आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ नोव्हेंबर, दिवस ३२१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ८०१ ते ८२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३८४१ ते ३८५२
“१७ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १७ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८४१ ते ३८५२ चे पारायण आपण करणार आहोत.
१७ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ८०१ ते ८२५,
801-18
ऐसे आपत्ती जे सुख । ऐहिकी परिणमे देख । परत्री कीर विख । होऊनि परते ॥801॥
इहलोकी प्राप्त झालेले जे सुख, त्याचा हा अशा प्रकारचा परिणाम होतो; आणि ते परलोकही खरोखर विषरूपानेच फलप्रद होते. 801
802-18
जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥802॥
जे इंद्रियांचे लाड पुरविण्याकरिता धर्मरूपी मळा त्याचे स्वाधीन करतात, ते धर्म जाळून इंद्रियाकडून विषयाचा सोहळा भोगवितात. 802
803-18
तेथ पातके बांधिती थावो । तिये नरकी देती ठावो । जेणे सुखे हा अपावो । परत्री ऐसा ॥803॥
मग पातकास थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या लोकांच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो; 803
804-18
पै नामे विष महुरे । परी मारूनि अंती खरे । तैसे आदि जे गोडिरे । अंती कडू ॥804॥
हे पहा, जसे विष हे शब्दाने मात्र मधुर परंतु परिणामी प्राणनाशक करणारे आहे, तसे इहालोकिंचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे. 804
805-18
पार्था ते सुख साचे । वळिले आहे रजाचे । म्हणौनि न शिवे तयाचे । आंग कही ॥805॥
पार्था, हे सुख केवळ रजोगुणांचेच बनलेले (राजस) आहे; म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको. 805
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥18. 39॥
806-18
आणि अपेयाचेनि पाने । अखाद्याचेनि भोजने । स्वैरस्त्रीसंनिधाने । होय जे सुख ॥806॥
आणि अपेय पानाने, अभक्ष्य भक्षणने, व स्वैरिणीस्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे सुख 806
807-18
का पुढिलांचेनि मारे । नातरी परस्वापहारे । जे सुख अवतरे । भाटाच्या बोली ॥807॥
किंवा दुसऱ्याचा आघात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतिपाठाने जे सुख होते; 807
808-18
जे आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजी जे देखिजे । जयाच्या आद्यंती भुलिजे । आपुली वाट ॥808॥
जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाचे शुद्धी नसते. 808
809-18
ते गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हे बहु न सांगोचि जे कथा । असंभाव्य हे ॥809॥
जे सुख अर्जुना, तामस असे जाण. ही कथा मी विस्ताराने सांगत बसत नाही कारण, ती असंभाव्य आहे. 809
810-18
ऐसे कर्मभेदे मुदले । फळसुखही त्रिधा जाले । ते हे यथागमे केले । गोचर तुज ॥810॥
अशाप्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फळरुप सुख हे तीन प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र सांगितले. 810
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
811-18
ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वाचूनि काहीचि नसे स्थूल । सूक्ष्मी इये ॥811॥
सर्व जगतांत लहान व मोठ्या वस्तू ज्या आहेत, त्यात एकही वस्तू कर्ता कर्म व फळ या त्रिपुटीशिवाय सापडणार नाही. 811
812-18
आणि हे तव त्रिपुटी । तिही गुणी इही किरीटी । गुंफिली असे पटी । तांतुवी जैसी ॥812॥
आणि अर्जुना, पट जसा तंतूंनी तयार केला आहे, तशी ही त्रिपुटी पाहू गेले असता तीन गुणांनी भरलेली आहे. 812
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥18. 40॥
813-18
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकी । न बंधिजे इही सत्वादिकी । तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी । आथी वस्तु ॥813॥
म्हणून तू हे लक्षात ठेव की, प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेली अशी कोणतीही वस्तू या यालोकी अथवा स्वर्गलोकी नाही. 813
814-18
कैचा लोवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेवीण कल्लोळा । होणे आहे ? ॥814॥
लोकरी वाचून कांबळा व माती वाचून गोळा कसा होणार ? अथवा पाण्यावाचून लाटा कशा होतील ? 814
815-18
तैसे न होनि गुणाचे । सृष्टीची रचना रचे । ऐसे नाहीचि गा साचे । प्राणिजात ॥815॥
त्याप्रमाणे जीवमात्र, गुणाच्या रचनेवाचून या सृष्टीत मोकळे नाहीत, 815
816-18
यालागी हे सकळ । तिही गुणांचेचि केवळ । घडले आहे निखिळ । ऐसे जाण ॥816॥
यास्तव, हे सर्व जगांतील पदार्थ तीन गुणांनी केवळ रचलेले आहेत, असे समज. 816
817-18
गुणी देवा त्रयी लाविली । गुणी लोकी त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानी उळिगे ॥817॥
या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की, त्यांनी एका देवाचे तीन देव गेले आणि लोकांचे 3 लोक (स्वर्ग, मृत्यू व पाताळ) गुणांनीच केले आहेत आणि चार वर्ण व त्यांची कर्मे आहेत. 817
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणा च परन्तप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥18. 41॥
818-18
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जया मुख्य ब्राह्मण । धुरेचे का ॥818॥
हे चार वर्ण कोणते, असे पुसशील, तर त्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत. 818
819-18
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानी । योग्य म्हणौनि ॥819॥
दुसरे क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ते ब्राह्मणांचाच बरोबरीचे मानावे. 19
820-18
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदी लागु नाही तया । तऱ्ही वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥820॥
हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण, त्याला वेदाचा अधिकार नाही, तर त्याची सेवावृत्ती तीन वर्णांच्या आधीन आहे. 820
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
821-18
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिका । शूद्रही की देखा । चौथा जाला ॥821॥
त्या ब्राह्मणादि तीन वर्णांच्या सेवा वृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही चौथ्या वर्णात गणले. 821
822-18
जैसा फुलाचेनि सांगाते । तांतु तुरंबिजे श्रीमंते । तैसे द्विजसंगे शूद्राते । स्वीकारी श्रुती ॥822॥
जसा फुलांच्या संगतीने असलेल्या दोऱ्याला ही श्रीमंत धारण करतात तशी श्रुती द्विजांच्या संगतीने शूद्रांचा त्यांचा स्वीकार करते. 822
823-18
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करू आता कर्मपथा । यांचिया रूपा ॥823॥
पार्था, आता अशा चार प्रकारांनी या चार वर्णांची व्यवस्था झालेली आहे. तर त्या त्या वर्णांची कर्मे कोणती हे भेद तुला सांगतो. 823
824-18
जिही गुणी ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनिया ईश्वरी । पैठे होती ॥824॥
ज्या गुणांनी ते चारी वर्ण जन्ममृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात; 824
825-18
जिये आत्मप्रकृतीचे इही । गुणी सत्त्वादिकी तिही । कर्मे चौघा चहू ठाई । वांटिली वर्णा ॥825॥
आत्म्याची जी प्रकृती, तिच्या सत्वादी गुणांनी चार वर्णाला चार ठिकाणी कर्मे वाटून दिली आहेत; 825
दिवस ३२१ वा. १७, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८४१ ते ३८५२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३८४१ (बाळकोडेचेअभंग)
काय आता यासि म्हणावे लेकरू । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासि राहिली लपून । कळो नये क्षण एक होता ॥२॥
क्षण एक होता विसरली त्यासि । माझेमाझे ऐसे करी बाळा ॥३॥
करी कवतुक कळो नेदी कोणा । योजूनि कारणा तेचि खेळे ॥४॥
ते सुख लुटिले घरिचिया घरी । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥
अर्थ
कृष्णाला लेकरु तरी आता कसे म्हणावे हा तर जगाचा मायबाप व गुरु आहे. याची माया याच्यामध्ये लपून राहाते त्यामुळे हा देव आहे हे लक्षातच राहात नाही. कृष्णाच्या देवपणाचा साक्षात्कार यशोदेला झाला व तिलाही कळाले आपला कृष्ण देव आहे परंतू एक क्षण झाला कि लगेच ती विसरुन गेली आणि माझे बाळ माझे बाळ असे करु लागली. कृष्ण आता काय करणार हे कोणालाही तो कळू देत नव्हता. तोच खेळाची योजना करायचा व तोच खेळ खेळायचा. तुकाराम महाराज म्हणतात, “गोकुळातील लोकांनी आपआपल्या परीने आपआपल्या घरीच कृष्णाचे सुख लुटले. ”
12:35 Sdm:
अभंग क्र. ३८४२ (बाळकोडेचेअभंग)
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळु मांडियेला यमुने पाबळी । या रे चेंडुफळी खेळू आता ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणा काठी । बैसोनिया वाटी गडिया गडी ॥३॥
गडी जव पाहे आपणासमान । नाही नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदे सकळांचा भाव । तयासि उपाव तोचि सांगे ॥५॥
सांगे सकळासि व्हा रे एकीठायी । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुके अवघेचि राहा । जाईंल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा । आपण निराळा एकला चि ॥१०॥
चिंडुनिया चेंडू हाणे ऊर्ध्वमुखे । ठेली सकळिक पाहात चि ॥११॥
पाहात चि ठेली न चलता काही । येरू लवलाही म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयाने त्याचे बळ ज्यासि । येरा आणिकासि लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुद्धी नाही त्याचे । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारी पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागे ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरी जाय लाग पाहोनिया ॥१७॥
या मागे जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठाया ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागे त्यांचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघा एक मोहरे मागिलां । चालता चुकलां वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालता न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोधे विचार ज्या नाही । समान तो देही बाळकासी ॥२२॥
सिकविले हित नायिके जो कानी । त्यामागे भल्यांनी जाऊ नये ॥२३॥
नये ते चि करी श्रेष्ठाचिया मन
12:35 Sdm:
अभंग क्र. ३८४३ (बाळकोडेचेअभंग)
मुखे सांगे त्यासि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथा ॥१॥
माथा कळंबाचे अवघडा ठायी । दावियेला डोही जळामाजी ॥२॥
जळांत पाहाता हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसे नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आत । खरा तेथे चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यांनी डोळा । म्हणती गोपाळा आता कैसे ॥५॥
कैसे करूनिया उतरावा खाली । देखोनिया भ्याली अवघी डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरली माघारी अवघी जणे ॥७॥
जयाचे कारण तयासी च ठावे । पुसे त्याच्या भावे त्यास हरी ॥८॥
त्यासि नारायण म्हणे राहा तळी । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जाता वरी पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणो ॥१०॥
नेणो म्हणती हे करितोसि काईं । आम्हा तुझी आईं देईल सिव्या ॥११॥
आपुलिया काना देउनिया हात । सकळी निमित्य टाळियेले ॥१२॥
निमित्याकारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवे । पाडावा त्या भावे चेंडू तळी ॥१४॥
तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव जाणो नेदी ॥१५॥
अर्थ
चेंडूफळीचा खेळ खेळत असताना चेंडू खूप दूर गेला तर कृष्ण् गोपाळांना म्हणाला “हे गोपाळांनो आपला चेंडू खूप दूर गेला तो कळंबाच्या माथ्यावर आहे की, यमुनेच्या डोहात पडला आहे ते पहा बरे. ” कृष्णाने कळंबाच्या माथ्यावर म्हणजे अशा अवघड ठिकाणी आपला चेंडू गुतलेला आहे तो गोपाळांना दाखवला आणि यमुनेच्या डोहातही चेंडू दाखवला. मग सर्व गोपाळ पाण्यात पाहू लागले तर कृष्ण त्यांना म्हणाला, “अरे तिकडे तुम्ही पाहूच नका. ” पुढे कृष्ण त्यांना म्हणू लागला, “अरे तो चे�
Sdm:
अभंग क्र. ३८४४ (बाळकोडेचेअभंग)
नेदी कळो केल्याविण ते कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतले गडे सांभाळावे ॥२॥
सांभाळ करिता सकळा जिवाचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरे ॥३॥
बरे विचारुनी करावे कारण । म्हणे नारायण बऱ्या बरे ॥४॥
बरे म्हणउनि तयांकडे पाहे । सांडविला जाय चेंडू तळा ॥५॥
तयासवे उडी घातली अनंते । गोपाळ रडते येती घरा ॥६॥
येता त्यांचा लोकी देखिला कोल्हाळ । सामोरी सकळ आली पुढे ॥७॥
पुसती ते मात तया गोपाळांसी । हरीदुःखे त्यासी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरी बुडालासे मुखे । कुटितील दुःखे उर माथे ॥९॥
मायबापे तुका म्हणे न देखती । ऐसे दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥
अर्थ
कृष्ण् कोणतेही कार्य होण्याअगोदर कोणालाही कळू देत नव्हता प्रत्यक्ष कार्यच अनुभवाला आणून दाखवित होता. कृष्ण् ज्यावेळी कळंबाच्या माथ्यावर गेला त्यावेळी हात चेंडूपर्यंत पोहोचेना असे त्याने गोपाळांना भासविले त्यावेळी गोपाळ कृष्णाला म्हणाले, “देवा जरा सांभाळून बरे. ” सर्व जीवाचा सांभाळ करणा-या देवाला गोपाळ म्हणाले, “कृष्णा सांभाळून बरे का” त्यावेळी कृष्ण् त्यांना म्हणाला, “हो हो सांभाळूनच करतो. ” कोणतेही कार्य करायचे असेल तर चांगल्या विचाराने करावे असे गोपाळांना कृष्णाला म्हणायचे होते त्यामुळे त्यांच्या ब-याला बरे असे देव म्हणत होता. कृष्णाने गोपाळांना बरे म्हणताच त्याने मुद्दाम चेंडू पाण्याच्या डोहामध्ये पाडला. मग कृष्णाने, त्या अनंताने त्या चेंडूसोबतच डोहामध्ये उडी मारली हे पाहून ते गोपाळ रडतच घरी आले. आल्यानंतर त्या पोरांचा कोलाहल पाहिला त्
Sdm:
अभंग क्र. ३८४५ (बाळकोडेचेअभंग)
गोपाळा उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥
झाले काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हापासी देव होता ॥२॥
देवासवे दुःख न पवते ऐसे । काही अनारिसे दिसे आजी ॥३॥
आजि दिसे हरी फांकला यांपाशी । म्हणउनि ऐशी परि झाली ॥४॥
जाणविल्याविण कैसे कळे त्यासि । शाहाणे तयासि कळो आले ॥५॥
कळो आले तीही स्फुंद शांत केला । ठायीचाच त्याला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणे ॥७॥
सांगे आता हरी तुम्हा आम्हा नाही । बुडाला तो डोही यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हेचि पुसता । जालिया अनंता कोण परि ॥९॥
परि त्या दुःखाची काय सांगो आता । तुका म्हणे माता लोकपाळा ॥१०॥
अर्थ
कृष्ण डोहात बुडाला त्यामुळे गोपाळांना दुखाचा इतका उबाळा आला होता की, त्यांना तो आवरतच नव्हता दु:खाने त्यांची वाचा कुंठीतच झाली होती. नेमके झाले काय हे कोणालाच काही कळेना कृष्ण कोठेही दिसेना नंतर काही वेळाने अचानकच सर्वजण विचारु लागले, “अरे तुमच्याबरोबर देव होता ना तो कुठे आहे ? ” या गोपाळांबरोबर जर देव असता तर यांना दु:ख झाले नसते देव असला की, यांना कधीही दु:ख होत नाही परंतु आज हे दु:खी दिसतात म्हणजे आज काहीतरी विपरीतच झालेले दिसते. पुढे गोपाळ असे विचार करु लागले की, आज यांच्यापासून देव कुठेतरी बाजूला गेला आहे त्यामुळेच या गोपाळांची अशी अवस्था झाली आहे. काही सांगितल्यावाचून कसे काय समजणार आहे परंतु त्यामध्ये काही शहाणे गोपाळ होते त्यांना ते लक्षात आले. त्यामध्ये काही शहाण्या गोपाळांनी रडत असलेल्या गोपाळांना शांत केले मूळत:च ज्या ��
Sdm:
अभंग क्र. ३८४६ (बाळकोडेचेअभंग)
पाषाण फुटती ते दुःख देखोनि । करिता गौळणी शोक लोका ॥१॥
काय ऐसे पाप होते आम्हापासी । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकाचिये डोळा असुं बाह्यात्कारी । नाही ती अंतरी जळतील ॥३॥
जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेकुरे कडियेहूनि ॥४॥
निवांत चि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळांवाचूनिया ॥६॥
वांचणे ते आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरीसवे ॥७॥
सवे घेऊनिया चालली गोपाळा । अवघी च बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाही मनुष्याचे नावे । गोकुळ हे गाव सांडियेले ॥९॥
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥
तिरी माना घालूनिया उभ्या गाईं । तटस्थ या डोही यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाइली कृष्णाचिया ॥१२॥
यांचे त्यांचे दुःख एक जाले तिरी । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोवरी च तीर न पवता ॥१४॥
अर्थ
कृष्ण यमुनेच्या डोहात पडला हे समजल्यानंतर सर्व लोक व गवळणी शोक करु लागले ते पाहून दगड सुध्दा फुट पहात होते. सर्व एकमेकांना म्हणू लागले असे कोणते पाप आमच्याजवळ होते की, त्यामुळे हरी आमच्यापासून आज दूर झाला. काही गोकुळातील लोक असे होते की, त्यांनी केवळ दाखवण्यासाठी बाह्य रुपाने वरवर अश्रु आणण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोक असेही होते की, या दु:खाने त्यांचे अंत:करण अगदी जळून गेले होते. कृष्णाचे अघटित दु:ख काही गवळणींना इतके जाळीत होते की, त्यांचे अंत:करण तर जळून गेले परंतु बाह्य रंगान��
Sdm:
अभंग क्र. ३८४७ (बाळकोडेचेअभंग)
तीर देखोनिया यमुनेचे जळ । कांठींच कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागे ॥२॥
मागे सरे माय पाउला पाउली । आपलेच घाली धाके अंग ॥३॥
अंग राखोनिया माय खेद करी । अंतरीचे हरी जाणवले ॥४॥
जाणवले मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥
अर्थ
कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला त्यावेळी कृष्णाला वाचवण्यासाठी कोणीही यमुनेच्या डोहात उडी मारली नाही. केवळ यमुनेच्या तीरावर उभे राहूनच सर्वजण आरडाओरडा, कोल्हाळ करु लागले. कोणीही कृष्णाला वाचवण्यासाठी यमुनेच्या डोहात उडी मारायला धैर्य करत नव्हते. भीतीपोटी स्वत: आपोआप पाय मागे ओढत होते. कृष्णासाठी रडणारी यशोदा माता देखील पावलापावलाने मागे सरकू लागली भीतीपोटी तर तिने अंगच खाली जमिनीवर टाकून दिले. स्वत:ची माय देखील स्वत:चे अंग राखून खेद करत आहे हे हरीला अंत:करणातून जाणवले. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाने सर्वाचे अंत:करण जाणले होते म्हणूनच यमुनेच्या डोहात उडी टाकली होती. ”
Sdm:
अभंग क्र. ३८४८ (बाळकोडेचेअभंग)
भावनेच्या मुळे अंतरला देव । शिरला संदेह भय पोटी ॥१॥
पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे । बोलिल्या सरिसे न करवे ॥धृपद॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥२॥
अंतरला बहु बोलता वाउगे । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥३॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवे । कोण कोणाभावे रडती ती ॥४॥
ती गेली घरास आपल्या सकळ । गोधने गोपाळ लोक माय ॥५॥
मायबापाची तो ऐसी झाली गति । तुका म्हणे अंती कळो आले ॥६॥
अर्थ
यमुनेच्या डोहात कृष्ण बुडाला हे समजल्यानंतर आपण यमुनेच्या डोहात उडी मारली तर आपले काय होईल हा संदेह आणि भीती प्रत्येकाच्या पोटी उत्पन्न झाला आणि याच भावनेमुळे देव त्यांच्यापासून अंतरला होता. यमुनेच्या डोहात कृष्ण बुडाला हे समजल्यानंतर घरी यशोदा म्हणत होती की, मी आता जाऊन यमुनेच्या डोहातच उडी मारते परंतु प्रत्यक्ष यमुनेच्या तीरावर आल्यानंतर यशोदेला बोलल्याप्रमाणे करणे अवघड गेले. कोणालाही सर्वस्वाचा त्याग व जीवाचा नाश करणे जमले नाही त्यामुळे नारायण त्यांच्यापासून अंतरला होता. खरे तर देव त्यांच्यापासून अंतरला होता कारण हे वरवर खूप व्यर्थ गोष्टी बोलत होते अंत:करणात त्यागाविषयी काहीच भावना नव्हती परंतु केवळ त्यागाच्या वरवर गोष्टी हे करत होते म्हणून. सर्वाच्या गोष्टी हरीने ओळखल्या व ऐकल्या व कोणकोणत्या भावनेने रडत आहे हे देखील देवाने जाणले. शेवटी सर्व लोक, मायबाप, गाई, गोपाळ आपआपल्या घरी निघून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, “कृष्णाच्या मायबापाची ही गती झाली तर मग विचार करा की, आपल्या अंत:काळी आपल्याला कोण उपयोगी पडेल ह
Sdm:
अभंग क्र. ३८४९ (बाळकोडेचेअभंग)
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणांसाठी होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधी ॥२॥
आधी पाठीमोरी झाली ती सकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणे जाऊनि पाताळा । जागविले काळा भुजंगासि ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधि ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचे ॥६॥
चेंडुवाचे मिसे काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण ॥७॥
अर्थ
कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला हे समजल्यानंतर सर्व लोक यमुनेच्या तीरावर आले परंतु कोणीही कृष्णाला वाचवण्यासाठी यमुनेच्या डोहात उडी देखील मारली नाही उलट भयाने सर्व लोक मागे सरले आणि शेवटी जे ते आपआपल्या घरी निघून गेले यामुळे देवाला सर्वाच्या अंत:करणातील खरे काय आहे हे कळून आले परंतु डोहामध्ये वेगळयाच कारणासाठी देव गेला होता. देव सुरवातीला पाताळात गेलाच नव्हता वरतीच होता सर्व गोकुळवाशीयांचा आपल्याविषयी असलेला भक्तिभाव व प्रेम देव पहात होता परंतु कोणाचेही आपल्याला वाचवण्याचे धैर्य झाले नाही हे समजल्यावर देव नंतर पाताळात खाली गेला. यमुनेच्या तीरावर आलेले सर्व गोपाळांनी यमुनेच्या डोहाकडे पाठ केली व जो तो आपल्या घराकडे मागे निघाला त्यावेळी मग कृष्णाने यमुनेच्या डोहात खोल उडी दिली. मग देवाने पाताळात जाऊन कालिया नावाच्या भुजंगाला हाक मारली व त्याला जागे केले. भुजंग आपल्या घरामध्ये अगदी निवांतपणे झोपलेला होता सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेला भुजंग गर्वाचा निधीच होता. केवळ चेंडूचे निमित्त करुन कालिया नावाच्या भुजंगाचे ग�
Sdm:
अभंग क्र. ३८५० (बाळकोडेचेअभंग)
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशी । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदे वांकी नभा देखे पायी ॥३॥
पाहिला सकळ तिने न्याहाळूनि । कोण या जननी विसरली ॥४॥
विसरु हा तीस कैसा याचा झाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥
दिसतसे रूप गोजिरे लाहान । पाहाता लोचन सुखावले ॥६॥
पाहिले पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडे झाले आता ॥७॥
आता हा उठोनि खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी । मोहिली अंतरी हरीरूपे ॥९॥
रूपे अनंताची अनंतअपार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥
अर्थ
कालियाच्या पत्नीला कृष्णाने चेंडू मागितला त्यावेळी तिने तेज:पुंज अशा हरीला पाहिले. लावण्याचा पुतळा आणि कोटी सूर्य, चंद्र उगवलेत असे हरीची मुखप्रभा तिने पाहिली. जणू कर्दळीचा गाभा हातामध्ये वाकी पायामध्ये तोडे व नीळवर्ण हरी तिने पाहिला. कालियाच्या पत्नीने हरीला पूर्णपणे न्याहाळून पाहिले आणि मनातच म्हणू लागली की, कोणती आई अशी आहे की, इतके सुंदर बाळ पाण्यात पडले आणि ती त्याला विसरुन गेली. हे बाळ जीवापेक्षाही अधिक आवडते असेल परंतु तरी देखील त्या आईला त्या बाळाचा विसर तरी कसा पडला ? हरीचे लहान गोजिरे सुंदर रुप त्या कालियाच्या पत्नीला दिसत आहे ते पाहून तिच्या डोळयाला अतिशय सुख झाले आहे. मग तिने आपल्या दुष्ट पती कालियाकडे पाहिले व तो उठलेला पाहून ती म्हणाली, “आता हे फारच वाईट झाले. ” आता हा दुष्ट उठेल आणि या सुंदर बाळाला खाईल आणि मग ही वार्ता त्याच्या आईला समजली की, मग ती कोल्हाळ ��
Sdm:
अभंग क्र. ३८५१ (बाळकोडेचेअभंग)
म्हणे चेंडू कोणे आणिला या ठाया । आलो पुरवावया कोड त्याचे ॥१॥
त्याचे आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जाले तीचे ॥२॥
तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधी ते माघारी फिरली वेगी ॥३॥
वेगी मन गेले भ्रताराचे सोयी । विघ्न आले काही आम्हावरी ॥४॥
वरी उदकास नाही अंत पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायी च देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणो येथे उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठ्याने बोलतो भय नाही मनी । केला उठवूनी काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळी । उठिला कल्लोळी विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधुधुकारे ॥१०॥
कारणे ज्या येथे आला नारायण । झाले दर्शन दोघामध्ये ॥११॥
दोघामध्ये झाले बोल परस्परे । प्रसंग उत्तरे युद्धाचिया ॥१२॥
चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
झाला सावकाश झेंप घाली वरी । तव म्हणे हरी मुष्टिघाते ॥१४॥
तेणे काळे त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥१५॥
आठवले काळा हाकारिले गोत । मिळाली बहुत नागकुळे ॥१६॥
कल्हारी संधानी वेष्ठीयेला हरी । अवघा विखारी व्यापियेला ॥१७॥
यास तुका म्हणे नाही भक्तीविण । गरुडाचे चिंतन केले मनी ॥१८॥
अर्थ
कृष्ण कालियाचे मर्दन करण्यासाठी यमुनेच्या डोहात खाली पाताळात गेला त्यावेळी तेथे म्हणू लागला की, “माझा चेंडू या ठिकाणी कोणी आणला मी त्याचे गर्वहरण करण्यासाठी आलो आहे. ” त्याचे असे निष्ठुर वचन ऐकून कालिया सर्पाच्या पत्नीचे मन भयभीत झाले. आधी तिची चित्तवृत्ती भगवंतावर होती भगवंत��
Sdm:
अभंग क्र. ३८५२ (बाळकोडेचेअभंग)
निजदास उभा तात्काळ पायापे । स्वामी देखे सर्पे वेष्टियेला ॥१॥
लहानथोरे होती मिळाली अपारे । त्याच्या धुधुकारे निवारिली ॥२॥
निघते आपटी धरूनि धावामधी । एकातेचि वधी माथा पाय ॥३॥
एकी जीव दिले येतांच त्या धाके । येतील ती एके काकूलती ॥४॥
यथेष्ट भक्षिली पोट धाये वरी । तव म्हणे हरी पुरे आता ॥५॥
आता करू काम आलो जयासाठी । हरी घाली मिठी काळीयासि ॥६॥
यासि नाथूनिया नाकी दिली दारी । चेंडू भार शिरी कमळांचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुनी बहुडविले ॥८॥
विसरु न पडे संवगड्या गाई । यमुनेच्या डोही लक्ष त्यांचे ॥९॥
त्याच्या गोष्टी कांठी बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथे हरी ॥१०॥
हरीचे चिंतन करिता आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥
अर्थ
कृष्ण कालियाचे मर्दन करण्यासाठी यमुनेच्या डोहात खाली पाताळात गेला त्यावेळी दोघामध्ये प्रसंगानुसार उत्तर प्रत्युत्तर झाले कृष्णाने कालियाला बुक्की मारली त्यावेळी कालियाला कृष्ण् काळ रुपाने आल्यासारखाच वाटला हा आपला जीव घेण्यासाठीच आला आहे असे त्याला वाटत होते त्यावेळी कालियाला आपले गणगोत आठवले व त्याने त्या सर्वाना हाक मारली व तेथे खूप नाग जमा झाले संकटकाळी देवाला भक्तावाचून सोडवणारा दुसरा कोणीही नसतो त्यामुळे देवाने गरुडाचे चिंतन मनामध्ये केले. भगवंताचा निजदास असलेला गरुड भगवंताने स्मरण करताच तात्काळ त्याच्या पायाजवळ हजर झाला पाहतो तर काय सर्पाने आपल्या स्वामींना वेढलेले होते. गरुडाने केवळ फुस्फुस करताच जेवढे काही नाग, सर्प लहान, मोठे जमा झाले होते ते सर्व द�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















