आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२३ मार्च, दिवस ८२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ९७३ ते ९८४
“२३ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २३ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २३ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९७३ ते ९८४ चे पारायण आपण करणार आहोत.
२३ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १ ते २५,
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥ अक्षरब्रह्मयोग ॥
अध्याय आठवा
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अर्जुन उवाचः
किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥8. 1॥
1-8
मग अर्जुने म्हणितले । हा हो जी अवधारिले । जे म्या पुसिले । ते निरूपिजो ॥1॥
मग अर्जुन म्हणाला, ” अहो देवा ! ऐकले का ? मी जे विचारले ते मला स्पष्ट करून सांगा.
2-8
सांगा कवण ते ब्रह्म । काइसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥2॥
ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव, अथवा अध्यात्म कशाला म्हणतात,
3-8
अधिभूत ते कैसे । एथ अधिदैव ते कवण असे । हे उघड मी परियेसे । तैसे बोला ॥3॥
अधिभूत कसे, आणी या जगात अधिदैवत कोण आहे, हे मला नीट समजेल असे सांगा. “
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥8. 2॥
4-8
देवा अधियज्ञ तो काई । कवण पा इये देही । हे अनुमानासि काही । दिठी न भरे ॥4॥
” देवा, अधियज्ञ तो काय, व तो या देहांत कोणता, हे अनुमानाने नीट लक्षात येत नाही.
5-8
आणि नियता अंतःकरणी । तू जाणिजसी देहप्रयाणी । ते कैसेनि हे शारंगपाणी । परिसवा माते ॥5॥
हे शांर्गपाणि, ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्यांना अंतकाली तुम्हाला कसे ओळखता येते, हे मला चांगल्या रीतीने समजवा. “
6-8
देखा धवळारी चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा । तरी वोसणताही बोल तयाचा । परी सोपु न वचे ॥6॥
(ज्ञानोबाराय म्हणतात) पहा की, चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला, तर तो जरी झोपेंत बरळला तरी त्याचे बरळणे व्यर्थ जात नाही,
7-8
तैसे अर्जुनाचिया बोलासवे । आले तेचि म्हणितले देवे । परियेसे गा बरवे । जे पुसिले तुवा ॥7॥
त्याचप्रमाणे, अर्जुनाच्या मुखातून जी वाक्ये आली त्याबरोबर देव म्हणाले, ” तू जे काही पुसलेस ते नीट ऐक. “
8-8
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥8॥
किरीटी हा कामधेनूचा बछडा असुन कल्पतरूच्या मंडपांत बांधलेला आहे, अर्थात् त्याच्या मनातील सर्व हेतु सिद्धींस जातात यात नवल ते काय ?
9-8
कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी । मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥9॥
श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात, तो देखील ब्रह्मस्वरूपाला पावतो, मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही ?
10-8
जै कृष्णाचेया होइजे आपण । तै कृष्ण होय आपुले अंतःकरण । मग संकल्पाचे आंगण । वोळगती सिद्धी ॥10॥
ज्या वेळेस कृष्णाचे आपण भक्त व्हावे, त्या वेळी आपले अंतःकरण कृष्णरूप बनते; मग संकल्परूप अंगणात (आपल्या मनात जे जे संकल्प येतील, ते ते पूर्ण करण्याकरिता) ऋद्धिसिद्धि सहज हात जोडून उभ्या असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-8
परि ऐसे जे प्रेम । अर्जुनीचि आथि निस्सीम । म्हणऊनि तयाचे काम । सदा सफळ ॥11॥
परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम, ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच अमर्याद आहे, म्हणून त्याच्या मनकामना नेहमी पूर्ण होतात.
12-8
या कारणे श्रीअनंते । ते मनोगत तयाचे पुसते । होईल जाणूनि आइते । वोगरूनि ठेविले ॥12॥
म्हणूनच, अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारील, असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेविले.
13-8
जे अपत्य थानी निगे । त्याची भूक ते मातेसीचि लागे । एऱ्हवी ते शब्दे काय सांगे । मग स्तन्य दे येरी ॥13॥
स्तनपान करुन दुर खेळत असलेल्या बालकाला भूक लागली आहे, हे त्याच्या आईलाच समजते. नाही तर त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते ?
14-8
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी । हे नवल नोहे काही । परि ते असो आइका काई । जे देव बोलते जाहले ॥14॥
अर्थात् कृपाळू अशा सद्गुरूचे ठिकाणी (आपल्या शिष्यासंबंधी) असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवल नव्हे. पण हे असो; देव जे काही बोलले ते ऐका.
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित ॥8. 3॥
15-8
मग म्हणितले सर्वेश्वरे । जे आकारी इये खोकरे । कोंदले असत न खिरे । कवणे काळी ॥15॥
मग सर्वेश्वर म्हणाले – जे या फुटक्या आकारात (देहांत) ओतप्रोत भरलेले असुन कोणत्याही वेळी नाश पावत नाही
16-8
एऱ्हवी सपूरपण तयाचे पहावे । तरि शून्यचि नव्हे स्वभावे । वरि गगनाचेनि पालवे । गाळूनि घेतले ॥16॥
बरे, त्याचा सुक्ष्मपणा पहावा तर स्वभावतः ते शुन्य नव्हे, पण अति पातळ अशा आकाशाच्या पदराने गाळून घेतलेले आहे;
17-8
जे ऐसेही परि विरूळे । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेही न गळे । ते परब्रह्म ॥17॥
अशा प्रकारचे जे विरळ आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून (शरीरांतून) हालवले असताही गळत नाही, त्याला ‘ परब्रह्म ‘ असे म्हणतात.
18-8
आणि आकाराचेनि जालेपणे । जन्मधर्माते नेणे । आकारलोपी निमणे । नाही कही ॥18॥
आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने त्याचे जे धर्म त्याला जे जाणत नाही, व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही,
19-8
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥
हे सुभद्रापते, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठिकाणी निरंतर सहज स्थिति असते, त्याला अध्यात्म असे म्हणतात.
20-8
मग गगनी जेवि निर्मळे । नेणो कैची एक वेळे । उठती घनपटळे । नानावर्णे ॥20॥
मग, निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-8
तैसे अमूर्ती तिये विशुध्दे । महदादि भूतभेदे । ब्रह्मांडाचे बांधे । होचि लागती ॥21॥
त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मांत प्रकृति – अहंकारादि भेदांनी ब्रह्मांडांचे आकार होऊ लागतात.
22-8
पै निर्विकल्पाचिये बरडी । की आदिसंकल्पाची फुटे विरूढी । आणि ते सवेचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची ॥22॥
परंतु कल्पनातीत शुद्धब्रह्माच्या माळ जमिनीत, मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होऊन, त्याला लागलीच ब्रह्मांडाचे धोंडे (आकार) उत्पन्न होऊन त्यांनी तो लवतो.
23-8
तया एकैकाचे भीतरी पाहिजे । तव बीजाचाचि भरिला देखिजे । माजी होतिया जातिया नेणिजे । लेख जीवा ॥23॥
आकारांत पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरलेला आहे असे दिसते, आणि त्या प्रत्येकांत किती जीव होतात व जातात याची गणना करता येत नाही.
24-8
मग तयागोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हे असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥24॥
मग त्या ब्रह्मांडांच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून असंख्यात आदिसंकल्प उत्पन्न होतात. असो, अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो.
25-8
परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥25॥
परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेकरूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते.
दिवस ८२ वा, २३, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९७३ ते ९८४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ९७३
कृपेचे उत्तरे देवाचा प्रसाद । आनंदी आनंद वाढवावा ॥१॥
बहुतांच्या भाग्ये लागले जाहाज । येथे आता काज लवलाहो ॥धृपद॥
अलभ्य ते आले दारावरी फुका । येथे आता चुका न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे । माप भरा बरे सिगेवरी ॥३॥
अर्थ
हरी कृपेने हरीविषयी बोलण्याचा प्रसाद मिळून आंनद वाढावा. अनेकांच्या भाग्याने विठ्ठल रुपी जहाज येथे लागले आहे त्यामुळे आपले काम पटकन साधून घ्यावे. अलभ्य म्हणजे दुर्मिळ वस्तू आपल्या दारावर फुकट आली आहे आता त्या वस्तूचा लाभ चुकवू देवू नका. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीव्हाने व श्रवणाने हृदय भांडारात शीग लागे पर्यंत हरिरूप माल भरून घ्या.
अभंग क्र. ९७४
पापपुण्य सुखदुःखाची मंडळे । एक एकाबळे धाव घेती ॥१॥
कवतुक डोळा पाहिले सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥धृपद॥
स्वर्गाचिया भोगे सरता नरक । मागे पुढे एक एक दोन्ही ॥२॥
तुका म्हणे भय उपजले मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥
अर्थ नाही टाका तपासा
अभंग क्र. ९७५
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥
केला असता अंगीकार । न मनी भार समर्थ ॥धृपद॥
संसाराचा नाही पाग । देवे सांग सकळ ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाणू । मध्ये नाणू संकल्प ॥३॥
अर्थ
पापी लोक दिलेल्या वाचनाला जगात नाही पण आमचा नारायण तसा नाही. त्या नारायणाने माझा अंगीकार केलेला आहे त्यामुळे त्याला माझा भार वाटत नाही. देवाने मला कहीही कमी केलेलं नाही व संसाराचा उपद्रवही मला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या नारायणाची कीर्ती मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता करत राहू.
अभंग क्र. ९७६
कथा करोनिया मोल ज्यापे घेती । ते ही दोघे जाती नरकामध्ये ॥१॥
ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा । अखंड स्मरा रामनाम ॥धृपद॥
मधुरवाणीच्या नका पडो भरी । जाल यमपुरी भोगावया ॥२॥
तुका म्हणे करी ब्रम्हांड ठेंगणे । हात पसरी जिणे धिग त्याचे ॥३॥
अर्थ
हरी कथा करून जो द्रव्य घेतो व देतो ते दोघेही नरका मध्ये जातात. राम नाम घेऊन पूर्ण ब्रम्हचा अनुभव घ्या. आचरण सत्याचे पाहिजे नाहीतर नुसते गोड बोलण्याच्या भारी पडू नका नाही तर तुम्हाला यमपुरी जावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भक्तीने ब्रम्हांड ठेंगणे करा जो पोट भरण्यासाठी हात पसरवितो त्याचे जिने हे धिक्कार कारक आहे.
अभंग क्र. ९७७
गोड नावे क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥
तैसे जाणा ब्रम्हज्ञान । बापुडे ते भक्तीविण ॥धृपद॥
रुची नेदी अन्न । ज्यात नसता लवण ॥२॥
अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचेचि नाम ॥३॥
तुका म्हणे तारा । नांव तंबुऱ्याच्या सारा ॥४॥
अर्थ
खीर गोड असते कारण त्यात साखर असते. त्याचा प्रमाणे नुसते ब्रम्हज्ञान असून उपयोग नाही तर भक्तीही लागते. अन्नात जर मीठच नसेल तर ते अन्न रुचत नाही. आंधळ्याला जर शिकवले तर आपल्याला फक्त शब्दाचेच काय श्रम होतील ते होतील. तुकाराम महाराज म्हणतात तंबोऱ्याला सर्व तारा सर्व एका सुरात जुळलेले पाहिजे त्याप्रमाणे भक्तीतही प्रेमाची साथ पाहिजे.
अभंग क्र. ९७८
नम्र जाला भूता । तेणे कोंडिले अनंता ॥१॥
हेचि शूरत्वाचे अंग । हारी आणिला श्रीरंग ॥धृपद॥
अवघा जाला पण । लवण सकळा कारण ॥२॥
तुका म्हणे पाणी । पाताळपणे तळा आणि ॥३॥
अर्थ
नम्रता हा गुण ज्याने आपल्या हृदयात धरण केला त्याने या हरीला जो अंनत स्वरूप आहे आपल्या हृदयात त्याला कोंडून ठेवले. हरीला प्रेमाने जिंकणे हेच खरे शूरत्वाचे अंग आहे. ज्या प्रमाणे सर्व रुचकर भोजनाला मीठ हे कारण असते त्या प्रमाणे आपल्या हृदयातील नम्रतेमुळे हरी आपल्यला आधीन होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणेपाणी पातळ असल्यामुळे खोल तळला जाते तसेच नम्रता या गुण मुळे सखोल अश्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होत असते.
अभंग क्र. ९७९
आपुल्या महिमाने । धातु परिसे केले सोने ॥१॥
तैसे न मनी माझे आता । गुणदोष पंढरिनाथा ॥धृपद॥
गावामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥
तुका म्हणे माती । केली कस्तुरीने सरती ॥३॥
अर्थ
परिसा या धातू मध्ये अशी काही नैसर्गिक शक्ती आहे कि ते लोखंडालाही सोने बनविते. त्याप्रमाणे हे पंढरीनाथा तू माझे गुण दोष, जाणता मला आपलेसे करून घ्यावे. माझे जीवन अमृत मय करावे. आहो देवा गावातील नदी ओढ्या नाले हे जेंव्हा गंगेला जाऊन मिळतात तेंव्हा गंगा त्यांना अमंगल मानीत नसते. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा कस्तुरीचा सहवास केल्या मुळे मातीलाही सुगंध येतो.
अभंग क्र. ९८०
तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण ॥१॥
ऐशी ज्ञानाचे डोबडे । आशा विटंबिली मूढे ॥धृपद॥
उपदेश तो जगा । आपण सोवळा इतका मांगा ॥२॥
रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्फीत ॥३॥
अर्थ नाही अभंग टाका
अभंग क्र. ९८१
ब्रम्हचारी धर्म घोकावे अक्षर । आश्रमी विचार षटकर्मे ॥१॥
वानप्रस्थ तरी संयोगी वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥धृपद॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथे याती धर्म कुळ नाही ॥२॥
बोले वर्म जो चाले या विरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥
तुका म्हणे काही नाही नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥
अर्थ
ब्रम्हचारी माणसाने वेदाचे अध्ययन करावे. व गृहस्ताश्रम स्वीकारल्यावर यजन, याजन, अध्यन, अध्यापन, दान आणि प्रतिगृह हि सहा कर्मे करावी. वानप्रस्थाश्रमा मध्ये माणसाने स्त्री पुरुष एकत्र जरी असले तरी त्यांनी वियोग धरून वागावे व जो संन्यास आश्रम मध्ये आहे त्याने सर्व संकल्पाचा त्याग करावा. परम हंस स्थितीत तो मनुष्य मुक्त असून त्याने धर्म कुल जात असे माणू नये. या वेदाच्या वर्मा नुसार चालावे व या विरहीत जो चालतो तो पापी समजावा असे श्रुती सांगते. तुकाराम महाराज म्हणतात वेदाने सांगितले तसेच वागावे व जो तसे वागत नाही त्याला कष्ट व दुखः होतात.
अभंग क्र. ९८२
आम्ही क्षेत्रीचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाही केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥
आले अयाचित अंगा । सहज ते आम्हा भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करिता निश्चिंती ॥धृपद॥
दंड धरिला दंडायमान । मुळी मुंडिले मुंडण । बंदी बंदाचि कौपीन । बहिरवास औटडे ॥२॥
काळे साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकी विटाळ । धरूनि असो एकांत ॥३॥
कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वे नेमिली । एका नेमे केली । स्वरूपीच वोळखी ॥४॥
नव्हे वेषधारी । तुका आहाच वरीवरी । आहे तैसी बरी । खंडे निवडि वेदांची ॥५॥
अर्थ
देह क्षेत्र जर मानले तर आम्ही त्यामधील संन्यासी आहोत व या देहात म्हणजे क्षेत्रात हृषिकेष भरलेला आहे व आम्ही आमच्या मनातून आशा व वासना बाहेर काढून टाकल्या आहे. आहो देणारा दाता हा पांडुरंग आहे असे आम्ही दृढ निश्चयाने सांगतो व त्यामुळे आम्ही आयाचित पणे राहत आहे. आम्ही या हृशिकेषाचा दंड धरण केला असून अज्ञानाचे मुळासहित मुंडण केले. व त्रीबंधाचे कौपिन घालून देह वृत्ती नाहीशी केली. आम्ही आमचे मूळ स्वरूप जाणून त्या ठिकाणी निश्चळ झालो आहे लौकिकाचा विटाळ धरून आम्ही एकातात आलो आहोत. कार्यापुरते आम्ही कार्य करतो व आमची वाणी या हरीशी एकरूप झाली म्हणून आम्ही एकत्वाच्या नियमाने या हरीचे स्वरूप ओळखले. तुकाराम महाराज म्हणतात मी ढोंगी साधू प्रमाणे वेश धरण करणारा नाही तर वेदातील जे उपयोगी खंडे सूत्रे आहेत तेच निवडू मी तुम्हाला सांगत आहे.
अभंग क्र. ९८३
निर्वाहापुरते अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोपी गुहा ॥१॥
कोठे ही चित्तासी नसावे बंधन । हृदयी नारायण साठवावा ॥धृपद॥
नये बोलो फार बैसो जनामधी । सावधान बुद्धी इंद्रियदमी ॥२॥
तुका म्हणे घडी घडीने साधावी । त्रिगुणाची गोवी उगवूनि ॥३॥
अर्थ
उदार निर्वाहापुर्तेच अन्न वस्त्र असावे व राहण्या साठी म्हणजे आश्रमाचे स्थान हे झोपडीत अथवा गुंफात असावी. चित्तात कसलेही बंधन नसावे हृदयात हा नारायण साठवावा. फार बोलू नये व फार लोकांन मध्ये नसावे. बुद्धी सावधान करून इंद्रियांचे दमन करावे. तुकाराम महाराज म्हणतात क्षणक्षणाणे हरी स्मरण करून त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन हरी प्राप्ती करून घ्यावी.
अभंग क्र. ९८४
याचि नावे दोष । राहे अंतरी किल्मिष ॥१॥
मना अंगी पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥धृपद॥
बिजाऐसी फळे । उत्तम का अमंगळे ॥२॥
तुका म्हणे चित्त । शुद्ध करावे हे हित ॥३॥
अर्थ
अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवणे हा दोष होय. मनात जर शुभ संकल्प तयार केले तर पुण्य व अशुभ संकल्प निर्माण केले तर पाप होते या करिता मनात शुभ संकल्प मानत ठेवावे. जसे बीज असते त्याप्रमाणे चांगले वाईट फळ येते. तुकाराम महाराज म्हणतात आपले हृदय शुद्ध करावे यातच आपले हित आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















