आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

५ डिसेंबर, दिवस ३३९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२३१ ते १२५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४०५७ ते ४०६८
“५ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 5 December
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ५ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
५ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२३१ ते १२५०,
1231-18
वारा आभाळचि फेडी । वाचूनि सूर्याते न घडी । का हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥1231॥
माझी प्राप्ति म्हणजे असा प्रकार असतो. वारा फक्त सूर्याच्या आड असलेले ढग दूर लोटतो, सूर्य काही नवा आणीत नाही; किंवा हाताने पाण्यावरील फक्त गोंडाळ दूर केली जाते; पाणी पहिलेच असते. 31
1232-18
तैसा आत्मदर्शनी आडळु । असे अविद्येचा जो मळु । तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशे स्वये ॥1232॥
त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा पडदा मध्ये असतो, तेवढाच शास्त्र दूर करितें; त्याचे आत मी असंग, स्वप्रकाश, नित्य आहेच. त्याचे दर्शन सहज होतें; 32
1233-18
म्हणौनि आघवीचि शास्त्रे । अविद्याविनाशाची पात्रे । वाचोनि न होती स्वतंत्रे । आत्मबोधी ॥1233॥
म्हणून, सर्व शास्त्रांची मर्यादा अगर कामगिरी अविद्येचा नाश करणे येथ वरच आहे; त्यांच्यात स्वतःसिद्ध आत्मबोध (साक्षात्) करून देण्याचे सामर्थ्य नाही. 33
1234-18
तया अध्यात्मशास्त्रांसी । जै साचपणाची ये पुसी । तै येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥1234॥
अध्यात्मविषयावरील जी इतर शास्त्रे त्यास, त्यांच्या विधानाच्या सत्यत्वाला प्रमाण काय असे विचारले तर, ती प्रमाण म्हणून ज्याच्याकडे बोट करितात ते हे गीताशास्त्र होय. (येवढी ह्याची थोरवी आहे. ) 34
1235-18
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया । तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथे शास्त्रे ॥1235॥
सूर्य उदयाने. पूर्वदिशा अलंकृत करितो खरी, पण, लगेच इतर सर्व दिशा सतेज होतात, तसे सर्व अध्यात्मशास्त्रांचा राजा अशी ही गीता तिच्यावर शास्त्राचे सर्व सनाथत्व अगर सौभाग्य अवलंबून आहे. 35
1236-18
हे असो येणे शास्त्रेश्वरे । मागा उपाय बहुवे विस्तारे । सांगितला जैसा करे । घेवो ये आत्मा ॥1236॥
हे असो; ह्या गीताशास्त्रेश्वराने मागे पुष्कळ विस्तारपूर्वक आत्म-प्राप्तीचा उपाय सांगितला आहे की ज्यायोगे तळहातावरील वस्तूप्रमाणे आत्मदर्शन व्हावे. 36
1237-18
परी प्रथमश्रवणासवे । अर्जुना विपाये हे फावे । हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥1237॥
पण प्रथम श्रवणा- बरोबर अर्जुनाच्या चित्तांत ते आरूढ होईल न होईल अशी देवांनी कळकळ बाळगून 37
1238-18
तेचि प्रमेय एक वेळ । शिष्यी होआवया अढळ । सांगतसे मुकुल । मुद्रा आता ॥1238॥
तोच अर्थ अगर तेच प्रमेय शिष्याच्या चित्तांत ठसावे म्हणून पुन्हा स्पष्ट करून कथन केले. 38
1239-18
आणि प्रसंगे गीता । ठावोही हा संपता । म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥1239॥
आणि गीताग्रंथाच्या समाप्तीचाही प्रसंग असल्यामुळे गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय एकच आहे हे तिच्या उपक्रमाच्या व उपसंहाराच्या एकार्थत्वाने दाखवितात. 39
1240-18
जे ग्रंथाच्या मध्यभागी । नाना अधिकारप्रसंगी । निरूपण अनेगी । सिद्धांती केले ॥1240॥
ग्रंथाच्या मधील अध्यायात अधिकार भेदाने भिन्न भिन्न सिद्धान्त सांगितले आहेत. 1240
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1241-18
तरी तेतुलेही सिद्धांत । इये शास्त्री प्रस्तुत । हे पूर्वापर नेणत । कोण्ही जै मानी ॥1241॥
त्यामुळे ह्या गीताशास्त्रांत अनेक सिद्धान्त सांगितले आहेत असे पूर्वापर संबंध न जर जाणणाराला वाटेल तर- 41
1242-18
तै महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका । भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥1242॥
मुख्य सिद्धान्ताच्या पोटात अनेक उपसिद्धान्त त्याची कक्षा म्हणून सांगावे लागतात, हे या उपसिद्धांताची मुख्य सिद्धान्तापाशी जुळणी करून दाखवून आरंभिलेली गीता, देव संपुर्ण करितात. 42
1243-18
एथ अविद्यानाशु हे स्थळ । तेणे मोक्षोपादान फळ । या दोही केवळ । साधन ज्ञान ॥1243॥
अविद्येचा नाश करून त्यायोगे आत्मरूप मोक्षफल जीवांच्या पदरात पाडणे व ह्या दोन्ही गोष्टीचे साधन म्हणजे केवळ यथार्थ आत्मज्ञान हेच होय, हे जीवांस पटविणे हाच गीतेचा महासिद्धान्त होय. 43
1244-18
हे इतुलेचि नानापरी । निरूपिले ग्रंथविस्तारी । ते आता दोही अक्षरी । अनुवादावे ॥1244॥
हे इतकेच सांगण्यासाठी, प्रसंगतः ग्रंथांत कर्म उपासनादि विस्तार करून सांगितले; पण त्या मुख्य सिद्धान्ताचा थोडक्यात अनुवाद करावा ह्या हेतूने 44
1245-18
म्हणौनि उपेयही हाती । जालया उपायस्थिती । देव प्रवर्तले ते पुढती । येणेचि भावे ॥1245॥
म्हणून उपेय म्हणजे ज्याच्यासाठी उपाय करावे ते फल प्राप्त झाले असतांही त्याचे उपाय सांगण्यात देव पुन्हा प्रवृत्त झाले. 45
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥18. 56॥
1246-18
मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा । मी होऊनी होय पैठा । माझ्या रूपी ॥1246॥
देव म्हणतात, अर्जुना, असा तो क्रमयोगी निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपात रहातो. 46
1247-18
स्वकर्माच्या चोखौळी । मज पूजा करूनि भली । तेणे प्रसादे आकळी । ज्ञाननिष्ठेते ॥1247॥
स्वकर्माचरणरूप पुष्पांनी माझे पूजन करून त्यायोगे होणाऱ्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो 47
1248-18
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिया भजन समरसे । सुखिया होय ॥1248॥
ती ज्ञाननिष्ठा ज्याने हस्तगत केली तेथे माझी भक्ति उत्कर्ष पावते व तिच्या भजनांत समरस होऊन तो सुखी होतो. 48
1249-18
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया । अनुसरे जो करूनिया । सर्वत्रता हे ॥1249॥
आणि सर्व विश्वाला प्रकाशित करणारा असा जो मी, त्याचा आत्मा त्याला तो सर्वथैव अनुसरतो. 49
1250-18
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ । का हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमी ॥1250॥
आपले काठिण्य सोडून मीठ जसा जलाचा आश्रय करिते किंवा सर्व दिशांत संचार करून वायु जसा आकाशाचे पोटात शान्त होतो. 1250
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३३९ वा. ५, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०५७ ते ४०६८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ४०५७
चांगले नाम गोमटे रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥१॥
शस्त्र हे निर्वाणीचा बाण । निकट समयो अवसान । कोठे योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतने ॥धृपद॥
सकळ श्रेष्ठांचे हे मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावे शरणागत । आहे उचित एवढेचि ॥२॥
म्हणोनि रुसलो संसारा । सर्प हा विखार पांढरा । तुजशी अंतर रे दातारा । याचि दावेदारानिमित्त ॥३॥
येणे मज भोगविल्या खाणी । नसता छंद लाविला मनी । माजलो मी माझे भ्रमणी । जाली बोडणी विटंबना ॥४॥
पावलो केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड । आता केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥
अर्थ
हरीचे नाम आणि रुप हे चांगले व गोड आहे हरीचे रुप डोळयाने पाहिले की डोळे शांत होतात व सर्व त्रिविधतापाचा नाश होतो. विठ्ठल विठ्ठल हा जप अतिशय प्रगट म्हणजे उघड असून सोपा आणि अतिशय सारभूत आहे. विठ्ठल नाम हे शस्त्र असून हा बाण ज्यावेळी आपला अंत:काळ जवळ येईल त्यावेळी याचा वापर करावा. विठ्ठल नामाच्या पुढे सर्वश्रेष्ठ असलेले गोदान, भूमीदान, सुवर्णदानिक आणि अशा प्रकारचे दहा दान यांची किंमत देखील काय करता येईल, नारायणाचे चिंतन केले असता नारायण दु:खाचे खंडन करतो. सर्वश्रेष्ठ जेष्ठ धा-यांचे हेच मत आहे नारायण आपण केलेल्या संकल्पापर्यंत आपल्याला पोहोचवितो. म्हणून त्याला शरण जावे हेच उचित आहे. म्हणूनच तर मी संसारावर रुसलो आहे संसार हा पांढरा विषारी सर्प आहे. हे दातारा या संसारातील द्रव्यदारांमुळे म्हणजे देहसंबंधी सर्वामुळेच तुझ्यापासून मी अंतरलो आहे. खरे तर यानेच मला अनेक योनीमध्ये भोग भोगव��
26/12/22, 10:38 Sdm:
अभंग क्र. ४०५८
तुझिया पार नाही गुणा । माझी अल्प मति नारायणा । भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायापाशी ॥१॥
काय जाणावे म्या दीने । तुझिये भक्तीची लक्षणे । धड ते तोंड धोऊ नेणे । परि चिंतने काळ सारी ॥धृपद॥
न लवी आणीक काही पिसे । माझिया मना वाया जाय ऐसे । चालवी आपुल्या प्रकाशे । हाती सरिसे धरोनिया ॥२॥
तुज समर्पीली काया । जीवे भावे पंढरीराया । सांभाळी समविषम डाया । करी छाया कृपेची ॥३॥
चतुर तरी चतुरा रावो । जाणता तरी जीवाचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । आरुष भाव परि माझा ॥४॥
होते ते माझे भांडवल । पायापे निवेदिले बोल । आदरा ऐसे पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तू जाणसी ॥५॥
अर्थ
हे नारायणा तुझ्या गुणाना अंत:पार नाही माझी बुध्दी अल्प आहे. हे सर्व जाणणा-या देवा तुम्ही सर्व भवसमुद्रातून तारणारे आहात त्यामुळे माझी एक विनंती तुमच्या पायापाशी आहे. मी दीनाने गरीबाने तुझ्या भक्तीची लक्षणे काय जाणावेत ? देवा मला तर धड तोंड धुण्याचे देखील कळत नाही परंतू तुझ्या चिंतनामध्ये मी माझा सर्व काळ घालवीत आहे. देवा वायाला जाईल असे वेड तू माझ्या मनाला लावू नकोस केवळ माझ्या मनाला तुझ्या भक्तीचेच वेड लाव. माझ्या मनाला देखील तुझ्या स्वस्वरुपाच्या प्रकाशातच त्याच्या हाताला धरुन चालव. हे पंढरीराया मी जीवाभावाने तुला माझे शरीर अर्पण केले आहे. देवा चांगल्या आणि वाईट विचारांपासून त्यांच्या धक्क्यापासून मला सांभाळ आणि तुझ्या कृपेची छाया माझ्यावर सतत ठेव. देवा तू खूप चतुर आहेस परंतू सर्व चतुरांचाही तू राजा आहेस ज्ञानी आहेस परंतू सर्व जीवाचाही जीव आहेस. देवा त
26/12/22, 10:38 Sdm:
अभंग क्र. ४०५९
का हो माझा मानियेला भार । ऐसा तव दिसतसे फार । अनंत पावविली उद्धार । नव्हेचि थार मज शेवटी ॥१॥
पाप बळिवंत गाढे । तुजही राहो शकते पुढे । मागील काही राहिले ओढे । नवल कोडे देखियेले ॥२॥
काय मानिती संतजन । तुमचे हीनत्व वचन । की वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥
अर्थ
आता न करावी चोरी । बहुत न धरावे दुरी । पडदा काय घरच्या घरी । धरिले दुरी तेव्हा धरिले ॥४॥ @
नको चाळवू अनंता । कासया होतोसि नेणता । काय तू नाही धरीत सत्ता । तुका म्हणे आता होई प्रगट ॥५॥
26/12/22, 10:39 Sdm:
अभंग क्र. ४०६०
तुळसीमाळा घालुनी कंठी । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटी पंढरीये ॥१॥
भुक्तीमुक्ती जयाच्या कामारी । रिद्धीसिद्धी वोळंगती द्वारी । सुदर्शन घरटी करी । काळ कापे दुरी धाके तया ॥२॥
जगज्जननी असे वाम भागी । भीमकी शोभली अर्धांगी । जैसी विद्युल्लता झमके मेघी । दरुषणे भंगी महा दोष ॥३॥
सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळा गोधना छंदु । पक्षीश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पावा छंदे ॥४॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तकाजा लवलाही ॥५॥
अर्थ
तुळशीची माळ कंठात म्हणजे गळयात घालून जगजेठी विठोबा पुंडलिकाकडे आपली दृष्टी लावून त्याला पाहातो जगजेठी भीमा नदीच्या तटी पंढरी क्षेत्रात विटेवर उभा आहे भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे चारही मुक्ती ज्याच्याकडे काम करणा-या दासी आहेत आणि रिध्दी सिध्दी ज्याच्या व्दारात लोटांगण घेत काम करण्यास सज्ज आहेत, आणि ज्याच्या नगराच्या भोवती सुदर्शन पहारा देत फिरत आहे त्याच्या धाकाने कळीकाळ देखील थरथर कापत असून दूर पळून जात आहे. अश्या देवाच्या डाव्या बाजूला जग्जननी रखुमाई अर्धांगिनी म्हणून शोभून दिसत आहे. वीज चमकल्यावर जशी विद्युल्लता म्हणजे प्रकाश पडतो झळकतो त्याप्रमाणे रुक्मीणी देवी दिसत आहे आणि तिच्या दर्शनाने महादोषाचा देखील भंग म्हणजे नाश होतो. असा हा देव सुखाचा समुद्र असून परम आनंद देणारा आहे त्याने गोप गोपीका व गोधनांना आपल्या वेणूचा छंद लावलेला आहे. या हरीने गोविंदाने आपल्या वेणूच्या छंदात पक्षी श्वापद यांना देखील वेध लावला आहे. तुक��
26/12/22, 10:39 Sdm:
अभंग क्र. ४०६१
हातीचे न संडावे देवे । शरण आलो जीवे भावे । आपुले ऐसे म्हणावे । करितो जीवे निंबलोण ॥१॥
बैसता संतांचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्ती दृढ झाला ॥धृपद॥
येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचे कोड । कनिष्ठी रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥
मरती मेली नेणो किती । हाचि लाभ तयांचे संगती । म्हणोनि येतो काकुलती । धीर तोचित्ती दृढ द्यावा ॥३॥
सुखे निंदोत हे जन । न करी तयांशी वचन । आदिपिता तू नारायण । जोडी चरण तुमचे ते ॥४॥
आपले आपण न करू हित । करू हे प्रमाण संचित । तरी मी नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हासती ॥५॥
अर्थ
देवा मी तुम्हाला अगदी जीवभावाने शरण आलो त्यामुळे मला तुम्ही दूर करु नका. देवा मी तुमचा आहे असे तुम्ही म्हणा मी तुमच्यावरुन माझा जीव ओवाळून टाकीन. हे कमळापती लक्ष्मीपते मी संतांच्या संगतीत जेव्हा बसलो त्यावेळी मला असे कळून आले, आपले या संसारामध्ये कोणीही आपले नाही आणि हाच निश्चय माझ्या चित्तामध्ये दृढ झाला आहे. प्रपंचाचे कौतुक दाखवून हे सर्व तुझ्या भजनाच्या आड येतात. कनिष्ठ गोष्टींमध्ये रुची ठेवून गोडी त्याविषयी धरतात आणि त्यामुळेच हे सर्व लोक फसले जातात मी हे माझ्या डोळयाने प्रत्यक्ष पाहात असून या लोकांची फजिती कशामुळे होत आहे हे देखील मला चांगल्या प्रकारेच कळत आहे. कितीतरी लोक मरतील कितीतरी लोक मेले आहेत आणि असंगाची संगती केली तर मला देखील तोच लाभ होईल. त्यामुळेच मी तुम्हाला काकूलती येत आहे आणि तुमच्या भजनाविषयी माझ्या चित्तामध्ये दृढता निर्माण होऊन माझ्या मनाला तुमच्या भजनाचे धैर
26/12/22, 10:40 Sdm:
अभंग क्र. ४०६२
आता येणे बळे पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहाता न कळे जयाचा अंत । तोचि हृदयात घालू आता ॥१॥
विसरोनि आपुला देहपणभाव । नामेचि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ ठाव । लागावया पाव संतांचे ॥२॥
बरे वर्म आले आमुचिया हाता । हिंडावे धुंडावे न लगता । होय अविनाश सहकारी दाता । चतुर्भुज सत्ता परि धाके ॥३॥
होय आवडी साना थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तीप्रिय लोभापर । करी आदर याचकपणे ॥४॥
ते वर्म आले आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालो संता । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आता जीवे भावे ॥५॥
अर्थ
आता पंढरीनाथ भावभक्तीच्या बळाने जवळच तिष्ठत उभा राहिला आहे. ज्याचा अंत:पार पाहण्यास गेले तर अंत:पार ज्याचा लागत नाही त्यालाच आपण आपल्या ह्दयात आता घालू. आम्ही आमचा देहभाव विसरून देहाचा अहंकार विसरुन गेलो आहोत आणि नामाच्या बळावर पंढरीरायाला आम्ही बोलाविला आहे. आता आम्ही संतांच्या पायाजवळ गेलो आहोत संत त्यांच्या पायाजवळ कोणीही साधक आला तर त्याच्या जात व कुळाचा कधीही विचार करत नाहीत. संतांच्या पायाचा आश्रय घेतला त्यामुळे भक्तीचे वर्म चांगले आहे व ते आमच्या हाती लागले आहे आणि हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी आता आम्हाला कोठेही हिंडावे लागणार नाही किंवा काहीही धुंडावे लागणार नाही. असा हा अविनाशी परमात्मा दाता आमचा साहाय्यकारी आहे तो जरी चतूर्भुज आहे तरी त्याच्यावर भक्तांचा मोठा धाक आहे. हरी हा भक्तांच्या आवडीनुसार लहान मोठा होतो सुंदर मनोहर रुपे देखील धारण करत असतो. हरीला भक्ती अतिशय प्रिय असून भक्तीवर त्याचा फार लोभ आहे भक्तांकडे तो याचक होऊन जातो आ
26/12/22, 10:41 Sdm:
अभंग क्र. ४०६३
आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हा जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे ॥१॥
उसने फेडिता धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनी भूषण । वाया थोर पण जनामध्ये ॥धृपद॥
अन्न जरी न मिळे तयासी देणे । अंगातुक पात्र उचित दान । उपकार तरी धन्वंतरीपणे । जरी देणे घेणे नाही आशा ॥२॥
शूर तो तयासी बोलीजे जाणा । पाठीसी घालूनी राखे दिना । पार पुण्या त्या नाही भूषणा । एक नारायणा वचन हे ॥३॥
आता पुढे बोलणे ते काही । मज तारिसील तरीच सही । वचन आपुले सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ॥४॥
अर्थ
हे पाडूरंगा तुम्हाला एक गोष्ट मला एकातात सांगायची आहे ती तुम्ही ऐका. आम्हाला जर आमचे संचित तारीत असेल तर त्यामध्ये तुझे महत्व तरी काय आहे ? उसने घेतले आणि ते पुन्हा फेडले तर त्यामध्ये धर्म आला तरी कसा आणि लोकांना हे मान्य होईल काय ? व्यर्थ लोकांमध्ये आपले भूषण आपले मोठेपण का मिरवावे ? ज्याला अन्नच मिळत नाही आणि एखादा आगंतुक याचक आपल्या दारात जर आला तर त्याला दान देणे हे उचित आहे. रोग्याला बरे करण्यासाठी वैदयाने कोणत्याही प्रकारची देण्याघेण्याची आशा न करता सत्पात्री औषधाचे दान करावे तरच ते परोपकार घडेल. जो दीनजनांना आपल्या पाठीशी घालून त्यांचे रक्षण करतो त्यालाच शूर म्हणावे हे तुम्ही जाणून घ्यावे. त्याच्या पुण्याला आणि त्याच्या भूषणाला म्हणजे मोठेपणाला पारावारच नाही म्हणजे अंत:पारच नाही हे नारायणा हे माझे शब्द तुम्ही ऐकावे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता यापुढे काय बोलावे जेव्हा तू मला तारशील तेव्हाच खरे. देवा ज्यावेळी तू आपले पतितपावन हे ब्रीद स�
26/12/22, 10:42 Sdm:
अभंग क्र. ४०६४
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचेचि नाम । दयाळु तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊ नेदी ॥१॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणाचीच रासी । जाणता तयासी तोचि एक ॥धृपद॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळी गोवळा । लाघवी अबळाभुलवणा ॥२॥
गांढया तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशी रत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥
खेळतो येणेचि खेळावा । नट तो येणेचि आवगावा । लपोनि जीवी न कळे जीवा । धरिता देवा नातुडेसी ॥४॥
उंच तरी बहुतचि उंच । नीच तरी बहुतचि नीच । तुका म्हणे बोलिलो साच । नाही अहाच पूजा केली ॥५॥
अर्थ
हा देव इतका चांगला आहे की तो पूर्ण काम आहे जर काही गोड असेल तर केवळ याचेच नाम आहे. दयाळू हा धर्म सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ आहे आणि देव हा अतिशय दयाळू असून तो खूप चांगला आहे तो आपल्या भक्तांना कधीही त्रास होऊ देत नाही आपल्या दासांना तो कधीही श्रम होऊ देत नाही. देवाला श्रीमंत आणि उदार म्हणावा तर लक्ष्मी त्याची पत्नी आहे आणि झुंजार व शूर म्हणावे तर कळीकाळ देखील त्याला थरथर कापतात चतुर म्हणावे तर देव सर्व गुणाची रासच आहे. आणि त्याला जाणावे असे म्हटले तर तो कोणालाही जाणत नसून तो स्वत:लाच जाणत आहे. हा हरी इतका पुरातन आहे की तो सर्वाच्या पूर्वीच्या आधीचा आहे. त्याची लीला कोणालाही कळत नाही. हा देव सर्व जाणता असून देखील लहान नेणता बालक होऊन गवळयांची गुरे राखीत आहे आणि आपली लीला दाखवून सर्व गोपीकांना हा देव भूलवित आहे. या हरीवर ज्याचा खरा भक्तिभाव असून त्याचे जे कुणी अंकित आहेत त्यांच्यापुढे हा देव इतका भ
26/12/22, 10:42 Sdm:
अभंग क्र. ४०६५
काय आम्ही भक्ती करणे कैसी । काय एक वाहावे तुम्हासी । अवघा भरोनि उरलासी । वाणी खाणी रसी रूपगंधी ॥१॥
कसे करू इंद्रिया बंधन । पुण्यपापाचे खंडण । काय व्रत करू आचरण । काय तुजविण उरले ते ॥२॥
काय डोळे झाकुनिया पाहू । मंत्रजप काय ध्याऊ । कवणे ठायी धरूनि भाव । काय ते वाव तुजविण ॥३॥
काय हिंडो कवण दिशा । कवणे ठायी पाय ठेवू कैसा । काय तू नव्हेसि न कळे ऐसा । काय मी कैसा पाहो आता ॥४॥
तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । वाहु पुष्पाजुळ तुका म्हणे ॥५॥
अर्थ
हे देवा आम्ही तुमची भक्ती काय आणि कशी करावी, काय म्हणून आम्ही तुम्हासी वाहावे ? कारण तुम्ही सर्वत्र भरुन उरला आहात सर्वाच्या वाणीमध्ये, अनेक खाणीमध्ये, रसामध्ये, रुपामध्ये, गंधामध्ये तुम्हीच आहात. इंद्रियांना आम्ही बंधन कसे करावे पाप व पुण्याचे खंडन कसे करावे ? तुझ्यावाचून काय व कोणते व्रताचरण करु तुझ्यावाचून येथे काय उरले आहे ? डोळे झाकून काय पाहावे मंत्र जप करुन कशाचे ध्यान करावे ? देवा अरे तुझ्यावाचून कोणतीही जागा मोकळी नाही मग कोणत्या ठिकाणी मी माझा भक्तिभाव धरुन राहू ? मी कोणत्या दिशेला व कसा हिंडू तू तर सर्वत्र आहे मग मी कोणत्या ठिकाणी कसा पाय ठेवू ? हे देवा तू न कळण्यासारखा आहेस की काय मग मी तुला कशा प्रकाराने पाहावे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझी भुजा तुझ्या नामाचीच अर्चन, मंत्र, माळ, धूप, दीप, नैवेदय, फळ, तांबुल, पुष्पाजुल आम्ही तुला वाहू. ”
26/12/22, 10:43 Sdm:
अभंग क्र. ४०६६
शरीर दुःखाचे कोठार । शरीर रोगाचे भांडार । शरीर दुर्गंधीची थार । नाही अपवित्र शरीरा ऐसे ॥१॥
शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचे घोंसुले । शरीरे साध्य होय केले । शरीरे साधले परब्रम्ह ॥धृपद॥
शरीर विटाळाचे अळे । मायामोहपाशजाळे । पतन शरीराच्या मुळे । शरीर काळे व्यापिले ॥२॥
शरीर सकळ हे शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरे तुटे भवबंध । वसे मध्यभागी देव शरीरा ॥३॥
शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा राधा । शरीरी वसे बहुत बाधा । नाही गुण सुदा एक शरीरी ॥४॥
शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावे सुख न करी त्याग । शरीर वोखटे ना चांग । तुका म्हणे वेग करी हरीभजनी ॥५॥
अर्थ
शरीर दु:खाचे कोठार आहे शरीर रोगाचे भांडार आहे. शरीर हे दुर्गंध साठवण्याची जागाच आहे शरीरा सारखे अपवित्र असे दुसरे काहीही नाही. याच मनुष्य शरीरामध्ये जर परमार्थ केला तर शरीर अतिशय उत्तम व चांगले आहे शरीर सुखाचे घडच आहे. शरीराने जर साध्य केले तर सर्व काही प्राप्त होते तसेच याच शरीराने परब्रम्ह देखील आपल्याला साधला जाऊ शकतो. शरीर हे स्त्रीच्या विटाळाच्या अळयापासून बनलेले असून माया व मोहपाशाचे जाळेच आहे. शरीराच्यामुळे आपण अधोगतीला जाऊ शकतो आणि शरीर हे काळेने व्यापलेले आहे शरीर हे सर्वात शुध्द आहे व परमार्थाचा ठेवाही आहे. शरीराच्या मध्यभागी देवाची वस्ती असून शरीराच्या मदतीने भवबंधाचा पाश तुटला जातो. शरीर अविद्येचा बांधा असून शरीर अवगुणाचा कालाच आहे. शरीरामध्ये अनेक प्रकारच्या बाधा आहेत त्यामध्ये एक सुध्दा चांगले गुण नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “शरीराला विविध प्रकारचे भो�
26/12/22, 10:43 Sdm:
अभंग क्र. ४०६७
इतुले करी भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरी । वर्ते वेव्हारी सुखरूप ॥१॥
न करी दंभाचा सायास । शांती राहे बहुवस । जिव्हे सेवी सुगंधरस । न करी आळस रामनामी ॥२॥
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करी संतांचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधी सुखास न पवसी ॥४॥
धरूनि विश्वास करी धीर । करिता देव हाचि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाही अंतर तुका म्हणे ॥५॥
अर्थ
अरे तुम्ही वर्तन करत असताना एवढे चांगले वर्तन करा की परद्रव्य आणि परनारी यांच्याविषयी, तुमच्या अंत:करणातून इच्छा टाकून दया मग सुखाने व्यवहारामध्ये वर्तन करा. दंभाने वागण्याचा प्रयत्न कष्ट करु नका पुष्कळ शांत स्थितीने राहा. तुमच्या जिव्हेने तुम्ही रामनामाचा सुगंधरस सेवन करा त्याविषयी तुम्ही आळस करु नका. सर्व जनमाणसांचा तू मित्र हो वाचेने अशुभ बोलू नको. दुर्जनांची संगती करु नकोस संतांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न कर. देवावाचून कोणतीही दुसरी इच्छा जर तू केलीस तर तुझी निराशा होईल. जर तू हावेने, अपेक्षेने तुझी तृष्णा वाढविली तर तुला कधीही सुख प्राप्त होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “तू हरीवर विश्वास ठेव आणि धैर्य धर आणि जे काही होत आहे ते सर्व देवच करत आहे असा निर्धार मनात कर. या नियमाप्रमाणे जे कोणी वागतील त्यांच्या योगक्षेमाचा भार देव वाहील त्यामध्ये कोणतेही अंतर देव पडू देणार नाही. ”
26/12/22, 10:44 Sdm:
अभंग क्र. ४०६८
संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे उल्लंघिता पार । बहुत वाहाविले दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म जाला फेरा । गणित नाही जी दातारा । पडिलो आवर्ती भोंवरा । बहु थोरा वोळसिया ॥धृपद॥
वाढलो परी नेणती बुद्धी । नाही परतली धरिली शुद्धी । मग म्या विचारावे कधी । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥
अनेक खाणी आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथे ॥३॥
ऐसी उल्लंघूनि आलो स्थळे । बहु भोवंडिलो काळे । आता हे उगवावे जाळे । उजेडावे बळे दिवसाच्या ॥४॥
सांडो या संसाराची वाट । बहु येणे भोगविले कष्ट । दावी सत्य ऐसे नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही ॥५॥
अर्थ
संसारसमुद्र हा अतिशय दु:स्तर म्हणजे कठीण आहे. या भवनदीच्या पलीकडे जो पार जाण्याचा प्रयत्न करतो त्याला तो पार होत नाही. या संसारसमुद्रामध्ये आतापर्यंत कितीतरी लोक दूरपर्यंत वाहात गेले परंतू त्यांना पैलतीराला पोहोचता आले नाही. हे दातारा आजपर्यंत जन्ममरणाच्या किती फे-या झाल्या आहेत याचे गणितच नाही. मी आतापर्यंत कितीतरी जन्ममृत्यूच्या फे-यामध्ये पडू गरगर फिरलो आहे. मी देहाने तर वाढलो परंतू माझी बुध्दी अजूनही वाढली नाही कारण तिने अजूनही परमार्थाकडे जाण्याची शुध्दी धरली नाही. मनुष्य देहाची सुवर्णसंधी सोडून मी परमार्थाविषयी विचार मग केव्हा करावा ? कित्येकही योनीमध्ये गेले तरी आहार, निद्रा, भय, मैथुन यांचाच तेथे ठिकाणा आहे. बालत्व, तारुण्य आणि वृध्दावस्था हे कोणत्याही योनीत गेले तरी प्रमुख भोग आहेत. अशा प्रकारचे मी अनेक स्थळे उल्लंघन करीत येथपर्यंत आलो आहे काळा
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















