आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

७ डिसेंबर, दिवस ३४१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२७१ ते १२९० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४०८१ ते ४०९२
“७ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 7 December
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ७ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
७ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२७१ ते १२९०,
1271-18
सूर्याचेनि सावाये । डोळा सावाइला होये । तै अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥1271॥
सूर्य प्रकाशाचे सहाय्य असलेला डोळा काय अधंकाराला भिणार आहे ? 71
1272-18
तैसा माझेनि प्रसादे । जीवकणु जयाचा उपमर्दे । तो संसाराचेनी बाधे । बागुले केवी ? ॥1272॥
त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवदशा उपमर्दित (नष्ट, बाधित) झाली आहे, त्याला संसाररूप बागुलाची (मिथ्या वस्तूची) कशी भीति वाटेल ? 72
1273-18
म्हणौनि धनंजया । तू संसारदुर्गती यया । तरसील माझिया । प्रसादास्तव ॥1273॥
म्हणून अर्जुना, माझ्या प्रसादाने तू हा इतरास दुस्तर असलेला संसार सहज तरून जाशील. (तरून जाणं आहे इतकेंही सत्यत्व त्याचे ठिकाणी उरणार नाही) 73
1274-18
अथवा हन अहंभावे । माझे बोलणे हे आघवे । कानामनाचिये शिवे । नेदिसी टेको ॥1274॥
अथवा, सर्वज्ञतेच्या किंवा अभिमानाच्या तोऱ्यात तू हे माझे बोलणे नुसते ऐकणारही नाहींस किंवा मनावरही घेणार नाहीस. 74
1275-18
तरी नित्य मुक्त अव्ययो । तू आहासि ते होऊनि वावो । देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगी ॥1275॥
तर, वस्तुतः तू नित्यमुक्त व अविनाशी आहेस ते सर्व व्यर्थ होऊन, देहसंबधाने होणारे सर्व दुःखाघात तुला सोसावे लागतील. 75
1276-18
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदी आत्मघातु । भुंजता उसंतु । कहीचि नाही ॥1276॥
ह्या देहात्मबुद्धीने पावलो पावली, आत्मघात होत असतो व विसावा म्हणून कसा तो क्षणभरही मिळत नाही. 76
1277-18
येवढेनि दारुणे । निमणेनवीण निमणे । पडेल जरी बोलणे । नेघसी माझे ॥1277॥
माझ्या भाषणाकडे तू दुर्लक्ष केलेस तर, वस्तुतः तू अमर असूनही तुला मरणासारखे दारुण दुःख भोगावे लागेल. 77
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वा नियोक्ष्यति ॥18. 59॥
1278-18
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । का दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषे अहंकारु । पोषूनि तैसा ॥1278॥
पथ्य मोडणारा ज्वराला व दीप फोडणारा अंधकारला, तसा विचार सोडणारा अहंकाराला पुष्ट करितो. 78
1279-18
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥1279॥
आपला देह तो अर्जुन, दुसऱ्यांचे देह ते स्वजन, आणि त्यांच्याबरोबर युद्ध म्हणजे पापकर्म. 79
1280-18
इया मती आपुलिया । तिघा तीन नामे यया । ठेऊनिया धनंजया । न झुंजे ऐसा ॥1280॥
ह्या तीन गोष्टींना आपल्या, बुद्धीप्रमाणे अशी तीन नांवे देऊन, अर्जुना, मी युद्ध करणार नाही असा-1280
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
128-18
जीवामाजी निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वाया धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥1281॥
चित्तांत दृढनिश्चय करून जरी तू बसला असलास तरी तुझा नैसर्गिक म्हणजे जन्मजात, स्वभाव तुझा तो निश्चय टिकू देणार नाही. 81
1282-18
आणि मी अर्जुन हे आत्मिक । यया वधु करणे हे पातक । हे मायावाचूनि तात्त्विक । काही आहे ? ॥1282॥
आणि विचार करून पाहिले तर, ” मी अर्जुना, हे माझे ह्यांचा वध करणे म्हणजे पातक ” इत्यादि समजूत, म्हणजे तत्त्वदृष्टया केवळ भ्रमावाचून दुसरे काही आहे काय ? 82
1283-18
आधी जुंझार तुवा होआवे । मग झुंजावया शस्त्र घेयावे । का न जुंझावया करावे । देवांगण ॥1283॥
अरे, प्रथम तूच युद्धाला तयार झालास त्याकरिता शस्त्रही धारण केलेस व आता ऐन प्रसंग मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा करतोस ? 83
1284-18
म्हणौनि न झुंजणे । म्हणसी ते वायाणे । ना मानू लोकपणे । लोकदृष्टीही ॥1284॥
म्हणून, झुंजणार नाही असे जे म्हणत आहेस ते व्यर्थ होय. आम्हाला तर ते खरे वाटत नाहीच, पण लोकही हे खरे आहे असे मानणार नाहीत. 84
1285-18
तऱ्ही न झुंजे ऐसे । निष्टंकीसी जे मानसे । ते प्रकृति अनारिसे । करवीलचि ॥1285॥
तरी युद्ध करू नये असा जो चित्तांत सारखा विचार सुरू आहे, तो तुझा क्षात्रस्वभावच अन्यथा करील. (फिरवील) 85
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥18. 60॥
1286-18
पै पूर्वे वाहता पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणी । तरी आग्रहोचि उरे ते आणी । आपुलिया लेखा ॥1286॥
अहो, पूर्वदिशेकडे पाणी वाहत असता, कोणी पश्चिमेकडे तोंड करून पोहू लागला, त्याचा आग्रह मात्र उरणार; पाणी त्यास आपल्या ओघाकडे आणणारच. 86
1287-18
का साळीचा कणु म्हणे । मी नुगवे साळीपणे । तरी आहे आन करणे । स्वभावासी ? ॥1287॥
साळीच्या बीयाने साळीपणाने न उगविण्याचे ठरविले तर ही अस्वाभाविक गोष्ट शक्य आहे काय ? 87
1288-18
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा । आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तू ॥1288॥
त्याप्रमाणे, जन्मतः क्षात्रसंस्कारसिद्ध प्रकृतीने घडलेला किंवा बनलेला बनलेला जो तूं, तो ह्या क्षणी युद्ध करणार नाही असे जरी म्हणालास तरी ते व्यर्थ होय; ती तुझी प्रकृति तुला उठविणारच. 88
1289-18
पै शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता । गुण दिधले जन्मता । प्रकृती तुज ॥1289॥
अर्जुना, तेज, शौर्य, दक्षता आदि तुझ्या अंगचे गुण प्रकृतिसिद्ध किंवा जन्मजात आहेत. 89
1290-18
तरी तयाचिया समवाया- । अनुरूप धनंजया । न करिता उगलिया । नयेल असो ॥1290॥
तर, त्या गुणानुरूप न वागता तु स्वस्थ बसू म्हणशील तर प्रकृति तुला तसे करू देणार नाही. 1290
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३४१ वा. ७, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०८१ ते ४०९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ४०८१ (आरत्या)
दैत्यभारे पीडिली पृथ्वी बाळा । म्हणोनि तूज येणे झाले गोपाळा ।
भक्तीप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळे तुज गाती आबळ बाळा ॥१॥
जय देव जय देव जय गरुडध्वजा । आरती ओवाळू तुज भक्तीकाजा ॥धृपद॥
गुण रूप नाम नाही जयासी । चिंतितांची तैसा होसी तयांसी ।
मत्स्य कूर्म वराह नरसिंह झालासी । असुरा काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥
सहस्त्र रूपे नाम सावळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा ।
जीवना जीवन तूचि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिका सुरवरा ॥३॥
संता महंता घरी म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा ।
सुदर्शन घरटी फिरे अवसरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥
भावेविण तुझे न घडे पूजन । सकळ ही गंगा झाल्या तुजपासून ।
उत्पत्ती प्रलय तूच करिसी पालन । धरूनि राहिला तुका निश्चये चरण ॥५॥
अर्थ
हे गोपाळा दैत्यभाराने तुझी पृथ्वीरुपी कन्या अतिशय पीडित झाली त्यामुळे तर तुला अवतार धारण करावा लागला हे देवा तू भक्तप्रतिपालक असून तुझा जन्म गोकुळात झाला तो दिवस त्यांच्यासाठी उत्सव सोहळयाप्रमाणे असून तेथील स्त्रिया तुझे मंगलगीत गात आहेत. हे गरुडध्वजा तुझा त्रिवार जयजयकार असो भक्तांचे कार्य करणा-या तुझी आम्ही आरती ओवाळू ज्या हरीला गुण, रुप, नाम नाही त्या हरीचे चिंतन फक्त ज्या पध्दतीने करतो त्या पध्दतीनुसार तो हरीरुप धारण करतो. देवा तू मस्य, कूर्म, वराह, नरसिंह झाला असून असुरांचा तू काळ आहेस व मुनीजणांच्या ध्यानात तू राहतोस हे विश्वंभरा देवा तुझे सारासार रुप व नाम असून तू सावळाही नाहीस आणि गोराही नाहीस आणि तुझ्याविषयी श्रृती “नेती नेती” असे म्हणत��
26/12/22, 10:51 Sdm:
अभंग क्र. ४०८२ (आरत्या)
काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामे मात्रे भवपाश तुटती ।
पाहाता पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळा सहित जडजीव उद्धरती ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिराया, श्रीपंढरिराया । करुनिया कुरवंडी सांडीन काया ॥धृपद॥
मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाही उपमा ।
श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी ।
विष्णूचे पूजन एकाभावेसी । नित्यमुक्त पूज्य तिही लोकासी ॥३॥
न वजे वाया काळ जे तुज ध्याती । अखंड तुझा वास तयाच्या चित्ती ।
धाले सुखे सदा प्रेमे डुल्लती । तीर्थे मलीन वास तयांचा पाहाती ॥४॥
देव भक्ती तूचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ती हे जनी ।
जड जीवा उद्धार व्हावया लागोनी । शरण तुका वंदी पाउले दोन्ही ॥५॥
अर्थ
देवा तुझा महिमा मी काय आणि किती वर्ण करू तुझे नाम घेतले तरी भवपाश तुटतात. विष्णूच्या मूर्तीची पाऊले पाहिले असता जड जीवासहीत कोटीकुळाचा उध्दार होतो. हे पंढरीराया तुझा त्रिवार जयजयकार असो. मी माझ्या देहाची कुरवंडी करुन तुझ्यावरुन ओवाळून टाकीन. देवा तुझ्या मंगल आरतीचा थोर महिमा आहे त्याला देण्यासाठी दुसरी कोणतीही उपमा नाही. देवा तुझी मंगल आरती जो कोणी तुझ्या श्रीमुखासहीत पाहतो तो जसे सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीसे होतो तसा त्याच्या सर्व कर्मबंधनाचा नाश होते. एकादशी हे व्रत आणि हा काळ अतिशय धन्य आहे आणि ज्याला कोणाला त्या दिवशी हरीजागरण आणि उपवास घडेल, आणि ज्याच्या हातून त्या दिवशी विष्णूचे एकनिष्ठ भक्तिभावाने पूजा घडते तो त्रैलोक्यात नित्य मुक्त असून स��
अभंग क्र. ४०८३ (आरत्या)
कंसराये गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत ।
घ्यावया अवतार झाले हेचि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्त ॥१॥
जय देव जय देव जय विश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपे बापा ॥धृपद॥
स्थूळरूप होऊनि धरितसे साने । जैसा भाव तैसा तयांकारणे ।
दैत्यासी भासला सिंह गजाने । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हे ॥२॥
अनंत वर्णी कोणा न कळेचि पार । सगुण की निर्गुण हा ही निर्धार ।
पागली साही अठरा करिता वेव्हार । तो वळितसे गौळियांचे खिल्लार ॥३॥
तेहतिस कोटि तिही देवांसी श्रेष्ठ । पाउले पाताळी स्वर्ग मुगुट ।
गिळिली चौदा भूवने तरि न भरेचि पोट । तो खाउन धाला गोपाळाचे उच्छिष्ट ॥४॥
महिमा वर्णु तरि पागलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करिता स्तुती ।
भावेविण काही न चलेचि युक्ती । राखे शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥
अर्थ
कंसाने देवकीच्या गर्भातील सात मुले जन्माला आल्यानंतर मारले त्यामुळे गोकुळात अनंत जन्माला आले. देवाचा अवतार घेण्याचे निमित्त एवढेच आहे की, असुरांचा संहार करुन भक्तजणांचे रक्षण करणे. हे विश्वरुपा तुझा त्रिवार जयजयकार असो हे बापा मी माझ्या देहरुपी दीपाने तुला ओवाळीन. देवा तुम्ही स्थूळरुप धारण करुन देखील छोटे रुपही भक्तासाठी धारण करतात ज्याचा जसा भक्तिभाव असेल त्याच्यासाठी तसेच रुप तुम्ही धारण करतात. सिंहाने हत्तीला पाहिल्यानंतर जसा त्याचा थरकाप उडतो त्याप्रमाणे देवाला पाहिल्यानंतर दैत्यांचा थरकाप उडतो काळाचाही महाकाळ ज्या दैत्यांना देव भासतो तो देव यशोदेला तान्हे मुलासारखे दिसतो. हरीचे वर्णन आतापर्यत अनंत लोकांनी
अभंग क्र. ४०८४ (आरत्या)
परमानंदा पुरुषोत्तमा रामा । अच्युता अनंता हरी मेघश्यामा ।
अविनाश अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥
जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥धृपद॥
गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भवसागरतारक दधिमंथना ।
मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सल सकळा मूळ जयजय निधाना ॥२॥
विश्वंभरा सर्वेश्वर जगदोध्दारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।
सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ती मनोहरा ॥३॥
गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी ।
नंदा नंदनवंदना त्रिभुवनांभीतरी । अनंतनामी ठसा अवतारांवरी ॥४॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संता । भगवाना भगवंता काळकृदांता ।
उत्पत्तिपालनपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारी रिति बहुता ॥५॥
अर्थ
हे परम आनंद देणा-या परम पुरुषोत्तमा, रामा, अच्यूता, अनंता, हरी, मेघाप्रमाणे शरीर असणा-या, हे अविनाशी लक्षात न येणा-या, परब्रम्हाचाही पलीकडे असणा-या तुझे कार्य न कळणा-या लक्ष्मीपते तुझा महिमा कळतच नाही. हे श्रीपती तुमचा मी त्रिवार जयजयकार करीत आहे तुम्ही अतिशय मंगलदायक असून शुभदायक आहात मी तुमची आवडीने आरती करीन. हे गोविंदा गोपाळा गोकुळ रक्षण करणा-या, आपल्या करंगळीवर गोवर्धनगिरी पर्वत धारण करणा-या, भवसिंधू हे दही मंथन करुन सर्वाना तारणा-या, हे मधू नावाच्या राक्षसाचा वध करणा-या, मुनीजणांचे जीवन असणा-या, धरणीचे श्रम हरण करणा-या, सर्व दीन लोकांचे प्रेमाने सांभाळ करणा-या व सर्व लोकांचे मूळ असणा-या देवा तू विजयाचे निधान आहेस. हे विश्वंभरा सर्वेश्वरा जगताचे उ
अभंग क्र. ४०८५ (आरत्या)
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी ।
तीर्थ हे चंद्रभागा महा पातका धुनी ।
उतरले वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा ।
आरती ओंवाळीन तुम्हा लक्ष्मीकांता ॥धृपद॥
नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचे गजर ।
सन्मुख गरुड पारी उभा जोडुनि कर ।
मंडितचतुर्भुजा कटी मिरवती कर ॥२॥
हरीनाम कीर्तन हो आनंद महाद्वारी ।
नाचती प्रेमसुखे नर तेथिंच्या नारी ।
जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥
आषाढी कार्तीकी हो गरुडटकयांचे भार ।
गर्जती नाम घोष महावैष्णववीर ।
पापासी रीग नाही असुर कापती सुर ॥४॥
हे सुख पुंडलिके कैसे आणिले बापे ।
निर्गुण साकारले आम्हालागिं हे सोपे ।
म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखे ॥५॥
अर्थ
पंढरी ही अतिशय पुण्यभूमी असून तेथे भीमा नदी दक्षिण मुखाने वाहात आहे भीमा नदीची आकृती ही चंद्राप्रमाणे आहे त्यामुळे तिला चंद्रभागाही म्हणतात आणि जे भक्त चंद्रभागेत स्नान करतील त्यांचे महापातक देखील धुवून जातात. अशा प्रकारचे वैकुंठातील महासुख देणारे श्रेष्ठ वैकुंठ खाली पृथ्वीवर उतरले आहे. हे देवा पाडूरंगा तुमचा जयजयकार असो हे अनाथांच्या नाथा तुमचा जयजयकार असो तुम्ही लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीपती आहात मी तुमची आरती ओवाळीन. येथे नित्य नवा सोहळा होत असून महावादयांचा गजर होत आहे आणि समोरच पारावर गरुड आपले दोन्ही कर जोडून उभा आहे. आणि तुम्ही तुमची दोन्ही हात कटेवर ठेवून आहात तुमची चतुर्भूज मूर्ती अतिशय सुशोभित दिसत आहे. महाव्दारामध्ये हरीनाम कीर्तनाचा आनंद होत आहे आणि तेथे नर व नारी स्त्री व पुरुष हे प्रेमसुखाने ना�
अभंग क्र. ४०८६ (आरत्या)
अवतार गोकुळी हो जन तारावयासी । लावण्यरूपडे हे तेज पुंजाळरासी ।
उगवता कोटि बिंबे रवि लोपले शशी । उत्सव सुरवरा मही थोर मानसी ॥१॥
जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता । आरती ओंवाळीन तुम्हा देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥धृपद॥
वसुदेवदेवकीची बंद फोडीली शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचे बाळ ।
दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राज्यया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥
राखता गोधने हो इंद्र कोपला भारी । मेघ जो कडाडिला शिळा वर्षता धारी ।
राखिले गोकुळ हे नखी धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥
कौतुक पाहावया माव ब्रह्मयाने केली । वत्सेंही चोरोनिया सत्यलोकासि नेली ।
गोपाळ गाईवत्से दोन्ही ठायी राखीली । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥
तारिले भक्तीजना दैत्य निर्दाळूनि । पांडवा साहकारी आडल्या निर्वाणी ।
गुण मी काय वर्णु मति येवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव मागे चरणी ॥५॥
अर्थ
सामान्य लोकाचा उध्दार करण्यासाठी देवाने गोकुळात अवतार घेतला आहे अशा या हरीचे रुप अतिशय लावण्य असून तेज:पुंजाची राशीच आहे. हरीच्या त्या तेजापुढे कोटी सूर्य चंद्र जरी उगवले तरी लोपले जातील अशा या हरीचा पृथ्वीवर गोकुळामध्ये जन्म झाला याचा थोर उत्सव सर्व देव देवतांना होत आहे. हे देवा कृष्णनाथा, रुक्मिणीकांता, देवकीसुता मी तुमची आरती ओवाळीन हे कृष्णनाथा तुमचा जयजयकार असो. देवा वसुदेव आणि देवकी कारागृहात असताना तुम्ही त्यांची सुटका केली विश्वजनिता तुम्ही आहात तरी देखील तुम्ही त्यांच्या पोटचे बाळ झालात. देवा तुम्ही सर्व दैत्यांचे काळ झालेला अ�
अभंग क्र. ४०८७ (आरत्या)
सुंदर अंगकांती मुख भाळ सुरेख । बाणली उटी अंगी टिळा साजिरा रेख ।
मस्तकी मुगुट कानी कुंडलां तेज फाके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥
जय देवा चुतर्भुजा जय लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥धृपद॥
उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तया न कळे गति ।
भाट हा चतुर्मुखे अनुवाद करिती । पागली साही अठरा रूपे न कळे गति ॥२॥
ऐकोनि रूप ऐसे तुजलागी धुंडिती । बोडके नग्न एक निराहार यती ।
साधने योग नाना तपे दारुण किती । सांडिले सुख दिली संसाराची त्या शांती ॥३॥
भरूनि माजी लोका तिही नांदसि एक । कामिनी मनमोहना रूप नाम अनेक ।
नासति नाममात्रे भवपातके शोक । पाउले वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥
उपमा द्यावयासी दुजे काय हे तुज । तत्वासि तत्वसार मूळ झालासी बीज ।
खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥
अर्थ
हरीची अंगकांती अतिशय सुंदर आहे आणि मुख व कपाळ अतिशय सुरेख आहे हरीच्या सर्वांगाला चंदनाची उटी लावली असून कपाळाला रेखीव असा कस्तुरीचा टिळा शोभून दिसत आहे. हरीच्या मस्तकावरील मुकूट आणि कानातील कुंडले अतिशय तेजोमय असून त्याचे तेज सर्वत्र फाकले आहे देवाचा ओष्टभाग आरक्त म्हणजे थोडासा लालसर आहे. दात हि-याप्रमाणे अगदी शोभून दिसत आहे. हे चतुर्भूज लावण्यतेज देवा तुम्ही आम्हाला या भवसमुद्रातून तारा मी तुमची आरती ओवाळीन. उदार असा हरी व झुंजार हरीचे श्रृती वर्णण करतात परंतू आम्हाला याचा अंत:पारच लागत नाही “नेती नेती” म्हणत श्रृती देखील मागे परतल्या आहेत. ब्रम्हदेव आपल्या चारही मुखाने हरीचे गुणानुवाद
अभंग क्र. ४०८८ (आरत्या)
सुकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।
झळकति दिव्य तेजे दंत माज पातळ । मिरविती मयुरपत्रे मुगुट कुंडले माळ ॥१॥
जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥धृपद॥
गोजिरे ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।
हृदयी ब्रम्हपद बाणले शृंगारी । गर्जति चरणी वांकी कंठ कोकिळस्वरी ॥२॥
घवघवित उटी अंगी बावन चंदनांची । लल्हाटी कस्तुरिचा कास पितांबरीची ।
कटिसूत्र वरी साजिरे प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाउले कुंकुमाची ॥३॥
सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सल विश्व लाविले ध्यानी ।
आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥
वर्णिता ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।
उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ती । तुकयाबंधु म्हणे स्तवू मी काय किती ॥५॥
अर्थ
हरीचे मुख सुकुमार असून कमळासारखे आहे हरीचे नीजस्वरुप अगदी निर्मळ आहे हरीचे शरीर सावळे, सुनीळ असून केस कुरळे आहेत. देवाचे दात अतिशय हि-यासारखे चमकत असून तेज दिव्य आहे देवाचे कमर पातळ आहे आणि मुकूटावर मोरपीस असून कानात मत्सयकुंडले आहेत व गळयात माळ अतिशय शोभून दिसत आहे. हे सर्वसुंदरा, जगदीश्वरा, रुक्माईवरा तुम्ही धन्य आहात मी माझ्या शरीराची कुरवंडी करुन तुमची आरती ओवाळीन. देवा तुझे चतुर्भूज आकृती ही अतिशय शोभून दिसत असून शंख, चक्र, पद्म, गदा व पावा तुझ्या हातामध्ये शोभून दिसत आहे. देवा तुमच्या ह्दयावर श्रीवत्सलांछन अतिशय साजिरे दिसत आहे तुम��
अभंग क्र. ४०८९ (आरत्या)
कनकाच्या परियेळी उजळूनि आरती । रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळू गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा । ध्रु. ॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानी कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहाता तेज फाकले ॥२॥
वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधे शोभत ॥३॥
सावळा सकुमार जैसा कर्दळीगाभाचा । चरणीची नेपुरे वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळिता मन हे उभे ठाकले ठायी । समदृष्टि समान तुकया लागला पायी ॥५॥
अर्थ
सोन्याच्या ताटामध्ये आम्ही ज्योती पेटवल्या आहेत व आरतीचे ताट तयार केले आहे त्या ज्योतींची प्रभा रत्नदीपाप्रमाणे आणि कशी प्रकाशीत झाली आहे ते पाहा या राही रुक्माबाई सत्यभामेच्या पतीला जो आतर बाह्य अतिशय साजिरा आहे त्याला ओवाळू चला. हरीचे चतुर्भूज रुप तसेच कानामध्ये दिव्य कुंडले हे साजिरे रुप अतिशय शोभून दिसत आहे हरीच्या आणि हरीच्या श्रीमुखाच्या शोभेचे तेज सगळीकडे पसरलेले दिसत आहे. सर्व श्रीमंत सर्वात ऐश्वर्यवान असलेला देव त्याच्या गळयामध्ये वैजयंती माळ अतिशय शोभून दिसत आहे तसेच शंख चक्र पद्म गदा ही आयुधेही त्याच्या हातामध्ये शोभत आहेत. हरीची काया ही सावळी सुकूमार आहे जणू केळीचा गाभाच आहे त्याच्या पायातील घाग-या वाळे पैंजण हे रुणझुण वाजत असून आकाशात गर्जत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्या हरीचे दोन्ही पावलेही समान आहेत ज्याची समदृष्टी आहे जो विटेवर उभा आहे त्या हरीची आरती ओवाळण्याकरता माझे मन स्थिर झाले आहे व मी त्याच्या पायी नमस्कार घातला आहे. ”
अभंग क्र. ४०९०
गाऊ नाचू विठो तुझा तुज करू अनुवाद । जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा झाला माझे मनी । देखिले लोचनी विटेसहित पाउले ॥धृपद॥
न करी तपसाधन मुक्तीचे सायास । हाचि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥
तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काई । पंढरीचा राणा साठविला हृदयी ॥३॥
अर्थ
हे विठोबा आम्ही तुझे नाम गाऊ त्याच छंदात नाचू आणि त्याचाच अनुवाद करु कारण जिकडे पाहावे तिकडे सर्वत्रच गोविंदाच मला दिसत आहे. हे विठोबा मी माझ्या डोळयाने तुझे विटेसहीत पाऊले पाहिले आहे त्यामुळे माझ्या मनाला आनंद झाला आहे. देवा मी तुझे नाम चिंतन करण्यावाचून कोणतेही तपसाधना करणार नाही सायुज्य मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी ही सायास करणार नाही जन्मोजन्मी हाच गोड भक्तीचा रस मला मिळावा असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता आम्हाला तुमच्या भक्तिप्रेमाचे काय उणे आहे कारण आम्ही पंढरीचा राणा म्हणजे राजा ह्दयात साठविला आहे. ”
अभंग क्र. ४०९१
धन्य दिवस आजि दर्शन संतांचे । नांदे तया घरी दैवत पंढरीचे ॥१॥
धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाही विचार ॥धृपद॥
धन्य पूर्व पुण्य वोढवले निरुते । संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते ॥२॥
तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी । संतांचे चरण आता जीवे न सोडी ॥३॥
अर्थ
आजचा दिवस खरंतर धन्य आहे कारण आज संतांचे दर्शन झाले आहे कारण पंढरीचे दैवत पांडुरंग संतांचे घरी नांदत आहे वास्तव्य करत आहे. संतांचा संसार कसा धन्य आणि पुण्य रूप झाला आहे त्याचा विचार पाहिला तर देव आणि भक्त हे दोन्ही वेगळे नाहीत च दोन्ही एक रुपच आहेत नाचे पूर्वपुण्य अतिशय धन्य आहे माझे भाग्य ही चांगले आहे म्हणावे लागेल कारण माझे पूर्ण पुण्या मुळेच आज मला फल प्राप्त झाले संतांचे दर्शन मला आज झाले. तुकाराम महाराज म्हणतात माझे भाग्य हे खूप धन्य आहे त्यामुळे हा लाभ आम्हाला प्राप्त झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या चरणांचे आज दर्शन झाले ते चरण आता मी माझ्या जीवा पासून वेगळे सोडणार नाही.
अभंग क्र. ४०९२ (प्रार्थना)
मागणे ते एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहे पांडुरंगा ॥१॥
या संतांसी निरवी हे मज देई । आणिक दुजे काही न मगे तुज ॥२॥
तुका म्हणे आता उदार तू होई । मज ठेवी पायी संताचिया ॥३॥
अर्थ
पांडुरंगा माझे एकच मागणे तुझ्याजवळ आहे आणि ते तुला देता आले तर पहा. देवा या संतांच्या हवाली मला कर त्यांच्या स्वाधीन कर यापेक्षा दुसरे काहीही मागणे मी तुला मागणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा आता तो उदार हो आणि मला दान दे या संतांच्या पायाजवळ मला कायम ठेव.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















