१९ मार्च, दिवस ७८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ९२५ ते ९३६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १९ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९२५ ते ९३६ चे पारायण आपण करणार आहोत.


१९ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १०१ ते १२५,

101-7
ते उपरतीचा वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावे पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटी ॥1॥
हात टाकीत ‘अहंब्रह्म ‘ या भावाच्या बळावर पोहून निवृत्तिरूपी तटावर निर्विघ्नपणे निघतात.
102-7
येणे उपाये मज भजले । ते हे माझी माया तरले । परी ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाही ॥2॥
या उपायाने जे मला भजतात, तेच या मायारुप नदीतून तरून जातात; परंतू असे भक्त अगदी विरळा. फार नाहीत.
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥7. 16॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय:॥7. 17॥

103-7
जे बहुता एका अवांतर । अहंकाराचा भूतसंचार । जाहला म्हणोनि विसर । आत्मबोधाचा ॥103॥
कारण, त्या एकाशिवाय इतर सर्व प्राण्यांना अहंकाररूप भूताचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरुपाचा विसर पडतो.
104-7
ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे । पुढीले अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जे न करावे । वेदु म्हणे ॥104॥
त्या वेळी त्यास नियमरूपी वस्त्राचे भान रहात नाही, अधोगतीची लाज नाहींशी होते, आणि ते वेदबाह्य वर्तणूक करितात.
105-7
पाहे पा शरीराचिया गावा । जयालागी आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनिया ॥105॥
अर्जुना, असे पहा की, या शरीररुप गावात ज्या कार्याकरिता आले, तो सर्व कार्यभाग सोडुन,


106-7
इंद्रियग्रामीचा राजबिदी । अहंममतेचिया जल्पवादी । विकारांतरांची मांदी । मेळवूनिया ॥106॥
या इंद्रियसमुदायरूप राजमार्गावर अहंममतेची बडबड करण्याकरिता कामक्रोधादिक विकारांचा समुदाय गोळा करितात;
107-7
दु:खशोकाचा घार्इ । मारिलीयाची सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥107॥
आणि दुःख व शोक यांचे घाव पडत असतांही त्यांना त्यांची आठवण सुद्धा नसते. हे सांगावयाचे कारण काय म्हणशील, तर ते मायेने ग्रासलेले असतात.
108-7
म्हणोनि ते माते चुकले । आइका चतुर्विध मज भजले । जिही आत्महित केले । वाढते गा ॥108॥
म्हणून ते मला मुकतात; परंतु फक्त चौघांनीच, ज्यांनी माझे भजन केले त्यांनी आत्महीत वृद्धिंगत केले.
109-7
तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासू बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥109॥
त्या चौघांपैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासु, तिसऱ्याला अर्थार्थी, व चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात.
110-7
तेथ आर्तु तो आर्तीचेनिव्याजे । जिज्ञासु तोजाणावयाचिलागी भजे । तिजेनि तेणे इच्छिजे । अर्थसिद्धि ॥110॥
आर्त हा दुःखनिवारणासाठी मला भजतो, जिज्ञासु ज्ञानप्राप्तीकरता भजतो, आणि तिसरा जो अर्थार्थी तो द्रव्यप्राप्तीचे इच्छेने मला भजतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


111-7
मग चौथियाचा ठायी । काहीचि करणे नाही । म्हणोनि भक्तु एकु पाही । ज्ञानिया जो ॥111॥
परंतु चौथा जो असतो, त्याला काहीच कर्तव्य नसतांही तो मला भजतो, म्हणून तो एक ज्ञानी पुरुषच माझा भक्त होय हे ध्यानात ठेव.
112-7
जे तया ज्ञानाचेनि प्रकाशे । फिटले भेदाभेदाचे कडवसे । मग मीचि जाहला समरसे । आणि भक्तुही तेविचि ॥112॥
कारण, त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने भेदाभेदरूप अहंकार नाहीसा होतो, व मग त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो मद्रूप होऊन बसतो, व त्याची भक्तीही तशीच कायम असते.
113-7
परी आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगता तो ॥113॥
परंतु स्फटिक मणि जसा उदकमय दिसतो, तसा हा ज्ञानी पुरुष इतरांच्या दृष्टीला दिसतो तसा नव्हे; त्याचे वर्णन करताना कौतुक वाटते.
114-7
जैसा वारा का गगनी विरे । मग वारेपण वेगळे नुरे । तेवि भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥114॥
ज्याप्रमाणे वारा हा गगनांत शांत झाल्यावर मग त्याचे वारेपण वेगळे उरत नाही, त्याप्रमाणे हा जरी मद्रूप झाला, तरी त्याचा भक्ताचा बाणा जात नाही.
115-7
जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । येऱ्हवी गगन तो सहजे । असे जैसे ॥115॥
जर वारा हालवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा भासतो, येऱ्हवी गगन आणि तो ज्याप्रमाणे एकच,


116-7
तैसे शरीरे हन कर्मे । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरे प्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥116॥
त्याचप्रमाणे शरीरासंबंधी सर्व कर्माच्या आचरणाने तो माझा भक्त वाटतो; परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मद्रूपच असतो
117-7
आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणे । मी आत्मा ऐसे तो जाणे । म्हणऊनि मीही तैसेचि म्हणे । उचंबळला सांता ॥117॥
आणि ज्ञानप्राप्तीच्या उजेडाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो, म्हणून मीही संतोष पावून त्याला आपला आत्मा असे म्हणतो.
118-7
हा गा जीवापैलीकडिलिये खुणे । जो पावोनि वावरोही जाणे । तो देहाचेनि वेगळेपणे । काय वेगळा होय ॥118॥
जो जीवपणाच्या पलीकडील खुण समजून घेऊन व्यवहारांत वागतो, तो देह धारण केल्यामुळे माझ्यापासून वेगळा होईल का पहा बरे !
उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥7. 18॥

119-7
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोहि भक्त झोंबे । परी मीचि करी वालभे । ऐसा ज्ञानिया एकु ॥119॥
म्हणून आपल्या हिताकरिता हवा तो मनुष्य माझी भक्ति करतो, परंतु मी ज्याच्यावर प्रीति करतो असा एक भक्त ज्ञानीच होय.
120-7
पाहे पा दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करिताहे फासा । परी दोरेवीण कैंसा । वत्साचा बळी ॥120॥
हे पहा की, दुधाच्या आशेने सर्व लोक गाईला फासा घालतात, परंतु आपल्या वासराला फासा शिवाय ती कसे दूध पाजते ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


121-7
का जे तनुमनुप्राणे । ते आणिक काहीचि नेणे । देखे तयाते म्हणे । हे माय माझी ॥121॥
का तर, त्याला दुसरी काही एक गोष्ट माहीत नसून आपल्या तनमनप्राणाने ते आईलाच ओळखत असते; आणि जी वस्तु पाहील ती माझी आई आहे असे समजते,
122-7
ते येणे माने अनन्यगती । म्हणूनि धेनूहि तैसीचि प्रीती । यालागी लक्ष्मीपति । बोलिले साच ॥122॥
अशा प्रकारे ते वासरू अनन्य भक्त असते म्हणून त्याच्यावर गायही तशीच प्रीति करते. यास्तव लक्ष्मीपति (कृष्ण) जे बोलले ते खरे.
123-7
हे असो मग म्हणितले । जे का तुज सांगितले । तेही भक्त भले । पढियंते आम्हा ॥123॥
हे असो. मग म्हणतात :- ज्ञान्याशिवाय जे तुला इतर भक्त सांगितले, तेही माझे आवडते आहेत.
124-7
परी जाणोनिया माते । जे पाहो विसरला माघौते । जैसे सागरा येऊनि सरिते । मुरडावे ठेले ॥124॥
त्यांना माझे ज्ञान झाले म्हणजे मग ते परत फिरणे विसरतात. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे माघारी फिरणे खुंटते,
125-7
तैसी अंत:करणकुहरी जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली । तो मी हे काय बोली । फार करू ? ॥125॥
त्याचप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणरूपी दरीतून अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली तो मद्रूप झाला. हे वर्णन किती करू ?

दिवस ७८ वा, १९ मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९२५ ते ९३६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ९२५
बोलणेचि नाही । आता देवाविण काही ॥१॥
एकसरे केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥धृपद॥
पाहेन ते पाय । जोवरी हे दृष्टि धाय ॥२॥
तुका म्हणे मने । हेचि संकल्प वाहाणे ॥३॥
अर्थ
या हरी शिवाय आता दुसरे बोलणे व्यर्थ आहे त्यामुळे दुसरे काहीच बोलायचे नाही. असा आम्ही दृढ नेम केला आहे. काम आणि क्रोध हे देवालाच अर्पण करायचे माझ्या दृष्टीचे समाधान होई पर्यंत या हरीचे चरण कमल मी पाहणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा दृढ संकल्प माझ्या मनात नित्य असतो.
अभंग क्र. ९२६
येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥
उंच देवाचे चरण । तेथे जाले अधिष्ठान ॥धृपद॥
आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥
तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलो अचळ ॥३॥
अर्थ

आता पासून जे सृष्टीचे मूळ भाव असतात ते हरी पासुन उत्पन्न झालेले असून ते फक्त साक्षपणे पाहायचे आहे. हरीचे चरण हे उच्च स्थान असून ते माझे अधिष्टान आहे. हे हरीचरण म्हणजे विविध प्रकारच्या आघातापासून वेगळे असे निर्मळ स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चरणाचे स्थळ हृदयात धरून मी आढळ राहिलो आहे.
अभंग क्र. ९२७
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥
भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथे देव । विरहित संकल्पा ॥धृपद॥
दिला पाडूनिया धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणे आपुलाल्या ॥२॥
तुका म्हणे पराधीने । जाली ओढलिया ॠणे । तुटती बंधने । जरि देवा आळविती ॥३॥

अर्थ नाही टाका
अभंग क्र. ९२८
आला भागासी तो करी वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायी ॥१॥
काय चाले तुह्मी बांधले दातारा । वाहिलिया भारा उसंतितो ॥धृपद॥
शरीर ते करी शरीराचे धर्म । नको देऊ वर्म चुको मना ॥२॥
चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥
इंद्रिये करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायी ॥४॥
तुका म्हणे नको देऊ काळा हाती । येतो काकुळती म्हणऊनि ॥५॥
अर्थ

हे नारायणा माझ्या भाग्यास जो व्यवसाय आला आहे तो मी करीन पण तुझ्या चरणी माझा दृढ भाव राहू दे. हे दातारा, तुम्ही आम्हाला कर्माच्या जोडीला बांधल्यामुळे आमचे काय चालणार आहे ? पण या कर्माचा भार आम्ही आमच्या माथ्यावर घेऊन चालत असतो. हे देवा शरीर काय करणार शरीराचे जे काही कर्म आहे ते चालू दे तुझे चिंतनाचे जे वर्म आहे मर्म आहे ते चुकू देऊ नकोस. या देहाचे विकार मला अनेक ठिकाणी फिरवतात परंतु देवा तुझ्या चिंतनात मला आळस येऊ देऊ नको. माझ्या इंद्रियांचे व्यापार चालू दे पण तुझ्या पायाशी मला थारा दे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला या काळाच्या हाती देऊ नकोस म्हणून मी तुला काकुळती येऊन विनंती करत आहे.
अभंग क्र. ९२९
आम्हा अवघे भांडवल । एक विठ्ठल एकला ॥१॥
कायावाचामनोभावे । येथे जीवे वेचलो ॥धृपद॥
परते काही नेणे दुजे । तत्त्वबीजे पाउले ॥२॥
तुका म्हणे संतसंगे । येणे रंगे रंगलो ॥३॥
अर्थ
एक विठ्ठलच येथे आम्हाला भांडवल आहे. काय वाचा मन भावाने आम्ही आमचा जीव या हरीच्या चरणी अर्पण केला आहे. हे विठ्ठला तुमचे चरण हे सर्व तत्त्वाचे बीज आहे या वाचून आम्ही दुसरे काहीच जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत संगतीने मी हरीच्या रंगात रंगू गेलो आहे.
अभंग क्र. ९३०
साहोनिया टोले उरवावे सार । मग अंगीकार खऱ्या मोले ॥१॥
भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर । संचिताचे थार मोडूनिया ॥धृपद॥
महत्वाचे ठायी भोगावी अप्रतिष्ठा । विटवावे नष्टा पंचभूता ॥२॥
तुका म्हणे मग कैचा संवसार । जयाचा आदर तेचि व्हावे ॥३॥
अर्थ
ज्या प्रमाणे हिरा घनाचे टोले सहन करून त्याची सिद्धता सिद्ध करतो त्याप्रमाणे ज्याचे अंतःकारण सर्व सोसतो त्याला देवा सहाय्य करतो. देह प्रारब्धाच्या स्वाधीन करून जो सर्व प्रकारची सुख दुखे भोगतो त्याचे सर्व संचित जाळून जाते. जे आपल्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे त्या ठिकाणी आपण आपली अप्रतिष्ठा करून घ्यावी कारण हा पंच महा भुताचा देह नष्ठ होणार आहे याची निंदा करून घ्यावी कारण हा देह नश्वर आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे केल्यावर संसार कसा राहील मग तुम्हाला ज्याच्या विषयी तुम्हाला आदर आहे त्या हरीशी तुमचे एक्य होईल.
अभंग क्र. ९३१
निर्वैर होणे साधनाचे मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥
नाही चालो येत सोंगसंपादणी । निवडे अवसानी शुद्धाशुद्ध ॥धृपद॥
त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्‍या कारणा पुरता विधि ॥२॥
तुका म्हणे राहे चिंतनी आवडी । येणे नावे जोडी सत्यत्वेसी ॥३॥
अर्थ

सर्वाशी निर्वैर होणे हे सर्व साधनांचे मूळ आहे बाकी इतर खटपट त्यामानाने कमी प्रतीचे आहेत. परमार्थात कुठलेही ढोंग चालत नाही शेवटी शुध्द व अशुध्ह काय याचा निवडा होत असतो. सर्व प्रकारच्या वासना नाहीश्या होणे याला त्याग म्हणतात विधी पूर्वक कार्य करणा पुरते विषयाचे सेवन याला त्याग म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला एका हरी चिंतनाची आवड निर्माण होते तोच खरा होय आणि त्याचेच नाते सत्याशी जोडले जाते हाच त्याचा लाभ होय.
अभंग क्र. ९३२
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणी विषयांचे ॥१॥
ठेवूनिया लोभी लोभ । जाला क्षोभ आत्मत्वी ॥धृपद॥
केला आणिका वाढी पाक । खाणे ताक मूर्खासी ॥२॥
तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥
अर्थ

आहो, ज्ञानी माणसाने विषयाचे जर श्रवण केले तर त्यांची हि वर्तणूक प्राण्यांना सारखी होते विषयांचा जर लोभ निर्माण झाला तर चित्तात क्षोभ निर्माण हिते आत्मज्ञांच्या जाणिवेत कमतरता येत. मूर्ख लोक चांगला स्वयंपाक तयार करून दुसऱ्याला वाढतात आणि आपण तक पिऊन भूक भागवितात. तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकाचा घात होऊन त्यांच्या देहाची वाताहत होते.
अभंग क्र. ९३३
का जी धरिले नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥
कोणा सांगतसा ज्ञान । ठकाठकीचे लक्षण ॥धृपद॥
आवडीने नाचे । आहे तरी पुढे साचे ॥२॥
तुका म्हणे प्रेम । नाही भंगायाचे काम ॥३॥
अर्थ
आहो देवा, तुम्ही निष्काम आहात नामरहित आहात तर मग तुम्ही नाम का धरण केले ? तुम्ही नामरहित आहत हे ज्ञान तुम्ही कोणाला सांगता ? हे सर्व फसवण्याचे लक्षण आहे. आमच्या पुढे तुमचे खरे रूप आहे व त्याच्याच पुढे आम्ही नाचत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या या कोरड्या ब्रम्हज्ञान च्या सांगण्याने वर्णनाने आमचा तुमच्या सगुण रुप विषयीचे प्रेम कधी भंगणार नाही.
अभंग क्र. ९३४
खरे बोले तरी । फुकासाठी जोडे हरी ॥१॥
ऐसे फुकाचे उपाय । सांडूनिया वाया जाय ॥धृपद॥
परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥
तुका म्हणे मळ । मने सांडिता शीतळ ॥३॥
अर्थ
मनुष्याने नुसते आयुष्यभर खरे बोलण्याचे व्रत जरी धरण केले तरी या हरीचे फुकट प्राप्ती होते. असे फुकटचे उपाय असून लोक आपले आयुष्य वाया घालवितात. एका सत्य वचनामुळे अनेक पर उपकार होतात. तुकाराम महाराज म्हणतात मनाने जर आतरिक मळ म्हणजे दुष्ट वासनेचा मळ काढून टाकला तरी मन हेशीतल राहते.
अभंग क्र. ९३५
दया क्षमा शांति । तेथे देवाची वसति ॥१॥
पावे धावोनिया घरा । राहो धरोनिया थारा ॥धृपद॥
कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥
तुका म्हणे घडे । पूजा नामे देव जोडे ॥३॥
अर्थ

जेथे दया क्षमा शांती असते तेथे देवाची वसती असते. जो कीर्तन करतो त्याच्यासाठी जसा दुष्काळात मनुष्य अन्नासाठी धावतो तसा देवा त्याच्याकडे धावत येतो. तुकाराम महाराज म्हणतात देवाचे नुसते नांव जरी घेतले तरी तो आपल्याला प्रत्येक्ष भेटावयास येतो.
अभंग क्र. ९३६
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखे ॥१॥
त्याचा फळे उपदेश । आणिका दोष उफराटे ॥धृपद॥
त्याचे खरे ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावी ॥२॥
तुका म्हणे सत्य सांगे । येवोत रागे येतील ते ॥३॥
अर्थ

शिष्याकडून जो सेवा करून न घेता त्याला देवासारखे मानतो, त्या गुरूचा उपदेश शिष्याला फळ प्राप्त करून देतो व इतर जे गुरु शिष्यांकडू सेवा करून घेतात त्यांना मात्र दोष लागतो. जो स्वतःच्या देहभावा विषयी उदासीन झालेला असतो त्याला खरे ब्रम्हज्ञान झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्याचा कोणाला राग जरी आला तर येऊ द्या.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading