आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
ऐक बा रामराया , तुझ्या वंदितो पाया, संपूर्ण लिखित पहा ऐका
गायक रविंद्र साठे
ऐक बा रामराया , तुझ्या वंदितो पाया
आवरी आपुली ही , विश्वमोहिनी माया…
ऐक बा रामराया ।।धृ।।
मी मूढ हीन दीन, सर्व सक्रिया हिन,
तू क्षमाशील देवा, शुद्धचरित निजधीन…
ऐक बा रामराया ।।१।।
घडो सदा साधू संग, नसो विषय प्रसंग,
सप्रेम भक्ती द्यावी, सत्व वैराग्य अभंग…
ऐक बा रामराया ।।२।।
वाटते नित्य भावे, तुझे साधू गुण गावे,
मन हे आवरेना, सांग काय म्या करावे……
ऐक बा रामराया ।।३।।
करिता संसार काम, मुखी असो तुझे नाम,
दया घना भक्त हो, मोरयाचा पूरविसी काम…..
ऐक बा रामराया ।।४।।


