१४ मार्च, दिवस ७३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४७६ ते ४९७ सार्थ तुकाराम गाथा अभंग ८६५ ते ८७६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१४ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १४ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १४ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८६५ ते ८७६ चे पारायण आपण करणार आहोत.


१४ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४७६ ते ४९७,

476-6
अथवा निलागे निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥
अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरुन प्रवास करितात,
477-6
जे भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जे पूज्य । सकळा सदा ॥477॥
जे भजन करणारांच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञीय विषय, अशा प्रकारे सर्वास पुज्य
478-6
तेचि तो आपण । स्वयं जाहला निर्वाण । जे साधकांचे कारण । सिद्ध तत्व ॥478॥
आणि साधकांचे सिद्धतत्त्व, ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो.
479-6
म्हणोनि कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियासि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥479॥
म्हणून, तो कर्मनिष्ठाना वंद्य व ज्ञान्यांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय.
480-6
पै जीवपरमात्मसंगमा । जयाचे येणे जाहले मनोधर्मा । तो शरीरीचि परि महिमा । ऐसी पावे ॥480॥
हे पहा की, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झाल्याकारणाने, तो देही असुनही अशा योग्यतेस पावतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

481-6
म्हणोनि याकारणे । तूते मी सदा म्हणे । योगी होई अंतःकरणे । पंडुकुमरा ॥481॥
म्हणून अर्जुना, याच कारणास्तव ‘ तू योगी हो. ‘ असे मनापासुन तुला मी नेहमी सांगत असतो.

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥47॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥6॥
482-6
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे । आणि सुखसर्वस्व माझे । चैतन्य तो ॥482॥
अरे योगी देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर, आणि केवळ माझा प्राण असे समज
483-6
जया भजता भजन भजावे । हे भक्तिसाधन जे आघवे । ते मीचि जाहलो अनुभवे । अखंडीत ॥483॥
त्याच्या ठिकाणी भजन करणारा, भजनक्रिया व भज्य वस्तु ही भक्तीची त्रिपुटी सदोदित राहते.
484-6
मग तया आम्हा प्रीतीचे । स्वरुप बोली निर्वचे । ऐसे नव्हे गा तो साचे । सुभद्रापती ॥484॥
हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरुप वर्णन करिता येत नाही. तर असे समज की, तो म्हणजे प्रत्यक्ष मीच.
485-6
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडे पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥485॥
अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते, त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह व तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही !

486-6
ऐसे भक्तचकोरचंद्रे । त्रिभुवनैकनरेंद्रे । बोलिले गुणसमुद्रे । संजयो म्हणे ॥486॥
संजय म्हणतो :- राजा भक्तरूप चकोरांचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा, व गुणांचा समुद्र जो श्रीकृष्ण परमात्मा, तो असे बोलला.
487-6
तेथ आदिलापासोनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था । दुणावली हे यदुनाथा । पावो सरले ॥487॥
तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची आस्था होतीच; ती पुनः दुप्पट झाली, असे यदुनाथाने मनात जाणले,
488-6
की सावियाचि मनी तोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणे हरिखे आता उपलवला । निरुपील ॥488॥
आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहज आनंद झाला की, मी जे सांगतो, ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन हा आरसाच होय. तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील.
489-6
तो प्रसंगु आहे पुढा । जेथ शांतु दिसे उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ॥489॥
तो प्रसंग पुढे असुन त्यात शांतिरस स्पष्ट दिसेल; व ज्ञानरुप बीजाचा मुढा उघडा होईल.
490-6
आनजे सात्विकाचेनि वडपे । गेले आध्यात्मिक खरपे । सहजे निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ॥490॥
जे ज्ञानबीज पेरण्याकरिंता सत्त्वगुणाची वृष्टि होऊन, व आध्यात्मीक तापांचे गुंतडे वाहून जाऊन, चतुर श्रोत्यांच्या चित्तांचे वाफे सहज तयार झाले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

491-6
वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृतीसी ॥491॥
त्यावर सोन्यासारखी अवधानाची वाफसा साधल्यामुळे श्रीनिवृत्तिनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली.
492-6
ज्ञानदेव म्हणे मी चाडे । सद्गुरुंनी केले कोडे । माथा हात ठेविला ते फुडे । बीजचि वाइले ॥492॥
ज्ञानदेव म्हणतात :- ते बिज पेरण्याकरिंता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली, व माझ्या मस्तकावर हात ठेवून ते बीज चाड्यात घातले.
493-6
म्हणऊनि येणे मुखे जे जे निगे । ते संतांच्या हृदयी साचचि लागे । हे असो सांगो श्रीरंगे । बोलिले जे ॥493॥
म्हणून, या माझ्या मुखातून जे जे काही निघेल, ते संतांच्या मनाला खरेच भासते. हे असो, आता श्रीरंग जे काही बोलले, ते पुढे सांगेन
494-6.
परी ते मनाचा कानी ऐकावे । बोल बुद्धीचा डोळा देखावे । हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥494॥
परंतु ते लक्ष देऊन ऐका. बुद्धीने त्याचा विचार करा. त्याला चित्त अर्पण करुन त्याचा अर्थ घ्या,
495-6
अवधानाचेनि हाते । नेयावे हृदयाआंतौते । हे रिझवितील आयणीते । सज्जनांचिये ॥495॥
व अवधानरूप हाताने ते आपल्या ह्रदयात सांठवा; म्हणजे सज्जनांच्या मनाला हे रमविणारे आहे.

496-6
हे स्वहिताते निवविती । परिणामाते जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जीवा ॥496॥
ह्या बोलापासून नित्य आत्मप्राप्ति होईल, संकटातून मुक्तता होईल, व जीवाला सुखप्राप्ति होईल.
497-6
आता अर्जुनेसी श्रीमुकुंदे । नागर बोलिजेल विनोदे । ते वोवियेचेनि प्रबंधे । सांगेन मी ॥497॥
आता, श्रीमुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितील, ते मी ओवी नामक कवितेत तुम्हाला सांगेन.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां – आत्मसंयमयोगोनाम् षष्ठोऽध्यायः ॥6॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ७३ वा, १४, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८६५ ते ८७६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ८६५
भोवंडीसरिसे । अवघे भोवतचि दिसे ॥१॥
ठायी राहिल्या निश्चळ । आहे अचळी अचळ ॥धृपद॥
एके हाकेचा कपाटी । तेथे आणीक नाद उठी ॥२॥
अभ्र धावे शशी । असे ते ते दुसरे भासी ॥३॥
अर्थ

जर भोवळ आली म्हणजे चक्कर आली तर असे भासते की आपल्या भोवतालचे सर्व काही फिरू लागले आहे. आणि आपली भोवळ राहिली कि सर्व स्थिर असल्याचे दिसते. पर्वता खाली उभा राहुन मोठ्याने हाक मारली तर आपल्याला आपला प्रती ध्वनी ऐकू येतो. तुकाराम महाराज म्हणतात जेंव्हा आकाशाती ढग धावू लागतात तेंव्हा आपल्याला चंद्रच धावतो असे भासते.
अभंग क्र. ८६६
नव्हो आम्ही आजिकाळीची । काची कुची चाळवणी ॥१॥
एके ठायी मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥धृपद॥
तुमचे आमचेंसे काही । भिन्न नाही वाटले ॥२॥
तुका म्हणे जेथे असे । तेथे दिसे तुमचासा ॥३॥
अभंग क्र. ८६७

योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभय लोकी कीर्ती सोहळा मान ॥१॥
येर येरांवरी जायांचे उसणे । भाग्यस्थळी देणे झाडा वेसी ॥धृपद॥
केलिया फावला ठायीचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥२॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे । शिवपद जीवे भोगिजेल ॥३॥
अभंग क्र. ८६८
मरणाहाती सुटली काया । विचारे या निश्चये ॥१॥
नासोनिया गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥धृपद॥
न देखे से जाले श्रम । आले वर्म हाता हे ॥२॥
तुका म्हणे कैची कीव । कोठे जीव निराळा ॥३॥
अर्थ

अहंम ब्रम्हास्मि या महा वाक्याचा मला बोध झाला त्यामुळे माझा जीव जन्म मरणाच्या चक्रातून सुटला आहे. त्यामुळे माझी सर्व प्रकारची तळमळ नष्ट झाली आहे व मी ब्रम्ह पदाचा आंनद भोगत आहे. ब्रम्ह पदाचा आंनद घेतल्यामुळे हे मी ब्रम्ह आहे हे वर्म हाती लागल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास मला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता कोणत्याही प्रकारचे मागणे शिल्लक राहिले नाही कारण जीव हा शिव रूप झाला आहे. यांची जाणीव मला झाली आहे.
अभंग क्र. ८६९
नव्हे ब्रम्हचर्य बाइलेच्या त्यागे । वैराग्य वाउगे देशत्यागे ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारे । सांडारे ते धीरे आचावाच ॥धृपद॥
कापवूनि टिरी शूरत्वाची मात । केले वाताहात उचित काळे ॥२॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मुळ स्तुति होता ॥३॥
अर्थ
काहीतरी कारणास्तव पत्नीचा त्याग केला किंवा भीती पोटी देशाचा त्याग केला तर त्याला वैराग्य प्राप्त होत नाही. वासनेच्या वासनेच्या लहरीमुळे काम आणि भय वाढते त्यामुळे त्याचा दृढ निश्चयाने त्याग करावा. जो शूरत्वाच्या गप्पा मारतो आणि युद्धाच्या गोष्टी एकूण घाबरतो त्याची युद्धाच्या काळात फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात जो खोट्या वैराग्याच्या गोष्ठी करतो त्याची स्तिती आपण करू नये कारण आपली जीभ वितळते.
अभंग क्र. ८७०
नको सांडू अन्न नको सेवू वन । चिंती नारायण सर्व भोगी ॥१॥
मातेचिये खांदी बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥धृपद॥
नको गुंफो भोगी नको पडो त्यागी । लावुनि सरे अंगी देवाचिया ॥२॥
तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा । उपदेश वेगळा उरला नाही ॥३॥
अर्थ

हरी प्राप्ती साठी अन्न त्याग करवा असे काही नाही तसेच वनात जाऊन राहावे असेही काही नाही सर्व कर्म करत असतांना नारायणाचे स्मरण करावे. बाळ ज्या वेळी आईच्या खांद्यावर बसते त्यावेळी त्याला चालण्याचा त्रास होत नाही कारण आईच्या प्रेमाशी तो एकरूप झालेला असतो त्या प्रमाणे नारायणाचे नारायाणाशी ऐक्य पळून आपले कर्तव्य करावे. जे जे कर्म करशील तू त्याचा त्याग कर. तुकाराम महाराज म्हणतात हाच एक परमार्थ श्रेष्ठ मार्ग आहे या पेक्षा वेगळा उपदेशच नाही.
अभंग क्र. ८७१
अवघी मिथ्या आटी । राम नाही जव कंठी ॥१॥
सावधान सावधान । उगवी संकल्पी हे मन ॥धृपद॥
सांडिले ते मांडे । आग्रह उरल्या काळे दंडे ॥२॥
तुका म्हणे आले भागा । देउनि चिंती पांडुरंगा ॥३॥
अर्थ

रामनाम कंठात जो पर्यंत येत नाही तो पर्यंत सर्व आटाआटी प्रयत्न व्यर्थच आहत त्यामुळे तू सावध हो सावध हो सर्व संकल्पनातूनमोहाच्या जाळ्यातून मनाची सुटका कर. एखाद्या गोष्टीचा त्याग केला आणि त्याचा पुन्हा स्वीकार केला तर मग यम दंड करतो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भाग्यात जे आले आहे ते पांडुरंगाला अर्पण करून पांडुरंगाचे चिंतन करत जा.
अभंग क्र. ८७२
न संगावे वर्म । जनी असो द्यावा भ्रम ॥१॥
उगीच लागतील पाठी । होती रितीच हिंपुटी ॥धृपद॥
शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटी ॥२॥
तुका म्हणे सीण । होईल अनुभवाविण ॥३॥
अर्थ

आपणास ब्रम्ह ज्ञान झाले हे वर्म लोकांना समजू देऊ नये आपण सामान्य आहोत असे लोकांना समजलेले बरे आपण ब्रम्हज्ञानी आहोत हे जर लोकांना समजले तर उगाच ते आपल्या पाठीशी लागतील आणि आपण काही सांगावयास गेलो तर ते कष्टी होतील. एखादी गोष्ट आपण चांगली शिकविली तर लोक तसे वागत नाहीत. आपण अनुभवलेल्या गोष्टी लोकांना अनुभावाविनच सांगितल्या तर त्यांना केलेला उपदेश हा आपल्यालाच शीण होईल.
अभंग क्र. ८७३
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटी वाहो नये ॥१॥
होणार ते घडो होणाराच्या गुणे । होईल नारायणे निर्मीले ते ॥धृपद॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाई । याचे नांव काय पुण्य असे ॥२॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खरे ॥३॥
अर्थ

एका जातीची दुसऱ्या भिन्न जातीशी भेट करून देऊ नये उदारणार्थ कासायाची गाईशी, वाघाची गाईशी, कधीही भेट करून देऊ नये. जे होणार आहे ते होणाऱ्याच्या गुणा नुसार होऊ द्या नारायणाने निर्मिले आहे तसे होईल. वाघाला जर भूक लागली असेल म्हणून त्याला गाय द्यावी याचे नांव पुण्य आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात जो मनुष्य विचार न करता काहीही कृत्य करतो त्याचे माता पिता हे गाढवेच म्हणावे.
अभंग क्र. ८७४
शाहाणिया पुरे एकचि वचन । विशारती खुण तेचि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतांकारणे । घेतला तो मने पाहिजे हा ॥धृपद॥
फांसावेना तरि दुःख घेते वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥
तुका म्हणे नको राग धरू झोंडा । नुघडिता पीडा होईल डोळे ॥३॥
अर्थ

शाहन्या व्यक्तीला एक इशारच खूप असतो त्याला पुढील ज्ञान समजून घेण्यासाठी तो इशाराच खूप असतो. संत उपदेश सर्वाना करतात परंतु संतांचा उपदेश एकाग्र मानाने घेतला पाहिजे. एखाद्याला जर गळू झाले तर ते कापणे योग्य नाही तर ते वाढून जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे निर्लज्जा मी केलेल्या उपदेशाचा राग तू माणू नको जर तू लवकरच आपले डोळे उघडले नाही तर तुलाच पिडा होईल.
अभंग क्र. ८७५
अभिनव सुख तरि या विचारे । विचारावे बरे संतजनी ॥१॥
रूपाच्या आठवे दोन्ही ही आपण । वियोगे तो क्षीण होत नाही ॥धृपद॥
पूजा तरि चित्ते कल्पावे ब्रम्हांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥
तुका म्हणे माझा अनुभव यापरि । डोई पायावरी ठेवीतसे ॥३॥
अर्थ

आपण कृत्य अस करवे की, ज्याने आपल्याला सुख प्रप्त होईल याचा मार्ग संतांना विचारवे. स्वरूपाचा विचार केला त्याचे स्मरण केले तर असे लक्षात येते की जीव व स्वरूप एकच आहे त्याचा क्षण भरही वियोग होत नाही. हरी हा सर्वत्र आहे असे जाणून पूजा करणे योग्य पण तो एक विशिष्ट ठिकाणी आहे समजून पूजा केली तर ती व्यर्थच. तुकाराम महाराज म्हणतात मी स्वतः विठोबाच्या चरणांवर मस्तक ठेवतो हा माझा अनुभव आहे सर्वत्र मी विठोबाचे रूप पाहतो.
अभंग क्र. ८७६
नटनाटय तुम्ही केले याच साठी । कवतुके दृष्टी निववावी ॥१॥
नाही तरि काय कळलेचि आहे । वाघ आणि गाय लाकडाची ॥धृपद॥
अभेदचि असे मांडियेले खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥
तुका म्हणे रूप नाही दर्पणात । संतोषाची मात दुसरे ते ॥३॥
अर्थ

हे देवा तुम्ही हया जगाचा नट आणि नाट्य उभे केले व तुम्हीच कवतुकाने हे नाटक पाहता. नाही तरी आम्हाला हे कळाले आहे वाघ आणि गाय हि वेगळी जरी दिसली तरी एकाच लाकडाची आहे म्हणजे सर्व जगात तुमचे स्वरूप आहे. जसे एका दिव्याच्या ज्योती पासून अनेक दिपके लावली जातात त्याप्रमाणे तुम्ही अभेद रूपाचा जगद रुपी खेळाचा पसारा मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात जसे दर्पणात आपले खरे रूप प्रतिबिंबित होते पण ते खरे नसते द्वैताचा भास होत असल्यामुळे आपल्याला सुख वाटते.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading