१८ नोव्हेंबर, दिवस ३२२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ८२६ ते ८५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३८५३ ते ३८६४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१८ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 18 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १८ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८५३ ते ३८६४ चे पारायण आपण करणार आहोत.
१८ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ८२६ ते ८५०,

826-18
जैसे बापे जोडिले लेका । वांटिले सूर्ये मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवका । स्वामी जैसे ॥826॥
ज्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो, अथवा स्वामी सेवकास भिन्नभिन्न व्यवहार सांगतो, 826
827-18
तैसी प्रकृतीच्या गुणी । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णी । चहू इही ॥827॥
त्याप्रमाणे, प्रकृतीचे जे गुण, त्यांनी कर्मांचा विस्तार करून त्यांची चार वर्णांचे ठिकाणी वाटणी केली; 827
828-18
तेथ सत्त्वे आपल्या आंगी । समीन-निमीन भागी । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥828॥
त्याठिकाणी सत्वगुणाने आपल्या सम विषम मार्गाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन वर्ण उत्पन्न केले; 828
829-18
आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविले वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥829॥
आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला; 829
830-18
ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥830॥
अशाप्रकारे हे प्रबुद्धा, एकरूपच असा प्राणीमात्रांचा गुणांनी चार प्रकारचा भेद केला आहे, असे समज. 830
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


831-18
मग आपुले ठेविले जैसे । आइतेचि दीपे दिसे । गुणभिन्न कर्म तैसे । शास्त्र दावी ॥831॥
मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे; 831
832-18
तेचि आता कोण कोण । वर्णविहिताचे लक्षण । हे सांगो ऐक श्रवण- । सौभाग्यनिधी ॥832॥
हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणती विहित कर्म तेच तुला आता सांगतो. ते ऐक. 832

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥18. 42॥
833-18
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हाती । बुद्धि आत्मया मिळे येकांती । प्रिया जैसी ॥833॥
(शम:) प्रिया ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकांती भेटते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते; 833
834-18
ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥834॥
आता जो बुद्धीचा लीनपणा, त्याला ‘ शम’ असे म्हणतात, तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याजपासून सर्व कर्मांचा आरंभ होतो. 83
835-18
आणि बाह्येंद्रियांचे धेंडे । पिटूनि विधीचेनि दंडे । नेदिजे अधर्माकडे । कहीचि जावो ॥835॥
(दम) आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही, 835


836-18
तो पै गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणे जे का ॥836॥
तो शमाला साह्यकर्ता असा दुसरा, ‘दम’ गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवितो. 836
837-18
सटवीचिये राती । न विसंबिजे जेवी वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्ती । वाहणे सदा ॥837॥
(तप:) जसे षष्ठीपूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाहीत, तसे सर्वकाळ चित्तांत ईश्वर स्वरूपाचा विचार करणे, 837
838-18
तया नाम तप । ते तिजया गुणाचे रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥838॥
त्याला ‘तप’ असे म्हणतात; आणि हा ब्राह्मण कर्माचा तिसरा गुण आहे. (शौचम्) आणखी शौच म्हणजे पवित्रपणा. हा निष्पाप असून दोन प्रकारचा आहे. 838
839-18
मन भावशुद्धी भरले । आंग क्रिया अळंकारिले । ऐसे सबाह्य जियाले । साजिरे जे का ॥839॥
मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे, तसा अंतर्बाह्य शुचिपणा भरलेला आहे. 839
840-18
तया नाम शौच पार्था । तो कर्मी गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जे साहाणे ॥840॥
त्याला पार्था, ‘शौच’ असे म्हणतात व तो ब्रह्म कर्मापैकी चौथा गुण होय. (क्षाती) आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे. 840
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


841-18
ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा । स्वरांमाजी सुहावा । पंचमु जैसा ॥841॥
त्याला अर्जुना, ‘क्षान्तिक्षमा’ असे म्हणतात सप्तस्वरात पंचमस्वर जसा अति मधुर आहेत असा ब्राह्मण कर्मातील हा पाचवा गुण होय. 8041
842-18
आणि वांकडेनी वोघेसी । गंगा वाहे उजूचि जैसी । का पुटी वळला ऊसी । गोडी जैसी ॥842॥
(आर्जवम्) आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला, तरी तो ज्याप्रमाणे सरळच आहे; किंवा उसाची पेरी जरी वाकडी असली, तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते, 842
843-18
तैसा विषमांही जीवां- । लागी उजुकारु बरवा । ते आर्जव गा साहावा । जेथीचा गुण ॥843॥
त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवावरही अत्यंत प्रीति असणे यास आर्जवम् असे म्हणतात; व हा ब्राह्मणकर्मापैकी सहावा गुण होय. 843
844-18
आणि पाणिये प्रयत्ने माळी । अखंड जचे झाडामुळी । परी ते आघवेचि फळी । जाणे जेवी ॥844॥
(ज्ञानम्) आणि -माळी कष्ट करून झाडाचे मुळास पाणी लावतो, त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात. 844
845-18
तैसे शास्त्राचारे तेणे । ईश्वरुचि येकु पावणे । हे फुडे जे का जाणणे । ते येथ ज्ञान ॥845॥
तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वरप्राप्तीच व्हायची हे ज्यांना समजते, ते ज्ञान होय. 845


846-818
ते गा कर्मी जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हे पाहे । एवंरूप ॥846॥
ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय; आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे. 846
847-18
तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रे का ध्यानबळे । ईश्वरतत्त्वीचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥847॥
(विज्ञान) तर शास्त्रविचाराने व ध्यानाचा अभ्यासाने ईश्वरस्वरूपी जी बुद्धी, सप्तशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते, 847
848-18
हे विज्ञान बरवे । गुणरत्न जेथ आठवे । आणि आस्तिक्य जाणावे । नववा गुण ॥848॥
तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मापैकी आठवे गुणरत्न होय. (आस्तिक्यम्) आणि आस्तिक्य नववा गुण असे समज. 848
849-18
पै राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । तेवी शास्त्रे स्वीकारिलिया । मार्गमात्राते ॥849॥
हे पहा, राजमुद्राकित मनुष्य कोणीही असला, तरी त्याची सर्व लोक सेवा करतात, त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत, 849
850-18
आदरे जे का मानणे । ते आस्तिक्य मी म्हणे । तो नववा गुण जेणे । कर्म ते साच ॥850॥
ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे, यालाआस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मणकर्मापैकी नववा गुण होय व याच गुणाने ब्राह्मणकर्म सर्व खरे होते. 850
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३२२ वा. १८, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८५३ ते ३८६४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३८५३ (बाळकोडेचेअभंग)
अवचिता त्यांनी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनिया यमुनेबाहेरी । पालवितो हरी गडियासि ॥२॥
गडियासि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशी ॥३॥
मजपाशी तुम्हा भय काय करी । जवळि या दुरी जाऊ नका ॥४॥
कानी आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहो ॥५॥
पाहो आले हरीजवळी सकळ । गोविंदे गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाई वरी घालितील माना । वोसरले स्तना क्षीर लोटे ॥७॥
लोटती सकळे एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळली ॥८॥
कुर्वाळली आनंदे घेती चारापाणी । तिही चक्रपाणी देखियेला ॥९॥
त्यांच पाशी होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यासि कृष्णे काया दिव्य दिली ॥११॥
दिले गोविंदे त्या पदा नाही नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
अर्थ
अवचित गोपाळांनी कालिया भुजंगाला वरती येताना पाहिले व बाऊ आला असे म्हणतच सर्वजण पळू लागले. खरे तर हरीनेच कालिया नागाला वरती आणले व आपल्या सवंगड्यांना हरी तेथे आपल्या जवळ बोलू लागला होता. आपल्या सवंगड्यांना कृष्ण म्हणत होता की, “सर्वानी माझ्याजवळ यावे. अरे माझ्याजवळ आल्यानंतर तुम्हाला भय देखील काय करणार आहे त्यामुळे माझ्यापासून दूर जाऊ नका जवळ तुम्ही यावे. ” गोविंदाचे बोल कानावर पडले त्यावेळी गोपाळ म्हणू लागले की, “नेमके नवल तरी काय घडले चला आपण तेथे जाऊन पाहू या. ” ज्यावेळी सर्व गोपाळ जवळ जाऊन पाहू लागले त्यावेळी कृष्णाने सर्व गोपाळांना आलिंगन दिले व सर्व गाईंना चोंबाळू लागला. कृष्णाने गाईंना चोंबाळले, गाईंनी देखील कृष्णाच्या गळयात माना टाकल्या व गाईंन�
Sdm:
अभंग क्र. ३८५५ (बाळकोडेचेअभंग)
जननी हे म्हणे आहा काय झाले । शरीर रक्षिले काय काजे ॥१॥
काय काज आता हरीविण जिणे । नित्य दुःख कोणे सोसावे हे ॥२॥
हे दुःख न सरे हरी न भेटे तो । त्यामागेचि जातो एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखते मी आता । तरी जीवापरता न करिते ॥४॥
करिता हे मात हरीचे चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
अर्थ
यशोदा म्हणू लागली की, “माझा कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला हे किती वाईट झाले मी माझे शरीर का जतन केले असेल ? आता हरीवाचून जगण्यात काय अर्थ आहे नित्य हे दु:ख कोण सोसत रहावे ? यशोदा पुढे म्हणू लागली की, “माझा हरी मला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत माझे दु:ख संपणार नाही त्यापेक्षा त्याच्या मागेच गेलेले बरे. मी हरीला एकवेळा जरी पाहिले तरी त्याला आता यापुढे मी माझ्या जीवापेक्षा वेगळा करणारच नाही. ” तुकाराम महाराज म्हणतात, “यशोदा माता हरीचे चिंतन करत असताना तिला शुभ शकुन होऊ लागले. ”
Sdm:
अभंग क्र. ३८५६ (बाळकोडेचेअभंग)
शुभ मात तिही आणिली गोपाळी । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढे हरुषे मात ॥२॥
हरुषली माता केले निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥
गोपाळा भोवते मिळाले गोकुळ । अवघी सकळ लहान थोरे ॥४॥
थोर सुख झाले ते काळी आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥
आले वरी बैसोनिया नारायण । काळया नाथून वहन केले ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदे । लावूनिया वाद्ये नाना घोष ॥७॥
नारायणापुढे गोपाळ चालती । आनंदे नाचती गाती गीत ॥८॥
तव तो देखिला वैकुंठीचा पती । लोटांगणी येती सकळही ॥९॥
सकळही एका भावे आळिंगिले । अवघिया झाले अवघे हरी ॥१०॥
हरी आळींगुनीहरीरूप झाली । आप विसरली आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिले देवे । मायबापा भावे लोकपाळा ॥१२॥
मायबाप देवा नाही लोकपाळ । सारखी सकळ तुका म्हणे ॥१३॥
अर्थ
वनमाळी कृष्णाने यमुनेच्या डोहातून चेंडू वर आणला आहे व तोही वरती आला आहे अशी शुभ वार्ता गोपाळांनी गोकुळात आणली. आपल्या दारापुढे कोणती आनंदाची गुढी आली आहे हे जाणून घेण्यासाठी यशोदा पुढे आली व तिने विचारले कोणती आनंदाची बातमी आहे ती मला तरी सांगा तेव्हा गोपाळ यशोदेला पुढे सांगू लागले, की “कृष्ण्‍ यमुनेच्या डोहातून चेंडू घेऊन वरती आला आहे. ” त्यावेळी यशोदा मातेला खूप आनंद झाला तिने गोपाळांवरुन लिंब लोण उतरुन टाकले. त्या गोपाळाजवळ सर्व गोकुळ जमा झाले अगदी लहान मोठे सर्व गोकुळ त्यांच्याभोवती जमा झाले. त्यावेळी सर्वाना खूप आनंद झाला सगळे सुखी झाले सर्व एकमेकांना सांगू लागले की, “गोविंद यमुनेच्या डोहातून वरती आला. नारा�
Sdm:
अभंग क्र. ३८५७ (बाळकोडेचेअभंग)
नेणे वर्ण धर्म जी आली सामोरी । अवघीच हरी आळिंगिली ॥१॥
हरी लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥
पारणे तयांचे झाले एक वेळे । देखिले सावळे परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदे लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरी ॥४॥
घरोघरी सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारी ॥५॥
दारी वृंदावने तुळसीची बने । रामकृष्णगाणे नारायण ॥६॥
नारायण तिही पूजिला बहुती । नाना पुष्पयाती करूनिया ॥७॥
यांचे ॠण नाही फिटले मागील । पुढे भांडवल जोडिती ही ॥८॥
ही नव्हती कधी या देवा वेगळी । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥
सेवाॠणे तुका म्हणे रूप धरी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥
अर्थ
यमुनेच्या डोहातून वर आल्यानंतर हरीला भेटण्यासाठी आलिंगन देण्यासाठी जी लोक हरीसमोर आले त्यांच्या वर्णाचा व धर्माचा काही विचार न करता सारख्याच भावनेने हरीने सर्वाना आलिंगन दिले. नंद, यशोदा सर्व लोकासोबत हरी गोकुळ नगरात आले. सावळे परब्रम्ह पाहून सर्वाच्या डोळयांचे पारणे फिटले. ब्रम्हानंदाच्या छंदामध्ये सर्व लोक नाचत होते व घरोघरी आनंदाच्या गुढ्या उभारत होते. घरोघरी सुख सोहळा व आनंद साजरा करण्यात येत होता प्रत्येकाच्या दारात, प्रत्येक चौकामध्ये विविध प्रकारच्या रांगोळया काढण्यात आल्या होत्या. दारोदारी तुळशीची वृंदावने व सर्वत्र तुळशीची रोपे लावण्यात आली होती व प्रत्येकजण रामकृष्ण नारायण असे गाणे गात होता. खूप प्रमाणात फुले आणून नाना प्रकारची फुले आणून नारायणाची त्यांनी पूजा केली. त्यांचे मागचे देवावरील असलेले ऋण कुठे फिटले नाही तोच त्यांनी पुढेही सेवारुपी
Sdm:
अभंग क्र. ३८५८ (बाळकोडेचेअभंग)
नारायण आले निजमंदिरासि । जावया लोकासि बहुडविले ॥१॥
बहुडविले बहु केले समाधान । विसरु हा क्षण नका माझा ॥२॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केले दंडवत सकळांनी ॥३॥
सकळा भातुके वांटिल्या साखरा । आपुलाल्या घरा लोक गेले ॥४॥
लोक गेले कामा गाईपे गोपाळ । वारली सकळ लोभासाठी ॥५॥
लोभ दावुनिया आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥
आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥
अर्थ
यमुनेच्या डोहातून वरती आल्यांनतर कृष्णाला सर्व लोकांनी घरी आणले नारायण ही घरी आला व सर्व लोकांना त्याने आपल्या घरी पाठवून दिले. मला एक क्षणभर देखील विसरु नका असे म्हणून कृष्णाने सर्वाचे समाधान केले व ज्याला त्याला आपल्या घरी पाठवून दिले. डोहात पडल्यापासून डोहात वरती निघेपर्यंत घडलेला सर्व प्रकार कृष्णाने लोकांना सांगितला त्यावेळी सर्व लोकांनी कृष्णाला दंडवत केले. सर्व लोकांना प्रसाद म्हणून प्रेमरुपी खाऊ म्हणून साखर वाटली मग सर्व लोक आपआपल्या घरी निघून गेले. जो तो आपआपल्या कामासाठी आपआपल्या घरी गेला गाई वासराजवळ गेली गोपाळ गाई वळण्यासाठी गेले व अशा प्रकारे लोभासाठी देवाने आपल्यापासून सर्वाना दूर केले. देव सर्वाना धन, दार, आशा, पुत्र या सर्वाचा लोभ दाखवून विसर पाडत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे सर्व लोभ, आशा, इच्छा, अपेक्षेने बांधले गेले आहेत मग ते लोक नारायणाला कशा प्रकारे जाणू शकतील ? ”
Sdm:
अभंग क्र. ३८५९ (बाळकोडेचेअभंग)
झाला कवतुक करिता रोकडे । आणीक ही पुढे नारायण ॥१॥
येउनिया पुढे धरिला मारग । हरावया भाग इंद्रायाजी ॥२॥
इंद्रा दही दुध तूप नेता लोणी । घेतले हिरोनि वाटे त्यांचे ॥३॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरे नव्हे ॥४॥
नव्हे तेचि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥
अर्थ
अशा प्रकारे नारायणाने कालिया दमनाचे एक कोड कौतुक करुन पुढे अनेक प्रकारच्या लीला केल्या आहेत. इंद्राला भोग देऊन इंद्रयाग करण्याची खूप दिवसापासून गोकुळवाशीयांची प्रथा होती, इंद्र मेघांच्या द्वारा वर्षाव करुन धन धान्य पिकवतो अशी लोकांची समज होती, लोक इंद्राला अनेक प्रकारचे धन धान्य घेऊन जाताना कृष्णाने त्यांचा मार्ग अडवला व इंद्राला अर्पण करण्याचा जो धान्याचा भाग (वाटा) होता तो हरण करण्यास सुरवात केली. इंद्राला दही, दूध, तूप, लोणी नेत असतानाच वाटेतच कृष्णाने ते सर्व हिरावून घेतले. सर्वाकडून दह्या, दुधाच्या कावड्या देवाने हिरावून घेतल्या त्यावेळी लोक म्हणू लागले, “अरे कृष्णा असे करणे हे बरे नव्हे. ” तुकाराम महाराज म्हणतात, “जे कोणीही करु शकत नव्हते तो कृष्ण्‍ करत होता तो कधीही कळी काळाला भीत नव्हता अशा प्रकारचे विविध लीला तो गोकुळात खेळत होता. ”
Sdm:
अभंग क्र. ३८६० (बाळकोडेचेअभंग)
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तया भेऊ नका ॥१॥
नका धरू भय धाक काही मनी । बोले चक्रपाणि गौळियासि ॥२॥
गौळियासि धीर नाही या वचने । आशंकितमने वेडावली ॥३॥
वेडावली त्यास न कळता माव । देवाआदिदेव नोळखता ॥४॥
नोळखता दुःखे वाहाती शिरी । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥
अर्थ
ज्यावेळी इंद्राला अर्पण करण्यासाठी धान्य, दही, दूध, तूप, लोणी गोकुळवासी नेत होते त्यावेळी कृष्णाने ते सर्व त्यांच्याकडून हिरावून घेतले व सांगितले की, “तुम्ही त्याला काहीही अर्पण करु नका” त्यावेळी कृष्णाला गोकुळवाशी म्हणाले की, “कृष्णा तुझा हा खेळ चांगला नाही बर का, जर इंद्र आपल्यावर कोपला तर चांगले होणार नाही” त्यावेळी देव त्यांना म्हणाला की, “इंद्राला तुम्ही भिऊ नका. ” गोकुळवाशीयांना चक्रपाणी म्हणतात की, “तुम्ही इंद्राचा कुठल्याही कोणत्याही प्रकारचा धाक किंवा भय मनामध्ये बाळगू नका तो आपल्याला काहीही देत नाही आपल्याला जे काही मिळते ते गोवर्धन पर्वताच्या माध्यमातूनच मिळते तुम्ही शेतात चांगले कष्ट करतात त्यामुळे शेतात तुम्हाला धान्य मिळते गोवर्धन पर्वतावर गवत उगते म्हणून गाई ते गवत खातात व दूध देतात आणि गोवर्धन पर्वतावरच नद्यांचा उगम होतो त्याच नद्यांचे सुर्यकिरणाव्दारे ढग तयार होऊन पाऊस पडते त्यामुळे इंद्राला काहीही देण्याची गरज नाही. ” परंतु गवळयांना कृष्णाच्या बोलण्यावर काही विश्वास बसेना आणि एवढे मोठे धैर्य करण्याचेही त्यांना जमेना आशंकित होऊन त्यांचे मन वेडावले होते. कृष्ण्‍ देवाचा देव आहे हे त्यांना ओळखता आले नाही केवळ मायेचा पडदा �
Sdm:
अभंग क्र. ३८६१ (बाळकोडेचेअभंग)
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असता अंगसंगे ॥१॥
अंगसंगे तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोही । जयाची हे नाही बुद्धी स्थिर ॥३॥
बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥४॥
लोभिका न साहे देवाचे करणे । तुका म्हणे तेणे दुःखी होती ॥५॥
अर्थ
नेहमी आपल्या अंगसंगतीत राहणारा कृष्ण देव आहे, हे संसाराचा आणि ज्ञानाचा भार वाहणारा लोक ओळखत नाही. आपल्या अंगसंगतीत साक्षात देव आहे हे त्यांना कळत नव्हते आणि जरी कृष्णाने काही अद्भूत लीला केल्या तरी त्यावेळी कृष्ण्‍ देव आहे असे जरी समजले किंवा वाटले तरी पण त्यांच्या मनामध्ये संदेह, संशय येत होता. ज्यांची बुध्दी स्थिर नाही ते चिंतेच्या डोहात पडतात. जे लोक आशाबध्द आहेत, लोभी आहेत त्यांची बुध्दी नारायण कधीही स्थिर राहू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की, “लोभी मनुष्याला देवाचे कोणतेही करणे सहन होत नाही त्यामुळे त्यांना दु:ख होते. ”
Sdm:
अभंग क्र. ३८६२ (बाळकोडेचेअभंग)
दुःखी होती लोभे करावे ते काई । उडतील गाई म्हैसी आता ॥१॥
आणीकही काही होईल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितले ॥२॥
सांगो चला याच्या मायबापापाशी । निघाले घरासि देवा रागे ॥३॥
रागे काला देता न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियासि ॥४॥
क्रोध देवावरी धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥
अर्थ
इंद्रयाग करायचा नाही असे कृष्णाने सांगितल्यानंतर गोकुळातील सर्व लोभी लोक दु:खी झाले आता काय करावे जर आपण इंद्रयाग केला नाही तर इंद्र आपले गाई, म्हशी उडवून टाकेल. यापेक्षा अजूनही कोणते तरी वेगळे संकट आपल्यावर येईल या धीटाला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी याला समजतच नाही. सर्व गोपाळ कृष्णावर रागावले आणि म्हणाले “चला आपण याच्या मायबापालाच सांगू. ” गोकुळवाशीया कडुन हिसकाउन घेतलेले दूध, तूप, लोणी त्याचा कृष्णाने काला केला आणि तो गोकुळवाशीयांना देण्यास गेला तर तो काला गोपाळवाशीयांनी घेतला नाही परंतु गोपाळांनी व कृष्णाने तो काला खाल्ला व सारे गोपाळ क्रोधित झालेल्या गोकुळवाशीयांकडे पाहून त्यांना टोकवित होते. तुकाराम महाराज म्हणतात, “ते लोक देवावर रागावले त्यामुळे त्यांना काल्याचा भाग मिळाला नाही. ”
Sdm:
अभंग क्र. ३८६४ (बाळकोडेचेअभंग)
जाणवले इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिने मेघा आज्ञा करी राव । गोकुळीचा ठाव उरो नेदा ॥२॥
नेदाविया गाई म्हसी वांचो लोक । पुरावे सकळिक सिळाधारी ॥३॥
धाक नाही माझा गौळिया पोरा । सकळिक मारा म्हणे मेघा ॥४॥
म्हणविती देव आपणा तोवरी । नाही जव वरी कोपलो मी ॥५॥
मीपणे हा देव न कळेचि त्यासी । अभिमानी राखी गर्वाचिया ॥६॥
अभिमानराशी जयाचिये ठायी । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
अर्थ
आपला इंद्रयाग कृष्णाने बंद केला आणि गोपाळ आपल्याकडे पाहून वाकुल्या दाखवतात हे इंद्राला समजले. अगदी तातडीने इंद्राने मेघदेवाला आज्ञा केली की, “इतकी वृष्टी गोकुळावर करा की, गोकुळाजवळ एक सुध्दा अवशेष ठेवू नका. ” शिळया दारांचा वापर करा गोकुळातील गाई, म्हशी आणि लोकांना कोणालाही वाचू देऊ नका अरे या गवळयाच्या पोरांना माझा धाक राहिला नाही सर्वाना मारु टाका असा इंद्रदेव मेघाला म्हणत होता. जोपर्यंत मी कोपत नाही तोपर्यंत तो कृष्ण्‍ स्वत:ला देव म्हणून घेतो. ज्याजवळ मीपणा आहे, अभिमान आहे, गर्वाच्या राशी आहे तोपर्यंत देव त्या लोकांना कळणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “पुढे इंद्र म्हणतो की, ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्याला देव कळणारच नाही तसेच इंद्राच्या ठिकाणीही अभिमान निर्माण झाला व त्यालाही श्रीकृष्ण्‍ देव आहे हे समजले नाही आणि ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्याच्यापासून देव दूरच आहे. ”

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading