१८ मार्च, दिवस ७७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ९१३ ते ९२४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१८ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १८ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १८ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९१३ ते ९२४ चे पारायण आपण करणार आहोत.


१८ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी ७६ ते १००,

76-7
उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥76॥
उदय आणि अस्त यांच्या लोंढ्यांनी जन्ममरणांचे धोंडे पडुन त्या ठिकाणी पंचमहाभुतात्मक शरीररुप बुडबुडे उत्पन्न होतात व लय पावतात.
77-7
सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याची आविषे । तेथ देव्हडे भोवत वळसे । अज्ञानाचे ॥77॥
जिच्यात मोह व भ्रांती हे मासे धैर्यरूप मांस गिळून टाकतात; त्या ठिकाणी अज्ञानरूपी मोठे भोवरे भोवती फिरत असतात;
78-7
भ्रांतीचेनि खडुळे । रेवले आस्थेचे अवगाळे । रजोगुणाचेनि खळाळे । स्वर्गु गाजे ॥78॥
भ्रांतिरूप गढूळ पाण्याने आस्थारूप गाळांत रुतून तमोरुपी खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते;
79-7
तमाचे धारसे वाड । सत्त्वाचे स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥79॥
(असा हा) तमोरुपी प्रवाह तरुन जाण्यास अवघड आहे; (येथे) सत्वरुपी स्थिर पाण्याचा मोठा डोह आहे; किंबहुना ही मायानदी दुस्तर आहे.
80-7
पै पुनरावृत्तीचेनि उभडे । झळंबती सत्यलोकीचे हुडे । घाये गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥80॥
खरोखर हीमधील जन्ममृत्युच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात, आणि ब्रह्मांडगोलाचे धोंडे तेव्हाच गडबडत जातात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


81-7
तया पाणियाचेनि वहिलेपणे । अझुनी न धरती वोभाणे । ऐसा मायापूर हा कवणे । तरिजेल गा ॥81॥
त्या पुराच्या प्रवाहात अजुन कोणाचे पाय लागत नाहीत ! अरे, असा हा मायापूर कोणाच्याने तरून जाववेल
82-7
येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय ते ऐक ॥82॥
आणखी येथे एक मोठेच नवल आहे; ही नदी तरून जाण्याला जे जे उपाय करावे, ते ते अपायकारकच होतात !
83-7
एक स्वयंबुद्धीचा बाही । रिगाले तयांची शुद्धीचि नाही । एक जाणिवेचा डोही । गर्वेचि गिळिले ॥83॥
कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर (हीमधून तरून जावे म्हणून) हिजमध्ये उडी टाकली, त्यांचा पत्ताच नाही; कोणाला ज्ञानरुपी डोहांत गर्वाने पार गिळून टाकले;
84-7
एकी वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाचा तोंडी । सगळेचि गेले ॥84॥
कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिच्याखाली मीपनाचे धोंडे बांधून या मायारुप नदीतुन तरून जाण्यास निघाले. ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच नाहीतसे झाले,
85-7
एकी वयसेचे जाड बांधले । मग मन्मथाचिये कासे लागले । ते विषयमगरी सांडिले । चघळूनिया ॥85॥
कोणी तारुण्याच्या बळाने कमर कसुन मदनाच्या कासेला लागले, तो त्यांना विषयरूप सुसरीनेच चघळुन टाकिले.


86-7
आता वृद्धाप्याचिया तरंगा- । माजी मतिभ्रंशाचा जरंगा । तेणे कवळिजताति पै गा । चहूकडे ॥86 ।
मग ते वार्धक्यरुप लाटांमध्ये तरंगत जात असता मतिभ्रंशरूप जाळ्यात सांपडतात, व त्यायोगे चहुकडून जखडले जाऊन शोकरूप कड्यावर आदळतात,
87-7
आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाचा आवर्ती दाटत । आपदागिधी चुंबिजत । उधवला ठायी ॥87॥
पुढे क्रोधरूपी भोंवऱ्यात सांपडले असता कोठे वर डोके करावयास लागले, की आपत्तिरूप गिधाडे त्यास टोचटोचुन खाऊ लागतात;
88-7
मग दु:खाचेनि बरबटे बोंबले । पाठी मरणाचे रेवे रेवले । ऐसे कामाचिये कासे लागले । ते गेले वाया ॥88॥
आणि मग ते दुःखरूप चिखलात फसुन मरणरूप वाळुंत रुतले जातात ! अशाप्रकारे जे विषयाच्या मागे लागले ते फुकट जातात. (त्यांचे जिणे व्यर्थ होते)
89-7
एकी यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटी । ते स्वर्गसुखाचा कपाटी । शिरकोनि ठेले ॥89॥
कोणी यज्ञादिक क्रियारुपी पेटी बांधूंन पोटाखाली घेतात; ते स्वर्गसुखरूपी कपारींत अडकुन राहतात.
90-7
एकी मोक्षी लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरवसा । परी ते पडिले वळसा । विधिनिषेधांचा ॥90॥
कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरुप बाहुबलावर भरवसा ठेवतात; परंतु कर्तव्याकर्तव्यांच्या वळणात पडतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-7
जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा नलगे । वरी काही तरो ये योगे । तरी विपाये तो ॥91॥
त्या नदीमध्ये वैराग्यरूप नाव चालत नाही, व विवेकरूप काठी टेकत नाही. तथापि योगाने तरता येईल. परंतु असे क्वचित् घडून येते.
92-7
ऐसे जीवाचिये आंगवणे । इये मायानदीचे उतरणे । हे कासयासारिखे बोलणे । म्हणावे पा ॥92॥
अशाप्रकारे, जीवाच्या अंगबळाने ह्या मायारुप नदीतून तरून जाता येते हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे, ते सांगतो.
93-7
जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसि दुर्जनाची बुद्धी । की रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥93॥
जर पथ्य न करणाराची व्याधि टळेल, साधूला दुर्जनाची बुद्धि कळेल, किंवा विषयासक्त पुरुष सिद्धि प्राप्त झाली असता तिला सोडील;
94-7
जरी चोरा सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ॥94॥
जर चोरांची सभा भरेल, अथवा माशाला गळ गिळिता येईल, किंवा भित्र्याला भिऊन पिशाच माघारे फिरेल.
95-7
पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥95॥
जर हरणाचे पाडस जाळे कुरतुडील, किंवा मुंगी मेरु पर्वत ओलांडील, तरच जीवांना (आपल्या स्वतःच्या शहाणपणाने) मायानदी तरुन पलीकडल्या तीरी जाता येईल !


96-7
म्हणऊन गा पंडुसता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैसी मायामय हे सरिता । न तरवे जीवा ॥96॥
म्हणून, हे पंडुसुता, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही, त्याप्रमाणे ही मायारुप नदी जीवाला तरवत नाही.
97-4
येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावे मज भजले । तया ऐलीच थडीये सरले । मायाजळ ॥97॥
येथे जे मला अनन्यभावाने शरण येतात, ते फक्त ह्या दुस्तर नदीतून सहज तरून जातात. इतकेच नव्हे, तर ते अलीकडच्या कांठी असतांनाच मायारुप जल पार नाहीसे होते.
98-7
जया सद्गुरु तारू पुढे । जे अनुभवाचे कासे गाढे । जया आत्मनिवेदन तरांडे । आकळले ॥98॥
ज्यांना सद्गुरू हाच नावाडी असुन ज्यांनी ब्रह्माची कास बळकट धरली आहे, व ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे;
99-7
जे अहंभावाचे ओझे सांडूनि । विकल्पाचिया झुळका चुकाऊनि । अनुरागाचा निरुता होऊनि । पाणिढाळु ॥99॥
जे अहंभावाचे ओझे टाकुन, विकल्परूपी वारा चुकवून, आणि बायकामुलांच्यावरील अनुरागरूपी पाण्याची धार टाळून,
100-7
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैलतीरा । झेपावले जे ॥100॥
ते जीवात्म्यांचे ऐक्य हाच उतार त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील काठाला जाऊन पोहोचतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ७७ वा, १८, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९१३ ते ९२४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ९१३
भावबळे विष्णुदास । नाही नाश पावत ॥१॥
योगभाग्ये घरा येती । सर्व शक्ती चालता ॥धृपद॥
पित्याचे जे काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥
तुका म्हणे कडे बैसो । तेणे असो निर्भर ॥३॥
अर्थ

हरी हा त्याच्या भक्तांच्या भाव याचा भुकेला आहे त्यामुळे हरी भक्तांचा कधीही नाश होत नाही त्यामुळे योग भाग्य शक्ती घरी चालत येतात. पित्याचे धन हे पुत्रालाच मिळणार आहे त्यापासून त्याल कोण आडवणार आहे म्हणजे देवाच्या प्रेम हे फक्त त्याच्या भाक्तालाच मिळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या हरीचे लहान मुले आहोत आम्ही त्याच्या कडेवर बसून निर्भय राहू आमचा सर्व भर त्याच्यावरच आहे आम्ही त्याचावर च निर्भर आहोत.
अभंग क्र. ९१४
कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाही ओल ॥१॥
कोण यांचे मना आणी । ऐके कानी नायकोनि ॥धृपद॥
घरोघरी सांगती ज्ञान । भूस सिणे कांडिती ॥२॥
तुका म्हणे आपुल्या मति । काय रिती पोकळ ॥३॥
अर्थ

देवाविषयी काहीही माहित नसलेल्या देवा विषयी कुठल्याही प्रकारचे प्रेम नसलेले माणसे जे शिकले आहेत ते फक्त सांगतात त्याला कुठल्याही प्रकारचे प्रेम नसते अश्या या गोष्ठी कोरड्या व चावट पणाचे आहेत. व अश्या चावट व्यक्तीचे बोलणे कोण मनापासून ऐकेल ? ऐकले तरी ते लोकांनी न ऐकावे. हे असे लोक घरो घरी जाऊन लोकांना ज्ञान सांगतात परंतु जसे कण टाकून भुसा कांडावा तसे ते असते. असे अल्प ती लोक तुकाराम महाराज म्हणतात असे अल्प मती असणारे लोक जे ज्ञान सांगतात ते निरर्थक व पोकळ असते.
अभंग क्र. ९१५
नव्हतियाचा सोस होता । झडो आता पदर ॥१॥
देखणे ते देखियेले । आता भले साक्षित्वे ॥धृपद॥
लाभ कळो आली हानि । राहो दोन्ही निराळी ॥२॥
तुका म्हणे एकाएकी । हा का लोकी पसारा ॥३॥
अर्थ
खरतर प्रपंच हा नव्हताच पण आता हे देवा त्याचा पदर झाडू दे. जे सद्चीद आंनद मला पाहायचे होते ते मी आता साक्षित्वाने पहिले आहे. हा आंनदाचा लाभ कळून आल्या मुळे आता देवाचे लाभ कळून आले आहे व आता लाभ व हानी या पासून आम्ही वेगळे राहू. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकटेच आहोत मग हा बाह्य पसारा मी लोकांमध्ये का मांडू ?
अभंग क्र. ९१६
सोसे वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥
ऐसे बरवे वचन । करितो तो नारायण ॥धृपद॥
असे प्रारब्ध नेमे । श्रमचि उरे श्रमे ॥२॥
सुख देते शांती । तुका म्हणे धरिता चित्ती ॥३॥
अर्थ
प्रपंच हा माझा आहे असे जर विचार केले तर दोष वाढतच जातात व तो प्रपंच काही केल्या पालटत नाही आपण जे करतो आहे ते मी करतो असे म्हणण्या पेक्षा नारायणाच करत आहे असे म्हणणे योग्य होय. खरे तर प्रारब्धाने चसर्व गोष्ठी होत असतात पण प्रपंचाचे अधिक कष्ट घेतेले तर त्यामुळे कष्टच होतात. तुकाराम महाराज म्हणतात जर आपण सुख चित्तात धरले तर शांती आपोपाच मिळेल.
अभंग क्र. ९१७
काय शरीरापे काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करू ॥१॥
देईन हाक नारायणा । ते तो नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धावेल ॥धृपद॥
सातांपाचांचे गोठले । प्रारब्धे आकारले । आता हे संचले । असो भोग सांभाळी ॥२॥
फावली ते बरवी संधि । सावधान करू बुद्धी । तुका म्हणे मधी । कोठे नेघें विसावा ॥३॥
अर्थ
शरीराला हरी भजनाचे शिवाय दुसरे काय काम आहे जे काही कर्म आपल्या वाट्याला आले आहे ते उचित मार्गाने करावे तेंव्हा हरीचे प्रेम व कृपा आपल्याला मिळेल त्यावेळेला हरीचे प्रेम मिळेल. नारायणाला प्रेमाने हाक मारील मग बंधने कशी राहतील ? मग माझी प्रेमाची हाक ऐकून तो पंढरीचा राणा धावत माझ्या कडे येईल. हे शरीर सात धातू व पंच महाभूते यांच्या सहाय्याने बनले आहे व प्रारब्धाने हे आकाराला आले आहे मग हे भोग भोगण्या करिता त्याच्या स्वाधीन राहु. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या प्रारब्धाने हा नर देह आपल्याला प्राप्त झाला आहे आता हीच संधी साधून बुद्धी सावध करून विश्रांती न सतत या देवा ला हाक मारत राहू.
अभंग क्र. ९१८
न लगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥
येतो बैसलिया ठाया । आसने व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचे ॥धृपद॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरेचि लक्षी । आवडीने भक्षी । कोरडे धान्य मटमटा ॥२॥
घेणे तरि भाव । लक्षी दासांचा उपाव । तुका म्हणे जीव । जीवी मेळविल अनंत ॥३॥
अर्थ

हरीची प्राप्ती करण्यासाठी देश काळ मंत्र विधान याची गरज नसते त्याची करुणा भाकली की त्याची प्राप्ती होते. आपण जेथे जाऊ बसू त्या ठिकाणी हा हरी येतो हरी भजन केले कि हि काया म्हणजे शरीर पवित्र होते व हेच पवित्र शरीर त्याचे अधिष्टान होते. भक्तांच्या मनात चाललेला विचार कल्पनेचा तो साक्षी असतो भक्ताने दिलेले अन्न धान्य तो मटामता यो आवडीने खातो. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या मनातील भाव ओळखू तो परमात्मा त्यांना त्यांच्याशी ऐक्य करून घेतो.
अभंग क्र. ९१९
भक्तिसुख नाही आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करू ॥१॥
नसावे जी तुह्मी काही निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥धृपद॥
एकाएकी मन नेदी समाधान । देखिल्या चरण वाचूनिया ॥२॥
तुका म्हणे वाचा गुणी लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥३॥
अर्थ

भक्ती प्रेमसुख हे हरी भक्ता वाचून इतर कोणालाही कळणार नाही. मग तो कोणीही असो पंडित असो, वाचक असो, ज्ञानी असो तरीदेखील त्यांना भक्ती सुख समजणार नाही. मग कोणी आत्मनिष्ठ किंवा जीवन मुक्त जरी झाले तरी त्यांना भक्ती सुख दुर्लभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही श्रद्धेने भक्तिभावनेने नारायणाचे नाम घेतले तरच तो तुमच्यावर कृपा करेल, नक्की करेल आणि मग तुम्हाला भक्तीचे खरे वर्म व मर्म कळेल.
अभंग क्र. ९२०
मागता विभाग । कोठे लपाल जी मग ॥१॥
संत साक्षी या वचना । त्यासी ठाउकिया खुणा ॥धृपद॥
होइन धरणेकरी । मग मी रिघो नेदी बाहेरी ॥२॥
तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥
अर्थ
हे देवा आम्ही जर आमचा वाटा आमची मागणी तुम्हास मागावयास आलो तर तुम्ही कोठे लपून बसला ? आमचा तुमच्या कडे वाटा आहे हे संत या वाचनाचे साक्ष आहेत. मग मी तुझ्या दारात धरणे धरून बसेल व तुला बाहेर जाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण मी अक्षर रूप आहे व तुझ्या माथ्यावर देव पणाचा भार आहे त्यामुळे तुला माझ्या विनंतीचा विचार करावा लागेल व माझ्या विनंती पुढे तुझे काहीही चालणार नाही.
अभंग क्र. ९२१
जिंकावा संसार । येणे नावे तरी शूर ॥१॥
येरे काय ती बापुडी । कीर अहंकाराची घोडी ॥धृपद॥
पण ऐशा नावे । देवा धरिजेतो भावे ॥२॥
तुका म्हणे ज्यावे । सत्कीर्तीने बरवे ॥३॥
अर्थ

जो संसाराला जिंकतो तोच खरा शूर असतो व त्याचेच नांव शूरत्व आहे. बाकीचे माणसे हि मूर्ख आहेत कि बाकीच्यांच्या देहरूपी घोड्यावर अहंकार स्वार असतो. प्रतिज्ञा अशी करावी की, आपण देवाला दृढ हृदयात धरावे. तुकाराम महाराज म्हणतात जगणे असे असावे की, आपली कीर्ती कायम उरावी.
अभंग क्र. ९२२
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनी ॥१॥
कोण पडे ये लिगाडी । केली तैसी उगवा कोडी ॥धृपद॥
केले सांगितले काम । दिले पाळूनिया धर्म ॥२॥
तुका म्हणे आता । असो तुमचे तुमचे माथा ॥३॥
अर्थ

हे पांडुरंगा तुम्ही आमच्या मागे प्रपंच रुपी दुख लावले आहे व तुम्हीच आमचे दुख मिटवू शकता. तुम्ही जर तसे करीत नसला तर तुमच्या भानगडीत कोण पडेल ? तुम्हीच संसारचा गुंता केला व तुम्हीच या संसाराचा गुंता सोडवा. तुम्ही जे मला धर्म पालनाचे कर्म सांगितले आहे ते मी केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या कर्तव्याची जबाबदारी तुमच्याच माथ्यावर आहे.
अभंग क्र. ९२३
समर्पीली वाणी । पांडुरंगी घेते धणी ॥१॥
पूजा होते मुक्ताफळी । रस ओविया मंगळी ॥धृपद॥
धार अखंडित । ओघ चालियेला नित्य ॥२॥
पूर्णाहुति जीव । तुका घेऊनि ठेला भाव ॥३॥
अर्थ

मी माझी वाणी पांडुरंगालाच अर्पण केली आहे व ती वाणी या माझ्या धन्याचेच नांव घेत आहे हे हरी माझ्या मगल ओवियांनी तुझे मंगल गीत गातो तीच तुला वाहिलेली मुक्ताफळे व पूजा आहे. नामचिंतनाच्या चाललेल्या अखंडित धरा ने मी पांडुरंगाला स्नान घालत आहे व तो नामचिंतनाच ओघ नित्य चालू आहे. तुकाराम महाराज म्हणतात नामचिंतनाचा ओघ नित्य चालू असतांना हा यज्ञ पूर्ण झाल्यावर मी जीवाचे म्हणजे माझ्या आत्मस्वरुपाची आहुती त्यात देणार आहे व प्रसाद ग्रहण करणार आहे.
अभंग क्र. ९२४
अवघाचि आकार ग्रासियेला काळे । एकचि निराळे हरीचे नाम ॥१॥
धरूनि राहिलो अविनाश कंठी । जीवन हे पोटी साठविले ॥धृपद॥
शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरे नव्हे ॥२॥
तुका म्हणे आता उपाधीच्या नावे । आणियेला देवे वीट मज ॥३॥
अर्थ

या विश्वातील जे काही आकार दिसतात ते काळाने ग्रासले आहे फक्त एक हरीचे नामच काळाच्याही पलीकडचे आहे. अविनाश नाम हे हरीचे आहे म्हणून मी ते नाम कंठी धरण केले आहे व माझ्या हृदयात जीवनात देखील हे नाम साठविले आहे. आहो हि शरीर संपत्ती मृगजळाप्रमाणे आहे तिचा नाश होणार आहे तिचे रूपही खरे नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, या उपाधीचा म्हणजे प्रपंचाचा मला वीट आला आहे.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading