्तन समूह, नोव्हेंबर नित्य पारायण सूची, पौराणिक सर्व, भ.श्रीकृष्ण चरित्र सर्व, भक्त प्रल्हाद संपूर्ण चरित्र, भजनी मालिका, भागवत पुराण महात्म्य १, भागवत महापुराण, भारुड, मारुती-हनुमान, मार्च नित्य पारायण सूची, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, मे नित्य पारायण सूची, वारकरी ग्रंथ, वारकरी जलद चाली, वारकरी संत, वारकरी सर्व, श्री भ. दतात्रय प्रभू सर्व, श्री समर्थ रामदास संपूर्ण चरित्र, संत कान्होपाठक, संत गजाजन महाराज, संत गाडगेबाबा सर्व भाग, संत गोरा कुंभार गोरोबाकाका, संत चरित्र सर्व, संत चोखामेळा चरित्र सर्व भाग, संत ज्ञानेश्वर सर्व, संत तुकडोजी महाराज साहित्य, संत तुकाराम म. चरित्र सर्व, संत तुकाराम संपूर्ण सूची, संत तुकाराम सार्थ गाथा, संत मीराबाई चरित्र सर्व, संत समाधी अभंग, संत ज्ञानेश्वर म. चरित्र, सप्टेंबर नित्य पारायण सूची, सर्व संत अभंग गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय, स्तोत्र-अष्टके, १२ महिने पारायण सूची, VIDEO

धार्मिक साहित्य सूची

धार्मिक साहित्य सूची List of religious literature
कुळदेवी, स्तोत्र-अष्टके

3. Mahishasuramardini Stotra, English, Sarth, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, इंग्लिश, सार्थ,

भक्त आध्यात्मिक उत्थान के लिए इस स्तोत्र का पाठ करते हैं। कहा जाता है कि प्रतिदिन पाठ करने से आध्यात्मिक विकास होता है। महिषासुर मर्दिनी स्तोत्र का पाठ चुनौतीपूर्ण समय या संकट के समय देवी दुर्गा के सुरक्षा कवच की तलाश और कठिनाइयों पर काबू पाने के लिए किया जाता है।
स्तोत्र-अष्टके

२. महिषासुरमर्दिनी स्तोत्र, हिंदी, सार्थ

भक्त आध्यात्मिक उत्थान के लिए इस स्तोत्र का पाठ करते हैं। कहा जाता है कि प्रतिदिन पाठ करने से आध्यात्मिक विकास होता है। महिषासुर मर्दिनी स्तोत्र का पाठ चुनौतीपूर्ण समय या संकट के समय देवी दुर्गा के सुरक्षा कवच की तलाश और कठिनाइयों पर काबू पाने के लिए किया जाता है।
कुळदेवी, स्तोत्र-अष्टके

१. महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी, सार्थ

महिषासुरमर्दिनी स्तोत्र मराठी आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्त या स्तोत्राचे पठण करतात. रोज पठण केल्याने आध्यात्मिक वाढ होते असे म्हणतात. महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे पठण आव्हानात्मक काळात किंवा संकटाच्या वेळी देवी दुर्गेचे संरक्षणात्मक कवच मिळविण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी केले जाते.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading