३० मार्च, दिवस ८९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १०५७ ते १०६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३० मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३० March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३० मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १०५७ ते १०६८ चे पारायण आपण करणार आहोत.


३० मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १७६ ते २००


176-8

जे ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही.
177-8
पाहे पा तरंग तरी होत जात । परि तेथ उदक ते अखंड असत । तेवी भूताभावी नाशिवंत । अविनाश जे ॥177॥
पहा की, उदकावर तरंग येतात व जातात, परंतु उदक हे कायमच असते. त्याप्रमाणे, भुते नाहीतशी झाली असता अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही.
178-8
ना तरी आटतिये अळंकारी । नाटते कनक असे जयापरी । तेवी मरतिये जीवाकारी । अमर जे आहे ॥178॥
किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मृत्यु पावणाऱ्या शरीरांत जे अमर आहे,

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥8. 21॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्या ।
यस्यातःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥8. 22॥

179-8
जयाते अव्यक्त म्हणो ये कोडे । म्हणता स्तुति हे ऐसे नावडे । जे मनबुद्धी न सापडे । म्हणऊनिया ॥179॥
ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता त्याची स्तुति केली असे वाटत नाही, कारण जे मन व बुद्धि यांना सापडत नाही,
180-8
आणि आकारा आलिया जयाचे । निराकारपण न वचे । आकारलोपे न विसंचे । नित्यता गा ॥180॥
जे आकाराला आले असताही ज्याचे निराकारपण जात नाही, व आकाराचा नाश झाला असता ज्याची नित्यता बिघडत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-8
म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेवीचि म्हणता बोधुही उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नामपरमगति ॥181॥
म्हणून ज्याला ‘ अक्षर’ म्हणतात, त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही,
182-8
परि आघवा इही देहपुरी । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारू करवी ना करी । म्हणऊनिया ॥182॥
आणि याचेच नाव परमगति. परंतु ते या शरीरांत व्यापून राहीलेले असुन निजल्याप्रमाणे आहे. का की, ते व्यापार करवीत नाही व करीतही नाही.
183-8
एऱ्हवी जे शारीरचेष्टा । त्यामाजी एकही न ठके गा सुभटा । दाही इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाति ॥183॥
हे महावीरा अर्जुना, येरव्ही शरीराच्या सर्व व्यापारांत एकही व्यापार रहात नाही; दहाही इंद्रियांचे व्यापार चालूच आहेत.
184-8
उकलू विषयांचा पेटा । होता मनाचा चोहटा । तो सुखदुःखाचा राजवाटा । भीतराहि पावे ॥184॥
विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर, त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा अंतर्यामीही प्राप्त होतो.
185-8
परि रावो पहुडलिया सुखे । जैसा देशीचा व्यापारू न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखे । करितचि असती ॥185॥
परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार रहात नाहीत, प्रजा आपापल्या (प्राप्तीच्या) इच्छेने व्यापार करीतच असते,


186-8
तैसे बुद्धीचे हन जाणणे । का मनाचे घेणे देणे । इंद्रियांचे करणे । स्फुरण वायूचे ॥186॥
त्याप्रमाणे, बुद्धिचे जाणणे किंवा मनाचे देणेघेणे, इंद्रियांचे करणे, व प्राणवायूंचे स्फुरण पावणे हे सर्व
187-8
हे देहक्रिया आघवी । न करिता होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥187॥
सर्व देहव्यापार त्याने न करविता आपोआपच होतात, ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रय चालते,
188-8
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरी । म्हणोनि पुरूषु गा अवधारी । म्हणिपे जयाते ॥188॥
त्याप्रमाणे, अर्जुना, तो शरीरांत स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असे समज;
189-8
आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रते । येणेही कारणे जयाते । पुरूषु म्हणो ये ॥189॥
आणि मायारूप पतिव्रतेच्या एकपत्नीव्रतांत पडल्यामुळे हा पुरुष हे नांव पावला आहे.
190-8
पै वेदाचे बहुवसपण । देखेचिना जयाचे आंगण । हे गगनाचे पांघरूण । होय देखा ॥190॥
परंतु वेदाच्या ज्ञानदृष्टीच्या महत्वाला ज्याचे आंगणही दृष्टीस पडत नाहीं, व ज्याच्यात आकाशाचा समावेश झाला आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-8
ऐसे जाणूनि योगीश्वर । जयाते म्हणती परात्पर । जे अनन्यगतीचे घर । गिंवसीत ये ॥१९१॥
असे जाणूनच योगिजन त्याला परात्पर म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो.
192-8
जे तनू वाचा चित्ते । नाइकती दुजिये गोष्टीते । तया एकनिष्ठेचे पिकते । सुक्षेत्र जे ॥१९२॥
जो एकनिष्ठ भक्त कायावाचामनेकरून दुसरे काही जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय.
193-8
हे त्रैलोक्यचि पुरूषोत्तम । ऐसा साच जयाचा मनोधर्मु । तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा ॥१९३॥
हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवद्रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे, त्या भक्ताचा हा आश्रमच होय.
194-8
जे निगर्वाचे गौरव । जे निर्गुणाची जाणीव । जे सुखाची राणीव । निराशासी ॥१९४॥
जे निरभिमान्यांचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान व जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान (राज्य),
195-8
जे संतोषिया वाढिले ताट । जे अचिंता अनाथाचे मायपोट । भक्ती उजू वाट । जया गावा ॥१९५॥
जे संतोषी जनाचे जेवण, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायपोट व जे भक्तीने चालणाराला मोक्षरूपी गावाची सरळ वाट.


196-8
हे एकैक सांगोनि वाया । काय फार करू धनंजया । पै गेलिया जया ठाया । तो ठावोचि होइजे ॥१९६॥
धनंजया, असे एकेक सांगून उगीच किती वर्णन करू ? परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रूपतेला पावतो.
197-8
हिंवाचिया झुळुका । जैसे हिंवचि पडे उष्णोदका । का समोर हालिया अर्का । तमचि प्रकाशु ॥१९७॥
थंडीच्या झुळकेने जसे ऊन पाणी थंड होते किंवा सूर्य समोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो
198-8
तैसा संसारू जया गावा । गेला सांता पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ॥१९८॥
त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान व त्याचे कार्य जग ज्या गावाला गेले असता आपणच मोक्ष होऊन रहाते.
199-8
तरी अग्नीमाजी आले । जैसे इंधनचि अग्नि जहाले । पाठी न निवडेचि काही केले । काष्ठपण ॥१९९॥
तसेच इंधन विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते व मागून निवडू गेले असता त्याचे लाकूडपण दृष्टीस पडत नाही;
200-8
ना तरी साखरेचा माघौता । बुध्दिमंतपणेही करिता । परि ऊस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥२००॥
किंवा, पंडुसुता, ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुनः चातुर्याने तिचा ऊस करिता येत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ८९ वा, ३०, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०५७ ते १०६८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग – १०५७
करी हे चि काम । मना जपे राम राम ॥१॥
लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
अर्थ

हे मना तू सदासर्वकाळ राम राम असा जप करण्याचे काम कर. मना तुला गोविंद गोविंद म्हणणे हा छंद लागू दे. तुकाराम महाराज म्हणतात मना माझ्या सारख्या गरिबाला तू एवढीच भीक घाल की माझे मन हरिनाम जप करेल.
अभंग – १०५८
आपुलिया लाजा । धावे भक्तंचिया काजा ॥१॥
नाम धरिले दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥धृपद॥
आघात निवारी । छाया पीतांबरे करी ॥२॥
उभा कर कटी । तुका म्हणे याजसाठी ॥३॥
अर्थ
हा देव आपली लज्जारक्षण करण्याकरिता लगेच धावत येतो कारण या देवाने दीनानाथ हे नांव धारण केलेले आहे आणि त्याने भक्तांचे रक्षण करण्याचे व्रत घेतले आहे व ते व्रत खरे करून दाखविण्याकरिता त्याला त्याच्या नावाप्रमाणे वागावे लागते. हा देव भक्तांवर येणाऱ्या आघात त्याचे निवारण करतो आणि त्याच्या पीतांबरा ची शीतल छाया भक्तांवर सदासर्वकाळ राखतो. तुकाराम महाराज म्हणतात हा देव त्याचे दीनानाथ हे नांव खरे करण्यासाठी कमरेवर हात ठेवून सदासर्वकाळ उभा आहे.
अभंग – १०५९
साधावया भक्तीकाज । नाही लाज हा धरीत ॥१॥
ऐसियासी शरण जावे । शक्ती जीवे न वंची ॥धृपद॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीले ॥२॥
तुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरियेला ॥३॥
अर्थ

आपल्या भक्तांची काम करण्यासाठी हा देव कोणत्याही प्रकारचे लाज धरत नाही. तो आपल्या भक्तांचे कार्य करण्याकरिता आपल्या शक्तीची कोणत्याही प्रकारे वंचना करत नाही. अशा विठ्ठलाला शरण जावे. या हरीने युद्धामध्ये भीष्माची प्रतिज्ञाही खरी केली आणि अर्जुनाचे रक्षणही केले. तुकाराम महाराज म्हणतात याचा साक्षी मी आहे त्यामुळे मी हरीला माझ्या चित्तात धारण करीत आहे.
अभंग – १०६०
धेनु चरे वनांतरी । चित्त बाळकापे घरी ॥१॥
तैसे करी वो माझे आई । ठाव देऊनि राखे पायी ॥धृपद॥
न काढिता तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥
तुका म्हणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥
अर्थ

व्यालेली गाय दूर रानात गेली तरी तिचे चित्त घरी आपल्या वासराकडे लागलेले असते. अगदी त्याप्रमाणे हे विठाबाई तुझे चित्त जरी सृष्टीची घडामोडी करण्याकडे असले तरीदेखील माझ्यावरही तुझे चित्त असू दे आणि मला तुझ्या पायात ठिकाणी आश्रय द्यावे. जसे पाण्यातून मासा बाहेर काढला की तो मासा तर फड करतो त्याप्रमाणे देवा तू माझे जीवन आहे आणि त्या जीवनातून मी वेगळा झालो की माझा जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या जीवाला, प्राणाला आणि देहाला तुझीच आवड आहे आणि जर माझ्या जीवाला तुझी प्राप्ती होत नसेल तर मला याची मुळीच गरज नाही.
अभंग – १०६१
हरीजनाची कोणा न घडावी निंदा । साहात गोविंदा नाही त्याचे ॥१॥
रूपा येऊनिया धरी अवतार । भक्ता अभयंकर खळा कष्ट ॥धृपद॥
दुर्वास हा छळो आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥
द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केले ॥३॥
न साहे चि बब्रु पांडवा पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥४॥
तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रा ॥५॥
अर्थ

हरीभक्तांची कोणीही निंदा करु नये कोणाकडूनही त्याची निंदा घडू नये आणि जर तसे झालेच तर ते गोविंदाला सहनच होत नाही. हा गोविंद भक्तांकरता अवतार धारण करतो आणि भक्तांना अभय देतो आणि दुष्टांना कष्ट देतो भय देतो. दुर्वास ऋषी अंबर ऋषींना छळण्याकरता आले पण हे भगवंताला सहन झाले नाही त्या हरीने आपले सुदर्शन त्यांच्या पाठीशी लावले व ते सुदर्शन त्यांना पीडा देत फिरु लागले. कौरवांनी भरसभेत द्रौपदीचा अपमान केला त्यामुळे या श्रीपती भगवानाला ते सहन झाले नाही ते रागावले व त्यांनी पांडवांना साहाय्य करुन या कौरवांची मदनशांती केली. ब्रभू हा पांडवाचा शत्रू होता ते हरीला सहन झाले नाही आणि आपल्या मोठया बंधूचे म्हणजे बलरामदादाचे दुर्योधनावर प्रेम होते असे असले तरी युध्दाच्या काळी हरीने बलरामदादाला योजना करुन तीर्थयात्रेस पाठवले व कौरवाचा नाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, “अश्वत्थाम्याने गुपचूप हल्ला करुन पांडवांच्या पाचही पुत्रांचा वध केला त्यामुळे या भगवंताने त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरील मणी काढून त्याच्या सर्व अंगाला दुर्गंध येईल असे केले. ”
अभंग – १०६२
ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि ॥१॥
जपे हरीनाम बीज । तोचि वर्णांमाजी द्विज ॥२॥
तुका म्हणे वर्ण धर्म । अवघे आहे सम ब्रम्ह ॥३॥
अर्थ

ज्याला हरिनामाची आवड आहे तोच एक पवित्र आहे. जो मनुष्य वेदाचे बीज हरिनाम सदासर्वकाळ जपतो तो चारी वर्णा मध्ये खरा ब्राम्‍हण होय. तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रकारची वर्णधर्म हे समान असून एक ब्रम्‍हच आहे.
अभंग – १०६३
विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गाता गीती ॥१॥
आम्हा विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥धृपद॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥२॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ॥३॥
अर्थ

हे विठ्ठलाचे मला नाम माझ्या हृदयात साठवून ठेवायला आणि त्याचे गीत गाण्यात खूप आवडते गोड वाटते. हे जीवन म्हणजे विठ्ठलच आहे. टाळ-चिपळ्या खरेतर हेच आमचे धन आहे आमच्या वाणीने विठ्ठल विठ्ठला म्हणणे हेच आमचे अमृत संजीवनी आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्वांग हे विठ्ठलाच्या रंगात रंगून गेले आहे.
अभंग – १०६४
अभंग नाही टाका तपासा
अर्थ नाही टाका तपासा
अभंग – १०६५
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥धृपद॥
नाही विठ्ठल जया ठावा । तो ही डोळा न पाहावा ॥२॥
तुका म्हणे नाही । त्याची भीड मज काही ॥३॥
अर्थ

जो विठ्ठलाला ब्रम्‍ह मानत नाही त्याचे कोणतेही बोल ऐकू नयेत. मग तो कोणीही एक असो एवढेच काय तो ब्रम्‍हदेव जरी असला तरीही त्याचे कोणीही ऐकु नये. ज्याला विठ्ठलच माहित नाही त्याचे डोळ्याने दर्शनही घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी विठ्ठलाला मानत नाही ज्याला कोणाला विठ्ठलाचे ज्ञान नाही मग तो कोणीही असो मला त्याची भीड नाही.
अभंग – १०६६
एक पाहातसा एकाची दहने । सावध त्या गुणे का रे न व्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अट्टाहासे । जव काळाऐसे जाले नाही ॥धृपद॥
मरणांची तव गांठोडी पदरी । जिणे तोचि वरी माप भरी ॥२॥
तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आले मग हालो नेदी ॥३॥
अर्थ

हे लोकांनो तुम्ही एखाद्या माणसाचे स्मशानात दहन झालेले पाहता मग त्या योगाने तुम्ही सावध का बरे होत नाहीत ? जोपर्यंत तुम्ही काळाच्या आधीन झालेले नाहीत तोपर्यंत तुम्ही भय पूर्वक आक्रोश पूर्वक त्या देवाला हाका मारा. जेव्हा तुम्ही जन्मता तेव्हा तुम्ही तुमच्या पदरात मरणाची गाठोडे घेऊन येता. मनुष्य जगणे हे तोपर्यंत असते जोपर्यंत त्याच्या आयुष्याचे माप भरलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक परमार्थ करण्यासाठी परमार्थाच्या मागे लागत नाही त्यांच्या जीवनाचा धिक्कार असो कारण मरणाचे मार्ग सारखे चालूच आहेत आणि त्या काळाच्या मनात आले तर तो आपल्याकडे आला तर तो आपल्या अंगाला हलु देणार नाही.
अभंग – १०६७
संतांसी तो नाही सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥
म्हणऊनि तया न वजावे ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥धृपद॥
भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥
तुका म्हणे जया संकोच दर्शने । तया ठाया जाणे अनुचित ॥३॥
अर्थ
संतांना आपल्या सन्मानाची आवड मुळीच नसते परंतु असे असले तरी देखील संत आपल्याकडे आल्यानंतर जो त्यांचा अपमान करतो त्यांचे वाटोळे होते. त्यामुळे संतांनी आपला अपमान जेथे होते तेथेच जाऊच नाही. जे त्यांचा अपमान करतात ते लोक दुर्बळ असतात व त्यांच्या पापामुळे त्यांचा घात होतो. ज्यांच्या ठिकाणी भक्ती भाव नसतो त्यांनाच संता विषयी शंका निर्माण होते. ती चूक संतांना मान-सन्मान योग्य वेळेत न देणे यामुळेच होत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना संत दर्शनाने संकोच निर्माण होतो त्या ठिकाणी संतांनी जाणे अयोग्य असते.
अभंग – १०६८
संसारसंगे परमार्थ जोडे । ऐसे काय घडे जाणतेनो ॥१॥
हेंडग्याच्या आळा अवघी चिपाडे । काय तेथे गोडे निवडावी ॥धृपद॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊ पाहे ॥२॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटी विचार त्या ॥३॥
अर्थ

हे लोक हो अहो संसाराची संगती केली म्हणजे परमार्थ मध्ये लाभ होणे शक्य आहे काय ? जनावराने चघळुन टाकलेली चिपाटे त्यामध्ये चांगल्या प्रकारची वैरण असते काय आणि आपल्याला ती निवडता येईल काय ? ढेकुन असलेल्या बाजेवर सुखाची झोप येईल काय आणि तशी कल्पना करून बोलणे देखील मूर्खपणाचे ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात मद्य सेवन केल्यानंतर मनुष्य आपल्या देखील ढुंगणाची लंगोटि सोडून देण्यास भीत नाही इतकी ती मद्य बुद्धी भ्रष्ट करते आणि कोणी जरी चांगले विचार त्या मनुष्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते चांगले विचार सांगणाऱ्या लोकांना दुष्ट समजतात.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading