आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२ डिसेंबर, दिवस ३३६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११७१ ते ११९० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४०२१ ते ४०३२
“२ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 December
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११७१ ते ११९०,
1171-18
गेलियाही भलतेउता । उदकपणे पंडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवी ॥1171॥
अर्जुना, ती (भिन्न दिसणारी) लाट वाटेल तेथवर जावो, उदक ह्या दृष्टीने तिचा असलेला एकात्मभाव कधींही भंग पावत नाही. 71
1172-18
तैसा मीपणे हा लोटला । तो आघवेयाचि मजआंतु आला । या यात्रा होय भला । कापडी माझा ॥1172॥
तसा माझ्यावर सर्वस्वे येऊन पडला म्हणजे अनन्य झाला, असा जो हा, तो सर्व मरूपच झाला. ह्याच त्याच्या पुण्यरूप यात्रेने तो माझा खरा यात्रेकरू होय 72.
1173-18
आणि शरीर स्वभाववशे । काही येक करू जरी बैसे । तरी मीचि तो तेणे मिषे । भेटे तया ॥1173॥
आणि शरीरस्वभावाप्रमाणे, तो काहीही जरी करू लागला, तरी त्या त्या रूपाने (व त्या या स्थितीत) त्याला माझे सर्वात्मकाचेच दर्शन होत असते. 73
1174-18
तेथ कर्म आणि कर्ता । हे जाऊनि पंडुसुता । मिया आत्मेनि मज पाहता । मीचि होय ॥1174॥
त्या त्याच्या कृतींत अर्जुना, हे कर्म आणि हा मी कर्ता, असे भाव जिवंत नसतात, (मृतवत् असतात) तर त्याचा आत्मा जो मी त्यानेच व तो मला ध्यात असतो व म्हणूनच तो मद्रूपच होतो 74
1175-18
पै दर्पणाते दर्पणे । पाहिलिया होय न पाहणे । सोने झांकिलिया सुवर्णे । ना झाके जेवी ॥1175॥
हे पहा, आरशाने आरशाला पाहणे म्हणजे कोणी कोणाला न पाहिल्यासारखेच आहे किंवा सुवर्णाच्याच पदार्थाने सुवर्ण झाकणे म्हणजे सुवर्ण उघढे ठेवणेच होय. 75
1176-18
दीपाते दीपे प्रकाशिजे । ते न प्रकाशणेचि निपजे । तैसे कर्म मिया कीजे । ते करणे कैचे ? ॥1176॥
दिव्यानेच दिव्याला प्रकाशिले ही जशी केवळ भाषा, वास्तवता नव्हे, तसे मद्रूप स्थितीत केल्या गेलेल्या कर्माला कर्म कसे म्हणता येईल ? 76
1177-18
कर्मही करितचि आहे । जै करावे हे भाष जाये । तै न करणेचि होये । तयाचे केले ॥1177॥
तो कर्म करीतच असतो किवा त्याजकडून कर्म होणारच, ‘पण हे मी करावे आणि हे मी करू नये ” अशी विधिकिकरता जेथे अस्त पावलेली असते, त्याने केलेल्या कर्माची न केल्यातच शास्त्र गणना करिते. 77
1178-18
क्रियाजात मी जालेपणे । घडे काहीचि न करणे । तयाचि नांव पूजणे । खुणेचे माझे ॥1178॥
मद्रूपता आली की जी जी काही क्रिया घडेल ती ती न केल्यासारखीच होते व माझी खरी खुणेची पूजा ती हीच होय 78
1179-18
म्हणौनि करीतयाही वोजा । ते न करणे हेचि कपिध्वजा । निफजे तिया महापूजा । पूजी तो माते ॥1179॥
म्हणून अर्जुना, तो आस्थापूर्वक जे कर्म करितो तेही न करण्यातच पडतें; हीच त्याने मला बांधलेली महापूजा होय. 79
1180-18
एवं तो बोले ते स्तवन । तो देखे ते दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेचि ॥1180॥
सारांश, तो बोलेल ते माझे स्तवन, तो पाहील ते माझे दर्शन, व तो जिकडे जिकडे जाईल तिकडे त्याला माझा अद्वय परमात्म्याची यात्रा घडते. 1180
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1181-18
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा । तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥1181॥
अर्जुना, त्याची सर्व कृति ही माझी पूजा होय, तो कल्पना करील तोच माझा जप; व तो असेल तीच माझी समाधि होय 81
1182-18
जैसे कनकेसी कांकणे । असिजे अनन्यपणे । तो भक्तियोगे येणे । मजसी तैसा ॥1182॥
सुवर्णपाशी त्याचाच अलंकार जे कांकण हे नेहमीच जसे अनन्य (एकरूप) असते त्याप्रमाणे ह्या भक्तियोगेकरून तो माझ्याशी अनन्य असतो. 82
1183-18
उदकी कल्लोळु । कापुरी परीमळु । रत्नी उजाळु । अनन्यु जैसा ॥1183॥
पाण्याशी लाट कापुरापाशी परिमळ । व रत्नाशी जसे त्याचे तेज अनन्य असते, 83
1184-18
किंबहुना तंतूंसी पटु । का मृत्तिकेसी घटु । तैसा तो एकवटु । मजसी माझा ॥1184॥
किंबहुना, तंतूशी पट, मृत्तिकेपाशी घट हे जसे एकरूप असतात तसा तो माझा भक्त मजपाशी एकवट म्हणजे मद्रूप असतो. 84
1185-18
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजाती । मज आपणपेया सुमती । द्रष्टयाते जाण ॥1185॥
या स्वयंसिद्ध अभेद भक्तीने दृश्यमात्राकडे, जो भक्त, त्यावरील नामरूपात्मक दृश्यत्वाचा पडदा बाजूस सारून, अधिष्ठान द्रष्टा जो मी, तदेकदृष्टीने पहातो. 85
1186-18
तिन्ही अवस्थांचेनि द्वारे । उपाध्युपहिताकारे । भावाभावरूप स्फुरे । दृश्य जे हे ॥1186॥
जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तीन अवस्थांद्वारां, उपहित अधिष्ठान व नामरूपादि उपाधि ह्यांच्या द्वारा, अभावरूपाने स्फुरणारे ( प्रत्ययास येणारें) जे काही ते दृश्य होय. 86
1187-18
ते हे आघवेचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा । अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥1187॥
ते, जे हे सारे दृश्य त्याचा तात्विक (अंतापयंत ) विचार करून, त्याचे खरे स्वरूप, अधिष्ठानरूप परमात्मा जो मी किंवा पहाणाराचा आत्मा तेच आहे, असा त्या योग्याच्या अपरोक्षानुभवाचा धेडा नाचू लागतो. 87
1188-18
रज्जु जालिया गोचरु । आभासता तो व्याळाकारु । रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवी ॥1188॥
रज्जुस्वरूपदर्शनाने तिजवर दिसलेला जो सर्पाचा आकार तोही तेव्हा रज्जुस्वरूपच होता असा निश्चय जसा व्हावा. 88
1189-18
भांगारापरते काही । लेणे गुंजहीभरी नाही । हे आटुनिया ठायी । कीजे जैसे ॥1189॥
सुवर्णालंकारांत, अलंकाराला गुंजभरही पृथक् सत्ता नसते, हे विचाराने किंवा अलंकार आटुनही जसे पहात येईल. 89
1190-18
उदका येकापरते । तरंग नाहीचि हे निरुते । जाणोनि तया आकाराते । न घेपे जेवी ॥1190॥
एका उदकावाचून लाट म्हणून काही स्वतंत्र वस्तूच नाही हे जाणणारा जसा तिच्या आकाराने फसत नाही. 1190
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३३६ वा. २, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०२१ ते ४०३२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ४०२१
आता मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावे सोडवुनि कृपानिधि । सापडलो संधी काळचक्री ॥१॥
करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई । करी वो आई मजवरी ॥धृपद॥
मागील काळ अज्ञानपणे । सरला स्वभावे त्या गुणे । नेणे आयुष्य जाले उणे । पुढील पेणे अंतरलो ॥२॥
आता मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथे म्या येउनि केले काय । नाही तुझे पाय आठविले ॥३॥
करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामी घ्यावा प्रेमा । सोडवी भ्रमापासुनिया ॥४॥
हृदय वसो तुमच्या गुणी । ठाव हा पायापे चरणी । करू हा रस सेवन वाणी । फिटे तो धणी तुका म्हणे ॥५॥
अर्थ
आता माझ्या बुध्दीने काही तरी शुध्दी धरावी आणि जे मिथ्या आहे त्याचा त्याग करुन निजस्वरुपाची प्राप्ती करुन घेण्यासाठी पुन्हा मागे फिरावे. हे कृपानिधी यातून मला तुम्ही सोडवा मी काळच्रकाच्या कचाटयात सापडलो आहे. देवा हे माझे आई तू ठरवलेस तर काय करु शकत नाहीस. मोहरीचा डोंगर करु शकतोस आणि पर्वताचा मोहरी करु शकतोस. त्यामुळे तुम्ही तुमच्या कृपेची सावली माझ्यावर धरा. माझा मागील सर्व काळ अज्ञानपणामुळे व स्वभावगुणामुळे व्यर्थ गेला. त्यातही माझे आयुष्य कमी त्यामुळे मी पुढे मोक्षाला आचवलो आहे, अंतरलो आहे. पण देवा मला आता भय वाटत आहे माझ्या आयुष्यातला एकामागून एक दिवस चालत जात आहे. देवा या मनुष्य जन्मामध्ये येऊन मी काय केले तुझे पाय देखील आठवले नाही. हे पुरुषोत्तमा मी केलेल्या अपराध तुम्ही केले तर क्षमा देखील होतील त्यामुळे तुम्ही माझे अपराध क्षमा करा. मला तुम्ही आपल्या नामाचे
26/12/22, 10:15 Sdm:
अभंग क्र. ४०२२
जेणे हा जीव दिला दान । तयाचे करीन चिंतन । जगज्जीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥
जो या भीवरेच्या तिरी । कट धरूनिया करी । पाउले समचि साजिरी । अंतरी धरोनि राहेन ॥धृपद॥
जो या असुरांचा काळ । भक्तभजनप्रतिपाळ । खेळे हा लाघवे सकळ । तयाच्या भाळ पायावरी ॥२॥
जो या गोपाळांच्या मेळी । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळी स्वामी माझा ॥३॥
जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगी सकळ कळा । जयाचे गळा वैजयंतीमाळा । तया वेळोवेळा दंडवत ॥४॥
जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावे त्यासि तुका शरण ॥५॥
अर्थ
ज्याने मला दान म्हणून हा जीव दिला आहे त्याचे मी चिंतन करीन. नारायण जगाचे जीवन आहे आणि त्याचेच गुणगान मी गाईन. जो आपले दोन्हीही कर कमरेवर धरुन भीवरेच्या तीरी उभा आहे, ज्याची साजरी अशी समचरण पाऊले आहेत त्या हरीलाच मी माझ्या अंत:करणात धरुन राहीन. जो असुरांचा काळ आहे व भक्तजणांचा सांभाळ करणारा आहे, जो मोठया कौशल्याने हा खेळ खेळत आहे त्याच्या पायावर माझे मस्तक असो. जो वनमाळी या गोपाळांच्या बरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळत आहे, त्या हरीने बळीच्या मस्तकावर पाय देऊन त्याला रसातळाला नेले व त्याच्या दाराचे रक्षण करण्याकरता तो पाताळातच राहिला. जो लावण्याचा पुतळा आहे आणि ज्याच्या अंगी सर्व कला आहेत, आणि ज्याच्या गळयामध्ये वैजयंती माळा आहेत अशा या भगवान विष्णूला वेळोवेळी माझे दंडवत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “लक्ष्मी म्हणजे सर्व ऐश्वर्याची स्वामीनी ज्याची दासी आहे आणि ज्याचे नाम सर्व पापाचा नाश करते, आणि जो सर्व तेजाच्या राशी �
26/12/22, 10:16 Sdm:
अभंग क्र. ४०२३
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसे तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझे ॥१॥
काय हे खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयाने ते कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥धृपद॥
काय हे स्थिर राहेल बुद्धी । काही अरिष्ट न येल की मधी । धरिली जाइल ते शुद्धी । शेवट कधी तो मज न कळे ॥२॥
काय ऐसे पुण्य होईल गाठी । घालीन पायी देवाचे मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटईन कंठी सद्गदित ॥३॥
काय हे निवतील डोळे । सुख ते देखोनी सोहळे । संचित कैसे ते न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥
ऐसी चिंता करी सदा सर्व काळ । रात्रंदिवस हेचि तळमळ । तुका म्हणे नाही आपुले बळ । जेणे फळ पावे निश्चयेंसी ॥५॥
अर्थ
हे संतजनहो माझा उध्दार होईल काय, नारायण माझ्यावर कृपा करील काय ? हे तुम्ही मला सांगा व माझ्या चित्ताचे समाधान तुम्ही करा. माझे संचित कर्म खंडित होईल काय आणि धर्माधर्म नाहीसे होईल काय ? हे कशाने नष्ट होईल ते काही मला कळत नाही म्हणून तर मला श्रम वाटत आहे. देवा माझी बुध्दी स्थिर राहील काय आणि मी मनामध्ये जो परमार्थाचा संकल्प धरला तो कोणतेही अरिष्ट न येता सिध्दीला जाईल काय ? आणि तो संकल्प सिध्दीला जाऊन मला शेवटी फलप्राप्ती केव्हा होईल हे मला काही कळत नाही देवा माझ्या पदरी असे पुण्य उत्पन्न होईल काय की, जेणेकरुन मी देवाच्या पायाला मिठी मारेन. तो जगजेठी मला प्रेमाने कुरवाळेन आणि त्यायोगे माझा कंठ सद्गतीत होईल. ते हरीचे सुखसोहळे पाहून माझे डोळे शांत होतील काय ? देवा माझे संचित कर्म कसे आहे ते मला काही कळत नाही परंतू वरती सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी वासनेचे डोहळे उत�
26/12/22, 10:16 Sdm:
अभंग क्र. ४०२५
तूचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलो तुज आता । तारी कृपावंता मायबापा ॥१॥
संतसंगति देई चरणसेवा । जेणे हा तुझा विसर न पडावा । हाचि भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ॥२॥
मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्ना सोडवूनि हाती । विनंती माझी परिसावी हे ॥३॥
आणीक काही नाही मागणे । सुखसंपित्तराज्यचाड धने । साकडे न पडे तुज जेणे । दुजे भक्तीविण मायबापा ॥४॥
जोडोनिया कर पायी ठेवी माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगी वोढवावी रंगकथा । पुरवी मनोरथा मायबापा ॥५॥
अर्थ
देवा तूच अनाथांचा दाता आहेस त्यामुळे तर दु:ख, मोह, चिंता नाश पावेल, त्यामुळे हे कृपावंता मायबापा मी तुला शरण आलो आहे तरी तू मला या भवसमुद्रातून तार. देवा मला तुझ्या चरणांची सेवा घडू दयावी आणि जेणेकरुन मला तुझा विसर पडणार नाही अशा संतांची संगती मला दयावी. देवा हाच दृढ भक्तिभाव माझ्या जीवाचा आहे माझे मनोरथ एवढे तुम्ही पूर्ण करा. देवा तुझे नाम वर्णन करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी माझ्या ठिकाणी दृढ भक्तिभाव प्रेम आणि तुझ्याविषयीचे आवड दयावी. व ह्या कार्यात आड येणा-या विघ्नांपासून मला तुम्ही सोडवा. एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. देवा हयावाचून माझे दुसरे काहीही मागणे नाही. मला सुख नको, संपत्ती नको, राज्य नको किंवा धनाविषयी आवडही नको हे मायबापा भक्तिवाचून दुसरे कोणतेही तुला संकट पडेल असे मी काहीही मागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा मी माझे दोन्ही कर जोडून तुमच्या चरणावर माझा माथा ठेवीत आहे व तुम्हाला विनंती करीत आहे, हे मायबापा हरीकथेचा रंग म�
26/12/22, 10:17 Sdm:
अभंग क्र. ४०२६
सेंदरींहेंदरी दैवते । कोण ती पुजी भुतखेते । आपुल्या पोटा जी रडते । मागती शिते अवदान ॥१॥
आपुले इच्छे आणिका पीडी । काय ते देईल बराडी । कळो ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधिरा ॥धृपद॥
दासीचा पाहुनर उखिते । धणी देईल आपुल्या हाते । करुणाभाषणउचिते । हे तो रिते सतंत शक्तीहीन ॥२॥
काय ते थिल्लरीचे पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरी आदी आवसानी । क्षोभे पुरश्चरणी दिले फळ ॥३॥
विलेपने बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती अपआपणया दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥
तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचे करा चिंतन । वंदू चरण येती सकळ ॥५॥
अर्थ
शेंदरी हेंदरी म्हणजे शेंदुर लावलेले हेंदरी दैवते अशा भूताखेतांची कोण पूजा करते ? अहो जी दैवत पोटासाठी रडतात आणि पोट भरण्यासाठी अन्न मागतात त्यांची कोण पूजा करणार आहे ? आपल्या इच्छेसाठी दुस-याला त्रास देणारे भिकारी दैवत आम्हाला काय देणार आहे ? अहो ज्याची बुध्दी अपूरी आहे आणि ज्याच्या ठिकाणी अधीरता आहे धैर्य नाही त्याची काय प्राप्ती होणार हे आम्हाला आता चांगले कळून आले आहे. जर एखादा पाहुणा आला आणि त्याने दासीच्या हाताने पाहुणचार घेण्याचे ठरविले तर त्या दासीला आपल्या मालकाला प्रथम विचारावे लागेल मग तिच्या योग्यतेनुसार मालक तिला जे हवे असेल ते देईल व त्यापुढे ती दासी पाहुण्यांच्या इच्छाप्रमाणे त्यांचा पाहुणचार करेन. अशी ही दैवते नेहमी शक्तिहीन असून मोकळीच असतात. डबक्यातील पाण्याचा काय उपयोग आहे अहो ज्या पाण्याने ओठच भिजत नाही त्या पाण्याने तहान जाईल तरी कशी ? कोणते��
26/12/22, 10:19 Sdm:
अभंग क्र. ४०२७
विषयओढीं भुलले जीव । आता यांची कोण करील कीव । नुपजे नारायणी भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरिले संसारी । पडोनि काळाचे आहारी । माप या लागले शरीरी । झालियावरी सळे ओढिती ॥धृपद॥
बापुडी होतील शेवटी । आयुष्यासवे झालिया तुटी । भोगिले मागे पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥
जुंतिले घाणा बांधोनि डोळे । मागे जोडी आर तेणेही पोळे । चालिलो किती ते न कळे । दुःखे हारंबळे भूकतहान ॥३॥
एवढे जयाचे निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । ते हे देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥४॥
तुका म्हणे न वेचता मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेचिता फुकाचे बोल । केवढे खोल अभागिया ॥५॥
अर्थ
विषयाच्या ओढीने सर्व जीव भुलले गेले आहेत स्वत:चे स्वरुप विसरले आहेत त्यामुळे आता यांची कीव कोण करील ? एवढा मोठा यांना नरदेह प्राप्त झाला तरी देखील यांच्या ठिकाणी नारायणाविषयी भक्तिभाव उत्पन्न होत नाही. अहो हे तर सर्व काळाच्या मुखी पडले आहेत तरी देखील या लोकांनी संसारामध्ये असे कोणते सुख धरले आहे ? अहो या शरीराला आयुष्याचे माप लागले आहे आणि ते की एकदा पूर्ण झाले की, मग यमदूत त्याच्यावर सळ ओढीत त्याला घेऊन जाईन एकदा की आयुष्याची तूट झाली मग शेवटी सर्व दीन होते. मागेही अनेक जन्मात कोटी भोग भोगले आणि पुढेही भोगावेच लागेल आणि पुन्हा जन्म घेऊन भोग भोगावेच लागेल. घाण्याच्या बैलाच्या डोळयाला पट्टी लावतात आणि बैलाने पुढे जाण्यासाठी कसर केला की तेली त्याला पाठीमागून आरी टोचतात. त्यामुळे त्याला त्रास होतो व किती चाललो हे देखील त्याला समजत नाही आणि तहान भूकेच्या दु:खाने
26/12/22, 10:20 Sdm:
अभंग क्र. ४०२८
आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तीमारग हळूचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । का रे अघोरा दचकसी ना ॥१॥
नाही त्या यमासि करुणा । बाहेर काढिता कुडी प्राणा । ओढाळ सापडे जैसे धान्या । चोर यातना धरिजेतो ॥२॥
नाही दिले पावइल कैसा । चालता पंथे तेणे वळसा । नसेल ठाउके ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनिया ॥३॥
क्षण एक नागीवा पायी । न चलवे तया करिता काही । ओढिती कांटवणा सोई । अग्निस्तंभ बाही कवटाळविती ॥४॥
देखोनि अंगे कापती । तये नदीमाजी चालविती । लागे ठाव ना न चलवे बुडविती । वरी मारिती यमदंड ॥५॥
तहानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमी ज्वाळ लोळविती ॥६॥
म्हणउनी करा काही सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तीरस तुका म्हणे ॥७॥
अर्थ
अहो तुम्ही या संसारामध्ये आला आहात म्हणजे मनुष्य देहात आला आहात तरी एक काम करा हळूच मुक्तिमार्ग धरा. अरे तू जर मुक्तिमार्ग धरला नाही तर काळ तुला कुंभीपाक नरकाच्या मोठया यातनाचा दंड करीन व हे तुला कळले असून तरी देखील हे अघोरा तू घाबरत का नाहीस ? देहातून प्राण बाहेर काढताना त्या यमाला कसलीही करुणा येत नाही. ओढाळ जनावर जर धान्य खाताना मालकाला सापडले तर त्याची गय होत नाही आणि चोर चोरी करताना सापडला तर त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात अरे तू जर पूर्वजन्मात काही पुण्याचे दान केले नसेल तर ते तुला या जन्मात कसे प्राप्त होईल ? अरे पापाच्या मार्गाने चालताना मोठा वळसा भोगावा लागतो तो जर तुला माहित नसेल तर मी तुला सांगतो ते तू ऐक जसे बंदीखान्यातील कैदयाला धरु�
26/12/22, 10:20 Sdm:
अभंग क्र. ४०२९
न बोलसी ते ही कळले देवा । लाजसी आपुलिया नावा । तुज मी घालीत नाही गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
उतरी आपुला हा भार । मजशी बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥
दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानुशक्ती ठाकेल तैसी । बाधी दोघासी विन्मुखता ॥३॥
म्हणोनि करितो मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळे नेमास आपुलिया ॥४॥
तुझे म्या घेतल्या वाचून । येथूनी न वजे वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाही म्हण तुका म्हणे ॥५॥
अर्थ
देवा तू माझ्याशी का बोलत नाहीस हे मला कळले आहे तुझे पतितपावन असे नाम आहे त्याप्रमाणे तू वागत नाहीत त्यामुळे तू माझ्याशी बोलण्यासाठी लाजत आहे. हे केशवा देवा मी तुला कसल्याही प्रकारची भीड किंवा संकट घातलेले नाही. त्यामुळे हे देवा तू माझ्याशी बोल आणि आपला भार उतरव. देवा माझा जर तुला अंगीकार करायचा नसेल तर मग मी संतांना शरण जाण्याचा विचार करीन. याचकाला दान देण्याविषयी दात्याची अशी धर्मनीती आहे की याचक जर दात्याच्या दारात दान मागण्यास गेला तर दात्याने आपल्या यथाशक्तीनुसार याचकाला दात्याला दान दयावे आणि याचकाने ते दान स्वीकारावे. परंतू जर याचकाने दान स्वीकारण्यास आणि दात्याने दान देण्यास विन्मुखता दाखविली तर दोघेही पातकी ठरतात म्हणून तर देवा मी मोठया अपेक्षेने तुझे बोलण्याची वाट पाहात आहे. त्यामुळे तर देवा मी मोठा धीर धरुन तुझी प्राप्ती जेणे होईल ते सायास करीत आहे आणि तुझ्या प्राप्तीचे जे नियम आहेत त्या नियमाला मी कधीही चुकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू माझा स्वीकार केल
26/12/22, 10:20 Sdm:
अभंग क्र. ४०३०
आता मी न पडे सायासी । संसारदुःखाचिये पाशी । शरण रिघेन संतांसी । ठाव पायापाशी मागेन त्या ॥१॥
न कळे संचित होते काय । कोण्या पुण्ये तुझे लाधती पाय । आता मज न विसंबे वो माय । मोकलूनि धाय विनवीतसे ॥२॥
बहुत जाचलो संसारे । मोहमायाजाळाच्या विखारे । त्रिगुण येताती लहरे । तेणे दुःखे थोरे आक्रंदलो ॥३॥
आणीक दुःखे सांगो मी किती । सकळ संसाराची स्थिती । न साहे पाषाण फुटती । भय काप चित्ती भरलासे ॥४॥
आता मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालो वेडा असोनि जाणता । पावे अनंता तुका म्हणे ॥५॥
अर्थ
देवा आता मी इतर कोणत्याही आणि संसारदु:खाच्याही कष्टात पडणार नाही. आता मी संतांना शरण जाईन आणि त्यांच्या पायाच्या ठिकाणी मी आश्रय मागेन. देवा माझे संचित काय होते आणि कोणत्या पुण्याईने तुझ्या पायाची मला प्राप्ती होईन हे मला काही समजत नाही. त्यामुळे हे माझे आई विठाई तू मला आता विसरु नकोस मी तुला धाय मोकलून विनवीत आहे. मी या संसाराने आणि मोहमायेच्या विषाने खूप जाचलो आहे. त्यामध्येच सत्व, रज आणि तम हे तीनही गुणाच्या लहरी येतात व याने दु:ख उत्पन्न होते त्यामुळे मला फार दु:ख होते व मी खूप आकांत करतो. देवा या संसाराच्या स्थितीमध्ये अजून किती दु:ख आहेत हे मी किती सांगावे ? हे दु:ख मला सहन होत नाही या दु:खाने तर पाषाण देखील फुटतील हे भय चित्तामध्ये इतके भरले आहे की, त्या भयाने माझे शरीर देखील थरथर कापत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मला या संसार घाणीची वार्ता कोणत्याही प्रकारे सहन होत नाही. देवा मी सर्व जाणता असून देखील वेडा झालो आहे त्यामुळे हे अनंता त��
26/12/22, 10:21 Sdm:
अभंग क्र. ४०३१
आता तुज कळेल ते करी । तारिसी तरि तारी मारी । जवळी अथवा दुरी धरी । घाली संसारी अथवा नको ॥१॥
शरण आलो नेणतपणे । भाव आणि भक्ती काहीच नेणे । मतिमंद सर्वज्ञाने । बहु रंक उणे रंकाहुनी ॥धृपद॥
मन स्थिर नाही माझिये हाती । इंद्रिये धावता नावरती । सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाही ॥२॥
सकळ निवेदिला भाव । तुझिये पायी ठेविला जीव । आता करी कळे तो उपाव । तूचि सर्व ठाव माझा देवा ॥३॥
राहिलो धरूनि विश्वास । आधार नेटी तुझी कास । आणीक नेणे मी सायास । तुका म्हणे यास तुझे उचित ॥४॥
अर्थ
देवा आता तुला जे काही करायचे असेल ते कर मला या भवसमुद्रातून तार अथवा मारुन टाक. तू मला तुझ्याजवळ ठेव अथवा दूर लोट किंवा मला संसारात घाल किंवा घालूही नकोस. देवा मी अज्ञानात तुला शरण आलो आहे भाव आणि भक्ति हे मी काहीच जाणत नाही. देवा मी सर्व ज्ञानाविषयी अतिशय मतिमंद आहे रंकाहूनही खूप उणेपणा माझ्यात असून त्यांच्यापेक्षाही नीच रंक मी आहे. माझे मन स्थिर नाही आणि माझे इंद्रिय माझ्या हातात नाही ते विषयाकडे स्वैरपणे धावतात ते मला काही केल्या आवरत नाही. देवा माझ्या जवळ शांती आणि निवृत्ती नाही त्यामुळे त्यांना आवरण्याविषयी माझ्या सर्व युक्त्या कुंठीत झाल्या आहेत. माझ्या अंत:करणात जे काही होते ते सर्व मी तुझ्यापुढे निवेदन केले आहे आणि माझा जीव तुझ्या पायी ठेवला आहे. देवा तू आता माझा सर्वस्व आहेस माझा तुझ्या ठिकाणी पूर्णपणे आश्रय आहे त्यामुळे तुला जसे वाटेल तसे माझ्या रक्षणासाठी उपाय कर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्या ठिकाणी पूर्णपणे विश्वास धरुन तुझाच आध
26/12/22, 10:21 Sdm:
अभंग क्र. ४०३२
देवा तू कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तू उदार । सकळा देवा तू अगोचर । होसी अविकार अविनाश ॥धृपद॥
भागली स्तुति करिता फार । तेथे मी काय ते गव्हार । जाणावया तुझा विचार । नको अंतर देऊ आता ॥२॥
नेणे भाव परि म्हणवींतो तुझा । नेणे भक्ती परि करितो पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धावणे ॥३॥
तुझिया बळे पंढरीनाथा । झालो निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथा । न भी सर्वथा तुका म्हणे ॥४॥
अर्थ
देवा तू कृपेचा व करुणेचा सिंधू म्हणजे समुद्र आहेस आणि तूच आमचा मायबाप आणि बंधू म्हणजे भाऊ आहेस. देवा जेणेकरुन जीवन सिध्द होईल अशा साधनांचा तू समुद्र आहेस तू भवबंध तोडणारा व काळ पाश तोडणारा आहेस. तुला शरण आलेल्या भक्तांचा तू वज्रपंजर आहेस, भक्तांना अभयदान देणारा तू उदार दाता आहेस. तू सर्व देवांना न दिसणारा म्हणजे अगोचर आहेस त्यांना तू अविषय आहेस आणि तू अविकार असून अविनाशी आहेस. देवा तुझी स्तुती करताना शेषासारखे वेदासारखे थकून गेले तर माझ्यासारख्या गव्हार अज्ञानी मनुष्याचे तेथे काय आहे ? देवा मला तुझे स्वरुप कळावे यासाठी मला तू तुझ्यापासून दूर करु नकोस. देवा भाव म्हणजे काय मला हे माहित नाही परंतू स्वत:ला मी तुझा म्हणून घेतो आणि भक्ति म्हणजे काय हे मला माहित नाही परंतू तुझी पूजा मी करतो. हे केशीराजा आम्ही तुमचे नाम घेतो त्यामुळे तुला आमच्या मदतीसाठी धावून यावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा आम्ही तुझ्या बळानेच निर्भर म्हणजे निष्काळजी झाल�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















